फायरफॉक्स ३ - विश्वविक्रमात सहभागी व्हा!

फायरफॉक्स या मुक्तस्रोत न्याहाळकाने गेल्या काही वर्षात जालावर भटकंतीचे परिमाण बदलले आहेत. अनेक नव्या सोयी-सुविधा आणि अधिक सुरक्षित वावर यामुळे फायरफॉक्स अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे. या न्याहाळकाची नवी आवृत्ती, फायरफॉक्स ३ (Firefox 3) लवकरच येत आहे. नव्या आवृत्तीत १४,००० हून जास्त सुधारणा आहेत!

यावेळी नव्या आवृत्तीच्या निमित्ताने २४ तासात सर्वाधिक डाउनलोड्स चा विश्वविक्रम करण्याचा त्यांचा विचार आहे. यासाठी काय करावे लागेल? फक्त 'डाउनलोड डे' च्या २४ तासात फायरफॉक्स ३ ही नवी आवृत्ती डाउनलोड करावी लागेल. 'डाउनलोड डे' ची अधिकृत तारीख अजून जाहीर झाली नाही. पण तोपर्यंत "मी 'डाउनलोड डे' च्या २४ तासात फायरफॉक्स ३ डाउनलोड करेन' अश्या अर्थाची प्रतिज्ञा तुम्ही करू शकता. जगभरात अनेक लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे. आतापर्यंत ३११८ भारतीयांनी अशी प्रतिज्ञा केली आहे. जगभरात २५४३९० लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे.

http://www.spreadfirefox.com/en-US/worldrecord/ या पानावर "Pledge Now!" या बटनावर टिचकी मारून ही प्रतिज्ञा करता येईल. तिथे फक्त तुम्ही कोणत्या भागात राहता ही माहिती द्यावी लागते. विरोप (इमेल) पत्ताही देण्याची सोय आहे, ज्यावर तुम्हाला अधिक माहिती ते कळवत राहतील.

http://www.spreadfirefox.com/en-US/worldrecord/getinvolved या पानावर या उपक्रमासाठी आणखी काय करता येईल याची माहिती आहे.

मी तरी डाउनलोड डे च्या २४ तासात फायरफॉक्स ३ डाउनलोड करण्याची प्रतिज्ञा केली आहे. तुम्ही कधी करणार?

Download Day 2008

Comments

प्रतिज्ञा केली

मी प्रतिज्ञा केली. 'डाउनलोड डे'ची वाट बघतो आहे. धन्यवाद शशांक.

मी सुद्धा

मी सुद्धा प्रतिज्ञा केली. 'डाउनलोड डे'ची वाट बघतो आहे. धन्यवाद शशांक.
येथे त्या दिवशी उपक्रमींना परत एकदा आठवण करून द्यावी म्हणजे बरे नाही का? :)





मी पण

मी पण प्रतिज्ञा केली आहे!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मी ही

केली प्रतिज्ञा....

धन्यवाद

आत्ताच प्रतिज्ञा केली.

नोंद केली

नोंदण्या पाहुन आम्हीही नोंद करुन आलो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिज्ञाबद्ध

वा! चांगली क्लुप्ती आहे फायरफॉक्सची.. फायरफॉक्स आहे इतके चांगले नसते तरी ही छान क्लुप्ती लढवल्याबद्दल प्रतिज्ञा घेतली असती ;)

आताच प्रतिज्ञाबद्ध झालो आहे

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

तुलना

मी फायरफॉक्स या आधी वापरले नाही. आयई ६ किंवा ७ सोडून फायरफॉक्स वापरायचे अशी इच्छा होण्यासाठी दोघांतील तुलना कुठे मिळेल?


यनांच्या कोड्यापासून बटण दाबण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागतो. - ह. घ्या

सध्या बदण दाबण्याचा निर्णय बरोबर आहे का या प्रतिक्षेत...

का? हेनफाफाकावातेपसांना!

हेनफाफॉकावातेपसांना

हे नवीन फाफॉ, का वापरायचे ते पण सांगा ना!

सध्याच्या मासॉआयइ मध्ये काय वाईट आहे?
मला तरी फाफॉ उलट नको वाटते. अनेकदा फा फॉ मधे मराठी अक्षरे तुटक दिसतात.

शिवाय त्यात मला लिहितांना काही चुकले बॅक स्पेस पण वापरता येत नाही.
त्यामुळे मी तरी मागेच फाफॉ वापरणे सोडून दिले होते.

तरी प्रयत्न करून पाहतो.

आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)

इकादिना!

इकादिना =
इथे काहीच दिसले नाही!
http://www.spreadfirefox.com/en-US/worldrecord/getinvolved या पानावर या उपक्रमासाठी आणखी काय करता येईल याची माहिती आहे.

इथे कुठेही मला उपक्रमाचे नावही दिसले नाही. उपक्रम यात कोणत्या प्रकारे सामील आहे हे कळले, तर मराठीच्या प्रेमासाठी तर नक्कीच आम्ही सामील होवू

आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)

'डाउनलोड डे' च्या उपक्रमासाठी

http://www.spreadfirefox.com/en-US/worldrecord/getinvolved या पानावर या उपक्रमासाठी आणखी काय करता येईल याची माहिती आहे.

"या उपक्रमासाठी" म्हणजे 'डाउनलोड डे' च्या उपक्रमासाठी.

नोंद केली

या माहितीबद्दल धन्यवाद.

नोंद केली

मी सुध्दा फायरफॉक्स किमाण ३ वेळा डाऊनलोड करण्याची नोंद केलीये.

माहितीसाठी धन्यवाद.

एकाहून अधिक नको

एकाच संगणकावर एकाहून अधिक वेळा डाउनलोड करू नये असे या उपक्रमाच्या संयोजकांनी म्हटले आहे. (एफएक्यू मध्ये ७वा प्रश्न)

ठीक आहे बॉ.

एका संगणकाहून एकदाच करेन. मग तर झाले ना?

नीलकांत

:)

एका संगणकाहून एकदाच करेन. मग तर झाले ना?

हो चालेल ना. त्याहूनही चांगले म्हणजे तुझ्या माहितीतील तिघांना ही माहिती दे :)

असे का?

फायरफॉक्स ३ रीलीज १ च्या पानावर गेलो तेंव्हा समजले की आता हा ब्राउजर विविध भाषात मिळू शकणार आहे. कुठल्या बघितल्यातर त्यात भारतीय भाषांमधे गुजराथी आणि पंजाबी ह्याच भाषा दिसल्या. मराठी लांब राहीली, हिंदी नाही अथवा देवनागिरी लिपिपण नाही.

आपण काय

आपण काय करू शकतो या साठी?
सगळे उपक्रमी एकत्र मिळून यात काही करत आले तर आवडेल.

आपला
गुंडोपंत

मराठीकरण

http://tech.groups.yahoo.com/group/MarathiOpenSource/ या ग्रुपवर फायरफॉक्स आणि इतर मुक्तस्रोत प्रणाल्यांचे मराठीकरण करण्याचे प्रयत्न सुरू होते. सध्याची स्थिती माहीत नाही.

इथे फायरफॉक्सचे मराठीकरण करणार्‍यांविषयी माहिती आहे. यातले बहुतेक 'मराठीओपनसोर्स' ग्रुपचे सदस्य आहेत. बाकी आय आय टी मुंबईचे आहेत.

जनभारती या सी-डॅक (C-DAC, Centre for Development of Advanced Computing) ने सुरू केलेल्या उपक्रमाचे उद्दिष्ट मुक्तस्रोत (Open Source) प्रणाल्यांचे भारतीयीकरण करण्याचे आहे. पण एकूणच समन्वयाच्या अभावामुळे गाडी पुढे सरकत नाही आहे असे दिसते.

१७ जून

डाउनलोड डे १७ जूनला निश्चित केला आहे याची नोंद घ्यावी.

----

धन्यवाद

राजेंद्र या माहितीबद्दल धन्यवाद! नोंदणी केलेल्या इमेल पत्त्यावर तुम्हाला इमेल आली का?

हो

हो, नोंदणी केल्यावर लगेच आली. आता नोंदणी केलेल्यांची संख्या १,१४७,२२८ झाली आहे!
----

नवीन

फाफॉ ३ वापरायला सुरूवात केली आहे. सध्या तरी वेग ही सुधारणा चटकन दिसण्यासारखी आहे. दुसर्‍या सुधारणा/गमती दिसल्यास कृपया इथे द्याव्यात.
----
"मै तेजा हूं, मार्क इधर है"

उतरवून घेतले

आता नवीन आवृत्तीत काय फरक आहे, ते वापराने हळूहळू कळेल.

मीही

मीही आताच उतरवून घेतले. आता वापरून पाहू.

दुवा

फाफॉ ३ मुळे मराठी टंकलेखन अधिक सुलभ.
दुवा

----

काही अनुभव

काही थीम्स आणि ऍडऑन्स व्यवस्थित काम करत नाहीत. :(





फा फॉ ३.५

फायरफॉक्सची ३.५ ही आवृत्ती विंडोजसाठी उपलब्ध झाली आहे असे कळते. लायनक्सवाल्यांसाठी अद्यापही रिलीज क्यांडिडेटच उपलब्ध आहे. जावास्क्रिप्टसाठी ट्रेसमंकीचा वापर, मेमरी लीकच्या अडचणीवर तोडगा आणि प्रायवेट ब्राऊजिंगची सोय अशी ठळक वैशिष्ट्ये आहे.

रिलीज क्यांडिडेट ३.१ च्या तुलनेत थोडा वेगवान वाटला. फाँटही थोडे बरे दिसत आहेत, भरमसाट मेमरी खात नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर