पाकिस्तानकडून येणे ३०० कोटी रुपये

मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारीच्या टाइम्स् ऑफ् इंडिया च्या पहिल्याच पानावर "पाकिस्तान गेली साठ वर्षे भारताचे ३०० कोटी रुपये देणं लागतो" अशा अर्थाची बातमी छापून आली आहे. त्यांत म्हंटल्याप्रमाणे १९४८-४९ पासून आत्तापर्यंतच्या आपल्या प्रत्येक वार्षिक अंदाजपत्रकांत लहान अक्षरांत "फाळणीपूर्व कर्जाच्या हिश्श्यापोटी पाकिस्तानकडून येणे सुमारे ३०० कोटी रुपये" अशी एक टीप असते. १९४८-४९मध्ये सरकारी अंदाजपत्रकांत दाखवलेला खर्च २५७.३७ कोटी रुपये होता. याचाच अर्थ पाकिस्तानकडून येणे त्यावेळच्या भारताच्या वार्षिक खर्चापेक्षा अधिक होते.

बातमीत पुढे म्हंटल्याप्रमाणे याची पार्श्वभूमी अशी आहे: फाळणीनंतर परस्पर संमतीने असे ठरले होते की अखंड भारतावर असलेले कर्ज सुरवातीला भारताने देऊन टाकावे आणि नंतर १९५२ पासून पाकिस्तानने आपला हिस्सा (३०० कोटी रुपये), ३ (तीन) टक्के व्याजदराने, ५० समान वार्षिक हप्त्यांत भारताला चुकता करावा. आजपर्यंत त्यापैकी एकही हप्ता पाकिस्तानने भारताला दिलेला नाही.

पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे म्हणून भारतांत उपोषण करण्यांत आले. त्यानंतर काय महाभारत झाले ते सर्वांनाच माहीत आहे. गेल्या ६० वर्षांत पाकिस्तानांतल्या कुठल्याच नेत्याला महात्मा व्हावेसे वाटले नाही.

Comments

महात्मा

पाकिस्तानकडून आपले येणे हवे ते करून वसूल करावे हे मला १०० टक्के मान्य आहे. त्यासाठी भांडण करायलासुद्धा माझी हरकत नाही.

ते निमित्य करून महात्म्यावर नथीतून तीर मारणे हा केवळ मनाचा क्षुद्रपणा आहे.
भारतात जे उपोषणाला बसले होते ते त्या घटनेच्या फार पूर्वी महात्मापदाला पोचलेले होते. "मला महात्मा व्हायचे आहे " असे त्यांनी कधीही कोणाला सांगितले नव्हते आणि ते पद मिळवण्यासाठी ते उपोषणाला बसले नव्हते. ती पदवी त्यांच्या एकंदर जीवनकार्यावरून लोकांनी त्यांना दिली होती. ते लोक कदाचित आपल्याइतके शहाणे नसतीलही. त्यानंतर भारतात, पाकिस्तानात, अमेरिकेत, रशीयात वगैरे कुठेच कोणालाही महात्मा हे पद मिळाले नाही. वाटल्यास आपण कोणाची शिफारस करून ती किती लोकांना ते मान्य होते ते पहावे.

महात्मा

ती पदवी त्यांच्या एकंदर जीवनकार्यावरून लोकांनी त्यांना दिली होती
महात्मा ही पदवी त्यांना अन्य् कोणी नाही, तर् खुद्द नेताजी सुभाषचंद्रांनी दिली होती.

बाकी ३०० कोटी वसुली अद्याप् बाकी आहे हे सहा दशकांनंतर उघडकीला यावे हे आश्चर्यच! कारण कोंग्रेस सरकारांनी हे दडवून् ठेवले हे जरी मान्य केले तरी, जनता सरकार (१९७७) आणि त्यानंतरचे अटलजींच्या काळात हे बाहेर का आले नाही?

असो, ते वसूल् करावे हे १००% मान्यच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टागोर

गांधींना महात्मा ही उपाधी रविंद्रनाथांनी दिली असे वाचल्याचे स्मरते.

पाकिस्तानला ५५ कोटी देणे

पाकिस्तानला ५५ कोटी देणे हा भारताने घेतलेला एक चांगला निर्णय वाटतो. नपेक्षा, पाकिस्ताने काश्मिरसोबत त्या ५५ कोटींचे रडगाणेही सर्वत्र गाण्यास कमी केले नसते.

५५ कोटी हक्काचे ...

आत्तापर्यंतच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे तेव्हा जे साधनसंपत्ती व उपलब्ध संपदांचे वाटप ठरले होते त्यानुसार भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये हे उपलब्ध गंगाजळीचा हिस्सा म्हणुन देणे आवश्यक होते.
त्यात आपण आपल्या पदरचे पैसे देऊन लै भारी उच्च आणि उदात्त काम् केले असे काही नाही ...
असो.

पण हा "३०० कोटींचा मुद्दा" नव्यानेच कळला ..
तसे असेल तर योग्य तो पाठपुरावा करुन व प्रसंगी भांडुन हे पैसे परत घेणेच योग्य आहे ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

पाकिस्तानला दिलेले कर्ज ..

म्हणजे बुडीत खाती जमा केलेली रक्कम असेच समजायला हवे ....

भारत पाक मधे ३ - ४ युद्धे झाली ... आणि प्रत्येक वेळी भारत विजयी झाला ... मग त्या वेळी ही रक्कम वसुल करता आली असती ...
आताही २६/११ नंतर पाक वर आंतराष्ट्रीय दबाव इतका आहे ... तर ही रक्कम वसुल करण्याच्या दृष्टीने काही करता येईल ...अर्थात तशी इच्छा हवी ..
आणि पाक हे असे राष्ट्र् आहे ... कि आपणहून प्रामाणिकपणे ही रक्कम परत देईल ... हे अशक्य आहे.
(हे ३०० कोटी फक्त मुद्दल आहे का ? कि ६० वर्षातील व्याज धरुन एकूण रक्कम आहे ?)

मुद्दल

३०० कोटी रु. हे फक्त मुद्दल आहे. त्याशिवाय त्यावर दरसाल दरशेकडा ३ टक्के व्याजही गेली ६० वर्षे येणे आहे.

 
^ वर