मला भावलेला कारंजा!

मला भावलेला कारंजा!

पुर्वरंग :

माझ्या जर्मनीच्या वास्तवात.. शनिवार रविवार काय करायच हा नेहमिच प्रश्न पडायचा. महिन्याचा बस/ ट्राम/ ट्रेनचा पास असल्यामुळे मी त्याचा पुरेपुर वापर केला. हे करत असताना.. एक दिवस. मी फ्रंकफ्रट ते बाद्सोड्न ही ट्रेन पकडली. आणि मनात कुठे जायच हे आधि ठरवल नसल्यामुळे.. शेवटच्या थांब्या वर ऊतरु अस ट्रेन मधे बसल्या वर ठरवल. शेवटचा थांबा हा बादसोदन (Bad Soden) adहोता.

ह्या जागेची मला आधि काहीच माहिती नव्ह्ती... तीथे गेल्या वर थोडा वेळ आजु बाजुला फीरु आणि नंतरची परतायची ट्रेन पकडायची हे ठरवल...

एकदाच बाद्सोदन गावं आलं. मनात एक प्रकारची भीती होती..... पण आता आलोच आहे तर पाहून घेवु....

स्टेशनच्या बाहेर आल्यावर...रस्त्यावर एकदम शांतता होती.. रविवार असल्यामुळे दुकान बंद होती... १५-२० पावल पुढे गेल्यावर एका गल्लीत.. काही दुकान दिसली... २-३ म्हातारे आजी आजोबा बंद दुकानाच्या काचेच्या खिडक्यातुन दुकानातल्या वस्तु बघत होते.. माझीपण ईच्छा झाली काय पाहात आहे ते पाहण्याची.... ह्ळुह्ळू पुढे सरकत गेले..ते दुकान कपडयाचे होते...

थोड पुढे गेले तर.. एक मोठा मंच दिसला.. त्यावर संगित वाजवणार्याू जोडप्याचा पुतळा होता.... आजुबाजुला फुलझाडांची झाडे होती.. परीसर छान वाटत होता.. म्हणुन थोड पुढे जाण्याच धाडस केल.

Garden-Stage

(URL:

http://farm3.static.flickr.com/2437/3616665120_fd74eaf5e3.jpg
)
आवडलेला कारंजा :

पुढे गेल्यावर एका कारंज्या कडे लक्ष्य वेधल्या गेल..

एक म्हातारे जोडप.. हया कारंज्याच्यांवर असलेल्या पुतळ्याशी खेळत होते. त्याचा कुई कुई आवाज येत होता... जस जुना मोठा दरवाजा खुप दिवसांनी ऊघडल्या वर जसा आवाज येतो तसा....

माझ कुतूहल वाढल..... ते जोडप पुढे गेल्यावर मी त्या कारंज्याच्या जवळ गेले... तर... काय गंमत... धातुचे नाच गाण्याच्या तयारीत असलेले ५-६ जोडप्याचे पुतळे होते... आपल्या हाताने मी एका पुतळ्याला जरा गोल फिरवल... हाताला, पायाला फिरवल... डोक फिरवल.. प्रत्येक वेळी नविन आकार समोर आला. फेर धरुन नाच चालु असल्याचा भास झाला.

मध्यभागी असलेला भागात जो पुतळा होता त्याच्या एका बाजुला (समोर) चंद्र तर एका बाजुला (मागच्या) सुर्य होता.

लहान मुला सारख... प्रत्येक पुतळ्याला हात लावला... त्याच्याकडे वरुन खाली नजर फिरवली... खुप सुरेख पुतळे होते....
मी बरेच फोटो काढले... पण...

माझ्या संग्रहातले फोटो खराब झाले. सध्या एकच फोटो माझ्या जवळ आहे...

Karanja

(URL:
http://farm4.static.flickr.com/3619/3616665204_f01cbcd082.jpg )

खुप मजा वाटली... मनाशीच हासत होते. एकटीच असल्या मुळे मोठयाने हासायचे टाळले.

हया कारंज्याची अधीक माहिती मीळवण्याचा प्रयन्त केला पण काही हाती आले नाही...

मला असे वाटतेकी हा कारंजा "the Fountain of Champagn"" असावा म्हणुन. पण नक्की माहित नाही.

थोड अवांतर:

थोडे पुढे गेले... एका बगीच्यात एका खडयात एक नळ होता चांगला सुशोभित केला होता. काहीजण ते जवळ जावुन पाहात होते... नंतर कळले इथे गरम पाण्याचे झरे होते...हे गावं स्पा (वेगवेगळो द्र्व्य लावुन केलेली आंघोळ) साठी प्रसिध्द आहे.... ह्या वरुनच ह्या गावाचे नाव “बाद सोदन” हे पडल.

एका रंगेबिरंगी आणि जरा वेगळ्या आकाराच्या घरा कडे लक्ष्य गेल...कळलेकी हे घर जर्मनीच्या प्रसिध्द वास्तुविशारद हुनड्रेजवास्सेरच (Hundertwasser) आहे.

Hundertwasser

(URL:
http://farm3.static.flickr.com/2478/3615846009_cc19dcc5ec.jpg
)

घरी परतायची वेळ झाली होती... पुढची ट्रेन मीळते की नाही याची काळजी वाटत होती... परतीची ट्रेन मीळाली....

मनात एक प्रकारचा आनंद झाला होता... आता पर्यन्त पाहीलेला हा सगळ्यात चांगला कारंजा होता... मला खुप भावला....

लेखनविषय: दुवे:

Comments

ह्ळुह्ळू

सुचना : "ह्ळुह्ळू" हा शब्द "हळु हळु" असा वाचावा.

हळूहळू

आपण हळूहळू सरकतो. बाई ह्ळु ह्ळु किंवा हळु हळु. पण लेख वाचनीय.
अवांतर: मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत ध्द हे अक्षर नाही. याचा उच्चार करणेही अतिशय अवघड आहे. घ झ ढ ध भ या व्यंजनांना य-व-र-ल-ण-न-म यांखेरीज अन्य व्यंजने जोडल्यास जोडाक्षराचा उच्चार करणे महा कठीण! --वाचक्‍नवी

वा

रसिकही शिल्पकृती बनवण्यात सहभागी होऊ शकतो, अशा कारंज्याचे वर्णन छान आहे.

वा

अनोळखी ठिकाणी एकट्याने आणि पूर्वयोजना न करता फिरण्याची मजा औरच असते. छान माहिती दिली आहे. आतापर्यंत जर्मनीत जाऊन आलेल्यांपैकी एकाहीकडून या भागाची माहिती मिळाली नव्हती.

अधिक पद्धतशीर, प्रमाण लेखनाचे नियम सांभाळून केलेले लेखन असल्यास अधिक मजा येईल. शीर्षक वाचून मला कारंजा हे महाराष्ट्रातल्या एखाद्या जागेचे नाव वाटले होते, लेख वाचताना ते कारंजा नसून कारंजे किंवा कारंजं आहे हे कळले. शुद्धलेखनाचा फारसा आग्रह नाही, परंतू लिहिताना अर्थाचा अनर्थ किंवा निरर्थ होऊ नये एवढीच अपेक्षा.(एखाद्या ठिकाणी कारंज्याला कारंजा असेच म्हणत असतील, तर त्याची कल्पना नाही). तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास वाचनाचा आनंद द्विगुणित होईल.
राधिका

+१

लेख आवडला. काहि तपशील रोचक आहेत.

मात्र मलाहि कारंजा हे विदर्भातील मुर्तिजापूर जवळ असलेलं एक दत्ताचं स्थान वाटलं

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

 
^ वर