शेवटी पाकिस्तान जातीवर गेले!

आजच्या (२ एप्रिलच्या) 'टाइम्स् ऑफ् इंडिया'त पहिल्या पानावर "अमेरिका पाकिस्तानला २.८ अब्ज डॉलरची जी मदत करणार आहे ती दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी, भारताविरुद्ध लढण्यासाठी नव्हे" या शीर्षकाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सर्व माहीत असूनही पाकिस्तानला लष्करावर खर्च करण्यासाठी मदत करीत राहणे ही अमेरिकेची जुनी खोड आहे. प्रत्येक वेळी ही मदत भारताविरुद्ध वापरण्यासाठी नाही असे आश्वासन अमेरिकेकडून दिले गेले आहे. या संदर्भात पं. नेहरूंच्या मंत्रीमंडळांतील संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेनन आपल्या एका भाषणात म्हणाले होते, "Guns firing only in one direction are yet to be manufactured".

वरील बातमीचा उत्तरार्ध १६व्या पानावर "Islamabad can't take on terrorists" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला आहे. त्यांत असे स्पष्ट म्हंटले आहे की अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेतल्यावर भारताचे वर्चस्व वाढण्याचा धोका असल्यामुळे पाकिस्तानला तालिबान व अतिरेकी हे दोन्ही पर्याय (भारताला शह देण्यासाठी?) जिवंत ठेवणे जरुरीचे वाटते.

अजूनही ज्यांना पाकिस्तान दहशतवादविरोधात आपल्याबरोबर आहे असे वाटत असेल त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा.

तुम्हाला काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

कुत्राचे शेपूट वाकडीच रहाणार

ज्यांना असं वाटत असेल त्यांनी अजून मुस्लिमांना ठीक प्रमाणे ओळखलेले नाही, मुस्लिम कधी पण "सेकुलर" किंवा "लोकशाही-समर्थक" होऊच शकत नाही...

http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर