अभिनंदन ओबामा

अखेर ज्याची वाट पहात होतो ते झाले. ओबामा अध्यक्ष झाले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर चेंज हॅज कम टू अमेरिका! पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ही खरोखरीचे बदलाची सुरूवात म्हणायला हवी. अभिनंदन!

लेखनविषय: दुवे:

Comments

वर्ण आणि भेद

अभिनंदन. मला स्वतःला आनंद झाला कारण एक तरुण (राजकारनार ४७ हे वय तरुणच म्हणायला हवे.) कोणतीही कौटुंबिक राजकिय पार्श्वभुमी नसताना, कळीचे मुद्दे घेउन कळकळीने लढला, जिंकला आणि ज्यासाठी लढला ते सर्वांना कळले. तरी सुद्धा पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ही ओळख नक्कीच खटकते. बदलाची सुरुवात असे म्हणताना असे न म्हणता आपल्या पासुनच बदलाची सुरुवात करायला हवी.
जगातल्या महासत्तेत एक विवेकी तरुण अध्यक्षपद भुषवतो आहे ने नक्कीच आनंददायक आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या बदलाचे वारे कधी वाहणार? की आम्ही सुद्धा तरुण नेता मान्य करणार पण तो एका घराण्याचा म्हणून. बदल होईल पण वयाचा फक्त. देशाची सुत्रे चालवायचे विचार तेच शेकडो वर्ष जुने असणार? असो, हे बदलाचे वारे जगात शांतता आणण्यास एक प्रतिक ठरावेत असे वाटते. राजकारण हे समाजकारणासाठी करावे आणि त्यात तरुणांनी हिरिरीने सहभागी व्हावे हा संदेश ओबामा नक्कीच देतात असे वाटते.
समाजाचे भले करण्यासाठी वर्ण आणि भेदभाव मुळापासून उखडावा लागतो याचे जीवंत उदाहरण म्हणायला काही हरकर नाही.





ही ओळख नव्हे

इथे 'पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष' हे शब्द वापरताना अमेरिकेच्या इतिसात जे पहिल्यांदा घडते आहे त्याची नोंद घेतली आहे. वर्णभेद जाण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल आहे. खुद्द ओबामांनीही त्यांच्या भाषणात एका वयोवृद्ध कृष्णवर्णीय महिलेचा उल्लेख केला. तिने तिच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे पाहिली, मार्टीन ल्युथर किंग यांचा लढा पाहिला. तिच्यासाठी आज नक्कीच एक अविस्मरणीय दिवस असेल. पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ही ओबामांची संपूर्ण ओळख नक्कीच नाही/नसावी.मला वाटते जो बदल झाला आहे त्याची जाणतेपणाने नोंद घेणे हे योग्य आहे. तरीही यामध्ये काही खटकले असल्यास क्षमस्व.

----

खटकले नाही

अजिबात खटकले नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की काही मुद्दे सोडायचे असतील तर सोडून द्यावे. उल्लेख करुन ते न सोडल्याची जाणीव जास्त होते. आपल्या येथे दलितांचे नेते वगैरे म्हटले की समाजाच्या एका समुहाला वेगळे उल्लेखल्याचा भाव त्यात येतो. म्हणून म्हटले की काही गोष्टी जाणून बुजून सोडल्या तरच त्या सोडल्या जातील आणि सुरुवात आपल्या पासून हवी. बदल आपल्या पासून हवा. बाकी गैरसमज नसावा.





सहमत

तुम्हाला काय म्हणायचे होते ते समजले. या बाबतीत सहमत आहे. गैरसमज नसावा.

----

सहमत आहे.

तुम्हा दोघात गैरसमज नसावा असेच मलाही वाटते. ;-)
सगळेच गैरसमज असे मिटू लागले तर किती बरे होईल बरे?
असो. ओबामांना शुभेच्छा! व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे स्वागत. सामान लावण्यासाठी पण शुभेच्छा! :-)
आणि ह्या माणसाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!. (चित्र जालावरून साभार)

-सौरभदा

==================

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

हा माणूस

या माणसाला खरे तर इंपिच (प्रतिशब्द नसावा) करायला हवे पण ते होणे नाही. त्यामुळे तो जातो आहे एवढ्यात समाधान मानू या.

----

झाले

- इफ इट वॉज़ बॅड, इट विल बी बॅक.

बुश दुसर्‍यांदा निवडून आले तेव्हा हे झालेच. :)

----

प्रतिशब्द

इंपिच (प्रतिशब्द नसावा)

इंपिंच ला मराठीत मला वाटते "महाभियोग" खटला असे म्हणले जाते. साध्या भाषेत हाकलून देणे:-)

जेंव्हा राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे स्वतंत्र बुद्धीने वागायला लागले तेंव्हा तीन चतुर्थांश बहुमत असलेले राजीव गांधी त्यांच्या विरुद्ध "महभियोग खटला" चालवून काढण्याचा प्रयत्न करणार होते. त्याची (राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करण्याची) पद्धत पण अमेरिकेतील इंपिंचमेंट प्रोसिजरसारखी क्लिष्ठ आहे.

नेमके कशाची वाट पहात होता?

अखेर ज्याची वाट पहात होतो ते झाले. ओबामा अध्यक्ष झाले

ओबामा अध्यक्ष होण्याची की अमेरिकेची निवडणूक होण्याची?

पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष, पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिले दलित मुख्यमंत्री/न्यायाधीश.वगैरे विशेषणांचा वैताग येतो. काय् गरज असते कुणास ठाऊक. कदाचित त्या समाजाच्या लोकांना ते सुखावह वाटत असते किंवा त्यांच्यात नसलेल्या लोकांना ते खुपत असते. पहिला असलास तरी दलित आहेस, कृष्णवर्णीय आहेस हे विसरू नकोस हे दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या अर्थाने सांगण्याचा प्रयत्न होतो. अशा फायदेलाटू आणि कुजक्या मनोवृत्तीचा निषेध असो.

अवांतरः राजेंद्र दुसरा परिच्छेद तुम्हाला उद्देशून वगैरे लिहिलेला नाही. पहिला आहे. :-)

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा सध्या पुणे.

दोन्हींची

ओबामा अध्यक्ष होण्याची की अमेरिकेची निवडणूक होण्याची?
दोन्हींची. कारण दोन्हींमुळे बुश जाईल हे निश्चित.

अवांतरः राजेंद्र दुसरा परिच्छेद तुम्हाला उद्देशून वगैरे लिहिलेला नाही.

ठीक आहे.

----

पेलिन

(मुख्य म्हणजे) पेलिन येणार नाही,

पेलिनला बघितल्यावर तुलनेत बुश सूज्ञ वाटत होता. :)
आणि तिच्या कपड्यांसाठी इतका खर्च???

----

सहमत

पेलिनला बघितल्यावर तुलनेत बुश सूज्ञ वाटत होता. :)

सहमत.

महिला टेनीसच्या सामन्यांत गर्दी खेळ बघायला होते असा अनेकांचा गैरसमज असतो.

अगदी...

पेलिन येणार नाही

बिल मार त्याच्या कार्यक्रमात म्हणाला होता, "पेलिन मेक्स जॉर्ज बुश लुक लाइक् ए प्रोफेसर!"

सुरुवात मस्त!

Palin: This is Sarah. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

Avengers: Ah, yeah, Gov. Palin.

Palin: Hello. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

Avengers: Just hold on for President Sarkozy, one moment.

Palin: Oh, it's not him yet, they're saying. I always do that.

हाहाहा! सुरुवात मस्त आहे. :-) पण पूर्ण संभाषण वाचता बाई इतक्या मूर्ख आहेत का म्हणायला जागा वाटते. (विशेषतः कार्ला ब्रूनीचे संदर्भ... की राजकारणी एकमेकांशी अशाच विषयांवर गप्पा हाणतात? ;-))

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हद्द झाली

Avengers: Gov. Palin, I love the documentary they made on your life. You know Hustler's Nailin' Paylin?

हे देखिल त्या मूर्ख बाईला कळू नये???

कॅनडातले हे रेडियोवाले बर्‍याच प्रसिद्ध लोकांना असले प्रँक कॉल्स करतात म्हणे, त्यांचे ट्रान्सक्रिप्ट आधीपासुन तयार असते. बहुतेक वेळा पहिल्या २-३ प्रश्नानंतर लोक ह्यांना पकडतात
पण ह्यावेळेला त्यांचे ट्रन्स्क्रिप्ट संपले तरी पेलिन बाईंना जाग आली नाही. शेवटी मनातील वाक्ये घुसडल्यावरही बाई थांबायचं नाव घेइनात म्हंटल्यावर थकुन रेडियोवाल्यांनी उलगडा केला.

:)

पण ह्यावेळेला त्यांचे ट्रन्स्क्रिप्ट संपले तरी पेलिन बाईंना जाग आली नाही. शेवटी मनातील वाक्ये घुसडल्यावरही बाई थांबायचं नाव घेइनात म्हंटल्यावर थकुन रेडियोवाल्यांनी उलगडा केला.

म्हणजे पालिनम्याडमनी त्यांचा सप्तरंगी पोपट केला म्हणायचा :)

----

मॅट डीमन

आणि एक दिवस त्यांना फोन येतो. "हलो, मी अहमदिनेजाद बोलतोय. काही नाही, तुमच्या देशात एकदोन फटाके फोडीन म्हणतो." बाईंना खरंच वाटतं. काय होईल? कल्पना करवत नाही!

पालिनम्याडमच्या बाबतीत मॅट डीमन हेच म्हणाला होता. मॅकेन ७५, म्हणजे ही बाई कधीही अध्यक्ष होऊ शकते आणि मग तिच्या हातात न्युक्लिअर बाँबचे
बटण! वी कॅनॉट बी सो क्लोज टू डिझास्टर!

----

उत्तम

हे ऐकलेत/वाचलेत की नाही?

हे ऐकले नव्हते. फुल्टू धमाल दिसते. :ड्

----

सहमत

पण जिद्द असेल तर त्याच्या नाकावर टिच्चून वर येणे, प्रगती करणे शक्य आहे हा संदेश महत्त्वाचा.

खरंय. आजच्या टाईम्स ऑफ् इंडियात मार्टीन ल्युथर किंग यांचे एक वाक्य आहे. एक दिवस् असा येईल की माझी मुले (कृष्णवर्णीय) या देशात त्यांच्या रंगावरून नाही तर त्यांच्या क्षमतेवरून ओळखली जातील.

संदेश चांगला गेला आहे.

अवांतरःकाही कुजकट लोकांकडून ओबामांचे पूर्ण नाव मुद्दाम छापले गेले हेही ऐकले.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

हा लेख वाचावा

ओबामांचे अभिनंदन!

हा लेख महत्त्वाचा वाटला. मूळ लेखाचा उल्लेख असता तर तो वाचता आला असता.

अवांतरः रेशियल प्रोफायलिंगसाठी अनुवादकाराला साधा मराठी शब्द सुचू नये याचे नवल वाटले. म.टा.मध्ये आढळणार्‍या शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल न बोललेले बरे!

वंशवादाविषयी भाषण

हा घ्या दुवा मूळ चर्चेचा आणि हा अनुवादाचा.

अवांतरः स्वतःची वाटचाल शोधता येऊ नये का काय?

माझी यादी

ओबामा यांची प्रतिमा करिष्मा असणारी एक विवेकी व्यक्ती अशी आहे. बुश २००० साली आले होते तेव्हाही त्यांची प्रतिमा संभाषणचातुर्य नसणारा एक उजव्या विचारसरणीचा नेता अशी होती. काल रात्रीचे ओबामांचे भाषण परिणामकारक होते. त्यातील भावनात्मक भाग जरी वगळला तरी , एकंदर त्यांच्या नूर आणि आविर्भावावरून अशी आशा वाटली की, या माणसाच्या हाताखाली गोष्टी बदलतील. अर्थात, असे म्हणतात की तुम्ही अगदी रसातळाला पोचलात की तिथून केवळ एकच दिशा शक्य असते : वर.

असो. ओबामा यांच्या सरकारला अनेक प्रश्नांना तोंड द्यायचे आहे. ते सगळेच प्रश्न समाधानकारक रीत्या सोडवतील आणि चार वर्षात सर्वकाही बदलू शकतील असे मानणे चुकीचे होईल. म्हणजे काही गोष्टीना अग्रस्थान देणे आले. तर त्यानुसार माझी यादी :

१. इराक. चार वर्षात अमेरिकन सैन्य तिथून बाहेर काढावे अशी आशा करायला हरकत नाही. युद्ध संपवावे. तो पैसा अमेरिकेच्या सीमा सुरक्षित करायला (डीएच् एस्) आणि इतर विकासकामांना द्यावा.
२. ऊर्जेचा प्रश्न : पुनरुज्जीवन करण्यायोग्य ऊर्जेचे स्त्रोत शोधण्याकरता आपले सगळे लक्ष तिथे एकवटावे. बुश साहेबानी या बाबतीत शून्य काम केले. अमेरिकेला लागलेले शोध उद्या सर्व जगाला उपयोगी पडतील.

बाकी इतर अनेक गोष्टी अर्थातच आहेत : अर्थव्यवस्था, करविषयक धोरणे. त्यांनी एफ्डी रूझवेल्ट प्रमाणे पुनर्बांधणी करावी किंवा काय , वगैरे गोष्टी. यात मला कळणारे फार कमी आहे. मते देता येतील पण त्याला फार अर्थ असणार नाही.

जाणकारांनी आपली मते नोंदवावीत.

सहमत

१. इराक. चार वर्षात अमेरिकन सैन्य तिथून बाहेर काढावे अशी आशा करायला हरकत नाही. युद्ध संपवावे. तो पैसा अमेरिकेच्या सीमा सुरक्षित करायला (डीएच् एस्) आणि इतर विकासकामांना द्यावा.

हा महत्वाचा मुद्दा वाटतो. विनाकारण मनुष्यहानी लवकरात लवकर थांबवावी.

----

आयटी ला ग्रहन लागणार हे खरे का ?

आयटीवाले जरा बिचकले आहेत, ओबामांच्या आगमनामुळे आयटी ला ग्रहन लागणार हे खरे का ?

वाटते तरी खरे

पण अमेरिकेलाच ग्रहण लागण्यापेक्षा ते बरे.

आपला
(ग्रहणमुक्त) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अभिनंदन

ओबामा अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचे हे (दुवा) भाषण ऐतिहासिक ठरावे - कमीतकमी जॉन एफ. केनडी यांच्या "कॅथोलिक" भाषणाइतके, किंवा त्याहून अधिक...

अभिनंदन ओबामा..

जॉन मकेन ह्यांनी आपल्या बंडखोर (मॅव्हरिक) प्रतिमेला तडा देउन, मतांसाठी पेलिनला निवडले, बुशला खूश ठेवले आणि कट्टर ख्रिश्चन धर्मियांना जवळ केले. ज्यामुळे त्यांची अवस्था धोबीका कुत्ता, ना घरका ना घाटका अशी झाल्याने अमेरिकेच्या कानाकोपर्‍यातुन पराभवास सामोरे जावे लागले!

अभिनंदन ओबामा.

ओबामाच्या विजयाच्या निमित्ताने आमच्या शेजारी कोण राहत आहे हे प्रथमच कळले व १ चॉकलेट खायला मिळाले.

ओबामा झिंदाबाद

आपला,
बराक हुसेन आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हा हा

गजकर्ण हारले आणि आजानुकर्ण जिंकले का? ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गोर्‍या अमेरिकनांची नैतिक जीत

अभिनंदन ओबामा.

ओबामाची जीत ही आफ्रिकन अमेरिकनांपेक्षा गोर्‍या अमेरिकनांची नैतिक जीत असेल अशा आशयाचे टोनी मॉरिसन हिचे काही दिवसांपूर्वी बीबीसीच्या न्यूजनाइट कार्यक्रमात ऐकलेले वाक्य इथे नमूद करावेसे वाटते.

ओबामा अभिनंदन !!!

भारतावर कोणतेही संकटे आणू नको, बाजूने राहता नाही आले तरी चालेल. विरोधात जाऊ नको, म्हणजे झालं !!!
अमेरिकेत काय बदल करायचे ते कर ! अर्थात सरकार बदलले म्हणजे व्यवस्था बदलत नसते, देखेंगे आगे आगे होता क्या ?

-दिलीप बिरुटे

काही निरीक्षणे

ओबामा अध्यक्ष झाल्याचा मला देखील खूप आनंद झाला. अमेरिकेत रहातो म्हणून आणि तसेच जगाचा नागरिक म्हणून देखील. कारण विचार करा बूश जर राष्ट्राध्यक्ष झाला नसता तर संपूर्ण जग किती वेगळे झाले असते! ("इट्स वंडरफूल लाईफ", चित्रपटाची उलटी गोष्ट यावरून तयार करता येईल!)... असो. आता काही निरीक्षणे:

  • काल नेहमी प्रमाणे निवडणूकांचे निकाल ऐकायला/पहायला बसलो. बॉस्टनच्या रात्री आठ वाजता सर्वप्रथम मॅकेनला केंटकी मिळाले नंतर मात्र ओबामा शेवट पर्यंत पुढे राहीले.
  • बॉस्टनच्या साडेदहाच्या सुमारास २०५ ते १३० का असा काही आकडा होता. बॉस्टनच्या अकरावाजता वेस्टकोस्टचे मतदान संपल्यावर अजून लिड वाढेल असे वाटले आणि बरोब्बर अकरावाजता (इतक्या लवकर म्हणून) अनपेक्षित वाटेल असे सीएनएन वर जाहीर केले: "ओबामा इलेक्टेड प्रेसिडंट!" आणि सर्वत्रच तसे त्याचवेळेस जाहीर झाले...
  • एकदम सर्वातील थ्रील गेल्या सारखे वाटले :-)! कारण २००० ची बूश-गोर आणि २००४ ची बूश्-केरी निवडणूक आठवली! असे ऐकून होतो की दोन्ही कडचे वकील गेले काही दिवस/महीने वाद-प्रतिवादाचा सराव करत होते! बिचार्‍यांचा धंदा बुडाला :-(
  • फॉक्स न्यूजवर नंतर कार्ल रोव्हची मुलाखत पाहीली. (कार्ल रोव्हला बुशच्या दोन्हीवेळेस जिंकण्याचा प्रमुख समजले जाते, तसेच इराक युद्ध, आणि इतर अनेक धोरणांसंदर्भात तो बोलविता धनी होता). त्यात त्याला त्याच्या मैत्रीपूर्ण (फॉक्स हे रीपब्लीकन्सच्या बाजूचे चॅनल आहे) भाषेत प्रश्न विचारले जात होते त्यात तो उलट सुलट बोलू शकला असता. पण त्याने स्पष्ट सांगितले की फक्त काळ्यांनी मते दिली असे नाही. नवीन पिढी वंशवादाला मागे टाकूनपुढे गेली आहे. जुनी पिढी ज्या दशकातील आहे त्याप्रमाणे थोडेफार त्यांच्या आठवणी त्यांचे निर्णय घेण्यात प्रभावी ठरू शकल्या असत्या. त्याने ओबामाच्या कँपेनचे कौतूक केले.
  • कालचे ओबामाचे भाषण जितके प्रभावी होते तसेच मला मॅकेनचे भाषण देखील आवडले. पराभव पचवणे यश पचवण्यापेक्षा सोपे असते असे जरी म्हणले तरी ती जेंव्हा वेळ येते तेंव्हा जो संयम दाखवायचा असतो तो मॅकेनने चांगलाच दाखवला असे वाटते.
  • आज सकाळी "राईटविंग टॉक रेडीओ" बॉस्टन मधील ९६.९ एफ एम वर मायकेल ग्रॅहॅमचे वर्तन ऐकत होतो (सुदैवाने पहावे लागत नव्हते!). जणू काही कम्युनिझम आला अशी रडारड करत आक्रस्ताळेपणा चालला होता.
  • वास्तवीक मला एकाच हातात सत्ताकेंद्रीत होणे योग्य वाटत नाही. पण या वेळेस फिलबर्स्टरप्रूफ बहुमत न मिळता पण रीपब्लीकन्सना धडा मिळावा असे मनापासून वाटत होते. त्यामुळे केवळ राष्ट्राध्यक्षच नाही तर हाऊस आणि सिनेटपण डेमोक्रॅट्सने मिळवले याचा आनंद झाला. अर्थात मला खात्री आहे की ही नशा काही काळातच डेमोक्रॅट्सच्या डोक्यात जाणार आहे आणि मग "पुनरपी जननम् पुनरपी मरणम्"चा खेळ पुढच्या दोन वर्षात होऊ शकेल (सिनेट, काँग्रेसचे बहुमत दर दोन वर्षांनी होणार्‍या निवडनूकातबदलू शकते).

बाकी ओबामा कृष्णवर्णीय आहे याचे महत्व आहे का?

माझ्या लेखी खूप आहे. आपल्याकडे भारतात मते देताना आणि त्यासाठी उमेदवार ठरवताना जातीचा विचार केला जातो (मला ते देखील योग्य वाटत नाही...) पण एकदा के ती व्यक्ती सत्तास्थनावर पोचली की मात्र कधी त्या बद्दल आवाज (जात/लिंग संदर्भात) केला जात नाही. मग ती महीला पंतप्रधान असोत, अल्पसंख्य पंतप्रधान असोत, दलीत राष्ट्रपती असोत अथवा महीला राष्ट्रपती असोत, अथवा सोनीया गांधींसारखी रीमोट हातात ठेवलेली महीला असोत (त्यांना देखील विरोध आहे तो परदेशीनगरीकत्वाच्या मुद्यावरून, स्त्री म्हणून नाही).

मात्र अमेरिकेत अजूनही कुठेतरी वर्णभेदाची, वंशभेदाची, लिंगभेदाची दरी आहे. मला सुदैवाने तशी दरी मनातपण नसलेले जास्त भेटलेत पण तरी मनात दरी असलेले पण अनुभवले आहेत.... आज एका अर्थी केवळ अमुक वर्णाचा/वंशाची व्यक्तीच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते या विचाराला तिलांजली मिळाली. समाजातील मानसीकता बदलण्याची ही सुरवात आहे. याची गरज सर्वांनाच आहे.

एका भारतीयाला, मी, तो कुणाला मत देणार म्हणून विचारले तेंव्हा त्याचे उत्तर या संदर्भात समर्पक वाटले: तो म्हणाला की राजकारणी माणसे कमी अधिक फरकाने सारखीच असू शकतात. ओबामा चांगला वाटतो तसा मॅकेन काही बूश कितका वाईट नाही... पण तरी मी ओबामालाच मत देणार कारण त्यातूनच ही वर्ण/वंशभेदाची दोघांच्या मधे असणारी काच कायमची फुटणार आहे. आज ओबामा राष्ट्राध्यक्ष होईल आणि त्यामुळेच जुन्या समजूती बदलतील आणि उद्या आपली मुले पण ह्या देशाचे नेतृत्व करू शकतील.

आज ही भेद ठेवणारी अदृश्य काच फुटली आहे... आश्चर्य वाटून घेऊ नका, जर २०१२ साली ओबामाला एका भारतीयाशी लढत द्यावी लागली तर... अर्थात तो भारतीय वंशाचा कोण हे माहीत असेलच, ज्याने संयमाने मॅकेन बरोबर जायचे टाळले, बुशबरोबरचे संबंध वेळीच आवरते घेतले आणि लुइझियानावर चांगले राज्य करून दाखवून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यात व्यस्त आहे - बॉबी जिंदाल.

प्रश्न

"फिलरबस्टर"प्रूफ असण्याला इतके महत्त्व का ? समजा एखादे विधेयक सेनेटमधे पास होत असेल तर फिलरबस्टरने त्याला फार फार तर तात्पुरती स्थगिती मिळेल , नाही का ? का फिलरबस्टरमुळे चांगले पास झालेले बिल् सुद्धा कचर्‍यात जाते ??

तसेच काही नाही

फिलबस्टरमुळे एखादा सिनेटरचे बोलणे संपल्याशिवाय पुढे जाता येत नाही. वर सर्कीटरावांनी सांगितलेल्या "Mr. Smith Goes to Washington" मधे ह्यासंदर्भात जीम स्टुअर्टचे काम बघण्यासारखे आहे आणि त्यातील नाट्य देखील...

अधुनिक काळात "बोलेणे संपल्याशिवाय" म्हणण्याऐवजी "भाष्य" संपल्याशिवाय म्हणता येईल. म्हणजे सलग अहोरात्र बोलायची गरज लागत नाही. अर्थात त्या संदर्भात सिनेटमधे ६०च्या वर एखाद्याकडे सदस्य असतीक तर ते गप करू शकतात. पण तसे केले तर त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या नावाने लोकशाहीचा गळा घोटला म्हणून रड ऐकायला येऊ शकते. म्हणूनच गेल्या वेळेस मॅकेनसकट ७ सिनेटर्सनी डेमोक्रॅट्सना विश्वास दिला होता की जर एखाद्या महत्वाच्या मुद्यावर फिलबस्टर आणले तर आम्ही पार्टीलाईन सोडून तुमच्या पाठीशी उभे राहू. आणि डेमोक्रॅट्स मधील ७ सिनेटर्सनीपण असे मान्य केले की जर कोणी उगाच त्याचा वापर केला तर आम्ही तो हाणून पाडू! आता डेमोक्रॅट्स म्हणतात की "अब हमारी बारी".. :-)

येती आठ वर्षे

म्हणजे येती आठ वर्षे अमेरिकेतल्या समस्त विनोदविरांना जड जाणार म्हणा. बुश,चेनी,पेलिन ह्यांनी त्यांना जितके खाद्य पुरवले आहे त्याच्या तुलनेत ओबामा नगण्य ठरेल अशी अपेक्षा! :-)

नो न्यूज् इज् गुड न्यूज्

कोलबेर, स्टुअर्ट् , बिल् मार् यांना म्याटर मिळण्याची मारामार होवो ! ;-)

धीर धरा...

म्हणजे येती आठ वर्षे अमेरिकेतल्या समस्त विनोदविरांना जड जाणार म्हणा. बुश,चेनी,पेलिन ह्यांनी त्यांना जितके खाद्य पुरवले आहे त्याच्या तुलनेत ओबामा नगण्य ठरेल अशी अपेक्षा! :-)

ओबामा नगण्य ठरेल अशी अगदी खात्री वाटते. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अर्थात कोणी न कोणी त्याच्या कॅबिनेटमधील या सर्व विनोदविरांना खाद्य पुरवेल अशी मला खात्री आहे. आज नाही तरी अजून दोन दिवसात नक्कीच (म्हणजे २० जानेवारी नंतरचे मी म्हणत आहे!). क्लिंटनच्या वेळेस क्लिंटन सोडा पण (त्याच्या भानगडींआधी) त्या आधी जॅकलीन एल्डर्स नावाच्या सर्जन जनरल ने काय धमाल उडवून दिली होती...

सहमत

बुश,चेनी,पेलिन ह्यांनी त्यांना जितके खाद्य पुरवले आहे त्याच्या तुलनेत ओबामा नगण्य ठरेल अशी अपेक्षा! :-)
सहमत आहे. स्टीफन कोलबेरचा हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांचा पंखा झालो. इथे बुश प्रत्यक्ष हजर होता ही दुधात साखर!!! :ड्

----

भाकित

२०१२: ओबामा-बायडन विरुद्ध पेलिन-जिन्दल (रिपब्लिकन हरणार)

पेलन- जिन्दल असे तिकीट असू शकेल का नाही ही शंका वाटते. जिन्दल यांनी मॅकेनबरोबर निवणु़कीत व्हीपी म्हणून उभे राहण्याचा यावेळचा मोह टाळला असावा असे वाटते. पुढच्या वेळी ते एकतर स्वतः राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवारीसाठी उभे राहतील असे वाटते किंवा दुसर्‍या कोणाबरोबर उपाध्यक्षपदी. पण दोन गौरवर्णीय अमेरिकन नसलेल्या व्यक्ती एकाच वेळी राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे राहणे हेही कसे ठरेल असे वाटते. पण ओबामांनी जिंकून हा अडथळा लोकांच्या मनातून दूर केला असावा, त्यामुळे काहीही शक्य आहे! ओबामांचे प्रशासन येत्या चार वर्षात काय घडवून आणाते त्यावरही जिन्दल यांची उमेदवारी अवलंबून आहे. जिन्दल यांचे तरूण वय ल़क्षात घेता अजून आठ वर्षे त्यांना जड नसावीत.

अभिनंदन!

काल ऐतिहासिक महत्त्वाच्या या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मस्त वाटले. गोरे, काळे सर्वच लोक विशेष अपेक्षेने ओबामांकडे पाहत आहेत.
त्या अपेक्षा त्यांना पूर्ण करणे शक्य होऊ दे एवढेच वाटते.

डब्लू

या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रोचक ठरावा. (विशेषतः ऑलिव्हर स्टोन आहे म्हणून)

----

 
^ वर