निव्वळ राजकारण की देशद्रोह?

आत्ताच रीडीफ.कॉम वर वाचल्याप्रमाणे (आणि आता ही बातमी इतर सर्व भारतीय पोर्टल्सवर आहे असे दिसतेयं) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बूश ने अमेरिकन काँग्रेसला दिलेली उत्तरे आणि भारतातील प्रामुख्याने काँग्रेस असलेल्या केंद्र सरकारने दिलेली उत्तरे आणि लेखी माहीती यात तफावत आहे असे किमान वरकरणी भासत आहे आणि हे नक्कीच जास्त काळजीचे आहे कारण त्यात केवळ अणूकरार हा भारताच्या बाजूने नाही इतकाच मुद्दा नाही, तो काय आपण स्वतंत्र राष्ट्रासारखे वागायचे ठरवले तर बासनात गुंडाळू शकू. पण त्याहूनही गंभिर गोष्ट अशी आहे की आपले सरकार हे आपल्या लोकप्रतिनिधिंशी आणि त्यामुळे भारतीय जनतेशी संसदेत खोटे बोलले आणि ते देखील अमेरिकेला फायद्याचे ठरणारे. रीडीफ मधे जे ठळक मुद्दे दिलेत तितकेच येथे चर्चेपुरते मांडतो. बाकी वर दिलेल्या दोन्ही दुवे वाचल्यास माहीती मिळू शकेल.

  1. अमेरिकेने भारताला इंधन पुरवठ्यासंदर्भात कुठलाही शब्द दिलेला नाही.
  2. भारताने लांबच्या काळापर्यंत इंधन साठवून ठेवण्यास अमेरिकेने मान्यता दिलेली नाही.
  3. हा करार स्पष्ट करतो की भारत परत कधिही अणूचाचणी करू शकणार नाही.
  4. अमेरिकेने सर्व हक्क स्वतःच्या हातात ठेवले आहेत (ज्याला करारान्वये भारताकडून मान्यता आहे) जेणे करून अमेरिका हा करार कधिही मोडू शकेल.
  5. १२३ करारन्वये जर इंधन मिळाले नाही तर भारत त्या विरुद्ध काही करू शकणार नाही.
  6. १२३ करार हा हाईड कायदा गृहीत धरतो/मान्य करतो.
  7. अमेरिका कुठलेही तंत्रज्ञान भारताला देणार नाही.

Comments

बापरे

हे गंभीर प्रकरण आहे. पण थोडे फार असे होणे अपेक्षीतच होते. आपल्या काँग्रेसकडुन आणखी काय अपेक्षा करणार? भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणुन विचार करणे गरजेचे आहेच. आता आपण फक्त एवढेच पहायचे आहे कि हे सत्य समोर आल्यावर भारातात त्याचे काय पडसाद पडतात? डावे सत्तेत आले तर फार काही चांगले होणार नाही. भाराततली राजकिय गुंतागुंत वाढुन अनेक प्रकरणे चिघळतील हे नक्की.

आर्य तुम्ही खरे बोललात

काँग्रेसने असे बरेच निर्नय घेउन भारताची वाट लावली आहे.

कोण कोणाला फसवतोय ?

कोण कोणाला फसवत आहे, काहीही कळायला मार्ग नाही. मात्र अणुचाचणीनंतर अणुइंधन पुरवण्याची हमी दिलेली नाही असे म्हणुन अमेरिकेने तर आपल्याला लैच धोका दिला असे वाटत आहे. काँग्रेसचे सरकार कोसळू नये म्हणुन ही प्रश्नोत्तरे गोपनिय ठेवण्यात आली म्हणतात. काँग्रेस आणि मित्रमंडळी भारतियांना फसवत आहेत की, अमेरिका आपल्या गळ्याला सुरा लावत आहे, काही कळत नाही.

'अणूर्जेचा पर्याय आणि भारत'हा श्री विजय नाईकांचा लेख वाचण्यात आला त्यात ७३ नंतर अमेरिकेत अणुवीज केंद्र उभारलेच गेलेले नाही. अनेक देशांनी अणुउर्जेचा नाद सोडला आणि आम्ही भारतीय आपल्या लेकरांना तरी च्योवीस तास वीज मिळेल म्हणुन या करारारे आनंदीत झालो होतो. च्यायला भारतीय म्हणुन इथून तिथून फसवणूकच वाट्याला येते इतकेच खरे वाटते.

धक्कादायक

३,४,५,६ माहित होते. दुवा शोधून इथेच देतो
१,२,७ नवे आहे आणि त्यातही "७"सर्वात धक्कादायक वाटले. १,२ व ७ हे भारतावर जाचक वाटले

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

 
^ वर