उच्चारण कार्यशाळा

आमच्या संस्थेतर्फे मुंबईत लवकरच एक उच्चारणशास्त्र कार्यशाळा होणार आहे. संस्कृतप्रेमींना हार्दिक निमंत्रण. त्या काळात जर मुंबईला येणे झाले तर मी ह्या कार्यशाळेला नक्की येईन. तेव्हा आपली भेट होईलच.

कलोअ,
आपला विनम्र,
ऋजु.

लेखनविषय: दुवे:

Comments

शुभेच्छा!

या संस्कृत उच्चारण कार्यशाळेला माझ्या शुभेच्छा!

-सौरभदा.

===============

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

आपल्या निर्मळ शुभेच्छांसाठी

आपले शतश: आभार :)

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

आपल्या शुभेच्छांसाठी

आपले आभार :)

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

हुं, छान उपक्रम

आपल्याला न विचारताच वरील निमंत्रणपत्रिका इ-पत्राने पत्ता-पुस्तकातील मराठी कळणार्‍या सर्वांना (जशीच्या तशी) पाठवली. कृपया राग नसावा.

संस्कृतप्रेमींना हार्दिक निमंत्रण.

बहुदा माँ मृदुलानंदमयीसुद्धा ह्या शिबिराला येतील. ;)

आमच्या संस्थेतर्फे

जाता जाता : आपण ग्वाल्हेरचे ना? मग ह्यातील आपली संस्था कुठली? का वसुधैव कुटुम्बकम् ?
____________________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

आपले

आपल्याला न विचारताच वरील निमंत्रणपत्रिका इ-पत्राने पत्ता-पुस्तकातील मराठी कळणार्‍या सर्वांना (जशीच्या तशी) पाठवली. कृपया राग नसावा.

शतश: आभार :) त्यात मला विचारावे असे काहीच नाही. संस्कृतचा योग्य प्रचार आणि प्रसार झाल्याशी कारण.

बहुदा माँ मृदुलानंदमयीसुद्धा ह्या शिबिराला येतील. ;)

मला व्यक्तिश: विचाराल तर बुवा आणि माताजी ही प्रस्थं अजिबात आवडत नाहीत. स्वत:ला माता म्हणवून घ्यायचा ह्यांना कोणी अधिकार दिला आहे? मध्यंतरी मला एक इ-मेल आली होती, त्यात एक माताजी पायाच्या पुढे तिरंगा ठेऊन लोकांना आशीर्वाद देत होत्या. असे काही पाहिले की मनाला त्रास होतो.

असो. ह्या कार्यशाळेला येणार्‍या प्रत्येकाचे मी हार्दिक स्वागत करतो.

जाता जाता : आपण ग्वाल्हेरचे ना? मग ह्यातील आपली संस्था कुठली? का वसुधैव कुटुम्बकम् ?

खरे तर पुढील संस्थांतर्फे असे लिहिणार होतो पण शेवटी संस्कृतचा प्रसार व प्रचार करणारी सर्व मंडळी व संस्था आपल्याच नाहीत का? मग मार्ग भिन्न असले म्हणून काय झाले? हे विचारात घेऊनच आमच्या संस्थेतर्फे असे लिहिले.

सर्वदेवनमस्कारं केशवं प्रति गच्छति ।

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

+१

बुवा आणि माताजींचा विरोधक

सहमत

-राजीव.

उत्तम संधी आहे....

माताजींना आणि बोवांना या निमित्ताने गाठायची उत्तम संधी आहे....

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शुभेच्छा

समारंभासाठी शुभेच्छा.

ऋ, लृ, ऐ, औ, ञ्, (फ्), श्, ष्, अनुस्वार आणि विसर्ग, या वर्णांच्या/ध्वनींच्या बाबत मराठी मूलभाषकांचे संस्कृत उच्चार गडबडीचे असू शकतात, असे माझ्या लक्षात आलेले आहे.

प्रौढ वयात अन्य भाषेतील उच्चार शिकणे बरेच कठिण असते. म्हणून आयोजित केलेल्या शिबिराबाबत अभिनंदन आणि शुभेच्छा.

वा!

वा वा! उच्चारण कार्यशाळेचा हा फार छानच उपक्रम दिसतो आहे!

आमच्यातर्फे आणि आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे सदर कार्यक्रमास शुभेच्छा!

आता उच्चारणाचाच विषय निघाला आहे, त्या संदर्भात एक प्रश्न -

काही मंडळी 'पाणी' असा उच्चार करतात तर काही मंडळी 'पानी' असा उच्चार करतात. तर यापैकी कुठला उच्चार बरोबर आणि का? हे कुणी सांगू शकेल काय? की दोन्ही उच्चार बरोबर? :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पानीयम्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"काही मंडळी 'पाणी' असा उच्चार करतात तर काही मंडळी 'पानी' असा उच्चार करतात. यापैकी कुठला उच्चार बरोबर आणि का?"
...
श्री.तात्या यांचा हा प्रश्न खोचक आहे. संस्कृत भाषेत पाण्याला 'पानीयम्' असा शब्द आहे.त्यामुळे 'पानी' हा शब्द संस्कृत शब्दाशी अधिक साधर्म्य असलेला, अत एव 'पाणी' शब्दाहून अधिक शुद्ध आहे असेच म्हणावे लागेल.
ग्रामीण भाषेतील अनेक शब्द् --ज्यांना आपण अशुद्ध समजतो--त्यांचे संस्कृत शब्दांशी समीपन आहे.: जसे--म्यां ,त्वां ,बी(सुद्धा या अर्थी), उजू (सरळ) इ.

पानी-लोनी

काही मंडळी 'पाणी' असा उच्चार करतात तर काही मंडळी 'पानी' असा उच्चार करतात. तर यापैकी कुठला उच्चार बरोबर आणि का? हे कुणी सांगू शकेल काय? की दोन्ही उच्चार बरोबर?
उच्चार दोन्ही बरोबर. लिखाण 'पाणी' असेच बरोबर.
पानी हा पानीयम्‌शी मिळताजुळता म्हणून पानी शुद्ध हे पटले नाही. मग लोणी हा नवनीतशी जुळणारा म्हणून लोनीला बरोबर म्हणावे लागेल. असेच म्हटले तर, बाळ, खेळ हे शब्द अशुद्ध म्हणावे लागतील. संस्कृत आणि मराठी ह्या दोन वेगवेगळ्या भाषा आहेत, मराठीकरण करताना न चा ण आणि ल चा ळ करणे ही मराठीची प्रवृत्ती आहे. --वाचक्‍नवी

पारंपरिक

उच्चारण कार्यशाळेला माझ्याही शुभेच्छा!

मराठीत पारंपरिक असा शब्द असून पारंपारिक हा शब्द चुकीचा आहे.

इतर भाषा शिकताना आणि बोलताना आपल्या मातृभाषेचा खून पाडू नका इतकी माफक इच्छा!

- राजीव.

माझ्या कल्पनेप्रमाणे

ही निमंत्रण पत्रिका मराठीत आहे. जिथे पारंपारिक हा शब्द मूलत: मराठीतील तद्भव शब्द आहे आणि तो संस्कृतातून आलेला तत्सम शब्द नाही. पण जर का खरोखरच सर्व तद्भव शब्द तत्सम करायचे म्हटले तर हा एकच शब्द नव्हे तर कंत्राटदार, कोट्याधीश, कोट्यावधी, तात्काळ, तात्पुरते इ. अनेक मराठी शब्द बदलावे लागतील. पण मी म्हणेन तुमचा हा अट्टाहास कशासाठी? कारण हे शब्द लोकस्वीकृत आहेत. मराठी भाषेचे ते वैभव आहेत. असो.

मात्र संस्कृतमध्ये पारंपारिक ह्या शब्दाचा फारसा वापर होत नाही कारण आम्ही परंपरागत: हा शब्द जास्त वापरतो. मात्र दुसरा कोणी पारंपारिक असे म्हणाले किंवा लिहिले तर आम्ही दोष काढत नाही. माझ्या इथेच नव्हे तर कुठेही लेखन पहा, मी कोणत्याही व्यक्तीचा व्याकरण दोष काढत नाही. ह्यात माझ्या मनाचा मोठेपणा काही नाही कारण आपण आजन्म विद्यार्थी आहोत ह्याचे मी सदैव ध्यान बाळगतो. स्वत:ला दुसर्‍याचे व्याकरणदोष काढणारा व्याकरणाचार्य समजत नाही.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

काही मजकूर संपादित.

धन्यवाद!

आपला प्रतिसाद वाचून करमणूक झाली. धन्यवाद!

पण मी म्हणेन तुमचा हा अट्टाहास कशासाठी?

मला तरी कुठेही अट्टाहास दिसला नाहि बॉ! केवळ काहि सुचवण्या होत्या. त्या 'हे असं आहे, पटलं तर बदल करा नाहितर राहिलं!'... अश्या स्वरूपाच्या होत्या. प्रचारक/प्रसारक लोकांकडून त्या झाल्या याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं इतकंच. आम्ही काय चुका करतच असतो हो!.. प्रश्न आमच्यासारख्यां (पक्षी: माझासारख्या) 'गावंढळ' लोकांच्या उच्चारणाच्या चुका सुधारू पाहणारे लिखाणात ज्या चुका करतात त्यांचा आहे. (आणि पुन्हा तुम्ही का इतकं मनावर घेताय हे कोडंच आहे.. कारण तुम्ही थोडंच लिहिलंय ते.. तुम्ही खरंतर चुका संकलित करून तुमच्या विद्यार्थीनीला देउ शकता की)

मात्र संस्कृतमध्ये पारंपारिक ह्या शब्दाचा फारसा वापर होत नाही कारण आम्ही परंपरागत: हा शब्द जास्त वापरतो

अस्सं होय! म्हणजे तुम्ही 'पारंपारिक' हा शब्द वापरू लागलात मगच असं समजायचं का की आता या शब्दाचा वापर संस्कृत मधे होतो.

मात्र दुसरा कोणी पारंपारिक असे म्हणाले किंवा लिहिले तर आम्ही दोष काढत नाही.

बहुदा दोष दाखवत नाहि म्हणायचे असावे.

माझ्या इथेच नव्हे तर कुठेही लेखन पहा, मी कोणत्याही व्यक्तीचा व्याकरण दोष काढत नाही

माझे इथेच नव्हे..... असं म्हणायचंय का?

(दुसर्‍याचे दोष 'काढणारा' व्याकरणाचार्य) ऋषिकेश

आणखीही..

पारंपरिकच नव्हे तर आंणखीही शब्द चुकीचे लिहिले गेले आहेत. स्वरुप(X), जेष्ठ(X) आणि पाटस्कर(X)(हा टस्कर कोण?) हे शब्द अनुक्रमे स्वरूप, ज्येष्ठ आणि पाटसकर असे लिहायला हवे होते. --वाचक्‍नवी

याला म्हणतात लोकां सांगे ब्रह्मज्ञान

उच्चारण कार्यशाळेला माझ्याही शुभेच्छा!

माझीही

मराठीत पारंपरिक असा शब्द असून पारंपारिक हा शब्द चुकीचा आहे.

इतर भाषा शिकताना आणि बोलताना आपल्या मातृभाषेचा खून पाडू नका इतकी माफक इच्छा!

विलीने नेमके पकडले...याला म्हणतात लोकां सांगे ब्रह्मज्ञान...:):):):)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सदिच्छा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संस्कृतप्रेमी श्री.ऋजु तसेच सृष्टिलावण्या संस्कृतभाषेच्या प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत.अंगीकृतकार्यात त्यांना यश लाभो ही सदिच्छा.
* श्री.धम्मकलाडू यांनी निमंत्रण पत्रिकेतील एक दोष दाखवला आहे.आणखीही काही चुका आहेत.'स्वरुप'हा शब्द 'स्वरूप' असा हवा. *जेष्ठ असे लिहिले आहे. तो शब्द 'ज्येष्ठ ' असा हवा.
* श्री.ऋजु यांनी लिहिले आहे: सर्वदेवनमस्कारं केशवं प्रति गच्छति । .
इथे नमस्कारं हे रूप नमस्कारः असे हवे.
* सृष्टिलावण्या यांच्या लेखनातील "भो भद्र कृतं मौनं ..."त्यात भद्र हे विशेषण कशाचे आहे? ते भद्रं असे हवे.(मूळ पाठः भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे| श्रोतारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभते|" असा आहे. अर्थात पाठभेद असू शकतात. पण ते व्याकरणशुद्ध असावे.
*श्री. ॠजु यांचे : संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
हे कानाला खटकते. मूळ शब्द महिमन् (पु) असा हलन्त आहे. त्याचे प्रथमा ए.व्. महिमा असे होते.पहिल्या पंक्तीत "अत्र कर्तृपदं गुप्तं'' असे दिसते.पण पांडित्याभावीं मी ते जाणू शकत नाही. (न) अस्ति या क्रियापदाचा कर्ता कोण बरे? साधितम् हे विशेषण
कोणत्या नामाचे? किम् साधितम् नास्ति ?
...असो. संस्कृत शब्दांचे उच्चारण अचूक हवेच. पण निर्दोष संस्कृत लेखन अधिक महत्त्वाचे आहे. 'संस्कृत' याचा अर्थच मुळी "शास्त्रोक्तनियमांनुसार असलेले" असा आहे. इथे कोणताही व्याकरण दोष क्षम्य मानला जात नाही, म्हणून लिहिले. हेतू दोषदिग्दर्शन हा नसून सुधारणा व्हावी हा आहे. तरी क्षमा असावी.(माझ्या या लिखाणातही चुका असू शकतील. आढळल्यास कृपया निदर्शनाला आणाव्या.)
»

सर्किटकाकांशी सहमत

यनासरांचे बरोबर आहे. त्यांनी केलेली मदतही स्पृहणीय आहे.

संस्कृत उच्चारण शिकवण्यासाठी एकत्र जमणार्‍या मंडळींना मातृभाषेतील उच्चारणही जमायला हवे. चुकीचे शब्द वाचून चुकीचे मराठी उच्चार करणारे संस्कृताचं आणखी काय भजं करणार .

यापुढे, मुद्रितशोधनासाठी मीही उपक्रमाची आणि उपक्रमींची मदत घेणार आहे. कारण इतर कुठेही इतके ज्ञानी आणि मदतशील सदस्य सहसा दिसत नाहीत.

अहो काका, आपल्यासारखे खुल्या दिलाने प्रशंसा करणारे सदस्यही इतरत्र दिसत नाहीत.

- राजीव.

बिनशर्त माफी

टग्याकाका,

चुकलो. माफ करा एक डाव.

मायमराठीवर प्रेम करण्याचा अक्षम्य अपराध माझ्या हातून घडला. अहो, काय ती देवांची भाषा. साक्षात परमेश्वर बोलतो त्या भाषेत बोलण्याचा प्रमाद मी करावा का या चिंतेत होतो पण तुमच्या कान उघडणीमुळे डोळे उघडले. (कानउघडणीने डोळे उघडतात. हॅहॅहॅ!!!)

मायमराठीचा अपमान करून, जास्तीतजास्त चुकीचे उच्चार लोकांत पसरवून तिचा गळा घोटावा हेच खरे. नाहीतर, संस्कृताचे महत्त्व पटायचे कसें लोकांना.

- राजीव.

बापरे ! किती भयंकर चुका......

* श्री.धम्मकलाडू यांनी निमंत्रण पत्रिकेतील एक दोष दाखवला आहे.आणखीही काही चुका आहेत.'स्वरुप'हा शब्द 'स्वरूप' असा हवा. *जेष्ठ असे लिहिले आहे. तो शब्द 'ज्येष्ठ ' असा हवा.
* श्री.ऋजु यांनी लिहिले आहे: सर्वदेवनमस्कारं केशवं प्रति गच्छति । .
इथे नमस्कारं हे रूप नमस्कारः असे हवे.
* सृष्टिलावण्या यांच्या लेखनातील "भो भद्र कृतं मौनं ..."त्यात भद्र हे विशेषण कशाचे आहे? ते भद्रं असे हवे.(मूळ पाठः भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे| श्रोतारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभते|" असा आहे. अर्थात पाठभेद असू शकतात. पण ते व्याकरणशुद्ध असावे.
*श्री. ॠजु यांचे : संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
हे कानाला खटकते. मूळ शब्द महिमन् (पु) असा हलन्त आहे. त्याचे प्रथमा ए.व्. महिमा असे होते.पहिल्या पंक्तीत "अत्र कर्तृपदं गुप्तं'' असे दिसते.पण पांडित्याभावीं मी ते जाणू शकत नाही. (न) अस्ति या क्रियापदाचा कर्ता कोण बरे? साधितम् हे विशेषण
कोणत्या नामाचे? किम् साधितम् नास्ति ?

बापरे ! किती भयंकर चुका......
'सृष्टीलावण्या' असे लिहिणेही चूक आहे तर...

आता संस्कृत- जिवंत की मृत? - काय फरक पडतो?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काही छोट्या शंका

श्री.ऋजु यांनी लिहिले आहे: सर्वदेवनमस्कारं केशवं प्रति गच्छति । . इथे नमस्कारं हे रूप नमस्कारः असे हवे.

मुळात हा श्लोकाचा भाग नाही. तो एक संभाषणाचा भाग आहे कारण श्लोक लिहायचा झाल्यास छंद, रचना इ. सर्व लक्षात घ्यावे लागते. पुस्तकांचे संदर्भ घ्यावे लागतात. तो विनाकारण अर्धवट लिहून चालायचे नाही. संभाषणात आपण सहज म्हणतो, "गेलेलो खरे, पण जाईन पण उद्या". ज्याचे पूर्ण वाक्य मी काल गेलेलो हे खरे पण उद्या पण जाईन. आता तुम्ही जर उद्या आणि गेलेलो ह्याचा संबंध जोडला तर ते कानांना विचित्र वाटेल. माझे म्हणणे इतकेच होते की केनापि कस्मै अपि कृतं नमस्कारं साक्षात् केशवं प्रति गच्छति । मराठीत जसे आपण संभाषणात सर्व शब्द नेमकेपणे म्हटले जात नाहीत तसेच संस्कृत संभाषणात म्हटले जात नाहीत.

खुद्द पाणिनीने लोकवापरातील अनेक शब्द व वाक्यरचना विचारात घेतल्या आहेत. उदा. जिथे जायचे ते स्थळ असले तरी त्याची सप्तमी न होता लोकस्वीकृतिप्रमाणे द्वितीया होते.

जाता जाता : संस्कृतमध्ये गच्छामि हे पूर्ण वाक्य होय.

सृष्टिलावण्या यांच्या लेखनातील "भो भद्र कृतं मौनं ..."त्यात भद्र हे विशेषण कशाचे आहे? ते भद्रं असे हवे.

मला वाटते हे वाक्य केवळ आपण कसे वाचता त्यावर सर्व काही अवलंबून आहे. उदा. भो भद्र, कृतं मौनम्.... हे श्रेष्ठा (बहुदा राजसभेत, राजाला उद्देशून) बेडूक जिथे वक्ते आहेत तिथे कोकिळेने मौन धारण केले आहे किंवा भो, भद्र: कृतं मौनम्.... हे __, कोकिळेने चांगले केले आहे की मौन धारण केले आहे. पण नुसते हे असे संबोधन कानाला त्रासदायक वाटते.

उरला प्रश्न स्वरूप व स्वरुप ह्याचा तर मी म्हणेन कि हे सर्व शुद्धलेखन दोष दाखवल्यावद्दल आभार (जे माझे स्वत:चे पण नाही. रुईयाच्या एका विद्यार्थिनीने मला ही निमंत्रण पत्रिका .jpg स्वरुपात forward केली होती, जी मी इथे केवळ लोकांना माहित व्हावे म्हणून टाकली कारण हा कार्यक्रम मराठीतून होता). माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो. मी तर वेळोवेळी निर्दोष लेखनाचा प्रयत्न करीतच असतो. दोष दाखवणार्‍यांचे खुल्या दिलाने स्वागत करतो. आपल्यासारखे शुद्धलेखन तज्ञ हे उपक्रमचे वैभव आहेत.

माझ्या मते उपक्रमने "आध्यात्मापासून राजनीतीपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर संस्कृत भाषेत लेखन झाले आहे." अश्या नजरेत भरतील अश्या वाक्यांना शुद्ध लिहिण्यासाठी आपली मदत घ्यावयांस हवी. कारण एखाद्या व्यक्तीने अशुद्धलेखन करणे वेगळे आणि मराठीच्या विकासासाठी निर्मित मराठी जालस्थळाने प्रकट अशुद्ध लिहिणे वेगळे. माझ्यावर टीका झाली तरी चालेल पण माझ्या आवडत्या उपक्रमावर टीका झालेली मला तरी आवडणार नाही आणि ते पण आपल्यासारखे विद्वान् इथे असताना.

बाकी आपल्या व्याकरण ज्ञानाविषयी जो माझ्या मनात अवाढव्य आदर होता त्या फुग्याला आपण लावलेली टाचणी पाहून मी हैराण झालेलो आहे.

इतर आपल्या आक्षेपांना सावकाश उत्तर देईनच. तसेच जिथे माझ्या चुका असतील त्या मान्य करीन सुद्धा. त्यात लाज बाळगणार नाही. तू.ए.पु.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

गैरसमज

माझ्या मते उपक्रमने "आध्यात्मापासून राजनीतीपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर संस्कृत भाषेत लेखन झाले आहे." अश्या नजरेत भरतील अश्या वाक्यांना शुद्ध लिहिण्यासाठी आपली मदत घ्यावयांस हवी. कारण एखाद्या व्यक्तीने अशुद्धलेखन करणे वेगळे आणि मराठीच्या विकासासाठी निर्मित मराठी जालस्थळाने प्रकट अशुद्ध लिहिणे वेगळे.

ऋजु, हा आपला गैरसमज आहे की समज आहे ते विशेष कळले नाही परंतु यापूर्वीही आपल्याला सांगितले होते की पल्लवी या कोणी उपक्रमावरील सदस्या आहेत. त्यांची वाक्ये उपक्रम या संकेतस्थळाची वाक्ये होऊ शकत नाहीत. किंबहुना, आपली किंवा इतरा कोणाची वाक्ये देखील उपक्रम या संकेत स्थळाची वाक्ये / घोषवाक्ये होऊ शकत नाहीत.

पल्लवी नावाची कोणी सदस्या उपक्रमाची चालक आहे असे ऐकण्यात आले नाही तरी आपण इतके मोठे विधान कोणत्या आधारावर करता हे कळले नाही. जमल्यास पुरावे देणे. पुन्हा पुन्हा सांगून आपण संकेतस्थळावर करत असलेले बिनबुडाचे आरोप केवळ दुर्दैवी वाटतात.

पल्लवी नावाच्या सदस्येवर आपल्याकडून होत असणारे आरोप गैरसमजापोटी होत आहेत असे मानते. नसल्यास, आपण असे आरोप थांबवावेत असे सांगावेसे वाटते. येथे उपस्थित नसणार्‍या, कोणत्याही वादात नसलेल्या बाईंना सतत लक्ष्य करत राहणे हे अनावश्यक वाटते.

आध्यात्मापासून राजनीतीपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर संस्कृत भाषेत लेखन झाले आहे."

हे वाक्य पल्लवी या सदस्येचे आहे. उपक्रमाचे नाही. तेव्हा ते विनाकारण उपक्रमाला चिकटवू नये ही विनंती.

आणखी एक चूक --माझी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"* श्री.धम्मकलाडू यांनी निमंत्रण पत्रिकेतील एक दोष दाखवला आहे."
असे लिहिले आहे, ती माझी चूक झाली आहे.वस्तुतः "पारंपारिक" हा अशुद्ध शब्द श्री. विली वोन्का यांनी प्रथम निदर्शनाला आणून दिला आहे.श्री.धम्मकलाडू यांनी त्यावर प्रतिसाद लिहिला आहे. क्षमस्व!

कौतुकास्पद अभिनिवेश

इथे ज्या अभिनिवेशाने लोकांनी निमंत्रणपत्रिकेतल्या चुका दाखवल्या आहेत त्याचे कौतुक वाटले. तोच अभिनिवेश संपादक मंडळाच्या नोटिसांमधल्या अशुद्धलेखनाबद्दल दिसला नाही (सर्किट यांचा अपवाद). तसेच इतर संस्कृतज्ज्ञही नेहमीच शुद्ध लिहितात असे नाही, पण वरील लोकांचा अभिनिवेश अशा लेखनातील चुका काढण्यात दिसला नाही.
असो.

विनायक

शांतपणे विचार करा बरं

इथे ज्या अभिनिवेशाने लोकांनी निमंत्रणपत्रिकेतल्या चुका दाखवल्या आहेत त्याचे कौतुक वाटले. तोच अभिनिवेश संपादक मंडळाच्या नोटिसांमधल्या अशुद्धलेखनाबद्दल दिसला नाही (सर्किट यांचा अपवाद). तसेच इतर संस्कृतज्ज्ञही नेहमीच शुद्ध लिहितात असे नाही, पण वरील लोकांचा अभिनिवेश अशा लेखनातील चुका काढण्यात दिसला नाही.
असो.

ही 'उच्चारण कार्यशाळा' संपादकांनी किंवा 'उपक्रम' या संकेतस्थळाने आयोजित केली आहे का? नाही! त्यांनी अशी कार्यशाळा आयोजित करून अशा 'पारंपारिक स्वरुप' असलेल्या 'जेष्ठ' आणि 'भद्र' चुका केलेल्या आहेत का? नाही!

आणि संपादकीय नोटीस म्हणजे काही शुद्धलेखनाची कार्यशाळा नाही. कृपया जरा शांतपणे विचार करा बरं.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कौतुकास्पद कळकळ

विनायककाका,

शुद्धलेखनाबाबत तुमची कळकळ कौतुकास्पद आहे. शुद्धलेखनाबद्दल तुम्ही इतके जागरूक आहात हे पाहून आनंद झाला. इथल्या संपादकांना करू देतच "शुद्ध मराठी उच्चारण कार्यशाळेचे" निमंत्रण - आपण दोघे त्यांचा खरपूस समाचार घेऊ. तोपर्यंत धीर धरा.

-राजीव.

संस्कृतज्ज्ञ पहिल्या अर्थी ठीक

(संस्कृतात तरी)
संस्कृत + ज्ञ = विकल्पाने संस्कृतज्ञ किंवा संस्कृतज्ज्ञ

पण मराठीत साधारणपणे उच्चारित द्विर्वचन लिहीत नाहीत...

जोडाक्षरातील प्रथम वर्णाचे द्वित्त्व/द्वित्व

उच्चारणाच्या सुलभतेसाठी असे होते. स्वरापुढे जर जोडाक्षर आले (वाक्याच्या सुरुवातीला नसले तर कुठलेही जोडाक्षर स्वरापुढेच आलेले असते), तर त्या जोडाक्षरातील प्रथम वर्णाचे द्वित्व विकल्पाने होते. (आणखी थोडी गुंतागुंत आहे, पण उगाच अती नको...) असे उच्चारण मराठीतही होते. संस्कृतात या बाबतीत उच्चारणानुसारी लेखन करायची पद्धत असल्यामुळे द्वित्व (द्वित्त्व!) करून विकल्पाने लेखन केले जाते.

बहुतेक मराठी लोक "अस्तित्व" लिहितात, पण उच्चार "अस्तित्त्व" असा करतात. "वध्य" असे लिहितात, पण उच्चार "वद्ध्य" असा करतात. संस्कृतात अस्तित्व/अस्तित्त्व, वध्य/वद्ध्य विकल्पाने लिहिले जाऊ शकते.

उच्चारणानुसारी लेखनाचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. फायद्यांकडे कितपत लक्ष द्यायचे आणि तोट्यांकडे कितपत, हे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे ठरते. उच्चारणानुसाराचा "सुवर्णमध्य" (सुवर्णमद्ध्य) काय ते वेगळे ठरते.

संस्कृतात हे द्वित्व, स्वरसंधी, वगैरे प्रकार उच्चारणानुसारी लिहिले जातात, पण वैदिक लेखन सोडल्यास शब्दांचे हेल (उदात्त-अनुदात्त-स्वरित) लिहिले जात नाहीत. ऋग्वेदाच्या लेखनातही प्रत्येक स्वराचा हेल लिहिला जात नाही, पदातील एखाददोन स्वरांवरतीच चिह्न लिहिले जाते. बाकी हेल वाचकाने "ओळखून घ्यायचे" असतात. म्हणजे संस्कृतातही उच्चारणाचे सगळे तपशील लिहीत नाहीत, पण द्वित्त्व वगैरे लिहिले जातात. अती होतील असे तपशील कुठले, याबाबत त्या पंडितांना हा समतोल वाटला.

मराठीत शेवटचा ध्वनित स्वर दीर्घ लिहिणे, अन्यथा ह्रस्व लिहिणे, (बहीण, बहिणीला) वगैरे उच्चारणानुसारी लिहिले जाते. पण द्वित्व वगैरे लेखनात येत नाहीत. हा मराठी तज्ज्ञांना "नको-ते-तपशील-कुठले"बाबत समतोल वाटला.

असो.

जोडाक्षराच्या द्वित्वाबद्दलचे निरीक्षण पाणिनींनी वैकल्पिक नियम म्हणून नमूद केले आहे - ८.४.४७ अनचि च ।

द्वित्व

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितातः
"बहुतेक मराठी लोक "अस्तित्व" लिहितात, पण उच्चार "अस्तित्त्व" असा करतात. "वध्य" असे लिहितात, पण उच्चार "वद्ध्य" असा करतात. संस्कृतात अस्तित्व/अस्तित्त्व, वध्य/वद्ध्य विकल्पाने लिहिले जाऊ शकते. "
...अशा उच्चारांची आणखी काही उदाहरणे:
*१.(अ) हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा|पुण्याची गणना कोण करी||
(ब) लौकरच पुण्याची गणना देशातील महानगरांत (मेट्रो) होईल.
*२.(अ) "गांधीहत्या आणि मी"..नथुराम गोडसे.
(ब) वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावे.
.....
असे उच्चार संस्कृतात लिहिण्यासाठी दोन विकल्प आहेत हे मात्र मला ठाऊक नव्हते.
मराठीत 'पुण्यतिथी' या शब्दासाठी 'पुण्ण्यतिथी' असा पर्याय व्याकरणमान्य नाही.
'महत्पुण्यम्' हा संस्कृत शब्द् 'महत्पुण्ण्यम्' असा लिहिण्याचा पर्याय आहे.(श्री.धनंजय सांगतात म्हणजे असणारच). पण असे लेखन मी कधी वाचले नाही.

संस्कृतज्ञ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या संदर्भात मी श्री.टग्या यांच्याशीं सहमत आहे.
'ज्ञ' म्हणजे ज्ञाता, जाणणारा,विद्वान. याप्रमाणे सिद्ध झालेले 'शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विधिज्ञ' आदि शब्द परिचित आहेतच.
संस्कृतज्ञ = संस्कृत भाषा जाणणारा, संस्कृत भाषेचा ज्ञाता. यात काही चूक नसावी असे वाटते.(संस्कृत हे वस्तुतः विशेषण आहे. पण ते संस्कृतभाषा या अर्थी नाम म्हणूनही वापरता येते.चांगल्या लेखनात तसे शक्यतो वापरू नये हे खरे.)
** आता तत्+ज्ञ=तज्ज्ञ म्हणजे तत् जाणणारा. इथे तत् = ब्रह्म. जसे:
तत् त्वम् असि= ते(ब्रह्म) तू आहेस.
तत्त्वमेव( तत् त्वम् एव) त्वमेव तत् |..ते तूच आहेस, तूच ते(ब्रह्म) आहेस. असे हे अद्वैत मत आहे.(तत्=ब्रह्म=परमात्मा. त्वम्=तू=जीवात्मा.तत्त्वम् म्हणजे या दोघांचे अद्वैत.) किंबहुना तत्त्वम्=तत्त्व.यावरून तत्त्वज्ञान म्हणजे अद्वैतज्ञान.
** अंततः- तज्ञ= त या अक्षराचे उच्चारण आणि लेखन जाणणारा.
तर तज्ज्ञ=ब्रह्मज्ञ, ब्रह्म जाणणारा.
निष्कर्ष असा की श्री.टग्या यांचे म्हणणे योग्य आहे.( म्हणजे माझ्या मते तसे असावे).

मराठी नियम म्हणून योग्य

संस्कृतात मात्र संधींबाबत उच्चारानुसारी लेखन करायची दीर्घ परंपरा आहे. तिचे अनेक फायदेही आहेत.

संधी करून लिहिल्यामुळे कवीला काय उच्चार अभिप्रेत होता, त्याबद्दल वाचकाला अधिक माहिती मिळते, आणि वृत्तबद्ध वाचनाची सोय होते. संधी केलेले शब्द अर्थातच कोशातील घटक शब्दांपेक्षा वेगळे असतात. ते कोशगत शब्दांशी तंतोतंत जुळण्यातला फायदा तुम्ही वर सांगितलेलाच आहे. कुठला फायदा अधिक, कुठला तोटा अधिक हे प्रत्येक भाषेतील सभ्य समाजातील लेखकांनी ठरवायचे असते.

तरी तुम्ही वरती दिलेला नियम सर्व भाषांना लागू असा मानू नये.

संस्कृतभाषेच्या लेखकांनी ठरवल्याप्रमाणे संधी उच्चारानुसारी लिहिणे सभ्य समाजात योग्य होते. आपण ते बदलू नये असे माझे मत आहे. पाणिनींनी इतक्या वैज्ञानिक दृष्टीने निरीक्षण करून द्वित्वाचा नियम ओळखला. ते निरीक्षण आजही आपल्याला करता येते. पाणिनींना खोटे पाडण्यास हरकत नाही - पण त्यांचे निरीक्षण चुकले असे तरी दाखवावे लागेल. म्हणजे सभ्य समाजात संस्कृतभाषेत बोलताना जोडाक्षराच्या पहिल्या वर्णाचे द्वित्व होत नाही, असे सर्वेक्षणाने सिद्ध करावे लागेल. (आता या काळात संस्कृत स्वभाषा म्हणून बोलणारे सर्वेक्षणासाठी कुठे सापडतील? उच्चारण-कार्यशाळेत नव्हेत - ते तर विद्यार्थी... आणि उच्चारण-कार्यशाळेतले गुरूही सर्वेक्षणासाठी चालणार नाहीत - कारण ते उत्तर पाणिनीयच देतील.)

संस्कृतात उच्चारणानुसारी संधी लिहू नयेत असा नियमही वाटल्यास करता येईल. पण एवढे लेखन उच्चारणानुसारी झाले असताना हा नियम कोणी मानेल याबद्दल मी साशंक आहे. मी स्वत: तरी पणिनींच्या अनुसार, आणि उच्चारणानुसारी लेखनपद्धतीला (संस्कृतपुरते) मानून संस्कृतज्ञ/संस्कृतज्ज्ञ अशी दोन्ही वैकल्पिक रूपे योग्य मानतो.

मराठीत उच्चारणानुसारी संधी लिहू नयेत, याबद्दल सहमत. सैद्धांतिक दृष्ट्या नव्हे, तर "शाळेत असेच शिकवतात, म्हणून सर्वांची सोय होत आहे" याबाबत सहमत.

- - -
जाता-जाता :
बहुतेक मराठीभाषक "संस्क्रुतद्द्न्य/संस्क्रुतद्न्य" असा वैकल्पिक उच्चार करतात. ज्ञ = ज्+ञ हा उच्चार बहुतेक मराठी-मूलभाषक लोकांना करता येत नाही. उच्चार येत असता तर "संस्कृतज्.ज्.ञ/संस्कृतज्.ञ" हा (संस्कृतातला) विकल्प नैसर्गिकच वाटला असता.
"संस्क्रुतज्द्न्य" हा उच्चार विचित्र आणि हास्यास्पद आहे. संधीनियम सुलभ उच्चारांचे वर्णन आहेत, उच्चार कठिण करणारे हे नियम नव्हेत.

अभिनिवेश?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अनेकांच्या लेखनात टंकनाच्या चुका होतात, व्याकरणदोष असतात. ते दाखवणे आवश्यक नसते. योग्यही नसते. इथे संस्कृतशब्दांचे लेखनच नव्हे तर उच्चारणही शुद्ध हवे यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्नरत असणार्‍या संस्कृतप्रेमी व्यक्तींच्या लेखनातच शब्दांची अशुद्ध रूपे आढळली म्हणून ती निदर्शनाला आणून द्यावी असे वाटले.तसेच :
"....हेतू दोषदिग्दर्शन हा नसून सुधारणा व्हावी हा आहे. तरी क्षमा असावी.(माझ्या या लिखाणातही चुका असू शकतील. आढळल्यास कृपया निदर्शनाला आणाव्या.)
असे म्हटले आहे. म्हणून त्या प्रतिसादलेखनात कोणताही अभिनिवेश नाही. केवळ कर्तव्य भावनेपोटी लिहिले .(..कृपया राग नसावा. सुरवात धम्मकलाडूंनी केली. तेव्हा राग आल्यास त्यांनाच ते द्यावे!!)

सुरवात मी नाही

यनावालाकाका, एक दुरुस्ती. सुरवात मी नाही विलीने केली. त्याचे श्रेय मी लाटणार नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खेद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋजु आणि सृष्टिलावण्या यांचे लेखन, तसेच ती निमंत्रणपत्रिका यांतील लेखन दोष प्रकटपणे दाखवले त्याविषयी मी खेद व्यक्त करतो. जे काही कार्य करतात त्यांच्याच हातून चुका होऊ शकतात. जो नुसता बसून निष्क्रिय राहतो त्याच्या दुसर्‍या चुका कशा होणार?.कबीराने म्हटले आहे:" मारग चलते जो गिरै वाको नाही दोस......" मार्गक्रमण करीत असता जर कोणी पडला , तर त्याला दोष देऊ नका. जो काही न करता घरी बसला आहे त्याच्या डोक्यावर मारा."
"कासया मी पाहू दोष आणिकांचे मज काय त्यांचे उणे असे" हे तुकाराम महाराजांचे वचन मला पटते.पण हातून त्या विरुद्ध झाले. याविषयी खेद वाटतो.
..."महिम्नः वर्णनम्=महिमवर्णनम् असा सामासिक शब्द होतो. "हे श्री.ऋजु यांच्या लक्षात आले असेल. पण तसे त्यांनी लिहिले नाही. यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.

 
^ वर