'ऊंझा-जोडणी' आणि मराठी शुद्धलेखन

गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे १९९९ भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) ऱ्हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ‍ी ) व ऱ्हस्व उ ( ‍ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला. (उदा. वीद्या, शीक्षक, वीनंती, रुप, वधु, धुर इ.)...
...

वरील ठराव झाला त्याच दिवसापासून आणंद येथे प्रकाशित होणारे 'मध्यान्तर' दैनिक व जवळजवळ वीस नियतकालिकांचे मुद्रण वरील ठरावानुसार होऊ लागले. अंदाजे पन्नास लेखकांची साठाहून अधिक पुस्तके अशा 'ई-उ'च्या फरकाप्रमाणे प्रकाशित झालेली आहेत. अजूनही होत आहेत. गुजराती भाषेतील वरिष्ठ प्रकाशन संस्था 'इमेज पब्लिकेशन्स' व सुरतेची 'साहित्य संकुल' वगैरे कित्येक प्रकाशन संस्था पण ऊंझा जोडणीच्या धोरणानुसार प्रकाशने करीत आहेत.

ऊंझा-जोडणी पुढे वाचा


प्र. : 'ऊंझा जोडणी'च्या वरील ठरावाप्रमाणेच मराठीत भाषेतही शुद्धलेखनाचे नियम सोपे व्हावेत, असावेत का?




लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद!

धन्यवाद!

काय चांगली बातमी दिली राव. सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

होय

> प्र. : 'ऊंझा जोडणी'च्या वरील ठरावाप्रमाणेच मराठीत भाषेतही शुद्धलेखनाचे नियम सोपे व्हावेत, असावेत का?
होय. मला वाटते की भविष्यात मराठीचे नियमही बहुधा असे होतील. असे झालेत तर काही मोठा तोटा होणार नाही. काही प्रमाणात फायदा होऊ शकेल.

पण आज अनेक लोकांना ह्रस्व-दीर्घ फार प्रिय वाटतात. त्यामुळे हा फरक नजिकच्या भविष्यकाळात होणार नाही, असेही मला वाटते. (हल्लीच एक लेखन-नियमांची अभ्यास-समितीने अहवाल सादर केला आहे. आणखी काही वर्षे तरी असा मोठा प्रयास बहुधा होणार नाही.)

स्वागत आहे.

'ऊंझा जोडणी'च्या वरील ठरावाप्रमाणेच मराठीत भाषेतही शुद्धलेखनाचे नियम सोपे व्हावेत, असावेत का?

होय, मराठी लिहिणे अधिक सोपे होणा-या अशा बदलाचे आम्ही आनंदाने स्वागत करु !!!
शुद्धलेखनाच्या नियम क्र. ६ ची गरज नसावी आणि नियम क्र. १३ बोलण्यातील उच्चारणाप्रमाणे लिहिण्याची सोय असावी. तर नियम १४,१५,१६,१७ ची आवश्यकताच नाही असे वाटते. शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.

आम्ही शुद्धलेखनावर इथे चर्चा केली होती.

अवांतर : चित्त, कोणाला सांगू नका आपल्या दोघातच ठेवा, अशा लेखनाला विद्यार्थ्यांच्या मराठीच्या उत्तरपत्रिका तपासणी करणा-यांनी केव्हाच मान्यता दिली आहे, असे वाटते. ;)

प्रश्नचिन्ह

गुजराती भाषा परिषदेचा निर्णय कसा आहे काही कळत नाही.

पाणी/पाणि किंवा दीन/दिन किंवा सूत/सुत अशा शब्दांमधला फरक कसा कळणार. गुजरातीमध्ये दीर्घ-र्‍हस्वानुसार अर्थ बदलणारे शब्द नाहीत हे मनाला पटत नाही. (मला गुजराती आवी नथी छे! ;)) )

पण शुद्धलेखनाच्या बागुलबुवामुळे लिहायला घाबरणारी मंडळी लिहू लागतील असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वाक्याचा अर्थ पाहावा !!!

वाक्यातून काय अर्थ ध्वनीत होतो. त्या प्रमाणे त्या शब्दाचा अर्थ ध्यानात घ्यावा.

मला पाणी दे , इथे पाणी प्यावयाचे आहे. हाच अर्थ लक्षात येतो.
माला पाणि दे, असे म्हटले तरीही पाणी प्यावयाचे आहे, असाच अर्थ लक्षात येतो.

( आता इथे तुम्ही म्हणाल 'मला 'हात' दे, असा अर्थ ध्वनीत होतो तर मग काही विलाज नाही. )
'पाणिग्रहण' च्या वेळेस पाणी पीले आहे आणि विवाहधर्माने स्त्रीचा स्वीकार करणे. इथे प्रसंग पाहून अर्थ लक्षात घेतला पाहिजे :)

पण शुद्धलेखनाच्या बागुलबुवामुळे लिहायला घाबरणारी मंडळी लिहू लागतील असे वाटते.
सहमत आहे.

-दिलीप बिरुटे
(शुद्धलेखनापेक्षा त्याचे स्तोम माजविणा-यांना घाबरणारा)

शब्दांतले फरक आणि पंचाइत

शब्द कुठे वापरला आहे यावरून शब्दांतले फरक समजणे सहज असते. जसे इंग्रजीत एकाच स्पेलिंगचे परंतु वेगळ्या अर्थाचे शब्द पहा,

पाउंड - १. हे मोजमापाचे परिमाण आहे
२. धडधडणे अशा अर्थी वापरले जाते.
३. भटक्या जनावरांना बंदिस्त करण्याची जागा म्हणून वापरले जाते.

बॉल : १. चेंडू
२. नृत्यप्रकार

लाईट: १. हलका
२. प्रकाश

परंतु असे लिहायचे झाले तर आपलि, म्हणजे ज्यांना र्‍हस्व दिर्घ लिहायचि सवय आहे त्यांचि पंचाइत होइल त्याचे काय?

पती गयु - म्हणजे (प्रतिसाद) संपला ... नवरा गेला असे नाही ;-)

ऊंझा जोडणी

शरद
प्रा.दिलीप साहेब यांस,
ऊंझा जोडणी स्विकारली तर बोलण्यातील उच्चारणाप्रमाणे लिहिण्याचा प्रश्नच कोठे उद्भवतो? ई-ऊ , उच्चार
कसाही असला ,तरी दीर्घच लिहावयाचे आहेत ना? की चुकले काही?
समित्पाणी [वर्गांत मागे बसणारा]

सहमत आहे.

ऊंझा जोडणी स्विकारली तर बोलण्यातील उच्चारणाप्रमाणे लिहिण्याचा प्रश्नच कोठे उद्भवतो? ई-ऊ , उच्चार
कसाही असला ,तरी दीर्घच लिहावयाचे आहेत ना

सहमत आहे. आपण बरोबर आहात असे वाटते.

मराठीत भाषेतही शुद्धलेखनाचे नियम सोपे व्हावेत, असावेत का? याच्या उत्तराच्या अनुषंगाने शुद्धलेखनाचे नियमासंबधी आम्ही आमचे मत व्यक्त केले आहे.

तुका म्हणे-

तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे||

;);)

सुलभीकरणाचे व्यसन नको

जरा त्रास होऊ लागला की आरडाओरडा करून सुलभीकरण घडवून आणता येते अशी भावना निर्माण झाली की कुठलीही प्रचलित गोष्ट कठीण वाटू लागेल. त्यापासून सावध.

सुलभीकरण

मिंग्लिश, हिंग्लिश या सुलभीकरणातुनच तयार झाल्या. माणसाच्या उत्क्रांतीत उपयोग नसलेले अवयव हळू हळू गळुन पडायला लागले. तसेच सुलभीकरण अपरिहार्य आहे.
प्रकाश घाटपांडे

मेंदू निकामी व्हावा का?

माणसाच्या उत्क्रांतीत उपयोग नसलेले अवयव हळू हळू गळुन पडायला लागले.

त्याचबरोबर Use it or lose it हा नियमही लक्ष्यांत घ्यायला हवा. या नियमाप्रमाणे न वापरलेले अवयव निकामी होतात. मेंदूचे काही भाग निकामी झालेले आपल्याला चालेल काय?

लुज इट

मेंदु उत्क्रांत होत गेला तसे ज्याची युज करण्याची गरज नाही तो लूज होतो. ॐ चे ओम् हे सुलभी करण चालू आहेच. ॡ तर वापरात दिसत नाही. काठीण्याचा अट्टाहास नको इतका सोपा आग्रह आहे. उंझा जोडणी हा त्याचाच भाग आहे.
प्रकाश घाटपांडे

मेंदूचा भाग

>>मेंदूचे काही भाग निकामी झालेले आपल्याला चालेल काय?

नाही चालणार हो पण इथे फक्त मेंदूचे भाग निकामी असं म्हणून चालणार नाही. मेंदूचे उपयोग नसलेले भाग निकामी झाले तर चालेल का असा प्रश्न हवा. नको असणार्‍या भागांची शरीराला वाढीसाठी शारीरिक आणि बौद्धिक, गरज नसते तेव्हा कदाचित मेंदूचे निरुपयोगी भाग निकामी झालेले चालून जाईल.

-राजीव

शुद्धलेखन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे १९९९ भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) ऱ्हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ‍ी ) व ऱ्हस्व उ ( ‍ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला. (उदा. वीद्या, शीक्षक, वीनंती, रुप, वधु, धुर इ.)...''

....
या पेक्षा पुढील प्रमाणे ठराव केल्यास लेखनकर्म अधिक सुलभ होऊ शकेल.
"ह्रस्व-दीर्ध अशा इ-ई तील कोणताही स्वर लेखनात वापरावा. तद्वतच उ-ऊ विषयी."
म्हणजे: विद्यानिकेतन,विद्यानीकेतन, वीद्यानिकेतन, वीद्यानीकेतन .....सर्व शुद्ध.
तसेच : गुरुदक्षिणा, गूरुदक्षिणा, गूरूदक्षिणा, गूरूदक्षीणा..इ. सर्व शुद्ध.
....

शुद्धलेखन हवेच!

कुणाला आवडो वा न आवडो शुद्ध लेखन हे हवेच. प्रत्येक गोष्टीत एक मापदंड/मानदंड असायलाच हवा. मात्र तो बंधनकारक, जाचक असू नये इतकेच. पण आपल्याला जर एखाद्या गोष्टीत काही साध्य करावयाचे असेल तर मग नेमकेपणाला आणि परिपुर्णतेला दुसरा पर्याय असू शकत नाही.

जो तो आपल्या मगदुराप्रमाणे लिहीत असतो. त्यात क्षुल्लक चुका क्षम्य ठरू शकतात. कारण सामान्यपणे फारच थोडे लोक ह्याबाबत जागरुक असू शकतात आणि त्यांना त्याबद्दलचे योग्य ते ज्ञान आणि भानही असते असे दिसून येते. जागरुक असूनही चुका करणारे(माझ्यासारखेही) लोक असतातच. तेव्हा चुका कमीत कमी करण्याकडे कल असावा असे वाटते. मजकुर वाचताना पदोपदी जर अशुद्धलेखनाचे खडे लागणार असतील तर विषय कितीही चांगला मांडला असला तरी जेवणात खडे लागल्यावर होतो तसा रसभंग होतो. तेव्हा आपल्याला जमेल तितके शुद्धलेखन पाळण्याचा प्रयत्न करणे हे उत्तम. मुळात सुधारणा करण्याची वृत्ती हवी की मग हळूहळू सगळे जमू शकते.

बोली भाषा लेखनात वापरायला अजिबात हरकत नाही पण त्यातही त्या भाषेचा लहेजा सांभाळणे ..हेही शुद्ध लेखनच ठरते.
त्यात सरमिसळ नको. केवळ काना/मात्रा/वेलांटी सांभाळणे म्हणजेच शुद्ध लेखन नव्हे.
एकूण काय तर शुद्धलेखनाचा आग्रह हवाच!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

कशाला हवे शुद्धलेखन !!!

शुद्धलेखनाचा आग्रह धरणा-यांनी तो जरुर धरावा. वाटल्यास शुद्ध लिहिण्याचा प्रयत्नही करावा पण इतरांनी तसेच करण्याचा आग्रह धरु नये. भाषेचा गूणच असा आहे की पुर्वी असे म्हटल्या जात होते की, प्रत्येक मैलावर भाषा बदलत असायची आता ती प्रत्येक व्यक्तिनुसार बदलत आहे. प्रत्येकजण आप-आपल्या व्यव्हारातील भाषा संवाद साधतांना वापरत असतो. तेव्हा त्यांचे लेखन असे-असेच हवे, असे म्हणने भाषा प्रवाही करण्याऐवजी तिला संकुचित करण्यासारखे वाटते. जसे पुर्वी काही शब्द लिहितांना 'नांव' च्या ऐवजी पुढे बदल होऊन 'नाव' असे झाले. याचाच अर्थ असा काही काळानंतर भाषेत बदल होणे हे भाषेचे प्रवाहिपणासाठी मदत करते, जीतकी सुलभ भाषा तितकी ती लोकांची आवडती भाषा होते. लेखनातून आशय समजतो ती भाषा शुद्ध, बस इतकेच आम्हाला समजते !!!

मराठी भाषेचे अधिक नुकसान कोणी केले असेल तर आपल्या सारख्या ज्ञानी माणसांनी. ती भाषा सामान्यजनांची होऊच नये, किंवा सामान्यजनांनी लिहूच नये यासाठी काही चौकटी आखून दिल्या आणि माझ्या सारखा भाषेवर प्रेम करणारा माणूस सतत लेखनापासून दूर राहिला !!!

-दिलीप बिरुटे

क्या बात है!

मी या भानगडीत पडायचेच नाही असे ठरवले होते!
फक्त वाचत होतो.
पन तुमचा प्रतिसाद इतका भारीतला आहे की त्याला दाद न देणे हा त्यावर अन्याय आहे असे वाटून लिहितोय!

आगे बढो सर! हम कायमच तुम्हारे साथ है!

आपला
गुंडोपंत

प्रमाणलेखन

उंझा जोडणीचा लेख शुद्धलेखनाला काट द्या असा नसून र्‍हस्व दीर्घाचे नियम शिथिल करणे असा असावा. येथे ज्ञान हा शब्द द्न्यान असा लिहावा किंवा संस्कृती हा शब्द संस्क्रुती असा लिहावा असे सूचित केलेले दिसले नाही.

तसेही, शुद्धलेखन या शब्दालाच सर्वप्रथम काट देणे आवश्यक आहे.

ऊंझा?

अर्थात फक्त दीर्घ ई ( ‍ी ) व ऱ्हस्व उ ( ‍ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला

असे आहे तर ऊंझा काबरे 'ऊंझा' असे लिहितात उंझा का नाही? (अगदी गुजरातीतही)

बाकी

पण शुद्धलेखनाच्या बागुलबुवामुळे लिहायला घाबरणारी मंडळी लिहू लागतील असे वाटते.

या कर्णाच्या मताशी सहमत

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

सुलभ लेखन

सरकारी समित्या किंवा परिषदा जेंव्हा असे नियम करतात तेंव्हा त्यांचा रोख हा शैक्षणिक अभ्यासक्रमावरच असतो असे मला वाटते. एखाद्या कथासंग्रहामध्ये व्याकरणाच्या नियमांची ऐशी की तैशी केली असेल तर सरकार काही त्यावर बंदी लादू शकत नाही. अगदी तसेच कुणी ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका केल्या म्हणून उपक्रमावरून त्याचा प्रतिसाद उडविला जात नाही. त्यामुळे अशा नियमांचा सर्वाधिक त्रास हा विद्यार्थ्यांनाच होत असतो.

मात्रा, विभक्ती, उभयान्वयी अव्यये, इत्यादी बोजड शब्दांमुळे विद्यार्थ्यांना व्याकरणाची भीती वाटते. शालेय स्तरावर केवळ ऱ्हस्व-दीर्घ आणि जोडाक्षरे कशी लिहावी हे सोप्या पद्धतीने शिकविले तर चालणार नाही का? त्यातही कोणी चुकलाच तर त्याचे गुण कापू नयेत. सरावाने गोष्टी जमू लागतात. व्याकरणापेक्षा सुलभ लेखन शिकविण्याची गरज आहे. परंतु आपल्याकडे पुढे जाऊन प्रत्येक विद्यार्थी लेखकच झाला पाहिजे अशा अपेक्षेने शालेय स्तरावर भाषा शिकविल्या जातात.

... असे असले तरी भाषेची अंगभूत गुण वैशिष्ट्ये जपली पाहिजेत असे मला वाटते. प्रवाहीपणा हा भाषेचा गुण आहे हे मान्य आहे. परंतु सरकारी (अधिकृत) नियमांची मागील ४६ वर्षे वगळता सात साडेसातशे वर्षांच्या काळात कोणी व्याकरणाच्या नियमांची सक्ती केली होती का? काळाच्या ओघात ऱ्हस्व-दीर्घ जर बाद होणार असतील तर त्यांना त्यांच्या गतीने जाऊ द्या. दहा बारा लोकांनी एकत्र येऊन भाषेला प्रवाहित करणे किंवा नियम करुन भाषेची प्रगती एक्सेलरेट करण्याचा प्रयत्न हास्यास्पद वाटतो.

जयेश

प्रतिसाद आवडला आणि असेच वाटते

हा प्रतिसाद फार आवडला.

"काळाच्या ओघात ऱ्हस्व-दीर्घ जर बाद होणार असतील तर त्यांना त्यांच्या गतीने जाऊ द्या. दहा बारा लोकांनी एकत्र येऊन भाषेला प्रवाहित करणे किंवा नियम करुन भाषेची प्रगती एक्सेलरेट करण्याचा प्रयत्न हास्यास्पद वाटतो," हे जयेश ह्यांचे म्हणणे बिलकुल पटले.

काळानुसार कुठलीही भाषा आणि त्या भाषेतील प्रमाणलेखनाचे/शुद्धलेखनाचे नियम बदलणारच. ह्या गोष्टींत हळूहळू उत्क्रांती होणारच. पण ही उत्क्रांती नैसर्गिकरीत्या होऊ द्यावी. लेखनाच्या नियमांच्या सुलभीकरणाची/सोपीकरणाची दिशा आणि गती मराठी बोलणाऱ्या-लिहिणाऱ्यांवर लादू नये, असे मलाही वाटते.

असेच

असेच म्हणतो.





वा.. अगदी बरोबर

काळाच्या ओघात ऱ्हस्व-दीर्घ जर बाद होणार असतील तर त्यांना त्यांच्या गतीने जाऊ द्या. दहा बारा लोकांनी एकत्र येऊन भाषेला प्रवाहित करणे किंवा नियम करुन भाषेची प्रगती एक्सेलरेट करण्याचा प्रयत्न हास्यास्पद वाटतो.
वा वा .. आपले हे मत खरेच योग्य आहे..
प्रतिसाद फार आवडला..
--लिखाळ.

मुळाशी जाऊ या!

काळाच्या ओघात ऱ्हस्व-दीर्घ जर बाद होणार असतील तर त्यांना त्यांच्या गतीने जाऊ द्या.

मला वाटतं, र्‍हस्व दीर्घही काही गरजेपोटी काळाच्या ओघांत निर्माण झाले असावेत. ते का निर्माण झाले असावेत हे समजून घ्यायला हवे. एखादी गोष्ट जुनी किंवा कठीण असली म्हणजे टाकाऊ असतेच असे नाही.

मोडी

र्‍हस्व दीर्घही काही गरजेपोटी काळाच्या ओघांत निर्माण झाले असावेत. ते का निर्माण झाले असावेत हे समजून घ्यायला हवे

माझ्या मते, छापखाने सुरू झाल्यावर मराठीने देवनागरीचा स्वीकार केला तेव्हा हे र्‍ह्स्व-दीर्घ आले. पूर्वी मराठी मोडी लिपीत लिहिली जात होती. आणि मोडीत हे र्‍ह्स्व-दीर्घ प्रकार नाहीत (चुभूद्याघ्या).

तेव्हा र्‍हस्व-दीर्घाला फार मोठी परंपरा आहे अशातला भाग नाही.

मराठीला र्‍हस्व-दीर्घाची गरज नाही असे माझे मत आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिहिणे आणि उच्चारणे

मोडीत 'कसे' लिहीत होते ते महत्त्वाचे नाही, तर लिहिलेले कसे उच्चारीत होते ते महत्त्वाचे. जेव्हा बालबोध लिपी प्रचारात आली तेव्हा ते 'तसले मोडी उच्चार' लक्षात घेऊनच प्रमाण-लेखनाचे नियम आपोआप बनले. इंग्रजीत 'काहीतरीच वाटणारे' स्पेलिंग असले तरी शब्दाचा योग्य उच्चार होतो. तसे मोडीचे होत असले पाहिजे. (फ़्रेन्चमध्येतर स्पेलिंग आणि उच्चाराचा सकृत्‌दर्शनी, बहुधा संबंध नसतो!) आता अशास्त्रीय नि छापायला आणि शिकवायला अवघड अशा मोडी लिपीत सुधारणा करून आपण बालबोध लिपी वापरत आहोत; तर परत मोडी लिपीसारखे अशुद्ध लिहायचे का, हे ज्याचे त्याने ठरवावे. प्रमाण-लेखन मात्र ठरवण्याचा कुणालाही वैयक्तिक अधिकार नाही.

भाषा जेव्हा जन्माला येते, तेव्हा ती बोलीभाषा असते. उच्चार जसजसे पक्के होऊ लागतात तसतसे त्या विशिष्ट उच्चारांना प्रमाण मानले जाऊ लागते. आणि जेव्हा असे प्रमाण उच्चार विशिष्ट स्वरूपात लेखनात येतात, तेव्हा तसे लिखाण अधिकृत होते. सर्व भाषांचे असेच होत आले आहे, मराठी काही जगातल्या इतर भाषांपेक्षा वेगळी नाही. तिला इतर भाषांप्रमाणेच राहू द्यावे, ढवळाढवळ करून तिला अप्रामाणित करू नका. -व्वाचक्‍नवी

लिहिणे आणि उच्चारणे : आणि, पाणी इ.

मोडीत 'कसे' लिहीत होते ते महत्त्वाचे नाही, तर लिहिलेले कसे उच्चारीत होते ते महत्त्वाचे

आणि व पाणी यातील "णि" आणि "णी" च्या उच्चारात फरक करणारा मराठी मी अद्याप पाहिलेला नाही. (पूर्वग्रह बाजूला ठेऊन) तुम्हीही उच्चार करून पहा.

जर उच्चारात फरक नसेल तर एक र्‍हस्व आणि दुसरा दीर्घ ठेवणे हा निव्वळ दूराग्रह!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मायेचे पूत आणि हरीचे लाल कुठे सापडतील?

मी उच्चार करून पाहिला आणि चार लोकांना करायला लावून ऐकला. 'तुम्ही आणि आम्ही' हे शब्द उच्चारायला सांगितले. एकही मायेचा पूत असा निघाला नाही की ज्याने 'तुम्ही आणी ऽ मी' असला उच्चार केला. 'नंतर मला प्यायला पाणी देता का?' हे विचारायला सांगितले . एकही हरीचा लाल असा नव्हता की जो मला 'पाणि‌‌द्‌या" असे म्हणाला. हे 'आणीऽऽ आणि पाणि' कुठे ऐकायला मिळतील यासाठी आता जगभर दौरा करून शोध घ्यायला पाहिजे. --वाचक्‍नवी

सर्वच

स्वतःला मराठी समजणारे सर्वच मायेचे पूत आणि हरीचे लाल र्‍ह्स्व उच्चार करतात. ज्यांना कानावर कातडे ओढून बसायचे आहे त्यांनी खुशाल बसावे.

उदाहरणार्थ आजच्या लोकसत्तेतील पत्र वाचावे. दुर्दैवाने मला दुवा देणे जमत नाहीये. त्यात पत्र लेखकाने "कवी" आणि "कविकल्पना" यातील "वी" आणि "वि" हे उच्चार "वि" असेच उच्चारले जातात असे दाखवले आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कवि आणि कविकल्पना

कवी आणि कविकल्पना या दोघांतील 'वि' कोणी र्‍हस्व उच्चारत असतील तर ते उच्चारण तमाम भारतीय भाषांच्या उच्चारणाप्रमाणे शुद्ध उच्चारण आहे. केवळ मराठी आणि गुजराथी 'विद्वानां'नी अशुद्ध उच्चारणाला उत्तेजन दिले आहे. --वाचक्‍नवी

मायेचे पूत आणि हरीचे लाल इथेच सापडावेत

आणि चा उच्चार बरेचदा बोलता बोलता आणीऽ असा होताना मी अनेकदा ऐकला आहे आणि स्वतःही केला असावा(?) विशेषतः आणि? हे प्रश्नात्मक विचारल्यावर जोर देऊन खेचण्यासाठी. परंतु आणि व पाणी यांचे उच्चार सहज वेगळे करता येतात हे मान्य पण एकच उच्चार करणारेही असावेत.

ज्याप्रमाणे श आणि ष चे वेगवेगळे उच्चार न करणारे अनेकजण आढळतील तसेच सर्व र्‍हस्व दीर्घ सांभाळून बोलतात असे वाटत नाही.

निगडीत हा शब्द तुम्हीच मागे दाखवून दिल्याने चांगला लक्षात आहे. निगडित म्हणजे संबंधित आणि निगडीत म्हणजे निगडी या गावात परंतु दोन्ही शब्दांचे दीर्घ उच्चारच सहसा ऐकले आहेत.

अवांतर: आमच्या शाळेचे एक ट्रस्टी होते. त्यांना भाषणास बोलावले की ते बरीचशी वाक्ये पूर्णविरामाने पूर्ण न करता त्याला आणीऽऽ लावून वाक्ये जोडत असत. आम्ही पोरे त्यांचे आणीऽऽ मोजत असू. ५०० शब्दांच्या भाषणात १०० आणीऽऽ सहज निघत.

निगडित / निग्डित

निगडित म्हणजे संबंधित आणि निगडीत म्हणजे निगडी या गावात परंतु दोन्ही शब्दांचे दीर्घ उच्चारच सहसा ऐकले आहेत.

या निगडित माझे थोडे वेगळे निरिक्षण आहे.
निगडित (संबंधीत) आणि निगडीत (निगडीमध्ये) हे ठिक वाटत नाही. कारण उच्चार करताना मी दोन्ही वेळी 'डि' र्‍हस्वच उच्चारतो. मात्र "ग" च्या र्‍हस्व दिर्घ स्वराने अर्थ स्पष्ट होतो. जसे निगडित (म्हणजे संबंधीत) आणि निग्डित म्हणजे निगडी शहरात असा उच्चार होतो. (इथे 'ग्' अर्धा नाहि आहे पण र्‍हस्व ग काढता येईना)

" या की! निगडीत भेटुया ना!" असे म्हटले जात नाही माझ्या निरिक्षणानुसार "या की! निग्डित भेटुया ना! "असे म्हटले जाते.
तुम्हाला ठिक वाटते का माझ्याच उच्चारातच घोळ आहे?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

आणीऽऽऽ...दीर्घ विराम!

(तुमच्या ट्रस्टींप्रमाणे)'आणि' हा शब्द उच्चारून दीर्घ विराम घेतला तर 'णी' चा उच्चार दीर्घ होऊ शकेल, पण दोन शब्दांमध्ये येणार्‍या 'आणि'मधला 'णि" र्‍हस्व उच्चारणे सहज नाही. करून पहा--राम आणि शाम. तू आणि मी, काळं आणि पांढरं ,सांगितलं आणि केलं वगैरे. आता ज्यांनी चुकीचे व सहज प्रवृत्तीला न मानणारे उच्चारच करायचे ठरवले असेल त्यांना परमेश्वरच माफ करेल.

न जाणें न नेणें अशा पामराला । बुझावूं शकेना विधाता तयाला ॥

सप्तमी विभक्तीच्या-- आंत, ईंत, ऊंत, एंत या प्रत्ययांतील 'त'पूर्वी येणारे अक्षर नेहमीच दीर्घ म्हणजे दोन मात्रांचे असते. ते र्‍हस्व उच्चारले तर 'त'चा उच्चार 'त्त्‌' असा होतो. 'निगडीत' चा उच्चार निग्डित्‍त्‌‌‌ असा होणे कदापि योग्य नाही.
>श आणि ष चे वेगळे उच्चार करणे सोपे नाही, ते प्रयत्‍नपूर्वक शिकावे लागतात. 'गोष्ट' मधल्या ष्ट चा उच्चार सहसा श्ट असा होत नाही. तसा उच्चार करायला मुद्दाम प्रयत्‍न करावा लागतो. कष्ट, पापिष्ठ, उष्ण हे उच्चार करताना 'ष'चा योग्य उच्चार ऐकू येतो. आणि सवयीने श-ष चे वेगळे आणि स्पष्ट उच्चारण जमते--वाचक्‍नवी

पुन्हा एकदा श आणि ष

श आणि ष चे वेगळे उच्चार करणे सोपे नाही, ते प्रयत्‍नपूर्वक शिकावे लागतात.
म्हणूनही 'ष' च्या वेगळ्या उच्चाराची मराठी भाषेला गरज नाही, असे मला वाटते. किंबहुना आता 'ष' चा उच्चार आम मराठी भाषक आता 'श' सारखाच करतात असे वाटते. त्यामुळे तो नाहीसा होणार असे वाटते.

काळाच्या ओघात..

श्री. चित्तरंजन आणि इतरांनी व्यक्त केलेले मत कुणालाही पटेल.. प्रमाण-लेखनाच्या नियमांत निष्कारण ढवळाढवळ करून ते 'सोपे' करू नयेत. उंझा जोडणी(=शुद्धलेखनाचे नियम) या तत्त्वावर आधारली गेले आहे. असे दिसून आले की बहुसंख्य अल्पशिक्षित गुजराथी माणसे सर्व इकार दीर्घ आणि बहुतेक उकार ‍हस्वच उच्चारतात. मग लेखनात ते तसे का लिहू नयेत? (मराठीचे अजूनतरी असे भजे झालेले नाही. बहुसंख्य मराठी माणसे प्रमाण-लेखनाप्रमाणेच ‍हस्व-दीर्घ उच्चारतात!) परंतु अशा उंझा-लेखनाला गुजराथी साहित्य परिषदेची अजूनतरी मान्यता नसावी असे त्यांच्या संकेतस्थळावरून दिसते आहे. अजूनही गुजराथीत प्रसिद्ध होणारे जोडणी-कोश प्रमाण-लेखनाच्या मूळ ३३ नियमांवरच आधारलेले आहेत. अधिक माहितीसाठी
इथे आणि
इथे पाहावे.
गावाचे मूळ नाव ऊंझा. 'ऊंझा फार्मसी' नावाचा इथला औषधांचा कारखाना प्रसिद्ध आहे. आता उंझा-जोडणीनंतर या गावाचे नाव तशा पद्धतीत 'उंझा' असे लिहिले जाते.
मार्क ट्वेनदेखील इंग्रजी स्पेलिंगमध्ये हळूहळू पायरीपायरीने सुधारणा कशा कराव्यात ते
असे सांगितले आहे.--वाचक्‍नवी

भाषेचे भजे होणे :)

प्रमाण-लेखनाच्या नियमांत निष्कारण ढवळाढवळ करून ते 'सोपे' करू नयेत.

चालू द्या !!! :)

मार्क ट्वेनदेखील इंग्रजी स्पेलिंगमध्ये हळूहळू पायरीपायरीने सुधारणा कशा कराव्यात ते
असे सांगितले आहे.

मराठी भाषा लिहिण्यात / शब्दांचे अर्थ समजून घेण्यात, कोणत्याच सुधारणा नको, तिला जीतकी बोजड ठेवू तितकी ती चांगली, चालु द्या !!!

भाषेतून संस्कृती संक्रमित होते असे म्हणतात. अशा संस्कृतीमुळेच आपण आजूबाजूच्या वातावरणाशी एकरुप होत असतो. भाषा ही मानवाचीच निर्मिती असल्यामुळे मानवाबरोबर तिचाही प्रवास चाललेला असतो. तेव्हाच भाषेचा / शब्दांचा वारसा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे, असा वारसा जातांना, पहिली पिढी दुस-या पिढीला अधिक समृद्ध भाषा देत असते. मानवाच्या संस्कृतीचा जस-जसा विकास होतो.तस-तसा भाषेचाही विकास होत असतो. नव-नवीन शब्द भाषेत जमा होत असतात. विज्ञानाचे शोध,सांस्कृतिक बदल, संस्थळावरील वेगवेगळ्या लेखकांची भाषा, या आणि इतर कारणांमुळे नव-नवीन शब्द भाषेत येतात. त्यामुळेच भाषासमृद्ध होत असते आणि अशा प्रवाही, सोप्या, होणा-या भाषेला /शब्दांना अधिक पर्याय देण्याऐवजी आपण पारंपारिक शब्दांना / नियमांना चिटकून बसण्यात काय अर्थ आहे, त्यात काही मजा नाही असे वाटते. अशाने मराठी भाषेचे भजे होत असेल तर आम्ही भाषाप्रेमींनी काय बोलावे बॉ ?

अवांतर : मराठी भाषेचे भजे होण्याने भाषा लिहिण्या/बोलण्यात सहजपणा येत असेल तर, अशा भजे होण्याचे आम्ही स्वागत करतो. :)

बेशुद्ध ले़खन !

शुद्ध लिहा
समजेल असे लिहा
परीणामकारक असेच लिहा.
वाचक बेशुद्ध पडतील असे लिहु नका.

अक्षरांचे गुलाम काय हेऊन बसता ?
काय सांगायचे ते समजुन् घ्या

समजणारया ला ..इशारा पुरेसा असतो .

कान्हा मात्रा वेलांट्या ही अक्षरांची मजबुरी आहे ..
तिचा अतिरेक नको..

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

विकतचे दुखणे

विवेकसिंधू - ज्ञानेश्वरी पासून ते तुकाराम गाथा - दासबोधापर्यंतचे सर्व मराठी लेखन हे र्‍हस्व-दीर्घ निरपेक्ष अशा मोडी लिपीत लिहिले गेले. अमृताशी पैजा जिंकणारी अक्षरे मेळविताना ज्ञानेश्वरांना र्‍हस्व-दीर्घाची चिंता कराविशी वाटली नाही. तुक्याचे अभंगदेखील र्‍हस्व-दीर्घाची पर्वा न करता तळागाळातील लोकांपर्यंत पोचले. मोडी लिपीत लिहिलेली शिवाजीची पत्रे दूरदूरच्या किल्लेदारांपर्यंत पोचली आणि त्यावर योग्य ती अंमलबजावणीदेखिल झाली. कुठेही र्‍हस्व-दीर्घाविना अर्थाचा अनर्थ झाला नाही.

थोडक्यात, र्‍हस्व-दीर्घाविना मराठी शेकडो वर्षे वापरली - बहरली जात होती. र्‍हस्व-दीघाविना मराठीचे काहिही अडले नव्हते!

र्‍हस्व-दीर्घात लिहिण्याची प्रथा त्यामाने अलिकडील.

छापखान्याच्या सोयीसाठी मराठीने देवनागरी स्वीकारली आणि त्याबरोबरच र्‍हस्व-दीर्घाचे विकतचे दुखणे मराठी घेऊन बसली. अर्थात त्याजोडीला मराठीला अत्यंत अनावश्यक असे ङ, ञ आणि ष यांचे नसते लोढणे गळ्यात बांधून घेतले.

ज्या पुरोगामी वृत्तीने मराठीने ऍ आणि ऑ घेतले, त्याच पुरोगामी पद्धतीने आता आपण हे मराठीला अनावश्यक असे र्‍हस्व-दीर्घ, ङ, ञ, ष ईत्यादि अक्षरांना तिलांजली दिली पाहिजे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मस्त रे !!!

ज्या पुरोगामी वृत्तीने मराठीने ऍ आणि ऑ घेतले, त्याच पुरोगामी पद्धतीने आता आपण हे मराठीला अनावश्यक असे र्‍हस्व-दीर्घ, ङ, ञ, ष ईत्यादि अक्षरांना तिलांजली दिली पाहिजे

व्वा, क्या बात है !!!

मोडीत र्‍हस्व-दीर्घ नाहीत?

कुणी सांगितले? मोडीत आणि मराठी बालबोध लिपीत कायकाय फरक आहेत? १. मोडीत अक्षरातला दंड(उभी रेघ) बालबोधसारखी वरून खाली नाही तर खालून वर काढतात. २. बालबोधमधील (द, ड, ट इत्यादी अक्षरात येतात तशा) खुंट्या व स-झ मध्ये येतात तशा संयोगरेषा नाहीत. ३.मोडीत हलन्त व्यंजने लिहिता येत नाहीत. ४. मोडीत ऋ, कृ वगैरे लिहिता येत नाही . ५. ॡ नाही, त्यामुळे कॢप्ती लिहिता येत नाही. ६. अ-ला दोन मात्रा देऊन ऐ आणि आ-ला दोन मात्रा देऊन औ लिहावा लागतो, बालबोधसारखी स्वतंत्र अक्षरे नाहीत. ७. ऍ आणि ऑ लिहिता येत नाहीत. ८. मोडीत प्रत्येक शब्दाला वेगळी शिरोरेषा नाही, एकच शिरोरेषा सर्व शब्दांना, त्यामुळे शब्द सोडवून वाचायला त्रास होतो. ९. विरामचिन्हे अजिबात नाहीत. (दंडदेखील नाही.) १०. र्‍हस्व-दीर्घ लिहिताना दोनदा इकार किंवा दोनदा उकार लिहावा लागतो. हे टाळण्यासाठी काही कारकून अर्थभिन्‍नता नसेल अशा ठिकाणी दोन्ही इकार-उकार सारखे लिहायला लागले. १०. छपाईकामाला मोडी अत्यंत गैरसोयीची, म्हणून चारशे वर्षे वापरात असलेली मोडी छपाई यंत्रे आल्याबरोब्बर मागे पडली. ११. अशोकलिपी ही प्राकृतसाठी, देवनागरी ही संस्कृतसाठी तर मोडी ही कारकून-चिटणिसांसाठी! --वाचक्‍नवी

झाले नाही केले

>>जसे पुर्वी काही शब्द लिहितांना 'नांव' च्या ऐवजी पुढे बदल होऊन 'नाव' असे झाले. याचाच अर्थ असा काही काळानंतर भाषेत बदल होणे हे भाषेचे प्रवाहिपणासाठी मदत करते<< 'नांव'चे ''नाव झाले नाही, काही ज्ञानी समजल्या जाणार्‍या माणसांना करावे लागले. कां केले? तर बर्‍याच लोकांनी नांवमधल्या अर्ध‍अनुस्वाराचा उच्चार करणे कमी केले. दुसरे कारण- छपाईच्या कामात अनुस्वारांचे ठसे जुळवण्यास जुळारी लोकांना, शुद्धलेखन तपासताना मुद्रितशोधकांना आणि म्हणून छापखान्याच्या मालकांना त्रास होऊ लागला. त्यावेळी जर संगणकछपाई असती तर हा अनुस्वार गळाला नसता, कारण तो व्युत्पत्तिसिद्ध आणि उच्चारित होता. हिंदीने एकही अर्धोच्चारित अनुस्वार टाकलेला नाही; त्यांना जे जमले ते 'त्या' सरकारप्रवृत्त मराठी विद्वानांना सहज जमले असते. संस्कृत तत्सम
शब्दांतले अंत्य इकार-उकार दीर्घ करावे लागले, कारण बहुसंख्य अल्पशिक्षित मराठी भाषक तसा उच्चार करत होते. ऊंझा जोडणी अशाच कारणासाठी सुचवली गेली. मराठी-गुजराथी सोडून इतर सर्व भारतीय भाषक जर शुद्ध संस्कृतप्रमाणे र्‍हस्व-दीर्घ उच्चारू शकतात तर ते मराठी लोकांना का जमत नाही?
पुन्हा सांगावेसे वाटते. भाषा जेव्हा जन्माला येते तेव्हा ती अल्पसंख्याकांची बोलीभाषा असते. जसजसे अनेकानेक लोक तशी भाषा बोलू लागतात, तेव्हा ती लिहिण्याचा प्रयास होतो. त्यावेळी एकवाक्यता असावी म्हणून काही मोजके विद्वान रूढ उच्चारांवर आधारित लिखाणाचे नियम ठरवतात. हे नियम कारण नसताना सुखासुखी बदलले जात नाहीत.
">मराठी शब्दांचे अर्थ समजून घेण्यात, कोणत्याच सुधारणा नको, तिला जीतकी बोजड ठेवू तितकी ती चांगली, चालु द्या !!! "<
माझी आई लोकांच्या दृष्टीने कितीही लठ्ठ असली ती मला नेहमीच सुंदर वाटेल, कधीही बोजड वाटणार नाही. आणि अर्थ समजून घेण्यात सुधारणा म्हणजे काय? अर्थ सुधारणे की समज सुधारणे की घेण्याची पद्धत सुधारणे?
विज्ञानाचे शोध, या आणि इतर कारणांमुळे नव-नवीन शब्द भाषेत येतात. अशा प्रवाही, सोप्या, होणा-या भाषेला /शब्दांना अधिक पर्याय देण्याऐवजी ?? वैज्ञानिक शब्दांमुळे भाषा प्रवाही आणि सोपी होते? वैज्ञानिक शब्दांना अधिकाधिक पर्याय असावेत? मग त्यांत नेमकेपणा तो काय राहिला? भाषेत नवीन शब्द आले की जुन्या पारंपरिक शब्दांना सोडचिठ्ठी द्यायची? अशाने भाषा समृद्ध होते की विकलांग? जगातल्या कुठल्या भाषेने असे केले आहे? फ़्रेन्चमध्ये गेल्या सातशे वर्षात शब्दांच्या स्पेलिंगमध्ये (भूतकाळाची काही अनियमित रूपांच्या स्पेलिंगशिवाय) कुठलेही बदल केलेले नाहीत. अमेरिकन फिलॉलॉजिकल असोसिएशनने १८७६मध्ये ar, catalog, definit, gard, giv, hav, infinit, liv, tho, thru, wisht या अकरा शब्दांच्या स्पेलिंगमध्ये अशा सुधारणा सुचवल्या. पुढे १८७९ त आणखी ३५०० आणि १९०६ मध्ये अजून ३०० शब्दांची या यादीत भर टाकली. (विस्तारभयास्तव पूर्ण यादी इथे देत नाही.) १९४९ पर्यंत यातील फक्त १२ सुधारणा जनतेने स्वीकारल्या. त्यांत शो ची भूतकाळी रूपे श्यू-श्यून च्या ऐवजी शोऽड्‌ करावी, किंवा रिअलाइज्‌ सारख्या शब्दांत आय्‌एस्‌ई ऐवजी आय्‌झेड्‍ई करावे, अशा किरकोळ सुधारणा जनतेने मान्य केल्या.
मराठी काही जगावेगळी भाषा नाही!--वाचक्‍नवी

उंझा जोडणी राहिली बाजूला :)

अर्थ सुधारणे की समज सुधारणे की घेण्याची पद्धत सुधारणे?

एखादा शब्द उच्चारण करतांना तो ब-याचदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरुपाचा असतो. उदा. आम्ही एका लेखाचे लेखन करतांना 'सरुची' झाडे असा उल्लेख केला, आमच्या भाषेवर जरा उर्दु चा प्रभाव पडतो. इथे मुळ शब्द आहे 'सुरुची' आता तुम्ही म्हणाल 'सरुची' हा शब्द चुकीचा आहे. म्हणजेच इथे समज आणि अर्थ समजून घेण्याची पद्धती सुधारली पाहिजे.

माझी आई लठ्ठ असली तरी मी तिला सुंदरच म्हणेन, पण बाकीचे तिला जाडी बाई असेच बोलतील, तिला सर्वांनीच सुंदर म्हणायचे असेल तर तिला काही बदल हे करावेच लागतील.

भाषेत नवीन शब्द आले की जुन्या पारंपरिक शब्दांना सोडचिठ्ठी द्यायची?

नव-नवे शब्द भाषेत आल्यामुळे पारंपारिक शब्दांना सोडचिठ्ठी द्यावी असे आम्ही कुठेही म्हटलेले नाही. पण खरं सांगू का पारंपारिक शब्द आपोआप मागे पडतात आणि नवे शब्द व्यवहारात यायला लागतात. हे आम्ही आपल्याला समजून सांगण्याची गरज नाही, तसे असते तर फादर स्टीफनच्या शब्दांचे नवल वाटले नसते.

'' पखियांमधे मैओरु ! वृखियांमधे कल्पतरु !
भासांमधें मानु थोरु ! मराठियेसे !!

आम्ही आपल्या प्रतिसादाला बगल दिला .( टाळला ) टाळला हा शब्द सोपा वाटतो तेव्हा बगल हा शब्द आम्ही कितीदा वापरतो, म्हणजे तो शब्द मागे पडतो. बडदास्त ठेवा, पेक्षा 'व्यवस्था ठेवा, असे म्हणतांना जरा बरं वाटतं.

मागे पडलेले शब्द :नोकदार, अधिकोषपत्र,तिथी,सुरक्षा पेटी, प्रवेश पत्र, निश्चित, धिंगाणा, क्षमा करा, भ्रमीचालक,आरस्पान, कोठार
वापरातील शब्द : टोकदार, बॅकनोट, दिनांक, तिजोरी, तिकीट, नक्की, गोंधळ,माफ करा,स्क्रू ड्रायव्हर, संगमरवर, गोदाम

वरील शब्द पाहा, मराठी शब्द बोलतांना लोकांचा ओढा हा सहजपणे वापरात येईल अशा शब्दांकडे असतो, असे असतांना पारंपारिक शब्दाच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे. तेव्हा होईल तितके नवनवीन शब्द भाषेत आले पाहिजेत. अहो, संगणक आल्यानंतर त्याला जोडून कितीतरी नवे शब्दांचे पर्याय द्यावे लागत आहेत. तेव्हा नव्या शब्दांमुळे, आणि नियमांचा हट्ट सोडला तर मराठी भाषा समृद्ध होईल इतकाच आमचा मुद्दा आहे.

झाले नाही केले

दोनदा उमटला म्हणून प्र.का.टा.आ.--वाचक्‍नवी

सरू, सुरू इ.

>>'सरुची' हा शब्द चुकीचा आहे. <<सरू आणि सरू असे दोनही मराठी शब्द शुद्ध आहेत, मात्र रू दीर्घ लिहिला आणि तसाच उच्चारला तरच!
बगल, बडदास्त हे शब्द मागे पडले आहेत असे मला मुळीच वाटत नाही. हे शब्द रोजच्या बोली आणि लेखी वापरात आहेत. फक्त विद्वत्‌प्रचुर भाषेत सर्वच अरबी-फार्सी शब्द टाळले जातात, तसे हे ही कदाचित. हे शब्द सुंदर आहेत पण ते सौम्य नाहीत.
नोकदार फार्सी, टोकदार-मराठी टोकपासून बनवलेला. तिथी फक्त चान्द्रमासाच्या तारखेला आणि दिनांक सौरमासाच्या. 'आरस्पान' स्त्री-सौंदर्याचे वर्णन करताना साहित्यिक अजूनही वापरतात. स्क्रू-ड्रायव्हरला भ्रमीचालक तर कधी ऐकलेला नाही, 'डिसमिस' मात्र इलेक्ट्रिशियन वापरतात. निश्चित आणि नक्की हे दोन्ही प्रचारात. परंतु, गोंधळ आणि धिंगाणा यांच्या अर्थात सूक्ष्म भेद. क्षमा करा, कोठार,
ह्यातला कुठलाही शब्द मागे पडलेला नाही.--वाचक्‍नवी

सरू आणि सुरू

'सरू' आणि 'सरू' ह्या दोन्ही शब्द नक्कीच अरबीपासून ('सर्व' हा मूळ शब्द) आले असावेत. (अरबीतून फारशीत, फारशीतून भारतीय भाषांत) सुंदर मुलीला सुरूच्या झाडाची उपमा उर्दू-फारशी कवितेत फार आम आहे, असे वाटते. चूभद्याघ्या.


१.
वो सर्वक़द है मगर बे-गुल-ए-मुराद नहीं
के उस शजर पे शगूफ़े समर के देखते हैं
--अहमद फ़राज

सर्वक़द म्हणजे सुरूच्या झाडासारखी उंच आणि राजसवाणी.
बे-गुल-ए-मुराद म्हणजे इच्छांच्या फुलांविना
शजर म्हणजे झाड.
शगूफ़े म्हणजे कळ्या.
समर म्हणजे फळ.
चूभूद्याघ्या.

सर्व की सरो?

'सर्व 'अरबी असेल पण फारशी आणि हिंदी या दोन्ही भाषांत सुरूच्या झाडाला सरो म्हणतात. हिन्दीत बनझाऊ असाही एक त्याच अर्थाचा शब्द आहे.
फारशीत 'सूर' म्हणजे खुशी. हिन्दीत सरू म्हणजे प्रसन्‍नता, हलकी नशा. या दोन शब्दांचा काही संबंध असेल?
'सर्व' म्हणजे सुरूचे झाड तर सर्वकद या शब्दाप्रमाणे मराठीत तन्वंगीप्रमाणे सुरूअंगी असा शब्द बनवायला हरकत नाही. --वाचक्‍नवी

ह.घ्या.

जर शिडशिडीत बांध्याची स्त्री = सुर्वंगी तर शिडशिडीत उंच स्त्रीचा पुरुष = सुर्वण्ट ?? (सुरु+वंत!) ;)

'सर्वंट'

मग 'सर्वंट' ह्या शब्दाचे काय? उंच, देखणा पहाडी नोकर की काय?

'सर्व'च

अरबीत 'सर्व'च आहे. इथे बघावे. फारशीतही. इथे बघावे. सरू कदाचित बहुवचन असू शकेल. तुम्ही तुमचे स्रोत सांगितल्यास बरे होईल. 'सूर' म्हणजे रेड वाईन असे दिलेले आहे. हिंदीत 'सुरूर' हा शब्द आहेच.

 
^ वर