'ऊंझा-जोडणी' आणि मराठी शुद्धलेखन

गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे १९९९ भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) ऱ्हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ‍ी ) व ऱ्हस्व उ ( ‍ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला. (उदा. वीद्या, शीक्षक, वीनंती, रुप, वधु, धुर इ.)...
...

वरील ठराव झाला त्याच दिवसापासून आणंद येथे प्रकाशित होणारे 'मध्यान्तर' दैनिक व जवळजवळ वीस नियतकालिकांचे मुद्रण वरील ठरावानुसार होऊ लागले. अंदाजे पन्नास लेखकांची साठाहून अधिक पुस्तके अशा 'ई-उ'च्या फरकाप्रमाणे प्रकाशित झालेली आहेत. अजूनही होत आहेत. गुजराती भाषेतील वरिष्ठ प्रकाशन संस्था 'इमेज पब्लिकेशन्स' व सुरतेची 'साहित्य संकुल' वगैरे कित्येक प्रकाशन संस्था पण ऊंझा जोडणीच्या धोरणानुसार प्रकाशने करीत आहेत.

ऊंझा-जोडणी पुढे वाचा


प्र. : 'ऊंझा जोडणी'च्या वरील ठरावाप्रमाणेच मराठीत भाषेतही शुद्धलेखनाचे नियम सोपे व्हावेत, असावेत का?
लेखनविषय: दुवे:

Comments

सुरू

पुढे दिलेल्या दुव्यावर "४. लेबॅनन आणि प्रतिलेबॅननची वृक्षसंपदा" या मथळ्याखाली पहा- अरबीत सरु हाच शब्द आहे असे
इथे दिसते आहे. --वाचक्‍नवी

असू शकेल पण

अरबी भाषेच्या तज्ज्ञांकडून उच्चार तपासून घ्यायला हवेत. सुरू, सरू हा उच्चारही चलनात असू शकतो. पण सर्व 'फ़सीह' किंवा अधिक योग्य उच्चार असावा. ह्या दुव्यावर 'सर्व' (sarw) हा उच्चार आहे असे दिसते आहे. सुरू, सरू कदाचित अनेकवचन असावे.

 
^ वर