भाषा आणि जीवनः दिवाळी २००८
'भाषा आणि जीवन' मासिकाचा दिवाळी २००८चा अंक मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळावर आता उपलब्ध आहे.
दिवाळी २००८ ह्या टॅगवर टिचकी मारली असता दिवाळी अंकातील लेख एकत्र पाहता येतील
यावेळचा अंक हा भाषाप्रेमींना मोठी मेजवानी आहे हे लेखांची व लेखकांची नावे पाहून लक्षात येईल.
संपादकीय/मराठी भाषेच्या विकासाच्या वाटा-६: राजाश्रय व लोकाश्रय - प्र०ना० परांजपे
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने प्रसृत केलेली शुद्धलेखन-प्रश्नावली
तीन कविता /राजेश जोशी/भाषांतर : बलवंत जेऊरकर
(१) दोन ओळींच्या दरम्यान
(२) अपूर्ण कविता
(३) आपली भाषा
मराठीचे लेखननियम :
मराठी प्रमाणभाषेचे लेखननियम - यास्मिन शेख
मराठीचे लेखनसंकेत - कल्याण काळे
आगर बोली - शंकर सखाराम
धनगरी ओव्यांचा लोकतत्त्वीय अभ्यास - माधुरी वि० दाणी
धुळे जिल्ह्यातील दलितांच्या लोकोक्ती आणि त्यांचे सामाजिक संदर्भ - प्रकाश भामरे
भाषेतील म्हणींचे संचित - विद्या वासुदेव प्रभुदेसाई
ज्याची त्याची प्रचीती :
(१) हद्दपार शब्द -लीला दीक्षित
(२) स्वयंपाकघरातील हरवलेले शब्द -शुभांगी रायकर
‘गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन - शरदिनी मोहिते
‘छंदोरचने'च्या भाषांतराची निकड -शुभांगी पातुरकर
पुस्तक परीक्षणे :
(१) आधुनिक समीक्षा सिद्धान्त -अविनाश सप्रे
(२) एक पुस्तक-प्रवासाची कथा -विजया देव
(३) भाषाभान -सुमन बेलवलकर
(४) अक्षरस्पंदन -सुमन बेलवलकर
(५) स्त्रीकवितेच्या अभ्यासकांस उपयुक्त ठरणारे पुस्तक -विद्यागौरी टिळक
परीक्षणासाठी आलेली पुस्तके
प्रतिसाद :
(१) शब्दसंक्षेप, वाक्यसंक्षेप -द०भि० कुलकर्णी
(२) मराठी भाषेतील सौजन्य -डॉ० प्र०चिं० शेजवलकर
(३) वर्हा डी बोलीची उच्चारप्रवृत्ती -रावसाहेब काळे
मुखपृष्ठावरील रेखाचित्र : अनिल अवचट. मांडणी : विनय सायनेकर, सुप्रिया खारकर
अंकात काही त्रुटी, शुद्धलेखनाच्या वा टंकनाच्या चुका आढळल्यास आवर्जून सांगाव्यात
Comments
प्रतिसाद
अंक चाळून बघितला. कंटेन्ट तर दमदार आहे. पण ऑनलाईन अंकाची मांडणी अजुन सुधारायला हवी होती. उदा. मुखपृष्ठावर लेखाच्या खाली दिलेल्या दुव्यांमधे काही ठिकाणी लेखाचे वर्गीकरण आहे, काही ठिकाणी नाही. या दुव्यांचा अनुक्रमही प्रत्येक ठिकाणी सारखा नाही. दिवाळी अंकातले लेख आणि इतर लेख वेगळे न ठेवता त्यांची सरमिसळ झालेली दिसते. अशा लहानसहान गोष्टी (कदाचित इतर संकेतस्थळांवर सुटसुटीतपणाची सवय झाल्यामुळे) आमच्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना खटकतात.
अंकाची माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. सवडीप्रमाणे वाचून काढीन.
दिवाळी २००८ अंक वाचा ह्या दुव्यावर टिचकी द्या
दिवाळी २००८ अंक वाचा ह्या दुव्यावर टिचकी द्या. दिवाळी २००८ ह्या टॅगवर टिचकी दिल्यास दिवाळी २००८ ह्या अंकातले सर्व लेक एकाखाली एक असे दिसतील.
शक्य असल्यास
जर एखाद्या दुव्याखाली लेखांचे वर्गीकरण नाही हे लक्षात आले तर शक्य झाल्यास सांगावे. दुव्यांचा अनुक्रम हा अकारविल्हे (अल्फाबेटिकल) ठरवला जातो त्यामुळे या अनुक्रमात बदल दिसत असावा. वर चित्त यांनी दिलेल्या दुव्यावर फक्त दिवाळी अंकातले लेख वाचता यावेत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मराठी भाषा आणि जीवन्
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आ'कर्ण यांनी दिवाळी अंकाचा परिचय थोडक्यात पण प्रभावीपणे करून दिला आहे.परिणामी अंक वाचण्याची उत्सुकता वाढली आहे. श्री.आ'कर्ण यांस धन्यवाद!
धन्यवाद....
आकर्ण, बातमीबद्दल धन्यवाद.
अंक भाषा आणि शुद्धलेखन विषयक दिसतो. भाषा आणि जीवन मधली पानपुरके वाचनीय!
मुखपृष्ट खास अवचट स्टाईल! लगेच ओळखू आले.
पुन्हा एकदा धन्यवाद!
सौरभ.
==================
वाचनीय
'भाषा आणि जीवन'मधील लेख वाचनीय असतात. हल्ली काही धड वाचायला वेळ नसतो त्यामुळे भाषा आणि जीवनच्या अंकांकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. बरी आठवण करून दिलीत. :-)
धन्यवाद.
लेख्
भाषा आणि जीवनचा दिवाळी अंक चाळला, ३-४ लेख वाचले. अंकातील यास्मिन शेखांचा "मराठी प्रमाणभाषेचे नियम" हा लेख आणि मनोगताच्या दिवाळी अंकातील अरूण फडकेंचा लेख "मराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत" हे दोन्ही एकाच विषयावरचे लेख आहेत आणि त्यात काही समान मुद्दे आले आहेत. मात्र फडकेंचा लेख अधिक विस्तृत आणि अधिक चांगला वाटला.
स्वयंपाकघरातील शब्द आणि हद्दपार शब्दांविषयीचे दोन छोटेखानी लेखही चांगले आहेत.
बाकी अंकामध्ये टंकलेखनाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे प्रत्येक लेखातील प्रत्येक परिच्छेदामध्ये जाणवते. हे केवळ ऑनलाईन अंकात असावे आणि छापिल अंकामध्ये बहुतेक फार चुका नसाव्यात अशी आशा आहे, नेमकी कल्पना नाही. परिषदेने संकेतस्थळावरील टंकलेखनाकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
(उपक्रमावरही गमभनची अद्ययावत आवृत्ती चढवली जाऊन येथे लेखन करताना होणारा त्रास कृपया लवकरात लवकर दूर करावा अशी उपक्रम प्रशासनाला विनंती.)
टंकलेखन
तेथे लेखन चढवताना दिलेले लेख हे परिषदेने पुरवलेले आहेत. त्यात वेळेनुसार व जमतील तसे बदल करण्यात येतात. शक्य झाल्यास जाणवलेल्या चुका सांगाव्यात म्हणजे ताबडतोब बदल करता येतील.
एक अडचण अशी जाणवते की परिषदेचे मूळ लेखन हे युनिकोडित नसून नंतर ते युनिकोडित करण्यात येते. त्या प्रक्रियेत काही दोष असावेत असा अंदाज आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
उदाहरण
उदाहरणार्थ यास्मिन शेखांच्या लेखातील खालील परिच्छेद पहावेत -
एकेरी अवतरणचिह्नांमधील शब्दापूर्वीचे चिह्न योग्य उमटलेले नाही, तेथे वेगळेच काही चिह्न दिसते (त्या चिह्नाचे नाव असल्यास माहीत नाही), मात्र कॉपी पेस्ट केल्यावर येथे ते व्यवस्थित उमटलेले दिसत आहे. बाकी दोष खालील परिच्छेदामध्ये लाल रंगात दाखविले आहेत. (उच्चार हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे चुकीचा टंकता येऊ शकतो ह्याचे खालील परिच्छेद हे उत्तम उदाहरण ठरावे :)) -
उदाहरण १ - मराठी मातृभाषा असलेले पुष्कळ सुशिक्षित लोक चादर ऐवजी चादर (चारमधील ‘चा'चा तालव्य उच्चा र), तसेच चाबूक ऐवजी चाबूक (तालव्य उच्चाचर), समाज ऐवजी समाज (दंतमूलीय उच्चाूर) करताना आढळतात. त्या उच्चा रांपैकी कोणता उच्चा्र स्वीकारायचा असा प्रश्न पडतो. दुसरी अडचण, माझा (दंतमूलीय) पण माझी (तालव्य), त्याचा (दंतमूलीय) पण त्याची (तालव्य), माज (दंतमूलीय) पण माजी (तालव्य). मराठीत ‘इ' हा स्वर तालव्य असल्यामुळे ‘माझा' यातील ‘झा' खाली नुक्ता दिल्यास ‘माझी'मधील ‘झी' खाली नुक्ता देऊ नये, हे चटकन लक्षात येणे कठीण. ज, झ यांच्या बाबतीतही हीच अडचण येईल. इंग्लिशमध्ये ‘S' या अक्षराचा उच्चाकर वेगवेगळा होतो तो सवयीने आपण बरोबरच करतो. उदा० Some, Sure, Season, thieves. ते उच्चाचर वेगळे आहेत तेव्हा त्यांचे स्पेलिंग वेगळे हवे, असा अट्टहास कोणी करीत नाही. त्याच पद्धतीने मराठीत एका वर्णाचे दोन उच्चा र (किंवा दोन उच्चाेरांसाठी एक वर्ण) मान्य करायला प्रत्यवाय नसावा.
उदाहरण २ -(७) र्हसस्व-दीर्घासंबंधीचे नियम (नियम ५ ते ८). यांत एकच बदल सुचवावासा वाटतो. तत्सम इ-कारान्त व उ-कारान्त शब्द दीर्घ लिहावेत, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यास ते दीर्घच राहतात; फक्त सामासिक शब्दांत हे शब्द पूर्वपदी आल्यास, ते संस्कृताप्रमाणे र्हलस्व लिहावेत, असा नियम आहे. (८) नियम ११मध्ये भर घालावी. हळूहळू, मुळूमुळू इ० शब्दांतील दुसरा व चवथा स्वर दीर्घ लिहावा, असा नियम आहे. याला अपवाद ध्वन्यनुसारी शब्दांचा द्यावा. जसे : रुणुझुणु, झुळुझुळु, कुहुकुहु. तसेच, चिवचिव, रिमझिम (उपान्त्य स्वर र्ह्स्व लिहावा.)
उदाहरण ३ - महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यावर ‘मराठी साहित्य महामंडळा'ने आपली लेखनविषयक १४ नियमांची यादी महाराष्ट्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवली, ती १९६२मध्ये. १९७२मध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि शिक्षणक्षेत्रात आणि इतरत्रही ते त्वरित अमलात आणावेत, असा आदेश काढला. काही अपवाद वगळता, आपण मराठी माणसे त्या नियमांनुसार मराठीचे लेखन करतो आहोत.
ह्या उदाहरणामध्ये शेवटच्या वाक्यातील 'करतो आहोत' हे खटकले. ते 'करत आहोत' असे असायला हवे. हा संकेतस्थळावरील अंकातील टंकलेखनाच्या दोष आहे वा मूळ लेखामध्येच 'करतो आहोत' आहे ह्याबद्दल कल्पना नाही.
ही केवळ काही उदाहरणे झाली, ह्याव्यतिरिक्तही अनेक चुका सापडतील. लेखन मूळ युनिकोडीत नसणे आणि नंतर ते करणे वा इतर काही कारणांमुळे हे दोष निर्माण झाले असतीलही. कारणे कोणतीही असोत, मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळावर असे दोष मोठ्या प्रमाणात असणे अजिबात योग्य नाही, परिषदेने ह्याकडे लक्ष पुरवणे महत्त्वाचे आहे असे वाटते.
धन्यवाद
मनोगताचा शुद्धिचिकित्सकाचा वापर करावा असे मनात आहे. व्याकरणविषयक चुकांबाबत अभ्यास परिषदेशी बोलावे लागेल. तेथील वाक्यरचना व मजकूर हा जसा दिला त्याप्रमाणेच प्रकाशित केला आहे.
धन्यवाद.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
करत, करीत इत्यादी
व्याकरणकारांच्या मते आचरगणातील धातूंना (आचर, आठव, उत्तर, जेव, धाव, जिंक, नेस, पांघर, शिंकर इ.इ.) प्रययापूर्वी विकल्पाने 'इ' लागतो. त्यामुळे मला वाटते, करत/करते/करत्ये आहे, करितो /करिते आहे, करीत आहे, ही सर्व रूपे बरोबर असावीत. आता कर हा आचरगणातील धातू आहे की नाही, ते माहीत नाही.
वरदाबाईंनी वापरलेला युनिकोडीत हा शब्दही खटकला. त्यातला यु मुळात दीर्घ असला तरी तसा उच्चारणे आणि लिहिणे मराठी संस्कृतीत बसत नाही (मराठी शुद्धलेखन नियमांनुसार उपान्त्यपूर्व इकार-उकार र्हस्व असतात). त्यामुळे तो तसा असणारच. परंतु 'डी' दीर्घ काढायचे कारण समजले नाही. 'करीत' सारखे 'युनिकोडीत' हे (उमजगण सोडून अन्य गणातील) क्रियापदाचे रूप असते तर डी दीर्घ, क.भू.धा.वि. असेल तर र्हस्व. इथे युनिकोडित हे विशेषण असल्याने, डि र्हस्व काढला असता तर बरा दिसला असता. --वाचक्नवी
करतो
करतो/करितो/करीत वगैरे रूपे बरोबर असू शकतात हे मान्य. करतो आहोत हे रूप योग्य वाटत नाही. बोलताना करत आहोत हे वेगात म्हणताना ते करतोहोत असे ऐकू येते, मात्र तसे प्रमाण लेखनात कधी पाहिले नाही.
युनिकोडित बाबतचे तुमचे मत मान्य. डी दीर्घ करण्याचे एकमेव कारण तो शब्द मराठी आहे हेच मनांत होते, लिहिताना त्यावर अधिक विचार केला नव्हता.
स्वयंसेवक हवे आहेत
श्रीलिपीतून युनिकोडमध्ये रूपांतर निर्दोष होत नाही. एका डेडलाइनपूर्वी हा अंक टाकायचा होता आणि रूपांतरातले दोष निस्तरायला तेवढा वेळ नव्हता. मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी स्वयंसेवक मिळाले तर हे आणि असे दोष कमी करण्यात मदत होईल. मराठी अभ्यास परिषेदेचे हे संकेतस्थळ हे स्वयंसेवेतूनच घडले आहे.
जात, जातो..
मी जात आहे--औपचारिक विधान.
मी जातो आहे--मी अगदी थोड्याच वेळात जातो आहे.
मी जातोय्. --मी अगदी आत्ता जायला निघालो आहे.
आम्ही जातो आहोत-ह्याचा अर्थ आम्ही या क्षणी किंवा अगदी थोड्या वेळात जातो आहोत असा तर नसेल? तरी, लेखी भाषेत हा प्रयोग नसावा असे दिसते आहे. यास्मिन शेखबाईंनी गंभीर स्वरूपाच्या लिखाणात हा प्रयोग टाळायला हवा होता.--वाचक्नवी
सर्वानी जालावर वाचण्या ऐवजी वर्गणीदारही व्हावे.
फक्त जालावर हा अंक वाचण्याऐवजी या मासिकाचे सभासदत्त्वही घ्यावे अशी शिफारस आहे.
दर्जेदार अंक
वार्षिक सभासदत्त्वापेक्षा आजीवन सभासदत्त्व घ्यावे. ह्या मासिकाची आजीव सभासदत्त्वाची वर्गणी अत्यल्प आहे. अंकातील लेखही फार छान असतात.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥