जमिनीवरून उपग्रहाचा वेध

  • या आठवड्यात अमेरिकेच्या युद्धनौकेवरून सोडलेल्या क्षेपणास्त्राने अमेरिकेच्याच एका नियंत्रणाबाहेर गेलेल्या उपग्रहाचा वेध घेतला.
  • यूएसए १९३ (USA 193) हा उपग्रह हेरगिरीच्या उद्देशाने (Spy satellite ) १४ डिसेंबर २००६ रोजी सोडला होता. याचे नेमके काम काय होते हे मात्र 'क्लासिफाइड' होते.
  • जरी याचे प्रक्षेपण व्यवस्थित झाले तरी प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात त्यात बिघाड निर्माण झाला.
  • जानेवारी २००८ मध्ये हा उपग्रह लवकरच पृथ्वीवर कोसळेल असे जाहीर झाले. उपग्रह पृथ्वीवर कोसळला तर त्यात असणार्‍या हायड्रॅझिन (hydrazine) या विषारी पदार्थामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती.
  • १२ फेब्रुवारीला राष्ट्राध्यक्ष बुश यांनी क्षेपणास्त्राच्या साहाय्याने उपग्रहाच्या इंधनटाकीचा वेध घेऊन विषारी पदार्थ नष्ट करण्याचा योजनेला मंजूरी दिली.
  • १४ फेब्रुवारीला अमेरिकन नौदलाने 'पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याआधी उपग्रहाला नष्ट करण्याची' योजना जाहीर केली.
  • २१ फेब्रुवारी रोजी नौदलाच्या बोटीवरून सोडलेल्या SM-3 क्षेपणास्त्राने 'पृथ्वीच्या वातावरणात शिरण्यापूर्वीच' उपग्रहाचा वेध घेतला.
  • उपग्रहाचे अवशेष येत्या काही दिवसांत समुद्रात शेकडो किलोमिटर पर्यंत पडण्याची शक्यता.
  • उपग्रह पाडण्याचा एकूण खर्च ४० ते ६० दशलक्ष डॉलर
SM-3 क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण

वाद-आरोप
विषारी पदार्थामुळे रू शकणारी जीवितहानी रोखणे हाच उद्देश होता असे जरी अमेरिकेने जाहीर केले असले तरी या हल्ल्याची कारणमीमांसा करणारे वेगवेगळे प्रवाद चर्चेत आहेत.

  • महत्त्वाची/गुप्त माहिती इतर कोणाच्या हाती लागू नये
  • उपग्रह-विरोधी क्षेपणास्त्राची (Anti-satellite (or ASAT) weapon) चाचणी

कसे घडले?

उपग्रहाचा वेध

१ - पॅसिफिक महासागरातून SM-3 क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण
२ - 'three-stage missile' चा अंदाजे २२,००० मैल/तास वेगाने प्रवास
३ - यूएसए १९३ (USA 193) उपग्रह पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ २४७ किमी उंचीवर
४ - उपग्रहाच्या इंधन टाकीवर SM-3 चा आघात, हायड्रॅझिन (hydrazine) अवकाशात सोडले जाण्याची अपेक्षा
५ - बरेचसे अवशेष जळून जाण्याची आणि उरलेले शेकडो किमी समुद्रावर पडण्याची शक्यता

अधिक माहिती - विकिपिडिया, बीबीसी

Comments

शीर्षक आणि चित्रे

शीर्षक देताना थोडी गडबड झाली आहे. प्रत्यक्षात क्षेपणास्त्र बोटीवरून सोडण्यात आल्याने लॉजिकली जमिनीवरून उपग्रहाचा वेध घेतला गेला नाही ;)

चित्रांचे सौजन्य विकिपिडिया आणि बीबीसीन्यूज.

चांगली माहिती

चांगली माहिती.. लेख अजून विस्तृत असता तर अधिक आवडला असता.. म्हणजे असे उपग्रह पाडण्याच्या पद्धती, त्यांचे फायदे तोटे (शास्त्रीय /अराजकीय ;) ), वापरण्यात येणार्‍या क्षेपणास्त्रांचे वैषिश्ट्य वगैरे वगैरे या लेखासालं असतं तर परिपूर्ण वाटला असता..
असो. लेख आवडला हेवेसांनल

-ऋषिकेश

सहमत

चांगली माहिती.. लेख अजून विस्तृत असता तर अधिक आवडला असता.. म्हणजे असे उपग्रह पाडण्याच्या पद्धती, त्यांचे फायदे तोटे (शास्त्रीय /अराजकीय ;) ), वापरण्यात येणार्‍या क्षेपणास्त्रांचे वैषिश्ट्य वगैरे वगैरे या लेखासालं असतं तर परिपूर्ण वाटला असता..

चित्र टाकल्याने लेख समजण्यास नक्कीच मदत झाली. आणखी वाचन करून मराठीत टंकला असता तर आवडलेच असते.

असो, असे वेगळ्या विषयांवरील लेख येऊ द्यात.

धन्यवाद

दोघांनाही धन्यवाद! पुढे तुमची सूचना नक्की आचरणात आणीन.

अग्रलेख

यावरच आज मटा मधे अग्रलेख आला आहे.

वा!

वैज्ञानिक विषयावरचा लेख वाचून जरा बरे वाटले.
आज्जून् येक चांगला मोट्टा लेक् लिवा कि हो!

आपला
गुंडोपंत

नक्की

नक्की लिहू. लिहिण्याच्या आणि माहिती शोधण्याच्या नादात मजा येते पर्यायाने 'नैराश्य' कमी होते ;)

 
^ वर