धर्म-शिक्षणाचे धडे ध्या.........

जून महिना उजाडला की, शात्र कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकामधे विशेषतः शहरामधील पालकंमध्य वाढ्लेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिषणाबरोबर संस्कार हेही महत्त्वाचे असून हे संस्कार धर्माव्दारेच मुलाबाळामध्ये उतरु शकतात.

धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलिचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण्-महाभारतातिल एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळामध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आवळ यामूळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे, सगळे लोक या परिस्थितीत सुधारणा करण्याची भाषा बोलतात पण प्रत्यक्षांत काहीही केले जात नाही.
खरं तर शिक्षण क्षेत्रात धार्मिक शिक्षणाचा पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे कहीच कारण नाही. किंवा त्यामुळे आपल्या निधर्मीवादाला वाव येईल अशीही भीति बाळगण्याचे कारण नाही अलिकडे घरांघरांतून सुध्दा धर्म आणि धार्मिक शिक्षण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थामधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे.
माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामाची गाथा, रामदासाचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गगत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत.
या शिक्षणाचे स्वास्थ कसे असावे हा तपशिलाचा प्रश्न आहे. तो ज्या त्या शिक्षण संस्थेने सोडविले तरी चालेल. पूर्वि संस्कृत विषय होता तेव्हा त्या व्दारे थोडा तरी धार्माशी व पाठांतराशी संबंध येई. आता संस्कृत भूतकाळात जमाझाले आहे. मुले यात माणसे न बनता यंत्र बनू लागली आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाबाळांना घडवायचे असेल, नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति यावे चाड असणारे नागरिक निर्माण करायचे असतील तर शिक्षण संस्थांमधून धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. काही शाळांनी प्रयोगादाखलही हा उपक्रम हाती घेऊन पहावा. मुलांना या शिक्षणांत गोडीही लागेल आणि त्याचे चांगले परिणामही दिसल्याशिवाय रहाणार नाहीत.
धर्म-शिक्षणाचे धडे ध्या.........
संजीव

Comments

असे?

म्हणजे असे काही करायचे आहे का?
http://in.crossmap.com/education/

की असे करायचे आहे?

की गोंदियातल्या आदिवासी विभागात चालले आहे तसं?

तसं असेल तर धर्म शिक्षणाचे काम पुर्ण करण्याची ही धोरणे व लागणारे पैसेही येथे आहेत!

आपला
गुंडोपंत

जबरा!

+++++१!!!!

- मेघना भुस्कुटे

दुवे उघडून वाचले.

प्रचाराचे उत्तर प्रचारानेच द्यावे लागते. सुळावर मेलेल्या येशूचे पवित्र भूत लोकांना एकदा दिसले एवढ्या तुटपुंज्या धाग्यावर आख्खा इसाई धर्म उभा आहे. बायबलचा पूर्वार्धच वाचनीय आहे. त्यात आपल्या पुराणांसारख्या भाकडकथा असल्या तरी इतिहासाचे काहीतरी धागेदोरे आहेत. दुसर्‍या भागात निव्वळ पोकळ उपदेश आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी प्रवचनकार आणि हरदासांची फौज आदिवासी भागांत पाठवली पाहिजे. मिशनर्‍यांना दे माय धरणी ठाय करून , पळता भुई थोडी होईल असे केले तरच काही शक्य होईल. पैशाच्या आमिषाने, जबरदस्ती किंवा स्वेच्छेने झालेले धर्मान्तरण परत उलटवता येते हे पटवून दिले की काम झाले. अशा लोकांची जात कागदोपत्री 'हिंदु' असेल, किंवा त्यांच्या मर्जीची असेल. जातीची नोंदणी बंद केली की हाही प्रश्न सुटेल. धर्म एका पुस्तकात कैद केला की संपला हेच सत्य.
डांग जिल्ह्यात मला आदिवासींनी काही ध्वनिमुद्रिका दाखवल्या होता. उभ्या पेन्सिलीवर त्यातली एखादी ठेवून त्यावर दुसर्‍या पेन्सिलीचे टोक ठेवायचे. तबकडी हाताने हळूहळू फिरवली की क्रिस्ती धर्मप्रचार ऐकू यायचा. सगळा भर "तुमचा देव दगडाचा, तो बुडतो. आमचा लाकडाचा, तो तरतो" यावर. (तुमचा जळतो आमचा नाही, हे कुणी सांगावे?).--वाचक्‍नवी

अज्ञान

धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलिचा धर्माशी संबंध येत नाही.

बौद्ध, जैन, इस्लाम, तुकाराम, ज्ञानेश्वरांवरचे धडे अभ्यासक्रमातून हटले की काय?

आता संस्कृत भूतकाळात जमाझाले आहे.

कधीपासून?

कुठल्या धर्माचे शिक्षण यावरही थोडा प्रकाश पडावा.

शिक्षणात लुडबूड नको

>> शिषणाबरोबर संस्कार हेही महत्त्वाचे असून हे संस्कार धर्माव्दारेच मुलाबाळामध्ये उतरु शकतात.

हे विधान खरे नाही, उदाहरणे देण्याची आवश्यकताही वाटत नाही.

>> धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलिचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर,
>> निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण्-महाभारतातिल एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात.

आमच्या शाळेत प्रतिज्ञा आणि जनगणमन बरोबर"खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" ही प्रार्थना म्हणत असत त्यात धर्माचा काही संबंध नव्हता. धर्मग्रंथांचे वाचन, पाठांतर, निरुपण शाळेत कशाला हवे? गणित, विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भाषा हे विषय कधी शिकायचे मग? धर्मग्रंथ कोणते? गीता की कुराण की गुरुग्रंथसाहेब की बायबल?

>> खरं तर शिक्षण क्षेत्रात धार्मिक शिक्षणाचा पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे.

उलट शिक्षणाचा धार्मिकतेशी जेवढा कमी संबंध येईल तेवढा चांगला. जे काही धार्मिक संस्कार करायचे आहेत ते आपापल्या घरी करावे.

>> त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाबाळांना घडवायचे असेल, नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति यावे चाड असणारे नागरिक निर्माण करायचे असतील
>> तर शिक्षण संस्थांमधून धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ति, मातृभक्ति इ. इ. सर्व शाळेने करावे मग पालकांची जबाबदारी काय? आणि धर्माच्या शिक्षणानेच हे गुण येतील असे म्हणणे हास्यास्पद आहे.

शिक्षणात धर्माची भेसळ करण्याचे प्रयत्न सगळीकडे होत असतात. राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या या प्रयत्नांमुळे मुलांचे नुकसानच होऊ शकेल. सर्व सुजाण लोकांनी अश्या प्रयत्नांचा विरोधच केला पाहिजे.

अवांतर - शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे. "शिषणाबरोबर संस्कार हेही महत्त्वाचे.." वगैरे वाचून हा लेख 'लैंगिक शिक्षणावर' आहे की काय असे वाटले. अर्थाचा अनर्थ होऊ नये.

 
^ वर