उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
राष्ट्रीय मूलनिवासी संघ, एतद्देशीय आणि बाहेरचे
नवीन
April 4, 2008 - 3:34 pm
भाग १
पुण्या-मुंबईत बरेच ठिकाणी भिंतींवर पुढीलप्रमाणे संदेश लिहिलेला दिसतो
सिर्फ ब्राह्मण विदेशी है, बाकी सब देशी है ।
पुणे करार धिक्कार परिषद, राष्ट्रीय मूलनिवासी संघ
पुणे करार धिक्कार परिषद, राष्ट्रीय मूलनिवासी संघ
हा संदेश पाहून काही प्रश्न मनात आले.
- "सिर्फ ब्राह्मण विदेशी है, बाकी सब देशी है ।" याला काही शास्त्रीय/ऐतिहासिक आधार आहे काय?
- राष्ट्रीय मूलनिवासी संघ ही कसली संस्था आहे? त्यांची उद्दिष्टे काय आहेत?
- 'पुणे करार' काय होता आणि मूलनिवासी संघाला त्याचा धिक्कार करावासा का वाटतो आहे?
भाग २
मध्यंतरी जनुकीय सर्वेक्षणाचा आधार घेऊन बर्याच उच्चवर्णीय जाती भारतीय नव्हेत असा प्रचार झाल्याचे आठवणीत आहे. असे एक सर्वेक्षण http://genomebiology.com/content/pdf/gb-2005-6-8-p10.pdf पाहता येईल.
जनुकीय माहितीच्या आधारे पाहिले तर बहुसंख्य ब्राह्मण हे एतद्देशीय असल्याचे दिसून येते. तसेच पूर्वीच्या काळातील ऐतिहासिक वास्तव पाहता खूप मोठ्या प्रमाणावर जनुकीय संकर सर्व जातीजमातीत होत असावा. आक्रमणे, स्थलांतरे इ. कारणांनी बरीच जनुकीय देवाणघेवाण झाली असणे शक्य आहे. याविषयी आपणास असलेली माहिती कृपया इथे द्यावी.
नम्र सूचना : सदर चर्चाप्रस्ताव केवळ माहिती मिळवण्याच्या उद्देशाने (ऍकॅडमिक इंटरेस्टने) मांडला आहे.
दुवे:
Comments
विविध जाती जमाती
http://mr.upakram.org/node/818 या ठीकाणि बिरुटे सरांनी चर्चा आरंभिली होती. त्यातील विविध प्रतिसादात काही माहिती उपलब्ध आहे. जगभरातल्या विविध संस्कृतीत संकर झाले आहेत. मानवाच्या उगमाचा शोध घेत बसले तर आफ्रिकेत जाउन पोहोचु. द्वेषमूलक अस्मिता जोपासून स्वार्थासाठी राजकारणाचा वापर हा इतिहासात दिसून येतो.
प्रकाश घाटपांडे
+१
द्वेषमूलक अस्मिता जोपासून स्वार्थासाठी राजकारणाचा वापर हा इतिहासात दिसून येतो.
एकदम मान्य!
बाकी या विषयासंदर्भात एक प्रश्न - या "मूलनिवासी संघाचे" नेतृत्व कोण करत आहे? चेहर्याचे नेतृत्व आहे की बिनचेहर्याचे (म्हणजे छूपे)? थोडक्यात असला द्वेष पसरवणार्या चळवळी हेतूपुरस्सर "नेतृत्वहीन" असतात की "हीन नेतृत्व" असते?...
बाकी ऍकॅडेमिक वगैरे विचाराल तर सांगायला लागतील - आर्य आणि अनार्य. या वादात दोन्ही बाजूने लिहीणारे दिसतील आणि ऍकेडेमिक रिसर्च झालेला दिसेल. माझे एक साधे म्हणणे आहे, तुम्हाला इटालीयन व्यक्ती चालत असेल तर जो इतिहास म्हणून पण कुठेच माहीत नाही त्याला सिद्ध न करता द्वेषाचे राजकारण कशासाठी?
पूणे करार (१९३२)- हा डॉ. आंबेडकर आणि म. गांधीजीं मधे झाला होता. थोडक्यात अस्पृश्यांना वेगळे मतदार संघ ठेवा असे आंबेडकरांचे म्हणणे होते आणि गांधीजींना ते मान्य नव्हते (त्यांना मुसलमानांसाठी वेगळे मतदार संघ असण्यास हरकत नव्हती). त्यांनी आमरण उपोषण केले आणि शेवटी नैतिकतेच्या दबावाखाली काही कलमे तयार करून हा करार झाला ज्यात आंबेडकरांनी वेगळे मतदार संघ हवेत हा हट्ट सोडला. पण नंतर त्याच करारामुळे नंतर झालेल्या प्रांतिक निवडणूकात ते हरले...
अर्थात आता ७५ वर्षनंतर या घटनेच्या (आणि तशा अनेक घटनांसंदर्भात) म्हणता येईल की पुलाखालून नुसते पाणी वाहून गेले नाही तर पूलच्या पूलच वाहून जाउन नवीन पूल तयार होऊन त्याखाली देखील पाणी वाहून गेले... थोडक्यात काहीतरी उकरून काढून (कुठल्याही बाजूच्या) सामान्यांना चिथावण्यापेक्षा त्यांना सुखाने कसे राहता येईल याचा विचार केला तर बरे होईल असे वाटते. नाहीतर काय उद्या उत्तरभारतात "क्षत्रीय समाज" हा "धोबी समाजाच्या" विरोधात आंदोलन करू लागेल की त्यांच्या गॉसिपमूळे आमच्या रामाला त्याच्या बायकोला सोडावी लागली म्हणून :-) (ह.घ्या.)
असो.
समाज व संकल्पना
वडारणी चोळी घालत नाहीत. ज्या चोळी मुळे रामायण घडल ! नकोच ती मेली कटकट ; चोळीचा मोह नको आन संसाराची होळी नको. अशी त्यामागची संकल्पना मांडली जाते.
रामोशी समाज म्हणतात. आम्हीच खरे रामाचे वंशज. रामोशी म्हणजे रामवंशी. काळाच्या प्रवाहात ते रामोशी झालं.
प्रत्येक जाती जमातीशी काही संकल्पना निगडीत आहेत. म्हणी .वाक्यप्रचार, लोकसंगीत , रुपके, लोककथा इत्यादी तून त्याची प्रतिबिंबे उमटत असतात.
प्रकाश घाटपांडे
धन्यवाद | चर्चेचा मार्ग
>> या ठीकाणि बिरुटे सरांनी चर्चा आरंभिली होती. त्यातील विविध प्रतिसादात काही माहिती उपलब्ध आहे
दुव्याबद्दल धन्यवाद! निश्चितच वाचनीय चर्चा आहे. पण त्यात फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला आहे असे प्रथमदर्शनी वाटले.
>> जगभरातल्या विविध संस्कृतीत संकर झाले आहेत.
प्रश्नच नाही. याचा शोध घेण्याचे प्रयत्नही झाले आहेत, त्यांची माहिती या चर्चेतून पुढे यावी असे वाटते.
>> द्वेषमूलक अस्मिता जोपासून स्वार्थासाठी राजकारणाचा वापर हा इतिहासात दिसून येतो.
हेही खरे आहे. ही चर्चा त्या रुळावर जाऊ नये असे वाटते. आपल्याला फक्त ऐतिहासिक/वैज्ञानिक/भौगोलिक अश्या माहितीची चर्चा हवी आहे.
अवांतर -
हा निबंधही वाचण्यालायक आहे.
जरूर वाचावा.
माहितीपूर्ण लेख
दुव्यावरील लेख चाळून पाहिला. अतिशय माहितीपूर्ण लेख वाटतो आहे. नीट लक्ष देऊन वाचला पाहिजे. विसुनाना धन्यवाद!
शास्त्रीय लेखन
दोन लेखांच्या दुव्यांबद्दल धन्यवाद. दोन्ही लेख शास्त्रोक्त पद्धतीने लिहिले आहेत, पण हे लेख कुठल्या 'पीयर रिव्ह्यू' मधून गेले आहेत व परिणामार्थ कुठल्या प्रकाशनात निवडले गेले आहेत हे समजलं तर बरं होईल. केवळ शास्त्रोक्त लेखनशैलीमुळे ते वस्तुस्थितीवर नवीन प्रकाश पाडतात हे मान्य करणं अवघड आहे.
सहमत
केवळ शास्त्रोक्त लेखनशैलीमुळे ते वस्तुस्थितीवर नवीन प्रकाश पाडतात हे मान्य करणं अवघड आहे.
सहमत आह. पैकी लेखात दिलेल्या दुव्यावरील लेख 'रिव्ह्यू' केलेला नाही, तसे त्याच्या पहिल्या पानावर स्पष्ट म्हटले आहे. विसूनानांच्या दुव्यावरील लेख 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्स' मध्ये प्रकाशित झालेला आहे. सर्वसाधारणपणे अशा मासिकांमध्ये लेख प्रकाशित करण्यासाठी त्या त्या मासिकाच्या रिव्ह्यू प्रक्रियेतून जावे लागते.* तेव्हा हा लेख त्यातून गेला आहे असे मानायला हरकत नसावी.
*अर्थात हे ही १००% खात्रीलायक नसते कारण शेवटी रेफरी लोकही माणसेच असतात. काही वेळा नंतर एखादा लेख असत्य आहे असे लक्षात आल्यावर तो परत घेतला जातो. पण सर्वसाधारणपणे पीयर रिव्ह्यू मधून गेलेल्या लेखांना ग्राह्य मानण्यात येते.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रकाशन | पियर रिव्ह्यू
>> पण हे लेख कुठल्या 'पीयर रिव्ह्यू' मधून गेले आहेत व परिणामार्थ कुठल्या प्रकाशनात निवडले गेले आहेत
चर्चा प्रस्तावात असलेला पेपर Genome Biology या जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे असे दिसते. विकिपिडीयावरील List of scientific journals in biology मध्ये याचे नाव आहे. हे जर्नल कितपत प्रसिद्ध/विश्वासार्ह आहे हे त्या क्षेत्रातील लोकच सांगू शकतील. आणि सदर पेपर चा पियर रिव्ह्यू झालेला नाही हे पहिल्या पानावर लिहिले आहेच.
प्रिप्रिंट डिपॉझिटरी
जीनोम बायॉलॉजीच्या संकेतस्थळावर गेल्यावर कळाले की हा लेख प्रिप्रिंट डिपॉझिटरी या विभागात आहे. इथे लेखक आपले लेख टाकू शकतात, याला पियर रिव्ह्यूची गरज नसते. अशीच सोय गणित, पदार्थविज्ञान इ. साठी या संकेतस्थळावर आहे. लेख अशा तर्हेने प्रकाशित करण्यामागे साधारणपणे एखाद्या शोधावर स्वतःचा हक्क सांगणे हा असतो. लेख प्रकाशनासाठी मासिकांना पाठवल्यावर पंचांची प्रक्रिया होईपर्यंत महिने ते वर्ष लागू शकते. तेवढ्यात दुसर्या कुणी तेच काम केले तर त्याचे श्रेय कुणाला असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जेव्हा अशा संकेतस्थळांवर लेख प्रकाशित होतो तेव्हा त्याची तारीख आणि वेळ नोंदली जाते ज्यायोगे शोध आधी कुणी लावला हे नक्की व्हायला मदत होऊ शकते.
बहुधा हा लेख प्रकाशनासाठी पाठवलेला असावा आणि पंचांच्या निर्णयाची प्रतिक्षा असावी.
हे जर्नल कितपत प्रसिद्ध/विश्वासार्ह आहे हे त्या क्षेत्रातील लोकच सांगू शकतील.
सहमत आहे.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx