छायाचित्र टीका २

छायाचित्र टीका २:

नमस्कार मंडळी. अजुन एक चित्र.

शिवलिंग

हे चित्र मी गोमुख येथे काढले आहे. चित्रात दिसणारे शिखर दिसायला गणेशासरखे दिसत असले तरी याचे नाव आहे शिवलिंग. भागीरथ पर्वतामधुन गंगेचा उगम होतो त्याच्या उजव्या बाजुला हे शिखर आपल्याला दिसते.

EXIF
Camera: Nikon D40
Exposure: 0.006 sec (1/160)
Aperture: f/22
Focal Length: 55 mm
ISO Speed: 200
Exposure Bias: -2/3 EV
Metering Mode: Pattern

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर निळी रंगसंगती

कृष्ण-धवल + एक प्राथमिक रंग असलेली चित्रे रंगाच्या दृष्टीने मोठीच दृष्टिवेधक असतात.

इथे "रूल ऑफ थर्ड्स" वापरायला हवा होता, असे राहून-राहून वाटते.

पुढच्या भूमीवरती काळे खडक आहेत, त्यांची एक आडवी "क्षितिजरेषा" तयार होते. ती रेषा खालून तृतीयांशावर असायला हवी होती असे वाटते. शिखराच्या डोक्यावरही चांगला एक तृतीयांश कोरा निळेपणा आहे, तो नको होता. शिखर जवळजवळ फोटोची वरची सीमा भेदणार असे वाटले असते तर ते अधिक "उत्तुंग" भासले असते.

(उभ्यातल्या एक-तृतीयांशात डोंगर घेऊन, क्रॉप करून, हा फोटो माझ्या कल्पनेत जमत नाही. जर तसा घ्यायचा असता, तर एकीकडे भले मोठे कोरे आकाश येते. त्यात एकतरी ढग असता तर ठीक... पण आकाश निरभ्र दिसत आहे...)

आणखी एक कल्पना - जर डोंगराला कंटाळवाण्या मध्यातून बाजूला ढकलायचे असेल तर रिकाम्या बाजूला (फोरग्राउंडमध्ये) काहीतरी विशेष टाकावे (फोटो काढतानाच). जवळचा एखादा मोठा ओबडधोबड खडक, वगैरे. जमिनीवर खाली बसून जवळचा छोटा खडकही फोटोमध्ये "मोठा" दिसू शकतो.

सहमत आहे

फोटो घेताना तो उभा घेउन खालील काळ खडक आणखी येऊ देउन वरचे आकाश थोडे कमी करायला हवे होते. शिवलिंगाच्या डावी आणि उजवीकडे असणरी मोकळी जागा पण टाळता आली असती.

चित्राचे एक्स्पोजर मात्र एकदम अचूक झाले आहे. बर्फाचे फोटो काढताना बर्‍याचदा फ्रेमचा बहुतांश भाग पांढरर्‍या रंगाने भरला की कॅमेर्‍याचा लाईट मिटर तो राखाडी करुन टाकतो. आणि त्यामुळे बर्‍याचदा बर्फात काढलेले फोटो काळपट दिसतात. ह्यावर उपाय म्हणून आकाशावर फोकस करुन चित्र कंपोज केले जाते किंवा लाईट मिटरची सुचना धुडकावुन लावुन एक किंवा दोन स्टॉप जास्त घ्यावे लागते. ह्या चित्रामध्ये ती तांत्रिक बाजू व्यवस्थित सांभाळल्याने पांढरा शुभ्र बर्फ खुलुन दिसतो आहे.

छान

एकुण चित्र सुंदर आहे. टिकाकार म्हणून न पाहता खुपच सुंदर जाणवते.

फोटो उभा कधी काढावा आणि आडवा कधी? मी शक्यतो अनेक निसर्ग चित्रे आडवीच पाहिली आहेत.





छान

छान चित्र !

पोलरायजर वापरला का? आकाश छान दिसत आहे. प्रकाश छान आहे.

चित्रा मध्ये पर्वाताच्यावरचे आकाश जास्त सुटले आहे असे वाटते. धनंजयांनी सुचवल्याप्रमाणे एखादी मोठी शिळा मध्ये घेतली असती तर तीनमितींचा भास तयार झाला असता.. तसेच शिळेच्या तुलनेत पर्वत खूप मोठा भासून त्याचे सत्य रूद्र स्वरुप समोर आले असते. हिमालयातल्या या मोठमोठ्या शिखरांच्या बाबतीत अनेकदा समोर एखादे तुलनेसाठी प्रमाण नसल्याने उंची-खोली-अजस्रता यांचा अंदाज येत नाही.

शिवलिंगासारखा पर्वत सपाट भागातून अचानक वर आल्यासारखा दिसत असल्याने तो चित्रात फार छान दिसतो आणि त्याचमुळे शिवलिंगासाठी आडवे चित्रच मला चांगले वाटते..

-- लिखाळ.

धन्यवाद्

सर्वांना सल्ल्यांबद्दल धन्यवाद.

लिखाळ, पोलरायजर वपरला नाही. ऊन जास्त असल्याने, एक्सपोजर २ स्टॉप कमी ठेवले त्यामुळे बर्फाचा रंग व मागचे आभाळ व्यवस्थीत टिपता आले.
-
ध्रुव

तिनच ना?

मला यातले फारसे काही कळत नाही त्यामुळे मी आपला
ते तुम्ही दिलेले कॉपीराईटचे मार्क शोधत बसलो...
तीनच आहेत ना?
की दगडात पण आहे एखादा?

आपला
गुंडोपंत

होय

होय तिनच...! :)

-
ध्रुव

ओके

कारण खुप शोधून पण दगडात काही मिळेना...

आपला
गुंडोपंत

काय विचार?

पंत एवढे शोधताय. विचार काय आहे? :)

ध्रुव, हे तुझे नाव, असे कसे टाकलेस बुवा? अनेक प्रकाशचित्रकारांच्या संकेतस्थळावर मी असे केलेले पाहिले आहे. जरा माहिती देशील का?





काय

विचार
असणार बाबा माझा?
फोटो मधले काही कळत नाही म्हणून
मी आपला काही तरी 'टैंपास' करत होतो.

आपला
गुंडोपंत

चित्रावरचे नाव

चित्रावर नाव टाकायला कुठल्याही सॉफ्टवेअरचा उपयोग करा. © हे टाकण्यासठी या अक्षराची आस्की टंकीत करा. ALT बटण दाबून ०१६९ या क्रमाने बटणे दाबा.
-
ध्रुव

 
^ वर