सोनियाचा "चिनू"

सोनिया गांधींना चीनने ऑलिंपिक्सच्या उद्घाटनाचे वैयक्तिक आमंत्रण दिले होते. तसे करताना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मात्र दिले नव्हते. तांत्रिक दृष्ट्या तसे आमंत्रण न देण्यात काही चूक नव्हती कारण देशातील ऑलिंपिक्स समितिने ते आमंत्रण पंतप्रधान/राष्ट्राध्यक्षांना देयचे असते पण राजनैतिक दृष्ट्या ते नक्कीचे चुकीचे होते. अर्थात चीनने ही चूक काही चुकून केली नव्हती. आंर्तराष्ट्रीय राजकारणात मुरलेले आणि जागतीक महासत्तेची स्वप्ने बाळगणारे आणि त्यासाठी वाटेल ते करायची तयारी असलेल्या या देशातील राजकारण्यांना त्यातूने काय संदेश दिले जात आहेत याची कल्पना आहे.

तरी देखील या विषयावर विशेष असे काही प्रसार माध्यमात वाचायला मिळाले नव्हते. किंबहूना ती बातमी झाली नाही अथवा केली गेली नाही. मात्र, आजच सेंटर फॉर पॉलीसी रीसर्च मध्ये प्राध्यापक असलेल्या ब्रम्हा चेलानींचा "सेंडीग ए राँग सिग्नल" हा लेख वाचण्यात आला.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची आणि सोनियांची वैयक्तिक गाठभेट अनेक वर्षांपुर्वी झाली होती, त्यात त्यांना त्यांचे (सोनियांचे) चीन प्रेम दिसून आले होते. १९८८ मधे त्या राजीव गांधींबरोबर जेंव्हा चीन मध्ये गेल्या होत्या तेंव्हा पासुन ही जवळीक चालू आहे. गेल्या काही वर्षात ही जवळीक वाढतच चालली आहे आणि त्यात राजशिष्ठाचार धाब्यावर बसवले जात आहेत. उ.दा:

  1. एका वर्षाच्या आत ही त्यांची दुसरी चायना भेट आहे.
  2. गेल्या ऑक्टोबर मधील राहूल गांधींना घेऊन गेलेल्या भेटीत चीन ने त्यांचे मोठे आदरातिथ्य केले खरे पण त्याच वेळेस अरूणाचल प्रदेश आणि इतर गोष्टींवरून त्यांनी सरहद्दीवर आक्रमक भुमिका घेतली होती.
  3. आत्ताच्या भेटी दरम्यान (ज्यात त्या त्यांच्या कुटूंबासहीत आणि परीवारासहीत - एक्स्टेंडेड फॅमिली गेल्या होत्या) चीन ने परत सरहद्दीवर आक्रमक भुमीका घेतलीच आणि मध्यरात्री भारतीय राजदुताला बोलावले (समन्स केले).
  4. मधल्या काळात मनमोहनसिंग जाऊन आले आणि ऑक्टोबर मध्ये परत एका आंतरराष्ट्रीय सभे निमित्ताने जाणार आहेत.
  5. प्रणव मुखर्जी भारतीय मदत घेऊन चीनला भुकंपग्रस्तांना मदत करायला गेले असताना आधी दिलेले भेटीचे आश्वासन त्यांच्या पंतप्रधानाने टाळले आणि खालच्या दर्ज्याच्या अधिकार्‍याला भेटीस पाठवले.
  6. या सर्व काळात चीनने कुठलाही वरीष्ठ नेता भारतात पाठवला नाही. राष्ट्रप्रमुखाने भारतात भेट देणे तर लांबच राहीले.

एकंदरीत आपण राजशिष्ठाचार आणि राष्ट्रीय स्वार्थ हा चीनच्या दरम्यान पाळत नाही आहोत आणि चीन पण आम्हाला (एक सोनिया आमच्या बाजूस असल्यावर) इतरांची पर्वा नाही हे त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहेत. पण या लेखाच्या शेवटी जे चेलानींचे वाक्य आहे ते सर्व काही सांगून जाते: (तसेच्या तसे इंग्रजीत) "Jawaharlal Nehru had advised that the 1962 invasion become a permanent piece of education. Today, not only have the lessons of 1962 been forgotten, but also the flurry of Indian officials visiting Beijing for the party shows the manner India’s self-esteem is ebbing. "

Comments

काय लिहावे

यावर आता काय लिहावे? सोनिया तिकडे चीनी कम नही म्हणताना इथे राणेंचा दंगा कदाचित ठरवूनच असेल. म्हणजे कसे लोकांचे लक्ष राणेंकडे आणि राणेंमुळे सोनिया तिकडे गेम पहायला कि करायला हे पहायाला जातंय कोण?

विचित्रच प्रकार

सोनिया गांधीसाठी आमंत्रण हे फारच विचित्र आहे. हे ठीक वाटत नाही.

चीनच्या वकिलातील अधिकार्‍याने माहिती दिली की चीनने "आमंत्रण कोणाला पाठवायचे" ते भारताच्या ऑलिंपिक समितीला विचारले, आणि कलमाडींनी सोनिया गांधींचे नाव दिले. (दुवा)

एम् एस् एन् इंडिया वार्ता सांगते की सोनिया गांधी यांना सरकारप्रमुखांशेजारी मंत्र्यांशेजारी बसवता येत नाही, तर त्यांना कुठे बसवायचे म्हणून चीन सरकारची भंबेरी उडाली होती (दुवा).

हे जर खरे असेल तर ब्रह्म चेल्लाणी यांचे काही मुद्दे तितका जोर राखत नाहीत. म्हणजे चीन सरकारने ठरवले की "भारतातले खरे सत्ताकेंद्र कुठले", आणि त्यातून हा निष्कर्ष की चीनचा हेतू काळाबेरा आहे. (म्हणजे चीनचा भारताविषयी आकस असावा - पण तो या घटनेवरून दिसून येत नाही...)

ब्रह्म चेल्लाणी यांचे मुद्दे बाजूला सारले, तरीही भारतीय ऑलिंपिक कमिटीने कोण्या गैरसरकारी व्यक्तीसाठी आमंत्रण उकळून घेणे हे ठीक नव्हेच.

आमंत्रण

चीनच्या वकिलातील अधिकार्‍याने माहिती दिली की चीनने "आमंत्रण कोणाला पाठवायचे" ते भारताच्या ऑलिंपिक समितीला विचारले, आणि कलमाडींनी सोनिया गांधींचे नाव दिले.

आपण म्हणता तो संदर्भ केवळ लाइव्हमिंट.कॉमनेच दिला आहे. टाइम्स आणि इकॉनॉमिक टाइम्स मधे वेगळे लिहीले आहे तसेच लंडनच्या इंडेपन्डट मधे वेगळे आले आहे.

कलमाडीवर नाव टाकायचे आणि मग "मी मारल्यासारखे कर तू रडल्यासारखे कर" म्हणायचे. आंतर्राष्ट्रीय राजकारणात ह्याला खरे समजायला लोकं काही दुधखुळे नाहीत. बरं मग आता भारतीय ऑलिंपिक्ससमितीच्या सांगण्यावरून बोलावलेच आहे तर त्यांची भेट ही दोन पक्षातील (काँग्रेस आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टी) सलोखा वाढवणारी म्हणजे अर्थातच पक्षिय म्हणून बिनसरकारी (अनऑफिशियल) भेट कशी काय झाली? आणि मग त्या भेटीसाठी (ते पण कुटूंबियांसमवेत) पैसा कोणी दिला? हा प्रश्न कोणी विचारला तर खरे उत्तर मिळेल का?

बाकी प्रोटोकोल चा मुद्दा झाला असेल म्हणून काही चायनाचे राजकारण साळसूद ठरते असे म्हणणे योग्य ठरते का?

ज्या व्यक्तीने "देशासाठी त्याग करून पंतप्रधान पद धुडकारले " त्या व्यक्तीला स्वतः आणि स्वतःच्या कुटूंबियांच्या पुढे त्याच देशाच्या पंतप्रधानाला आणि राष्ट्रपतीला मान दिला नाही म्हणून साधी ऑलिंपिक्सची भेट धुडकारणे जमू नये?

ब्रम्ह चेलानी बरोबर आहे का चूक हा प्रश्न नाही तर आपण आपले फासे कुणाच्या हातात खेळायला देत आहोत हा प्रश्न आहे. हे पहा इकॉनॉमिक टाइम्स मधील वेधकः

Earlier, the duo had visited China last October soon after the CPC Congress and held wide-ranging discussions with top Chinese leaders, including Premier Wen Jiabao. This was followed by a visit by Prime Minister Manmohan Singh to Beijing in January this year.

Thereafter, on July 24 Chinese Ambassador to India Zhang Yan had called on the Congress president at her 10, Janpath residence and handed over a formal invitation from the CPC. The Chinese Government had also appreciated the manner in which India had facilitated the Olympic torch relay in New Delhi earlier this year and had forestalled any protests by exiled Tibetan here.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

होय तिबेटबद्दल भेटणे विचित्रच

ते खूपच विचित्र.

भारतीय ऑलिंपिक कमिटीने नाव पुढे केले याबद्दल बद्दल चीनच्या भारतातील वकिलातीचा दुवा. प्रश्न टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहाराने विचारला होता - साधारण पानाच्या मध्यावर आहे. या दुव्यावर कलमाडींचे नाव नाही.

वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी वेगवेगळ्या तपशीलांवर अधिक लक्ष दिले असणार.

चीनने मारल्याचे सोंग करून इंडियन ऑलिंपिक असो रडल्याचे सोंग करत असेलही. पण मोठ्या प्रमाणावर चीन भारताची धोरणे काँग्रेसमार्फत चालवत असेलसे वाटत नाही. भारताचा अमेरिकेशी आण्विक करार हा चीनला फार फायद्याचा नसावा, पण काँग्रेसने (कोणाच्या फायद्याकरिता हे ठाऊक नाही) पुढे नेला.

तिबेटींच्या विरोधात चीनची मदत करणे (चेहरा गांधी परिवाराचा पुढे), आणि त्याच वेळी अमेरिकेशी करार पास करणे (चेहरा मनमोहन सिंग यांचा पुढे) हे दोन्ही काँग्रेसचे धोरण असावे. काँग्रेसचा कारभार गांधी कुटुंबीय चालवतात, हे मनमोहन सिंगही गुपित म्हणून राखत नाहीत.

पाणी मुरतंय

कुठेतरी पाणी मुरतंय हे निश्चीत! विकास म्हणतात त्याप्रमाणे सोनीयांनी निमंत्रण धुकडकावले असते तरच योग्य होते. हे सगळं वाचून धनंजयरावांच्या काहि वाक्यांपुढे प्रश्नचिन्हे(खरंतर उद्गारवाचक प्रश्नचिन्हे) घालायचा मोह होतो आहे

मोठ्या प्रमाणावर चीन भारताची धोरणे काँग्रेसमार्फत चालवत असेलसे वाटत नाही?
भारताचा अमेरिकेशी आण्विक करार हा चीनला फार फायद्याचा नसावा?

:)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

एकूणच सगळा प्रकार

एकूणच सगळा प्रकार संशयास्पद आहे. वर लिहिल्या प्रमाणे गांधी कुटुंबीयांचा खर्च कोणी केला हे पाहिले तर बरेच उलगडे होतील.
अवांतरः कलमाडींचे लोकसभेचे तिकीट पक्के. जिंकणार की नाही हा मुद्दा वेगळा...

"स्वाभिमान" कशाशी खातात हो?

"राष्ट्रीय स्वाभिमान" म्हणजे काय हो?
आत्मसम्मान कशाला म्हणतात हो? प्रतिभा ताई यांना विचारून आम्हाला कळावे... तसेच "त्यागमूर्ति" सोनिया तर महान आहेतच...
हिन्दीतून सर्वाना हासडून काढले आहे, एकदा फेरी लावा माझ्या अनुदिनीवर... मराठीत इतक्या "सोफिस्टिकेटेड" शब्दात हासडता येणार नाही मला...
http://sureshchiplunkar.blogspot.com

सध्याचे वातावरण

भारतातले सध्याचे वातावरण...
सरकार काही प्रमाणात का असेना, स्थिर आहे, इकडे सोनिया आणि चीनचे भेटणे, तिकडेच भुट्टो कुटुंबीयांशी भेट, काश्मीरमध्ये काँग्रेसचे सरकार पडणे, त्यानंतर काश्मीर मधली अशांतता, खास करून हिंदु मुसलमान खेळ आता फक्त तिथेच चालु शकतो कारण तो गुजरातमध्ये आता चालला नाही. पाकिस्तानातली अशांतता आणि त्यावरून त्यांच्या जनतेला भडकवायला भारताचा वापर, भुट्टो आणि गांधींमधले साधर्म्य (चि. भुट्टो आणि चि. गांधी), त्यांची सत्ता स्वप्ने आणि खास करून या भेटी चीन मध्ये. नक्की काय अर्थ काढायचा? हम्म्म... काढले तर बरेच काही. नाहितर शांतिवार्ता आणि सदिच्छा भेट आहेच.

 
^ वर