एकपत्नित्व - सामाजिक न्यायासाठी

नवीन पिढीला सुरवातीच्या सक्षम होईपर्यंतच्या काळांत आवश्यक ते संरक्षण व आधार मिळून तिचे नीट संगोपन व्हावे म्हणून समाजांत विवाहसंस्था निर्माण झाली असावी. त्यांत शारीरिक सुख व प्रजननाबरोबरच पुढील जबाबदारी घेणे अभिप्रेत असावे.

बहुतेक सर्व प्रगत समाजांत एकपत्नित्वाचा कायदा आहे. त्यानुसार अनेक स्त्रियांशी विवाह करून जबाबदारी घेण्याची क्षमता व इच्छा असलेल्या पुरुषालाही एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करता येत नाही.

समाजांतील प्रत्येक व्यक्तीचा अन्न, वस्त्र, निवारा या नैसर्गिक गरजा भागवण्याच्या हक्काप्रमाणेच वैवाहिक जीवनाचा हक्क मान्य केल्यास एका पुरुषाने किती स्त्रियांशी विवाह करावा हे समाजांतील स्त्रियांची संख्या व पुरुषांची संख्या यांच्या गुणोत्तराच्या आधारावर ठरवावयास हवे.

पूर्वीच्या काळी आजकालच्या मानाने लढाया अधिक वारंवार व्हायच्या व त्यांत बरेच पुरुष मारले जायचे. त्या नंतर साहजिकच स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा खूप ज्यास्त व्हायची. अशा परिस्थितींत बहुसंख्येने असलेल्या स्त्रियांचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून एका पुरुषाला अनेक स्त्रियांशी विवाह करण्याची अनुमति असे. त्यांत पुढील जबाबदारी घेणे ओघानेच येई.

सद्यःस्थितींत स्त्रियांची संख्या व पुरुषांची संख्या यांचे गुणोत्तर एकाच्या आसपास असल्याने एकपत्नित्वाचा (किंबहुना बहुपत्नित्व प्रतिबंधक) कायदा आवश्यकच आहे. नाहीतर आर्थिक किंवा इतर सामर्थ्य बाळगून असणारे जबाबदारी घेण्याची क्षमता आहे या कारणास्तव अनेक स्त्रियांशी विवाह करतील व त्यामुळे इतर काहीजण वैवाहिक जीवनाच्या हक्कापासून वंचित राहतील.

(वरील मजकूर सुमारे दोन वर्षांपूर्वी 'मनोगत' वर टाकला होता. तो येथे नवीन उपक्रमींसाठी परत देत आहे. हाच मजकूर इंग्रजींत भाषांतर करून Thane Plus (Times of India supplement) कडे Monogamy for Social Justice या शीर्षकाखाली पाठवला होता. तो Thane Plus ने Reader's Corner या सदराखाली फेब्रुवारी व जून २००८ मध्ये Marriage is sacred या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. मूळ शीर्षक कायम ठेवण्याने निधर्मवादाला धोका उत्पन्न होईल अशी Thane Plus ला भीति वाटली की काय कुणास ठाऊक?)

आपणास काय वाटते?

Comments

भविष्यात!

सद्या मुलांच्या तुलनेत मुली कमी जन्माला येताहेत आणि त्यातल्या कैक जन्माला येण्याआधी गर्भात अथवा जन्मल्याबरोबर मारल्या जातात. हे असेच राहिले तर एकास एक असे प्रमाण न राहिल्यामुळे मुलगे जास्त प्रमाणात जन्माला येतील आणि भविष्यात एकाच स्त्रीशी अनेक पुरुषांना विवाह करावा लागेल.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हम्म!

समाजांतील प्रत्येक व्यक्तीचा अन्न, वस्त्र, निवारा या नैसर्गिक गरजा भागवण्याच्या हक्काप्रमाणेच वैवाहिक जीवनाचा हक्क मान्य केल्यास एका पुरुषाने किती स्त्रियांशी विवाह करावा हे समाजांतील स्त्रियांची संख्या व पुरुषांची संख्या यांच्या गुणोत्तराच्या आधारावर ठरवावयास हवे.

ढोबळमानाने हे वाक्य ठीक वाटू शकते परंतु अधिक विचार करता फारसे पटले नाही कारण अन्न, वस्त्र, निवारा यापुढे पुरुषाने किती स्त्रियांशी विवाह करावा ही गरज एकांगी वाटते. पुरूष सैन्यात जात आणि कामी येत आणि स्त्रिया एकाकी पडत हाही ढोबळ मानाने ठीकच वाटते परंतु केवळ याच कारणासाठी एक पुरूष अनेक स्त्रियांशी विवाह करतो हे न पटण्याजोगे आहे. ही बहुधा मध्ययुगीन chivalry सदृश कल्पना असावी, प्रागैतेहासीक मानवाचा त्याच्याशी फारसा संबंध वाटत नाही. एक पुरूष अनेक स्त्रियांशी लग्न करतो कारण -

१. माणूस हा ज्या सस्तन प्राण्यांच्या वर्गात येतो त्या वर्गांत एक नर अनेक माद्यांसोबत राहतो. मानवाने ही प्रथा अनेक वर्षे सोडल्याचे आढळत नाही. पुरूषप्रधान संस्कृती अनुसार एका नराने अधिक माद्या ठेवणे हे त्याला शोभेसे आहे हे मानले जाऊ लागले. पुरूषाला एकापेक्षा अधिक स्त्रिया शोभून दिसतात असे वचन अनेकदा वाचले आहे.
२. शेती करू लागल्यावर मानवाला अनेक काम करणार्‍या हक्कांच्या तोंडांची आवश्यकता भासू लागली. अधिक संतती किंवा ज्याला अनेक पुत्र तो धनवान या कल्पनांतून अनेक लग्ने करून आपला वंश वाढवण्याचे कार्य होत गेले.
३. माणसाला प्रदेशावर शासन करण्याची अक्कल आल्यावर आपला प्रदेश सुरक्षित राहावा या हेतूने आणि राजकिय संबंध अबाधित राहावेत या हेतूने किंवा थोरा-मोठ्यांशी आपले संबंध बनावेत या हेतूने आपल्या मुलींची लग्ने राजा, ब्राह्मण अगदी ऋषी मुनींशीही करून देण्यात आली.
४. स्त्री ही आपली संपत्ती आहे आणि संपत्ती ही जितकी मिळवावी तेवढी चांगली हा विचारही पुरातन संस्कृतीत नाकारता येत नाही. दान हे संपत्तीचेच होते.

अनेक ब्राह्मण, वैश्य जे युद्धावर जात नसत त्यांनाही एकापेक्षा अनेक पत्नी असल्याचे दिसते. तेव्हा, केवळ युद्धात कामी आल्याने पुरूष अनेक स्त्रियांशी लग्ने करू लागला हा इस्लामी निष्कर्ष (ह. घ्या) बर्‍यापैकी ढोबळ वाटतो.

१९४७ पुढे ते प्रेमाची भुमीती >>

हिंदु म्यारेज एक्ट ने ही एकपत्नीत्वाची मर्यादा कायद्याने अंमलात् आणली. या रेशनींग विरुद्ध्
तथाकथीत हिंदुत्व वादी प्रवाहांनी बोंब न मारणे हे एक् मुक आश्रर्यच् आहे.
आदर्श रामा पेक्षा दशरथ आपल्या संस्क्रुतीचा अधिक योग्य प्रतीनिधी आहे.
द्रौपदीला पंच पतीव्रतां मधे पद बहाल करणे हे तर आपल्या लैगीक सहीष्णुतेचे सही धैर्य आहे.
आज चे द्रुष्य :
भारतातले >
आपल्या ताकदी व क्षमते नुसार कायद्यात राहून अथवा ना राहून सुखनैव आयुष्य क्रमणारे आधुनीक दशरथ बरया पैकी संखेत् आहेत. थोड्या प्रयत्नाने दिसु शकतील.
आधुनिक द्रौपदीला जाहिर व कायदेशिर सन्मान तर केवळ अशक्य आहेत.
थोडक्यात, स्त्रियांना समान संधी अजुनही नाहि.
डार्विन, अरे, सस्तन प्राण्यां मधे पुरूष ही उपभोगाची वस्तु कधीच असणार नाही का !!?

एकुलत्या एकाच विवाह अथवा संबंधाला सुद्धा सुखी न बनवू शकलेल्यांना २ वा अधीक् संसार हे केवळ अकल्पीत वाटत असतात.

ग्लोबल द्रुष्य >
कथा १>
प्रिंस चार्ल्स > दैव देते आणि कर्म् नेते. डायनाला पचवू शकला नाही.
डायना > ना घरकी ना घाट की >
डोडी > माग्च्यास ठेच पुढचा शहाणा !!

ताकद आणि क्षमता यांचा विचार् न करता या भानगडीत् पडणारे दु:ख कायमचे जडवुन घेतात आणि करूण पणे जिवन संपवतात किंवा मरण भोगत रहातात.

कथा २>
बील > पतीव्रतेच्या पुण्याई ने थोडक्यात् वाचला .
हिलरी > आधुनिक पतीव्रता !
मोनिका > विन विन सिचुएशन नथिग् टु लुज !

ताकद ,क्षमता व् निर्लज्जपणा यांचे यशस्वी नियोजन यामुळे मजेत जगता येते.

लिंग भेदाच्या कुंपणात प्रेमाचे त्रिकोण.चौकोन, पंचकोन आणि वर्तुळ .. सर्व काही शक्य आहे.. मात्र या भुमीती चे गणित पचवायची औकात हवी !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

 
^ वर