पाकिस्तान आणि लोकक्रांती

जेव्हा जेव्हा लोकांना दडपण्यात आले तेव्हा तेव्हा लोकांनी संधी मिळताच बंधने दुप्पट जोमाने दूर केल्याचे दिसते. मग ती जर्मनीची फाळणी असो, इंदिरा गांधीची आणिबाणी असो वा नूकतेच झालेले मुशर्रफमियांचे पानिपत असो.
झिंदाबाद, झिंदाबाद... लोकशाही झिंदाबाद ही बातमी हेच सांगते. पाकिस्तानात स्थापन झालेली लोकशाहि हे भारतासाठीच नव्हे तर जगासाठी सुवार्ता आहे असे समजले जातेय.
तुम्हाला काय वाटते? ही कितपत सुवार्ता आहे का? हा लोकशाहिचा खेळ कितपत टिकेल?
पाकिस्तानात लोकशाहि असल्याचे आता सत्तेचे विकेंद्रिकरण झाले आहे. त्याचे भारतावर चांगले आणि वाईट असे कोणते परिणाम होतील?
मतदान ३०%च्या आसपासच होते तेव्हा हा कौल कितपत विश्वासर्ह आहे? याचा अर्थ लोकशाहिवर विश्वास केवळ ३०% पाकिस्तानीच जनतेचा आहे का?

या विषयावर वेगवेगळ्या वृत्तपत्रांत अग्रलेख येतीलच त्याचेहि दुवे द्यावेत हि विनंती

Comments

म टा

थोडक्यात, ही निवडणूक म्हणजे 'पाकिस्तानातील लोकशाहीची पहाट' असे समजण्याचे कारण नाही

असे अनुमान काढणारा मटाचा अग्रलेख इथे वाचता येईल

अजून वेळ आहे

पाकीस्तानात लोकशाहीची पहाट झाली आहे की अराजकाची मध्यान्ह हे समजायला अजून वेळ आहे.

पाकीस्तानातील राज्यकर्ते हे हिंदूस्थानच्या द्वेष स्वतःच्या जनतेच्या नसानसात भरत स्वतःच्या राजकारणावर त्यांच्या महत्वाकांक्षा पुर्‍या करतात हा आजवरचा इतिहास आहे. बेनझीर भुत्तो गेली पण ती जरी असती तरी भारताबद्दल काही तिला प्रेम नव्हते. कार्गीलचा खोडसाळपणा हा नवाब शरीफ पंतप्रधान आणि मुशारफ सेनाप्रमुख होते. यातील प्रत्येकाने अल कायद्याला कधीना कधी मदत केली आहे. तरी बुश सरकार असे पर्यंत "दहशतवाद विरोधी लढा" जोरात रहाणार असल्याने ते गप्प राहतील. पण उद्या ओबामा राष्ट्राध्यक्ष झाला तर हे परत मूळ पदावर येऊ शकतात.

थोडक्यात भारताच्या दृष्टीकोनातून आज काही फरक पडलाय असे समजायची गरज नाही.

अवांतरः जर्मनीची फाळणी आणि इंदीरा गांधी यांचा आणिबाणी नंतरचा पराभव या पूर्णपणे वेगळ्या घटना आहेत त्यांची तुलना पाकीस्तानातील सध्य परीस्थितीतील मतदानाशी करता येईल असे वाटत नाही. तसेच जर्मनीची फाळणी ही जेत्यांनी त्यांना हवी तशी केलेली होती. म्हणून अर्धी अमेरिकेच्या बाजूस तर अर्धी रशियाच्या बाजूस असे लोकांच्या मनाविरुद्ध झाले होते,लोकशाहीने नाही.

इस्लामी विस्तारवाद्यांचे राज्य

वरवर दिसायला पाकिस्तानांत कोणाचीही सत्ता असो, लष्कराची असो की निर्वाचित लोकप्रतिनिधींची, खरी सत्ता इस्लामी अतिरेकी व विस्तारवादी यांचीच आहे. त्यांच्या विरोधांत जाण्याची कोणत्याही पाक राज्यकर्त्यांची हिंमत होणार नाही. म्हणून पाकिस्तानांतील सत्तांतरामुळे भारताला पाकिस्तानमुळे होणारा त्रास कमी होईल या भ्रमांत आपण राहू नये हे बरे.

एक विचार

पाकिस्तानची केस् बघता , "नो न्यूज् इज् गुड् न्यूज्" या इंग्रजी उक्तिची यथार्थता पटते ! जेव्हा एखाद्या ठिकाणाबद्द्ल रोज काही ना काही घडतेय् अशी बातमी येत रहाते तेव्हा समजावे : मामला बिघडलाय्. जगातल्या शांततापूर्ण समजल्या जाणार्‍या प्रदेशांतून (उदाहरणार्थ : पश्चिम युरोपातील अनेक छोट्या छोट्या राष्ट्रांबद्द्ल ) कसलीच बातमी ऐकायला मिळत नाही. याउलट , पाकिस्तानमधे दर काही वर्षानी राजवटी काय उलथतात, नेत्यांचे खून काय होतात. राज्यघटना रोजच्या पेपरासारखी काय बदलते, सुप्रिम् कोर्टाचे न्यायाधीश काय रद्दबातल होतात ..... किंबहुना , पाकिस्तानातले कुठलेही सरकार - लोकशाहीतले किंवा लष्कराचे - त्यांच्या सत्तेचे हस्तांतरण सुखासुखी होतच नाही !
असो.

अनिश्चतेत भरच

पाकिस्तानातील निवडणुकांमध्ये मुशर्रफविरुद्ध जनतेने कौल दिला असला तरी कोणालाच स्पष्ट बहुमत न दिल्याने अनिश्चतेत भरच पडली आहे. झरदारी (भुट्टो बाईंचा नवरा) यांच्यावर जनतेचाच काय त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांचाही विश्वास नाही. कालपर्यंत ते आणि नवाझ शरीफ एकत्र येऊन सरकार बनवणार अश्या बातम्या असतानाच 'अमेरिकेच्या प्रभावाखाली झरदारी मुशर्रफांनाच पाठिंबा देतील' अशी बातमी कुठशी वाचली.

अनिश्चितता

निवडणुकीत कौल विरूद्ध गेला तरी मुशर्र्फ अजून बाहेर पडायला तयार नाहीत, बुश त्यावर काही बोलत नाहीत, अमेरिका म्हणते की आम्ही मुशर्र्फांबरोबर "काम करू". आणि मुशर्र्फ सांगतात की नवीन सरकारच्या स्थापनेत मदतच करू. बेनझिरचे पती असिफ झरदारी यांनी म्हटल्याचे सांगितले जाते की ते मुशर्र्फ यांच्याबरोबर काम करायला तयार आहेत. एकीकडे न्यायाधीशांची नव्याने नियुक्ती करेपर्यंत मुशर्रफ यांचे काय होणार हे अनिश्चित आहे.

डॉन -पाकिस्तानी वर्तमानपत्रातली बातमी

अजून एक
आणि लोकशाहीची स्थापना झाली तरी ते भारताशी संबंध कसे ठेवणार ह्याबद्दल शंकाच आहे.

अमेरिकेचे प्यादे

अमेरिकेशी असलेली स्वाभिमानशून्य मैत्री पाकिस्तानला फारच महागात पडली आहे. भारत सुरुवातीच्या काळात त्यापासून दूर राहिला हे फारच बरे झाले असे वाटते.

पाकिस्तानातील प्रत्येक लष्करशहाला अमेरिकेचा वरदहस्त आणि पाठिंबा मिळाला आहे. दुसर्‍या देशांमार्फत आपले हेतू साध्य करायचे असतील तर त्या देशात लोकशाही असणे अमेरिकेला परवडणारे नव्हतेच. झिया यांना रशियाचे अफगाणिस्थानवरील आक्रमण आणि मुशर्रफ यांना ९/११ पथ्यावरच पडले! परंतु त्यातून रुजलेली "कलाशनिकॉव" संस्कृती पाकिस्तानला विनाशाच्या वाटेवर घेऊन जात होती याचे मात्र त्यांना भान नव्हते.

आताही जर नवीन सरकारने अमेरिकेच्या हातातील प्यादे बनायचे नाकारले तरच तेथे लोकशाही टिकेल अन्यथा नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुशर्रफ

>>>> परंतु त्यातून रुजलेली "कलाशनिकॉव" संस्कृती पाकिस्तानला विनाशाच्या वाटेवर घेऊन जात होती याचे मात्र त्यांना भान नव्हते.

उलट मला असे वाटते की, मुशर्रफ यांच्या राजवटीमधे कडव्या धर्मांधाच्या गन् कल्चरला पायबंद घालण्याचा प्रयत्न खूप झाला. पण तो अयस्वी ठरला. हे विष १९९९ च्या आधीच्या २०-२५ वर्षांत इतके भिनले की गेल्या ७-८ वर्षांमधल्या प्रयत्नाना कसलेच यश आले नाही.

मुशर्रफ

मुशर्रफ यांच्या राजवटीमधे कडव्या धर्मांधाच्या गन् कल्चरला पायबंद घालण्याचा प्रयत्न खूप झाला

मुशर्रफ जिहादींच्या मागे लागले ते ९/११ नंतरच. त्यापूर्वी नाही. अफगाणिस्थानच्या तालीबानी सरकारला मान्यता देणारे जे २-३ देश होते त्यात एक होता मुशर्रफ यांचा पाकिस्तान.

निमित्त झाले ते रशियाच्या अफगाणिस्थानवरील आक्रमणाचे. रशियाला अफगाणिस्थानमधून घालवणे ही अमेरिकेची गरज होती. रशियाशी थेट दोन हात अमेरिकेला करायचे नव्हते. तेव्हा उपयोगी पडला पाकिस्तान!

मुजाहिदीन "घडवले" गेले आणि त्यांना हातातून उडवण्यासारखी स्टिंजर क्षेपणास्त्रे दिली गेली, अफगाणिस्थानवरील हल्ला हा इस्लामवरील हल्ला आहे हे त्यांना "पटवले" गेले. हे सर्व अमेरिकेच्या आशिर्वादानेच घडले.

रशियन तर गेले आणि मागे उरले ते मुजाहिदिन, शस्त्रास्त्रे आणि जिहादी शिकवण! जी ९/११ नंतर अमेरिकेला त्रासदायक वाटू लागली (तत्पूर्वी नव्हे!).

थोडक्यात, पाकिस्तानची सध्याची अवस्था ही अमेरिकेच्या हातातील बाहुले बनल्यामुळे झालेली आहे.

टीप : आता खोटे वाटेल पण ५० च्या दशकात पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतकी गतिमान होती की, कोरियानेदेखील त्यांच्या कडून अर्थव्यवस्थेचे धडे घेतले होते!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

म्हणजे

मुशर्रफांच्या कारकीर्दीत कराची स्टॉक इन्डेक्स ११०० वरून ११००० वर गेला हेही विसरून चालणार नाही.

कराची स्टॉक इंडेक्स मधे बाहेरून कोणी पैसे गुंतवत असेल का? की रॉन पॉलने म्हणल्याप्रमाणे चीनमधून घेतलेले बीलियन डॉलर्स स्वतःचे तेल मिळवायला म्हणून धोरणात्मक संरक्षणाच्या (स्ट्रॅटेजीक सिक्यूरीटी) नावाखाली जे मुशारफ सरकारला देऊ केले त्यातून हा इंडेक्स वर आलाय?

(तळटीप: हा प्रश्न माहीतीसाठी विचारलाय, वाद घेण्यासाठी अथवा संशय घेउन नाही!)

चांगले वाक्य...

परंतु पाकिस्तानात सैन्याच्या कारकीर्दीतच प्रगती झाली आहे, हेही तितकेच खरे.
एकदम मान्य. यापुढेही तेच होणार आहे. नव्याने आलेले सरकार भ्रष्ट होईल मग सत्ताभ्रष्ट होईल मग परत जनता सैन्याचे स्वागत करेल.... पुनरपी जननम् पुनरपी मरणम् - पण, आपला वरील प्रतिसाद वाचला आणि त्याच वेळेस खालील वाक्य आठवले आणि त्याचे वास्तव पण जाणवले.

A government big enough to give you everything you want is big enough to take everything you have. - Barry Goldwater

अमान्य

परंतु पाकिस्तानात सैन्याच्या कारकीर्दीतच प्रगती झाली आहे, हेही तितकेच खरे.

अमान्य

(फक्त मत नोंदवून ठेवले आहे... समथिंग इज् बेटर दॅन नथिंग्)

समभाग बाजार ... प्रगती वगैरे वगैरे

समभाग बाजाराला राजकीय स्थैर्य आवडते

हे ठामपणे म्हणता येणार नाही. समभाग बाजार हा मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खायला सिद्ध असतो.* पाकिस्तानातील निर्देशांकाची भरभराट हे भांडवलशहाला एका हुकूमशहाची कठपुतळी करणे अधिक सोपे असल्याचा परिणाम आहे.

* त्सुनामीचा सर्वाधिक फटका बसलेल्या चार पाच देशात नंतर आठवड्याभरात निर्देशांकांचे उच्चांक नोंदविले. (दुवा याक्षणी माझ्या हाताशी नाही. कृपया आंतरजालावर धुंडाळावा.)

 
^ वर