संस्कृतचे मारेकरी

एकदा आम्ही आपल्या संस्कृत वर्गात निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे याची आपसांत चर्चा करत होतो. तो वर्ग आम्ही ज्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने घेत होतो त्याचे पदाधिकारी चटकन म्हणाले, "आमच्याच संस्थेच्या अध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा".

ह्यावर मी म्हणालो की बोलवायला हरकत नाही पण श्री. कखग यांचा संस्कृतशी काही थेट संबंध आहे का? त्यावर ते पदाधिकारी म्हणाले म्हणजे काय, अगदी लहानपणापासून, अनेक संस्कृत विषयीच्या संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे.

त्यावर आम्ही ठीक आहे म्हटले आणि श्री. कखग प्रमुख पाहुणे म्हणून येतील असे ठरले.

निरोप समारंभात हे श्री. कखग बोलायला उभे राहिले व म्हणाले, "संस्कृतचा आणि माझा लहानपणापासून संबंध. माझी आजी रामरक्षा म्हणायची ती मी ऐकायचो. मला प्रणम्य
शिरसा पण वाचून म्हणता येते".

आम्हाला हे सर्व ऐकून हसावे की रडावे तेच कळेना. ह्या २ ओळीत त्यांचा आणि संस्कृतचा संबंध संपला. ह्या २ ओळींमुळे त्यांनी श्रोत्यांच्या मनात संस्कृतविषयी नक्की काय प्रेम जागृत केले?

आजही हे गृहस्थ व त्यांच्या सुविद्य पत्नी अनेक संस्कृतभाषेविषयीच्या संस्थांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत (?) आहेत. असे संस्कृतचे मारेकरी आपल्याला जागोजागी आढळतात.

१) पाठ्यपुस्तक मंडळ -असे म्हटले जाते, जे शिकवतात ते पाठ्यपुस्तके बनवत नाहीत व जे पाठ्यपुस्तके बनवतात ते शिकवत नाहीत. मुलांच्या मनांत संस्कृत विषयी घृणा निर्माण कशी होईल हे पाहाणे हे एकमेव कार्य ही पाठ्यपुस्तकी विद्वान मंडळी करतात.

२) जागोजागी अवजड संस्कृतभाषा वापरून समोरच्याला गारद करू पाहाणारे

३) संस्कृत परिषदांमध्ये आपले प्रबंध इंग्लिशमधून वाचणारे

४) संस्कृतच्या विद्यार्थ्यांना शिकवताना टोचून बोलणारे

५) संस्कृत भाषेत सलग ४ वाक्ये सुद्धा न बोलता येऊ शकणारे (जी बोलली जाते ती भाषा, जी लिहिली जाते ती भाषा नव्हे) पण मोठ्या कागदी पदव्या मिळवलेले

६) "भूतकाळातील संस्कृत आणि तत्कालीन समाज" ह्या विषयीचे दोष उकरून काढणारे पण संस्कृत भाषेचा वर्तमानकाळ व भविष्यकाळ ह्या संबंधी एक शब्दसुद्धा बोलू न इच्छिणारे

७) संस्कृतचे धडे व कविता नवनीत, २१ अपेक्षित, विकास इ. मार्गदर्शके हातात घेऊन शिकवणारे शिक्षक

८) भाषांतर पद्धतीने संस्कृत शिकविणे अवलंबणारे सरकारी (मेकॉलेकृत) शैक्षणिक धोरण.

९) संस्कृत शिकवताना व्याकरणावर अवाजवी भर देणारे (लहान मूल पण आधी भाषा शिकते मग तिचे व्याकरण)

संस्कृतला वाचवायचे असेल तर ह्या मारेकर्‍यांना आधी संपविले पाहिजे नाही का?

लेखनविषय: दुवे:

Comments

मुळात...

संस्कृतला वाचवायचे असेल तर ह्या मारेकर्‍यांना आधी संपविले पाहिजे नाही का?

आधी मुळात संस्कृत वाचवायची गरजच का पडावी? अशी मरणासन्न अवस्था त्या भाषेवर का यावी असाही एक प्रश्न मनात उभा राहतो...

आणि संस्कृतच्या मारेकर्‍यांना संपवायचं म्हणजे नक्की काय करायचं हे कळू शकेल का?

असो...

आपला,
(संस्कृत भाषेशी कधीच जवळीक, आपुलकी न वाटलेला!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

नेहरूंच्या संस्कृतद्वेषामुळे

नेहरूंमुळे तीन युगांपर्यंत क्षय न झालेली व लोकांना अवगत असलेली संस्कृत भाषा नष्ट होण्याची परिस्थिती आली. महात्मा गांधी यांनी सर्व प्रदेशाला व्यापून घेणार्‍या भाषेच्या स्वरूपात हिंदीचे समर्थन केले, तर बापूंची इच्छा म्हणून पूर्ण देशाने ते स्वीकारले. नेहरू यांनी `संस्कृतचा प्रसार करू नये. संस्कृतबद्दल चर्चा करू नये', या प्रकारच्या सूचना काढून संस्कृतच्या प्रभावावर अखेरचा प्रहार केला.

संस्कृतद्वेषी नेहरू

Jawaharlal Nehru has said that Sanskrit is a language amazingly rich, efflorescent, full of luxuriant growth of all kinds, and yet precise and strictly keeping within the framework of grammar which Panini laid down two thousand years ago. It spread out, added to its richness, became fuller and more ornate, but always it stuck to its original roots. The ancient Indians attached a great deal of importance to sound, and hence their writing, poetry or prose, had a rhythmic and musical quality. Our modern languages of India are children of Sanskrit, and to it owe most of their vocabulary and their forms of expressions.

हेच ते संस्कृतद्वेषी नेहरू का?

स्रोतः हिंदू विस्डम

मला तर वाचल्याचे आठवतं की नेहरुंनी भारताचा प्राचीन वारसा राखला जावा यासाठी सर्व शाळांतून संस्कृतची सक्ती करावी अशी सूचना केली होती. (चू. भू. दे. घे.)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लागण

थोडक्यात म्हणजे विषय कोणताही असो, तो गांधी-नेहरूंपर्यंत खेचायचा आणि आपल्या मताची एक निराधार पिंक टाकायची, या रोगाची लागण (अन्य काही संकेतस्थळांप्रमाणे) उपक्रमालाही लागलेली दिसते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनंती

मी हा प्रतिसाद लिहीस्तोवर ६७ प्रतिसाद झाले आहेत. नवे प्रतिसाद वाचताना त्रास होतो आहे. पुढील प्रतिसादकाने कृपया नवा विषय सुरू करावा.

ब्राव्हो!

संस्कृतचे मारेकरी पटले. अशाप्रकारचा लेख पहिल्यांदाच वाचायला मिळाला. आतापर्यंत, "शासनाने तुम्हाला शिकायची संधी दिली तरीही तुम्हाला संस्कृत येत नाही म्हणजे काय ?" या आविर्भावात टिमकी वाजवणारे आणि ज्यांना संस्कृतबद्दल फारसे ज्ञान नाही त्यांचा अतिशय अपमान करणारे लेखच वाचनात आले होते.

विशेषतः, ज्यांना शाळेतला अर्धातास सोडला तर घरात किंवा समाजात संस्कृत शिकायची संधी मिळाली नाही (आणि याचे कारण त्यांच्या वडिल-आजोबांना शासनाने आणि समाजाने कदाचित संस्कृत शिकायची संधी दिली असली तरी सामाजिक परिस्थिती पूरक नसावी) त्यांना "संधी मिळूनही ढ राहिलेले" असे हिणवले जात असल्याने संस्कृत विषयी मनात कोणतेही प्रेम उत्पन्न न झालेले बरेचजण दिसतील.

२) जागोजागी अवजड संस्कृतभाषा वापरून समोरच्याला गारद करू पाहाणारे

हे तर मराठी संकेतस्थळांवर पावलोपावली भेटतील. मराठीत सहजसोपे शब्द असताना आपल्या सुसंस्कृतपणाची जाहिरात करणारे बहुधा इतरांच्या मनात संस्कृतबद्दल घृणा निर्माण करत असावेत का काय असा विचार चाटून गेला.

संस्कृत शिकवताना व्याकरणावर अवाजवी भर न देता संस्कृत शिकवता येईल का याचा प्रयत्न करून पहाणार असाल तर मी विद्यार्थिनी आहेच.

मला नाही भेटले.

>>जागोजागी अवजड संस्कृतभाषा वापरून समोरच्याला गारद करू पाहाणारे --हे तर मराठी संकेतस्थळांवर पावलोपावली भेटतील.<<
मला नाही आढळले. मुळात संस्कृत अवजड आहे? रोजच्या वापरातले असे कुठले मराठी सोपे शब्द आहेत की त्यांच्या ऐवजी लोक अवजड संस्कृत शब्द वापरतात? कुणी उदाहरण देऊ शकेल? संस्कृत-इंग्रजी-गणित हे अवघड विषय आहेत असे शालेय विद्यार्थ्यांचा कानी कपाळी सतत पडावे अशी महाराष्ट्राची शिक्षणपद्धती असल्याने, संस्कृत शब्द 'अवजड' वाटतात. संस्कृतची एकातून दुसरा शब्द निर्माण करण्याची क्षमता इतकी अप्रतिम आहे की मूळ शब्द माहीत असला की उरलेल्या सर्वाचे अर्थ आपोआप समजतात.
गुजराथमधील एका छोट्या गावातून हिंडताना एका दुकानात एक दक्षिणी भारतीय दिसला. त्याला काहीतरी हवे होते, पण त्याला हिंदी-गुजराथीत काय म्हणतात ते माहीत नसल्याने तो मोडक्यातोडक्या हिंदीतून त्या वस्तूचे वर्णन करत होता. दुकानदारांना काही बोध होत नव्हता. त्या दाक्षिणात्याने हताश होऊन माझ्याकडे पाहिले. "लाजा?", मी विचारले. "येस येस! इट इज कॉल्ड 'लाजा' इन संस्कृत!" तो उत्तरला. म्हणजे त्याला लाह्या हव्या होत्या. अर्थातच दुकानदाराने त्या मिळवून द्यायला मदत केली. त्या छोट्या गावातला तो दुकानदार म्हणाला, "अहो, लाजाहोमात वापरतात त्या लाह्या कुणाला माहीत नाहीत? आधी 'लाजा' म्हणून विचारले असते तर आम्ही लगेच समजलो असतो." उगीच नाही आदि शंकराचार्यांनी फक्त संस्कृत भाषेच्या मदतीने वयाच्या आठव्या वर्षापासून ते ३२व्या वर्षी मरण्यापूर्वीपर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर आणि द्वारका ते जगन्‍नाथपुरी असे भारतभर सफल भ्रमण केले.
--वाचक्‍नवी

आश्चर्य वाटले नाही

हरकतसारखा सोपा आणि प्रचलित शब्द असताना प्रत्यवायसारखा शब्द वापरण्याच्या अट्टहासाची चर्चा या निमित्ताने आठवली.

असो, एखादी गोष्ट मानायची नाही म्हटली की ती दिसेनाशी होते हे माहित असल्याने आश्चर्य वाटले नाही.

मला नाही आढळले.

देवही मला नाही आढळला म्हणून देवच नाही असे म्हणणारे अनेकजण असले तरी आम्हाला अनुभव आहे, देव आहेच असे म्हणणारे संख्येने अधिक आहेत. त्यामुळे आपल्याला संस्कृतचा टेंभा मिरवणारे दिसले नाहीत म्हणजे ते नाहीतच असा अर्थ कृपया करून घेऊ नका. :-)

आणि एक, मूळ लेखकानेही अशा प्रकारचे लोक समाजात असल्याबद्दल म्हटले आहे तेव्हा मराठी संस्थळांवर भेटले नाहीत तर प्रत्यक्ष समाजात शोधून बघा, सापडतील कदाचित.

उगीच नाही आदि शंकराचार्यांनी फक्त संस्कृत भाषेच्या मदतीने वयाच्या आठव्या वर्षापासून ते ३२व्या वर्षी मरण्यापूर्वीपर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर आणि द्वारका ते जगन्‍नाथपुरी असे भारतभर सफल भ्रमण केले.

खरंय! अनेक परदेशी मिशनरीही दुर्गम भागात जाऊन आदिवासींत वगैरे त्यांची भाषा जाणून न घेताही ख्रिश्चन धर्माचा सफल प्रसार करत असतात. त्यासाठी, त्या गावातील एखादी स्थानिक "लोकल" व्यक्ती किंवा त्या लोकांशी संवाद साधू शकेल असे "माध्यम" (व्यक्ती) असावे लागते. नंतरचे कार्य थोडेफार सोपे असते. इतका साधा विचार न करता आदिशंकराचार्यांच्या काळात सर्वजण संस्कृत बोलत असावेत असे निष्कर्ष जरा हास्यास्पद वाटतात. तसेही, शंकराचार्यांनी सर्व जातीं-जमातींतून प्रचारसभा घेतल्या होत्या का की राजकारण-समाजकारण करणार्‍या शासकांना आपले सिद्धांत पटवले होते आणि त्यांच्यामार्फत जनसामान्यांचा कौल मिळवला होता याबाबत मी अनभिज्ञ आहे. (चू. भू. दे. घे.)

अहो, लाजाहोमात वापरतात त्या लाह्या कुणाला माहीत नाहीत?

मला माहित नाही. होम-हवनात लाह्या वापरतात हे ऐकून आहे पण लाजाहोम हा शब्द आज नव्याने कळला. "लाजा" या शब्दाचा एकच मराठी अर्थ मला माहित आहे आणि तो लाह्या ह्या शब्दाशी दूर दूरपर्यंत साधर्म्य साधत नाही, लज्जा या शब्दाशी साधतो.

यावरून आठवले:
आमच्या एका दाक्षिणात्य नातेवाईकांना माझ्याकडील गोड्या मसाल्याचे पदार्थ चाखून गोडा मसाला हवा झाला. त्यांनी चौकशी केली असता बहुधा पार्ल्याच्या विजय स्टोर्समध्ये त्यांना तो विकत घेता यावा अशी मी कल्पना दिली. त्यांनी दुकानात जाऊन "मुझे घोडा मसाला चाहिये|" अशी मागणी गेली. पार्ल्याच्या त्या मराठमोळ्या दुकानदाराने आम्ही असा घोड्याचा मसाला विकत नाही असे सांगून सदर गृहस्थांची बोळवण केली.

सहमत आहे...!

हरकतसारखा सोपा आणि प्रचलित शब्द असताना प्रत्यवायसारखा शब्द वापरण्याच्या अट्टहासाची चर्चा या निमित्ताने आठवली.

हेच म्हणतो! बाय द वे, 'हरकत' हा माझ्या मते उर्दू शब्द आहे. आणि उर्दू भाषेची खुमारी आणि नजा़कत काही औरच!

त्यामुळे आपल्याला संस्कृतचा टेंभा मिरवणारे दिसले नाहीत म्हणजे ते नाहीतच असा अर्थ कृपया करून घेऊ नका. :-)

सहमत आहे...!

आपला,
(नजा़कत, मस्तमिजा़ज आणि डामडौल असलेल्या उर्दूभाषेचा प्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रत्यवाय?

हा तर ग्रांथिक शब्द आहे. सावरकर कदाचित त्यांच्या बोलण्यात वापरत असतील, पण मी तरी कुणाला रोजच्या बोलण्यात हा शब्द वापरताना ऐकले नाही. हिंदीत मात्र अनेकदा ऐकू येतो. त्यांच्या बोलण्यात जेवढे शुद्ध संस्कृत शब्द आहेत तेवढे मराठी भाषेत वापरले जात नाहीत. वैद्यकीय ग्रंथात हा शब्द वापरतात त्यावेळी त्याचा अर्थ दोष किंवा नुकसान असा असतो. उदा. अमुक रोगात अमुक खाण्यास प्रत्यवाय नाही. प्रत्यवाय ह्या शब्दात हरकत या शब्दापेक्षा वेगळ्या अर्थाची छटा आहे. --वाचक्‍नवी

हम्म!

अमुक रोगात अमुक खाण्यास प्रत्यवाय नाही. प्रत्यवाय ह्या शब्दात हरकत या शब्दापेक्षा वेगळ्या अर्थाची छटा आहे.

अमुक रोगात अमुक खाण्यास हरकत नाही. हे वाक्य ही येथे चालून जाते. प्रत्यवाय हा वेगळा शब्द असल्याने वेगळी छटा असणे शक्य आहेच पण तो रोजच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी वापरणे म्हणजे प्रचलित मराठी शब्दाला अव्हेरणे आहे असे वाटते.

कदाचित...

प्रियालीबाईंचे लग्न कदाचित हिंदु विवाहपद्धतीनुसार झाले नसेल, तरी त्यांनी अशा लग्नांना नक्कीच हजेरी लावली असेल. हिंदु लग्नात जोपर्यंत लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी होत नाही तोपर्यंत हे लग्न धर्माला, सामाजिक रूढी आणि संस्कारांना तसेच तमाम वैदिक, परंपरागत , ब्रिटिशकालीन जुन्या, आणि हल्लीच्या नव्या भारतीय कायद्यांना मान्य नाही. जर एखाद्या लग्नात यांपैकी एखादा विधी झाला नसल्याचे आढळले तर ते लग्न कायद्याने रद्दबातल ठरते. --वाचक्‍नवी

हिंदू लग्नात

लाह्यांचा होम होतो हे माहित आहे आणि आसपासची माणसे त्याला होम किंवा लाह्यांचा होम म्हणतात हे ही माहित आहे. त्याला लाजाहोम हा शब्द् मात्र तुमच्याकडून ऐकला.

हिंदु लग्नात जोपर्यंत लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी होत नाही तोपर्यंत हे लग्न धर्माला, सामाजिक रूढी आणि संस्कारांना तसेच तमाम वैदिक, परंपरागत , ब्रिटिशकालीन जुन्या, आणि हल्लीच्या नव्या भारतीय कायद्यांना मान्य नाही.

हे मात्र विचित्रच म्हणावे लागेल. जो हिंदू धर्म त्याचे पालन करणार्‍यांना अमुक दिवशी देवळात जा, अमुक वारी या देवाचे पूजन केले नाही तर तुम्ही धर्मबाह्य, किंवा अमुक खाल्ले तर धर्मबाह्य या रूढी पाळत नाही किंवा विसरला आहे तो लग्नासारख्या वैयक्तिक प्रश्नात कायद्याच्या मदतीने इतकी मोठी ढवळाढवळ करतो हे माहित नव्हते.

लाजाहोम आणि अवांतर

सदरील चर्चा बहुतेक संस्कृतवर चाललेली असल्यामुळे वाचक्नवी यांनी संस्कृत शब्द 'लाजाहोम' वापरला असावा. पण मुळचा शब्द 'लाह्याहोम'च आहे. लग्न झाल्यानंतर वधुवरांच्या हाताने या लाह्यांचा होम करतात. पण यावरुन आठवले एका लग्न सोहळ्यात लग्नप्रसंगी होमाभोवती फेर्‍या मारतांना वधुच्या हातात वधुच्या भावाने लाह्या टाकायच्या आणि वराने त्या लाह्या वधुच्या हातातुन खाली पाडायच्या असे लग्नातली सातवी फेरी होईपर्यंत चाललेले होते. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लाह्याहोम?

लाह्याहोम हा शब्द वापरलेला मी कधीच ऐकलेला नाही. होम हा शब्द संस्कृत. आणि लाह्या मराठी. त्यामुळे लाह्याहोम असे रूप कधीच होणार नाही.
दुसरे असे की, लग्न हा वैयक्तिक प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक संस्कार आहे यावर दुमत नसावे. इथे हिंदुधर्म कायद्याच्या मदतीने ढवळाढवळ करीत नाही आहे. तर कायदा हिंदुधर्मात ढवळाढवळ करीत नाही आहे. आपला कायदा हिंदू विधींना अधिकृतपंणे केवळ मान्यताच देतो असे नाही तर, त्यांच्या कायदेशीरपणावर आणि अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करीत आहे. तसे पाहिले तर, कायदा कुठल्याच धर्माच्या न्यायविसंगत नसलेल्या बाबतीत ढवळाढवळ करीत नाही.
>>जो हिंदू धर्म त्याचे पालन करणार्‍यांना अमुक दिवशी देवळात जा, अमुक वारी या देवाचे पूजन केले नाही तर तुम्ही धर्मबाह्य, किंवा अमुक खाल्ले तर धर्मबाह्य या रूढी ....<< धर्म आणि रूढी यांची गल्‍लत होते आहे. जो हिंदू धर्म देवावर विश्वास ठेवा असा आग्रहसुद्धा धरत नाही, तो इतक्या फालतू गोष्टी पालन करायला सांगेल?--वाचक्‍नवी

लाह्याहोम नाहीच पण होणारच नाही ?

लाह्याहोम हा शब्द वापरलेला मी कधीच ऐकलेला नाही.
आम्ही तरी कुठे ऐकला आहे. आम्हीच तो प्रयोग करुन पाहिला.

लाह्याहोम असे रूप कधीच होणार नाही.
होणारच नाही असे म्हणने चूक ठरेल असे वाटते. अनेक शब्द असे आहेत की संस्कृतच्या शब्दात बदल होऊन मराठीत त्याचा वापर सुरु आहे. 'लाह्याहोम' हे रुप मला स्वतःलाच आवडले. पण 'लाजाहोम' तरी आम्ही शब्द कुठे ऐकला आहे. फक्त 'लाजाहोम' हा शब्द संस्कृत आहे. त्याच्या मुळात 'लाह्या' आहेत इतकेच म्हणायचे होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घोडा मसाला, घोडा तेल

गोडा मसाला आणि गोडे तेल हे शब्द फक्त मराठीतच वापरतात. मद्रासी दाक्षिणात्यांच्या तमिळ भाषेत क,ख,ग,घ पैकी एकच मूळाक्षर आहे, ते बिचारे गोडाला घोडा म्हणाले तर काय आश्चर्य? आमचे एक हिंदी भाषक मित्रदेखील गोड्या तेलाला चेष्टेने घोडेका तेल म्हणत. जर त्या दक्षिणी भारतीयांनी 'मधुर मसाला' मागितला असता तर दुकानदाराला अर्थ समजण्याची दाट शक्यता होती.
पत्त्यांच्या ब्रिज नावाच्या खेळात एक संकेत आहे. एखादे वेळी, उतारी कोणता पत्ता टाकून करावी ते समजत नसेल तर हुकमाचे पान टाका. (व्हेन इन डिफ़िकल्टी, प्ले ट्रंप!) त्या धर्तीवर व्हेन इन डिफ़िकल्टी स्पीक संस्कृत. अडचणीत सापडलात तर संस्कृतमध्ये सांगा!
हा मंत्र भारतभर कुठल्याही प्रांतात यशस्वी होतो की नाही याच अनुभव घ्या.--वाचक्‍नवी

मत्प्रिया प्रिया

संस्कृत शिकवता येईल का याचा प्रयत्न करून पहाणार असाल तर मी विद्यार्थिनी आहेच.

वा वा, वाचून मन आनंदित झाले. तुझ्यासारखी बुद्धिमती विद्यार्थिनी संस्कृतला मिळाली तर छानच.

तुझ्यासारखे इतर अनेकांना पण सोप्या पद्धतीने संस्कृत शिकायची इच्छा आहे असे मला खाजगीत अनेकांनी सांगितले.

पण संस्कृत शिकायची इच्छा असेल तर तुम्हां सर्वांना प्रथम आपापले कप रिकामे करावे लागतील, त्याला तुमची तयारी आहे का?

कारण अज्ञानाचा अहंकार सोडणे सोपे नव्हे.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

बाप रे!

हा सल्ला तुमच्या प्रिय प्रिया ह्यांना आहे, तरी तो ह्या चर्चेत उघडपणे (म्हणजे व्य. नि. तून नव्हे) दिला असल्याने हा माझा अज्ञ प्रश्नः

"पण संस्कृत शिकायची इच्छा असेल तर तुम्हां सर्वांना प्रथम आपापले कप रिकामे करावे लागतील, त्याला तुमची तयारी आहे का? "

हे कळले नाही. मला अगदी प्रार्थमिक पायरीची भाषा शिकतांना हे असे 'अ़ज्ञानाचे कप रिकामे करावे लागणे ' वगैरे जरा अतिच झाले नाही? हे असे जर शिकायला सुरूवात करायच्या अगोदरच असले तर

"४) संस्कृतच्या विद्यार्थ्यांना शिकवताना टोचून बोलणारे " (मारेकरी)

च्या धास्तीने तर विद्यार्थी इथे फिरकरणारच नाही!

रिकामा कप

गुरुवर्य ऋजु ,

अहो माझा कप रिकामा नसता तर संस्कृत शिकवायची इच्छा आहे परंतु तक्ता/ तालिका कशी बनवायची माहित नाही असे म्हटल्यावर लागोलाग तुम्हाला ते स्पष्टीकरण दिले नसते. तेव्हा काळजी नको. तसेच माझ्या नावाचा उल्लेख कृपया, प्रियाली असा करावा.

धन्यवाद.

सहमत आहे..

आविर्भावात टिमकी वाजवणारे आणि ज्यांना संस्कृतबद्दल फारसे ज्ञान नाही त्यांचा अतिशय अपमान करणारे लेखच वाचनात आले होते.

हे तर मराठी संकेतस्थळांवर पावलोपावली भेटतील. मराठीत सहजसोपे शब्द असताना आपल्या सुसंस्कृतपणाची जाहिरात करणारे बहुधा इतरांच्या मनात संस्कृतबद्दल घृणा निर्माण करत असावेत का काय असा विचार चाटून गेला.

सहमत आहे...

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

भक्ती आणि विभक्ती !!

संस्कृत शिकवताना व्याकरणावर अवाजवी भर देणारे (लहान मूल पण आधी भाषा शिकते मग तिचे व्याकरण)

पुलंचे एक् वाक्य आठवले - आमच्या संस्कृतच्या शिक्षकांनी विभक्ती-प्रत्ययावरच भर दिल्यामुळे संस्कृतचा भक्ती-प्रत्यय आलाच नाही! (मूळ वाक्यरचना कदाचित् वेगळी असेल पण भावार्थ तोच).

आम्हीही शाळेत संस्कृत शिकलो. परंतु ९०% च्यावर गुण मिळूनही स्वतःची ४ वाक्ये बोलता येत नाहीत!!

(संस्कृत) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खरे आहे

पण संस्कृतचे शिक्षक विभक्ति आणि प्रत्यय ह्यावर भर देतात कारण संस्कृत विषयाकडे
गुणवर्धक (Scoring) म्हणून पाहिले जाते आणि त्याच करिता तो विषय विद्यार्थी घेतात. जर शिक्षकांनी विभक्ति आणि प्रत्यय ह्यांच्यावर भर दिला नाही तर गुण कमी मिळतात त्यामुळे पालक शिक्षकांशी भांडायला येतात असे चित्र दिसते. हे सर्व सदोष अभ्यासक्रम पद्धतीमुळे होते. त्यात शिक्षकांचा फार दोष आहे असे म्हणता येणार नाही.

मात्र ह्यावर अक्सीर इलाज म्हणजे व्याकरणावर दुसर्‍या सहामाहीत भर द्यायचा आणि पहिल्या सहामाहीत मुलांमध्ये भाषेची जास्तीत जास्त गोडी लावायची. अर्थात त्यासाठी शिक्षकांना संस्कृत विषयी प्रेम हवे, तळमळ हवी.

वर्गात शिरताच क्षणी मार्गदर्शक (Guide) हातात घेऊन शिकवणारे शिक्षक (?) भाषेविषयी काय कप्पाळ गोडी निर्माण करणार?

तसेच संस्कृत ४ वाक्य सुद्धा बोलता न येण्याचे मुख्य कारण म्हणजे पर्याय भाषा भाषांतर पद्धतीने शिकवल्या जाणे. खरे तर प्रत्येक भाषा ही त्याच भाषेतून शिकवली गेली पाहिजे पण आपल्याला ह्या पर्याय भाषा माध्यम भाषेत भाषांतर करून शिकवल्या जातात. तिथेच तर घोडे पेंड खाते.

म्हणूनच मराठी माध्यमातील मुलांना इंग्रजी बोलायला कचरतात.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

एक निवेदन..

पुलंचे एक् वाक्य आठवले - आमच्या संस्कृतच्या शिक्षकांनी विभक्ती-प्रत्ययावरच भर दिल्यामुळे संस्कृतचा भक्ती-प्रत्यय आलाच नाही!

क्या बात है! अगदी खरं आहे...माझ्यासारखी काही मंडळी कदाचित याच कारणामुळे संस्कृत भाषेची भक्ति तर सोडाच, परंतु जवळीक करण्यापासूनदेखील करण्यापासून लांब राहिली असावीत...!

आम्हीही शाळेत संस्कृत शिकलो. परंतु ९०% च्यावर गुण मिळूनही स्वतःची ४ वाक्ये बोलता येत नाहीत!!

सहमत आहे. अत्यंत कठीण व्याकरण, संधीचे, विसर्गाचे वगैरेचे अत्यंत कठीण व अनैसर्गिक वाटणारे उच्चार, इत्यादी गोष्टी मला नेहमीच महाकठीण वाटत आलेल्या आहेत. आणि त्यामुळेच कदाचित माझ्यासारखी अनेक मंडळी या भाषेपासून चार हात लांब राहिली असावीत असं मला वाटतं! जी भाषा सामान्य जनात लोकप्रिय होत नाही, उलटपक्षी माझ्यासारखी अनेक सामान्य मंडळी त्या भाषेपासून अंमळ दूरच राहू इच्छितात, ती भाषा अत्यंत दुर्लभ आणि शिकण्यास अत्यंत किचकट आहे, हे ती भाषा शिकणार्‍यांचं नव्हे, तर त्या भाषेचं शॉर्टकमिंग आहे असं मी मानतो.

ऋजू यांच्या प्रतिसादात ही भाषा शिकवणार्‍यांवरच आणि या भाषेच्या शिक्षणपद्धतीवरच सरसकट दोष दिला गेला आहे असे मला जाणवले, परंतु १०० % हीच वस्तुस्थिती आहे असे मला वाटत नाही. माझ्या शालेय जीवनातही संस्कृत भाषा तळमळीने, प्रामाणिकपणे आणि मनापासून शिकवणारी काही शिक्षक मंडळी मी पाहिली आहेत. तेव्हा संस्कृतच्या शिक्षकांनाच या भाषेच्या मरणासन्न अवस्थेला जबाबदार धरण्यात फारसे हशील नाही असे वाटते! परंतु अहो, ही भषाच अत्यंत कठीण व किचकट आहे आणि सरासरी बुद्धीमत्तेच्या विद्यार्थ्याना (त्यात मीही एक!) काही केल्या समजतच नाही त्याला शिक्षक मंडळींचा तरी काय इलाज आहे, शिक्षक मंडळी तरी किती डोकेफोड करणार, असा प्रश्न मला पडतो!

समाजातील अत्यल्प घटकाचेच या भाषेवर वर्चस्व आहे हीच वस्तुस्थिती आज बहुत करून पाहायला मिळते! माझे समाजतल्या सर्व थरातल्या (जातपात, आर्थिक स्थिती, इत्यादी निकषांवर) मंडळींशी जिव्हा़ळ्याचे संबंध आहेत परंतु त्यांच्याशीही अनेक वेळा चर्चा करताना त्यापैकी बहुतांशी लोकांना ही भाषा मुळीच समजत नाही, त्यांना या भाषेबद्दल जराही गोडी, आस्था वाटत नाही असेच माझ्या निदर्शनास आले आहे. संस्कृत भाषेबद्दल प्रेम असणार्‍या लोकांनी, त्या भाषेच्या प्रचारक-प्रसारकांनी कृपया याचा विचार करावा व याची कारणे शोधून काढावीत असे मला वाटते! या भाषेच्या अप्रियतेचे उत्तरदायित्व सरसकट संस्कृतच्या शिक्षकांच्याच आणि शिक्षणपद्धतीच्याच माथी मारून संस्कृतच्या प्रसारकांना व प्रचारकांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असे वाटते! आज मी गेला काही काळ मराठी संस्थळांवर वावरतो आहे. संस्कृतच्या मारेकर्‍यांबद्दल संस्थळावर लिहिले जाते, परंतु संस्कृतच्या कुणी रक्षणकर्त्याने या भाषेची सामान्य लोकांना गोडी लावण्याच्या दृष्टीने सातत्याने काही लेखमाला वगैरे लिहिल्याचे माझ्या पाहण्यात नाही! का बरे असे असावे? आणि असलेच जरी काही संस्कृतचे मारेकरी तरी नुसता त्यांना दोष देऊन काय उपयोग आहे? उलटपक्षी मी तर असे म्हणेन की त्यांना त्यांचे काम करू द्यावे, आणि संस्कृतच्या रक्षणकर्त्यांनी आपलेही काम चोखपणे करावे/करत रहावे! अहो शेवटी मारणार्‍यापेक्षा तारणारा मोठा असतो असे कुठेतरी काहीसे वाचल्याचे आठवते! संस्कृतचे मारेकरी काय करतात हे पाहण्यात वेळेचा अपव्यव करण्यापेक्षा संस्कृतच्या रक्षणकर्त्यांनी आपण स्वत: या भाषेची सामान्य जनात गोडी लागण्याकरता काय करत आहोत, कितपत झटतो आहोत, कितपत तळमळीने व सातत्याने या बाबत काय काम करतो आहोत हे पाहणे अधिक अगत्याचे ठरते असेही मला वाटते!

संस्कृतच्या प्रचारकांस/प्रसारकांस व ज्यांना या भाषेची समाजात अधिकाधिक गोडी लागावी असे वाटणार्‍यांकरता आता थोडेसे माझे वैयक्तिक निवेदन! -

आमच्या अभिजात संगीतातील रागदारीतही प्रत्येकाला कळतेच असे नव्हे किंवा प्रत्येकाला त्याची आवड असतेच असे नव्हे. अश्या मंडळींना त्याची गोडी लागावी, त्यातील काही राग समजून सांगावेत या हेतूने मी 'बसंतचं लग्न' ही लेखमाला सर्वप्रथम मनोगतावर सुरू केली होती जी वाचकांना खूप आवडली होती असे अनेकांनी कळवल्याचे आठवते. आजही सवडीनुसार सदर लेखमालाचे नवे नवे भाग लिहिण्याचा माझा मानस असतो व त्यात सातत्य राखण्याचाही माझा प्रयत्न असतो. माझा असा मुळीच दावा नाही की अभिजात संगीताच्या या प्रसार/प्रचार कार्यात मी पूर्णत: यशस्वी झालो आहे. परंतु किमान निदान तसा प्रयत्न तरी केल्याचे मला निश्चितच समाधान आहे!

सांगायचा मुद्दा हा की मी जसा माझ्या परिने लोकांना अभिजात संगीत समजून सांगण्याचा, त्याची गोडी लावायचा सातत्याने प्रयत्न केला/करतो आहे, तशीच गोडी आमच्यासारख्या संस्कृत मध्ये अज्ञ असणार्‍या मंडळींना लागावी म्हणून ही संस्कृतप्रेमी मंडळी सातत्याने काही प्रयत्न करताना का दिसत नाहीत असा प्रश्न मला पडला आहे! आम समाजाचे एक वेळ सोडून द्या, परंतु किमान मराठी आंतरजालावरील वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून, का कुणी संस्कृतप्रेमी सातत्याने काही प्रयत्न करताना दिसत नाही?

आम पब्लिकला संस्कृतची गोडी लागावी अशी तळमळ असणारा कुणी संस्कृतप्रेमी/प्रचारक/प्रसारक नुसताच तक्रारवजा सूर न काढता, मला वरील प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर देऊ शकेल काय?

उपक्रमाच्या वाचकांकरता संस्कृतची गोडी लागण्याच्या दृष्टीने, त्या भाषेची तोंडओळख होण्याच्या दृष्टीने, लहान लहान लेख असलेली एक लेखमाला का नाही कुणी उपक्रमावर सुरू करत? मला खात्री आहे की अश्या लेखमालेचं उपक्रमावर निश्चितच स्वागत होईल आणि स्वागत करणार्‍यांमध्ये कदाचित सर्वात पहिला मी असेन! :)

आहे ना तुम्हाला संस्कृतबद्दल प्रेम? ती भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी म्हणून वाटतं ना तुम्हाला? मग का नाही संस्कृतविषयक सोप्या शब्दात मार्गदर्शन करणारी लेखमाला कुणी इथे सुरू करत?

असो, माझं या संस्कृतप्रेमींना प्रचारकांना/प्रसारकांना इतकंच सांगणं आहे!

आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रचारक व प्रसारक,
भारतीय अभिजात संगीत.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अनुभव

संस्कृतचे मारेकरी काय करतात हे पाहण्यात वेळेचा अपव्यव करण्यापेक्षा संस्कृतच्या रक्षणकर्त्यांनी आपण स्वत: या भाषेची सामान्य जनात गोडी लागण्याकरता काय करत आहोत, कितपत झटतो आहोत, कितपत तळमळीने व सातत्याने या बाबत काय काम करतो आहोत हे पाहणे अधिक अगत्याचे ठरते असेही मला वाटते!

तात्या आपला हा मुद्दा १००% मान्य. अशा संकेतस्थळांचा उचीत वापर हा माहीतीपूर्ण लिखाण करून करता येतो. तसा तो अनेकांनी काव्य-शास्त्र (भाषा शास्त्रपण) - विनोद हे लिहीण्यासाठी केला आहे. चर्चेचा हा विषय कदाचीत लेखकाने वैतागातून काढला असला तरी त्याबरोबरच आपण म्हणता तसे लेख लिहीले गेले नाहीत (या संदर्भात - संस्कॄतवर)तर काही उपयोग नाही.

फक्त आपल्या प्रतिसादात, म्हणल्याप्रमाणे "आम पब्लिकला संस्कृतची गोडी लागावी अशी तळमळ असणारा कुणी संस्कृतप्रेमी/प्रचारक/प्रसारक नुसताच तक्रारवजा सूर न काढता,.." असलेला मला सुदैवाने थोडाफार जवळून पाहीला/अनुभवायला मिळाला त्याबद्दल थोडक्यात लिहीतो.

या सन्मान्य व्यक्तीचे नाव आहे - कृष्णशास्त्री. मूळचे बंगलोरचे असलेले हे कृष्णशात्री यांना कधी संस्कृतबद्दल काळजी आली , जाग आणाविशी वाटली ते माहीत नाही कारण स्वतःबद्दल ते कधी बोलत नाहीत. त्यांना वाटणारी संस्कृतबद्दलची काळजीपण त्यांनी नंतर म्हणजे २००२-३ मधे वगैरे ती पण व्यक्तिगत बोलताना सांगीतली... पण साधारण १९९५ ची ही गोष्ट आहे. जुलै-ऑगस्टच्या सुमारास मित्राने सांगीतले की अरे कृष्णशास्त्री बॉस्टनला येत आहेत त्यांना जरा मदत करायची आहे. म्हणलं काय करतात ते? ते अमेरिकेत संस्कृतभारती चालू करायला येत आहेत. भारतात अशी संस्था आहेच, पण एकतर जगात प्रचार करायला आणि उत्साही मंडळींना संस्कृत शिकवायला म्हणून येत आहेत. त्यांचा एम आय टी मधे (मॅसॅच्युसेटस इन्स्टी ऑफ टेक.) ३ दिवसांचा संध्याकाळी वर्ग असणार आहे वगैरे. म्हणलं बर त्यांना काय राईड पाहीजे, रहायचे असेल ते सांग... कुठेतरी उगाच एक कर्मठ चेहरा डोळ्यांसमोर आला, आणि वाटले येतोय कुणीतरी विद्वान!

तर मग भेटलो कृष्णशास्त्रींना - कन्नड असले तरी मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व येते म्हणाले. म्हणलं चला बरं झालं. त्यात चेहरा हसरा, चाळीशीच्या घरातील म्हणजे फार मोठे नसलेले व्यक्तिमत्व. बडबडे पण...पण सगळं संस्कॄतमधेच! म्हणजे इतक्या भाषा येत होत्या पण हट्ट जसे जमेल जसे वाटेल तसे संस्कॄतमधेच आपणपण त्यांच्याशी बोलायचे. (माझ्या मित्राने मदत मागीतली तेंव्हा ही "फाइन प्रिंट" सांगीतली नव्हती). सगळंच लफड झाल. पण नंतर लक्षात आले की त्यांचा हट्ट हा संस्कॄत बोलण्यासाठी होता, तो अचूक बोलण्यासाठी, व्याकरणशुद्ध बोलण्यासाठी नव्हता... कधी काही सुचले तर आपल्याला चूक न दाखवता ते योग्य सांगत होते. पण तरी विचार करा, बॉस्टन दाखवताना त्यांच्याशी कसे संस्कॄतमधे "साईटसीइंग" करणार? :)

पण हळू हळू त्यातील औपचारीकता (ऑकवर्डनेस) निघून गेला. मग ३ दिवसांच्या एम आय टी च्या अभ्यास वर्गात नाव घातले (कुठेतरी अहंकार की माणसे नसली तर निदान आपण त्यात असू)... बघतो तर वर्ग भरलेला - भारतीय आणि अभारतीय व्यक्तींनी! वर्गात बोलायला सुरवातच त्यांनी संस्कृतमधे + हावभावाने केली. संस्कृतमधेच प्रश्न विचारला की किती जणांना संस्कृत बोललेले समजत नाही? बर्‍याच देशी-परदेशींनी हात वर केले. ते म्हणाले (संस्कृतमधेच) मग मी आत्ता विचारलेला प्रश्न कसा समजला? सर्व जण हसले (म्हणजे ते ही समजले!) . पुढे ३दिवसातच सर्वजण समजू शकेल इतके आंग्लमिश्रीत पण संस्कृत सहज बोलू लागले!

आज ही संस्कृत भारती, जी ते येण्या आधी अस्तित्वात नव्हती ती इस्टकोस्ट, वेस्टकोस्ट आणि इतरत्र काही ठिकाणी सक्रीय आहे. विद्यापिठात आणि बाहेर आठवड्याला एकदा अथवा महीन्यातून काहीवेळा संस्कृतचे (वदतु आणि नंतर पठतु) संस्कृतम् चे क्लासेस घेतात. मी जरी त्या संस्थेतनंतर कार्यकर्ता म्हणून सहभागी नसलो तरी जवळून लोकं माहीत आहेत. आमची मुलगी श्लोकस्पर्धेत भाग घेते कधी बक्षिस मिळते तर कधी नाही कारण एकेका गटात २५-३० मुले असतात - ते ही कुठले तरी भन्नाट अवघड श्लोक म्हणायला. पण मुलांना आवडते. या वर्षी वेळे अभावी नाव घालणार नव्हतो तर तीला आठवण झाली की श्लोकस्पर्धा या काळात असते, मग तीने विचारले की कधी आहे आणि हट्टाने नाव घालायला सांगून बाकीच्यावेळेस मराठी-इंग्रजी बोलणार्‍या, इंग्रजी वाचणार्‍या मुलीने वाल्मिकी रामायणातील (त्यांनी या वर्षी ठरवलेले) श्लोक पाठ करायला सुरवात केली...

थोडक्यात एका माणसाच्या ह्ट्टापायी आणि जिद्दीने आणि तो ही भारतातच रहाणारा, आज संस्कृतभारती दहा-बारा वर्षात मोठी झालेली अमेरिकेत पहात आहे. ज्यांना करायचे असते ते नक्की करतात - तक्रार करत नाहीत..

बाकी संस्कृत बद्दलचे ज्ञान राहण्याची गरज आहे असे मला संस्कृत नीटसे न येऊनही वाटते पण तो वेगळ्या चर्चचा अथवा प्रतिसादाचा मुद्दा आहे!

सौभाग्य

कृष्णशास्त्री म्हणजे साक्षात् संस्कृतचा परीसस्पर्श. तो ज्यांना होतो ते संस्कृतमय होऊन जातात. अतिशय ऋजु आणि लाघवी व्यक्तिमत्व.

अशा व्यक्तिमत्वाचा सहवास तुम्हाला लाभला हे तुमचे सद्भाग्य.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

अगदी खरं!

कृष्णशास्त्री म्हणजे साक्षात् संस्कृतचा परीसस्पर्श. तो ज्यांना होतो ते संस्कृतमय होऊन जातात.

अगदी खरं! तुम्हा-आम्हाला, विशेष करून संस्कृतच्या प्रचारकांना आणि प्रसारकांना कृष्णशास्त्रींकडून खूप काही शिकण्यासारखं आहे! हो की नाही हो ऋजूसाहेब? :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

यू सेड इट...!

कृष्णशास्त्र्यांच्या माहितीबद्दल धन्यवाद विकासराव! तुमच्या लेकीचेही कौतुक वाटले!

ज्यांना करायचे असते ते नक्की करतात - तक्रार करत नाहीत..

यू सेड इट! अहो पण कृष्णशास्त्रींसारखा एखादाच! बाकी बरेचसे जण नुसत्या मारामारीच्याच गोष्टी करत असतात! स्वत: काहीच न करता 'संस्कृतकरता यंव करायला पाहिजे', 'संस्कृतकरता त्यंव करायला पाहिजे' अश्याच नुसत्या वायफळ गप्पा मारणारी बरीचशी मंडळी मला मराठी आंतरजालावर दिसतात!

असो...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पुन्हा संस्कृत :)

संस्कृत विषयीची तळमळ आणि त्यातुन संस्कृतच्या मारेक-यांची ओळख झाली !!!

आम पब्लिकला संस्कृतची गोडी लागावी अशी तळमळ असणारा कुणी संस्कृतप्रेमी/प्रचारक/प्रसारक नुसताच तक्रारवजा सूर न काढता, मला वरील प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर देऊ शकेल काय?

पण आम पब्लीकला संस्कृतविषयी जिज्ञासा,शिकण्याची इच्छा, सहानुभुती, आणि गोडीच नसेल तर संस्कृत प्रेमी/ प्रचारक/प्रसारक/ काय करतील हो !!!

आपला,
संस्कृतचा मारेकरी

वाचले

पण आम पब्लीकला संस्कृतविषयी जिज्ञासा,शिकण्याची इच्छा, सहानुभुती, आणि गोडीच नसेल तर संस्कृत प्रेमी/ प्रचारक/प्रसारक/ काय करतील हो !!!

आपण आपल्याच प्रतिसादावरील प्रतिसाद वाचल्यास लक्षात येईल की "आम पब्लीकला नाही तरी बर्‍याच जणांना संस्कृतविषयी जिज्ञासा,शिकण्याची इच्छा, सहानुभुती, आणि गोडी" असू शकते. तेंव्हा आपण म्हणता तसे काही जणांना जिज्ञासा, इच्छा, गोडी नसणे समजू शकते पण आपल्या विधानातून ज्यांना आवड असू शकते त्यांना अथवा त्या आवडीला केवळ संस्कृत म्हणून नकळत विरोध दिसतोय आणि तो पटू शकत नाही.

विरोध व्यक्तिसापेक्ष !!!

संस्कृतची गोडी असणा-यांना, शिकणा-यांना आमचा विरोध नाही. ज्यांना जिज्नासा आहे, त्यांनी शिकावी त्यांना विरोध करण्याचे कारण नाही. पण सर्वच सामान्य माणसांना संस्कृतविषयी जिज्नासा आहे, याबाबात दुमत होऊ शकते. संस्कृत ही आमची बोली कधीच नव्हती ती भाषा सामान्य माणसाने शिकूच नये, किंवा तसे नसले तरी ती सर्वांचीच भाषा व्हावी यासाठी कोणत्याच काळात प्रयत्न झाल्याचे आमच्या वाचनात नाही. संस्कृत शिकणा-यांना जाणीवपुर्वक दुर ठेवल्या गेलेल्या त्या सामान्य लोकांना संस्कृत शिकण्याची जिज्नासा निर्माण होईल यावर आमचा विश्वास नाही म्हणुन कदाचित आमच्या विधानात संस्कृत विरोध दिसत असेल. तसे असले तरी त्याचे आम्हाला बिल्कूलच वाईट वाटत नाही. कदाचित भाषेबद्दल काही पुर्वग्रह असतीलही म्हणुन तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. काही दिवसापासून संस्कृत ही अनेक भाषांची जननी आहे, असे ऐकत होतो. आता तिला मावशी म्हणन्याचा प्रयत्न त्या विषयाचे अभ्यासक करतांना दिसतात. असो आमचा संस्कृत भाषेला विशेषत: मृत भाषेला जीवंत करण्याचा जो प्रयत्न आहे, त्याला विरोध आहेच. तो विरोध पटणारा नसला तरी सामान्य माणसाचे मत म्हणुन आपण आमच्या मताचे स्वागत कराल याबद्दल आमच्या मनात शंका नाही.

अवांतर :- आमच्या विद्यापीठात नुकतेच म्हणजे तरी दोन वर्ष झाले असतील संस्कृत विषय सुरु होऊन. पण अजुनही विद्यार्थ्यांमधे संस्कृत विषयीची कोणतीच 'अधिकची' जिज्ञासा इतर भाषेच्या तुलनेत दिसली नाही आणि ही परिस्थिती सर्वच महाविद्यालयात असावी असे वाटते. (गुण मिळतात म्हणुन प्रवेश घेणारे अधिक आहेत हेही आम्ही नम्रपणे नमुद करु इच्छितो. )

सहमत आहे..

संस्कृत ही आमची बोली कधीच नव्हती ती भाषा सामान्य माणसाने शिकूच नये, किंवा तसे नसले तरी ती सर्वांचीच भाषा व्हावी यासाठी कोणत्याच काळात प्रयत्न झाल्याचे आमच्या वाचनात नाही.

संस्कृत शिकणा-यांना जाणीवपुर्वक दुर ठेवल्या गेलेल्या त्या सामान्य लोकांना संस्कृत शिकण्याची जिज्नासा निर्माण होईल यावर आमचा विश्वास नाही

सहमत आहे....!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

असंस्कृत्

>>जी भाषा सामान्य जहनात लोकप्रिय होत नाही, उलटपक्षी माझ्यासारखी अनेक सामान्य मंडळी त्या भाषेपासून अंमळ दूरच राहू इच्छितात, ती भाषा अत्यंत दुर्लभ आणि शिकण्यास अत्यंत किचकट आहे, हे ती भाषा शिकणार्‍यांचं नव्हे, तर त्या भाषेचं शॉर्टकमिंग आहे असं मी मानतो.

भाषेचा सोपेपणा आणि किचकटपणा हा भाषेपेक्षाही शिकणार्‍याच्या बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून असतो असे वाटते. तसं बघायला गेलं तर मातृभाषा सोडल्यास इतर सर्व भाषा शिकायला सारख्याच किचकट किंवा सोप्या असतात. त्यामुळे एखादी भाषा आपल्याला येत नाही हे त्या भाषेचं शॉर्टकमिंग आहे असं म्हणणं म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशातला प्रकार झाला. कुठलीही भाषा हे साक्षात सरस्वतीचं रूप असून ती सामान्य मनुष्यापेक्षा केंव्हाही मोठी असते हे नेहमी लक्षात घ्यावं. इतरत्र उर्दू भाषेच्या खुमारी आणि नजाकतीबद्दल आपल्याला वाटणार्‍या प्रेमाबद्दल उल्लेख आलेला आहे. आपल्यासारख्या उर्दूप्रेमी माणसाने कृपया खालील ओळीचा हिंदवी तर्जुमा(!) वाचकांना पेश -ए -खिदमद् करावा अशी नाचीजची आपल्याला दरख्वास्त आहे.
सनी ख्वाने तकदीसे मशरिक कहां है

राहिला प्रश्न अभिजात रागदारीचा तर त्यातली रागसंकल्पना ही वेदकाळाइतकी प्राचीन असून तिचं मूळ सामवेदात आहे असं मानलं जातं. देवालयांमधे देवस्तुतीपर ध्रुपदस्वरूपात असलेलं रागसंगीत सुलतानांच्या दरबारात आणून परमेश्वराऐवजी आक्रमक सुलतानांचं गुणवर्णन करणारी ख्यालगायकी ही साधारण पंधराव्या शतकापासून निर्माण झाली आहे. मूळ रागसंकल्पना इतकी शक्तिशाली आहे की तिचा ऐकणार्‍याच्या कानांद्वारे मनावर परिणाम होतो आणि म्हणूनच भाषांच्या भिंती ओलांडून भारतीय रागसंगीत जगभर आस्थेनं ऐकलं जातं हे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. बसंतचं लग्न ही लेखमालिका चांगली होती पण संगीत ही अनुभवायची गोष्ट असल्यामुळे रागाचं केवळ वर्णन करून तो कसा लोकप्रिय करता येऊ शकतो हे आमच्या तरी ध्यानात आलेलं नाही.
कुठलीही विद्या नेहमी पात्र शिष्यालाच द्यावी असा दंडक गुरूला घालून दिलेला आहे. अशिष्याला विद्या देणार्‍या गुरूचीच विद्या नष्ट होते म्हणतात. कदाचित संस्कृत भाषेच्या गुरूंबद्दल असंच काहीसं घडल्यामुळेच आज तिच्यावर अशी स्वत।लाच सिद्ध करून काही असंस्कृत लोकांकडून प्रशस्तिपत्रक मिळवण्याची पाळी आली असावी.

'मर्डर इन् ओरियंट एक्प्रेस् ' या प्रसिद्ध पुस्तकाची संकल्पना बारा निरपराध माणसांना ज्यूरीत बसवल्यावर एखाद्या माणसाला देहदंड सुद्धा देता येतो या तत्त्वावर आधारित आहे. याच पुस्तकाचं उदाहरण देऊन असं विचारावंसं वाटतं की दंड किंवा न्यायनिवाडा करून निकाल देण्याचा अधिकार कोणाच्या हातात आहे यावर तो निकाल / दंड कितपत बरोबर आहे हे ठरावं हे उत्तम नाही का? ज्यूरीतील माणसंच जर निरपराध आणि सच्चरित्र नसतील तर निकाल आणि निक्काल(!) यात फरक तो काय राहणार?

--अदिती

व्यक्तिगत रोखाची अनावश्यक वाटणारी वाक्ये प्रतिसादातून अप्रकाशित करण्यात आली आहेत. व्यक्तिगत संवादासाठी कृपया, खरडवही किंवा व्य. नि.चा वापर करावा. - संपादन मंडळ

अनुभव व परिचयात्मक लेख

"संगीत ही अनुभवायची गोष्ट असल्यामुळे रागाचं केवळ वर्णन करून तो कसा लोकप्रिय करता येऊ शकतो हे आमच्या तरी ध्यानात आलेलं नाही."

गायन-वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, चित्रपटांसबंधित सर्वच कला इ. अनेक विषयांवर लेख लिहीले जातात, पुस्तकेही लिहीली जातात. हे लेख, ही पुस्तके फक्त त्यातील मर्मज्ञच वाचतात असे नव्हे, अनेकदा त्याबद्दल नुसती थोडीफार माहिती अथवा/ आणि कुतूहूल असलेले इतरेजनही वाचतात. ह्यातून त्यांना रूची निर्माण होऊ शकते. मग अर्थातच आपापल्या मगदूमानुसार हे काठावरचे लोक त्या त्या विषयात खोल जाऊ शकतात. तेव्हा रागाचे वर्णन, त्याविषयी काही रसात्मक विचार जर कुणी लेखांतून मांडले तर त्यात गैर काहीच नाही, उलट हे अगदी सकारात्मक कार्य आहे असे मला वाटते.

[जाता जाता, साहिरच्या 'चकले'तील ती ओळ 'सना-ख्वाने-तकदिसे-मशरिक कहां है?' अशी आहे. (संदर्भः 'तलखियॉ'). गाण्याच्या मीटरमध्ये बसाण्यास थोडी कठीण म्हणून तिचे 'जिन्हे नाझ है हिंदपर, वो कहां है?' असे केले गेले].

खुलासा..

बसंतचं लग्न ही लेखमालिका चांगली होती पण संगीत ही अनुभवायची गोष्ट असल्यामुळे रागाचं केवळ वर्णन करून तो कसा लोकप्रिय करता येऊ शकतो हे आमच्या तरी ध्यानात आलेलं नाही.

आपण मी लिहिलेला,

आमच्या अभिजात संगीतातील रागदारीतही प्रत्येकाला कळतेच असे नव्हे किंवा प्रत्येकाला त्याची आवड असतेच असे नव्हे. अश्या मंडळींना त्याची गोडी लागावी, त्यातील काही राग समजून सांगावेत या हेतूने मी 'बसंतचं लग्न' ही लेखमाला सर्वप्रथम मनोगतावर सुरू केली होती जी वाचकांना खूप आवडली होती असे अनेकांनी कळवल्याचे आठवते. आजही सवडीनुसार सदर लेखमालाचे नवे नवे भाग लिहिण्याचा माझा मानस असतो व त्यात सातत्य राखण्याचाही माझा प्रयत्न असतो. माझा असा मुळीच दावा नाही की अभिजात संगीताच्या या प्रसार/प्रचार कार्यात मी पूर्णत: यशस्वी झालो आहे. परंतु किमान निदान तसा प्रयत्न तरी केल्याचे मला निश्चितच समाधान आहे!

हा उतारा नीट वाचल्यास माझ्या लेखनामुळे मी कुठला राग लोकप्रिय केला आहे/करता येतो असं कुठेही म्हटलेलं नाही! मी माझ्या परिने त्या रागाचं सौंदर्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, मला जो राग जसा दिसला त्याप्रमाणे त्याबाबत थोडंफार वर्णनात्मक लेखन करून वाचकांना तो राग वारंवार ऐकण्याची गोडी लागू शकेल, किमानपक्षी उत्सुकता तरी वाटू शकेल इतपत प्रयत्न केला आहे. शिवाय यात मी पूर्ण यशस्वी झालो आहे असाही दावा मी केलेला नाही, हेही अदितीताईंच्या लक्षात यायला हरकत नाही!

पण संगीत ही अनुभवायची गोष्ट असल्यामुळे

संगीत ही अनुभवायची गोष्ट आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या माहितीप्रमाणे संगीताचा स्वर्गीय आनंद अनुभवल्याशिवाय बसंतच्या लग्नाचे १२-१३ भाग कुणा व्यक्तिस लिहिता येतील असं मला वाटत नाही!

असो...!

देवालयांमधे देवस्तुतीपर ध्रुपदस्वरूपात असलेलं रागसंगीत सुलतानांच्या दरबारात आणून परमेश्वराऐवजी आक्रमक सुलतानांचं गुणवर्णन करणारी ख्यालगायकी ही साधारण पंधराव्या शतकापासून निर्माण झाली आहे.

या संदर्भात अधिक भाष्य येथे केले आहे.

आपला,
(हिंदुस्थानी रागसंगीताचा व ख्यालसंगीताचा विद्यार्थी!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

असेच म्हणतो.

तात्या शी सहमत आहे. बसंत च लग्न हे संगीताचा परिचय करुन देणारी लेखमाला आठवते.
प्रकाश घाटपांडे

'लिहीणं' हा मनाचा आरसा असतो

भाषा ही कॅप्सुलच्या आवरणासारखी असते. कॅप्सूलमधील औषध महत्वाचे, आवरण हे काळानुसार बदलतच असते. संस्कृत हि भाषा प्राचिन आहे. तेंव्हा जुन्या अवशेशांना, थडग्यांनांच मंदिर समजू नये. जो पर्यंत मंदिरात भक्तांच्या भक्तिचं तेज असतं तोपर्यंतच मंदिराच्या अस्तित्वाला अर्थ असतो.
आपण जसे बोलतो, लिहितो तसेच घडत असते. संस्कुत भाषा संपलेली आहे हे तुमच्या लेखातील शेवटच्या वाक्यातच दिसून येते.
'मरणाराच दुसर्‍याला संपवायची' भाषा बोलतो.

एक तर

संस्कुत भाषा संपलेली आहे हे तुमच्या लेखातील शेवटच्या वाक्यातच दिसून येते.
'मरणाराच दुसर्‍याला संपवायची' भाषा बोलतो.

मी लिहिले आहे की... संस्कृतला वाचवायचे असेल तर. सतीशराव, अहो जिवंत असलेल्यालाच वाचवतात आणि जे उत्कट, उत्कृष्ट आहे त्याचा मृत्यु कसा होऊ शकतो?

तसेच आपले वरील विधान अनाकलनीय आहे. मृत्यु पावलेला अथवा पावत असलेला / असलेली कसे काय बुवा दुसर्‍याला संपवण्याची भाषा करणार? तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणी मृत्युशय्येवर असलेला "तुझा गळा दाबीन" असे कधी म्हणाला आहे का?

तुमचे विनोदयुक्त लिखाण वाचून हसू येते आहे. मी गेले कित्येक दिवसात एव्हढा हसलो नसेन.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

सहानुभुती...

मी लिहिले आहे की... संस्कृतला वाचवायचे असेल तर.

अहो पण संस्कृतला वाचवायची वगैरे वेळ त्या भाषेवर यावी याचेच नवल वाटते!

माझ्या मते एखाद्या भाषेचा जन्म झाल्यावर आमच्यासारख्या सामान्य, तळागाळातल्या लोकात तिचा प्रचार आणि प्रसार होऊन ती लोकप्रिय होणे, अधिकाधिक लोकांत लोकव्यवहारासाठी, थोड्याफार प्रांतवार वैशिष्ठ्यांच्या फरकाने (जसे कोकणी, व्हराडी, मालवणी, कोल्हापुरी, इत्यादी) लिहिण्या-बोलण्यासाठी ती वापरली जाणे हेच मी त्या भाषेचं मोठेपण मानतो!

उदाहरणच जर द्यायचं झालं तर आपली मराठी भाषा! आज ही भाषा किती समृद्ध आहे, हे मी वेगळं सांगायला नको!

या पार्श्वभूमीवर एखाद्या भाषेला वाचवण्याची वगैरे वेळ यावी याचे दयायुक्त वाईट वाटते! असो, जी मंडळी संस्कृतला वाचवू इच्छितात त्यांच्याबद्दल मला सहानुभुती आहे! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

आम्हालाही सहानुभुती.

जी मंडळी संस्कृतला वाचवू इच्छितात त्यांच्याबद्दल मला सहानुभुती आहे! :)

संस्कृत मधुन लोक संवाद साधत आहेत. संस्कृत मधुन नव-नवीन लेखन वाचायला मिळत आहे.
संस्कृतमधुन महाराष्ट्रातले विधानसभेचे कामकाज चालले आहे. बसचे फलक, दुकानाचे फलक, संस्कृतमधुन लिहिल्या जात आहे. संस्कृतमधुन गाणी ऐकायला मिळत आहे. त्याच्या नादमधुर स्वरांनी वातावरण प्रचंड अद्भुत झालेलं आहे.
वेगवेगळ्या संकेतस्थळांवर संस्कृतमधुन माहितीची देवाणघेवाण होत आहे, प्राचिन संस्कृत वाडःमयातुन लौकिक,पारलौकिक, विज्ञानाबद्दल प्रचंड माहितीचा साठा उपलब्ध झाल्यामुळे इतर भाषांनी संस्कृतचीच नव्हे तर प्रगतीचीही कशी हानी केली त्याबद्दल चर्चासत्रांचे जागोजागी आयोजन करण्यात येत आहे. संस्कृतच्या एकेका शब्दातील अर्थांवर संशोधन चालली आहेत. असे खरेच व्हावे यासाठी आमची प्रचंड सहानुभुती जी मंडळी संस्कृतला वाचवू इच्छितात त्यांच्याबद्दल आहे. :)

वा!

संस्कृतमधुन गाणी ऐकायला मिळत आहे. त्याच्या नादमधुर स्वरांनी वातावरण प्रचंड अद्भुत झालेलं आहे.

वा! फारच सुरेख कल्पना आहे! परंतु बिरुटेशेठ, मी एक मुद्दा मांडू इच्छितो तो असा की वातावरणात अद्भूतपणा असलाच तर तो संगीताच्या सुरांमुळेच अधिक असेल, शब्दांमुळे नसेल! कारण गाण्याचे शब्द संस्कृतमध्ये असल्यामुळे ते पब्लिकला किती समजतील हा मला प्रश्नच आहे! :)

बाय द वे, संस्कृतमधली भावगीतं ऐकायला मी उत्सुक आहे. कुणाच्या संग्रही असल्यास कृपया माझ्याशी व्य नि ने संपर्क साधावा! :)

आपला,
(संगीतप्रेमी!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

कोमात गेलेली भाषा

अहो जिवंत असलेल्यालाच वाचवतात आणि जे उत्कट, उत्कृष्ट आहे त्याचा मृत्यु कसा होऊ शकतो?

बहुतेक रावळेसाहेबांना संस्कृतभाषा ही 'कोमात' गेलेल्या रुग्णासारखी वाटत असेल.

फारशी माहिती नाही .पण.....

जशी संस्कृत ही आपल्याकडे प्राचीन्,ईतर भाषांची जननी मानतात ,तसे युरोपिअन् भाषेचे उगमस्थान "लॅटीन" ही
ऐतिहासिक (पण आता सहसा बोलण्यात् न येणारी) भाषा आहे.
ईथे ,पाश्चात्त्य जगात कुणी लॅटीन ही बोलीभाषा व्हावी असा आग्रह केल्याचे ऐकिवात नाही.
हो.तिचे अभ्यासक आहेत,पण त्यांची मुख्य भुमिका ही इतिहास संशोधनाचे एक् साधन म्हणुन वापरण्याचीच आहे.
येथील सध्याच्या युरोपिअन भाषा सोडुन लॅटीनचा वापर् करण्याचा आग्रह धरतान कुणी आढळत नाही.
किंवा "आता कुणी लॅटीन वापरत नाही" अशी खंतही कुणाकडे दिसली नाही.

मग संस्कृत बोलण्यात वापरात् येत नाही,ह्यात एवढं वाइट का वाटतय तेच कळत नाहिये.
आज जगभरातील कुठलाही भुभाग घ्या.(उत्तर पुर्व युरोपमधील सेल्टिक्/केल्टिक भाषा,बाजुअकडील् जुन्या स्कॅंडीनेव्हिअन् भाषा,
मध्य पुर्वेतील सेमेटिक भाषा गटातील भाषा,चीन-जपान मधील चित्र-भाषा.भारत्-एउओपे सिल्क रूट वरच्या इंडो-युरोपिअन् भाषा.
वगैरे वगैरे.)
तिथे हजारो वर्षांपुर्वि बोलली जाणारी भाषा पहा.आज बोलली जाणारी भाषा पहा.
दोन्ही भाषात दिसेल ते "साम्य" . पण् त्या भाषा एकच असणार नाहित.

भाषा ही प्रवाही असणारच. शेवटी भाषा भाषा म्हणतात ती आहे तरी काय?
आपण् एकमेकांशी बोलतो,संवाद साधतो,तेच ना.
संवाद साधणार म्हणजे त्यात् अपरिहार्यपणे जीवन,जीवनद्धतीशी संबंधित बोलणे आले.
आणि अशी शेकडो हजारो वर्षात् जीवन् पद्धती कशी,किती बदलली हे मी आपणा लोकांना सांगणे म्हण्जे
चौथितल्या पोराने बिल् गेट्सला विंडोज बद्दल् माहिति देण्यासरखं आहे.

थोडक्यात सांगायचं येवढचं व्हतं की,
भाषा त्या काळात् एक् बोलली जात् होती.
तिच्यात् बदल्,सुधारणा अप्-भ्रंश होत आजची एक् भाषा बोअलई जातिए.
काही शतकंनी हि वेगळेच रूप घेइल.
हे होत आहे.होत् राहणार.

जन सामान्यांचे मन

बिल गेट्स आणि विंडोज

पाश्चात्त्य जगात कुणी लॅटीन ही बोलीभाषा व्हावी असा आग्रह केल्याचे ऐकिवात नाही.

खरे आहे आणि संस्कृतलाही कोणी बोलीभाषा करण्याची गरज आहे असे वाटत नाही. परंतु, काही हौशी आणि अभ्यासू मंडळींना एकत्र येऊन संस्कृत जिवंत ठेवावी असे वाटत असेल तर त्यात गैरही नाही. भाषा केवळ वाचल्याने किंवा लिहिल्याने नाही तर बोलल्याने आणि उच्चारांनीही जिवंत राहते तेव्हा जर कळकळीने कोणी तो प्रयत्न करत असेल तर स्तुत्यच आहे.

परंतु, ते करताना बिल गेट्सला सुद्धा विंडोजची किती वर्जन्स बदलावी लागली त्याचा विचार भाषापंडितांनी डोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. नदी प्रवाही नसेल, दुसर्‍या जलस्रोताला सामावून घेत नसेल तर सुकते/ संपते हे जितके सत्य आहे तितकेच ते भाषेबाबतही आहे.

श्रवणबेळगोळ मधील मराठी शिलालेख, ज्ञानेश्वरकालीन मराठी, शिवाजीकालीन मराठी, ब्रिटिशकालीन मराठी आणि आताची मराठी यांच्या अनेक आवृत्ती बदललेल्या आढळतील कारण सदर भाषा ही रोजच्या वापरातील भाषा असावी. या पार्श्वभूमीवर संस्कृतच्या किती आवृत्ती बदलल्या हे जाणून घ्यायला आवडेल.

सहमत आहे..

परंतु, काही हौशी आणि अभ्यासू मंडळींना एकत्र येऊन संस्कृत जिवंत ठेवावी असे वाटत असेल तर त्यात गैरही नाही.

हा हा हा! हे आवडलं! :)

परंतु, ते करताना बिल गेट्सला सुद्धा विंडोजची किती वर्जन्स बदलावी लागली त्याचा विचार भाषापंडितांनी डोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. नदी प्रवाही नसेल, दुसर्‍या जलस्रोताला सामावून घेत नसेल तर सुकते/ संपते हे जितके सत्य आहे तितकेच ते भाषेबाबतही आहे.

लाख मोलाचा मुद्दा!

या पार्श्वभूमीवर संस्कृतच्या किती आवृत्ती बदलल्या हे जाणून घ्यायला आवडेल.

हेच म्हणतो!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बोलणंच खुंटलं!

हां, आता 'संस्कृत ही जन्मत:च परिपूर्ण भाषा असून तिच्या कुठल्याही आवृत्त्या वगैरे काढण्याची मुळी गरजच नाही' असं जर कुणी म्हणणार असेल तर म्या पामराचं तर बॉ बोलणंच खुंटलं! :)

काय म्हणता प्रियालीताई? बरोबर का नाय? :)

आपला,
(आवृत्त्यातला!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

संस्कृत बोलीभाषा?

संस्कृत प्रवेशिका, संस्कृत परिचय आणि संस्कृत परिमल या नावांची जी शालेय पुस्तके पूर्वी पु.ना,वीरकर, म. वि. काशीकर आणि वि.कृ. श्रोत्रिय यांनी लिहिली होती, त्यांच्यामुळे त्या काळच्या बहुतेक विद्यार्थ्यांना संस्कृत आवडत असे. ही पुस्तके बदलली आणि संस्कृतची शाळांतून हकालपट्टी व्हायला सुरुवात झाली. या पुस्तकांतून संस्कृत भाषेचे सौंदर्य अगोदर समजायचे आणि मग तिचे व्याकरण. स्पेलिंग पाठ केल्याशिवाय इंग्रजी येत नाही ही जशी भ्रामक कल्पना तशीच संस्कृत म्हणजे पाठान्तर हीसुद्धा! पाठान्तर न करता या दोन्ही भाषा येतात असा माझा स्वत:चा अनुभव आहे.
भाषा म्हणजे बोलणे आणि बोलणेच ही कल्पना तितकीशी बरोबर नाही. प्राण्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा, मूक-बधिरांची भाषा, नृत्य-संगीताची भाषा, ट्रॅफिक सिग्नल्सची भाषा या सर्व भाषाच.
महाराष्ट्रातल्या (तसेच गुजराथ आणि अशा काही प्रांतातल्या) मुलांना दोन-दोन पदव्या मिळेपर्यंत शिक्षण घेऊनही इंग्रजी बोलता येत नाही. कुणाला खरे वाटणार नाही, पण माझ्या परिचयाच्या एका एम.बी.बी.एस. डॉक्टरलाही इंग्रजी बोलायची भीती वाटते. त्यामुळे संस्कृत समजले तरी बोलता येईलच असे नाही. बोलण्यासाठी ज्याच्याशी बोलायचे त्याला ती भाषा अवगत नसेल तरी बोलण्याची सवय कशी होणार? मराठीच्या डझनभर बोलीभाषा आहेत. आपल्याला त्या बोलता येतात? मुंबईच्या श्रीवत्सबालमंदिर या शाळेची मुले शाळेत फक्त संस्कृतच बोलतात. ती मुले पुढील आयुष्यात संस्कृत कधीच विसरणार नाहीत. जगात ज्या अतिशय अवघड भाषा आहेत त्यांच्यांत मराठीची गणना होते, संस्कृतची नाही.
परवा वसंतराव गाडगीळ यांचे संस्कृत भाषण ऐकले. ज्या पद्धतीने सभेला हजर असणार्‍यांनी त्यांच्या भाषणाला दाद दिली ते पाहून, अजूनही अनेकांना संस्कृत समजते अशी खात्री झाली. (ती सभा संस्कृतसंबंधी नव्हती.) माझ्या माहितीचे अनेकजण संस्कृतमध्ये बोलू शकतात. पण हे सर्व शिक्षक आहेत. वसंतरावांसारखे शिक्षक नसलेले थोडेच.
संस्कृत बोलता आले नाही तरी त्या भाषेचे वाङ्‍मय समजते आणि आवडते. इतके समृद्ध वाङ्‍मय क्वचितच दुसर्‍या एखाद्या प्राचीन भाषेचे असेल. संस्कृतची तोंडओळख असेल तर इतर भारतीय भाषा समजायला आणि शिकायला मदत होते हा अतिशय महत्त्वाचा फायदा.
महाराष्ट्र सोडला तर इतर अनेक प्रांतांतून संस्कृत शिक्षणाचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. संस्कृतच्या शिक्षणासंबंधी महाराष्ट्राइतकी अनावस्था भारतातील कुठल्याही प्रांतात नाही. --वाचक्‍नवी

यादी ?

जगात ज्या अतिशय अवघड भाषा आहेत त्यांच्यांत मराठीची गणना होते, संस्कृतची नाही.

अवघड भाषांची अशी यादी उपलब्ध आहे? कोणी बनवली ती यादी आणि अवघडपणाचे निकष कोणते?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवघड भाषा ?

जगात ज्या अतिशय अवघड भाषा आहेत त्यांच्यांत मराठीची गणना होते, संस्कृतची नाही.

वाचक्नवी,
काय राव !!! माय मराठी इतकी सोपी भाषा कोणतीच नसावी.
इंग्रजी ही तितकीच सोपी भाषा आहे. पण संस्कृत ही सोपी असुच शकत नाही.( उच्चारशास्त्राच्या अभ्यासकांचे मत आहे. )

बरं भाषा ही सोपी आणि अवघड कशावरुन ठरवायची ?
आपल्या आजुबाजुला बोलली जाणारी भाषा माणुस लवकर शिकतो. आता आमच्या आजुबाजुला मराठी भाषा बोलली जाते म्हणुन येणारी पीढी मराठीच शिकेल.
इंग्रजी भाषा बोलणार्‍यांच्या परिसरातील अधिक इंग्रजी शिकतील. (जगभर बोलल्या जाते म्हणुन)
आता संस्कृत ही जीथे बोलल्याच जात नाही तिथे संस्कृत काय शिकणार ?

>>संस्कृतच्या शिक्षणासंबंधी महाराष्ट्राइतकी अनावस्था भारतातील कुठल्याही प्रांतात नाही.
उदाहरणार्थ कोणत्या राज्यात संस्कृतविषयी आस्था आहे, आणि त्यांचे तेथील भाषेच्या तुलनेत प्रमाण काय आहे जरा आकडेवारीने सांगता का ?

अवांतर : भारतात एक गाव आहे म्हणे, तिथे गावातील संपुर्ण लोक संस्कृतच बोलतात. अशा लोकांचे देवाशप्पथ आम्हाला कौतुक वाटते. :)

+१ आजुबाजुला बोलली जाणारी भाषा माणुस लवकर शिकतो

आजुबाजुला बोलली जाणारी भाषा माणुस लवकर शिकतो
+१
सर्व भाषा या परिस्थितीत एकमेकांइतक्याच सोप्या किंवा कठिण असतात. प्रौढ वयात मराठी, इंग्रजी, संस्कृत शिकणे कठिण जाते. पण त्यात्या भाषेच्या मुलुखात राहिले तर प्रौढ वयातही ती बोलणे शक्य होते.

कर्नाटकात मठूर अग्रहारात लोक संस्कृत बोलतात असे ऐकून आहे. परंतु संस्कृत लहानपणापासून बोलणारा दुसरा कुठला मुलूख आज नसावा.

 
^ वर