बराक हुसेन ओबामा चे अमेरिकेतील वंशवादाविषयी भाषण

मित्र मैत्रिणींनो,

काही असे शब्द असतात, की त्यांवर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.

केनेडीचे, नेहरूंचे पहिले महत्वाचे भाषण. ("थिंक नॉट व्हॉट युवर कंट्री कॅन डू फॉर यू, थिंक व्हॉट यू कॅन डू फॉर युवर कंट्री", किंवा "व्हाईल द रेस्ट ऑफ द वर्ल्ड स्लीप्स्..")

मार्टीन ल्युथर किंग चे "आय हॅव अ ड्रीम" हे भाषण..

काल-परवाच असेच एक भाषण अमेरिकेत झाले.. मला प्रत्यक्ष ते भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही, पण आज न्यू यॉर्क टाईम्स वर हे भाषण वाचण्याची संधी मिळाली:

बराक हुसेन ओबामाचे भाषण

आजवर वंशवादाचा मुद्दा प्रत्येक अध्यक्ष पदाच्या उमेदवाराने गादीखाली ढकललेला आहे.. (आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड, उर्फ "ब्लाईंड फूल")

पण ओबामाने धाडस करून हा मुद्दा जाहीरपणे मांडला..

कृपया, आपल्या सहकार्याने ह्या भाषणाचे मराठी भाषांतर होऊ शकेल का ?

एन वाय टी च्या स्थळावर हे भाषण सात पृष्ठांवर विभाजित आहे.. सात सदस्यांनी ही सात पृष्ठे वाटून घ्यावी..

येथे भाषांतर तज्ञ आहेत, त्यांना हे सोपे जाईल, असे वाटते.

कळवा..

आपला आ. सर्किट

भाषांतर महत्वाचे

हे भाषांतरीत झाले तर आम्हाला व्यवस्थित समजणे सोपे जाईल.
प्रकाश घाटपांडे

भारताला तंतोतंत लागू पडणारे

रेव्हरंड राईट यांच्या वंशवादी वक्तव्याचा 'टू ड्राईव्ह होम द पॉईंट' परिणामकारक वापर. बराक ओबामा यांचा वंशवादाला मुळापासून भिडण्याचा स्तुत्य प्रयत्न.
आदर्श आणि स्पष्ट विचार.
अनेक ठळक वाक्ये, भावना हेलावणार्‍या कथा, आत्मकथा यांनी ओतप्रोत. (प्रत्यक्ष पाहिले नसल्याने वक्तृत्वाबद्दल बोलू शकत नाही.)

भाषण आवडले. भारताला तंतोतंत लागू पडणारे.
भाषांतर करण्यायोग्य - सर्किट यांच्याशी सहमत.

प्रत्यक्ष

(प्रत्यक्ष पाहिले नसल्याने वक्तृत्वाबद्दल बोलू शकत नाही.)

प्रत्यक्ष पाहिल्यास भाषण वाटतच नाही, कवितावाचनाचा कार्यक्रम अधिक वाटतो ! :-)

आवाजाचा चढ उतार, वाक्याची फेक, खूपच सुंदर आहे.

ओबामा म्हणजे "वक्ता दशसहस्त्रेषु" आहे.

- सर्किट

--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

वा!

वा! सर्किटराव या दुव्याबद्दल अनेक आभार!
सुंदर भाषण... मी पहिल्या पानाचे भाषांतर सुरु करतो आहे... अर्थात मी तज्ञ नाहि पण भाषण आवडल्याने माझ्यापरिने सुरुवात करतो आहे. (काहि मुद्दे पटले नाहित तरी भाषण आवडले म्हणून हा खाटाटोप)

(प्रभावित) ऋषिकेश

मीदेखील एक पान

(बाकी पाने कोणी सुरू केली असतील म्हणून) पान ५ सुरू करतो.

क्षमस्व!

भाषांतर करणे आपला प्रांत नाही पण प्रयत्न करायला आवडला असता. दुर्दैवाने, काही व्यक्तिगत घडामोडींतून वेळ काढणे अवघड आहे - मताच्या पिंका टाकणे सोपे असते.

परंतु, भाषांतर वाचायला नक्की आवडेल. सध्या मूळ भाषण टप्प्या टप्प्याने वाचते आहे. ;-)

सर्वांना शुभेच्छा!

सध्याचे भाषांतरकर्ते उमेदवार

१. ऋषिकेश
२. चित्रा
३. नंदन
४. मुक्तसुनीत (खाली बघावे)
५. धनंजय
६. (कोणी नाही - किंवा माहीत नाही)
७. (कोणी नाही - किंवा माहीत नाही)

कोलबेर कुठलेही एक पान घेण्यास तयार. सर्किट यांनी एक पान घ्यावे.

मी क्रमांक ४ घेतो.

.....
१. ऋषिकेश
२. चित्रा
३. कोलबेर
४. मुक्तसुनीत
५. धनंजय
६. (कोणी नाही - किंवा माहीत नाही)
७. (कोणी नाही - किंवा माहीत नाही)

मी पान ७

जर कुणी नसेल तर मी पान ७ घेतो.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

नवीन उमेदवार यादी

अन्यत्र केलेली उमेदवारमोजणी :

१. ऋषिकेश
२. चित्रा
३. नंदन
४. मुक्तसुनीत
५. धनंजय
६. (कोणी नाही - किंवा माहीत नाही) ?कोलबेर
७. राजेंद्र

कोलबेर कुठलेही एक पान घेण्यास तयार. तर त्यांनी पान ६ निवडावे.
सर्किट यांनी जुळवाजुळव करावी. (प्रत्येक पानाचा शेवटचा परिच्छेद पुढील पानाच्या पहिल्या परिच्छेदाशी जुळतो का, अशा प्रकारचे संपादन करावे.)

प्रक्रिया

अनुवाद झाला की सर्किटरावांना पाठवायचा किंवा कसे?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

पान एक

पान एकचा अनुवाद तयार आहे. सर्कीट रावांना पाठवायचा किंवा कसे?.. मी सर्कीटराव, धनंजय व चित्रा (भाग२) यांना व्यनी करतो आहे.. पुढे अमेरिकनवासियांनी जुळवाजुळव करावी ;)

-(भारतवासी)ऋषिकेश

धन्यवाद मित्रहो !!

सहज, मुक्तसुनीत आणि ऋषिकेश ह्यांनी अनुवाद पाठवलेला आहे. (पान ७, ४ आणि १ अनुक्रमे.)

धन्यवाद. (आता फक्त ४ पाने उरली आहेत्.)

- सर्किट

--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

पान ५ पाठवले

सर्किट यांना व्यनि ने.

पाठवले

पान दोन पाठवले.. सर्किट यांना व्य. नि. ने

पाठवले

पान ७ सर्किट यांना व्यनि ने पाठवले. नंतर सहजरावांनीही तेच पान केल्याचे वाचले. असो.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

जरा लांबलेले आहे (भाषण म्हणून)

आणि मी या चिमूट-चिमूट शब्दखाऊ (साउंड बाईट) पिढीसाठी म्हणून बोलत नाही.

लिंकन यांचे गेटीजबर्ग भाषण - त्या मानाने लहान होते - केवळ २७२ शब्द. तोही विषय ज्वलंत होता. पण ते अति-ऐतिहासिक सोडा.
मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे "आय हॅव अ ड्रीम" भाषण आदमासे १६६७ शब्दांचे आहे. ते भाषणही वंशभेद/समेट याच विषयावर आहे.

ओबामा यांचे भाषण तब्बल ४८६८ (आदमासे) शब्दांचे आहे. थोडी संपादकीय कात्री (किंवा खूपच) अपेक्षित होती. केवळ लांबीमुळे या भाषणाचा बहुतेक भाग इतिहासात विसरला जाईल असे वाटते.

लिंकन यांनी भाषणाचे जितके सामान्यीकरण करता येईल तितके केले. त्या दिवसास लागू आणि भविष्यात गैरलागू तपशील कसोशीने टाळले. किंग यांच्या भाषणातही वायफळ तात्कालिक (अन्य काळांस गैरलागू असे) तपशील शोधून सापडत नाहीत.

ओबामा यांच्या भाषणात रेव्हरंड जेरेमायाह् राईट यांचा नामोनिर्देश आवश्यक होता, हे मान्य. पण जेराल्डीन फेर्रारो (हिने हल्लीच काही वादग्रस्त विधाने केली होती) हिचा उल्लेख नसता आला तरी चालले असते. शेवटची ऍशलीची कथा ही आजकाल सर्व राजकारण्यांच्या भाषणांत "अमुकतमुकची कथा" म्हणून दिसते. माझी आशा आहे की विसाव्या शतकातील ही भाषण-साहित्यक्षेत्रातील कंटाळवाणी चौकट एकविसाव्या शतकात हळूहळू कालबाह्य होईल.

आता फक्त दोन उरलीत

धनंजय (पान् ५) आणि चित्रा (पान २) ह्यांनी पाठवलेली भाषांतरे मिळालीत.

आता पान क्र ३ आणि ६ उरली आहेत.

धन्यवाद.

- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

पृष्ठ ३

पृष्ठ क्र. ३ चे भाषांतर नंदन ह्यांनी करून पाठवले आहे. धन्यवाद.

त्यांना विलंब झाल्याचे कारण देताना ते म्हणतात, की "जरा गजर्‍यात गुंतलो होतो"..

(जर संदर्भ नसता, तर हे काय भलतेच, असे वाटले असते, पण कळले ;-)

आता पृ. ६ साठी कोलबेरपंतांची वाट पाहणे सुरू आहे.

- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

पृष्ठ सहा

पृष्ठ सहा चे भाषांतर कोलबेर पंतांनी पाठवलेले आहे. धन्यवाद.

आता लवकरच पूर्ण भाषण उपक्रमावर प्रकाशित होईल.

सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

वाट पाहतो

वाट पाहतो आहोत...

आपला
गुंडोपंत

प्रतीक्षेची सीमा

आदरणीय गुंडोपंत,

आपल्या प्रतीक्षेची सीमा झाली आहे.

नुकतेच आम्हीपूर्ण व्याख्यानाचा अनुवाद उपक्रमावर चढवलेला आहे.

- सर्किट

--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

नमस्कार्

वाट बघत आहे,,,,