ब्रज भाषा

माझे मित्र व इतिहास संशोधक श्री. परचुरे ह्यांना कवि भूषण विरचित खालील शिवस्तुतीचा अर्थ हवा आहे. कृपया एकतर त्याचा अर्थ सांगावा अथवा जालावर ब्रज शब्दकोश कुठे मिळेल ते सांगावे.

दिल्लिय दलन दबाय करि सिय सरजा निरसंक।
लूटि लियो सूरति सहर बंक्कक्करि अति डंक।
बंक्कक्करि अति डंक्कक्करि अससंकक्कुलि खल
सोचच्चकित भरोचच्चलिय विमोचच्चखजल
तठ्ठठ्ठै मन कठ्ठठ्ठिकसोई रठ्ठठ्ठिल्लिय
सद्दद्दसदिसि भद्दद्दबिभयि रद्दद्दिल्लिय ॥

आगाऊ धन्यवाद,

आपला नम्र,

ऋजु

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रयत्न.

दिल्लिय दलन दबाय करि सिय सरजा निरसंक।

दिल्लीपती ने दाबुन ठेवण्याचा प्रयत्न केला.

लूटि लियो सूरति सहर बंक्कक्करि अति डंक।

तरीही सुरत शहर डंका वाजवत लुटले

बंक्कक्करि अति डंक्कक्करि अससंकक्कुलि खल

दुष्टांचे निर्दालन त्याने वाजत गाजत केले.

सोचच्चकित भरोचच्चलिय विमोचच्चखजल
त्याच्या वेगाने आश्चर्य आणि खजिल झाला

तठ्ठठ्ठै मन कठ्ठठ्ठिकसोई रठ्ठठ्ठिल्लिय

येथे अडलो आहे. ( इतके ठ् ठ् पहिल्यांदा पाहत आहे).

सद्दद्दसदिसि भद्दद्दबिभयि रद्दद्दिल्लिय ॥

येथे प्रयत्न सोडावा लागला.

धन्यवाद, द्वारकानाथजी

आपल्या उत्तराबद्दल.

तसेच आपल्यापैकी कोणाला ब्रज शब्दकोश मिळाला / कुठे मिळू शकेल माहित असले तर कृपया hsparchure@gmail.com वर संपर्क साधा.

तसे त्याला मी ५-६ मराठी जालस्थळांवर यायला सांगितले आहे. उपक्रमवर येईल सुद्धा.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

अनेक संस्थळे

ब्रजभाषेसंबंधी अनेक संस्थळे महाजालावर आहेत्, त्यातील काहींवर ब्रज शब्दावल्या आहेत. त्यातील एक येथे आहे. अगोदर विषयवार शब्दसूची, नंतर ब्रजभाषेचे व्याकरण, वाक्यरचना आणि ४७८ पानानंतर दोनखंडी शब्दकोश आहे. --वाचक्‍नवी

 
^ वर