आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही! - २

आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही! - २

आजही गुडोपंतांना त्या तत्वाने ग्रासले होते. अधुन मधून असेच होते. काही करण्याची इच्छा रहात नाही. जगापासून वेगळेच झालो आहोत अशी भावना येते. आणि ही भावना काही तात्पुरती नसते बरं. ही अशी कायम स्वरूपी डोक्यात बसून राहते कुठे तरी मागे. काम ही धड होत नाही. आणि खूप कामं पण आहेत.

खालच्या रबर मॅटस् बदलायच्या आहेत. नवीन वजनं आणायला झाली आहेत. एकदा व्यायामशाळेला रंग देवून घ्यायचा आहे. शिवाय मुलांना फीची आठवण करून द्यायची आहे. दोन वेळा वजनं आणायला म्हणून मुंबई ला जाण्यासाठी पंचवटीचं रिझर्वेशन केलं पण दोन्ही वेळा गेलेच नाहीत.
पुर्वी सारखं हल्ली लिखाणही होत नाही.

ही भावना म्हणजे एखाद्या अचानक पणे घडलेल्या गोष्टीचा परिणाम नाहीये. काहीच करण्याची इच्छा नाही. म्हणजे अगदीच डाउन वाटणे. आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!

अरे ही काय भानगड आहे?
हा भाग २ आहे!
५० प्रतिसादां नंतर प्रतिसाद शोधणे अवघड जात असल्याने भाग २ सुरु करत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

पुष्पौषधी

लिखाळाने उल्लेखलेली पुष्पौषधी हा एक उपाय नक्कीच आहे.
मी वापरल्या आहेत या औषधी. पण परिणाम विवादास्पद आहेत.
का ते माहीत नाही पण मला दीर्घकालीन परिणाम त्यातून मिळाला नाही.
मात्र परिणाम नक्कीच मिळाले आहेत. बाखची औषधे चमत्कारीक आहेत खरी.

आता प्लॅसिबो इफेक्ट म्हणणार्‍यांना मी म्हणेन की हा बाख फ्लॉवर थेरपीचा अनुभव घेवून पाहा. जाणार काही नाही लागले तर काही हाती लागेल!
ही औषधे फार महागही नसतात. तुमची तुम्हीही घेवू शकता. पण थोडे वाचन करून मगच घ्या असा सल्ला मात्र मी नक्कीच देईन.

आपला
अर्क
गुंडोपंत

प्लासिबो

प्लासिबो हा चिकित्सकांचा चघळायचा विषय आहे. त्याविषयी एक माहिती पुर्ण लेख इथे बघता येईल
प्रकाश घाटपांडे

पहिला भाग

लेखाचा पहिला भाग इथे आहे.--वाचक्‍नवी

मंत्र

मंत्र मस्त आहेत. आवडले!
हे मंत्र प्रत्यक्ष आचरणात आणता आले की मग झेन!

हे कागदावर सोपंच असतंय हो.
प्रत्यक्षात आणायचं म्हणजे झेपत नाही ना...

कुणी मला असा एक आठवण करून देणारा गुलाम कायमचा दिला तर काय बहार येईल.
असे झाले तर माझे कोणतेच प्रतिसाद मग विखारी/वादग्रस्त नसतील का?
पण मग सहजतेने येणारे हे इंपल्सीव्ह लिखाणही संपुन जाईल हे पण तितकेच खरे.

आपला
झेनपंत

एक उपाय

उपक्रमावरील लेख आणि चर्चा पाहून आपल्याला बरीच पुस्तके वाचायची आहेत, बरेच सिनेमे पाहायचे आहेत, बरीच माहिती मिळवायची आहे हे समजते. त्यामुळे रिकाम्या मनाला एक काम मिळते. आपल्या आवडत्या विषयावर थोडा रिसर्च करून लेख लिहिणे किंवा चर्चेत सहभागी होणे यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होईल असे वाटते.

(चर्चेखोर आणि नव्या विषयांच्या शोधात) नवीन

निराशा का मरगळ?

चांगल्या चाललेल्या या चर्चेतील काही प्रतिसाद पाहून तिथे निराशा आहे का मरगळ असा प्रश्न पडला.

मला वाटतं की मनाची मरगळ ही निराशेच्या आधीची पायरी असावी. मरगळ झटकत राहण्याचा सतत प्रयत्न करत राहणे, आयुष्यात वैविध्य शोधणे (
खरंतर आयुष्याला इतके आयाम आहेत की वैविध्य शोधावे लागत नाही. समोरच असते, आपण त्याकडे न पाहण्याचा आळशीपणा करत असतो.)
, नव्या गोष्टींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे निराशेच्या जवळ जाण्यात रोखण्यास मदत करेल.

विस्तार नंतर

नैराश्य अथवा मरगळ.

खरेच मुद्दा चांगला आहे. मनाला मरगळ आली आहे की नैराश्याने गाठले आहे हे एकदा समजावुन घेतले पाहिजे.

एक अनुभव.

बहुधा ४/५ वर्षापूर्वीची गोष्ट असावी. नागपूरला असताना मला दुचाकी चालवत असताना मध्येच अंधारी आल्यासारखे वाटायचे आणि हा अनुभव उड्डाण पुलावर जास्तच यायचा. का बरे असे होत आहे हे मात्र समजत नसे. जुजबी डॉक्टरांना ( कंपनीत) दाखविले आणि मित्रामध्ये चर्चा करु लागलो. माझ्या काही मित्रांना व्हरटायगो ( चक्कर येणे) असावा असे वाटले म्हणून एका कान-घसा-नाक तज्ज्ञाला दाखविले. त्यानेही असे असावे म्हणून सहमती दाखविली आणि उपाययोजना सूरु केली. पण काही दिवसांनी तोच त्रास सुरू झाला आणि माझे धाबे दणाणले. मग अजून १ /२ विषेशतज्ज्ञांना दाखविले पण उपचार चालू आणि उपाय शून्य.

हळुहळू दुचाकी चालविणे सोडून दिले आणि मी स्वत:ला धास्तावून घेऊ लागलो. असे काही दिवस गेल्यानंतर माझ्या एका ज्येष्ठ मित्राला भेटलो आणि सर्व कहाणी सांगितली.

त्यांनी एका त्यांच्या अनुभवाच्या तज्ज्ञाची शिफारस केली आणि मी त्यांना भेटलो.

सर्व तपासणी कागदपत्रे बघितल्यानंतर त्यांनी विचारले की काही मनाला जाळणारी चिंता आहे काय? मी नकारार्थी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की व्हरटायगो किंवा तत्सम असे काहीही नाही आणि माझ्या औषधाने / उपाययोजनेने तुम्ही खडखडीत बरे व्हाल.

ते म्हणाले की तुम्हाला मामुली नैराश्याने (मायनर डिप्रेशन) गाठले आहे आणि ही औषधयोजना करायला हवी. या औषधाने तुम्हाला काही काळापुरते भरपूर झोप येईल, तोंडाला कोरड पडेल आणि मामुली बद्धकोष्टाचा त्रास होईल.

त्यांची औषधयोजनेने मला बरे वाटू लागले आणि रोगापेक्षा इतर साईड ईफेक्टसनी मी हैराण झालो.

पण गाडी परत चालवता येत असल्यामुळे आणि वरील साईड इफेक्टस् त्यामानाने सुसह्य असल्याकारणाने बहुतेक ही स्थिती तात्पुरती असेल असे वाटल्याने मी काहीसा निर्धास्त झालो हेही खरे... ( अपुर्ण)

अनुभव-२ पूढे...

गाडी चालवतांना अंधारी येणे डॉक्टरांच्या औषधाने थांबले आणि मला तरी पुर्नजन्म झाल्यासारखा वाटला.

डॉं नी सांगितल्या प्रमाणे एका महिन्याचे औषध घेतले आणि परत दाखविले. त्यांनी मग ३ महिन्याचे औषध दिले तेही घेतले. परत दाखविले आणि त्यांनी परत तेच औषध सहा महिन्यासाठी दिले आणि मी धास्तावलो.

"डॉक्टर, अहो अश्या पद्धतीने मी तर या औषधावर अवलंबुनच राहिल, काही काळासाठी ठिक आहे परन्तु सदासर्वकाळ मला असे आयुष्य नको आहे. आता मला बरे वाटते तेंव्हा तुम्ही हे औषधयोजना बंद करायला हवी"

" मधुमेही, रक्तदाबाच्या अनेक रुग्णांना आयुष्यभरच काही औषधावर अवलंबुन राहावे लागते. किंबहुना त्यात थोडाफार फेरफार, हलगर्जीपणा अनेक उत्पातांना आमत्रंण देत असतो. माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात आणि ते काळांतराने बदलत असतात, बरे होत असतात. आपल्या मेंदुमध्ये अनेक रसायने तयार होत् असतात आणि त्यात काही बदल झाला तर असे दृष्य परिणाम दिसत असतात आणि त्यावर ज्यास्त विचार न करता तुम्ही सातत्याने हीच औषधे घेत रहा. "

"तुमचे सर्व म्हणणे मला पटते पण, डॉ. हे नैराश्यावरचे औषध घेत रहावे मला योग्य वाटत नाही. "

"काही अभ्यासकांच्या मते समाजात ३० % लोकं ही नैराश्याने बाधित आहे आणि यावर बरीच लोकं कळत नकळत औषधे घेत असतात, तेंव्हा काही काळासाठी औषधे घेत रहा".

अश्या प्रकारे आमचा संवाद संपला आणि मी औषधे घेत राहिलो आणि मनानेच ही औषधे बंद सुद्धा केलीत. अश्याप्रकारे औषदे बंद केल्यावर परत अंधारी येण्याचा त्रास सुरु झाला.

परत डॉं. ना भेटलो आणि परत औषधे सुरु आणि माझे मन विलक्षण खट्टु झाले. आता आपल्याला आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार म्हणजे आपले निरोगी आयुष्य संपले आणि हे आजारी आयुष्य सुरु अश्या कल्पना मला हैराण करु लागल्या.

( अपूर्ण)

अंधारी येणे

द्वारकानाथ,

आपला अनुभव वाचून खेद वाटला. डोळ्यासमोर अंधारी येणे हे मानसिक विकाराचे लक्षण असू शकते अशी मलाही कल्पना नव्हती. अनुभव -३ जरूर टंका.

मधुमेही, रक्तदाबाच्या अनेक रुग्णांना आयुष्यभरच काही औषधावर अवलंबुन राहावे लागते. किंबहुना त्यात थोडाफार फेरफार, हलगर्जीपणा अनेक उत्पातांना आमत्रंण देत असतो.

खरे आहे. तुम्हीही औषधे बंद करू नका. अमेरिकेत मधुमेह किंवा मानसिक विकारांसाठी केवळ डॉक्टरच नाहीत तर औषधांच्या कंपन्या (उदा.तीच प्रोझॅक विकणारी कंपनी, इलाय लीली) अनेक कार्यक्रम राबवतात. त्यापैकी एका कार्यक्रमात काही विशिष्ट कालावधीत रुग्णांना घरी फोन करून औषधे बंद न करण्याबद्दल आठवण करून दिली जाते. तसेच, ते जी औषधे घेतात त्यांचे गुण-दोष समजावून सांगितले जातात. यात मार्केटींगचा भाग आहे हे निश्चित परंतु दूरवर विचार केला तर माणसाची हलगर्जीपणाकडे झुकणारी टेंडंसी (मराठी गंडले) असते आणि अनेकदा औषधांकडे दुर्लक्ष होते तेव्हा कोणीतरी वचक ठेवणारे, आठवण करून देणारे हवे असे वाटते.

उतारवयात अमेरिकेत एकएकटी जगणारी माणसे अनेक असतात, कितीही नाही म्हटले तरी कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे ही भावना सुखावणारी असते. त्यांना अशा कार्यक्रमांचा उपयोग झाल्याचे दिसून आले आहे.

तुम्हीही घरातल्यांना असा वचक तुमच्यावर ठेवण्याबद्दल सांगा.

अवांतरः या प्रोझॅकविक्या कंपनीवर अनेक मराठी माणसांची पोटे अवलंबून आहेत.

ए ब्युटीफूल माईंड

आपला अनुभव वाचून अस्वस्थ नक्कीच झालो. या संदर्भात २००१ सालचा ऑस्कर विजेता "ए ब्युटीफूल माईंड" हा चित्रपट पाहीला नसला तर अवश्य पहा. ह्याचा आपल्या अनुभवाशी सरळ संबंध नसला तरी मनाच्या खेळाशी आहे. सुखांत असलेली ही गोष्ट सत्यघटना आहे आणि म्हणूनच अद्भुताहून अद्भूतही आहे. त्याची थोडक्यात कथा अशी आहे: (अवांतर वाटल्यास क्षमस्व)

जॉन नॅश ह्या प्रिन्स्टन विद्यापिठातील खूप हुशार पण अबोल विद्यार्थ्याला केवळ त्याच्या २९ का अशाच काही पानाच्या "ओरीजिनल" विचारांवर पीएचडी मिळते. याच विद्यापिठात त्याचा एक ब्रिटीश रुममेट त्याच्याशी सतत बोलताना दाखवला आहे. त्याचा रिसर्च असतो तो गेम थिअरीवरील गव्हर्निंग डायनॅमिक्स. (आता त्याला नॅश इक्विलिब्रियम असे म्हणतात). नंतर त्याला सरळ एम आय टी या जगद्मान्य विद्यापिठात प्राध्यापकाची नोकरी मिळते. मग त्याचे एका त्याच्याच विद्यार्थिनीशी लग्न होते. तेंव्हा तो ब्रिटीश रुममेट त्याच्या लहान भाचीला घेऊन त्याला परत एकांतात भेटतो. पुढे अमेरिकन मिलीटरी त्याला रशियन कोडस डिकोड करायला बोलवते. त्यातील एक म्होरक्या त्याचा कायमचा कॉन्टॅक्ट होतो. मग याला सर्वत्र म्हणजे अगदी टॅब्लॉईड (पित) वृत्तपत्रातपण रशियन हेर एकमेकांना कोडेड संदेश पाठवताना दिसतात. पुढे त्याला सतत तो म्होरक्या त्याच्या मागावर असल्याचे वाटते.....

...पुढे ही कथा खूप रंगत जाते. पण मुळ असे आहे की ही तीन पात्रे (ब्रिटीश रूममेट, त्याची लहान भाची आणि मिलीटरीतला म्होरक्या - सिक्रेट सर्व्हिस एजंट) ही काल्पनीक आणि त्याच्या मनातले खेळ असतात. दारीद्र्यात रहायची वेळ येते. आधी हे सर्व मान्य नसते पण नंतर त्याला पटते आणि तो औषधे घेऊ लागतो. सुधारतो. एकीकडे त्यानेच बायकोला त्याच्या लहान मुलाबरोबर सोडून जायला सांगीतले असते (काळजीमुळे), पण ते परत सर्व एकत्र येतात...

परत २५ वर्षांनंतर त्याला प्रिन्स्टन मधे त्याच्या विद्यार्थी दशेतील प्रतिस्पर्धी (वास्तवीक तो त्याच्या विरुद्ध नसतो) मदत म्हणून कामाला घेतो. हा मुलांना शिकवताना रमून जातो. त्याही अवस्थेत त्याला ती तीन पात्रे दिसत असतात, फरक इतकाच होत जातो की तो हे मान्य करतो की हा भ्रम आपल्याबरोबर कायम रहाणारा आणि त्याला तोंड देउ लागतो (जे तो आधी करायाला तयार नसतो). त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजपण त्यांना मधून मधून ते भास होतात पण आता वर म्हणल्याप्रमाणे ते तोंड देऊ शकतात.

ह्याचा शेवट हा ऑस्लोमधे त्याच्या भाषणाने घेतला आहे - १९९४ सालचे अर्थशास्त्रातले नोबेल स्विकारताना. त्याच्या संशोधनाने संपुर्ण मार्केट इकॉनॉमिक्स बदलले आणि वॉलस्ट्रीट पर्यायाने सर्वत्र शेअर मार्केट मधले व्यवहार बदलले आणि वास्तवात अनेक सामाजीक फायदे झाले.

वास्तवातील प्रो. जॉन नॅश

त्यांच्या नोबेल च्या संकेतस्थळावरील माहीतीत त्यांनीच स्वतःबद्दल शेवटी म्हणताना म्हणले आहे की, "So at the present time I seem to be thinking rationally again in the style that is characteristic of scientists. However this is not entirely a matter of joy as if someone returned from physical disability to good physical health. One aspect of this is that rationality of thought imposes a limit on a person's concept of his relation to the cosmos. For example, a non-Zoroastrian could think of Zarathustra as simply a madman who led millions of naive followers to adopt a cult of ritual fire worship. But without his "madness" Zarathustra would necessarily have been only another of the millions or billions of human individuals who have lived and then been forgotten.

Statistically, it would seem improbable that any mathematician or scientist, at the age of 66, would be able through continued research efforts, to add much to his or her previous achievements. However I am still making the effort and it is conceivable that with the gap period of about 25 years of partially deluded thinking providing a sort of vacation my situation may be atypical. Thus I have hopes of being able to achieve something of value through my current studies or with any new ideas that come in the future."

त्यांचे चित्रपटातील आणि मी खात्री करू शकलो नाही पण असे दिसतयं की वास्तवात पण जे नोबेल स्विकारताना केलेले भाषण आहे तो या विषयावरचा त्यांच्यापुरता त्यांनी केलेला गोषवारा आहे:

Thank you. I've always believed in numbers and the equations and logics that lead to reason.
But after a lifetime of such pursuits, I ask,
"What truly is logic?"
"Who decides reason?"
My quest has taken me through the physical, the metaphysical, the delusional -- and back.
And I have made the most important discovery of my career, the most important discovery of my life: It is only in the mysterious equations of love that any logic or reasons can be found.
I'm only here tonight because of you [his wife, Alicia].
You are the reason I am.
You are all my reasons.
Thank you

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

संबंध

द्वारकानाथजी,
नैराश्य आणि अंधारी येणे यांचा संबंध कळाला नाही. कदाचित मनोकायिक (psychosomatic) संबंध असावा. तरीही यावर औषधे घेऊन फायदा होत असेल तर घ्यायला काहीच हरकत नसावी. यात काही वाईट किंवा कमीपणाचे आहे असे मनात आणू नये. तसेच याबद्दल आणखी माहिती मिळवून नैराश्य टाळण्यासाठी उपायही करता येतील. आपले अनुभवकथन पूर्ण झाल्यावर विस्तृत प्रतिसाद देईन.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अनुभव

द्वारकानाथजी,
आपल्या अनुभवाने नैराश्य या विषयाचा एक वेगळाच आयाम पुढे आला आहे.
आपल्या अनुभवाने नैराश्याचे मनोकायीक परिणाम काय असु शकतात यावरच एक लेख असावा असे वाटू लागले आहे. राजेंद्राच्या प्रतिसादात तसे आले आहे असे वाटते. तसा स्वतंत्र लेख/ चर्चा आल्यास स्वागत आहे.

नैराश्याचा डोकेदुखीशी संबंध आहे असे मागे वाचल्याचे आठवते. अनेकदा अनेक विकार हे केवळ मानसिक असूनही कायिक रूपाने बाहेर येतात.
एग्झिमा हा कोंडमारा झालेल्या मनाचे कायीक स्वरूप आहे असे 'ऐकून' आहे. (जाणकारांची मते ऐकायला आवडतील.)
तसेच आपल्या शरीरातील निरनिराळ्या ग्लँडस (पिचूटरी, थायरॉइड वगैरे)
याही यात महत्वाचे कार्य करतात.

(आवंतरः योगासनां मध्ये या ग्लँडस ना योग्यरीतीने काम करायला शिकवले जाते असेही 'ऐकले' आहे. म्हणून योगासनांनी मनोकायीक आरोग्य उत्तम रहात असावे.)

एकुणच आपल्याला आपल्या आईवडीलांकडून आलेल्या वारश्या प्रमाणे व आपले बालपण कोणत्या परिस्थितीत गेले आहे या घटकांमुळे मन संतुलितरीत्या निरोगी राखता येणे काही सर्वस्वी तुमच्या हातात नाही असे म्हणता येवू शकेल; पण आपण तसा प्रयत्न करू शकतो हे निश्चित!

आपला
गुंडोपंत

मनोकायिक

मनोकायिक आजार हा खरेच या चर्चमध्ये आलेला एक महत्वाचा आणि वस्तविक अनिवार्य असा आयाम आहे. चर्चा ज्या चांगल्या रीतिने झाली त्या कडे पाहता असे अनेक महत्वाचे पैलू त्यात येणे हे तीचा प्रवाह योग्य दिशेने वाहत आहे याची खात्री देणेच आहे. (आ?!! मलाच हे वाक्य पुन्हा वाचावे लागणार :)

खरेतर मनोकायिक आजार अथवा मनाचे शरीरावर होणारे परिणाम हा फार अभ्यासनीय पैलू आहे.
आपल्या आसपास वावरणार्‍या अनेक जणांकडे पाहून आपल्याला हे सहजी जाणवते. जर परिणाम गंभिर अथवा मोठा असेल तर तो आजारात परिणत होतो. अश्या परिणामांकडे वेळीच लक्ष पुरवणे खरेच गरजेचे असते हे नक्की.

द्वारकानाथांचा अनुभव पुढे वाचण्यास उत्सूक.

-- लिखाळ.
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

अनुभव-३ पूढे...

( अनुभव- ३ थोडा विलंब झाला आणि काही मित्रांच्या + प्रियालीच्या प्रतिसादाना प्रतिसाद देऊ शकलो नाही म्हणून दिलगिर आहे.).

एखादी गोष्ट विनासायास मिळत आहे असे म्हटले की त्याची किमंत राहत नाही असे म्हणतात ते खरेच आहे. निरोगी शरीर अथवा आजाररहित जगणे म्हणजे किती मौल्यवान आहे ना? रोज औषध घेऊन जगणे किती कष्टप्रद आहे याची जाणीव ४० च्या उंबरठ्यावर झाली.

डॉक्टरांच्या औषधांनी मला गाडी चालवत असताना अंधारी येणे बंद झाले आणि रात्री शांत झोप लागत असल्याकारणा मूळे दुसर्‍यादिवशी ताजेतवाणे वाटत असे. फक्त एकच दुखणे ( साईड इफेक्ट) होते की सकाळी शोचास लगेच होत नसे. त्यासाठी डॉक्टरांनी इसबगोल घ्यायला सांगितले होते आणि इसबगोल ची चव मला बिल्कुल आवडत नसे. त्यावर सकाळी १/२ लिटर कोमट पाणी पिणे असा उपाय मी शोधुन काढला आणि त्याचा मला उपयोगही झाला.

तरीपण... औषधावर जगणे मला आवडत नसे आणि यातुन सुटकारा कसा मिळवावा ही नवीन चिंता सुरु झाली. अधून मधून मी २ /३ दा औषधे ( फक्त १ च गोळी होती) मनानेच बंद केली आणि परत १५/२० दिवसांनी तोच त्रास सूरु झालेला आढळला. मी मग निमूटपणे परत औषधे सूरु करत असत.

दोन वर्षापूर्वी माझी बदली झाली आणि ती गोळी पुण्यात मला लवकर मिळाली नाही. मनात धाकधुक होती की आता परत तोच त्रास होतो की काय? परंतु सुदैवाने तो त्रास ( गाडी चालवत असतांना अंधारी येणे) परत जाणवला नाही. त्याच बरोबर सकाळी फिरायला जाणे, मनात निराशा येणारे विचार टाळणे इत्यादी सूरु केलेत आणि या औषधापासून सुटकारा मिळाला. मागच्या दोन वर्षापासून ही गोळी घेतली नाही.

हा प्रसंग मी बर्‍यापैकी विसरुनही गेलो होतो (इतर गडबडीत) परंतु स्नेही गुंडोपंताच्या मूळ लेखावर माझ्या स्मृती जाग्या झाल्या आणि एक वेगळा अनुभव कथन करता आला.

या निमित्ताने बरेच विचार मनात आले की चांगला डॉक्टर मला मिळाला नसता तर? त्यांनी माझे जे काही समाधान केले तसे केले नसते तर? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातून मुक्त होण्याचा माझा विचार...डॉक्टरांनी सांगितले होते की समाजात १/३ माणसे तीव्र अथवा सौम्य अश्या निराशेने बाधित आहे हा विचार मला आजही अस्वस्थ करत असतो.

असो. आयुष्यात अनेक गोष्टी घडतात आणि आपण आंतर्बाह्य ढवळून निघतो हेच खरे.

४०च्या उंबरठ्यावर

एखादी गोष्ट विनासायास मिळत आहे असे म्हटले की त्याची किमंत राहत नाही असे म्हणतात ते खरेच आहे. निरोगी शरीर अथवा आजाररहित जगणे म्हणजे किती मौल्यवान आहे ना? रोज औषध घेऊन जगणे किती कष्टप्रद आहे याची जाणीव ४० च्या उंबरठ्यावर झाली

द्वारकानाथ, तुम्हाला ४० पासून सतत औषधे घ्यायला लागली म्हणून वाईट वाटून घेऊ नका. हीच परिस्थिती बहुसंख्य लोकांची आहे. कोणाला ब्लडप्रेशरची औषधे घ्यावी लागतात तर कोणाला डायबिटिसची तर कोणाला कोलेस्ट्रॉलची. मनोविकारावरील औषधे यापेक्षा कोणत्याही प्रकारे वेगळी नाहीत फक्त विकारांची लक्षणे वेगवेगळी आहेत.

औषधावर जगणे, ती नित्यनियमाने घेणे बहुधा कोणालाही आवडत नाही. मला तर साधी विटॅमिनची गोळी घेणेही आवडत नाही परंतु आयुष्य इतक्या वेगाने चालले आहे आणि त्यातून माणसाच्या आयुष्याबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत की त्या पुर्‍या करता करता आपण स्पर्धेत कुठेतरी मागे पडत जातो का या विचाराने नैराश्य येण्याची कारणे आणि टक्का दोन्ही वाढले आहेत.

तुमच्या डॉक्टरांनी १/३ माणसांना निराशेने बाधित ठरवले तरी माझ्यामते ते प्रमाण बरेच अधिक असावे. फरक इतकाच की प्रत्येक माणूस निराशेवर आपापल्यापरीने मात करतो आणि ती करताना काहीजणांना इतरांच्या मदतीची गरज लागत नसावी.

काही सहज गोष्टी सांगाव्याश्या वाटल्या, तुम्हाला लागू होतीलच असे नाही पण झाल्यास त्याचा वापर आयुष्यात नक्की करा -

  • तुम्ही सामान्य असाल तर सामान्य आहात हे मान्य करा आणि प्रयत्न करून आपल्यात सुधारणा होते का पहा, पण स्वतःला कमी समजू नका. सुधारणा न झाल्यास*, जगात करण्यासारख्या इतर खूप गोष्टी आहेत, त्यापेक्षा माझे आयुष्य खूप लहान आहे म्हणून निराश होण्यात अर्थ नाही असे मनाला बजावत रहा.
  • तुमच्या आवडीच्या काही गोष्टी करत रहा. त्यातून तुमच्या मनाला उभारी, आनंद आणि उद्याची वाट पाहण्याची संधी मिळेल.
  • निराशेचे विचार मनात आले तर खुशाल येऊ द्या पण त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदला. म्हणजे, तो विचार मनात आला तर खट्टू होण्यापेक्षा मी याबद्दल काय करू शकतो किंवा काहीच करू शकत नसेन तर दुसरी एखादी गोष्ट करू शकतो का हा विचार मनात आणा.

मला स्वतःला या विचारांचा अतिशय उपयोग होतो. तुम्हालाही होईल अशी आशा करते.
शुभेच्छा!

* येथे सुधारणा म्हणजे व्यसनातून सुधारणा असे अपेक्षित नसून, आपली सांपत्तिक परिस्थिती, एखाद्याबरोबरचे संबंध, मुलांचे भविष्य अशा सर्वसामान्य गोष्टी अपेक्षित आहेत.

छान

द्वारकानाथांचा अनुभव फार मह्त्वाचा वाटला.

प्रियालीताई,
मनोविकारावरील औषधे यापेक्षा कोणत्याही प्रकारे वेगळी नाहीत फक्त विकारांची लक्षणे वेगवेगळी आहेत.

प्रतिसाद आवडला.
-- लिखाळ.

उपयोग

काही सहज गोष्टी सांगाव्याश्या वाटल्या, तुम्हाला लागू होतीलच असे नाही पण झाल्यास त्याचा वापर आयुष्यात नक्की करा -

होय ! गोष्टी १, २ , ३ या व्यवहार्य व उपयुक्त आहेत. उगीचच +व्ह थिंकिंग च्या नादी लागून मर्यादा मान्य करणे म्हणजे -व्ह थिंकींग असे नाही. कधी कधी समजत असत पण उमजत नसतं अशा वेळी तीच गोष्ट आपल्या सुहृदाने सांगितली तर पटते. बरं वाटत.
औषधं जान्हवी तोयम्
प्रकाश घाटपांडे

सहमत

द्वारकानाथजी,
आपल्याला आता त्रास होत नाही हे चांगलेच आहे. पण वर म्हटल्याप्रमाणे जरी औषध घ्यायची वेळ आली तरी त्यात हरकत नाही असे वाटते.
टगेराव म्हणतात त्याप्रमाणे यात विनोदबुद्धीही महत्वाची आहे. यावर गुरूवर्य साइनफेल्ड यांचे एक वचन आठवते. "इफ युअर बॉडी वॉज अ कार, यू वुड नॉट बाय इट. देअर इअज सो मच मेंटेनन्स इन्व्हॉल्व्हड." यातला विनोदाचा भाग सोडला तर विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपल्या शरीराची काळजी घेण्यात आपण किती वेळ(आयुष्य) घालवतो. आणि तरीही नाही नाही त्या अडचणी येतच असतात.
आपल्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली नाही. डॉक्टरांनी नैराश्यावर फक्त औषधे न देता नैराश्य कशामुळे आले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला का हे कळाले नाही. मानसिक अडचणींवर औषधे मदत करतात, पण त्याबरोबरच यामागची कारणे जाणून घेणेही आवश्यक असते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमत

आपल्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली नाही. डॉक्टरांनी नैराश्यावर फक्त औषधे न देता नैराश्य कशामुळे आले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला का हे कळाले नाही.
खरेच. हे जाणून घ्यायची उत्सूकता आहे.

तसेच मुंबईच्या वेगवान, धावपळीच्या जीवनपद्धतीतून पुण्यातल्या निवांत पाणाच्या वातावरणामुळे असा परिणाम झाला का?
--लिखाळ.

निदान.

आपल्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली नाही. डॉक्टरांनी नैराश्यावर फक्त औषधे न देता नैराश्य कशामुळे आले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला का हे कळाले नाही.

डॉ. नी विचारले होते की काही चिंता आहे काय? मी त्याला नकारार्थी उत्तर दिलेले होते. मग त्यांनी सांगितले की हा सौम्य निराशेचा प्रकार असावा आणि त्याच्या मुळे अंधारी येणे हे लक्षणा दिसत असावे. (बाकी भाग मी लिहिलेला आहेच.) त्यांनतर डॉ. नी सांगितले की आपल्या मनात अनेक मनस्थिती आपोआपच येत असतात, कधी आपल्याला उदास वाटते, निराश वाटते, चिड्चीड वाटते आणि त्याची काहीही कारणे नसातात. अनेक वेळेस आपोआपच बरेही वाटू लागते. या काळामध्ये शरीराच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये फरक पडत असतो आणि काही काळापूरते औषधघ्यावे लागते. हा भाग आजही मला मान्य आहेच. फक्त मनामध्ये कोठे भावना असते की आपण औषधावर जगत असतो आणि ती कोठेतरी डाचणी देत असते.

सुदैवाने आता बरे वाटते आणि परत त्रास झाला तर औषध विनातक्रार घेईलच.

 
^ वर