अर्थ वा संदर्भ?

यु ट्युब् वर हा विडीओ पाहिला: http://www.youtube.com/watch?v=i01GCCnk1Wo

यात म्हटल्या जाणा-या गाण्याचा(?) अर्थ वा संदर्भ कोणी देउ शकेल काय? नवीन रचना आहे का?

मालिका कुणी पहात असल्यास त्याबद्दल थोडी माहीती दिलित तरी आवडेल.

धन्यवाद,
Nile

लेखनविषय: दुवे:

Comments

स्टार प्रवाह

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू झालेली ही सिरिअल असून वरील व्हिडिओमध्ये त्याचे शीर्षक गीत दाखवले आहे असे वाटते. बाकी अर्थ,संदर्भ वाचायला मलाही आवडेल.

अवांतर: मी मागे मुंबईला फोन करून तुम्ही ही सिरिअल पाहता का असे विचारले त्यावेळेस ही मालिका पाहणे "असंभव" ;-) आहे असे उत्तर मिळाले.

कवि भुषण

कवि भुषण यांचे हे "शिवराज भुषण" काव्य आहे इथपर्यंत कळाले. पुर्ण काव्य इंटरनेट वर दिसत नाही, कुणाकडे आहे का?

भुषण यांनी हे राज्यअभिषेकावेलळी रचलेले आहे! मिळवलेच पाहिजे असे दिसते. (असे असेल तर अवघड नाही :) )

शेर शिवराज है|

येथे बघा. कवी भूषण यांच्या इतर रचनाही येथे आहेत.

असो. मालिकेचे शीर्षक गीत फारच सुंदर आहे. कोणी ही मालिका पाहत असल्यास मालिकेच्या दर्जाविषयी वाचायला आवडेल.

आभार्,

धन्यवाद! :)

पुरंदरेंनी चाल लावली आहे असे कळाले! सुरेखच आहे!

(मला सुध्धा घरी कोणी बघतयं ही मालिका असे वाटत नाही!! पुढच्या फोन वर विचारले पाहिजे)

छत्रपती शिवाजी अप्रतिम आहे.

नुसतीच अप्रतिम नाही तर अभूतपूर्व आहे. शहाजीच्या सुरुवातीच्या काळापासून मालिकेची सुरुवात आहे. शहाजीची धावपळ, या सलतनीकडून त्या सलतनीच्या नोकर्‍या करत करत सैन्य उभारणी कशी केली. अगदी छोट्या बाळशिवाजीला कसे घडवले आणि त्यानंतर शिवाजीला सल्ला देणारी एकापेक्षा एक चांगली माणसे शिवाजीकडे पाठवून त्याच्या स्वराज्याच्या उभारणीला बंगळुरात राहूनही जे जे शक्य होईल ते कसे केले ते अतिशय समर्थपणे दाखवले आहे. शहाजीच शिवाजीचा खरा गुरू हे ही मालिका पाहून पटते.
आता शिवाजी मोठा झाला आहे, आणि गेल्या सातआठ दिवसापासून ज्याची तपशीलवार आखणी चालू होती ते काम, म्हणजे अफ़झलखानाचा वध एक दोन दिवसात होईल असे वाटते.
इतकी चांगली मालिका किंवा शिवाजीवर इतका चांगला चित्रपट वा इतके चांगले नाटक अजूनपर्यंत झालेले नाही. पूर्वी , हिंदीत चाणक्य नावाची एक उत्कृष्ट मालिका होती, तिच्यापेक्षा ही सरस आहे.
माझ्या ओळखीचे कुणीही ही मालिका पाहत नाही. कारण, ज्या स्टार वाहिनीवर ही येते, ती अनेकांना माहीत नसते. शिवाजीवर अनेक सिनेमे होऊन गेले आहे, परत परत काय पहायचे असे म्हणणारे काही जण आहेत. या छत्रपती शिवाजी मालिकेतले शिवचरित्रातले प्रसंग लोकांना माहीत नसतात. तसेच शिवाजीच्या आयुष्यात आलेली बरीच, तथाकथित अल्पपरिचित माणसे यांची नावेही लोकांना आठवत नसतात. त्यामुळे ही मालिका, मधूनच पाहिली तर अनेकांना समजत नाही. ज्यांनी बाबासाहेब पुरंदरे शब्दश: वाचले आहेत, त्यांना मात्र पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो.
आणखी एक म्हणजे, नेमक्या या मालिकेच्याच वेळी भुताटकी आणि पुनर्जन्मावर आधारलेली असंभव ही मालिका दुसर्‍या एका वाहिनीवर असते, ती लोकांना सोडवत नाही, हेही एक कारण आहे. (असंभव या मालिकेतल्या संवादात वापरलेले मराठी अत्यंत शुद्ध आणि उच्च दर्जाचे असते. केवळ यासाठी ही मालिका ऐकावी असे आमच्या परिचयाच्या एका शुद्धलेखनतज्‍ज्ञाचे मत आहे!) --वाचक्‍नवी

व्वा!

अगदी छोट्या बाळशिवाजीला कसे घडवले आणि त्यानंतर शिवाजीला सल्ला देणारी एकापेक्षा एक चांगली माणसे शिवाजीकडे पाठवून त्याच्या स्वराज्याच्या उभारणीला बंगळुरात राहूनही जे जे शक्य होईल ते कसे केले ते अतिशय समर्थपणे दाखवले आहे. शहाजीच शिवाजीचा खरा गुरू हे ही मालिका पाहून पटते.

वा! यावर मागे चर्चा केली होतीच. शहाजीच्या राजकारणाचा विसर पडू नये असेच वाटते.

नेमक्या या मालिकेच्याच वेळी भुताटकी आणि पुनर्जन्मावर आधारलेली असंभव ही मालिका दुसर्‍या एका वाहिनीवर असते, ती लोकांना सोडवत नाही, हेही एक कारण आहे.

हम्म! तेच म्हटले वर. ;-)

मत...

असंभव या मालिकेतल्या संवादात वापरलेले मराठी अत्यंत शुद्ध आणि उच्च दर्जाचे असते. केवळ यासाठी ही मालिका ऐकावी असे आमच्या परिचयाच्या एका शुद्धलेखनतज्‍ज्ञाचे मत आहे

हे मत प्रामाणिक आहे की उपहासाचे आहे? कारण मी ही मालिका पाहत नाही.

-सौरभ.

==================

आत्ताच (की आताच)

असंभव या मालिकेतल्या संवादात वापरलेले मराठी अत्यंत शुद्ध आणि उच्च दर्जाचे असते.

हप्ता बंद ह्या मालिकेचा एक भाग पाहिला. त्यात सूत्रधार आदेश बांदेकर म्हणाला, ज्योतिबा फुले ह्यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा काढली. त्या शाळेच्या हेडमास्तर होत्या सावित्रीबाई फुले ! :O

त्याला बहुदा हेडमिस्ट्रेस म्हणायचे असावे. पण मराठी माध्यमात शिकलेल्या बांदेकरभाऊंनी जर मुख्याध्यापिका हा सर्वांना माहित असलेला शब्द योजला असता तर हा विनोद घडला नसता. असो.

विनाकारण इंग्रजी शब्दांचा प्रेक्षकांवर मारा करण्याचा अट्टाहास बाळगला तर असे प्रसंग वारंवार घडणारच.
--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

छान मालिका

मी रोज न चुकता पाहतो.

 
^ वर