आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -३

पहिल्या व दुसर्‍या भागाला ५० प्रतिसाद झाल्याने भाग ३ सुरु करत आहे.
या भरघोस प्रतिसादांबद्दल परत धन्यवाद!
(बाप रे!!! एखाद्या चर्चेचा तिसरा भाग कधी सूरू केला नव्हता आजतागायत!)

असेच नवनवीन चित्रपटांबद्दल येवू द्या...
----------------------------------------------
आपण सगळेच चित्रपट बघत असतो. काही जण अधून मधून तर काही अगदी नियमीतपणे.
आपण कोणते चित्रपट येव्हढ्यात पाहिले आहेत?

या यादीत
अगदी सगळे चालतील फ्रेंच, इटालियन, स्पॅनीश, इंग्रजी, हिंदी, मराठी, तामीळ...
डॉक्युमेंटरीज, आर्ट फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, फिचर फिल्म्स आणि अगदी ऍडल्ट सिनेमे सुद्धा! ;)

मात्र या चर्चेत नुसते चित्रपटाचे नाव देवू नका, त्या चित्रपटात काय आवडले/नावडले तेही द्या.
चित्रपट पाहिल्यावर काय वाटले, भावले, पटले न पटले व तसे का वाटले हे दिलेत तर बहारच!
शिवाय चित्रपटाचे संक्षिप्त कथानक दिले तर फार उत्तम. मात्र सस्पेन्स असेल तर शेवट देवू नका हे सांगणे नलगे!

या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला माहीत नसलेल्या भाषांमधील जागतिक चित्रपटांची ओळख व्हावी ही अपेक्षा आहे.
(त्यामुळे अति गाजलेले हिंदी, मराठी, इंग्रजी सिनेमे यात आले नाहीत तरी चालतील असे वाटते.)

आपला
गुंडोपंत

Comments

सेक्स अँड लुसीया

सेक्स अँड लुसीया हा २००१ सालातला स्पॅनीश सिनेमा.
अर्थात नावात असल्यापर्माणेच भन्नाट सेक्स यात आहेच.
पण कथाप खूपच गुंतागूंतीची आहे.

कथानक पुढच्या पोस्ट मध्ये देतो.
लिहायला वेळ लागेल.

बाकी नायिकेच्या भूमीकेतील पाझ वेगा बद्दल मी काय लिहिणार?
"बघा" इतकेच म्हणू शकेन. ;-))

मला तीची पॅशनेट भूमीका आवडली.
लोकेशन्स तर सुरेखच आहेत. बेट व त्यावरचा निसर्ग मनोहारी...

सेक्स अँड लुसीया

दिग्दर्शक /लेखक: ज्युलियो मेदेम
इ.स.: २००१
भाषा: स्पॅनीश
प्रभू: पाझ वेगा, त्रिस्ताम उलोआ, नज्वा नीम्री

-निनाद

सेक्स अँड लुसीया - कथा

सेक्स अँड लुसीया
वाट्ला तितका काही सिनेमा नुसताच प्रणयात्म नव्हता.
इन् फॅक्ट भलताच कोंप्लेक्स होता असं वाटलं. सिनेमा संपल्यावरपण बराच वेळ (वरून खाली येणारे टायट्ल्स बघत) विचार करत बसून राहीलो.

कथा साधारणपणे अशी.
लुसिया ही माद्रीद मधली एक् वेट्रेस. आपल्या लेख लॉरेंझोच्या प्रेमाचा शेवट झालेला सहन न होवून एक छोट्याशा बेटावर काही काळ जाउन राहण्याचा निर्णय घेते. हा अगदी अनोळखी अशा वातावरणाता सगळे विसरून जाण्याचा काहीसा प्रयत्न असतो.

तीचा प्रेमीक लॉरेंझो व लुसीया यांची कथा या बेटावरून उलगडत जाते. ज्यांना लुसीया कुठलाच संबंध नसलेले समजत असते ते तीच्या किती जवळ व गुंतलेले असतात याचा अनुभव ती घेते (आणि आपणही घेतो!)

लॉरेंझो सहा वर्षांपुर्वी याच बेटावर पोहोत असतांना एका मुलीच्या ऍक्रॉस येतो. तो त्याचा वाढदिवस असतो. त्यांचा पॅशनेटली झालेला प्रणय ही त्याला अचानक पणे मिळालेली भेट असते. एकमेकांचे नावही न घेता हे दोघे प्रणयी वीर दूर जातात.
मात्र त्यातून तीला एक मुलगी होते. याची लॉरेंझो काहीच कल्पना नसते.
लुसीया एक दिवस त्याला पाहते व त्याचे लिखाण आपल्यावर खूप प्रभाव पाडून गेले आहे अशी कबुलीच देते.
शिवाय मला तुझ्या बरोबरच रहायचे आहे असेही सांगते. लॉरेंझो व ती त्याच्या घरी येतात... (मग अगदी पॉर्न फिल्म होईल असा प्रणय पुढे आहे.)
लॉरेंझो आपली कथा/कादंबरी लिहिण्याच्या प्रयत्नात असतो. त्यात तो खूपच गुरफटून जातो.

पाळणाघरा जवळ त्याला एक केयरटेकर मुलगी तीच्या बॉसच्या मुलीला, लूनाला खेळवायला घेऊन आलेली भेटते. तीच त्याची लूना मुलगी असते. (पण अर्थातच तो तीला ओळखत नाही त्याचे नाव लॉरेंझो म्हणजे सूर्य). छोट्याशा मुलीला तीचे वडील हवे असणं किती महत्वाचं असते तेही एक प्रसंगात दिसून जातं.
ती त्याला त्या रात्री घरी येण्याचे आवाहन करते व तो जातो. तीला तो 'आवडलेला' असतो. मात्र लॉरेंझो त्या मुलीकडेच लक्ष देतो. त्या मुलीला झोपवण्याचे काम तो करतो. तीला एक सुंदरशी बेटावरची गोष्ट सांगतो.

मात्र त्या केअरटेकरच्या प्रणयाच्या नादात तो आपल्याच मुलीच्या मृत्युला कारणीभूत ठरतो.
त्याच रात्री त्याचाही अपघात होतो. त्याचा मृत्यु झाला असे समजून लुसीया बेटावर निघून जाते.

सगळी पात्रे त्यांचे नशीब आणि योगायोग याची जुळणे होत कसे एकमेकांना भेटत, ओळखत जातात व पुढे शेवट काय होतो हे पडद्यावरच पाहा.

लेखक दिग्दर्शक जुलियो मेदेम ची ही एक खास कथा आहे यात संशय नाही.
या कथानकात शेवटातून मध्यात यायला एक खास जागा आहे जी आपल्याल गुंगवून टाकते.

बाकी चित्रिकरण/लोकेशन तर अप्रतीम आहे. जुलियो मेदेम च्या प्रेमिकेनेच याचे कला दिग्दर्शन केले आहे.
पाझ वेगा पुढे पेनेलोप क्रूझ तर काहीच नाही! तीचा अभिनयही सुरेख आहे.

-निनाद

व्हिस्परींग सँड्स

व्हिस्परींग सँड्स
हा इंडोनेशीयन सिनेमा आजच समजला...
कुणी पाहिलाय का हा?

-निनाद

स्टोरी अनडन

स्टोरी अनडन नावाचा इराणी सिनेमा कुणी पाहिलाय का?
हा पण इंटरेस्टींग आहे असे कळले आहे...

-निनाद

स्वीमींग पूल

स्वीमींग पूल
हा फ्रेंच सिनेमा.
एक ब्रिटिश गुन्हेगार कथा लेखिका जरा विरंगुळा व्हावा म्हणून प्रकाशकाला भेटायला येते.
तो सुचवतो की तू माझ्या फ्रांस मध्ये असलेल्या घरी सूटी घ्यायला म्हणून रहायला जा.

ती तयार होते.
तेथे गेल्यावर एक दिवस मस्त जातो. मात्र नंतर त्याची तरूण मुलगीही तेथे अवतरते. ही बिंधास्त मुलगी व तीचे सदैव घराच्या तलावात पोहणे व तीची प्रणयी व लाउड जगण्याच्या तर्‍हेने ही लेखिका अस्वस्थ होउन जाते.
आधी त्रास दायका वाटली तरी नंतर तीला या मुलीची जगण्याची तर्‍हा आकर्षक वाटायला लागते. खरं तर लिखाणाला प्लॉट सापडत जातो.
ती पण ही कथा लिहित जाते.

मात्र एका धुंद रात्री एक अपघात घडतो.
आणि मग ही रहस्यमय गुन्हेगारी कथा लिहिणारी लेखिका स्वतःच एका गुन्ह्यात आधी साक्षिदार व नंतर सहभागी ही होते. ते सगळे दाबण्यासाठी काहे उपायही करते. त्यामुलीचे व त्या योगाने प्रकाशकाचे आयुष्य हे सगळेच समोर येते.
पुढे काय होते ते पडद्यावरच पहा...

एकुण सिनेमा बरा आहे. खुप काही खास नाही.
फ्रेंच लोक ब्रिटिशांना कसे खालच्या दर्जाचे समजतात हे ती मुलगी बिंधास्तपणे वेगवेगळ्या प्रकारे लेखिकेला ऐकवते व तीची 'स्वत: कधीच जगलेली फक्त इमॅजिनरी गुन्हेगार लेखिका' म्हणून संभावना करते ते संवाद सही आहेत.

-निनाद

लिल्या फोर एव्हर -

लिल्या फोर एव्हर -

हे परिक्षण समिक्षण वगैरे काहीच नाही ज्या काही सिनेमांचे परिक्षण समिक्षण करण्याच्या जवळपासही मी नाही त्यातला हा एक.

कथा
सिनेमा सुरु होतो तेंव्हा मार खाल्लेली ओठातून रक्त येत असलेली लिल्ल्या पळत जातांना दिसते. आणि मग सिनेमा मागे मागे जातो.
लिल्या (ओक्साना अकिन्शिना) एक सोळा वर्षाची मुलगी आहे. ती एस्टोनिया (रशिया) मध्ये राहते. तीची आईअ तीला एका डेटींग एजंसी द्वारे हाती लागलेल्या नवीन बॉयफ्रेंड बरोबर अमेरिकेला चालली आहे. तीच्या आई सोबत अमेरिकेला लिल्ल्यालाही अमेरिकेला जायचे आहे.
लिल्या फोर एव्हर2
आई सांगते की मी आधी पुढे जाते मग मागून मी तुला बोलावून घेईन. लिल्ल्याला वाईट वाटते पण तरीही आई निघून जाते. लिल्ल्या वाट बघत राहते. काही दिवसात हे स्प्ष्ट होते की अमेरिकेहून काहीच येणार नाहीये आणि लिल्ल्या आता एकटीच येथे राहिली आहे. तीला वालोद्या नावाचा एक अकरा वर्षांचा मुलगा भेटतो. याला त्याच्या विचित्र वडीलांनी घरातून हाकलून दिलेले असते. आपले वडील असे का आहेत हे त्याला कळत नाही.
रस्त्यावर आलेला वालोद्या व लिल्ल्या एकत्र होतात. जणू काही एक छोटेसे कुटूंबच. एकमेकांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतात.
लिल्या फोर एव्हर2

एक दिवस मजा म्हणून ती व तीची मैत्रीण नताशा एका क्लब मध्ये जातात. तीथे नताशा एका माणसा सोबत झोपण्याचा निर्णय घेते. त्यातून तीला बरेच पैसे मिळतात. लिल्ल्या मात्र या सगळ्यातून अलिप्त राहणेच पसंत करते. घरी येवून झोपलेली असतांना रात्री अचानक नताशाचे आईवडील तेथे येतात व तीला पैसे हातात देउन सांगतात की आम्हाला 'असे पैसे' नकोत. लिल्ल्या काहीच कळत नाही.
दुसर्‍या दिवशी नताशाला विचारल्यावर नताशा सांगते की तीने स्वता:चे नाव वाचवण्यासाठी वडीलांना खोटे सांगितले की लिल्ल्याने असे करून हे पैसे मिळवले आहेत. चिडलेली ल्लिल्ल्या अस्वस्थ होते व ते पैसे कचर्‍यात फेकून देते. हे सगळ्या गल्लीत पसरते व लिल्ल्याला सगळे चिडवायला लागतात.

काही दिवसातच तीच्या पैसे न भरल्याने अपार्टमेंट ची वीज कापली जाते. खायलाही काही उरत नाही. मेणबत्ती वर काही उबही येत नाही. नाईलाजाने अस्वस्थ लिल्या काही दिवसातच पैसे नसल्याने एका क्लब मध्ये वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करते.

एक दिवस तीला एक माणूस भेटतो. तो तीला स्वीडन मध्ये नोकरीचे अमीष दाखवतो. या जगातून बाहेर पडून आता तरी जगायला मिळेल या आशेवर ती जायला तयार होते. खोट्या पासपोर्ट च्या आधारवर हे सगळे घडते. इकडे वालोद्या खूप अस्वस्थ होतो. मात्र लिल्ल्याही तीच्या आई प्रमाणेच वालोद्याला सोडून स्वीडन ला जाण्याचा निर्णय घेते.
स्वीडन मध्ये नोकरी हे स्वप्नच ठरते तीथे तीला जबरी वेश्या व्यवसायाला लावले जाते. एका मागून एक बलात्कार होत राहतात. लिल्ल्याला वेड लागायचेच बाकी राहते.
इकडे रशिया मध्ये वालोद्याला त्याचा एकमेव मासिक आधारही गेल्याचे सहन होत नाही व तो आत्महत्या करतो.

लिल्ल्या एकदा पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण तीला पकडून बदडून परत आणले जाते. या सगळ्यात वालोद्या तीला देवदूताच्या रूपाने स्वप्नात भेटत असतो.
तो तीला परत पळून जाण्याचा सल्ला देतो. व ती तसे करते, पळत सुटते. पण अनोळखी प्रदेशात भाषा येत नसतांना प्रचंड मार खाउन डोळे सुजलेले असतांना तीला पाण कुठे जातो आहोत याचे ही भान रहात नाही. इथेच सिनेमा सुरु झाला होता.
लिल्या फोर एव्हर3
सिनेमाच्या शेवटी वालोद्या व लिल्ल्या दोघेही देवदूत झाले आहेत. सगळ्या क्रूर जगापासून दूर वालोद्या व लिल्ल्याच्या आवडत्या गच्चीवर आनंदाने खेळतांना दिसतात.

---
सिनेमा संपल्यावर प्रचंड अस्वस्थता या बरोबरच अनेक प्रश्न मनात येत राहतात. आशाने, स्वप्नाने भरलेल्या डोळ्यांचा, लिल्ल्याचा चेहरा आईचे सोडून जातांना लिल्ल्याचा आकांत... डोळ्यापूढून हलतच नाही.

लिल्ल्याच्या आईचेही असेच झाले असेल का हा प्रश्न आपोआपच मनात येतो. ती खरंच अमेरिकेला गेली असेल का? लिल्ल्या हा आजच्या देशांतरावर व शरणागतांच्या प्रश्नावर असलेला कंटेंपररी सिनेमा आहे असे जाणवते. कोणताच आधार नसलेल्या लोकांसाठी कोणत्याही देशात गेले तरी आयुष्य तसेच पिळवणूकीचेच असते. रशियाच्या आजच्या समाजाचे दर्शन हादरवणारे आहे. लुकास मूडीसन हा दिग्दर्शक एक क्रूर पण खरा अनुभव देउन जातो. सिनेमा नसून ही एक डोक्युमेंटरीच आहे असेही म्हणायला हरकत नाही. इतके का हे भांडवलवादी पुरूषी जग निर्दय बनत चालले आहे? पैश्या साठी होणारा मानवी व्यापार व त्यात दिसलेल्या मानवी क्रौर्‍याने अस्वस्थ होत जातो आपण. एका छोट्याश्या मुलीला जगण्यासाठी कोणतेच बळ हे जग देउ शकत नाही का? कुठलाच आधार मिळू नये का? असी आजही घडतेच आहे... हे कधी थांबणार आहे सगळे...? नक्की कुठे चाललो आहोत आपण?

-निनाद

खरंच, नक्की कुठे चाललो आहोत आपण?

>> नक्की कुठे चाललो आहोत आपण?
हा प्रश्न आजकाल प्रत्येक सेंसिबल चित्रपट पाहुन,बातमी वाचून, आजुबाजुच्या परिस्थितीकडे पाहून करावा लागतो नाहि :( (हाच् प्रश्न उपक्रमावरील काहि भडक धर्माधिष्टित चर्चा वाचूनही पडू लागला आहे)

-ऋषिकेश

अस्वस्थता

(हाच् प्रश्न उपक्रमावरील काहि भडक धर्माधिष्टित चर्चा वाचूनही पडू लागला आहे)

पाहिले असेल तर यात मी नसतो.

नक्की कुठे चाललो आहोत आपण?

मला तरी हा सिनेमा पाहून आलेली अस्वस्थता जाणे अवघड आहे.

मागे मुक्तसुनीत म्हणाले होते की 'त्या पाहिलेल्या सिनेमाच्या फील घेऊन काही दिवस राहण्याचे काय?'
तेंव्हा मी म्हणालो होतो की, ते त्या कथेवर दिग्दर्शकावर त्या प्रेझेंटेशन अवलंबून आहे.
आता ते मीच म्हंटलेलं अनुभवतो आहे.
याची फील घालवण्यासाठे एखादा हलका फुलका सिनेमाही काही उपयोगाचा नाही,
इतका खोलवर परिणाम करून गेला आहे हा लिल्ल्या फोर एव्हर्.

-निनाद

स्टार वॉर्स : लुकास इन लव्ह

जॉर्ज लूकास यांना स्टार वॉर्स ही कल्पना कशी सुचली यावर एक चित्रफित. :)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

स्टोरी अनडन मिळालाय

इराणी स्टोरी अनडन
मिळालाय, कळवतोच.

-निनाद

व्हिस्परींग सँडस्

व्हिस्परींग सँडस् किंवा बहासा इंडोनेशिया मध्ये पासीर बेर्बीसीक.
हा इंडोनेशियन चित्रपट इंडोनेशियाचे वेगळेच दर्शन घडवतो.

कथा अशी आहे. दया (दायन सास्त्रोवदोयो)
ही एक छोटी मुलगी तीच्या आईसोबत सागर किनार्‍या वरच्या एका छोट्याशा खेड्यात रहात असते. तीचे वडील लहानपणीच तीला सोडून गेले असतात. ते कसे असतील या विचारात ती तासंतास घालवते.
एकदा अचानक होणार्‍या दंगलीने त्यांना खेडे सोडून अजून दूरवरच्या वस्तीत जाऊन रहावे लागते. या किशोरवयीन मुलीवर आईचे करडे लक्ष असते. त्या करडेपणाला दयापण काहीशी नाखुष असते.
नव्या वस्तीत तीला एक मैत्रीण मिळते. दिघींचा काही काळ मजेत जातो पण एका घटनेत तीला तीची मैत्रीण गमवावी लागते. मात्र त्याचवेळी तिचे वडील अचानक पणे परत येतात... त्यांच्या बरोबर आलेला मित्र तीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतो. दयाची होणारी मानसिक अवस्था अतिशय परिणामकारक रित्या दाखवली आहे. आईच्या हे सर्व लक्षात येते पुढचा अंदाज घेउन व ती दयाला या सगळ्यापासून दूर निघून जायला सांगते.

व्हिस्परींग सँडस्

कथा संथ आणि तशी साधी व सुरुवातीला पकड घेत नाही असे वाटले तरी नंतर सिनेमा उत्सुकता धरून ठेवतो.
काही प्रमाणात इंडोनेशियाचे खरे सामाजिक ग्रामीण जीवनवही बघायला मिळते.
चित्रिकरणासाठी निवडलेले लोकेशन्स आऊट ऑफ वल्ड आहेत... संगितही अप्रतीम आहे. एक वेगळेच जग. वेगळाच अनुभव.

दिग्दर्शकः नान त्रिवेणी अचनास
लेखकः नान त्रिवेणी अचनास/रय्या मकारीम
इ.स. २००१
भाषा : बहासा इंडोनेशिया
प्र.भू. :दायन सास्त्रोवदोयो
ऍवॉर्डसः एशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हल चे सिनेमॅटोग्राफी, साउंड. शिवाय, ब्रिस्बेन, सियाटल, ओस्लो, व सिंगापूर यथील निरनिराळ्या प्रकारची पारितोषिके.
-निनाद

अ रोड टू लदाख

अ रोड टू लदाख
अ रोड टू लदाख हा सिनेमा चूकूनही बघू नका.
अश्विन कुमार चा हा सिनेमा इतका टुकार आहे की विचारूच नका.
कलाकारंची कामेही अगदीच फालतु आहेत. शेवटी
इर्फान खानला गोळी लागल्यावर त्याच्या चेहर्‍यावर कोणतेही भाव येत नाहीत.
अरे साधी माशी बसली तरी पाहतो ना आपण... इथे तर आखी गोळीच बसली छातीत बंदुकीची.
छ्या! एकदम भंगार सिनेमा...
बाकी हिमालय दाखवलाय, पण त्यात काय विशेष रे?
तो तर काय साधा जुना सुपर ८ कॅमेरा फिरवला तरी भव्यच दिसतो.
कथा? काहीच सांगण्यासारखी नाही...

जागतिक वगैरे सिनेमाच्या रांगेत खरं मी हे लिहायलाही नको आहे. जाऊ देत्... कधी तरी असं स्लिप् ऑफ टंग सॉरी, स्लिप् ऑफ आय होऊन पाहिले जातात असले सिनेमे...
आणि हिमालयच बघायचा तर आम्ही 'हिमालय' हा तिबेटी सिनेमाच पाहु ना...

पाहिल्यावर पडलेला प्रश्न का बनवलाय हा सिनेमा???
दिग्दर्शकः अश्विन कुमार
प्रभु: कोयल पुरी , इर्फान खान
भाषा: हिंदी, इंग्रजी

-निनाद

लुमुंबा

यावरून आठवले ,
२००० साली आलेला लुमुंबा
नावाच आफ्रिकन सिनेमा पाहिलाय का कुणी?

पॅट्रीस लुमुंबा या कांगोच्या नेत्यावर आहे हा सिनेमा...

-निनाद

हे काय चालले आहे?

हे काय चालले आहे?
ज्यांना चित्रपटांत रस नसेल त्यांनी येथे प्रतिक्रीया द्यावीच असा कुणाचाही आग्रह नाही.
ज्यांना रस आहे ते वाचत आहेत. परिक्षणावरही प्रतिक्रीया असलीच पाहिजे असे काही नसते. यामुळे आमच्या सारख्यां वर्षातून एकच चित्रपट पाहणार्‍यांना चित्रपटांची माहिती मिळते ही गोष्ट महत्वाची आहे.

कृपया ही मालिका सुरळीत पणे चालू द्यावी ही विनंती.
आपला
गुंडोपंत

??

कुठल्या प्रतिक्रिये विषयी बोलताय पंत?

काल

कोलबेरा,
काल परवा कडे जरा येथे गडबड झाली होती,
आता ती संपादित केली गेली आहे.
जाउ दे, चालायचेच!
काय नविन चित्र्पट पाहिले की नाही काही?
आपला
गुंडोपंत

मॅड मॅक्स

काल मेल गिब्सन चा मॅड मॅक्स पाहिला.
याची बहुतेक चित्रिकरण ऑस्ट्रेलिया मध्ये झाले आहे.
हा सिनेमा बहुतेक सगळ्यांनाच माहीत असेल असे वाटते. म्हणून जास्त काही लिहित नाही...

-निनाद

अनुदिनी

चित्रपट परीक्षणांचे संकलन करणारी एक अनुदिनी सापडली. चित्रपटप्रेमींसाठी ही पर्वणी ठरावी.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

चांगला दुवा

चांगला दुवा आहे.
मात्र आशा आहे की हे लेखक असे संकलन करण्यासाठे परवानगी देत आहेत.

-निनाद

परवानगी आहे.

होय. लेखकांची परवानगी घेऊनच हा उपक्रम चालवला जातो आहे.

- मेघना भुस्कुटे

विमानात पाहिलेले चित्रपट

या वीकांताच्या मुंबईचा प्रवासात "वेडिंग क्रॅशर्स" नावाचा तद्दन पाणचट पण प्रचंड विनोदी (खररतर आचरट ;) ) चित्रपट विमानात् माहिला.. खूप टाईमपास चित्रपट आहे :) मजा आली हे पहा ट्रेलर

नंतर एन्चांटेड नावाचा नवीन फेरी टेल प्रकारात मोडणारा चित्रपट पाहिला ठिक ठिक वाटला. लोकेशन्स/ऍनिमेटेश ट्रीक्स नेहेमीच्याच आणि लाईट फार भडक वाटले :(

शिवाय मॅट्रीक्सचा तिसरा पार्टही बघितला. पण त्याबद्दल काहि नवे लिहिण्यासारखे नाही.

या शिवाय गेल्या आठवड्यात "एमा"ही बघितला त्यावर वेगळ्या प्रतिसादात सविस्तर लिहितो :)

भाग

शिवाय मॅट्रीक्सचा तिसरा पार्टही बघितला. पण त्याबद्दल काहि नवे लिहिण्यासारखे नाही.

मॅट्रीक्स चा पहिला भाग पाहिल्या नंतर त्याविषयी किती बोलू आणि किती नाही असे होते.
तेच कथेचा गाभा वापरून वापरून झिजला की अशी प्रतिक्रिया येते.
किती दुर्दैवी आहे... एक सशक्त थीम पण अगदी झिजऊन टाकली त्यांनी...
असे अनेकादाच होते म्हणा..

-निनाद

बिग फीश

जरा आर्टी -फार्टी वाटेल. टिम बर्टनचा सिनेमा आहे त्यामुळे हटके आहे. फँटसी आहे पण प्रत्येक प्रसंगाला एक वास्तव आहे.

मला आवडला.

कथा म्हणले तर एका साधारण फिरता विक्रेत्याने (Travelling Salesman) आपले आयुष्य कसे रंजक कथानक बनवले असते. त्याच्या मुलाला आपल्या बापाच्या त्याच त्या भुलथापा वाटत असतात. शेवटि वडील मृत्युशय्येवर असताना त्या कथातुन त्याला हळुहळू वडलांचे आयुष्य व त्याचा अर्थ कळतो.

ज्यांना पुर्ण कथा वाचुन सिनेमा बघायला आवडतो त्यांनी हे वाचा. व ज्यांना कथा आधी कळलेली आवडत नाही त्यांनी नका वाचु. ज्यांना सिनेमा बघायचा नाही त्यांनी ह्या दुव्यावरची कथा वाचा. आवडू शकेल.

Big Fish ट्रेलर

 
^ वर