सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८


सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८
सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८
सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८

Comments

अभिनंदन!

अंक येण्याची चाहूल लागली होतीच. :) पहिल्या नजरेत काही मान्यवरांचे लेखन दिसल्याने उत्सुकता वाढली आहे. सावकाश वाचून काढायला हवा.

दर्जेदार अंक

सुरेशभट.इन चा दिवाळी अंक खरोखर दर्जेदार आणि वाचनीय आहे! एका वेळी आणि एका जागी इतक्या सुंदर गझला वाचायला मिळणे ही रसिकांसाठी पर्वणीच आहे. सर्व संबंधितांचे अभिनंदन!

मस्त आहे दिवाळी अंक!

चित्तरंजन यांची अंकप्रसिद्धीची घोषणा पेपरात वाचली होती. मराठीतले एकूण ऑनलाईन अंक आता पाच झाले. :-)
प्रदीप कुलकर्णींचा लेख छानच झाला आहे. गझला देखील सवडीने वाचायला हव्यात.

-सौरभदा

===============

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

नमस्कार मंडळी... :)

नमस्कार मंडळी,
आज - काही क्षणांपूर्वीच- या संकेतस्थळाचा सदस्य झालो आहे. कृपया, सामावून-संपादून घ्यावे अस्मादिकांना !
... आणि आल्या आल्याच कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाले. (सौरभदांचा प्रतिसाद). बरं वाटलं. [ (कुणाला वाटणार नाही ? :) ]
या संकेतस्थळाचा सदस्य होण्याला निमित्त ठरलं , ते म्हणजे याच संकेतस्थळाचा दिवाळी अंक. सदस्य न होताही वाचता आला असता दिवाळी अंक...पण त्यात मजा नाही ! घर पाहायचं , न्याहाळायचं , वस्तू हाताळायच्या [(हां..हां..इथपर्यंतच !!! उचलेगिरी अजिबात करणार नाही...तसा विचारही आणू नका मनात कुणी !) ]तर घरात शिरायलाच हवं ! नुसतं खिडकीतून पाहून उपयोगाचं नाही...

आमचे सन्मित्र श्री. शशांक जोशी यांनीही सदस्य होण्याचं निमंत्रण कधीपासूनचं देऊन ठेवलं होतं...पण मीच आज-उद्या, आज-उद्या करत होतो...कारण माझ्यासारख्या कवड्याला कविता लिहायला [(कोण म्हटलं ते...भाव मारायला :) ] इथे काही वावच नव्हता, नाही... !...पण म्हटलं, काही हरकत नाही. अनेक विद्वानांचे, प्रकांडपंडितांचे, ज्ञानी मंडळींचे माहितीपूर्ण लेख वाचता येतील, त्यावर प्रतिसाद देता येतील, (झालंच तर, अस्मादिकांनाही कधी कधी स्वतःचा उजेड पाडता येईल !) ...परिणामी, आता मी हा तुमच्यापुढे उभा आहे...!!! [ (पण...कवितेवर एवढा राग का बरं आहे उपक्रमकारांचा ? नाही, घाबरू नका...! मी आपलं सहजच विचारलंय हां... :) ]
असो, मंडळी....नमनालाच घडाभर नको ! आत्ता थांबतो...पण भेटू या, भेटत राहू या वरचे वर....नमस्कार !

 
^ वर