पित्याच्या मारेकर्‍याची भेट.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2952576.cms

आपल्या पित्याचे मारेकरी असलेल्या व्यक्तिची भेट घेणे हे कोणत्या दृष्टीकोनातुन समजुन घ्यावे हा प्रश्न मला सतावत आहे. या मागे माझ्या मते एक महत्वाचा आणि मनाच्या आत खोलवर दडलेल्या कोठल्यातरी भागाला नक्कीच स्पर्श करत असेल.

आतापर्यंत भारतातील राजकिय हत्या अथवा राजकिय व्यक्तिंच्या हत्येचा मागोवा घेतला तर महात्मा गांधी, इंदिराजी, राजीव गांधी आणि प्रमोद महाजनाचे नाव आठवते.

त्यातही सर्व गांधीच्या हत्येमागे राजकिय मतांतर अथवा मतभेद असलेले वाटतात. दुर्देवाने प्रमोद महाजन यांचाही अकाली अंत मनाला चटके देतो.

प्रियांका तशी परिपक्व वाटते पण तरीही पित्याच्या मृत्युचा क्षण तिच्या मनात कोठेतरी असावा असे वाटते.

तिने नलिनीला भेटुन काय साध्य केले हा प्रश्न मला भेडसावतो. त्याच बरोबर तिने असे करायला नको होते असेही वाटते.

शेवटी अश्या घटना एक अपरिहार्य भाग म्हणून स्विकारायला हवे. असो.

Comments

लाइमलाइट

राजकारणी लोक लाइमलाइट मधे यायला अगदी काहीही करु शकतात याचे उत्तम उदाहरण आहे हे !

>>प्रियांका तशी परिपक्व वाटते ...

प्रियांका स्वताहुन अशी काही मुव्ह घेउ शकेल असे का कोणजाणे वाटत नाही, तिची बोलवितत्या धनी सोनिया असल्या पाहिजेत, आणी तसे असेल तर त्या नक्किच परिपक्व राजकारणी आहेत.

ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन

अशा प्रकारच्या भेटी मनातील शल्य बरे करायला उपयोगी असतात, असे दक्षिण आफ्रिकेत दिसून आले.

त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ज्यांनी खून-अत्याचार केलेत, त्यांचा आणि झळ पोचलेल्यांचा संवाद घडवण्यात आला. पोरकी झालेली मुले आपल्या आईवडलांना मारणार्‍या गुप्तपोलिसांना भेटली, अशाही घटना झाल्या.

हा प्रकार त्या समाजाला उपयोगी पडला आणि त्या व्यक्तींना उपयोगी पडला.

 
^ वर