मिशन इंस्तानबुल

भारता बाहेर कामासाठी काही दिवसांसाठी जायचे म्ह्टले की खुप कंटाळा येतो. नको ती नोकरी..... इतरांना खुप लाखोली वाहुन, ….कशी तरी मनाची तयारी करायची. मनाची तयारी करत मिशन इंस्तानबुल हाती घेतले......१५ दिवसांचे होते.

टर्कीला जायचा होत. इस्तांबुलला...कधी विचारपण केला नव्ह्ता...टर्की .. तु़र्कस्तान ह्या देशाबद्द्ल... आमच्या कंपनी कडुन टर्कीला जाणारी मी पहीलीच.. त्यात पण मुलगी, माझ्या सारखेच त्याना पण द्डपण आले होते. ज्या कंपनीचे काम करायचे होते त्या कंपनीच्या वरीष्ठ अधि़कार्यांोनी दिलासा दिला, आमच्या देशात आम्ही काळजी घेऊ, काही कमतरता पडणार नाही वॅगरे... मुस्लिम धर्मौचे वर्चस्व असणारा हा देश... त्या मुळे मनात एक प्रकारची धासती... ती वेगळी सांगयला नकोच.

हो नाही, हो नाही करत टर्की ला जायचा दिवस उजाडला....महत्वाची कागद पत्र कंपनी मधुन गोळा केली.. शेवटच्या क्षणा पर्यंत धावपळ चालु होती. कंपनी कडुन जाणार म्हणुन जास्त काळजी वाटत नव्ह्ती. राह्ण्याची सोय, विमानाचे तिकीटं, त्या द॓शात चालणार॓ चलन - प॑॓स॓ , या सगळ्यांची सोय कंपनीकडुन झाली होती.

फ॓ब्रुवारी महिना होता. तीथे हीमवर्षाव चालु होता, मनात थोडी भीती होती. पहिल्यादांच अनुभवणार होती. थंडीत आपले कसे होणार... अमेरीकेला जाऊन आलेल्याच्या सुचनांचा मान राखुन… थंडीत घालयचे कपडे सोबत घेतले होते.

मुंबई - फ्रंकफ्रट - इस्तांबुल असा विमान प्रवास होता. फ्रंकफ्रटला आमचे विमान ऊशिरा पोचले... फ्रंकफ्रट विमानतळ कसे आहे हे पाह्यला वेळच मिळाला नाही... झोपेतच होते मी. त्यामुळे पुढचे विमान पकडण्यासाठी खुप घाई झाली. धावपळ करत विमान पकडले. या धावपळीत विमान सेवा कर्मचारी वर्गाची खुप मदत झाली. .... इस्तांबुलला पोह्चल्या वर... आपले सामन घेण्यासाठी उभी होती.... धावत्या पट्टीवर आपले सामान आता येईल मग यईल करत वाट बघत होते... सामान काही दिसले नाही..... इकडे तीकडे पाह्यला सुरवात केली. तीथे ऊभ्या असलेल्या कर्मचारी वर्गाची मदत घेतली... मला समजेल अशा इंग्रजीत त्यानी मला सांगितले की सामान नंतरच्या विमानाने येईल.... काळजी करु नका... तुम्ही ज्या ठीकाणी राहणार आहे तीथला पत्ता द्या. ... माझ्या सारखें दोघे तिघे होते.... बघितंल ते काय करतात ते.... कदाचीत त्याना या प्रसंगाची सवय असेल... त्यानचा अनुभव आपल्या कामी पडेल... पण ते पण माझ्यासारखेच... एकमेकान कडे बघत होतो … दुसरा काही पर्याय नसल्यामुळे... मी पत्ता दिला....

विमानतळाच्या बाहेर आल्यावर सगळीकडे कापुस पिंजुन टाकल्यासारखं वाटत होते. काही कर्मचारी यंत्रानी रस्यातला बर्फ बाजुला करत होते..... मला हे बघताना गंमत वाटत होती...

थोडा वेळ विसरुनच गेली की मला टॅक्सी पकडयची आहे. टॅक्सीसाठी परत इकडे तिकडे बघायला सुरवात केली. टॅक्सीवाल्याला होटॅलचा पत्ता सांगितला... पॅसे कीती द्यायचे ते ठरविले.. टर्कीचे चलन टर्कीश लीरा आहे. अमेरीकन डॉलर हे चलन तिथे चालत. माझ्या कडे अमेरीकन डॉलर होते.. त्यामुळे अमेरीकन डॉलर मधेच भाडं ठरल.... होटॅलवर गेली.. आरक्षण असल्यामुळे काही त्रास झाला नाही. होटॅल खुप छांन होत... पण दमली असल्यामुळे कधी एकदाची खोलीत जाते आणि झोपते असे झाले होते... दोन्ही देशांच्या वेळेत २:३० तासांचा फरक होता. टर्की २:३० तास पुढे आहे... त्या प्रमाणे माझ घड्याळ नीट केल.

खोलीत वेलकम ड्रींक साठी वाईन बॉटल होती, फळं होती .. संत्र, केळ, किवि ... आकार एवढा मोठा होता की क्षणभर वाटल खोटीच फळ आहे... खुप छान पद्धतिने टेबलावर मांडुन ठेवल होत.
लेखन सामुग्री भरपुर होती..सगळ्यांवर इंस्तुबल शहराचा देखावा चित्तारला होता. त्यामुळे त्यावर काही लिहण्याची ईच्छाच झाली नाही... भारतात सोबत आणली काही नमुना म्हनुन. हाऊस किपींग वाले रोज एक चॉकलेट ठेवत..

झोपायच्या आधी .. आपण सुखरुप पोह्चलो हे घरी आणि ऑफीस मधे फोन करुन कळवले. झोपयचा प्रयन्त केला झोप काही येत नव्हती, सारखं मनात आपल मागे राहिलेले सामान बरोबर येणार की नाही याची चिंता होती... जर आलंच नाही तर काय करायचं? हा विचार करत असताना कधी झोप लागली हे कळल सुद्धा नाही. फोन वाजत होता पण कळतचं नव्ह्त की आपल्या खोलीतलाच फोन वाजत आहे!... २-३ रींगा वाजल्या वर पटकन फोन उचलला. गोड आवाजात विमानसेवा कर्मचारी बोलत होती. आपल सामान आल आहे थोड्यावेळात आपल्याला मिळेल. तसदि बद्द्ल दिलगिर व्यक्त केली. जरा जिव भांड्यात पडला... १०-१५ मिनिटांनी सामान आल. सामान मिळाल्याची पोह्च पावती दिली. परत नमस्कार चमत्कार झाला... सामान चांगल्या स्थितीत होत. एक काळजी मीटली.

पोटपुज्या करुन परत झोपली. झोप हा माझा आवडता छंद.

झोपेतचं थोड्यावेळाने लक्षात आलं आपल्या बरोबर काम करण्यासाठी एक सहकारी नेदरलेंड वरुन येणार आहे आणि त्याच्या बरोबर बसुन ऊद्या ऑफिसला कसे जायच व पुढच्या कार्यक्रमाची आख्ननी करायची होती. .. मार्क लाफनर नाव होत त्याच. फोनवर आधी बोलले होते त्याच्याशी, पण प्रत्यक्षात आज पहिल्यांदाच भेटणार होती. झोपेतुन उठले.. तोंडावरुन थंडपाणी घेतल. जरा आवरलं.. घड्याळ्यात बघीतल तर त्याची येण्याची वेळ झालीच होती.

थोड्यावेळाने दरवाज्यावरची बेल वाजली... दरवाज्यात ऊभ्या असलेल्या माणसाने मी काही बोलायच्या आधीच, मी “मार्क लाफनर” अशी ओळख करुन दिली. आम्ही दोघे मग होटॅलच्या स्वागतकक्षात गेलो. तीथे बसुन.. ऊद्दाच्या कार्यक्रमाची आखणी केली. सकाळी ८ वाजता भेटायच ठरल. त्या बरोबर काही महत्वाच्या गोष्टीपण सांगितल्या. पासपोर्ट नेहमी सोबत ठेवायला सांगितला. सकाळी भेटायच ठरवुन आम्ही आपापल्या खोलीत गेलो.

सकाळी ८ ला आम्ही ऑफिसला टॅक्सीने जात होतो.... टॅक्सीवाला माझ्या कडे बघुन.. हिंदीस्तान हिंदीस्तान करुन, तुम्ही हिंदुस्थान वरुन आला आहात याची विचार पुस करत होता... त्याच्या मोडक्यातोडक्या इंग्रजीतुन इस्तांबुल शहराची माहीति पण देत होता.. त्या वेळेस लक्षात आल.. इस्तांबुल हे शहर "टुरीस्ट प्लेस" म्हणुन प्रसिध्द आहे.

इस्तांबुल हे शहर दोन खंडात वसलेल आहे. आशिया आणि युरोप. गंमत आहेन!. बोस्फरस कालवा या दोन खंडाला विभागत आहे.. या कालव्यावर भला मोठा पुल टाकला होता...पुलाच्या आशिया खंडाच्या भागात जाताना... "वेलकम टु आशिया" अशी पाटी आहे... तर युरोपच्या भागात जाताना " वेलकम टु युरोप" लीहलेले आहे. काय छानं.. पुढचे १५ दिवस... दोन खंडात जाण येण करणार... होटॅल युरोप भागात तर ऑफिस आशिया भागात होत...

इस्तांबुल हे खुप मोठ ऍतिहासिक शहर असल्यामुळे रस्त्याच्या कडेला भल्या मोठ्या सुरेख इमारती दिसत होत्या.. मनात शनिवार रविवार कसा घालवायचा याची आखणी पण करुन झाली. मधुन मधुन मार्कशी बोलत होते....आणि मधुन मधुन टॅक्सीवाल्याशी... ४५ मिनटाचा वेळ कसा गेला हे कळल पण नाही.. ऑफिस आलपण...

ऑफिसची इमारत टोलेजंग आणि चकाचक होती. सुरक्षा अधिकारी पटकन पुढे आले, कोणाला भेटायच याची विचारपुस केली.. आम्हचे पासपोर्ट जमा करुन घेतले.... त्यातला एक सुरक्षा अधिकारी सोबत आला... आम्हाला ज्या ठीकाणी जायचे होते ते १० व्या मजल्यावर होते.

खुप शांतता होती... आमच्या सोबत काम करणारा तिसरा सहकारी “नोयान कयान” हा टर्किश होता..तो अजुन ऑफिसला आलेला नव्हता....आम्ह्ची बसायची सोय ज्या खोलीत केली होती.. ती खोली सुरक्षा अधिकार्‍याने दाखवली.. थोडया वेळाने नोयान आला... ऊशिर झाल्यामुळे दिलगीरी व्यक्त केली.... आताच जे हवामान इथे आहे ते.. बरोबर नाही.. टर्कीला पहिंल्यांदाच इतका अवेळी हिमवर्षाव झाला... मागच्या आठवडयात आम्हाला सुट्टी मीळाली. हिमवर्षाव मुळ्ये आमच्या देशाचे खुप नुकसान झाले. हे नोयान ने आम्हाला आवज्रुन सांगितल. … एकमेकांची थोडक्यात ओळख करुन घेत आम्ही कामाला सुरवात केली. पुढचे दोन आठवडे कसे काम करायच हे ठरवलं. पुढचे दोन आठवडे कसे काम करायच हे ठरवलं. नोयानने ऑफिस मधल्या इतर कर्मचारी वर्गाची ओळख करुन दिली....

रेस्ट रुम कुठे आहे ती दाखवली... पाणी, कॉफी मशिनची माहिति दिली... हया मशिनमधे टर्किश लिरा टाकाव्या लागत होत्या... किती? हे आता मी विसरली!

नोयानेच ते पॅसे टाकले व आम्हाला कॉफि दिली.

माझ्या लक्षात आल... अमेरिकन डॉलर चालत असले तरी....टर्किश लिरा असलेल्या चांगल्या... ज्या देशाचे जे चलन आहे ते तिथे वापरलेल बरं पडत.. निदान.. गणित कराव लागत नाही..

काम करत असताना आम्ही एकमेकांच्या देशाची माहिती पण आदान प्रदान करत होतो. लक्षात आलं की याना भारत या देशा बद्द्ल खुप कुतुहल आहे. मी शाकाहारी आहे म्ह्टल्यावर त्याना खुप कुतुहल वाटल. जेवायला कँटिनध्ये शाकाहारी पदार्थ निवडायला मद्त केली….. ज्यास्त काहि पदार्थांची चव घेता आली नाही याचे माझ्या पेक्षा त्यालाच वाईट वाटल.

नोयान हा मुळातच खुप बोलका होता.... त्यामुळे तो खुप माहिती देत होता.. आणि घेत होता…

वेळ कसा गेला हे कळल सुध्दा नाही. संधाकाळचे ६ वाजले.. मनात २ आठवडयातला एक दिवस संपला हे गणित करुन झाले.
मी आणि मार्कने सकाळी सुरक्षा अधिकार्यााकडे जमा केलेले आपापले पासपोर्ट परत घेतले. परत होटॅलवर आलो... नंतर हा रोजचाच एक कार्यक्रम झाला...

मार्कच्या स्वभावाब्द्द्लची एक गोष्ट मला सांगण्याशिवाय राहवत नाही... ती न विसरुन चालणार कसं? मार्क हा माझ्या पेकक्ष्या मोठ्या हुदद्या वर होता... त्याला हे माहित होत कि रोजचा ऑफिसला जायचा यायचा खर्च ऑफिस मधुन मला मिळेल.. तसा त्यालापण मिळतच असणारच... पण तो नेहमीच टॅक्सीच भाड द्यायच टाळायचा... सुट्टे नाही..अस जुजबी कारण... नंतर पण देत नव्ह्ता... अशे चकट फु माणसं फक्त भारतातच नाही याची प्रचिती आली... नंतर मी पण जरा शहाणी झाली... जेवढ भाड व्हायच त्याच्या निम्मे करुन त्याच्याच हातात आधिच करुन देत.. म्हणजे त्याला झक मारत... निम्मे त्याला द्यावे लागत... तरी पहिल्या २ दिवसाचे पे॑से बुडालेच...

कंपनी कडुन मला प्रीपेड क्रेडिट कार्ड मीळाल होत. १००० डॉलर चे टर्कीश लिरा हे चलन एटीयम् मशिन मधुन काढले. एटीयम् मशिन हॉटेलच्या आवारात होत. हे एक बर झाल. नाही तर शोधा शोध करावी लागली असती. टर्कीश लिरा हाताळताना मजा वाटली. उगाच कोटयाधिश असल्याचा आनंद झाला.

माझ वास्तव्य.. मार्च २००३ मधल. अंदाजे 1 U.S. dollar = 1,650,000 lira. आंतरदेशिय बाजारपेठेत TRL हा त्याचा कोड होता.
आता आंतरदेशिय बाजारपेठेत TRY हा त्याचा कोड आहे. २००९ मधे 1 Turkish lira = 0.588582 U.S. dollars.
खुप सारे शुन्य असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत हे चलन वापरायला त्रास होत होता. त्यामुळे २००३ च्या शेवटि ठरल की लिरा मधले ६ शुन्य काढायचे. आ. यो.सो. ४२१७ प्रमाणे १ न्यु लिरा “TRY” = १०००००० जुन्या लिरा “TRL”, २००५ मधे “TRY” चलनात आल्या. १ जानेवारी २००९ पासुन फक्त नविनच लिरा चलनात आल्या.
म्हणजेच मी हाताळलेले चलन जुने झाले !!!

हॉटेलच्या आवारात एक गंमतशिर गोष्ट बघितली... राजेशाही थाटातल्या गाडी सारखी... जळच ऊभ्या असलेल्या माणसाने विचारल.. बुट पॉलिश करायचे का? मी नाही म्ह्टल. राजेशाही थाटातली गाडी बुट पॉलिश साठी वापरतात... लागलीच मनात आपल्या इथल्या बुट पॉलिशवाल्यांशी तुलना करुन झाली.

२-३ दिवस ऑफिसच्या कामात कसे गेले हे कळलंपण नाही..गुरवारी संध्याकाळी नोयानने आपल्याला बियर पार्टीला जायचे घोषीत केल. नोयानचे बॉस आणि अजुन एक ऑफिस मधली मुलगी नीलोफर सोबत होते. मी बियर घेणार नाही ही माहीति आधीच नोयानने माझ्याकडुन बोलताना काढुन घेतली होती... जीथे शाकाहारी पदार्थ आणि फळांचा रस मिळेल असे रेस्टॉरंट शोधन्याचे काम नीलोफरवर सोपवल होतं हे बोलताना तीने सांगितल. हे किती कठीन कामं होत आणि या कामा साठी तीने तीच्या इतर मीत्रांची मदत कशी घेतली याचे वर्णन तीच्या कडुन एकतांना मी खुप भारावुन गेली... आपल्या साठी एवढं केलं!! मी तीचे आभार मानले. अथीति देवो भव्.. हा मंत्र टर्कीश लोक पण अंमलात आणतात तर.... २-३ तास ह्सत खेळत गप्पा मारण्यात कसे गेले हे कळलं पण नाही. शनिवारी तुला आम्ही आमचे शहर दाखवायला घेवुन जावु हे पण ठरवुन झालं.

मनात ह्या देशातील लोक कशी असतील... कशी वागतील.. याच कुतुहल मला होतच.... ४-५ दिवसांच्या अनुभवानी मी खुप भारावुन गेले होते.

भारतात राहणीमानावरुन आपण मुसलमान बाई आणि माणुस ओळखु शकतो... इथे..तसे कोणि मी बघीतले नाही..
सगळेच गोर्यांान सारखे दिसत होते... माझ्या पाह्ण्यात बुरखा घातलेली बाई आली नाही...

नंतर नोयाने सांगितल... युरोप जवळ असल्यामुळे... आमचा देश आशिया खंडात असुन सुध्दा आम्हाला युरोप युनियन मधे जायच आहे.. आमची राहणिमान पुर्ण युरोपियन पध्द्तीची आहे... आमचे लहानपणा पासुनचे स्वप्न जर्मनिला जायचे असते.

शनिवार उजाडला... १० वाजता दोघ मला घ्यायला आली... माझ्या पेक्षा त्यांचाच उत्साह जास्त... त्यांच्या उत्साहात मी पण सामिल झाले... माझ्या साठीच तर हे सगळ चालल होत!!!. कुठे कुठे जायच हे त्यानीच ठरवल होत...तस मला स्वताला कुठे काय माहित होत... भारतातुन आलेल सोन्याच सिंहासन ज्या ठिकाणी ठेवल होता तो राजवाडा आणि सध्याच यिल्दिझ प॓लेस - मुझियमला पहिल्यांदा भेट दिली....

खुप छान पद्धतिने सगळ जतन केल होत. ह्या जागे वरुन शहर खुप छान दिसत होत... सगळी कडे पाणीच दिसत होत. हे पाणी बोस्फरच होत. खुप छान टुलिपच गार्डन होत. शेवटच्या ओट्टामन सुलतानच होत हे. नोयान आणि नीलोफरने त्याना जी माहिती होती ती आपापल्या परीने सांगतली.

दुपारचे जेवण तीथेच घेतले... जेवताना त्यांच्या खाण्याच्या सवई सांगितल्या.. आपल्या कडे जस जेवणात मसाला ताक असत तस तिथे पण असत. ताकाला इंग्रजीत बटर मिल्क म्हणतात हे त्याना माहित नव्ह्त. त्यांच्या मते या पदार्थाला इंग्रजीत पर्यायी शब्द नाही. वांग्याला एग् प्लंट म्हणतात हे मला त्यांच्या कडुन समजलं.. ताक कस तयार करतात ह्याची सविस्तर माहिति नोयाने सांगितली. त्याची आई त्याच्या बायको पेक्षा कसा स्वॅपाक चांगला करते ते पण सांगितल. इस्तंबुलचे कुठ्ले पदार्थ मी खाललेच पाहिजे ते पण सांगितल. आळुच्या पानात भात भरुन केलेले रोल. हा पदार्थ नंतर मी खाना खजाना मधे संजिव कपुरने करुन दाखवताना पाहिला होता. बकलावा हा गोड पदार्थ.... टर्किश चहा...मसाले... ...इत्यादि... आपल्या सारखे ते पण भरपुर मसाले वापरतात.. मसाला मार्केटला जरुर भेट दे म्हणुन सांगितल. खरेदि करण्यासाठी आपण नंतर एका शोंपिंग मॉल मधे पुढ्च्या आठवडयात जावु असं नोयान ने सांगितल...

वेळ कसा पटकन गेला हे कळल पण नाही… परत हॉटेल वर.... सोमवारी ऑफिस मधे भेटु..... काही गरज पडल्यास फोन कर अस सांगुन त्यांनी निरोप घेतला.

अजुन एक दिवस संपला हे मनात गणित करुन झाले... रोज घरी फोन करतच होते... आजचा दिवस कसा घालवला हे फोन करुन सांगितले..... थोडा वेळ गेल्यावर परत कंटाळा आला... काय करावे हे कळत नव्ह्तं... खिडकितुन बाहेर बघत थोडा वेळ घालवला.
हॉटेल मधले शॉपिंग सेंटर बघायला गेले... तेवढाच टाईम पास.....पुर्ण न बघताच परत खोलीत येवुन टिव्ही बघत बसले... टिव्हीवर तस बघण्या सारखं काही नव्ह्त... एकच इंग्रजी वाहिनी दिसत होती. टिव्ही बघता बघता कधी झोप लागली हे कळलं पण नाही....

जाग आली तेंव्हा दुसरा दिवस ऊजाडला होता.... काय करायचे हे ठरवल नव्ह्त.... आळसात वेळ घालवण्या पेक्षा जवळच फिरुन येऊ ठरवल.

हॉटेल मधे ब्रेकफास्टला काय काय मिळत हे आधिच पाहिलं होत. ब्रेड बटर शिवाय माझ्या खाण्या लायक काही नव्ह्त. ब्रेड बटर खाण्याची माझी इच्छा नव्हती.. सोबत आणलेला खाकरा आणि चिवडा खालला.. लिंबु सरबत घेतल. पटकन आवरल... आणि बाहेर पडले. मनात विचार चालु होतेच...

.. मागच्या आठवडा भर रोज एक दोन पदार्थ सोबत ऑफिसमधे घेवुन जात होते... त्यामुळे नोयान, मा़र्क आणि नीलोफरला ते खाणयाची सवय झाली होती. मार्कला चिवडा तिखट लागत होता तरीपण आवडीने खात होता. खुप तिखट, खुप तिखट करत... मिटक्या मारत होता...चिवडा भरपुर आणला होता.. आईने भरुन दिला तेंव्हा एवढा कशाला?

चहाची मी खुप भोक्ती.. मना सारखा चहा मिळाला नाही की माझ बिनसायच.. ५-६ दिवसा पासुन तर मी आपण जसा चहा पितो तो पाहिला सुध्दा नाही... तडजोड करत दिवस काढत होते...

दुसर्‍या देशात आपले खाण्याचे खुप हाल होतात हे इतरांकडुन एकल होत. ते आता प्रत्यक्षात थोड्या का फरकाने अनुभवत होते.

ब्रिटिश आणि अमेरीकन इंग्रजीचा थोडा अभ्यास करावा लागेल. किंवा थोडया ट्राव्हल टिप्स ज्या देशात जायच.. ते माहित करुन घेणे आपल्याच फायद्याचे असते.... ऍकदमच कोरी पाटी नको...

आले तेव्हां वातावरण खुप वेगळ होत.. हिमवर्षाव चालु होता.. आणि आता आपल्याकडे हिवाळ्यात कशी थंडी पडते... तेंव्हाच जस वातावरण असत तस होत.. पण मधुनच भुरभुर पाऊस पण पडत होता...

विचार करत करत मी हॉटेलच्या बाहेर आले... उजवीकडे की डावी कडे... काही फरक पडणार नव्ह्ता...
टाईम पासच करायचा होता.... टाईम पास करता करता हे शहर कसे आहे हे पण समजत होत.. शहराचा युरोपियन भाग - नविन भाग बघत होते.... रस्ता खुप चवडा होता... पायी चालण्यार्यांासाठी चांगली सोय केली होती...दगडी रस्ते होते... मधेच हात पसरवत भिकारी समोर आले... त्यांच्या कपड्यावरुन ते भिकारी आहे... हे माझ्या लक्षात लवकर आल पण नाही....
आपल्याकडच्या सारखंच तीथेपण काही मुल पाठीमागे लागली की आमच्या दुकानात या, आमच्या दुकानात चांगल्या वस्तु मिळतात... टिपिकल... टुरिस्ट प्लेस....

एक ९-१० वर्षाची मुलगी तीच्या दुकानात खाणा खुणा करुन येण्याची विंनती करत होती...थोड टक्रिश भाषेत बोलत होती... जावुन तर बघु करत मी दुकानात शिरले.. दुकानात मोठी माणसे सामान दाखवायला होती..त्यातल्या एकाने नीळया काचेवर डोळा असलेली एक गोलाकार वस्तु दाखवली... हयाला नजारा म्हणतात.. इथली खुप प्रसिध्द वस्तु आहे... ही वस्तु जवळ असली की कोणाची नजर लागत नाही.... इथे ए॑णारा प्रत्येक जण आपल्या देशात ही वस्तु घेऊन जातो...( आता हे भारतात पण दिसतात.. आर्चिस मध्ये दिसत) .

दिसायला खुप छान असल्यामुळे मी ..... गिफ्ट म्हणुन दयायला छोटे छोटे ८-९ नजार घेतले.... एक किचेन पण घेतलं ...माझ्या खरेदीची सुरवात झाली...

क्रेडिट कार्ड दिलं तर ते चालल नाही... नशिब जेवढे बिल झाल होत.. तेवढे प॓से होते.... वेगळीच काळजी लागली..नंतर खरेदि न करताच... नुसते इकडे तिकडे फिरले...पाहण्या सारखं खुप होत... इमारती वरचे नकक्षी काम .... फुल विकणार्याा बायका...ट्राम.... चॉकात असलेले फवारे...पुतळे... लाकडी इमारती... हे सगळ बघता बघता हॉटेल भोवतीची एक चक्कर पुर्ण झाली...

थोडावेळ स्वागतकक्षात वेळ घालवला.... एक लग्न संभारंभ चालु होता... शांतपणे सगळ चालल होत... थोडावेळ बघितला...

खोलीत आले... भुक लागली होती... जवळ असलेल्या जिन्नसा प॑की थोड खाल्ल... खाल्ल्यावर जरा बर वाटल....टिव्ही बघण्याचा प्रयन्त केला.

सोमवार ऊजाडला... ऑफिस मध्ये जाण्याची वेळ झाली..... ऑफिसला गेल्यावर ... क्रेडिट कार्डाची फजिती मी ऑफिस मधे ईमेलने कळवली.... काम सुरु झालं... कॉफि ब्रेकमधे नोयानला क्रेडिट कार्डाची फजिती सांगितली.

त्याने लागलीच मला एका जवळच्या बँकेत घेऊन गेला... कार्ड एटियम मशिन मध्ये टाकले... टर्किश भाषेत काही तरी लिहुन आलं... ते त्याने मला समजवुन सांगितल, त्याच्या बायकोला फोन करुन अधिक माहिती मिळ्वली... ती बँकेतच काम करते... कार्ड ज्या बँकेच आहे त्या बँकेचा काही तरी प्रोबल्मेम आहे.

... आम्ही परत ऑफिसला आलो.. तो पर्यंत माझ्या कंपनी कडुन उत्तर आलं..काही काळजी करु नका... कार्ड ज्या बँकेच आहे त्या बँकेला कळवलं आहे... ते तुम्हाला सविस्तर उत्तर पाठवतील... तुम्हाला आलेला अनुभव बर्यातच लोकांना येत आहे.. थोड्या वेळातच.. प्रोबम्लेम सुटेल... सुटला नाहीतर.... तुम्हाला क्लॉंयंट मदत करेल. त्यांच्या अकॉंट डिपार्ट्र्मेची मदत घ्या.

नोयान सोबत असल्यामुळे त्याने सगळी माहिती गोळा केली... संध्याकाळी घरी जाताना आपण परत कार्ड वापरुन बघु हे सांगितलं...
परत कामाला सुरवात केली... रोजच्या कामाचा अहवाल माझ्या बॉसला ईमेलने कळवत होतीच. काम ठरल्या प्रमाणे व्यवस्थित चालल होत.

संध्याकाळी आम्ही कार्रेफोउर (Carrefour) ह्या मॉलला भेट दिली... तीथल्या कॉफि हाऊस मधे कॉफि घेतली... आणि कार्डने प॑से दिले... व्यवस्थित ट्रांस्याक्शन झाल. एक टेंशन कमी झालं...

ऑफिस मधे फोन करुन कळ्वलं... ते पण खुष झाले.

मॉल मधे मी काहीच खरेदि केली नाही .. फक्त मॉलची भव्यता... आणि झगमगाट बघत होते... कार पार्किंगची जागा बघुन मी च्याटच पडले... २००० कार एका वेळेस पार्क करता येतात...

२-३ दिवस मधे गेले... गुरवारी संध्याकाळी सेंडॉफ पार्टी होती... पण एका लाईट हाऊस मधे... नोयानची बायको निलोफर... ऑफिस मधली निलोफर, नोयान, मार्क आणि मी... असे ५ जण पार्टिला होतो... ह्या ठीकाणी फेरी ने जाव लागत... फेरी बोट ह्या लाईट हाऊस हॉटेल वाल्यांच्याच होत्या...

रात्रीच इंस्तानबुल शहर खुप छान दिसत होत. हॉटेलच्या आत गेल्यावर खुप वेगळ वाटल.. लाईव्ह मुझिक.. डॉंस...
मेनु कार्डावरचे पदार्थ बघुन.... काहीच कळत नव्हत्.... सगळ्यांनी मला मदत करत .. मी काय ऑर्डर कराव हे ठरलं.... त्याच बरोबर ते काय काय घेणार हे पण ठरलं.. सगळ्या पदार्थांची ऑर्डर दिली....गप्पा सुरूच होत्या...भारतियां बद्द्लचे काही प्रश्न त्यांच्या मनात होते...त्या वर चर्चा चालु झाली.. तु कपाळावर लाल काय लावल आहे.. तुमच्या देशात मुलींना कसे वागवतात.. ...योगा कशा प्रकारे करतात... लता मंगेशकर आम्हाला कशी आवडते..... माझ्या पद्धतिने उत्तर देत होते.

ज्या पद्ध्तेने हे पदार्थ माझ्या समोर आले.. ते बघुन मला वाटल... हो ... हे मी खाऊ शकेन... व्हेज पुलाव हा नारळाच्या करंवटीत होता. तळलेले बटाटा आणि वांग्याची काप.. मोसंबि एवढा लिंबु एका सुरेख जाळीच्या कापडात लाल फितीने बांधला होता.. मी त्याकडे बघत असताना... निलोफरने सांगितल.. लिंबाचा रस पदार्थात पिळत असताना त्याच्या बिया पदार्थात पडु नये म्हणुन अश्या पद्धतिने सादर केलं आहे... ही कल्पना मला खुप आवडली....

जेवणाचा आनंद सगळेच घेत होते...तिथे हजर असलेल्या फोटोग्राफर कडुन एक ग्रुप फोटो काढुन झाला...
निलोफरने लाईव्ह मुझिकवर एक गाण गायलं... बघता बघता... रात्रीचे ११ वाजले... सगळ्यांचा निरोप घेतला... नोयानच्या बायकोने उद्या आमच्या कडे जेवायला ये सांगितलं... मी आधी नाही म्ह्टल.. कशाला त्रास करुन घेता ... पण तिने खुप आग्रह केला... आणि मला हो म्हणावच लागल....
उद्दया ऑफिस मधला शेवटचा दिवस होता... काम पण चांगल झालं होत... फक्त एक आढावा घ्यायचा होता..आणि सगळ्याचा निरोप...माझ परतीच तिकिट रविवारच्या रात्रीच होत..
हॉटेलच्या खोलीत आल्यावर... त्यानच्या घरी जाताना काय भेटवस्तु घेऊन जायला पाहिजे... याचा विचार करत होते...

भारतातुन येतांना मी सोबत कुठली भेटवस्तु आणली नव्हती... याचे जरा वाईट वाटल.... पण आता काही उपयोग नव्हता... की काही विकत घेऊ म्ह्टल तर... वेळपण नव्हता....थोडा विचार केला... आपल्या कडे असलेले...ड्रायफ्रुटस अजुन आपण वापरले नाही... सगळे जसेच्यातशेच आहे...ठरल तेच द्यायचे... पण गिफ्ट पॉकिंग कस करायच? ... सोबत.. वेळ घालवण्या साठी.. क्रोशाची सुई आणि दोरा आणला होता... पटकन एक बटवा विणयला सुरवात केली... पुर्ण होईल की नाही याचा विचार केलाच नाही...विणुन पुर्ण झाला तेंव्हा घड्याळात बघितलं तर रात्रीचे ३ वाजले होते.. बटव्यात सगळे पाकिटे टाकले.. ५ पाकिटं होते... काजु, बदाम, मनुका, अंजिर आणि पिस्ता...

स्वतालाच शाबासकी दिली...मनात आल... १०-१२ थाँक्यु कार्ड बनवु... कागद शोधला... त्यावर ड्राँईग केल पेनाने.... एकुण १२ कार्ड बनवली... स्वनिम्रीतीचा आनंद झाला.... बघते तर.. सकाळचे ५ वाजले होते.... पण थकवा जाणवत नव्हता.... २ तास झोप काढली...

ऑफिसला गेले.... ठरवल्या प्रमाणे मिटिंग झाली... ऑफिसच काम निट झाल होत अस सगळ्यांनी एकमताने कबुल केलं....ऑफिसधे ज्यांशा ज्यांशी माझा संबध आला.. त्या ८ जणांना मी कार्ड देऊन त्यांचे आभार मानले... मी हे कार्ड स्वताच्या हाताने बनवले हे सांगितल्यावर... त्यांच्या प्रतिक्रिया खुप छान होत्या... सगळयांनी आम्ही तुला मिस् करु अस म्ह्टल... भारताच नाव निघालं की तुझाच चेहरा आम्हाला आठवेल...

संध्याकाळी नोयान त्याच्या घरी घेऊन गेला... त्याचा एक मित्रपण आला होता... खुप छान स्वागत त्याच्या घरी झालं...
हे लोक आपल्या सारख पाणी पित नाही... पाणी खुप कमी पितात....थोड्या गप्पा मारल्यावर जेवण टेबलवर लावल....
आधि टोमॉटो सुप.... चव चांगली होती.... माझ्यामुळे सगळयान साठी शाकाहारी जेवण बनवलं होत... पहिल्यांदाच आम्ही... पुर्ण शाकाहारी जेवण घेणार आहे हे सांगितल... माझ्यामुळे त्याना शाकाहारी जेवण करण्याची शिक्षा!!!
जेवणाचा मेनु बघुन मी भारावुन गेली... ओळखिचा होता... काबुली चण्याची भाजी, पुलाव, लाल मिर्च्यांच लोणच, ब्रेड.
..... हा सगळा मेनु निलोफरच्या आईने ठरवला... आणि स्वताच्या हाताने बनवला होता.. हे सगळ बनऊन त्या त्यांच्या घरी परत गेल्या होत्या... त्यानचे मी मनात आभार मानले... त्यांची भेट झाली नाही.... भेट झाली असती तर त्यांचा हात हातात घेऊन त्यांचे आभार मानले असते...

बर्यातच दिवसांनी व्यवस्थित जेवण केल...

जेवण करत असताना नोयानला भेटायला त्याच्या २ चुलत बहिणी आल्या होत्या... त्यामुळे त्यांचीपण भेट झाली..
जेवण झाल्यावर आमच्याकडे कॉफि घेतात.. ती घेण्याचा आग्रह केला. टर्किश कॉफि खुप प्रसिद्ध आहे... ती निलोफर ने बनली... कॉफि पावडर , पाणी आणि थोडी साखर टाकुन ऊकळवलेल काढण्.... ही कॉफि पिण्यासाठी छोटेसे काचेचे पेले... नोयानच्या मित्राने एक गंमतशिर गोष्ट सांगितली.... तुम्हालापण गंमत वाटेल... कॉफि पिल्यावर कपात जो कॉफि पावडरचा गाळ साचतो त्याच्या आकारा वरुन भविष्य कथन केल जात..... निलोफरच त्यात प्राविण्य आहे... ही कला सगळ्यांनाच नाही येत... आईकडुन मुलीला शिकवली जाते... गुढविद्या आहे... किटि पार्टीत खुप चालते... ज्याला येते त्या बाईला खुप भाव असतो...

निरोप घेण्याची वेळ झाली... सोबत आणलेल.. गिफ्ट निलोफरच्या हाती दिल.. तिच्या आईसाठी ग्रीटिंग कार्ड दिल. त्याच्या मित्राला आणि बहिणिंना पण एकेक ग्रीटिंग कार्ड दिली... त्यांना खुप आनंद झाला... निघायच्या आधि फोटो सेशन झाल...
काही गरज पडल्यास फोन कर... आणि परतिच्या प्रवासा साठी शुभेच्छा दिल्या...

नोयान आणि त्याचा मित्र मला हॉटेलवर सोडायला आली.....
अपेक्षा केली नसताना खुप आदरातिथत्य झालं.... खुप आनंदि होते.. २ दिवसच काढायचे... २ दिवसाने... आपण भारतात असणार...
शनिवार ऊजाडला... सामानाची आवरा सावर केली.... आज मला काहीच काम नव्ह्त.. काय करायचा हा प्रश्नच होता... ठरल जवळ असलेला डोलबाची पॉलेस बघु.... मनात विचार आला आणि लागलीच अमलात आणला... पायीच गेले.. यात जाण्या साठी टिकिट होत.. ते काढल... गाईड होता तो संपुर्ण माहिती देत होता... बघुन झाल्यावर.. बाहेर आले.. माझ्यात काय संचारल काय माहित अजुन दुसरी ठीकाण पाहु म्हणत... ईतर महत्वाची ठीकाण पण पाहिली... टोपाकी, चिरागन पालेस, माल्टा माँशन्, .ब्लु मॉस्क, हायीया सोफिया चर्च , हिप्पोड्रम …. ह्पापल्या सारखी सगळ डोळ्यात साठवत आणि जमेल तस फोटो काढत होते... ऍ॓तिहासीक माहिती गाईड देत होता.. पण बरचस डोक्यावरुन जात होत... नंतर इंटरनेट वरुन वाचु... नाही तर ह्या वास्तु बघायला खुप वेळ लागेल...

प्रत्यक वास्तुला ३००-४०० वर्षाचा ईतिहास होता...मुसलीम- ख्रींचन-मुसलीम धर्माच्या वर्चस्वाचे चक्र कसे फिरल ते ह्या वास्तु बघताना जाणवल..
अंधार पडायला सुरवात झाली ... मी परत हॉटेल वर आले....ऊद्द्याचा दिवस आपल्या हातात आहे त्याचापण पुरेपुर उपयोग करुन घायच ठरवलं...
रविवार ऊजाडला.. आज ८ वा़जताच बाहेर पडले.. ३-४ वाजेपर्यंत परत यायचे ठरवुन्...हॉटेलजवळुनच एक टॉक्सी ठरवली... कुठे कुठे जायच हे ठरवलं...जास्त नाही पण २-३ ठिकाण पाहुन होतील...
आधि ग्राँड बजारला (Kapali Carsi) गेलो.. जगातला सगळ्यात जुना आणि मोठा छता खालचा बाजार होता .. आपल्या कडच्या माहात्मा फुले मंडई (क्रोफर्ड मार्केट) सारख.

मार्केट खरच बघण्या सारख आहे.. मुख्य म्हणजे ईमारत... आत गेल्यावर सगळ्या प्रकारच सामान ईथ मिळत्..ईथले गालीचे प्रसिदध आहे.. लागणारा कच्चा माल आपल्या काश्मिर वरुन येतो ही माहिति तिथल्या दुकानदाराने सांगितली... मी भारतीय आहे हे माझ्याकडे बघुन त्यांनी ओळ्खल..

वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आकर्षक रीत्या मांडले होते.... अत्तर ठेवण्या साठी छोट्या छोट्या काचेच्या कुपी होत्या. टर्किश कॉफि आणि २ सेट काचेचे कप अस भेट देण्यासाठीच्या गोष्टी होत्या.. त्यातले २-३ सेट मी विकत घेतले..
२-३ तास कसे गेले हे कळलच नाही...
तिथुन टर्किश हमाम बघायला गेलो...बाहेरुनच बघीतल...
तीथुन पाण्याखालचा महाल (Sinking Palace) बघीतला. महालात फिरायला लाकडाचा रस्ता आहे.. वास्तुशास्त्राचा ऊत्तम नमुना आहे..
माझी परत हॉटेलवर जाण्याची वेळ झाली....जवळ असलेला वेळ चांगल्यारीतीने घालवला ह्याचे समाधान वाटले.... पाय खुप दुखत होते... पण ऊत्साहामुळे लक्षात आल नाही... अवतार तर बघण्यासारखा होता.

हॉटेलवर आल्यावर बिल विभागात मी ८ वाजता हॉटेल सोडेल.. माझ बिल तयार ठेवा सांगुन खोलीत आले.. सोबत असलेल सामान निट ठेवल. काही मागे राहील नाही याची खात्री करुन खाली आले.. झालेल बिल दिल....
एयर पोर्टवर आले.. ३ तास बाकी होते.. इमिग्रेशन केल... आणि विमानाची वाट बघत बसले... २ आठवडे कसे गेले हे नकळत पिक्चर बघितल्या सारख डोळ्या समोर आल. माझ्या परतीच्या विमानाची घोषणा झाली... आणि माझा परतीचा प्रवास सुरु झाला...
मुंबई एअर पोर्टवर पोहचले.....खुप आनंद झाला... अशाप्रकारे माझ १५ दिवसांच मिशन इंस्तानबुल संपल.... मिशनच्या आठवणि चांगल्या होत्या...
आता कुठेही इंस्तानबुल हे नाव एकल किंवा वाचल की..सह्जरित्या.. अधिक जाणुन घ्यायला मला आवडत.
आधि म्ह्टल्या प्रमाणे... वेळ मिळाल्यावर.. हया शहराची माहिती इंटरनेटवर बघते... टुरिस्ट म्हणुन हया शहराला भेट द्यायला काहीच हरकत नाही...हो पण त्यासाठी नोयान सारखा आदराथित्य करायला कोणी असायला हव.

इंटरनेटवरुन शोधुन काढलेली माहिती

बोस्फरस कालवा हा काळा समुद्र आणि मरमरा समुद्रातुन जातो. युरोप आणि आशिया खंडाला विभागतो.
बोस्फरस कालव्यावर दोन मोठे हवेत तरंगणारे पुल आहे. पहिला पुल हा बेयलेरबेयि (Beylerbeyi) आणि ऑर्तकोय (Ortaköy) ला जोडणारा आहे, १९७३ ला तो वाहतुकी साठी खुला केला. या पुलाला बोगझिचि पुल (Bogazici Bridge) म्हणतात. १०७४ मिटर
लाबं आहे. ६ लेन मोटर वाहतुकी साठी आहे, म्हणजे किती रुंद, हे लक्षयात आलेच असेल. पिलरची ऊंची ५४० फुट आहे. ह्या पुलाची भव्यता समजली असेलच. हयाच पुलावरुन माझ २ आठवडे युरोप-आशिया अस जाणयेण व्हायचं.
दुसरा पुल हा अनदोलु हिसरि आणि रुमेलि हिसरि ला जोडणारा होता. १९८८ ला तयार झाला. ह्या पुलाला फतिह सुलतान मेहमेत पुल म्हणतात. १०९० मिटर, ८ मोटर लेन साठी रुंद. ६५ मिटर पाण्यापासुन उंच.
बोस्फरस कालव्याच्या दोनी बाजुला, खुप सुरेख मोठे मोठे महाल आहे.

सिनकिनग महाल (Sinking Palace) : जुन्या इस्तांबुल शहरात जमीनी खाली हा महाल / पाण्याची टाकी आणि वरून ट्राम जाण्याचा रस्ता.
सिनकिनग महाल बयझानतिनेच्या जुस्तिनिअनुस १ राजाने( Byzantine King Justinianus I) ६ व्या शतकात बांधला आहे अस म्हणतात.

सिनकिंग महालाला बासिलिका सिस्तेरन (Basilica Cistern) पण म्हणतात. ही जुनी जमिनी खालची पाण्याची टाकी (underwater reservoir) आहे. ह्या टाकीचे मोठे स्तंभ आता पाण्याचा वर आले. ह्या टाकीची २७ द्क्ष लक्ष गॉलन पाणी साठवण्याची क्षमता होती. त्या वेळच्या पुर्ण कोनस्तनोपल (Constantinople) शहराला पाणी ह्याच टाकीतुन पुरवले जायचे. बरीच वर्ष ही टाकी काळाच्या ओघात दुर्लिक्षीत जमीनी खाली कचाराने बुजुन गेली.
डच प्रवासी प. गयल्लिउस (P Gyllius) ला १५०० साली ह्याचा शोध लागला. त्याला शहरातले लोक येका खड्यात दोरी बांधलेली बादली टाकली की त्यातुन पाण्या बरोबरच माशेपण येतात. त्याला याच कुतुहल वाटल, ह्या कुतुहला पोटी त्याने तो खड्या खणायच ठरवल आणि खणणास सुरवात केली..मग काय आर्श्चय मोठे स्तंभ लागले. हि बातमी सरकारला समजली. मग ते पण ह्या शोधात सामिल झाले. स्तंभ त्यांच्या मुळ स्वरुपात ठेवण्यात ते समर्थ झाले. हळु ह्ळु पाणि आटल्यावर खुप सारे अचंबित करणार्याम गोष्टी समोर आल्या.
मेडुसाच डोक असलेला मार्बलचा स्तंभ येका कोपर्याा आढळला. ह्या मागची गोष्ट अशी सांगण्यात येते की जो कोणी तीच्या कडे बघेल त्याचा दगड बनायचा. लोकांच्या दुष्ट नजरांपासुन वाचवण्यासाठी तीचे डोक असलेला हा स्तंभ प्रवेशव्दारा जवळ ठेवला होता.

डोलमाबाहची (Dolmabahce) महाल: हा ३ मजली महाल १८४३ ते १८५६ मधे बांधला. ह्या महालात २८५ खोल्या, ४३ मोठे हॉल, ६ टर्किश आंघोळीच्या खोल्या आहे. ६ मिटर लाबं कोरीव काम केलेले दोन भव्य मुख्य दरवाजे आहे.
मुसतफा केमल (Mustafa Kemal) आतातुर्क (Atatürk) १० नोव्हेंबर १९३८ मधे ह्याच महालात मरण पावला.

हाजीया सोफिया (Hagia Sophia) हे जगातल सगळ्यात जुन आणि मोठ चर्च आहे. ४०० शतकातल. बर्याaच ने॑सर्गिक आपत्तीला सामोरे जाऊन अजुनी दिमाखात ऊभे आहे.
वास्तु स्थापत्यचा खुप चांगला जुना नमुना आहे. गोलाकार घुमट (dome) ला आधार देण्यासाठी मोठे ४ स्तंभ आणि भींतिंचा वापर करण्यात आला. या पध्दतिच बांधकाम यापुर्वि कधि झाल नव्हत. एक एक स्तंभ जमिनि लगत ११८ स्वे. यार्ड चा आहे.
भुकंपात बराच भाग नष्ट झाला. परत बांधला गेला..
१४५३ मध्ये ओटामन टर्किश सुलतान अहमेत ने हे चर्चच मस्जिद बनवल. चर्चमधले भिंतीवरील ख्रीचन चीत्र प्लास्टर करुन झाकले. खाली जमीनिवर गालीचे टाकुन नकक्षीकाम केलेली फरशी झाकुन टाकली
१९३५ पर्यंत हे मस्जिद म्हणुन वापरल जात असे. मुसतफा केमल (Mustafa Kemal ) ने त्यानंतर ते संग्राहलय म्हणुन जतन केल. संग्राहलाय झालावर प्लास्टर काढुन टाकले त्यामुळे.. मुळ स्वरूपातले भीत्ती चित्र सगळ्यांच्या समोर आली. जमीनिवरचे गालिचे काढुन टाकण्यात आले.
१००० वर्ष पेक्षा जास्त जुनी असलेली वास्तु बघीतल्याचा वेगळाच आनंद होतो. एकाच वास्तुत एका बाजुला ख्रिचन धर्माची पवित्र मानलेली मेरीची मुर्ती तर दुसर्याळ बाजुला मुसलमानाची प्रार्थाना करण्याची भिंती लगतची जागा. ईथला एक स्तंभ प्रसीध्द आहे. जर कोणी ह्या स्तंभाला आपल्या दोनी हाताने आलिंगन देतांना आपले हात एकमेकांना स्पर्श झाले तर आपल्या मनातली इच्छा पुर्ण होते.
१९८५ उनेसको (UNESC() मधे हाजिया सोफिया हे वर्ल्ड हिरिटेज म्हणुन घोषित केल.
टोपकाई (Topkapi) हा ओत्तॉमनांनी बाधंलेला पहिला महाल आहे. १४६६ ते १४७८ मधे बांधला. हा महाल खुप छान आहे. ४०० वर्ष हा महाल ओत्तोमन सुलतानांचे राहण्याचे ठिकाण होते. ८ ते १० ह्जार लोक राहत असत. कारंजांनी सुशोभित केलेले मोठ मोठे बगिचे आहे.
१९२४ मधे हा महाल संग्राहलय म्हणुन घोषित केला.

BLUE MOSQUE (SULTANAHMET CAMII) :
ब्लु मॉस्क ( Blue Mosque) : सुलतान अहमेत- १ (Sultan Ahmet १) ने ही ब्लु मोस्क १६०६ ते १६१३ मधे बांधली. ईझनिक (Iznik) फरशि बणवण्यार्याh कारागीराकडुन निळ्या रंगाच्या ९९९ छटां मधे, २०००० फरशा बनवुन घेतल्या. ह्याचा ऊपयोग आतला भाग सुशोभित करण्यासाठी केला. ह्याच निळ्या फरश्यांन बरोबर ३०० स्टेन ग्लास पेंटिंग्चा पण खिडक्या सुशोभित आणि ने॑सर्गीक प्रकाश येण्या साठी केला. ह्या निळ्या रंगा मु़ळेच ह्याचे नाव ब्लु मॉस्क पडल.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

वा!

अनपेक्षित रित्या मला अगदी हव्या असलेल्या विषयावरचा जरासा संदर्भ असलेला लेख वाचायला मिळाला.
ऑटोमन साम्राज्या विषयी मी काही माहिती शोधतच होतो वाचायला.

लेख मस्तच झाला आहे. पण याची लेख मालिकाही चालली असती.
आणि काही प्रकाशचित्रे द्याल?

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

धन्यवाद गुंडोपंत.

लेख मस्तच झाला आहे. पण याची लेख मालिकाही चालली असती.

मनात एक भीती होती... लेख मालिका लिहत असताना .."आळशी" नावाची मॅत्रीण भेटली असती तर!!! .. नको ..आपला लेखच बरा.

प्रकाशचित्रे.... नकीच्च...देइल.

स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा

सर्वप्रथम उपक्रमावर स्वागत. आवि एका दमात इतकं सगळं लिहिल्याबद्दल अभिनंदन :)
लेख फार छान आहे. वाचून मजा आली.. नवा प्रदेश, नवे लोक, नवे अनुभव.. अशी नवलाई नेहमीच एका अनामिक भीतीबरोबर उत्सुकता निर्माण करते ती अश्या छान अनुभवांमुळेच!

अनुभव छान उतरला आहेच त्याबरोबर तुम्हाला भेटलेल्या व्यक्ती आम्हालाही लेखाद्वारे भेटल्या. अजून येऊ द्या!

-ऋषिकेश

धन्यवाद

धन्यवाद ऋषिकेश

लेख आवडला.

लेख आवडला. इस्तंबुल शहर हे जगातील एकमेव शहर असे आहे की ते दोन खंडात विभागले गेले आहे. तुर्की लोकांना दुसर्या महायुद्धानंतर जर्मेनीत अनेक कामे मिळाली. तेथे मनुष्यबळाची कमतरता युद्धात जर्मेनीचे लाखो पुरुष मारल्या गेल्या मुळे निर्माण झाली होती. ती पिढी तेथेच राहिली; नंतरची प्रमुखतेने ट्याक्सी चालवणे वगैरे सारखी कामे करुन्न उपजिविका करते आहे. आताची तिसरी पिढी मात्र चांगली सुशिक्षीत आहे व् व्हाईट कॉलर कामे करते.

अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीच्या एका सॉफ्टवेअरचे नाव इस्तंबुल होते व् तो प्रोजेक्ट मी केला होता भारतात त्याची आठवण आली.

माहिती बद्द्ल धन्यवाद

अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीच्या एका सॉफ्टवेअरचे नाव इस्तंबुल होते.

ह्या माहिती बद्द्ल आभारी आहे.

सुंदर गिफ्ट

स्वनिर्मित गिफ्ट व ग्रिटींग आवडली.
प्रकाश घाटपांडे

छान

छान प्रवासवर्णन!
राधिका

स्वागत

प्रवासवर्णन छान झाले आहे.

सही!

वा ! अप्रतिम केले आहे वर्णन! एकदम जुन्या मैत्रिणीला भेटल्यावर आपण कसे पटकन भराभरा बोलत सुटतो तसा फिल आला हा लेख वाचताना! मजा आली!

छान लेख

तुम्ही इतके कष्ट घेऊन हा लेख लिहिलात तेव्हा आणखी थोडे कष्ट घेउन थोडा नीटनेटका केला असतात तर अजून आवडला असता. हा लेख म्हणजे रफ ड्राफ्ट वाटला.

पुढील लेखनास शुभेच्छा!

सुचनेचे बद्दल आभारी आहे

प्रतिसादा बद्दल आभारी आहे. पुढच्या लेखात सुचनेचे पालन करु...

सहमत

प्रवासवर्णनपर लेख आवडला. अमेरिकेची प्रवासवर्णने वाचून नाही म्हटले तरी वैताग आला होता. एखाद्या सुखद झुळकीप्रमाणे हा लेख वाटला. (थोडे शुद्धलेखनाकडे लक्ष दिल्यास बरे होईल म्हणजे या झुळकीबरोबर उडणाऱ्या अशुद्ध शब्दांच्या धुळीची आमच्यासारख्यांना ऍलर्जी आहे.)

उपक्रमावर स्वागत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शुद्धलेखन

पुढच्या लेखात शुद्धलेखन सुधारन्याचा नक्कीच प्रयन्त करेल....

लेख आवडला

प्रवास वर्णन आवडले. उपक्रमावर स्वागत.

लेख काळजीपूर्वक लिहिला असता तर दोन-तीन भागात टाकता आला असता असे वाटते.

लै भारी !

प्रवासवर्णन आवडले !

-दिलीप बिरुटे

लेख आवडला

महत्त्वाचे म्हणजे या निमित्ताने ललित लेखनाला उपक्रमावर असलेली बंदी उठली हे बरे झाले. हे कदाचित् "इंटरनेटवरून शोधलेली माहिती" या परिशिष्टामुळे झाले असावे का? हे परिशिष्ट जोडले नसते तर सदर लेख उपक्रमाच्या धोरणांशी सुसंगत म्हणता आला असता का आणि तो उपक्रमावर राहिला असता का?

विनायक

काही गरज?

असले प्रतिसाद देण्याची खरोखर काही गरज आहे का?
लेख माहितीपुर्णच आहे!
शिवाय लेखिकेचा येथे पहिलाच लेख आहे. काही काळाने येथे कसे लेखन होते याची जाणीव होतेच. मग तसे लेखनही बदलत जाते. परंतु फालतु वादापायी संपादनाची कात्री न चालवता संपादकांनी मराठीतील एक चांगली लेखिका मिळवली आहे हे थोडके नाही का?

या शिवाय वर बहुतेक सगळ्या सदस्यांनी लेख चांगला असल्याचे कळवले आहेच.

ज्यांना हे संपादकांचे अथवा उपक्रमाच्या मालकांची वागणे खपत नसेल
त्यांनी आपले स्थळ काढावे, कुणी अडवले आहे?

आपला
गुंडोपंत
(स्वतःचे संकेतस्थळ काढण्याची ऐपत नसलेला एक गरीब सदस्य!)

काही मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाच्या प्रतिसादांसाठी खरडवही किंवा व्य. नि. सुविधेचा वापर करावा.

प्रतिसाद संपादित.

असले प्रतिसाद देण्याची खरोखर काही गरज आहे का?

असले म्हणजे कसले? नेमके काय चुकले?

लेख माहितीपुर्णच आहे!

इंटरनेटवरून मिळालेली माहिती इतकाच भाग माहितीपूर्ण आहे. आधीचा म्हणजे सुमारे ७०% लेख जवळजवळ बिनमाहितीचा आहे.

शिवाय लेखिकेचा येथे पहिलाच लेख आहे. काही काळाने येथे कसे लेखन होते याची जाणीव होतेच. मग तसे लेखनही बदलत जाते. परंतु फालतु वादापायी संपादनाची कात्री न चालवता संपादकांनी मराठीतील एक चांगली लेखिका मिळवली आहे हे थोडके नाही का?

पहिल्या लेखाचे कौतुक मलाही आहे. लेख आवडल्याचे मी पण लिहिले आहेच. परंतु धोरणात्मक प्रश्न संपादक - मालकांना विचारले तर काय मोठे आकाश कोसळले?

प्रतिसाद संपादित. व्यक्तिगत प्रतिसादांसाठी खरडवही किंवा व्य. नि. सुविधेचा वापर करावा. विषयाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद अप्रकाशित केले जातील याची नोंद घ्यावी.

प्रतिसाद संपादित.

इंटरनेटवरून मिळालेली माहिती इतकाच भाग माहितीपूर्ण आहे.

म्हणजे लेख माहितीपूर्ण आहे तर!

पहिल्या लेखाचे कौतुक मलाही आहे. लेख आवडल्याचे मी पण लिहिले आहेच.

छान, चांगली दाद देणे उत्तम!

परंतु धोरणात्मक प्रश्न संपादक - मालकांना विचारले तर काय मोठे आकाश कोसळले?

ओहो! मालकांना विचारलेत! मग सार्वजनिक कशाला? व्यनि टाकला असता तरी चालले असते. प्रतिसाद सार्वजनिक आल्याने सदस्य या नात्याने मीही त्यावर टिप्पणी दिली.

- गुंडोपंत

उपक्रमाच्या धोरणात न बसणारा प्रतिसादातील मजकूर संपादित केला आहे.

लेक् मस्त् आ हे.

तेवड् शुध्द्लेखनाच् बघा. नाय्तर् लेख चांगलाआहे. असे ट्रॅवेलॉग उपक्रमावर वाचताना आनंद झाला. प्रवास आणि प्रवासवर्णन हे दोन्ही विषय उपक्रमाला वर्ज्य नाहीत हे पूर्ववाचनांवरून आम्हाला माहित होतेच.

काही लोकांचा नेहमीप्रमाणेच आक्षेप दिसतो. असले आक्षेप लेखांवर असतात का संकेतस्थळांवर ते आम्हाला कळत नाही पण संकेतस्थळाकडून त्यांना उत्तर मिळालेले आहे असे दिसते.

-राजीव.

--------------------------------------------------------------------
"प्वाटात लय दुकतया रं गांजोप्या"
"ह्ये घ्ये टमरेल इन्या. चल आपन दोगंबी जाऊ परसाकडला"

अहो, असले ५६ लेख आम्हीपण लिहू शकतो पण आमची लायकी इतकी खालच्या थराची नाही हो.

धोरण

ज्यांना हे संपादकांचे अथवा उपक्रमाच्या मालकांची वागणे खपत नसेल
त्यांनी आपले स्थळ काढावे, कुणी अडवले आहे?

आपला
गुंडोपंत

उपक्रमाचे धोरण नेमके काय आहे या प्रश्नाची दोन उत्तरे संभवतात. १. माहितीपूर्ण लेखन किंवा २. मालक संपादक ठरवतील ते.
पहिले धोरण असेल तर प्रस्तुत लेख ललित आहे की माहितीपूर्ण? "इंटरनेटवरून मिळालेली माहिती" असे परिशिष्ट जोडले की कुठलेही ललित लेखन माहितीपूर्ण ठरते का? हे आणि असे प्रश्न सुसंगत ठरतात. पण जर दुसरे उत्तर असेल तर बोलणेच खुंटले आणि मग आपली टिप्पणी योग्य ठरते. या संबंधात मला कम्युनिस्ट पार्टीसंदर्भातला किस्सा आठवतो. एकदा एका सदस्याची शिस्तभंगाबद्दल चौकशी चालू असते. "हॅव यू वेव्हर्ड फ्रॉम द पार्टी लाईन?" "नेव्हर! आय ऑल्वेज वेव्हर्ड विथ द पार्टी लाईन" त्याचे मासलेवाईक उत्तर.

विनायक
अवांतर - धोरणविषयक प्रश्न व्यनि अथवा खरडीने न विचारता जाहीर विचारण्यामागचे कारण असे की जाहीर खुलासा झाल्यास प्रशासनाची भूमिका मला एकट्यालाच न समजता सर्वांना समजेल

माझे वाक्य उधृत का केले आहे?

गजाननराव,
माझे वाक्य का उधृत केले आहे?
मी प्रतिसाद देणे अपेक्षित आहे काय?

कम्युनिस्ट पार्टीचा किस्सा का दिला आहे?
आपला काही गैरसमज झाला आहे, मी कम्युनिस्ट नाही!
माझा पार्टी या प्रकाराशी संबंध दारू पितांनाच येतो. आणि तेव्ह्ढी एकच पार्टी मला माहिती आहे!
या शिवाय, माझा कोणताही पक्ष काढण्याचा मनोदय नाही.

उपक्रमा विषयी असली माहिती जर जाहिर विचारायची आहे तर,
मग वेगळा चर्चा प्रस्ताव का नाही टाकत? इस्तान्बूलचा यात काय संबंध आहे?

तेथे कम्युनिस्ट सरकार होते काय?
की उपक्रमाचे हेड हापीस तेथे आहे?

आपला
गुंडोपंत

उत्तरे

माझे वाक्य का उधृत केले आहे?
मी प्रतिसाद देणे अपेक्षित आहे काय?

त्याचे कारण दुसर्‍या परिच्छेदात दिले आहे.

कम्युनिस्ट पार्टीचा किस्सा का दिला आहे?
आपला काही गैरसमज झाला आहे, मी कम्युनिस्ट नाही!
माझा पार्टी या प्रकाराशी संबंध दारू पितांनाच येतो. आणि तेव्ह्ढी एकच पार्टी मला माहिती आहे!
या शिवाय, माझा कोणताही पक्ष काढण्याचा मनोदय नाही.

समजले नसेल तर सोडून द्या. सर्वांना सर्व गोष्टी समजल्याच पाहिजेत असे नाही.

उपक्रमा विषयी असली माहिती जर जाहिर विचारायची आहे तर,
मग वेगळा चर्चा प्रस्ताव का नाही टाकत? इस्तान्बूलचा यात काय संबंध आहे?

माझा प्रश्न उपक्रमाचे या लेखाबद्दलचे धोरण काय आहे असा असल्याने या धाग्यात विचारला आहे.

विनायक

काही मजकूर संपादित. संपादन मंडळाला अनावश्यक वाटणारे यापुढील सर्व प्रतिसाद समूळ अप्रकाशित केले जातील याची नोंद घ्यावी.

हेच

समजले नसेल तर सोडून द्या. सर्वांना सर्व गोष्टी समजल्याच पाहिजेत असे नाही.

हेच म्हणतो मी! ;))))

माझा प्रश्न उपक्रमाचे या लेखाबद्दलचे धोरण काय आहे असा असल्याने या धाग्यात विचारला आहे.

पण धागा प्रवास वर्णनाचा आहे. धोरण विषयक नाही.
येथे पुर्वीही प्रवास वर्णन आले आहे.
(लास वेगास आणि इतरही)

काही मजकूर संपादित. संपादन मंडळाला अनावश्यक वाटणारे यापुढील सर्व प्रतिसाद समूळ अप्रकाशित केले जातील याची नोंद घ्यावी.

मजकूर संपादित असल्याने मला कळलाच नाही, काय लिहिले होते ते देवाला माहिती
असो,

मी या वादातून बाहेर जात आहे.राअपण आनि उपक्रम काय घालायचे ते घाला!
गोंधळ म्हणतोय मी!

आपला
गुंडोपंत

उत्तरे

तेथे कम्युनिस्ट सरकार होते काय?

कल्पना नाही. तितका माझा अभ्यास नाही.

की उपक्रमाचे हेड हापीस तेथे आहे?
हा प्रश्न आपण खरोखर गंभीरपणे विचारता आहात? मला याचेही उत्तर माहिती नाही. तसेही मला हे माहिती असावे असे आपल्याला का वाटले हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

विनायक

फोटो

बासिलिका सिस्तेरन (Basilica Cistern) :

Water Palace
Water Palace 2

टोपकाई (Topkapi) :

topkapi-1
topkapi-2

पुल :

night view of bridge

हागिया सोफिया (Hagia Sophia):

hagia sophia

बाजराचे प्रवेश द्वर :

grand bazar

ब्लु मॉस्क ( Blue Mosque) :

blue mosque -inside

चित्रे छान

फोटू आवडले.
जियो...!!!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर