बदलती मराठी - १

'लोकसत्ता'च्या लोकरंग पुरवणीमध्ये 'जय मराठी' नावाचा एक खुसखुशीत लेख आला आहे.

त्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवा. आणि तुम्हीही असे मजेदार प्रश्न विचारा.

प्रश्न १- खालील परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या.

एका मराठी वाहिनीवर एक खाण्या-पिण्यासंबंधीचा कार्यक्रम चालू आहे. मालिकांमध्ये चमकणारी एक तारका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेबरोबर बाहेर जेवायला जाते आणि गप्पा मारते, असं दृश्य आहे. बोलता बोलता सूत्रसंचालिका त्या तारकेला म्हणते, ``अगं तू डाएटवर आहेस की काय? काही घेतलं नाहीस. तुझी प्लेट तर खालीच आहे.'' ती तारका घाईघाईत उद्‌‌गारते, ``नाही, तसं काही नाही, घेते ना!''
दृश्य दुसरे- कार्यक्रम हाच. संचालिका हीच. समोरचे तारे-तारका बदललेले. संचालिका तारकेला म्हणते, ``मी ऐकून आहे, रेसिपीजची आवड आहे तुला, तू एक छानशी रेसिपी सांग पाहू.'' मग ती (माजी) तारका- जी स्वतःची ओळख एक मराठी लेखिका म्हणूनही करून देते- ती लापशी रव्याच्या शिऱ्याची कृती सांगते. मग सूत्रसंचालिका- ``वॉव्‌! कशी दिसते ही डिश? हाऊ डज्‌ इट्‌्‌ लूक्‌?'' ती तारका- `इट्‌्‌ लुक्स सो यम्म्म्मीऽऽ ना!
प्रश्न १- हा कार्यक्रम कुठल्या वाहिनीवर सुरू असेल? (मराठी वाहिन्या चार-पाचच आहेत, म्हणून पर्याय दिलेले नाहीत.)
प्रश्न २- पहिल्या दृश्यात जेव्हा सूत्रसंचालिका `प्लेट खालीच आहे', असं म्हणते तेव्हा प्लेट नक्की कुठे असेल? (योग्य पर्याय निवडा)
(अ) टेबलाच्या खाली (आ) टेबलक्लॉथच्या खाली (इ) तळमजल्यावर (ई) यापैकी नाही.
प्रश्न ३- दुसऱ्या दृश्यात लापशी रव्याच्या शिऱ्याची `यम्म्मी' कृती सांगणाऱ्या तारकेचे नाव काय? (ती बालसाहित्य लेखिकाही आहे म्हणे)
प्रश्न ४- रेसिपी या मराठी शब्दाचा अर्थ काय?
(अ) खाद्यपदार्थाचे वर्णन (आ) खाद्यपदार्थ बनविण्याची कृती (इ) तयार खाद्यपदार्थ
प्रश्न ५- कार्यक्रमाची सूत्रसंचालिका कोण असेल? (एका महान- दिवंगत- मराठी साहित्यिकाची नात असल्याचं ती आÆभमानाने सांगते- यावरून ओळखा)
प्रश्न ६- मराठी वाहिनीवरचा मराठी कार्यक्रम म्हणवून घेण्यासाठी कार्यक्रमात मराठी भाषेचे प्रमाण नक्की किती असावे, असे तुम्हाला वाटते?
(अ) ७५% (आ) ५०% (इ) २५% (ई) १०% (उ) यापैकी नाही; फक्त `मी मराठीच' असा ढोल पिटला की पुरे!
प्रश्न २- खालील शब्दांचे अर्थ सांगा. व्याकरणदृष्टया ते शब्द नक्की काय आहेत (म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण इ.) हे सांगता आल्यास बारा गुण अधिक.
‡ सृजनता ‡ वैविध्यता ‡ सादरीकरण ‡ सौंदर्यता ‡ सौंदर्यीकरण ‡ साशंकता
प्रश्न ३- खालील वाक्यांचे अर्थ ससंदर्भ स्पष्ट करा.
‡ आता सौंदर्याची भीती कशाला?
‡ अडचण साबणात नाही, घासणीत आहे
‡ हे डोळे काचेसारखे नाजूक, त्यांना साबणाच्या अश्रूंनी का रडवावं?
‡ समस्या चल हट
‡ किटाणांपासून दहापट सुरक्षा
‡ थुंकू नका! नाहीतर दंड रु. २००/-
प्रश्न ४- खालील संवाद नीट वाचा. त्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांवरून हे ओळखा, की संवाद म्हणणाऱ्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे. (पर्याय दिलेले आहेत)
१) ``तुम्ही कधीपासून माझा पाठपुरावा करताय?''
(अ) माझा पिच्छा पुरवताय (आ) माझा पाठलाग करताय (इ) मला पाठिंबा देताय (ई) बातमीसाठी तपशील गोळा करताय.
२) ``तुम्ही मला भरीला पाडू नका. त्याचे परिणाम वाईट होतील. तुमचं काम तुम्ही करा. `त्यातच तुमची भलाई आहे'.
(अ) त्यातच तुमचं मोठेपण आहे (आ) त्यातच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे (इ) त्यानेच तुमचं कल्याण होईल (ई) त्यातच भलं आहे.
३) `माझ्या नादी लागलेल्यांचं तळपट होईल'.
(अ) माझ्या कट्टर अनुयायांचं तळपट होईल (आ) माझ्या विश्वासू सहकाऱ्याचं तळपट होईल (इ) माझ्या अंगचटीला येणाऱ्यांचं तळपट होईल (ई) माझ्याशी वाद घालणाऱ्यांचं तळपट होईल (ड) माझ्या कामात विघ्न आणणाऱ्यांचं तळपट होईल.
प्रश्न ५- हिंदी की मराठी ते ओळखा. (राज ठाकरे यांची मदत घेतली तरी चालेल.) तिसरीच कुठली भाषा वाटली, तर तसे नमूद करा.
‡ पाणी उकळण्याच्या झंझटीपासून मुक्ती!
‡ माझी साथ द्या.
‡ स्वर्गीय अमुक अमुक यांचा जयंती सोहळा संपन्न.
‡ या संकटांचा मुकाबला मी एकटा करू शकत नाही. माझी मदत करा.
‡ या पालकाच्या पानांना आधी धुवून घ्या मग या पानांना बारीक कापा.
प्रश्न ६- खालील संवाद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
माझी मुलगी एका मैत्रिणीला खेळायला घेऊन घरी आली. ती चिमुरडी आमच्याकडे पहिल्यांदाच आली होती. मी, ``तुम्ही दोघी आतल्या खोलीत खेळा. तो कोपऱ्यातला चेंडू घेऊन जा हवा तर.''
चिमुरडी - `चेंडू? म्हणजे काय?'
माझी मुलगी - `चेंडू म्हणजे बॉल'.
दोघी आत गेल्या. थोडया वेळाने खेळून झाल्यावर...
मी - `तुम्ही दोघी ताटली घेऊन या. एकेक खाऊ देते.'
चिमुरडी - `ताटली म्हणजे?'
मी - `ताटली म्हणजे छोटी थाळी'.
चिमुरडी - `थाळी म्हणजे काय?'
तेवढयात माझी मुलगी दोन ताटल्या घेऊन आली. चिमुरडी - `यांना तर आम्ही डीश बोलतो.'
(डी दीर्घ तिनेच म्हटलेला.)
खाऊन झाल्यावर चिमुरडी निघाली.
मी, `आता तू रविवारी ये हं!'
चिमुरडी, `रविवारी म्हणजे?'
माझी मुलगी, `म्हणजे सण्डेला'.
चिमुरडी - ``ओके. पण मी मम्मीला विचारून येईन, कारण सण्डेला डान्स प्रोग्रॅमची रिहर्सल आहे. क्लासच्या टीचरनी गर्ल्सना ब्लू कलरचे ड्रेसेस घालून आणि बॉइज्‌ना यलो कलरचे शर्ट घालून बोलावलंय शार्प टेन थर्टीला; ...बाय!''
प्रश्न १- हा संवाद कसा वाटतो?
(अ) काल्पनिक (आ) अतिशयोक्त (इ) सत्य घटनेवर आधारित
प्रश्न २- या संवादातील चिमुरडीची मातृभाषा कोणती असेल?
(अ) इंग्लिश (आ) मराठी (इ) इतर कुठलीही भारतीय
प्रश्न ३- या चिमुरडीला मी कोण वाटले असेन?
(अ) परग्रहावरील व्यक्ती / प्राणी (आ) अनेक वर्षे परदेशात राहून आलेली व्यक्ती (इ) डोकं फिरलेली व्यक्ती
तर ही प्रश्नपत्रिका पूर्ण सोडविता आल्यास जरूर कळवा.

Comments

:-))

:-)))

एकदम सॉल्लिड बरं क्या..

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

हा हा हा ...

हा हा हा ...
फार मस्त ! गेले बरेच महिने मराठी वाहिन्यांपासून दूर होतो. त्यामुळे आमच्या अनुपस्थितीत मराठी लँग्वेज इतकी पल्युट झाली आहे हे पाहून् अनामिक हुरुहुर वाटली :) (अचानक जड लिहायला लागले की 'अनामिक हुरहुर' वगैरे पेरावे लागते हे चाणाक्ष वाचक समजतीलच. पण ते सध्या दुर्मिळ झाल्याने भीति नाही ;) ).

आवडलेली अथवा नसमजलेली वाक्ये -
>अडचण साबणात नाही, घासणीत आहे<
अडचण या शब्दाला असलेल्या अर्थछटांत भर :)

पालकाची पाने वाचून खूपच करमणूक झाली.
मदत करणे, धन्यवाद देणे, याबाबतच्या मजा हल्ली 'महागुरुंच्या' एका कार्यक्रमात पाहिल्या. तिथले परिक्षक आणि काही स्पर्धक फारच चांगले मराठी बोलायचा ट्राय करत असतात. ते पाहून ना.. म्हणजे आय फिल एकदम हॅप्पी !

चिमुरडी आणि लेखिका यांतील संवाद खरा वाटतो. मी सुद्धा यल्लो यल्लो ड्रेस घालून फ्रेंडच्या हॅप्पी बर्थ डेला जाणारी आणि एंजॉय करणारी लहान मुले पाहिली आहेत. तिथले डिफ्रंट कलर्सचे बलून्स, केक-कँडल्य, आणि हॅप्पी बर्थडे विश करायला म्हटलेले साँग त्या एंजॉयमेंटमध्ये ऍडिशनच करत असते.

>थुंकू नका! नाहीतर दंड रु. २००/- <
हे वाचून मात्र पान खायला सुरुवात करीन म्हणतो :)

कळावे,
मराठीवर लोभ असावा.
--लिखाळ.

थुंकू नका!

'थुंका! नाहीतर दंड रु. २००/-'
असे नसल्याने पान खाण्यामागची प्रेरणा नीटशी कळली नाही.

प्रश्न ३

ही वाक्ये जाहिरातीतील असावीत. हीच वाक्ये याच अर्थाने मराठीत कशी असावीत?

‡ आता सौंदर्याची भीती कशाला?
('अब खुबसूरतीसे डरना कैसा' चे भाषांतर असल्यास) ठीक वाटले. हिंदी इतके दमदार मात्र नाही. 'आता सौंदर्याला भीता कशाला?' म्हणण्यात फारसा राम नाही. सौदर्या हे नटीचे नाव होते यात या वाक्याचा दोष दिसला नाही. :)

‡ अडचण साबणात नाही, घासणीत आहे
चांगला मराठी पर्याय सापडला नाही. अडचणला 'लोचा/घोळ' म्हणणे फारसे प्रभावी वाटले नसते.

‡ हे डोळे काचेसारखे नाजूक, त्यांना साबणाच्या अश्रूंनी का रडवावं?
उपमा विचित्र असेल. पण बालकांच्या साबणाची जाहिरात वाटली. साबणांच्या अश्रूंना साबणामुळे येणारे वगैरे म्हणता येईल पण फायदा?

‡ समस्या चल हट
नो प्रॉब्लेम चा जो मराठी प्रति वाक्प्रचार आहे, तोच वापरावा. फार तर 'आता कसली अलीय (आली+आहे) समस्या' म्हणता येईल. 'समस्यांनो दूर व्हा' - चक्क नो-नो.

‡ किटाणांपासून दहापट सुरक्षा
पर्याय सुचला नाही. अर्थ समजल्यासारखाच दिसतो.

‡ थुंकू नका! नाहीतर दंड रु. २००/-
गैर काय आहे हे समजले नाही. गर्भितार्थ (?) समजल्यासारखाच वाटली. पर्यायी वाक्य सुचले नाही.

थुंकल्यास २०० रु. दंड

‡ आता सौंदर्याची भीती कशाला?
आता कुरुप दिसण्याची शंका कशाला ?.. ( अमुक साबण बापरा सुंदर दिसा !) हे बरे वाटते.
पण तरी सुद्धा वरचे वाक्य काहिरातीत असल्याने खपून जाईल. कारण एकाच वाक्यात सौंदर्य-भीति-उपाय असे आल्याने जाहिरात पटकन समजेल.

‡ अडचण साबणात नाही, घासणीत आहे
दोष साबणात नाही, घासणीत आहे.
(प्रश्न तुमच्या साबणाचा नाही, घासणीचा आहे)

‡ हे डोळे काचेसारखे नाजूक, त्यांना साबणाच्या अश्रूंनी का रडवावं?
हे चालून जावे. साबण-मूल-डोळ्यातून पाणी असे मनावर ठसते. म्हणून.

‡ समस्या चल हट
नो प्रॉब्लेम चा जो मराठी प्रति वाक्प्रचार आहे, तोच वापरावा. फार तर 'आता कसली अलीय (आली+आहे) समस्या' म्हणता येईल. 'समस्यांनो दूर व्हा' - चक्क नो-नो.
सहमत .. समस्या ?!! छे! आता नाहिच.. किंवा आता कसली आलीये समस्या.. हे चांगले.

‡ किटाणांपासून दहापट सुरक्षा
किटाणूंपासून संरक्षण हे जास्त बरे वाटले. पण संभ्रमित आहे.

‡ थुंकू नका! नाहीतर दंड रु. २००/-
गैर काय आहे हे समजले नाही. गर्भितार्थ (?) समजल्यासारखाच वाटली. पर्यायी वाक्य सुचले नाही.
थुंकू नका ! थुंकल्यास २०० रु. दंड ! हे मला आवडेल. तर्कशुद्ध वाटेल.
--लिखाळ.

ह्म्म

साबण.
दोष 'साबणाचा' की 'साबणात' ;)?

'दहापट' संरक्षण चालून जावे. दहापटीमागे संख्याशास्त्र असल्याने टाळणे अपेक्षित नसावे. (जंतू/किटाणू?/किटाण दसपटीने कमी वगैरे.)
(किटाणांचा खाली दिलेला दुसरा अर्थ त्याला माहीत/अभिप्रेत नव्हता.णूं/णां फरक लक्षात आला नव्हता.).
अर्थात हलकासा फरक असावा असे वाटते. सुरक्षा (प्रिव्हेन्टिव) ही गरज तर संरक्षण (प्रतिक्रियात्मक) ही प्रक्रिया वाटते. जाणकारांनी खुलासा करावा. (त्याला सुरक्षाचक्र चालते. संरक्षण कवचच असावे असा आग्रह नाही.)

थुंकू नका ! थुंकल्यास २०० रु. दंड !
हे थोडे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यासारखे वाटले. :) थुंकायचे नसेलच तर द्विरुक्ती कशाला? 'थुंकल्यास २०० रु. दंड !' पुरेसे ठरावे. (पण यात धमकी नाही :(, माहिती आहे.)

किटाणांपासून दहापट सुरक्षा

किटाण म्हणजे: बरेच दिवस् दात न घासता निव्वळ चूळ भरणे वगैरे प्रकार केल्यावर दातांच्या फटी आणि हिरडीच्या बाजूला पिवळ्या धमक किंबा कधी कधी तपकिरी रंगाचा दाट थर जमतो. त्याला किटाण असे म्हणतात. म्हणजे आमच्या खेडेगावत तरी म्हणतात. त्यामुळे किटाणांपासून सुरक्षा हा एकदम ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब असलेला वाक्यप्रयोग आहे. लेखिका कदाचित पुण्या-मुंबईकडच्या पांढरपेशी मराठी भाषा ऐकत वाढली असल्याने तिला ग्रामीण शब्द आणि संस्कृती म्हणजे मराठी संस्कृतीचा र्‍हासच वाटायचा.

अवांतरः निव्वळ जोक आहे. लोड घेऊ नका हे सांगणे न-लगे.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

सुरक्षा

येथे विनोद अपेक्षित आहे तो सुरक्षा या शब्दावर.

मराठीकरण करायचे असल्यास 'किटाणांपासून तुमचे रक्षण/संरक्षण' असे व्हावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

किटाणांपासून

किटाण वापरायचे असेल तर ते किटाणापासून/किटणापासून असे हवे. किटाणचे अनेकवचन करता येईल का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

किटाणू

मुळात किटाणू हा शब्दच नवा आहे. आमच्या लहानपणी (म्हातारा झालो ;)) असा शब्द ऐकिवात नव्हता.
कीट + अणू = कीटाणू असा शब्द जीवाणू , विषाणू धर्तीवर रूढ होऊ पाहतोय. पण कीटण किंवा किट्टण हाच शब्द पूर्वीपासून वापरात आहे.

जिवाणू/विषाणू

जिवाणू (बॅक्टेरिया) / विषाणू (व्हायरस) आठवते. किटाणू हिंदी असावेत.

भारी पडेल

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3701272.cms ही बातमी पाहा.

भारी पडेल स्कूटरची रपेट याचा अर्थ काय?
ग. स्कूटरची रपेट करताना खूप भारी वाटेल
म. स्कूटरची रपेट करताना खूप महाग पडेल
भ. स्कूटरची रपेट करताना खूप जड जाईल
न. डोक्यावर भारा घेऊन स्कूटरवर बसलात तर तो खाली पडेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हा हा हा

खो खो खो.

आपला,
(हहपोदु)आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

घाण्यात हवे काय?

चुना कशात मळतात?

आपला
(लोणारी) आजानुकर्ण

Btw, चुना मळणाऱ्या लोकांना लोणारी म्हणण्याची प्रथा मला बिरबलाच्या गोष्टीवरून सुरू झाली असे वाटते.

आपला,
(अतिचुन्याने तोंड भाजलेला) अकबर आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

घाणा आणि घाणी

घाणा छोटा असतो. घाणी मोठी. घाणा म्हाणजे एका वेळेस तळण्यासाठी वगैरे, कढईत टाकायच्या वस्तूचे मोजमाप. घाणी = चुना मळवण्यासाठी(चुना-पाणी यांचे चांगले मिश्रण करण्यासाठी) केलेली खास चाकोरी. हिच्यामधून दगडाचे चाक बैलाच्या मदतीने फिरवले जाई आणि घाणीत मळलेला स्वच्छ चुना तयार होई.

बापरे!

स्कूटरच्या रपेटीचे स्कूटर बघून घेईल. आपल्याला काहीच भारी पडणार नाही. ;-)
खाली बातमीत मात्र स्कूटरवरून रपेट असे बरोबर लिहले आहे.
आजवर मटाच्या असल्या गोंधळाबद्दल फक्त ऐकले होते. आज बरीच उदाहरणं पाहिली. मटाला काही धरबंद (मटाच्या भाषेत घरबंद) राहिलेला नाही. इथे कुणीही बातमी देऊ शकते काय?

===========

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

रेल्वेच्या उटपटांग नियमामुळे 'मराठी' सायडिंगला

रेल्वेच्या उटपटांग नियमामुळे 'मराठी' सायडिंगला

याचा अर्थ कोणी सांगेल का? (दुवा)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सायडिंग

सायडिंग चा हा अर्थ असेल तर उपयोग फारसा चुकीचा नसावा.

उटपटांग

हो सायडिंगचा अर्थ माहीत आहे. पण उटपटांग हा काय प्रकार आहे.

आपला,
(ओरांग उटान) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ओरांग उटान

प्रतिसादात उटपटांग बघून ओरांग उटान असेच लिहायला आले होते पण इथे ओरांग उटान आधीच हजर दिसले. ;-)

पण खरंच,

उटपटांग (हिंदी) = उफराटे (मराठी ) काय?

ऊटपटांग..

ऊटपटांग(हिंदी) म्हणजे उलटसुलट, विसंगत; असंबद्ध; निरर्थक; व्यर्थ; बेडौल(उंटाच्या अंगासारखे), वेडावाकडा.
तसेच आणखी शब्द: ऊटकनाटक=व्यर्थ उलाढाल. ऊआबाई=व्यर्थ, निरर्थक; शेंडा ना बुडखा असा.

दे धक्का!!!

'धक्क्याला लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ माहीत नसला की असा धक्का दिला जातो

आपला,
(धक्कादायक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रिस्पॉन्सेस

रिस्पॉन्सेस फिफ्टीच्या वर गेल्याने प्लीज सेकंड थ्रेड स्टार्ट करावा. :)

खाली

काही हरकत नसावी. तशीही बरीच जागा खाली आहे.

आपला
(वरचढ) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

किटाणांपासून?

किटाण चे अनेकवचन किटाणे होत असेल तरच किटाणांपासून चालेल. दहापट सुरक्षा, याला काहीच अर्थ नाही. सुरक्षा अशी पटीत मोजता येते? (इतर मंजनांपेक्षा) किटाणाला दसपटीने प्रतिबंध करणारे. असे चालेल.
>>म्हणजे आमच्या खेडेगावत तरी म्हणतात. त्यामुळे किटाणांपासून सुरक्षा हा एकदम ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब असलेला वाक्यप्रयोग आहे.<< खेडेगावात सुरक्षा वगैरे शब्द पोचले हे वाचून धन्यता वाटली. किटाण हा जर ग्रामीण शब्द असेल तर या वस्तूला शहरी भाषेत काय म्हणतात?
इथे दोष साबणाचा नाही, तर घासणीचा आहे.--हे सर्वात योग्य,
--वाचक्‍नवी

खाली

'खाली' वरून आठवले - आमच्या ओळखीच्या एका काकांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी कार्यालयाचा वरचा मजला घेतला होता. त्यांच्या मुलाच्या लग्ना आधीआणखी एक लग्न त्याच मजल्यावर लागणार होते. तेव्हा आधीच्या लग्नाची मंडळी जाऊन आता तो मजला रिकामा झाला का हे व्यवस्थापकांना हिंदीतून विचारताना हे काका फोनवर म्हणाले "आपका उपर का हॉल नीचे हो गया क्या?"

वरचा मजला

त्यापेक्षा सरळ मराठीत, 'तुमचा वरचा मजला रिकामा आहे का?' असे विचारायचे ना ;) ह.घ्या!

कोल्हापूरची मराठी

खास कोल्हापूरच्या मराठीचा हा एक नमुना.

----

शामील

निवेदकाचं मराठी कोन्च व्हं?

आम्हाला आम्ही सांगितलं रांगडा गडी...

घोडदौड चालू आहे त्यात शामील झालेले आहात तुम्ही.

हम्म

ते मराठी मालिकांचे मराठी निवेदक आहेत. त्यांचे मराठी कुठलेही असू शकते. ;)

----

निवेदकाची मातृभाषा

निवेदकाची मातृभाषा गुजराथी आहे. मराठी मात्र 'टिपिकल' वाहिन्यांच्या पठडीतले आहे.

जितेंद्र जोशी

निवेदक श्री. जितेंद्र जोशी 'कोंबडी पळाली' ह्या गाण्याचे गीतकार आहेत असे ऐकले आहे. मात्र त्यांची मातृभाषा गुजराती आहे हे माहीत नव्हते. जितेंद्र जोशी आणि खाली दाखवलेले मनोज जोशी हे नातेवाईक आहेत का. चेहरेपट्टीत बरेच सारखेपणा आहे.

मनोज जोशी

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुधारित आवृत्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
असाच आणखी एक जुना शब्दखेळ... या शीर्षकाखाली श्री.टग्या यांनी एक कोडे दिले आहे.त्या कोड्याचा एक पाठभेद खालील प्रमाणे.(श्री.टग्या यांनी दिलेल्या उत्तराशी मात्र मी सहमत नाही.)

  • आमच्याकडे वीस भट जेवायला आले.
  • बावीस गेले.
  • तेवीस परत आले.
  • चौतीस जेवले.

याचे काही सुसंगत स्पष्टीकरण आपण देऊ शकाल काय? भटांची संख्या नेमकी किती?
(चौत्या वा़क्यातील पहिल्या शब्दाचा फार कीस काढू नये.)

चौथ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चौत म्हणजे चतुर्थी हा श्री.टग्या यांनी लावलेला अर्थ अगदी बरोबर आहे.कोकणात 'गणेश चतुर्थीचा' सण फार महत्त्वाचा मानला जातो.
चतुर्थी-->चवथ-->चवत-->चौत . याप्रमाणे हा अशुद्ध शब्द झाला असावा.

एका बातमीचे शीर्षक

चाईल्ड ऍडॉप्शनचा 'टॅबू' कमी होतोय
पाच पैकी तीन महत्वाचे शब्द इंग्रजी !
मटा खूप एंटरटेनिंग न्यूज पेपर आहे. कस्मोपॉलिटन रीडर्ससाठी आहे बहुधा.
-- लिखाळ.

मटाने नाव बदलावे

मटा खूप एंटरटेनिंग न्यूज पेपर आहे. कस्मोपॉलिटन रीडर्ससाठी आहे बहुधा.

हो हो! खरं म्हणजे ते नावात महाराष्ट्र वगैरे काय वापरतात कळत नाही. ग्रेटनेशन वापरावे.

विशेषनामांचे भाषांतर...

इंग्रजी काय आहे? विशेषनाम की सामान्यनाम?

आपला,
(पाणिनी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

भटांची संख्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
याचे उत्तर एकच भट असे आहे. कोकणात (त्याकाळी तरी) जेवणाला एका वेळी वीस पंचवीस भट कोणी बोलावले असतील याची शक्यता नाही.
कोड्याचे स्पष्टीकरण असे:
..कोकणात आमच्या गावी एक विश्वंभर भट होते. त्यांना सगळेजण वीस भट म्हणत. जसे: नारायण भट=नारभट, सदाशिव भट =सद्भट,
केशव भट=केसभट.
..
*आमच्याकडे वीस भट जेवायला आले.-->आमच्या घरी विश्वंभर भट जेवायला आले.
*बावीस गेले....> ते (स्नानासाठी) विहिरीकडे गेले.(बाव=विहीर. हा शब्द वापी या संस्कृत शब्दावरून आला आहे.बावडी शब्द परिचित असावा.)
*तेवीस परत आले.....> ते विश्वंभर भट (आंघोळ करून ) परत आले.
*चौतीस जेवले. ....> ( गणेश) चतुर्थीच्या दिवशी ( आमच्या कडे) जेवले.

विस

कदाचित विश्वंभर भटांच्या पिताश्रींचे नांव सदाशिव असावे. म्हणजे वि.स. भट असे.

आपला,
पु.ल. आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर