आडनावे
भारतीय समाजातच काय पण सार्या जगभरातील लोकांना आडनावे असतात. आडनाव हा प्रकार मलातरी विलक्षण वाटतो. नावात बरचं काहि असलं तरी आडनावातही भरपूर काहि लपलेलं असतं. साधारणतः केवळ आडनावावरून बर्याचदा माणसाचा धर्म, संभाव्य संपर्काची भाषा, त्याच्यावरील संस्कार, त्याचा व्यवसाय, भारतासारख्या ठिकाणी त्याची जात, त्याचे मुळ वास्तव्याचे ठिकाण आणि त्या अनुशंगाने त्याचा आहार, कपडे इ., क्वचित प्रसंगी त्याचा आर्थिक दर्जा वगैरे वगैरे. ओळखता येते
केवळ मराठी आडनावांचाच विचार करायचं म्हटलं तरी "व्यवसायाभिमुख आडनावे" (माळी, शिंपी, कोष्टी, इ. इ.), "स्थळाभिमुख आडनावे" (दाभोळकर, दादरकर, लातूरकर, इ.इ.), "जोड आडनावे" (गुर्जरपाध्ये, ठाले-पाटील इ.इ.), असे अनेक भाग करता येतील.
असो. तर या आडनावांचा विचार करताना मनात अनेक प्रश्न उभे राहतात त्याच्यावर ह्या चर्चेच्या निमित्ताने उहापोह व्हावा ही इच्छा
१. ही आडनावे कोठून आली आणि नक्की कधी आणि कशी आली?आडनाव ही संकल्पना मुळ भारतीय आहे की बाहेरून आलेली?
२. तुमचे वास्तव्य असलेलल्या देशांतील व्यक्तींची आडनावे त्यांच्याबद्दल काय माहिती देतात?
३. दक्षिण भारतातील मंडळीचे नाव मोठे असेल पण त्यात आडनाव नसते (ते त्यांच्या जातीचे नाव हाल्ली आडनाव म्हणून लावतात ते सोडून) असे कसे?
४. काहि समाजात एकापेक्षा अधिक आडनावे असतात त्याबद्दल काहि माहिती देऊ शकाल का?
५. मुसलमान समाजातील नावांमधे "आडनाव" नक्की कोणते असते?
६. भारतीय काहि चमत्कारीक/अनवट आडनावांची व्युत्पत्ती कशी शोधावी?
चर्चा सुरू झाल्यावर सुचतील तसे अजून प्रश्नांची भर घालीनच
Comments
जोड-आडनावे
मलाही हा प्रश्न पडतो.
माझ्या एका मित्राने मला 'ढुंगण-खाजवे' असे आडनाव देखिल असते असे सांगीतले होते.
चांगली चर्चा
हे मोठे कठिण वाक्य आहे. आपल्या ओळखीच्या सर्व लोकांना आडनावे असतात खरी. शाळेत दाखला घेताना तो रकाना भरावाच लागतो. समजा कोणाला आडनाव नसेल, त्या व्यक्तीशी आपली भेट होणे शक्य आहे काय?
पण ही पद्धत सार्वत्रिक-सार्वकालिक नसावी. जुन्या संस्कृत लेखकांची आडनावे सापडत नाहीत. (गोत्र सापडते, पण आडनावाशी खूप साधर्म्य असले, तरी गोत्र म्हणजे आडनाव नव्हे, असे मला वाटते.) येशू आणि त्याच्या शिष्यांची, बायबलमध्ये उल्लेख केलेल्या त्याच्या भक्तांची आडनावे उल्लेखलेली नाहीत. युरोपातील प्लेटो, सॉक्रेटिस यांची आडनावे काय?
चर्चाप्रस्तावातील प्रश्नांबद्दल मलाही कुतूहल आहेच...
दक्ष्हिणभारतीय
दक्षिणभारतीयांचे असे म्हणणे आहे (विषेशतः तामिळ) की त्यांना आडनाव नसते. ते हल्ली (म्हणजे कधीपासून हे त्यांनाहि[म्हणजे मी ज्यांच्याशी बोललो त्यांना] माहित नाहि) आपल्या जातीचे नाव आडनाव म्हणून लाऊ लागले आहे. जसे सुब्रमह्ण्यम इ.
मलाहि असेच वाटते. पण असे असल्यास ही पद्धत साधारणतः कधी, कशी व कुठे सुरु झाली हे शोधणे रोचक ठरावे
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
होय.
होय. दक्षिणभारतीयांमध्ये आडनावे नसतांत. आम्हीही उत्तरेंत आल्यावर 'आडनावे' ह्या संकल्पनेशी परिचीत झालो. परंतु शर्मा, वर्मा, कर्मा इ.इ. कुलनामे दक्षिणेत आहेत. उदा. राजा रविवर्मा, दिवाकर शर्मा, रामगोपाल वर्मा, विश्वंभर कर्मा इ.इ.इ. ह्यांतील कर्मा वगळतां इतर कुलनामे उत्तरेंत 'आडनावे' म्हणवतांत.
हैयो हैयैयो!
सुब्रम्हण्यम्
सुब्रम्हण्यम हे जातीचे नाव नाही, ते आहे गणपतीचा भाऊ कार्तिकेयाचे दुसरे नाव. ते नाव असणार्याचे ते ख्रिश्चन नाव असते. तामिळी लोकांना आडनावे नसतात. अय्यर, अय्यंगार ही ब्राह्मणामधल्या पोटजातींची नावे. पण बहुतेक तमिळी ब्राह्मण हल्ली ही आडनावे म्हणून वापरत नाहीत. क्रम साधारणपणे असा: गावाचे नाव-वडिलांचे नाव -स्वत:चे नाव किंवा नावे. उदाहरणार्थ 'दासिग वेंकट सच्च सांब शिवर राव' हे एका मुलाचे पाळण्यातले नाव होते. त्या मुलाने पुढील आयुष्यात ही सर्व नामे गाळून विनोद हे एक वेगळेच तीन अक्षरी नाव घेतले. तामिळी मुली हल्ली लग्नानंतर देखील वापल्या नावाअगोदर वडिलांचे नाव लावतात.
केरळ्मध्ये नायर, नंबुद्रिपाद ही जातिनामे लोक आडनावासारखी वापरतात. आन्ध्रात आणि आन्ध्राच्या सरहद्दीवर राव हे आडनाव वापरणारे अनेक आहेत. पिळ्ळै हे मूळ केरळी आडनाव. ते तमिळनाडू आणि श्रीलंकेत वेगवेगळ्या स्वरूपात वापरतात. केरळातले बहुतेक समाज मातृसत्ताक पद्धतीतले असल्याने त्यांच्या नावात आईच्या स्त्रीपूर्वजाचा उल्लेख असतो. त्याला कुलनाम किंवा आडनाव म्हणता येईल. दक्षिणी भारताचा जो प्रदेश ब्रिटिशकाळात मुंबई इलाख्याचा भाग होता तिथेच नाव-वडिलांचे नाव-आडनाव ही पद्धत आहे. उत्तरेला आपल्याच पाळण्यातल्या नावाचे हवे तेवढे तुकडे पाडून आद्याक्षरे बनवतात. हरगोविंदराम तिथे एच जी राम होऊ शकतो.
उत्तर भारतात विशेषत: पंजाबात गावाचे नाव आडनाव म्हणून वापरतात. लढ्ढा, चढ्ढा ही बहुतेक गावाची नावे असावीत. शिवाय वाला जोडून आगरवाल वगैरे नावे होतातच. सोडावॉटरबॉटलओपनरवाला हे पारशातले आडनाव प्रसिद्ध आहे.
मराठीत, लीला मस्तकार-रेळे यांनी पहिल्यांदा लग्नानंतर जोडनाव वापरायला सुरुवात केली. हल्ली भक्ती बर्वे -इनामदार, अलका कुबल-आठल्ये वगैरे अनेक जोडआडनावी बायका महाराष्ट्रात प्रसिद्धीला आल्या आहेत. बंगालेत स्त्री-पुरुषांची रॉयचौधरी, रॉयभौमिक, दासगुप्ता, दासमुन्शी, सेनगुप्ता, सेनरॉय अशी काही जोडनावे आहेत. एरवी ते ठाकुर, वंद्योपाध्याय, चक्रवर्ती, मुखोपाध्याय वगैरे असतात.
पाश्चात्यांत जो मिडल नेम म्हणून प्रकार आहे, ते वडिलांचे नाव नसते. --वाचक्नवी
उपयुक्त
हे मी यासाठी विचारले की माझ्या ऑफीसातील काहि मुलीदेखील सुब्रम्हण्यम हे "लास्ट नेम" या रकान्यात भरतात. पण जर हे कार्तिकेयाचे नाव आहे तर त्या त्यांच्या वडिलांचे नाव आडनाव म्हणून लावत असाव्यात असे वाटते.
या बद्दल माहिती वाचायला आवडेल. विस्ताराने लिहाल का?
बाकी नेहेमीप्रमाणे उपयुक्त माहिती दिलीत. आभार! :)
-ऋषिकेश
टोळी
माणसाने आपली टोळी (कंपू असं लिहिणार होते ;-)) बनवायला सुरूवात केली तेव्हापासूनच त्याने आडनावाचा वापर सुरू केला असावा. कारण हेच की आपण या टोळीचे सदस्य आहोत हे दाखवण्यासाठी. अर्थात, आपल्या नावासोबत टोळीचे नाव लावून फुल नेम किंवा संपूर्ण नाव सांगण्याची पद्धत नसावी.
म्हणजे श्रीकृष्ण आपले नाव श्रीकृष्ण वसुदेव यादव असे लावत नसावा. परंतु यादवकुलीन वासुदेव किंवा यादवांचा वासुदेव असे संबोधणे अशक्य नसावे.
सर्रास आडनाव लावायची पद्धत कधी रुजू झाली माहित नाही. ब्रिटिश काळात असावी का? परंतु त्यापूर्वी वडिलांचे नाव आपल्या नावासोबत लावत. बाळाजी विश्वनाथ वगैरे. दाक्षिणात्य आजही तसे करतात.
दक्षिण भारतातील सर्वच मंडळींना आडनाव नसते असे नाही. आमच्याकडे द. कर्नाटकातील असूनही (म्हणजे बॉर्डरवाले नाही) भट, आचार्य, जोशी अशी आडनावे आहेत.
अवांतर: येशूचे नाव जोसेफसन तर होणार नाही. जीजस कारपेन्टर किंवा येशु रब्बाय असायला हरकत नसावी. ;-)
आयरिश
ओ' देखील लावतात.
पीटर ओ'टूल
स्कार्लेट ओ'हारा
डेनीस ओ'नील
आणि आमचा आवडता -
जॅक ओ'लॅन्टर्न
नातू
मॅक म्हणजे मुलगा
आणि ओ म्हणजे नातू किंवा वारस.
मॅक
मॅक (चा मुलगा) स्कॉटिश तर ओ (चा मुलगा) (ओ'कॉन्नर मधील) आयरिश असावे.
आयरिश
या पानावरील यादी बघावी.
ओ' हे आयरिश आहे याबद्दल पूर्ण खात्री आहे. :)
जनरल ओ'ड्वायर आयरिश होते काय?
दुवे
हम्म. यासारखी माहिती मराठी विकीवर या चर्चेअखेरीस मिळेल अशी आशा आहे.
निषेध
"वेलिंग" हे नाव गोव्याच्या रकान्यात न घालता महाराष्ट्राच्या रकान्यात घातले, याबद्दल मी विकिपेडिया लेखकाचा निषेध करतो.
(चांगला दुवा, तो. यांना धन्यवाद.)
रशियन
>>> ही पद्धतदेखील सार्वत्रिक नसावी. युरोपीय संस्कृतीत तर बहुधा नसावीच असे वाटते,
- रशियन नावे याला अपवाद ठरावीत. ऍलेक्सी निकोलायोविच म्हणजे ऍलेक्सी, निकोलायचा मुलगा. रशियन स्त्रियांचे सामाजिक स्थान आणि नाव यातला संबंध, व्यवसायानुरूप येणारी आडनावे (बोहरी/पारशी जमातीसारखी) याबद्दल अधिक माहिती या दुव्यावर आहे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हं
हं रोचक माहिती.. पण मग म्हणजे मुलाचे आडनाव आणि वडीलांचे आडनाव कधीच सारखे नसेल.. अश्या नावाला आडनाव म्हणता येईल का?
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
चित्पावन आडनावे
चित्पावन आडनावांच्या व्युत्पत्ती विषयी ह्या पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली आहे. चित्पावन आडनावे ही सदर व्यक्तिंनी यज्ञात पार पाडायच्या जवाबदारी वरुन आलेली आहेत. उदा 'बापट' म्हणजे यज्ञात बोकडचा बळी देणारे
बिरुदे वरुन 'बिरुटे'
बिरुदे वरुन बिरुटे झाले असेल का ? :)
(बिरुदे मिरवणे)
नदीवरुन, गावावरुन,शरिरावरुन, आडनावे आली असावीत....डोळे, काने, नाके, भोके,दाभाडे, बरीच आडनावे दिसतात. गावावरुन मार्होळ्याचे मार्होळकर, पेंडापुरचे पेंडापूरकर,भंडार्याचे भांडारकर,
पण-
पीटर ओ'टूल
स्कार्लेट ओ'हारा
डेनीस ओ'नील
यांचा शोध कसा घ्यायचा बॉ ?
यांचा शोध कसा घ्यायचा बॉ ?
इतकेच काय तर फडके, नागडे, उघडे, अशी आडनावे कशी पडली असतील?
आपल्याकडे (भारतात) आडनावे प्रांत, जात, भाषा आदी गोष्टींची कल्पना देतात याप्रमाणे परकीय आडनावे अशी काहि कल्पना देतात का?
अजून एक आडनाव वरणातमुतले: ( माझ्या आत्येभावाच्या वर्गात या आडनावाचा मुलगा होता) ,
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
सरनेम
"व्हॉट इज युवर सरनेम?"
आले का वांदे! आता हायस्कुल मदी समद्या ईषयांना एकच मास्तर नस्तोय देव गुरजी वानी. वायले वायले अस्त्यात. मंग यान्ला काय सांगायचे असे मनात विचार चालू होते. हायस्कुल मधील एका शिक्षकाने हा प्रश्न इंग्रजीच्या तोंडी चाचणीला विचारला होता. मग विचार आला कि क्लासटीचर चे नाव द्यावे सांगुन.
"माय सर्स नेम इज कर्णे"
परत तोच प्रश्न
परत तेच उत्तर
आरे बाबा तुझे आडनाव काय?
तव्हा कुड माहीती झाल कि सरनेम म्हनजे आडनाव.
आता आमच्या आडनावातच घाट असल्याने घाटावरचे पांडे असा स्वच्छ अर्थ निघतो.
प्रकाश घाटपांडे
आपल्यापुरते सांगता येईल
जगाचे माहित नाही. भारतात तरी आडनावे ही जातींप्रमाणेच उद्योगधंद्यांवरून पडली असावीत. पूर्वीच्या काळी असलेल्या बलुतेदारी पद्धतीमध्ये त्या त्या धंदेवाल्याचे नाव आणि बापाचे नाव घेतले की झाले, अशी पद्धत होती. देशपांडे, देशमुख, फडणीस, कुलकर्णी, पाटील, सुतार, लोहार इ. नावे याची उदाहरणे आहेत. सुताराचा नामू, देशमुखांचा बाळू अशा नावानेच त्यांची ओळख व्हायची. आमच्या लहानपणी मोठ्यांना यापद्धतीने बोललेले आम्ही ऐकले आहे. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या बॅचमध्ये असलेल्या सहा मराठी विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच आडनावे लावण्यात आली, अशी माहिती डॉ. अरूण टिकेकर यांनी लिहिलेल्या मुंबईच्या इतिहासात दिलेली आहे.
दक्षिण भारतात आडनावांची पद्धत सर्वत्र सारखी नाही. तमिळनाडू आणि कर्नाटकात आडनाव वडिलांचे नाव आणि मग मुलाचे नाव असा प्रकार असतो. उदा. हरदनहळ्ळी दुड्डगौडा देवेगौडा-यात हरदनहळ्ळी हे गाव, दुड्डगौडा म्हणजे मोठे पाटील आणि देवेगौडा म्हणजे देव पाटील. गावाचे नाव म्हणजे मूळ गाव. तिरुनेल्लै नारायण अय्यर शेषन हे टी. एन. शेषन यांचे नाव. तिरुनेल्लै या गावातील पुजाऱयाचा मुलगा ही ओळख या नावावरून पटते. केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती असल्याने तिथे वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लावतात. मात्र गावाचे नाव लावण्याची पद्धत तिथेही आहे.
धन्यु!
उपयुक्त माहिती.
दक्षिण भारतातील एक महत्त्वाचं आडनाव म्हणजे "नायर" हे नक्की काय आहे? गाव, वडील का जात?
सुब्रमह्ण्यम, कस्तुरीरंगन वगैरे व्यवसाय / जाती आहेत असे ऐकून आहे.
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
नायर जातीचे नाव..
नायर आडनाव, सुब्रम्हण्यम, कस्तुरीरंगन ही व्यक्तिविशेषनामे. --वाचक्नवी
सिंग / सिंह
मला अजून एक प्रश्न आहे तो 'सिंग / सिंह' या आडनावबद्दल.
हे आडनाव आहे का? का केवळ नावाला जोडला जाणारा शब्द आहे श्रीयुत या अर्थाने?
ऋषिकेश(सिंग)
सिंह/सिंग/सिन्हा
पंजाबमध्ये पुरुष आणि स्त्रियाची नावे सारखीच असल्याने नर की मादी हे ओळखण्यासाठी सिंह अथवा कौर लावतात. अन्य प्रांतात सिंग/सिन्हा/सिंह हे आडनाव.--वाचक्नवी
+१
शिखांत नुसतेच दलजीत म्हटले तर कळणार नाही बाई की बुवा!
दलजीत सिंग किंवा दलजीत कौर असे स्पष्ट करावे लागते.
जात नव्हे उपजात
नायर ही जात नाही, ती मल्याळी ब्राम्हणांमधील एक् उपजात आहे. नंबुद्रीपाद्, नंबुद्री ह्या अन्य काही उपजाती. पंजाबमधील नय्यरशी त्यांचा काय् संबंध हे माहित नाही.
सुब्रमह्ण्यम, कस्तुरीरंगन वगैरे व्यवसाय / जाती आहेत असे ऐकून आहे
ही दोन्ही शंभर टक्के नावे आहेत. ती मुलाची का वडिलांची, हे संदर्भावरूनच सांगू शकता येईल.
सिंग हे क्षत्रियतावाचक बिरुद आहे. गुरु गोविंदसिंह यांनी आपल्या अनुयायांना ते नावापुढे लावण्याचा आदेश दिला. उत्तरेतील राजपुत लोक हे बिरूद सर्रास वापरतात.
अहिक माहिती.
अहिक माहिती.
नायर = अनार्य तसेच ऐयर = आर्य : ही महाराष्ट्रभाषी सावरकरांची उपपत्ति.
म्हणतांना 'नंबुद्रिप्पाड' असे म्हणावे. (त्यातही 'ड' पूर्ण) 'नंबुद्रिप्पाद' असे म्हणणे चूक आहे. नंबुद्रिप्पाड आणि नंबुद्रि हे एकच मानावेत.
उत्तरेत शासकीय कागदपत्रांमध्ये आडनावे नोंदवणे अनिवार्य असल्यास दाक्षिणात्य मंडळी (अनिच्छेने) आपल्या नावानंतर आपल्या पिताश्रींचे/पतीचे इ.इ. नाव लावतात. आणि दक्षिणेतर मंडळी त्यासच त्यांचे 'आडनाव' समजतात.
खुद्द अस्मादिकांस 'आडनाव' असे काही नाही. त्यामुळे महाराष्ट्रप्रांती / महाराष्ट्रभाषी जनांना खूपच स्पष्टिकरणे / विश्लेषणे द्यावी लागतात.
हैयो हैयैयो!
नायर
नायरसंबंधी मी वेगवेगळ्या दक्षिणी भारतीयांना विचारले विविध उत्तरे मिळाली. यात नायर हे शूद्र असतात असेही एक उत्तर होते.
एक नक्की. की निदान पूर्वीच्या काळी ,नंबुद्रींमधल्या फक्त वडील पुत्राला लग्नाचा अधिकार होता. बाकीचे पुत्र नायर बाई ठेवत. त्यांची प्रजा आपल्या नावानंतर मामाचे(म्हणजे आईच्या माहेरचे) नाव लावत असे. अजूनही ही प्रथा अल्प प्रमाणात चालू असावी. -वाचक्नवी
ब्राह्मण नव्हे, क्षत्रिय
नायर ही जात नाही, ती मल्याळी ब्राम्हणांमधील एक् उपजात आहे
ब्राह्मणांतील नव्हे, क्षत्रियांतील.
काही आडनावे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
संख्यादर्शकः एकबोटे, दुभाषी, त्रिपाठी, चौबळ, पंचपात्रे, ..सप्तर्षी, सातपुते, अष्टपुत्रे, नवांगुळ,
...............दशपुत्रे, .. बाराहाते,...विसपुते, बावीस्कर, चाळीसगावकर, ..साठे,.....सहस्रबुद्धे
शाकदर्शकः भोपळे, भेंडे, पडवळ, दोडके, गवारे,मुळे,
रंगदर्शकः गोरे, पांढरे,ढवळे, काळे, जांभळे,निळे,
..असे अनेक गट करता येतील.
पशुपक्षी?
वाघ, लांडगे, गाढवे, ढेकणे, झुरळे, चित्ते, राजहंस, कावळे, मोरे, मुंगी, टोळ
(बंगालमध्ये नाग असेही आडनाव असते.)
दोन नावे
जॉर्ज वॉकर बुश, सारा मिशेल ग-लर, ऍना निकोल स्मिथ (उदा. साठी माफ करा) पण या नावांत मधले नाव हे काय आहे?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मधले नाव
पाश्चात्य लोकांच्यात वडिलांचे नाव मधले नाव म्हणून लावायची पद्धत नाही. इथे मुला मुलिंची दोन नावे ठेवायची रीत आहे. जे नाव (आई वडिलांना) जास्त आवडले ते पहिले नाव (फर्स्ट नेम) आणि नंतर मधले नाव (मिडल नेम). थोडक्यात सेरा आणि मिशेल किंवा ऍना आणि निकोल ही नावे एकाच व्यक्तिला रेप्रेजेंट करतात.
इथे मुला मुलिंची दोन नावे ठेवायची रीत आहे
हॅरी पॉटर च्या शेवटच्या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात हॅरी पॉटरच्या थोरल्या मुलाचे नाव अल्बस सेवेरस असे आहे, जे हॅरीच्या दोन शिक्षकांवरून बेतलेले आहे.
मात्र संबोधताना त्यातील फक्त पहिले नाव वापरले जाते.
जातीवाचक आडनावे
काही ठिकाणी फक्त प्रथम नावाने उल्लेख करण्याची प्रथा आहे. एका अर्थाने ते बरेच आहे. कारण आडनावावरुन लोकांच्या मनात जातींची गणिते चालू होतात. आमच्याकडे तबीब या आडनावा मुळे काही लोक त्याला मुस्लीम समजत असत. कधी कधी " क्या तबीब साब ! सलाम आलेकूम् " असे संभाषण होत असे. तो चक्क ब्राह्मण होता.
एका पोलिस स्टेशनला सरकारी कामानिमित्त गेलो होतो. एका वयस्कर हवालदाराचे आडनाव चित्राव होते.
मी त्याला विचारल " ज्योतिषातले सिद्धेश्वर शास्त्री चित्राव कोण लागतात?"
तो ओशाळुन म्हणाले "छे छे आमी खालच्या जातीतले" मग मी त्याला जातीभेद न मानण्यावर लेक्चर दिले. पुढे त्याने मंग तुमी पोलिसमदी कशे काय आले हे विचारलेच.
जुन्नर तालुक्यात ओतुर जवळ ब्राह्मणवाडा नावाचे गाव आहे. तेथे ब्राह्मणे आडनाव असलेले परंतु ब्राह्मण नसलेले शेतकरी कुटुंबातील लोक रहातात. त्यांना बामने किंवा बाम्हने कुणी म्हणत् नाहीत. आळेफाट्यावर निरक्षर म्हातारी बाईसुद्धा कंडक्टरला तिकिट मागताना एक ब्राह्मणवाडा द्या असे म्हणते.बामनवाडा म्हणत नाही.
मराठे. गोसावी, पुजारी आडनाव ब्राह्मणात व मराठयात पण आहे. जोशी ,साठे , वैद्य पण आडनावे अशीच झाशा देणारी आहेत. देवर्षी आडनाव मुस्लीम आहे. इनामदार, तांबोळी , कुलकर्णी, देशपांडे मुस्लीमात देखील आहेत.
आजचा सुधारक या मासिकात एका लेखकाने लिहिणारे किती ब्राह्मण आहेत? संपादक मंडळावर किती ब्राह्मण? असा सर्व्हे करताना आडनावांचाच आधार घेतला होता ते आठवले. इथे पहा
सामाजिक विश्लेषणासाठी ही माहिती उपयुक्त असते. काही लोक याचा वापर विद्रोहासाठी करतात तर काही लोक् सलोख्यासाठी करतात.
प्रकाश घाटपांडे