खिडकीग्रस्त संगणक : सुरक्षा आणि सफाई

विसू १ : हा लेख खिडकीग्रस्तांसाठी आहे. म्याक किंवा लिनक्स वापरणार्‍यांनी याकडे दुर्लक्ष करावे किंवा 'काय साध्या-साध्या गोष्टीसाठी झगडावे लागते या तळागाळातल्या लोकांना' असे म्हणून सोडून द्यावे.

खिडकीग्रस्त संगणक चांगला चालायला हवा असेल तर त्याची तान्ह्या बाळाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. आणि मासॉची बाळे वयाने कितीही वाढली तरी त्यांची बौद्धिक पातळी वाढत नाही. या बाळाला जगवण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

सुरक्षा : अँटीव्हायरसमध्ये नॉर्टनचा अनुभव चांगला नाही. हा मेमरीच्या बाबतीत बकासुर आहे आणि तरीही विषाणूची लागण होतेच. व्हिस्टाबरोबर मॅकफी ट्रायल म्हणून आले होते पण ते मधेच आपोआप बंद होत असे. फुकट मिळणार्‍यांपैकी अव्हिरा आणि एव्हीजी हे दोन्ही उत्तम आहेत. एका संगणकावर एकच अँटीव्हायरस वापरावे, दोन एकाच वेळी वापरल्यास अडचण येण्याची शक्यता असते. पण अँटीस्पायवेअर मात्र एकापेक्षा जास्त वापरल्यास ते एकमेकांना पूरक ठरून अधिक चांगली संरक्षक भिंत तयार होते. (अर्थात तुमच्या संगणकाची क्षमता पाहून किती वापरायचे ते ठरवावे. साहजिकच यांना मेमरी लागते.) अँटीस्पायवेअरमध्ये सुपरअँटीस्पायवेअर, विंडोज डिफेंडर, स्पायबॉट, स्पायवेअरब्लास्टर हे चांगले आहेत. शक्यतो आयई वापरू नका. त्याऐवजी फाफॉ बरेच सुरक्षीत आहे.

महत्त्वाचे :ही सॉफ्टवेअर नुसती असून उपयोग नाही त्यांचे नियमित अपडेट घेतले नाहीत तर ती असून नसल्यासारखी आहेत. याचबरोबर मासॉ आपल्या पातकांचे प्रायश्चित्त म्हणून नियमितपणे विंडोज अपडेट प्रकाशित करत असते. तेही आवश्यक आहेत. शिवाय तुमच्या संगणकावरील जावाचेही अपडेट घेणे आवश्यक आहे. (कंट्रोल पॅनेल - जावा - अपडेट) मात्र जावाचे नवीन व्हर्जन इन्स्टॉल केल्यावर जुने व्हर्जन तुम्हाला हाताने काढून टाकावे लागते. (कंट्रोल पॅनेल - ऍड/रिमूव्ह प्रोग्राम्स)

संसर्ग झाल्यास काय करावे?

सीनेट या स्थळावर प्रश्न विचारल्यास जलद मदत मिळते असा अनुभव आहे. जर विषाणू अधिक शक्तीशाली असेल तर एचजेटी अर्थात हायजॅक धिस या प्रकारच्या स्थळांवर मदत मागता येईल. ग्लॅडिएटरचा फोरम हा 'एचजेटी लॉग्ज' या विशिष्ट प्रकारात मोडतो. इथे माहिती देण्याआधी तुम्हाला हायजॅक धिस नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून रन करावे लागेल. यामुळे तुमच्या संगणकावर कुठल्या प्रोसेस आहेत याचा एक रिपोर्ट तयार होतो (टेक्स्ट फाईल). तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा त्यासोबत तुम्हाला ही फाईल जोडावी लागेल.

सर्वात महत्वाचे : या किंवा इतर कुठल्या एचजेटी फोरमवर तुमच्यासारखीच अडचण इतर कुणाला आलेली दिसली तर त्याने केलेले उपाय तुम्ही करू नका. एचजेटी फोरमवर वापरले जाणारे प्रतिबंधक उपाय (उदा. कोम्बोफिक्स) अत्यंत जहाल असतात आणि तज्ञांच्या देखरेखीखाली न केल्यास तुमच्या संगणकाला अपाय होण्याचा संभव असतो.

सफाई: विंडोज आणि लिनक्समधील एक फरक म्हणजे लिनक्स अत्यंत शहाणे बाळ आहे. जन्मल्यापासून स्वतःची सर्व कामे स्वतः करते. यातील एक काम म्हणजे टेंपररी फाइल काढून टाकणे. यासाठी सीक्लीनर हे सॉफ्टवेअर फारच उत्तम आहे. हे वापरण्याआधी सूचना वाचल्यास उत्तम. नुसत्या सफाईला धोका नाही, पण यातील रजिस्ट्री क्लीनर माहिती असल्याशिवाय न वापरलेला बरा.

डीफ्रॅगमेंटेशन : मासॉचे बाळ काम झाले की फायली वाट्टेल तशा जागा मिळेल तिथे टाकून देते. मग फायली हुडकताना वेळ लागतो. हे टाळायचे असेल तर नियमितपणे हार्ड डिस्क डिफ्रॅग करायला हवी. व्हिस्टा वापरत असाल तर चुकूनही व्हिस्टाचा डिफ्रॅग वापरू नका. मासॉच्या बाळाने खोली आवरायला काढली तर सगळी कामे टाकून ते दिवसभर खोलीच आवरत बसते आणि इतके करूनही खोली आवरली जात नाहीच. तो बंद कसा करायचा याच्या सूचना इथे. याऐवजी ऑसलॉजिक्स हे मोफत सॉफ्टवेअर संगणक डिफ्रॅग करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

याखेरीज व्हिस्टा इन्स्टॉल केल्यानंतर त्यात साधारणपणे १७६० गोष्टी अनावश्यक असतात आणि त्यामुळे संगणक हळू चालतो. तुमच्यामध्ये बराच रिकामा वेळ, वेठबिगाराप्रमाणे मेहनत करण्याची तयारी आणि तेनसिंग शेर्पाइतकी चिकाटी असेल तर यातील बर्‍याच गोष्टी काढून टाकून तुम्ही आपले जीवण सुसह्य करू शकता. हे कसे करायचे याची माहिती इथे.

सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये फुकट ते चांगले हा समज दिवसेंदिवस दृढ होतो आहे. लिनक्स, ओपनऑफिस यांच्या वाढत्या वापरामुळे मुक्तस्त्रोत प्रणालीमधून तयार झालेली सॉफ्टवेअर लोकप्रिय होत आहेत. खिडकीग्रस्तांसाठी फुकट मिळणार्‍या सॉफ्टवेअरची यादी आणि त्यांचे समीक्षण इथे मिळू शकेल.

Comments

लेख चांगला आहे

लेख चांगला आहे, उपयुक्त आहे.

परंतु एक दोन गोष्टी लिहायचा मोह आवरत नाही.
१) व्हिस्टा गेली एक वर्ष वापरतो आहे, मला तरी काही गैरसोयीची किंवा स्लो देखील वाटली नाही.
२) संगणकाला बाधा कशी होते?

माझ्या संगणकाला अजुनही बाधा झाली नाही (टचवुड) मॅकेफी रक्षण व वेळोवेळी येणारे विंडोज पॅचेस आजवर तरी चोख काम करत आले आहेत.
इमेल मधुन येणार्‍या अनोळखी व न मागीतलेल्या फाईल्स् ओपन न करता डीलीट करणे, माहीत नसलेले, फ्रिवेयर उगाच् इंस्टाल न करणे, माउस अतिशय शिस्त लावून वापरणे इकडे तिकडे क्लिक न करणे, पॉप अप ब्लॉकर,

सध्या मुद्दाम एक संगणक (एक्स पी ) विदाउट एन्टी व्हायरस ठेवला आहे. ठरावीक साईटस् उघडणे, माहीत नसताना उगाच क्लिक न करणे, पॉप अप ब्लॉकर इतकेच चालू ठेवले आहे. बघु कधी बाधा होते.

दरवेळी संगणक घेताना आपण ज्याकरता उपयोग करणार [पिदवणार] आहोत तितक्या ताकदीचा संगणक घेणे म्हणजे रॅम, मदरबोर्ड, प्रोसेसर इ घेतले तर संगणक भरपुर चांगल्या वेगात अगदी व्हिस्टावर देखील उत्तम चालतो असा माझा अनुभव.

एन्टी व्हायरस मुळे जरासा स्लो झाल्यासारखा वाटतो संगणक पण संगणकाचा मजबुत रॅम्, कमीत कमी बॅकग्राउंड प्रोसेसेस, आतील फॅन व खोलीतील हवामान योग्य असणे, सुपर्ब ब्रॉडबँड नेट कनेक्शन असेल तर व्हिस्टाचा बाप असला तरी वापरकर्त्याला फारसा त्रास होउ नये.

आजवर एव्हीजी, नॉर्टन व मेकाफी वापरले आहेत व मत मेकाफी ला इतर दोन मधे संगणक स्लो होतो.

कदाचित वरील काही उपाय केल्यास संगणक अजुन फिट होईलही पण आता जे आहे ते देखील उत्तमच आहे. त्यामुळे उगाच करायला गेलो एक झाले भलतेच असे नको व्हायला. :-)

असो जाणकारांचे मत अपेक्षीत.

व्हिस्टा

सहजराव,
तुम्ही मासॉमध्ये नोकरीला नाहीत ना? ;)

१) व्हिस्टा गेली एक वर्ष वापरतो आहे, मला तरी काही गैरसोयीची किंवा स्लो देखील वाटली नाही.
भाग्यवान आहात. अर्थात तुम्ही काय काय वापरता त्यावरही हे अवलंबून आहे. व्हिस्टा विशेष त्रासदायक ठरण्याची काही उदाहरणे म्हणजे
व्हिस्टावरून एक्सपी असलेल्या संगणकाला संपर्क करणे
प्रिंटर इन्स्टॉल करणे (बरेचदा, पण माझ्या बाबतीत त्रास झाला नाही.)
यूएसी नावाचे अत्यंत बिनडोक प्रकरण. जर एखाद्याने यूएसी बंद न करता व्हिस्टा महिनाभर वापरले असेल तर त्याला संत म्हणायला हरकत नाही.
व्हिस्टाचा डिफ्रॅगमेंटर : एकतर हा बॅकग्राउंडमध्ये चालतो आणि कधीही सुरू होतो. तुम्ही इतर काही महत्वाचे काम करत असाल तर अशा वेळी तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता आहे. शिवाय डिफ्रॅग किती झाले, किती राहिले याचा अजिबात अंदाज येत नाही कारण सर्व बॅकग्राउंडमध्ये चालत असते. बाकीही बरीच उदाहरणे आहेत.

माझ्या संगणकाला अजुनही बाधा झाली नाही (टचवुड) मॅकेफी रक्षण व वेळोवेळी येणारे विंडोज पॅचेस आजवर तरी चोख काम करत आले आहेत.
यातले काही उपाय लेखात आलेच आहेत.

एन्टी व्हायरस मुळे जरासा स्लो झाल्यासारखा वाटतो संगणक पण संगणकाचा मजबुत रॅम्, कमीत कमी बॅकग्राउंड प्रोसेसेस, आतील फॅन व खोलीतील हवामान योग्य असणे, सुपर्ब ब्रॉडबँड नेट कनेक्शन असेल तर व्हिस्टाचा बाप असला तरी वापरकर्त्याला फारसा त्रास होउ नये.
सहमत आहे. दुर्दैव हे की प्रत्येक वेळी इंटेल नवीन ताकदीचा संगणक बाजारात आणते आणि मासॉ ती ताकद फुकट घालवण्यासाठी आधीपेक्षा वाईट ओएस बाजारात आणते. म्हणूनच "Every time andy gives us more power bill takes it away" असे म्हणतात ते खोटे नाही.

इथे प्रश्न फक्त व्हिस्टाचाही नाही. व्हिस्टामुळे फसल्याचे दु:ख नाही, पण मासॉ सोकावते आहे. एकतर व्हिस्टाची मुळात काही गरजच नव्हती. मासॉने आणलेल्या सर्व ओएसमध्ये एक्सपी सर्वात चांगली आहे. ती सोडून नवीन ओएस बाजारात आणायचे कारण काय? उत्तर एकच : बनियेगिरी. मासॉचे सर्व बेत लोकांना अधिकाधिक गंडवून पैसे उकळणे ह्या एकमेव हेतूवर आधारलेले असतात. प्रत्येक ओएसच्या होम बेसिक, होम प्रीमीयम इ. प्रती काढणे हा त्यातलाच प्रकार. मासॉचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मासॉला सर्व क्षेत्रांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असा गोड गैरसमज असतो. ऍपलच्या आयपॉडला उत्तर म्हणून मासॉने झून नावाचा प्रकार बाजारात आणला होता. त्याचे पुढे काय झाले हे सांगायला नको. :)

असो जाणकारांचे मत अपेक्षीत.
:) क्षमस्व. मी जाणकार नाही तरीही प्रतिसाद दिला.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

विस्टा

विस्टाचे कौतुक करावेसे नक्कीच वाटत नाही. विस्टासाठी असणार्‍या हार्डवेअरवर उबुंटु सारखी लिनक्स तर एकदम मस्त चालते. अनेक चांगली आणि फुकट सॉफ्टवेअरे उपलब्ध असल्याने चंगळच होते. हा ज्यांच्या वर विंडोजचे भरपुर संस्कार आहेत त्यांना समजायला जड जाते. पण लिनक्सला आपले म्हटल्यास अनुभव चांगला असतो. ज्यांना विंडोजवर काम करायला आवडते त्यांना विचारा की विषाणु संसर्ग झाला की काय होते? संगणक प्रशासनाचे काम माहित असेल्यांना ठिक आहे पण ज्यांना कामापुरताच संगणक वापरायचा असतो त्यांना भयंकर त्रास होतो विषाणु संसर्गाचा.
सध्या एकाच संगणकावर विस्टा आणि उबुंटु वापरत आहे आणि मला स्वतःला उबुंटुचा अनुभव जास्त चांगला वाटतो.


मी पण

>>>सध्या एकाच संगणकावर विस्टा आणि उबुंटु वापरत आहे आणि मला स्वतःला उबुंटुचा अनुभव जास्त चांगला वाटतो.

तुमच्याकडून प्रेरणा घेऊन एका लॅपटॉपवर आत्ताच उबंटु चढवले आणि त्यातूनच हा प्रतिसाद लिहीत आहे! थोडी अक्षर ब्लरड् दिसत आहेत पण कळू शकतात.

धन्यवाद!

अरे वा

अरे वा. अक्षरे सुद्धा सुंदर दिसतात. अजानुकर्णाला विचारा हवे तर. बाकी उबुंटुपेक्षा विस्टाला बुट होण्यास जास्त वेळ लागतो. ५ पैकी १ वेळा संगणक अडकुन राहतो.


सोपी पद्धत

उबंटू विंडोज् च्या बरोबरीने चढवायचे असेल् तर् कुठल्याही इतर विंडोज् सॉफ्टवेअर प्रमाणे "इन्स्टॉलर" आता उपलब्ध आहे. त्याचे नाव वुबी:
http://wubi-installer.org/

मी तोच वापरला. एक काळ्जी घेतली: सर्व फाईल्स एक्स्टर्नल हार्डडिस्कवर बॅकअप करून ठेवल्या.

मी वायरलेस नेटवर्कने डाऊनलोड करत होतो आणि गेले दोन दिवस मला इंटरनेट कनेक्टीव्हीटीमधे काही अडथळे येत असल्याने दोन-तीनदा डाउनलोड कॅन्सल करून पुन्हा चालू करावे लागले. मात्र तसे करत असताना आधीच्या पॉइंटपासून पुढचे डाउनलोड चालू होत होते त्यामुळे "डबल" वेळ गेला नाही.

८.०४

उबंटु ८.०४ पासुनच उबंटुच्य चकत्यामध्येच ही सुविधा आहे की उबंटु एखाद्या विंडोज ऍप्लिकेशन प्रमाणे टाकता येते. बाकी मग सिस्टीम-ऍडमिनिस्ट्रेशन मधुन अप्लिकेशन मॅनेजर वापरुन हव्या त्या कारणासाठी हवे असणारे सॉफ्टवेअर उतरवुन घ्या.


छान

नुकतेच कळलेले खालील टूल्स सुद्धा उपयुक्त आहेत.
१. विन्डीरस्टॅट आपल्या संगणकाची जागा नेमकी कुठे जाते हे कळण्यासाठी.
२. प्रोसेस एक्सप्लोरर सध्या काय काय चालू आहे हे पाहण्यासाठी.
३. ऑटोरन्स सुरुवातीलाच काय चालू होते हे पाहण्या ठरवण्यासाठी.
४. एव्हरेस्ट आपल्या संगणकात नक्की काय काय आहे हे कळण्या कळवण्यासाठी.

व्हिस्टा

सहजरावांप्रमाणेच मला देखील व्हिस्टाचा विशेष वेगळा अनुभव आलेला नाही. मात्र सुरवातीस मी डेस्कटॉप आणि लॅपटॉप एकदम व्हिस्टाचे घेयचे चू़क केली. तर वायरलेस राऊटर आणि फोन सगळेच चालेनासे झाले. बर्‍याच शोधाअंती समजले की मासॉ ला याची जाणीव होती. मग त्यांनी सांगितलेला उपाय केला तर थोडेफार जमले. पण मला वाटते नंतर सर्वांनी (केबल, राऊटर, फोन) त्यांच्या सिस्टीम अपडेट्स केल्यावर नंतर काही प्रश्न आला नाही.

नॉर्टनचा त्रास मला देखील झाला. आधी मला तो व्हिस्टाचा वाटला पण नंतर समजले की हे तर नॉर्टनचे कर्म... मग आता कॅस्परकी अँटायव्हाररस वापरला तर चांगला अनुभव येत आहे. बेस्टबाय वाल्याने मला तो सुचवला. (बेस्टबाय मधील कर्मचारी हा एक वास्तवीक माझा नावडीचा विषय आहे)

बाकी कायम वैताग वाटणारा प्रॉब्लेम म्हणजे स्टार्टअपचे प्रोग्रँम्स - एमएसकॉनफिग करूनही...

स्टार्टअप

विस्टाचा एसपी१ अपडेट आल्यानंतर बरीच सुधारणा झाली. माझ्या अनुभवाप्रमाणे विस्टा आहे तसे वापरले तर बरेच रिसोर्सेस फुकट जातात. विस्टा सुरू होताना बर्‍याच सर्विस आणि स्टार्टअप प्रोग्राम अनावश्यक असतात. ते बंद केले तर बूट करताना लागणारा वेळ बराच कमी होतो.
स्टार्टअप प्रोग्रामसाठी हा उपाय वापरून पाहिला का?

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

+१

विस्टाचा एसपी१ अपडेट आल्यानंतर बरीच सुधारणा झाली

+१
एस्पी १ नंतर बाळाने थोडे बाळसे धरले आहे. आता ब्लु स्क्रीन प्ल्रॉब्लेमहि येत नाहि. (ता. क. मी त्या दुर्दैवी वापरकर्त्यांपैकी आहे ज्यांनी ताजा ताजा व्हिस्टा घेतला होता.. सुरवातीला केवळ युसबी लावला तरी ब्लु स्क्रीन यायची.. :) ) आता बाळाची तब्येत बरीच सुधारली आहे .. एसपी टु येणार असेलच.. :) वाट पाहतो आहे.

बाकी वरील लेख अत्यंत उपयुक्त आहे. आपले काहि उपाय व तो च्या सुचना पाळून बघतो आणि कळावतो
धन्यु!

(अजूनहि युएसी बंद न केलेला परमसंत)ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

यूएसी

मी पण यूएसी हा लेख वाचून बंद केला. कटकट होती ती एक मोठी.

वायरलेस राऊटर म्हणजे काय?

हे काय असते? कुणीतरी माहिती द्यावी.

सौरभ.

==================

वायरलेस राउटर

या चित्रात दाखवल्याप्रमाणे वायरलेस राऊटर हा नेटवर्कशी (बहुतेक वेळेस) केबलने जोडलेला असतो. त्यातून मग लहरींचे प्रक्षेपण होते, जे तुमच्या संगणकात वायरलेस नेटवर्क कार्ड असेल (जे बहुतेक लॅपटॉप मधे आता असते) तर केबल न वापरता इंटरनेटशी कनेक्ट होऊन शकता. जर कनेक्शन ओपन ठेवले तर कोणीही वापरू शकतो नाहीतर सांकेतीक शब्द लागू शकतो. अधिक माहीती साठी येथे अथवा इतरत्र पाहू शकता.

धन्यवाद.

आता नीट समजले.

-सौरभ.
==================

पाच वर्षे मागे

मी डॉस६.२२-विंडोज ३ - विंडोज ४ - विंडोज ९५ - विंडोज ९८ - विंडोज ९८ दुआ - विंडोज एक्सपी असा प्रवास केलेला आहे.
पूर्णपणे मासॉग्रस्त आहे. पण नेहमीच ५ वर्षे मागे राहिल्याने नवजात अर्भकांच्या बाळलीला अनुभवल्या नाहीत.
विडोज अजूनतरी सर्वात जास्त वापरली जाणारी संगणकप्रणाली आहे. युनिक्स-लिनक्स-उबुंटू चे कौतुक ऐकतो आहे. एका पीसीवर रेड हॅट लावली आहे. पण फारसा वापर नाही.
विंडोजची हार्डवेअर बेस्ड (नेटिव्ह) ऍप्लिकेशन्स उबुंटूवर चालतात काय? याचा खुलासा तज्ञांनी करावा. जसे विडोज डीएलेल् वापरून तयार केलेली सिरियल/ युएसबी पोर्ट ऍक्सेस् ऍप्लिकेशन्स?
चालत नसतील तर ती तशी बनवण्याची काय प्रक्रिया आहे?
पुढेमागे वेळ आलीच तर उबुंटूवर ऍप्लीकेशन्स लिहिता येतील.

युएसबी

विंडोजची हार्डवेअर बेस्ड (नेटिव्ह) ऍप्लिकेशन्स उबुंटूवर चालतात काय? याचा खुलासा तज्ञांनी करावा. जसे विडोज डीएलेल् वापरून तयार केलेली सिरियल/ युएसबी पोर्ट ऍक्सेस् ऍप्लिकेशन्स?

सर्वप्रथम मी तज्ञ नाही पण अनुभवातून लिहीत आहे :-)

मी उबंटुवर फ्लॅश ड्राइव्ह/मेमरी स्टीक घालून पाहीली - ताबडतोब डिटेक्ट झाली. तेच कॅमेर्‍याच्या एस् डी कार्डचे. थोडक्यात आपल्याला युएसबी ऍप्लिकेशन्स वापरायची असल्यास ऑटोडिटेक्ट होते हे नक्की.

एक्सपी

तांत्रिकदृष्ट्या एक्सपी जरी आधीची प्रणाली असली तरी विस्टापेक्षा एक्सपी आधुनिक आहे असे वाटते. एक्सपीचे सर्विस प्याक आल्यानंतर ती खूपच सुसह्य आणि स्टेबल झाली होती.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

वाईन वापरुन

विंडोजची ऍप्लिकेशने उबुंटूवर चालवण्यासाठी वाईन वापरता येईल. काही लोकांच्या मते वाईन वापरल्याने व्हायरसचा प्रादुर्भाव होणे शक्य आहे. मात्र अनेकांनी उबुंटूवरील वाईनवरुन व्हायरस असणारे ऍप्लिकेशन वापरुन पाहिले तरी फारसा फरक पडलेला नाही. वाईन वापरुन सफारी, क्रोम, इंटरनेट एक्स्प्लोरर वगैरे ब्राऊजर व्यवस्थित वापरता येतात.

मात्र उबुंटू-लिनक्स मध्ये विंडोजवरील बहुतेक सर्व ऍप्लिकेशनांना उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विंडोज बेस्ड ऍप्लिकेशन वापरण्याची गरज पडत नसावी. (अर्थात एखादा गेम खेळण्यासाठी वाईन वापरावे लागेल)

मात्र हार्डवेअर बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे काय हे नक्की समजले नाही. (एखादे उदाहरण?)


जसे विडोज डीएलेल् वापरून तयार केलेली सिरियल/ युएसबी पोर्ट ऍक्सेस् ऍप्लिकेशन्स?

हे वापरुन पाहावे लागेल. आयई सारखे ऍप्लिकेशन व्यवस्थित चालते त्यामुळे यांना तशी अडचण येऊ नये,


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभारी आहे

प्रतिसादांबद्दल आभारी आहे. लिनुक्सबाबत नवखा असल्याने पुढे काहीही बोलण्यासाठी अभ्यास करावा लागेल. :)

 
^ वर