नाथपंथ

नाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते. त्यापैकी एक प्रमुख महासिद्ध मच्छिंद्रनाथ हे प्रसिद्ध आहेत. स्वतः शिव हा नाथपंथातील एक गुरू आदिनाथ म्हणून ओळखला जातो.

मत्स्येंद्रनाथ आणि त्याचा शिष्य गोरक्षनाथ (म्हणजेच मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ) या गुरू-शिष्यांच्या सभोवती गुढाचे एक वलय निर्माण केले जाते. मच्छिंद्रनाथाचा जन्म माशाच्या पोटात झाल्याच्या चमत्कृतीपूर्ण कथा प्रसिद्ध आहेत. हठयोग त्यातील कुंडलीनी जागृती, चक्रे, बंध इ. मुळे चमत्कार, शक्ती, विद्या वगैरेंशी नाथपंथाची सांगड घातली जाते. इतकेच नव्हे तर अगदी भुताखेतांच्या कथा - कादंबर्‍यात हटकून नाथयोग्याचा समावेश केला जातो. :-)

मत्स्येंद्रनाथांना नेपाळात बरेच महत्त्व असल्याचे कळते. गोरखनाथांचे महत्त्व तर "गुरखा" या शब्दातून दिसते. परंतु, काहीजणांच्या मते या गोरखनाथांची समाधी महाराष्ट्रात वज्रेश्वरी येथे असल्याचे सांगितले जाते.

ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ हे नाथपंथी असल्याचे सांगितले जाते. ज्ञानेश्वरांच्याही अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टी याचमुळे प्रसिद्ध आहेत का याबाबत उत्सुकता आहे.

या विषयावर माझी माहिती एवढीच परंतु पुढीलप्रकारे चर्चा व्हावी असे वाटते.

  • नाथपंथाबद्दल उपलब्ध असणारी अधिक माहिती.
  • नाथपंथाचे भारतातील स्थान आणि महत्त्व - धर्म, कर्मकांड आणि त्यात अडकलेल्या विद्वज्जनांचा नाथपंथाकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा होता?
  • महाराष्ट्रात नाथपंथाचा उदय आणि प्रसार कसा झाला? - ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ वगैरे नाथपंथात कसे सामील झाले?
  • नाथपंथाबाबत प्रसिद्ध लोककथा, आख्यायिका कोणत्या?

हठयोग, कुंडलीनी जागृती वगैरे चमत्कृतीपूर्ण बाबींबद्दलही या चर्चेत उहापोह करता यावा.

विशेष सूचना: कृपया, कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा वगैरेंचे समर्थन करण्यासाठी ही चर्चा नाही याची खात्री बाळगावी. समजूती, लोककथा, आख्यायिका वगैरे जाणून घेण्यासाठी ही चर्चा आहे.

Comments

नाथसंप्रदाय

सर्वात पुरातन असा संप्रदाय म्हणजे नाथपंथ. नाथपंथाचे 'शांतिरक्षीत' (इ.स. ६९३ ) या पंडिताने प्राकृत भाषेला महत्त्व देऊन जनसामान्याची दु:खे दुर केली, लोकहितकारी नाथसंप्रदाचे तेच संस्थापक. त्यांची परंपरा या प्रमाणे सांगितल्या जाते. शांतिरक्षीत, सरहपाद, शबरलुईपा, हिरुपा, दारीक घंटापा, जालंदर, कानिफ, मत्सेंद्र, गोरक्ष व गहिनी असा सांगितला जातो.

नाथपंथ हा मूळचा शैव संप्रदायी, परंतु शिवविष्णु-ऐक्याचा प्रचारच त्यांनी इथे केला.त्यामुळे इतर ठीकाणी असलेले शैव-वैष्णव भांडणे दिसत नाहीत. मुळात नाथपंथ हा हटयोगी सिद्धांताचा पंथ. गुरुभक्ती, ईश्वरभक्ती, त्यानंतर कृष्णभक्ती असा उपासनामार्गाचा त्यांनी पुरस्कार केला.

नाथमंडळी सर्वत्र फिरणारी म्हणून ते बहुभाषी असत त्याचबरोबर ते इतरत्र जातांना त्या त्या बोलीचा आदर आणि कार करत असायचे.वैदिकांच्या देववाणीपेक्षा लोकवाणीला दिलेल्या महत्वामुळे भारताच्या प्रत्येक भागात नाथपंथाचा प्रभाव दिसून येतो.

असे असले तरी नाथपंथाने बाराव्या शतकात धर्मजागृतीचे कार्य नेटाने व यशस्वी केलेले दिसते. गोरक्षनाथांनी आपल्या गुरुचा मत्सेद्रनाथाचा (योगिनीच्या जाळ्यात सापडलेल्या ) उद्धार केला. ( त्या अगोदर बौद्ध, शाक्त, कापालिक इत्यादी तंत्रसाधनांचे प्राबल्य माजलेले होते. ) आत्मशुद्धी, आत्मानुभूती,आणि सर्वांनाच आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणारा संप्रदाय म्हणजे नाथसंप्रदाय.

बाकी अजून माहितीसाठी मराठी वाड;मयाचा इतिहास चाळावा लागेल :(

अवांतर : संदर्भ नसल्यामुळे प्रतिसादात असे वाटते, म्हणण्यास हरकत नाही, चु.भु.दे.घे. हे सर्व आलेले आहेच, हे वेगळ सांगणे न लगे.

योगिनीच्या जाळ्यात ;-)

प्रतिसादासाठी धन्यवाद!

बाकी अजून माहितीसाठी मराठी वाड;मयाचा इतिहास चाळावा लागेल :(

तसे कराच आणि कृपया अधिक माहिती पुरवा.

गोरक्षनाथांनी आपल्या गुरुचा मत्सेद्रनाथाचा (योगिनीच्या जाळ्यात सापडलेल्या ) उद्धार केला.

ते कसा ती आख्यायिका सांगा की विस्तृत. म्हणजे कोण योगिनी? तिचा हेतू काय होता? शिष्याने गुरूचा उद्धार कसा केला वगैरे.

इतकेच माहिती की....

पुर्वी असलेल्या धर्मात मद्यमासमैथून आणि तंत्र साधनेचे प्राबल्य होते, मत्स्येंद्रनाथ अशाच एका योगिनीच्या जाळ्यात गुंतले आणि त्यांना निष्कलंक चारित्र्य व संघटनशक्ती असलेल्या गोरक्षनाथांनी त्यांना पुन्हा रुळावर आणले. पुर्वीच्या पंथाचा प्रभाव नाथपंथावर होता जसे की बौद्धाच्या महायान आणि वज्रयान यांचा. शिवाऐवजी शवाला महत्व होते. चमत्कार, सिद्धी,व्यभिचार, पापाचरण, प्राणीहत्या, या साधना पवित्र होत्या आणि या तांत्रिकांच्या धर्मसाधनेत योगिनींना महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे मत्सेंद्रनांथ योगिनी (शिष्या ) कडे आकृष्ट झाले असावेत.

मध्ययुगीन धर्मसाधनेत योगिनींचे मेळावेच मेळावे होते म्हणतात,ध्यानसाधनेसाठी मद्यपान, शरीरपुष्ठतेसाठी मासभक्षण, कामविकाराचे दमन केले तर त्यांचा क्षोभ होईल, मग ती साधना कसली ? म्हणुन कामोपभोग हे साधनेचे सुत्र...अशा धर्मसाधनेत मत्सेंद्रनाथ गुरफटले असावेत, विशेष साधनेसाठी काही विशेष स्त्रीया पवित्र मानल्या जात होत्या( पात्रता सांगता येणार नाही) त्यात एखाद्या अशा खास स्त्रीत मत्सेंद्रनाथ गुंतले असतील ? (चुभुदेघे)


शिष्याने गुरूचा उद्धार कसा केला वगैरे.

वेदज्ञानाच्या जाळ्यात सापडून , भगवी वस्त्रे धारण करुन, हातात भिक्षा पात्रे घेऊन, केसाच्या जटा वाढवून, नग्न राहून, उन्मत्तपणाचे वर्तन ठेवून राहणे योग्य नाही, हे त्यांनी अमनस्क योग ज्ञानदीपबोध या ग्रंथातील विचारांनी त्यांचे प्रबोधन केले असावे.

अमनस्कयोग ग्रंथात :योगी गुरुची लक्षणे सांगितली आहेत. योगसाधनेसाठी उपयुक्त स्थाने, योगासने, क्रियायोग यांचे महत्त्व सांगितले आहेत.
ज्ञानदीपबोध या ग्रंथात : श्री दत्तगुरु आणि गोरक्षनाथ यांचा संवाद आलेला आहे.या ग्रंथात नाथपंथीय तत्वज्ञान आहे, स्वर्ग, मृत्यु, पाताळ, या सर्वांचे नियमन करणारा तो शिव सर्व ज्या योगे सर्व इच्छा पूर्ण होतात.

बाकी नाथसंप्रदायाविषयी अजून काही शोधून टाकता आले तर नक्की खरडेन.

बरोबर

मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्याच्या राणीच्या मोहात पडले होते. तिथे साक्षात हनुमंताशी त्यांची भेट झाली असे ऐकले आहे.

आपला,
(वानरसैनिक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्त्रीराज्य

मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्याच्या राणीच्या मोहात पडले होते. तिथे साक्षात हनुमंताशी त्यांची भेट झाली असे ऐकले आहे.

या बद्दल अधीक माहीती असल्यास वाचायला आवडेल.

यातील स्त्रीराज्य हा शब्दवाचताना एकदम "स्त्री पार्टी" या शब्दाची आठवण झाली :-)

लक्षात असलेल्या माहितीप्रमाणे -

रा.चिं. ढेरेंच्या 'नाथ संप्रदायाचा इतिहास' मधून आठवेल तसे -

मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.
या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली.

परंतु 'उर्ध्वरेता' या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली.

ऊर्ध्वरेता

नाथसंप्रदायाबद्दल नवीन माहिती वाचत आहे. सर्वांना धन्यवाद.

ऊर्ध्वरेता क्रियेबद्दल पुढील भाग अवांतर आहे, म्हणून तो पांढर्‍या ठशात (अदृश्य) दिला आहे. या अवांतर माहितीबद्दल येथे अति-अवांतर प्रतिसाद देऊ नये :-)

ऊर्ध्वरेता हा प्रकार गृहस्थाश्रमी व्यक्तीने शिकूच नये.
संन्यस्त पुरुषाने ऊर्ध्वरेता प्रक्रिया शिकणे म्हणजे एका प्रकारे "रडीचा खेळ" आहे, असे माझे मत आहे. का ते असे :
रेतनलिका मूत्रनलिकेच्या मध्यात जोडली जाते, आणि रेत स्रवताना मूत्रनलिकेतूनच बाहेर पडते, हे तर सर्वांना ठाऊक आहे. मग ते बाहेरच्या दिशेलाच का टाकले जाते, उलट्या दिशेने मूत्राशयाकडे का जात नाही? - हा प्रश्न आपल्यापैकी कोणाकोणाला पडला असेल. होते असे, की रेत स्रवताना मूत्राशयाच्या "तोटीशी" असणारा एक स्नायू अकुंचन पावतो, आणि ती वाट रेतासाठी बंद होते. उरलेल्या एकाच वाटेने, म्हणजे बाहेर पडते. लक्ष देऊन देऊन तो स्वयंसंचालित "तोटीचा" स्नायू इच्छेने वापरता येतो. मग रेत स्खलत असताना "ऊर्ध्व" दिशेला, म्हणजे मूत्राशयात जाते.
या रेताचे सर्व घटक (म्हणजे शुक्राणू वगैरे) त्यानंतर सोडलेल्या मूत्रात सापडतात. म्हणजे "रेत" असे कुठल्या आंतरिक चक्रात जिरत नाही, कायमचे "ऊर्ध्व" जात नाही, तर केवळ कालांतराने मूत्रातून बाहेर पडते.
संभोग करायचा, आणि रेत नंतर मूत्रातून टाकायचे, आपले रेत "आतमध्ये ओज वाढवते आहे" असे स्वतःची गैरसमजूत(?) करून घ्यायची... म्हणून मी याला "रडीचा खेळ" म्हटले आहे. हा कसला संन्यास!!!
संततिनियमनाचा मार्ग म्हणूनही हा चांगला नाही. बहुतेक रेत उलटे गेले तरीही कळे-न-कळे थोड्या प्रमाणात रेत बाहेर झिरपू शकतेच. म्हणजे चुकून गर्भधारणा होऊच शकते. मुद्दामून गर्भधारणा घडवणे इच्छित असेल, तरी गडबड होते. प्रयत्न करून-करून तो तोटीचा स्नायू सैल झालेला असतो, सर्वच्या सर्व रेत योनीकडे न जाता, काही प्रमाणात मूत्राशयात जाते, आणि गर्भधारणेकरिता तेवढेच कमी उपलब्ध असते. संततिनियमनासाठी कंडोम वापरणेच त्या मानाने कार्यक्षम मानावे.

उत्तम चर्चा

मस्त विषय, आणि माझ्या जिज्ञासेचाच आहे.

हे ढेरेंचं पुस्तक भक्तिभावानी लिहिलं गेलं आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनातून ? कारण नाथपंथ म्हटलं की त्यात जादू टोणा, बुवाबाजी करणार्‍या इतक्या लोकांचा संबंध आहे, की ते सगळं वाचून डोकं बधीर होतं.

ख्रिश्चनांचा येशूचाही नाथ पंथाशी काही लोक संबंध लावतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे योगविद्येमुळेच त्याला तीन दिवस क्रुसावर टांगूनसुद्धा मरण आले नाही, व नंतर त्याच्या अनुयायांनी त्याला काश्मिरमध्ये आणले, व तिथे तो मरण पावला (आणि त्याची कबर तिथेच आहे वगैरे वगैरे)

उर्वरित प्रतिसाद ह्या चर्चेत इतरत्र पाहिलेल्या माहितीबद्दल

कनिफनाथाचं पुण्याजवळ सासवडजवळ देऊळ आहे.

ब्राह्मणांचा नाथपंथाशी विषेश संबंध नसावा कारण त्यांचा उदरनिर्वाह पूजा पाठ यज्ञकर्म ह्यातच असल्यामुळे नाथपंथ त्यांच्या "पथ्यावर" पडणारा नव्हता :) अर्थात ब्राह्मणांमधली शिक्षणाची प्रथा नाथवाङ्मय जतन करुन ठेवण्यात उपयोगी आली असेलच.

ऐतिहासिक संशोधन

डॉ. रा.चिं. ढेरे दैवते, धर्म, संप्रदाय यांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करतात.
ढेर्‍यांची पुस्तके दैवत-इतिहास/ दैवतशास्त्र / सांस्कृतिक इतिहास या स्वरुपाची असून नाथ, अवधूत, दत्त, वारकरी इ. संप्रदायांचा शास्त्रीय अभ्यास करून त्यावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.

"स्कंदपुराणातील ' पांडुरंगमहात्म्य ' या संस्कृत रचनेपासून ते संत सावता माळी यांच्या अभंगापर्यंत जे पंढरपूरच्या विठ्ठलाचा वर्णन सापडते , तशी मूर्ती आज पंढरपूरात नाही . हृदयस्थानावर कोरलेला कुटमंत्र हे या मूतीर्चे महत्त्वाचे वर्णन आहे . तशी मूर्ती माढे येथे आहे . तसेच १६५९ मध्ये अफझलखानाच्या आक्रमणाच्या वेळी पंढरपूरची मूर्ती माढे येथे हलवली होती , अशीही पारंपरिक माहिती आहे . या साऱ्याचे शास्त्रीय विवेचन करत डॉ . रा . चिं . ढेरे यांनी असे मांडले की माढे येथील मूर्ती आद्यमूतीर्शी साम्य सांगते . पण अशीही शक्यता आहे , की माढ्यात पंढरपूरचा विठ्ठल येऊन गेला म्हणून माढेवासीयांनी त्याची प्रतिमूर्ती स्थापन केली असेल . "- येथून

स्पष्टीकरण

वरील प्रतिसादात मी "ब्राह्मणांचा विषेश संबंध नसावा" असं म्हटलं आहे. ह्यात "विषेश" हा शब्द मी स्पेशल ह्या अर्थाने वापरला आहे ह्याची नोंद करावी. नाथवाङमय जतन करण्यात अर्थातच विषेश संबंध येतो असं मला वाटतं.

यात

ध्यानसाधनेसाठी मद्यपान, शरीरपुष्ठतेसाठी मासभक्षण, कामविकाराचे दमन केले तर त्यांचा क्षोभ होईल, मग ती साधना कसली ? म्हणुन कामोपभोग हे साधनेचे सुत्र...
यात चुकीचे ते काय आहे?
दमन महत्वाचे की शमन महत्वाचे?
ज्ञानाचा उगम कुणासाठी कुठून होईल हे कसे सांगता येईल.
आणि मग जर निसर्गाच्या आदिम भावनेतून ज्ञानाची साधना असेल तर त्यात चुकी चे असे काय आहे?

कुणी प्रकाश टाकेल काय?

आपला
गुंडोपंत

पंत,

यात चुकीचे ते काय आहे?
आगीत तूप टाकल्याने आग भडकते शमत नाही.

दमन महत्वाचे की शमन महत्वाचे?
निवृत्ती महत्वाची !

ज्ञानाचा उगम कुणासाठी कुठून होईल हे कसे सांगता येईल.
आणि मग जर निसर्गाच्या आदिम भावनेतून ज्ञानाची साधना असेल तर त्यात चुकी चे असे काय आहे?
चूक काहीच नसावी.

सहज कुठे वाचलेले आठवले म्हणून लिहितो. रामकृष्णांना कुणी मुक्ती मिळविण्याच्या काही चित्रविचित्र मार्गांबद्दल विचारले असता ते म्हणाले की घरात शिरायला अनेक मार्ग असतात. मोरीच्या भोकातून आत यायचे की दरवाजातून ते ठरवायला पाहिजे.

-- (पढतमूर्ख) लिखाळ.

निवृत्ती-ज्ञानदेव..

नाथ संप्रदायाबद्दल बिरूटेसरांनी वर माहीती दिली आहे तशीच काहीशी मी पण ऐकली आहे. तरी "शांतिरक्षित" बद्दल माहीती नव्हते. ती नवीन माहीती समजली.

ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ वगैरे नाथपंथात कसे सामील झाले?

मर्यादीत माहीतीवरः विठ्ठलपंत आणि कुटूंबिय ह्यांना आळंदीच्या कर्मठ समाजाने वाळीत टाकलेले असताना ते (का ते आत्ता आठवत नाही पण) अरण्यातून जात होते. तेंव्हा निवृत्तीनाथांची इतरांबरोबर चुकामूक झाली. त्या चुकामुकीतून ते गुहेत गेले जेथे त्यांना नाथसंप्रदायातील गुरू (गोरक्षनाथ?) आणि नंतर ज्ञानप्राप्ती झाली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या ज्ञानेश्वर भावंडांच्या आईवडीलांनी जेंव्हा देहदंड मान्य करून प्राणत्याग केला तेंव्हा निवृत्तीनाथ हे या नाथसंप्रदायाच्या गुरूबरोबरच होते. नंतर मात्रा या गुरूने त्यांना (उगाच बसून तप करण्याऐवजी) बाहेर जाऊन ज्ञानाचा उपयोग इतरांना करून देण्याची आज्ञा केली. त्यातून त्यांनी ज्ञानेश्वरांना स्वतःचे शिष्यत्व देऊन ज्ञान दिले आणि नंतर लिहीण्याची आज्ञा केली.

वर बिरूटे सरांनी म्हणल्याप्रमाणे, केवळ मंत्र-तंत्र आणि हटयोग च नाही तर सर्व देवदेवतांना एकत्र आणून त्यांच्या भक्तगणांतील भांडणे थांबवण्याचा प्रयत्न नाथसंप्रदायाने केला. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ज्ञानेश्वरांनी चालू केलेला (पाया घातला) वारकरी संप्रदाय ज्यात सामाजीक समता आणायचा प्रयत्न केला गेला. मधल्या काळातील एकनाथ मात्र नाथसंप्रदायातील होते ज्यांनी देखील समाजातील काही चुकीच्या प्रथा काढण्याचा प्रयत्न केला ज्यात जातीची बंधने मोडण्याचा आणि भूतदया हा भाग पण येतो.

गहिनीनाथ

निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ होते असे वाटते. चूकभूलदेणेघेणे.

गहिनीनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य.

नवनाथांची नावे येथे

आपला,
(वारकरी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बरोबर आहे

निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ होते असे वाटते. चूकभूलदेणेघेणे.

गहिनीनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य.

धन्यवाद अजानुजर्ण! गहनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू !

वा

वा! आवडली चर्चा...
आम्ही लहानपणी शाळेत जातांना एकमेकांना हाका मारायला,
"चलो मछिंदर गोरख आया"
अशा आरोळ्या द्यायचो त्याची आठवण झाली.

नवनाथांच्या सगळ्या कथा द्या कुणीतरी इथे...

आपला
गुंडोपंत

चलो मछिंदर गोरख आया

"चलो मछिंदर गोरख आया" अशा आरोळ्या द्यायचो त्याची आठवण झाली.

अगदी! मीही हे ऐकले आहे. लिखाळपंतांनाही माझ्या खरडवहीत त्याची आठवण झाली होती. पण या आरोळ्या का ठोकल्या जात त्या मागची कथा कोणती?

चलो -

http://mr.upakram.org/node/1372#comment-22279
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आणखी एक प्रश्न

बर्‍याच उसाच्या रसाच्या दुकानांची नावे गोरक्षनाथ, गहिनीनाथ रसवंती गृह अशी असतात/असायची. ती का?
उसाचा रस काढणार्‍यांना नाथ संप्रदायाचे एवढे आकर्षण का असावे?

मनातला प्रश्न

हा प्रश्न नेहमी पडतो. खास करून कानिफनाथ का असेच काहीतरी नाव असते. कोल्हापूरच्या बिभिषण पाटलांचे अशा वेषात कोणीतरी चित्र काढल्याचे त्यांच्या तोंडुन ऐकले आहे.





जबरा निरिक्षण!

बर्‍याच उसाच्या रसाच्या दुकानांची नावे गोरक्षनाथ, गहिनीनाथ रसवंती गृह अशी असतात/असायची. ती का?

खरंच की!

महाराष्ट्रात उच्चवर्णिय आणि ब्राह्मण यांचे वर्चस्व असताना या नाथसांप्रदायाचे काय स्थान होते? त्यांच्याकडे आदराने पाहिले जाई की त्यांना हेटाळणी मिळत असे? मंत्र-तंत्र यामुळे त्यांची भीती वाटे का?

महाराजांचे निश्चलपुरी महाराज नावाचे तांत्रिक गुरू असल्याचे वाचले आहे (अर्थात ते नाथपंथी वगैरे असल्याचे वाचलेले नाही) परंतु राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना बाजूला सारण्यात आले कारण गागाभट्ट किंवा इतर प्रकांडपंडितांना हे प्रकार मान्य नव्हते. अशा पार्श्वभूमीवर नाथपंथी नेमके कोणत्या समाजाचे गुरू बनले?

पुन्हा तंत्रमंत्र -

महाराष्ट्रात उच्चवर्णिय आणि ब्राह्मण यांचे वर्चस्व असताना या नाथसांप्रदायाचे काय स्थान होते?
त्यांच्याकडे आदराने पाहिले जाई की त्यांना हेटाळणी मिळत असे? मंत्रतंत्र यामुळे त्यांची भीती वाटे का?

-

मला वाटते तसे नसावे. उच्चवर्ण / ब्राह्मण हे या तंत्रातही प्रविण असत. जारण-मारण-उच्चाटनाचे हे मंत्र ऋग्वेद, (रुद्र )अथर्ववेद इ. पासूनच निर्मित नव्हेत का?

ॐ र्‍हीं, क्लीं | अस्त्राय फट् | ॐ 'गँ' गणपतये नमः |

गणेशविद्या = अर्धेंदुलसितं| तारेण रुद्धं| गकारो मध्यमरूपं| अनुस्वारस्च अन्त्य रूपं| नादः संधानं| संहितासंधि: | = "गँ" (चुभूद्याघ्या)

इ. इ. ब्राह्मणी तांत्रिक मंत्र आहेतच की.

बाकी माहिती इथून.

आणखी एक प्रश्न - नाथ पंथियांना 'कानफाटे योगी' म्हणत का? का म्हणत?

(भयालीदेवींचा मोहरा नेहमी तंत्रमंत्रांकडे का वळतो? आणखी एखादी सिद्धी त्यांना प्राप्त करायची आहे काय?)
;)

कपालिक

कुठेतरी पाहिलेल्या टुकार सिरियलमधून कळलेली गोष्ट की - कपालिक हा एक अघोर पंथ आहे. त्यांचे कान टोचलेले, फाटलेले असतात. त्यांच्याशी काही संबंध तर नाही? ;-)

कृपया स्रोत विश्वासार्ह मानू नये. रामसेच्या चित्रपटातील भुतांएवढाच तो नकली असावा...पण कपालिक हा अघोरपंथ आहे हे निश्चित.

शंका

अर्धेंदुलसितं| तारेण रुद्धं| गकारो मध्यमरूपं| अनुस्वारस्च अन्त्य रूपं| नादः संधानं| संहितासंधि:
असे आहे का
अर्धेंदुलसितं| तारेण रुद्धं| एतद् तव मनुस्वरुपं|गकारो पूर्वरूपम्| अकारो मध्यमरूपं| अनुस्वारस्च अन्त्य रूपं| बिंदू रुत्तर रुपं|नादः संधानं| संहितासंधि: | स एषा गणेशविद्या
(बर्‍याच ठिकाणी संधी विग्रह केला आहे मुळ श्लोक संधी साधतो ;) )

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

बरोबर आहे

अथर्वशीर्ष म्हणून कैक वर्षे झाली. स्मरणशक्ती आंतरजालामुळे (रेडी रेफरन्स) कमकुवत झाली आहे.

मी जे अथर्वशीर्ष म्हणतो

त्या पाठात

अर्धेंदुलसितं| तारेण रुद्धं| एतद् तव मनुस्वरुपं|गकारो पूर्वरूपम्| अकारो मध्यमरूपं| अनुस्वारस्च अन्त्य रूपं| बिंदू रुत्तर रुपं|नादः संधानं| संहितासंधि: | स एषा गणेशविद्या

असे म्हणतो.

चतुरंग

रसवंती गृहे व नाथपंथ

ब्राह्मणेतर समाज ( क्षत्रियांसकट) उदरनिर्वाहासाठी शेती वा तत्सम व्यवसायावर अवलंबून - हा व्यवसाय हंगामी - शेतीची कामे नसताना, शेतीपूरक व्यवसायांमध्ये ब्राह्मणेतरांची संख्या अधिक - नाथपंथातल्या जात-पात भेदाभेद न पाहाण्याच्या / न पाळण्याच्या रीतीचे साहजिकच ब्राह्मणेतरांना अधिक कौतुक - त्यामुळे ब्राह्मणेतरांनी नाथपंथ जास्त संख्येने स्वीकारला - नाथपंथी लोकांपैकी अधिकांनी शेतीपूरक व्यवसायांपैकी रसवंती गृहाच्या व्यवसायात जम जास्त चांगला बसवला - त्यामुळे रसवंतीगृहांची नावे नाथपंथातील दिसतात. अशीच कारण मीमांसा अमृततुल्य चहाच्या दुकानांची नावे `-- + इश्वर' अशी (जबरेश्वर, नागेश्वर इ.) असण्याची आहे. अमृततुल्यच्या व्यवसायात शैव अधिक संख्येने आहेत - होते. आता त्या त्या व्यवसायाची तसतशी नावे ठेवण्याचा तो trend बनला, मालक भले नाथपंथी किंवा शैवपंथी नसेलही.
- नूतन
**************
अवधूता, गगन घटा गहराई ||

गुरु नानक आणि नाथ पंथ

शीख संप्रदायाचे (धर्माचे?) गुरू नानक यांनाही नाथ संप्रदायाने शिक्षण दिले होते असे कळते.
इथे 'चरपटनाथ' हेही एक नाव दिसते.

अवघड जागचे दुखणे

आईकडून कळलेली ऐकीव माहिती अशी -
नाथसंप्रदायाचा काळ हा 'काळा इतिहास' म्हणून ओळखला जातो कारण या काळात जोग आणि जोगिणींचे जथ्थे फिरायचे आणि व्यभिचार हा बोकाळला होता. यातून समाजाला बाहेर काढण्याच्या कामी नाथसंप्रदायाचे मोठे कार्य आहे.

हा इतिहास शालेय अभ्यासक्रमात कधीच शिकवला जात नाही आणि त्यामुळेच मग अश्मयुगीन मानवानंतर डायरेक्ट अलिकडील काळातील इतिहास शिकवायला घेतला जातो. याच्या मधल्या कालखंडात नक्की काय होते? ह्या लहान मुलांच्या प्रश्नाला उत्तर कसे द्यावे हेच मग कळेनासे होते !

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार का काय अशीही भीती वाटते कधीकधी !

खरे आहे

आपले म्हणणे खरे आहे.
इतकेच काय, आपल्या अतिशय श्रीमंत इतिहासाचीही काहीच कल्पना मराठी माणसाला नसते. म्हणजे पाचवे शतक ते १३ वे शतक या दरम्यान महाराष्ट्रात काय घडले असे विचारले तर कुणालाच काही माहिती नसते.

आपला
गुंडोपंत

स्त्री-राज्यात मारुती व गोरखनाथ व चलो मच्छिंदर गोरख आया

शरद
स्त्री राज्यात सर्व स्त्रीयाच होत्या. मारूतीने तेथल्या राणीला आश्वासन दिले की मी मच्छिद्र येथे आणीन. त्याप्रमाणे त्याने गोरखनाथ बरोबर नसतांना मच्छिंद्रनाथांना गाठले व त्याना स्त्री-राज्यात आणून सोडले. गोरखनाथाना बरेच दिवसानी त्यांचा पत्ता लागला. ते चार शिष्यांना घेऊन स्त्री-राज्याकडे निघाले. सीमेवर त्यांची आणि मारुतीची गाठ पडली.झालेल्या लढाईत मारुती हरला व श्रीरामांच्या मध्यस्तीने दोघांची दिलजमाई झाली व गोरखनाथ स्त्रीराज्यांतशिरले.तिथे मच्छिन्द्रांची सरळ भेट घ्यावयाऐवजी वादकाचा, तबलजीचा वेष घेतला व दरबारात नृत्याला साथ करतांनातबल्यातून बोल काढले " चलो मच्छिंदर गोरख आया ". मच्छिंद्रनाथ चकीत होऊन गोरखला शोधू लागले.
असल्या, खेडेगावातल्या अडाणी लोकांकरता लिहलेल्या गोष्टीकरता वाचा " नवनाथ भक्तीसार "
शरद

या वरून

स्त्री राज्यात सर्व स्त्रीयाच होत्या.

या वरून मला ऑस्कर पारीतोषिक विजेता "द लास्ट एम्परर" हा चित्रपट आठवला. बाकी सर्व माहीती इंटरेष्टींग...!

स्त्रीराज्य

... आणि या राज्यातल्या प्रजननाची पद्धत : मारुती राज्याबाहेर पहारा देत बसायचा. त्याने वेळोवेळी केलेल्या मोठ्या भुभु:काराने राज्यातल्या स्त्रियांना गर्भ रहायचा असा नवनाथचरित्रात उल्लेख. एकूणच ही पोथी अशा प्रकारच्या उल्लेखांनी संपृक्त.

मस्त चर्चा

चर्चा मस्त आहे. बरीच माहिती मिळाली. माझ्याकडून भर घालण्यासारखे काही नाही. पण वाचतो आहे..
--लिखाळ.

+१

चर्चा मस्त आहे. बरीच माहिती मिळाली. माझ्याकडून भर घालण्यासारखे काही नाही. पण वाचतो आहे..

अगदी असेच. अतिशय रंजक चर्चा!.... सवडीने गुगलून काहि माहिती मिळाली तर इथे देईन ;) तोपर्यंत वाचनमात्र..

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

गोरक्षनाथ - कथा

------------
गोरक्षनाथाची कथा.
मछिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भीक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहुन घरातल्या स्त्री ने भीक्षा वाढतांना आपल्याला मुल व्हावे असा अशिर्वाद मागीतला.
त्यावर मछिंद्रनाथांनी स्त्री ला एक भस्माची चिमुट दिली आणि अशिर्वाद दिला, की मुलगा होईल.

स्त्री हरखून गेली व तीने शेजारी-पाजारी जावून सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकुन शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्री ने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.

बारा वर्षांनी मछिंद्रनाथ परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भीक्षा देण्यास आली. तीला पाहून मछिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मुल झालेच नाही. मछिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही.
त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मछिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मछिंद्रनाथ त्या मुलाला घेवून गेले. हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस
आला.
----------

अर्थातच या कथेमध्ये काळानुरूप बदल झाले असणार... कदाचित गोरक्षनाथ हा मच्छिंद्रनाथांचाच मुलगा असेल. बापाविना पोरका म्हणून त्याला गोठ्यात काम कामाला ठेवत असतील. मुलाचे हाल पाहुन मच्छिंद्रनाथ मुलाला आपल्या बरोबर घेवून गेले असतील अशीही ही कथा असु शकेल.

आपले म्हणणे ऐकायला आवडेल...
आपला
गुंडोपंत

गोरक्षनाथांचे लिखाण

गोरक्षनाथांनी योग प्रकार जनमानसात रुजवला. त्यासाठी भारतभर भ्रमण केले.
यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके पुढील प्रमाणे
१. गोरक्ष संहिता
२. सिद्ध सिद्धांत पद्धती
३. योग मार्तंड
४. योग सिद्धांत पद्धती
५. योग बीज
६. योग चिंतामणी

असे म्हणतात की गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतावरच नाही तर अरब जगतातही होता.
(मला नक्की माहिती नाही!)

कानाला भोके पाडण्याची पद्धातीही गोरक्षनाथांनी सुरु केली. अशी भोके पाडण्या आधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. हे साधू अवधूत असत.

सर्व नाथपंथीय जरी शिवा पासूनच उत्पन्न झालेले असल्याचे मानत असले तरी, नाथ संप्रदाय अद्वैतवादी आहे.ताअणि स्व ला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे असे मूलतः मानणारा आहे असे समजले जाते. आणि हा 'जाणीवेचा मार्ग' योगाच्या माध्यमानेच पाहिला जातो.
-------------------
तसे काही विज्ञानवादी अंधश्रद्धाळूंना हा विषय फारसा पचण्यासारखा नाही... चालायचच जगात सगळेच लोक असणार त्यात हे पण...

आपला
गुंडोपंत

नाथांची नावे

नवनाथ खालील प्रमाणे आहेत.

  • मच्छिंद्रनाथ
  • गोरखनाथ
  • गहिनीनाथ
  • निवृत्तिनाथ
  • नागनाथ
  • कानिफनाथ
  • जालंदरनाथ
  • चर्पटनाथ
  • रेवणनाथ

(भर्तूहरी नाथ कुठे/कोणता नक्की?)

मात्र या सर्वांच्या आधी

  • आदिनाथ - शंकर
  • उदयनाथ - पार्वती स्वरूप
  • सत्यनाथ - ब्रह्म स्वरूप
  • अचलनाथ - नागांचे राजे
  • गजवेली नाथ - गणपती स्वरूप
  • सिद्ध चौरंगीनाथ

अशी उतरंडही लावली जाते.

आपला
गुंडोपंत

दुवा

येथे अजून ६४ योगिनी विषयक बरीच माहिती मिळाली.

शिवाय येथे अजून माहिती...

मटा मधील ही माहिती चांगली वाटली.

आपला
गुंडोपंत

वा! धन्यवाद

गुंडो, इतिहासाला लोक कंटाळतात का असं प्रश्नचिन्ह असतानाही, महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला माहित नाही हे कबूल करून बरंच संशोधन केलेलं दिसतंय. (ह. घ्या)दुव्यांबद्दल धन्यवाद. वेळ काढून वाचेन.

विसुनाना माढ्याच्या लेखाबद्दल धन्यवाद. ढेर्‍यांच्या पुस्तकातून काही संदर्भ सापडल्यासही टाकावेत.

चर्पटपंजरी ?

गुंडोपंतांनी बरीच माहिती दिली आहे.
विसूनाना आणि गुंडोपंत यांनी दिलेल्या माहितीमध्ये चर्पटनाथ असा उल्लेख आहे. चर्पटपंजरीचा आणि यांचा काही संबंध आहे का? चर्पटपंजरी हा काय प्रकार आहे?
--लिखाळ.

निर्गुणी भजने

कुमार गंधर्वांनी गायलेली निर्गुणी भजने आणि नाथसंप्रदाय यांचा काही संबंध आहे का? (..त्यात काही भजने कबीराची आहेत. इतर कोणाची ते माहित नाही. कबीर आणि नाथ यांचा काही संबंध आहे का?)
-- लिखाळ.

अगदी बरोबर

निर्गुण भजनांचा नाथ संप्रदायाशी संबंध आहेच.

निर्गुण = आकारहीन दैवत.
नाथ संप्रदाय हा मुळात आकारहीन वैदिक दैवते, बौद्ध धर्म, जैन धर्म इ. विचारांमधून निर्माण झालेला आहे.
निर्गुण भजने प्रामुख्याने भोजपुरी भाषेत असून ती 'जोगी ' (=योगी) गातात.
सर्वस्वाचा त्याग करून ठिकठिकाणी भटकणे ही या जोगी लोकांची दिनचर्या असते.
हे जोगी गोरखपूर येथील गोरखनाथाच्या मठातून आलेले आहेत अशी लोकांची समजूत असते.

अवांतर -
"सुनता है गुरू ग्यानी "हे कुमार गंधर्वांचे भजन मला अतिशय आवडते.

व्रात्य !

विसुनाना,
आपण दिलेल्या दोनही दुव्यांबद्दल आणि माहितीबद्दल आभार.
आपण दिलेल्या पहिल्या दुव्यामध्ये 'व्रात्य' प्रकारच्या योगी लोकांचे वर्णन आहे. एखाद्या उपद्व्यापी माणसाला आपण व्रात्य म्हणतो. ते तसे का याचा थोडा मागमुस या योगी लोकांच्या वागण्यात असावा का? याच योग्यांच्या समुदायामुळे व्रात्य हा शद्ब आपल्या वापरात आला असावा का !

अवांतर : हो ते गाणे सुंदरच आहे. मला 'हीरना' हे गाणे सुद्धा आवडते. आणि अवधूता.. गगन घटा गहरा...

सहज

नाथपंथिय
एकदा हठयोगातून पुढे गेल्यावर सहजयोगाचीही साधना करतात. (अवधूत?)
(सहज योग हा हठयोग नंतर येतो का?)
या सहजयोगात हा व्रात्यपणा घुसला असावा असा माझा अंदाज आहे.

आपला
गुंडोपंत

जोतिबा आणि नाथ संप्रदाय

'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' मध्ये नाथसंप्रदायाबद्दल वाचल्याचे अंधुक आठवत होते, म्हणून शोधले - पण सापडले नाही :(. वरील प्रतिसादांत रा. चिं. ढेरे यांचा उल्लेख वाचून त्यांच्या 'लज्जागौरी' या पुस्तकात काही सापडते का, म्हणून शोधल्यावर हा उतारा मिळाला. मुख्यत्वेकरुन हा जोतिबाबद्दल असल्याने प्रस्तुत विषयाशी याचा थेट संबंध आहे, असं वाटत नाही. तरीही...

"जोतिबाच्या उपासना-साहित्यात अनेकदा त्याचे वर्णन शैली-शृंगी-कंथा-झोळी या नाथपंथीय परिवेशात केले जाते. आदिलशाहीच्या काळात त्याची उपासना नाथपंथी गोसाव्यांकडे होती, अशी नोंद उपलब्ध झालेली आहे. त्याची सध्याची मूर्तीही एका नाथपंथी साधूने घडविल्याची पारंपरिक समजूत प्रचलित आहे.

जोतिबा आणि नाथ संप्रदाय यांचा हा संबंध जोतिबाच्या क्षेत्रपाळ-स्वरुपामुळे आहे. कारण महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ क्षेत्रपाळ जो भैरव, तो नाथ-संप्रदायाचे अनुयायी असलेल्या भराड्यांच्या भक्तीचा विषय आहे. एके काळी पाशुपत असलेले आणि शिव-भैरवादी मंदिरांच्या पूजा-अर्चांदी व्यवस्थेत गुंतलेले भराडी (भरटक) पुढे, पाशुपतांचा नाथ संप्रदायात समावेश झाल्यावर, नाथसंप्रदायी बनले आणि स्वाभाविकपणेच त्यांची दैवतेही त्यांच्या श्रद्धांना अनुरूप बनली. भराड्यांच्या उपासनेचा विषय असलेल्या भैरवाचे वर्णनही नाथपंथी स्वरूपात केलेले आढळते. जोतिबाचा एक भक्त भुजंगनाथ हा भराडीच होता."

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

नवनाथ

शरद
नवनाथ खालीलप्रमाणे :
१] मच्छिंद्रनाथ,
२] गोरक्षनाथ,
३] जालंदर,
४] कानिफ़,
५] चर्पटी,
६] नसग,
७] भरथरी,
८] रेवण,
९] गहिनी.
गहिनीनाथांचे शिष्य निवृतीनाथ नवनाथांत नाहित.

चौसष्ट योगिनी शाक्त पंथातील आहेत. नाथपं थातील नव्हेत.

कबीराच्या विचारसरणीवर नाथसंप्रदायाचा प्रभाव दिसतो. कबीर नाथपंथी नव्हता.

समित्पाणी

बरोबर आहे

मी नावे जशी आठवतील तशी लिहिली आहेत. तरी ६] नसग हे नाव मला आठवत नाही.
असो,
शिवाय नवनाथ नक्की कोण येते या विषयी अनेक मतप्रवाह आहेत. कदाचित हे वेगवेगळे योगी असतील कदाचित एकाच योग्याला अनेक नावे असु शकतील. यामुळे गोंधळ होतो. नाथ पंथिय पण चौसष्ट योगिनी आदि प्रकारांचा अभ्यास करतात कारण मुलतः योग हा विषयच नाथांनी प्रसारीत केला असल्याने या विषयी मतभेद नसावेत असे वाटते. मात्र आपण म्हणता तसे यातले नैपुण्य (?) काही पंथांनी वाटून घेतले असावे...

कबीराला गोरक्षनाथ भेटले(?) असा काहीसा उल्लेख अर्धवट आठवतो आहे पण नक्की माहिती नाही.
तसेच गोरक्षनाथांचा उल्लेख वेदकाला आधी तसेच शंकराचार्यांकडूनही पण आला आहे असे कोणत्या तरी संस्थळावर वाचले.

आपला
गुंडोपंत

कबीर...

कबीर आणि नाथपंथ यावर माहितीसाठी शरद आणि गुंडोपंतांचे आभार. अजून काही मिळाल्यास द्यावे. वाचायला उत्सूक आहे.
-- (उत्सूक) लिखाळ.

अडबंगनाथ ? अलख निरंजन् !

नवनाथांत एक अडबंगनाथही होते असे आठवते, कोणाला काही माहीत आहे का?

"अलख निरंजन" हा नाथपंथीयांचा घोष असे. अलख (अलक्ष्य) म्हणजे "दिसू शकत नाही असा", निरंजन (नि-रंजन) म्हणजे "ज्यावर (बहुधा, कोणत्याही उपाधीचा) डाग/कलंक नाही असा". हे ईश्वराचे नाथपंथीय बेसिक वर्णन असावे.

- दिगम्भा

 
^ वर