भारत तोडो.

आम्ही ज्या प्रकारच्या बातम्या पुण्यात ऐकत आहोत त्यावरुन हा लेख लिहित आहे. पुण्यात आणि नाशिकमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये बिहारी आणि उत्तर प्रदेशातिल कामगारांना घरात घुसून मारहाण करण्यात येत असुन त्यांनी २४ / २५ तारखेपर्यंत महाराष्ट्र सोडण्यात यावे असे तथाकथित राजकिय कार्यकत्याकडून सांगण्यात येत असून बरेच अभागी कामगार आपापल्या बायकापोरांसह आपापल्या मूळ प्रदेशात परत जात आहे. (अन्यथा त्यांच्या जिवीताची हमी घेता येणार नाही ही गर्भीत धमकी.) हे कामगार औद्योगिक संस्थेत मजूरीची हलकी कामे उदा. फोर्जिंग, प्लेटिंग, बफिंग, पत्र्याची घासाघासी, हमाली इत्यादी कामे करत असतात. त्यांनी ही कामे बंद झाल्यामूळे उत्पादनही बर्‍यापैकी खंडीत झाल्याच्या बातम्या संबधीत लोकांकडून ऐकण्यात येत आहे. संबंधित औद्योगिक संस्थांनी पोलिसांकडे स्वरक्षण आणि गस्त मागितली आहे असे कळते.

दुर्देवाने याबाबतचे वृत्त मात्र वर्तमानपत्रात मात्र वाचलेले आढळत नाही.

सर्व संबंधित उपक्रमींनी यावर गंभीरपणे विचार करावा अशी माझी विनंती आहे.

आज आपण एकमेकांच्या साह्याने अर्थकारण आणि समाजकरण करत असतो आणि अश्या प्रकारच्या समाजविघातक आणि देशाची अखंडता छेदू शकणार्‍या गोष्टीबद्दल जागृत राहणे आपले परम कर्तव्य आहे असे मी मानतो.

आजच सकाळ मध्ये अशी बातमी वाचली की आग्र्याजवळ रेल्वेतून प्रवास करणार्‍या मराठीत बोलणार्‍या लोकांना तेथील काही तरुणाकडून दमदाटी करण्यात आली आणि एका कर्तव्यदक्ष पोलिस आधिकार्‍यामूळे पूढचा प्रसंग टळला.

समाजजीवनात अश्या अनेक ताणतणावांना सामोरे जावेच लागते आणि विधायक मार्गाने आपण हाही प्रश्न सोडवला पाहिजे असे मला वाटते.

अन्यथा आपण १९४६ चा ६२७ संस्थानाच्या दिशेने वाटचाल करत असुन परत कोणा परकिय साम्राज्याला आमंत्रत देत आहोत असेही मानण्यास प्रत्यवाय नसावा.

भारत जोडायचा की तोडायचा असे आता आपणच ठरवायलाच हवे.

Comments

दोरीचा साप

ज्या काही घटना आपण लिहील्या आहेत त्या होणे नक्कीच चांगले नाही पण तरी देखील "भारत तोडो" वगैरे म्हणणे म्हणजे साप समजून भुई धोपटण्यातला प्रकार होत आहे.

सर्व प्रथमः
आम्ही ज्या प्रकारच्या बातम्या पुण्यात ऐकत आहोत त्यावरुन हा लेख लिहित आहे. ...दुर्देवाने याबाबतचे वृत्त मात्र वर्तमानपत्रात मात्र वाचलेले आढळत नाही.

ह्या अफवा कशावरून नाहीत? उद्या तुम्हाला सांगोवांगी समजले की बिहारी लोकांचा तांडा मराठी लोकांना मारहाण करत सुटलाय तर काळजी वाटली तरी आपण त्या बातमीची आधी खात्री करून घ्याल का ती खरी समजाल?

आग्र्याला मराठी माणसाला झालेला त्रास खरा असला तरी अनुमान काढण्यासाठी तसा समाजाच्या/देशाच्या दृष्टीकोनातून एखादाच प्रसंग आहे . परत याचा अर्थ काळजी घेऊ नये अथवा वाटू नये असा नक्कीच नाही.

समाजजीवनात अश्या अनेक ताणतणावांना सामोरे जावेच लागते आणि विधायक मार्गाने आपण हाही प्रश्न सोडवला पाहिजे असे मला वाटते.

अगदी बरोबर बोललात. आणि तसे झाले तर उत्तमच आहे. पण दिसताना काय दिसतयं? राज-अबु-अमर यांनी त्यांना पाहीजे ते गोंधळ घातले. त्यांनी त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या कम्युनिटीचे स्वार्थ चुकीच्या मार्गाने बघितले असे म्हणू. पण इतरांचे काय? - राज्य सरकार, केंद्र सरकार त्यांना अटक करणे, गुन्हे नोंदवणे, मुंबई सर्वांची म्हणणे याच्या पलीकडे काही करताना दिसताहेत का? हे प्रश्न आहेत हेच जर त्यांना मान्य नसेल अथवा तसे ते पहात नसतील तर विधायक मार्ग म्हणजे काय? विचार करा, मुंबईत जे काही झाले त्यावर नेतृत्व दाखवत विलासरावांनी/मनमोहन सिंगांनी कोणी चांगले मध्यस्थ नेमून सगळ्यांना एकत्र चर्चेस आणले तर राज-अबू- समर सारख्या लोकांना त्यात भाग घेणे नाकारता येईल का? अर्थात तसेले नेतृत्व ना धड राज्यात आहे, ना धड केंद्रात हे दुर्दैव...

अन्यथा आपण १९४६ चा ६२७ संस्थानाच्या दिशेने वाटचाल करत असुन परत कोणा परकिय साम्राज्याला आमंत्रत देत आहोत असेही मानण्यास प्रत्यवाय नसावा.

खालील प्रश्न पहा:

  1. पोट्टी श्री रामलू यांनी आंध्रप्रदेश तयार करण्यासाठी प्राण दिले आणि भाषावारप्रांत रचना सुरू झाली. त्यात नंतर सर्व आले....
  2. दक्षिणेतील हिंदी विरोधी चळवळ - विशेष करून तामिळनाडूतील विरोध (करूणानिधींनीतर साध्या हिंदी बातम्या रात्री ९:०० वाजता दाखवायला लागले म्हणून टिव्ही फोडून दिल्लीला मला वाटते - विठ्ठलराव गाडगिळांना पाठवला होता..)
  3. नक्षलवाद्यांच्या चळवळी झाल्या/अजून ही होत आहेत.
  4. पंजाबचा धगधगता प्रश्न..पंजाब वि हरीयाना
  5. प.बंगाल मधील बंगाल्यांना (आणि तेच आसामींना) जाऊन विचारा की मारवाडी आवडतात का ते...
  6. आसाम, नागालँड

वगैरे

इतक्या सर्व वेळीस भारत तुटण्याची भिती दाखवली गेली नव्हती (अपवाद थोडाफार पंजाब प्रश्नाचा असेल). यातील काही प्रश्न गंभिर आजही आहेत. मुंबईचा प्रश्न हा आधी म्हणल्याप्रमाणे अर्बन डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, जो जगात सर्वत्र असतो. भारतात देखील आज मुंबईत आहे उद्या इतर राज्यांमधे/शहरांमधेपण जाणवणारच आहे. तो प्रश्न आहे हे जाणून उत्तरे शोधणे महत्वाचे आहे. पण नको त्या गोष्टीस महतव देत बसत केवळ् याला अट़क, त्याच्यावर गुन्हा नोंदणे सोडून अजून काहीच ठोस पावले उचलली जात नाहीत हे चूक आहे. म्हणूनच अशा "आयसोलेटेड" घटनेस "भारत तोडो" वगैरे म्हणून आपण न कळत फक्त एका मराठी माणसाच्या कृत्यामुळे सर्वांमधे अपराधी भावना जागृत करत केवळ स्वतःला कमी लेखत आहोत असे वाटते. जे वर उल्लेखलेल्या एकाही घटनेत इतर प्रांतियांमधे केलेले अथवा त्यांना "सामुदायीकपणे" वाटलेले कधी पाहीले अथवा ऐकलेले नाही.

बहुतांशी सहमत

वरील विकासरावांच्या प्रतिक्रियेशी बहुतांशी सहमत आहे. फक्त

राज्य सरकार, केंद्र सरकार त्यांना अटक करणे, गुन्हे नोंदवणे, मुंबई सर्वांची म्हणणे याच्या पलीकडे काही करताना दिसताहेत का?

हा प्रश्न पटला तरीही थोडा चिंतनीय वाटला :)
कारण असे, हे इतकेच केल्यावर सगळे शांत झाले आहे! ना मिडिया हा प्रश्न ताणत आहे ना नेते.. कारण ते त्यांना सोयीचे आहे. पण नेत्यांना अथवा मिडियाला ह्या प्रश्नाचा उहापोह करण्यास भाग पाडण्यासाठी लागणारे जनमानस आहे का?
म्हणजे

त्याच्यावर गुन्हा नोंदणे सोडून अजून काहीच ठोस पावले उचलली जात नाहीत हे चूक आहे

हे कबुल पण हे चुक आहे हे भारतीय जनतेला खरच वाटतंय का? का झालं तितकं पुरे झालं असंच जनतेलाच वाटतेय त्यामुळे नेते आणि मिडिया दोघंही हे पुढे नेऊ इच्छित नाहित.

तरीही माझं मत विचाराल तर जखमेवर वेळीच 'संपूर्ण' औषधोपचार झाले पाहिजेत. अशी वेळ न येवो की वर वर मलमपट्टी केल्याने जखम आतुन चिघळली आणि मग पायच कापावा लागला

-ऋषिकेश

महाराष्ट्र धर्म.

विकास राव,

या अफवा नसून दुसर्‍याच दिवशी स्थानिक वर्तमानपत्रात याबद्दल सविस्तर वृत्तांत आलेला आहे. असो.

आपण इतरत्र याला समांतर वाटणार्‍या घटना लिहिलेल्या आहेत. या घटना आणि महाराष्ट्र छोडो या मध्ये गुणात्मक भेद आहे. भारतात कोणताही विधायक अथवा विघातक प्रयोग हा अगोदर महाराष्ट्रात सिद्ध व्हावा लागतो आणि नंतरच तो देशात स्विकारला जातो, उदा. शिक्षणाची द्वारे सर्वसामान्यांना खुली होणे, स्त्री सबलीकरण, कुटुंब नियोजन, जाणता मध्यमवर्ग इत्यादी इत्यादी. त्यामुळे मला वाटणारी काळजी ही स्वाभाविक आणि खरी समजण्यात यावी.

दुसरे असे की आपली ( आपल्या सर्वांची ) भूमिका ही भारतीय म्हणून आहे की मराठी / बिहारी / गुजराती म्हणून आहे याचाही उहापोह आता करावा लागेल. वर्तमानपत्राच्या वृताप्रमाणे हजारो नागरीकांनी स्थळांतर केलेले आहे. असा प्रत्येक नागरीक जेंव्हा आपापल्या गावी जात असतो तेंव्हा नेमका काय संदेश जात असेल यावरही विचार करावा. शेवटी राज, अबु अथवा अमरसिंग यांच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे हेही ठरवायला हवे.

शेवटी अश्या छोट्या गोष्टींनीच आपण जोडत जातो अथवा तूटत जातो.

द्वारकानाथ

महाराष्ट्र धर्म - मर्म

नमस्कार द्वारकानाथ,

आपण माझी मूळ प्रतिक्रीया पाहीलीत (तसेच इतरत्र या संदर्भात लिहीलेले पाहीलेत) तर लक्षात येईल की जे काही होत आहे ते आपल्याप्रमाणेच मलापण अमान्यच आहे. आपल्यात आणि माझ्या विधानात आणि विचारात जर कुठे फरकच असेल तर तो कारणमिमांसेत आणि काही (सर्व नाही) उपाय/प्रतिक्रीयांमधे आहे.

आपण आपल्या प्रतिक्रीयेस समर्थ रामदासांनी प्रचलात आणलेला "महाराष्ट्र धर्म" हा शब्द वापरलात म्हणून समर्थांच्याच अनुषंगाने मला काय म्हणायचे आहे ते लिहीतो:

मराठा तितुका मेळवावा | अवघे महाराष्ट्र धर्म वाढवावा
आपल्याला माहीत आहेच की यातील "मराठा" हा शब्द जातीवाचक नाही की धर्म हा शब्द "रिलीजनवाचक"... याचा अर्थ आपण आधी आपल्याला संघटीत (चुकीच्या अर्थाने नाही) करण्याची आणि काहीतरी चांगले करायची गरज आहे मग आपण इतरांचे भले करू शकू..

म्हणूनच रामदासांनी असेपण म्हणले आहे की:
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥ प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥ परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगिसी । अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥ साहेबकामास नाहीं गेला । गृहींच सुरवडोन बैसला । तरी साहेब कुटील तयाला । पाहाती लोक ॥ ५ ॥ तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनाचें हासें जालें । दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥ (संदर्भ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक बारावा : विवेकवैराग्य समास पहिला : विमळ लक्षण
- विकीबुक्स मधून चिकटवले आहे)

वरील मार्मीक उपदेश जसा व्यक्तीला लागू असतो तसाच समाजाला पण लागू असतो. जो समाज स्वतःच्यातील कमकुवत व्यक्तींचे भले करू शकत नाही तो इतरांचे काय करणार?

म्हणूनच मी माझ्या आधीच्या प्रतिक्रीयेत जे म्हणले होते ते अजून वेगळ्या शब्दात परत सांगतो: "आत्यंतीक नागरीकरणाच्या, वाढणार्‍या लोकसंख्येच्या आणि विषमतेने विकसीत होणार्‍या राष्ट्राचे हे प्रश्न आहेत हे मान्य करा आणि ते सोडवायचा प्रयत्न करा" पण आपले सत्तेतील राजकारणी ते प्रश्न आहेत हेच मान्य करायला तयार नाहीत हे दुर्दैव आहे. ज्या क्षणाला सरकार पुढाकार घेऊन हे प्रश्न सोडवायला उभे राहील त्या क्षणाला राज-अबु-अमर-अजून कोणी गोम्यासोम्या यांच्या वक्तव्याला महत्व आपोआप मिळेनासे होईल. पण त्या साठी हा सिद्धसाधकाचा खेळ थांबवण्याची इच्छाशक्ती असणे आणि ती आमलात आणणे महत्वाचे आहे.

आपल्याला हा (वरील) प्रश्न आहे हे तरी मान्य आहे का?

दुसरे असे की आपली ( आपल्या सर्वांची ) भूमिका ही भारतीय म्हणून आहे की मराठी / बिहारी / गुजराती म्हणून आहे याचाही उहापोह आता करावा लागेल.

याचे उत्तर आपल्यासंदर्भात आपल्याच प्रतिसादात दिसते,:"या घटना आणि महाराष्ट्र छोडो या मध्ये गुणात्मक भेद आहे. भारतात कोणताही विधायक अथवा विघातक प्रयोग हा अगोदर महाराष्ट्रात सिद्ध व्हावा लागतो आणि नंतरच तो देशात स्विकारला जातो, ..." थोडक्यात आपण आपल्याच नकळत स्वतःला भारतीय म्हणायच्या आधी महाराष्ट्रीय/मराठी म्हणत आहात असे वाटले.

माझ्या पुरते बोलाल तर मी माझ्यासकट कुणालाच केवळ एका "ओळखी" ने ओळखत नाही . गरज असताना मराठी असतो (जात मात्र मी मानत नाही, त्यामुळे मराठीच्या खाली काही समजत नाही), अर्थातच कायमच भारतीय असतो आणि हिंदू पण असतो. तसेच कायमच फक्त माणूस पण असतो...जर समोरचा माणूस हा मला मराठी समजणार असला आणि त्या पद्धतीने वेगळे वागवणार असला तर ते मला मान्य नाही. प्रतिक्रीया म्हणून मी त्याला तो कोण आहे (प्रांतीय) ते समजून वागवणार नाही पण माझ्या विरुद्ध जे "डिसक्रिमिनेशन" होत आहे त्याविरुद्ध मी आवाज नक्कीच उठवीन (गुंडगिरीने नाही). तसे करत असताना मी भारत तोडत नसतो तर त्यातील लोकशाही मुल्ये वाढवत असतो कारण तसे केले नाही तर "चलता है" विकृती समाजात बळावत जाते ज्याचे तुम्ही, मी आणि सर्वसाधारण भारतीय आज बळी ठरलो आहोत.

विधायक मार्ग.

ज्या क्षणाला सरकार पुढाकार घेऊन हे प्रश्न सोडवायला उभे राहील त्या क्षणाला राज-अबु-अमर-अजून कोणी गोम्यासोम्या यांच्या वक्तव्याला महत्व आपोआप मिळेनासे होईल.

१०० % सहमत. माझ्या मते शासनाने दूरदर्शनाचा पूरेपूर फायदा घेतला पाहिजे. अनेक अभ्यास गट, आमनेसमने चर्चेची तयारी इत्यादी प्रामूख्याने केलीच पाहिजे. अनेक पक्षानी, सामाजिक संस्थांनी अश्या वेळेस आगीत तेल ओतण्याऐवजी सामंजस्य आणि सद्भावनेचा प्रचार आणि प्रसार करावयास हवा. अनेक वेळेस वर्तमानपत्रही आग लागेल अश्या प्रकारच्या मथळ्याची योजना करत असतात.

त्याचबरोबर आपल्यासारख्या असंख्य सुशिक्षितांनी आपल्या जीवनाचा काही तरी भाग अश्या मागासलेल्या प्रांतात घातला पाहिजे. आज दोन प्रांतात, समाजात, वर्गात दरी वाढत आहे त्यावर आतापासूनच विचारयोजना आणि कृतीयोजना करावयास हवी.

मराठी...प्रांतीयवादी?

महाराष्ट्रामधे राहून उत्तर प्रदेश दिन साजरा करणारे जर निष्पाप असतील तर,महाराष्ट्र्भूमीत महाराष्ट्रप्रेमाची अपेक्षा करणारे आम्ही प्रांतीयवादी कसे?
भारत तुटू नये ही केवळ आमचीच जबाबदारी आहे काय?

(कट्टर मराठी) -इनोबा

महाराष्ट्राबाहेर मराठी सण

तुमची विचार करण्याची तर्‍हा योग्य आहे. पण मुद्द्यांचा उपन्यास असा करावा :

उत्तरप्रदेशात राहणार्‍या मराठी लोकांना मराठी सण साजरे करण्यास रोखणे जर प्रांतीयवादी नसेल, तर महाराष्ट्रात राहाणार्‍या उत्तरप्रदेशी लोकांना त्यांचा सण साजरा करू देणे प्रांतीयवादी कसे.

(अर्थात, उत्तरप्रदेशात मराठी सण साजरा करण्याबाबत कोणी प्रतिबंध आणला असेल तर या वाक्यास सत्याची पुष्टी मिळते आणि अधिक जोर येतो.)

हिंदुस्तान टाइम्स मधील हा लेख या संदर्भात वाचण्यालायक ठरावा.

किन्चित सुधारणा ?

उत्तरप्रदेशात राहणार्‍या मराठी लोकांना मराठी सण साजरे करण्यास रोखणे जर प्रांतीयवादी नसेल, तर महाराष्ट्रात राहाणार्‍या उत्तरप्रदेशी लोकांना त्यांचा सण साजरा करू देणे प्रांतीयवादी कसे.

असे धनंजय याना म्हणायचे असावे.

किञ्चित सुधारणा ?

किञ्चित् सुधारणा
असे मुक्तसुनीत यांना म्हणायचे असावे
(क्षमा करावी, मोह आवरला नाही :))
- दिगम्भा

मूळ मुद्दा

महाराष्ट्रामधे राहून उत्तर प्रदेश दिन साजरा करणारे जर निष्पाप असतील तर,महाराष्ट्र्भूमीत महाराष्ट्रप्रेमाची अपेक्षा करणारे आम्ही प्रांतीयवादी कसे? भारत तुटू नये ही केवळ आमचीच जबाबदारी आहे काय?

धनंजयनी आधीच म्हणल्याशी सहमत आहे. उत्तर प्रदेश दिन साजरा करणे ह्यात काहीच चूक नाही. आम्ही जर अमेरिकेत २६ जानेवारी आणि बॉस्टनला जिथे (देशातील एक मोठा) अमेरिकन स्वातंत्र्यदिन साजरा होतो तिथेच चार्ल्स नदीवर भारतीय स्वातंत्र्यदीन साजरा करू शकतो, भारतातील तमाम महाराष्ट्रमंडळे त्यांच्या त्यांच्या राज्यात महाराष्ट्रदीन साजरा करू शकतात तर उत्तर भारतीयांनी त्यांचा दिवस मुंबईत साजरा करू नये म्हणणे हे अयोग्य आहे.

असल्या वादाने मुळ मुद्दा बाजूस राहतो. आज जो काही आक्षेप आहे तो जर मराठी माणसांना डावलून उत्तर भारतीयांना कामे दिली जात असतील तर त्यावर आहे आणि त्यावर असावा/असल्यास हरकत नसावी. मराठी भाषेत बोलणे साहजीक भाग असावा, अर्थात त्या साठी आधी मराठी माणसांना उगाच हिंदी बोलणे सोडावे लागेल! मी हे ही बर्‍याचदा पाहीले आहे की आजही अमराठी माणसांपेक्षा मराठी माणसे मुंबईला बाँबे म्हणताना आढळतात....

राज यांचा मुख्य रोख

माझ्या मते, उ.प्र. दिन किंवा छट पूजा साजरी करण्यापेक्षाही त्यानिमिताने उत्तरेतील नेते येथे येऊन स्थानिक राजकारणाविषयी जी आगखाऊ भाषणे करतात, त्यावर राज यांचा मुख्य रोख दिसतो.

मी भारतात जेथे राहतो तेथे दक्षिणी मंडळींचा अय्यप्पा हा सण जोरदार रीतीने साजरा होतो आणि त्याचा (ध्वनिवर्धक सोडल्यास) कुणाला फारसा त्रास होत नाही की त्यांचे त्यांच्या राज्यातील पुढारी येथे येऊन दंडाईची भाषणेही करीत नाहीत. गरब्या-दांडियात तर सर्वच समाजातील लोक (कारणे काहीही असोत!) सामील होतात.

तेव्हा उ.प्र. दिन किंवा छट पूजा जर येथिल मंडळींनी (त्यांच्या राज्यातील पुढार्‍यांना वगळून) साजरी केली तर कुणाचा आक्षेप राहण्याचे कारण उरणार नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पटले

माझ्या मते, उ.प्र. दिन किंवा छट पूजा साजरी करण्यापेक्षाही त्यानिमिताने उत्तरेतील नेते येथे येऊन स्थानिक राजकारणाविषयी जी आगखाऊ भाषणे करतात, त्यावर राज यांचा मुख्य रोख दिसतो.

ह्यात तथ्य आहे. पटले.

हे वाचा

हे देखील वाचा.
दुवा

काय झाले आहे. आपली प्रसारमाध्यमे अतिशय कार्यक्षम झाल्यामुळे छोट्याछोट्या घटनाही आता वारंवार उगाळून सांगितल्याने त्या जास्त धोकादायक वाटत आहेत इतकेच.

-- आजानुकर्ण

हितसंबंध

द्वारकानाथ,

अन्यथा आपण १९४६ चा ६२७ संस्थानाच्या दिशेने वाटचाल करत असुन परत कोणा परकिय साम्राज्याला आमंत्रत देत आहोत असेही मानण्यास प्रत्यवाय नसावा.

हे आपले म्हणणे फारच निराशाजनक (पेसिमिस्टिक) वाटते.

भाषावार प्रांतरचना झाली तेव्हाच सीमावाद आणि भाषिक अल्पसंख्य ह्या समस्या राहणार हे निश्चित होते. तरीही भाषावार प्रांतरचना हे पाऊल नक्कीच चांगले होते.

आता हे भाषिक अल्पसंख्य स्थनिकांच्या कोणत्या हितसंबंधांना धक्का लावतात हे पाहणे उद्बोधक ठरेल.

५०-६० च्या दशकात मुंबईत आलेले दक्षिणी हे प्रामुख्याने सुशिक्षित होते. त्या जोरावर त्यांनी कचेर्‍यांतील पांढरपेश्या नोकर्‍या पटकावल्या. त्यावेळीही गिरण्या-कारखान्यांतून कामे करणारा कामगार हा प्रामुख्याने मराठीच होता (आणि चौपाटीवर भेळ विकणारा भैया उ.प्र. वासीच होता!). तेव्हा दक्षिणींचे हे "आर्थिक आक्रमण" प्रामुख्याने मराठी मध्यमवर्गाच्या हितसंबंधाना धक्का लावणारे होते. म्हणूनच शिवसेनेला सुरुवातीला जो पाठिंबा मिळाला तो दादर-ठाण्यासारख्या ठिकाणी.

आता परिथिती वेगळी आहे. आता कचेर्‍यांतून मराठी भाषिक मोठ्या संख्येने दिसताहेत. भेळवाला, इस्त्रीवाल्यांमुळे त्याच्या आर्थिक हितसंबंधांना अजिबात धक्का लागलेला नाही. आताचे हे उत्तरी आक्रमण बहुतांशी सांस्कृतिक आणि राजकीय आहे. हिंदी भाषिक नगरसेवकांची वाढती संख्या, मुंबई महापालिकेत हिंदीलाही अधिकृत भाषा मिळावी यासारखी त्यांची मागणी याची मराठींना धास्ती वाटत आहे.

भारत जोडायचा की तोडायचा असे आता आपणच ठरवायलाच हवे.

हे कोणी ठरवायचे? ज्या गावी आपण राहतो, कमावतो तेथिल स्थानिकांशी मिळून-मिसळून वागायचे की दंडेलीने यावर सर्व काही अवलंबून आहे. महाराष्ट्रातील गावागावात किराण्याचा व्यवसाय करणारा मारवाडी समाज स्थानिकांमध्ये कसा मिसळून गेला आहे हे मी तुम्हास सांगण्याची गरज नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

राज आणि राजकारण

जर आपण राजची भाषणे लक्षपूर्वक ऐकली, त्याच्या मुलाखती, पत्रकार परिषदा यातील त्याचे विचार समजावून घेतले, तर असे कळून येईल की राज जे करतो आहे ते, तीन-चार वर्षांनी येणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करीत नसून, समाजकारण करीत आहे. तो जे करतो आहे ती समाजसेवा आहे.
हिंदी-इंग्रजी प्रसारमाध्यमातून मिळणार्‍या बातम्या शंभर टक्के खोट्या आहेत. मुंबईत किवा इतरत्र कोठीही अशांत परिस्थिती नाही. अमिताभ बच्चनच्या घरावर खडासुद्धा फेकला गेलेला नाही. अर्थात प्रचंड जनसमुदायाने हल्ला केला ही धादान्त खोटी बातमी. उत्तरी भारतीयांना (धुणी वाळत घालण्यासाठी ?) काठ्या वाटल्या तर राज मराठी माणसांच्या स्वरंक्षणासाठी तलवारी वाटेल, यात काय गैर आहे? अबू आझमी जर मराठी लोकांना मारण्यासाठी उत्तरेतून ३५ हजाराची कुमक मागवणार असेल, तर राज सरहद्दीवरच त्यांना अडवण्याची भाषा करतो, यात काही चूक आहे?
उत्तरी भारतीय महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन साजरा करतात, तसा तो त्यांच्या प्रांतात करतात? मुळीच नाही. असा दिन ते साजरा करत नाहीत हे सत्य आहे. मग हे मुंबईतच का? 'यूपी लखनौ झांकी है, महाराष्ट्र अब बाकी है" या घोषणेचा अर्थ काय? राजने छटपूजेला विरोध केलेला नाही, केला आहे तो त्या निमित्ताने माजणार्‍या राजकारणाला. मुंबई महापालिकेत कामकाज हिंदीत चालले पाहिजे, आणि त्यासाठी पालिकेची घटनादुरुस्ती करावी, ही मागणी देशद्रोही नव्हे? महाराष्ट्रात येणार्‍या सर्व परप्रांतीयांना काही वर्षांनी मराठी भाषा समजते, ते ती शिकतात, बोलतात आणि काही लिहितातसुद्धा. हे हिंदीभाषक का करत नाहीत. त्यांच्या मते मराठी ही मोलकरणींची भाषा आहे. ती बोलली तर आपल्याला लोक हलके समजतील. राज जे करतो आहे ते राजकारण नाही, समाजकारण आहे हे नक्की. त्यामुळेच उद्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजचेच विचार अमलात आणले, तर आश्चर्य नाही!--वाचक्‍नवी

बरेचसे मुद्दे मान्य परंतु...

तुमचे बरचेसे मुद्दे हे नक्कीच विचारकरण्यासारखे आहे तरीही, राज हा तरुण आणि उमदा नेता आहे. त्याने बरोबरी म्हणून कायदा हातात घेणे हे निश्चितच आक्षेर्पाह आहे.

राज यांनी जास्त व्यापक विचार करायला हवा आणि प्रांतवादी नेता होण्याऐवजी भारताच्या दृष्टीने विचार करायला हवा. त्यासाठी एखादे इतर नेत्याप्रमाणे आपले वर्तमान पत्र काढायला हवे.

अबु / अमरसिंगाची बरोबरी करुन तो स्वताचे अवमुल्यन करत आहे असे मला वाटते.

उत्तरी भारतीयांचे स्थलांतर

उत्तरी भारतीय स्थलांतर करताहेत. ठीक आहे. का माहीत आहे? लालूप्रसादने धमकी दिली आहे की आम्ही २५ पेब्रुवारीला महाराष्ट्रात ठिकठिकाणी छटपूजा करू. ही पूजा अडवण्याची धमक महाराष्ट्र सरकारमध्ये आहे? आणि सामान्य मराठी जनतेमध्ये? साहजिकच मराठी माणसे चिडली आणि त्यांनी ठरवले की त्या तारखेअगोदर सर्व बिहारींना हाकलून द्यायचे. काही चूक? न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी.
(न रहेगा बिहारी, न होगी छटपूजा.)म्हणजे, सांप भी मरे और लकडी भी न टूटे. छटपूजेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर ज्या दंगली झाल्या असत्या त्या टळल्या. --वाचक्‍नवी

राजचे पत्र

सुधींद्र कुलकर्णी यांच्या पत्राला राजने दिलेले उत्तर.

-- आजानुकर्ण

आवडले.

राजचे पत्र आणि प्रत्येक मुद्दा आवडला.

राजने स्वतसाठी महाराष्ट्र हीच भूमी ठेवावी हे मात्र पटत नाही. राजची जाणीव प्रगल्भ आहे, तो बराचसा बदलण्याचाही प्रयत्न करत आहे. आजच्या तरुण नेत्यांमध्ये ( सुप्रिया सुळे, राहुल, उद्धव) सर्वात चांगले भवितव्य राजला असावे, परंतु त्याने कायदा हातात घ्यायला नको आणि विनाकारणच सामान्य नेत्यांबरोबर स्वताची तुलना करायला नको.

राजबद्दल च्या चर्चेसाठी वेगळा दुवा सुरु करायला हवा.

पत्र

पत्रातील खालील मुद्दे पटले नाहीत.
१. स्वातंत्र्यलढ्यात हिंसाचार, जाळपोळ झाली म्हणून ती आत्ताही होऊ शकते हे समर्थन.
२. रथ यात्रा, गोधराकांड निंदनीय होते, त्यांचा उल्लेख समर्थन होऊ शकत नाही. दीवारमध्ये शशीकपूर म्हणतो त्याप्रमाणे दूसरों के पाप गिनाने से तुम्हारे अपने पाप कम नही हो जाते. असे झाल्यास भारतातील सर्व प्रांत पेटून उठतील.
३. मला प्रसिद्धीत रस नाही. (हे वाक्य सर्व देशातील सर्व राजकारणी कधी ना कधी म्हणतात. ते विशेष गंभीरपणे घ्यायचे नसते.)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

समर्थन?

राजने हिंसाचार, जाळपोळ याचे कधी समर्थन केले? राजचे पत्र नीट वाचावे. राजचा एकही मुद्दा अजून एकाही राजकारण्याला किंवा पत्रकाराला खोडता आलेला नाही. राजला प्रसिद्धीत रस असल्याचे सिद्ध करणे अवघड आहे. त्याला प्रसिद्धी दिली अमरसिंग, अबू आझमी आणि जया बच्चन सारख्यांनी. जया बच्चन म्हणाली .'मी राजला ओळ्खत नाही, पण त्याच्याकडे खूप जमीन आहे ती त्याने मला द्यावी'. यात प्रसिद्धी कुणाची झाली, राजची की त्याच्या जमिनीची? हिंदी-इंग्रजी वृत्त- माध्यमांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या नसत्या तर, राजला भारतभर प्रसिद्धी मिळालीच नसती.
आता सर्वोच्च न्यायालय म्हणते आहे की भूमिपुत्र नावाची काही संकल्पनाच नाही. यात सर्वोच्च न्यायालयाची काही चूक नसावी. शेतकर्‍याला, वनवासी-आदिवासींना, मुंबईत आगरी-कोळ्यांना मराठीत भूमिपुत्र म्हणतात, हे न्यायालयाच्या लक्षात कुणी आणूनच दिले नसेल. फक्त 'गंगा छोरेवाला' भूमिपुत्र आणि सारे मराठी, असल्यांचे दास? हिंदी चित्रपटात मोलकरणी एकजात मराठी दाखवतात. अशा चित्रपटांना महाराष्ट्रात प्रदर्शित करायला इथल्या सेन्सॉरने बंदी करायला हवी. ज्या भाषेचे इतर, तीच भाषा बोलणारी मोलकरीण दाखवता येणार नाही?--वाचक्‍नवी

समर्थन

राजने हिंसाचार, जाळपोळ याचे कधी समर्थन केले?
Do political movements need to obey the law? Political history learnt by me tells me that breaking the law, getting arrested, braving lathis and getting jailed are symbols of a principled agitation.
Now, the violence.
Isn't the outbreak of spontaneous outrage in a people's movement understood? Can anyone avoid the violence or damage to property even if it does not bring happiness? Wasn't Gandhiji forced to withdraw his agitation when a chowkie was burnt at Chauri Chaura?
Besides, even after all this, was the violence and damage to public property avoided in the 1942 agitation? When people become furious, their response is the same, whether it is the Congress or the African National Congress.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

समर्थ म्हणजे पाठिंबा

एखाद्या चित्रपटाच्या जाहिरातफलकावरून लोकांनी दंगल केली तर तो फलक दंगलीचे समर्थन करतो असे म्हणता येत नाही, तसेच लोकांच्या काही अनपेक्षित प्रतिक्रिया दिसल्या, यावरून राजने दंगलीला प्रोत्साहन दिले असे म्हणता येत नाही. पुण्याचे पोलीस आयुक्त-उमराणीकर- मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सच्या सभेत, मनोहर धारिया यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हणतात, "पुणे अशांत असल्याचे वृत्तपत्रांनी केलेले वर्णन अतिरंजित आहे. थोडीफार दगडफेक झाली असली , तरी लोकांची डोके फुटली व रक्तपात झाला असे काहीही घडलेले नाही." --वाचक्‍नवी

असं आहे

जेव्हा आपण सार्वजनिक विधान करतो तेव्हा त्यामुळे होणार्‍या परीणामांची जबाबदारीही आपलीच असते. असे नसते तर नाशिकमध्ये मराठी कामगाराच्या मृत्यूबद्दल माफीनामा काढण्याची गरज नव्हती. तसेच, माझ्या आधीच्या प्रतिसादांमधील वाक्यांमध्ये कायदा तोडण्याचे समर्थन स्पष्ट दिसत आहे. याहून सबळ पुरावा देणे शक्य नाही आणि जरी दिला तरी त्याचा उपयोग होईल असे दिसत नाही.

दुसरा मुद्दा. अशा प्रकारच्या चर्चांमध्ये भाग घेण्यार्‍यांचे वेगवेगळे हेतू असतात. काही (अल्पसंख्यांक) लोकांचा खरोखर चर्चा करण्याचा उद्देश असतो. काही लोकांना चर्चा सुरू करून नंतर मजा बघायला आवडते. काही लोकांना वाद घातल्याशिवाय शांत झोप येत नाही. आत्तापर्यंतचा अनुभव असा की अशा चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही. सबब, माझ्याकडून ही आणि अशाच इतर चर्चा संपलेल्या आहेत. यापेक्षा वेळ घालवण्यासाठी नक्कीच चांगले पर्याय आहेत.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

महाराष्ट्र हीच भूमी?

राजने महाराष्ट्र हीच भूमी का नाही ठेवू? बाळ ठाकरेंनी, शरद पवारांनी अजून महाराष्ट्र हीच भूमी ठेवली आहे, लालूने बिहार,अमरसिंग, अमिताभ बच्चनने उत्तर प्रदेश वगैरे वगैरे. इथे तर पक्षाचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. नावातसुद्धा महाराष्ट्र. तेलुगू देसमला कुणी सांगेल का की आपल्या पक्षाचे कार्यक्षेत्र काश्मीरपर्यंत वाढवा म्हणून? मग राजलाच हा सल्ला का?--वाचक्‍नवी

क्षमता जास्त आहे म्हणून...

राजची क्षमता जास्त आहे म्हणून त्याने राष्ट्रीय विचार करावा. मला एक सांगा आजच्या ४० च्या आतच्या नेत्यांमध्ये मुल्यांकन केले तर राज कोठे असेल?

निकष खालील प्रमाणे,

विकासाच्या कामाबद्दल अग्रक्रम,
जनाधार,
मुद्दा ऐरणीवर घेण्याची क्षमता,
आर्थिक क्षमता,
आपल्या चुका सुधारत जाण्याची वृती,
विचाराची स्पष्टता,
सगळे अग्रक्रम बदलवण्याची क्षमता.

अजून काही तुम्ही जोडा आणि सांगा राज ने र्‍ह्स्वदृष्टी असायला हवे की दिर्घदृष्टी?

रा.सु. गवई आणि राजचे उत्तर

माझे आंदोलन कशासाठी हे देशाला कळले - राज ठाकरे

मुंबई, ता. २२ - महाराष्ट्राच्या संस्कृतिरक्षणासाठी मला आंदोलन का करावे लागले, या प्रश्‍नाचे उत्तर बिहारच्या आमदारांनी राज्यपाल रा. सू. गवई यांच्यासमोर विधानसभेत बिभत्स तमाशा करून संपूर्ण देशाला दिले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. .......
बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला झालेल्या राज्यपाल रा. सू. गवई यांनी त्यांच्या अभिभाषणात "मनसे'च्या आंदोलनाचा उल्लेख केला नाही म्हणून राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी सभागृहात जोरदार गोंधळ घालत राज्यपालांना परत पाठविण्याची मागणी केली. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्राने नेहमीच मतभेद असलेल्या मुद्द्यांवर त्या-त्या राज्यांशी आदराचा व्यवहार केला आहे. अन्य राज्यांतून आलेल्या राज्यपालांबाबत सर्व घटनात्मक आणि मानवी मर्यादांचे पालन करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. कर्नाटकसोबत महाराष्ट्राचे वर्षानुवर्षे सीमाप्रश्‍नी तीव्र मतभेद आहेत. त्यासाठी झालेल्या आंदोलनात मराठी तरुणांचे बळी गेले आहेत. कर्नाटकाचे नेते असताना एस. एम. कृष्णा यांनीही महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. मात्र तरीही ते राज्याचे राज्यपाल म्हणून येथे आल्यावर घटनात्मक मर्यादांचे पालन करीत महाराष्ट्राने त्यांना अतिथ्यशीलपणे स्वीकारले आहे, अशी आठवण राज ठाकरे यांनी करून दिली आहे.

महाराष्ट्राच्या सहिष्णू व सौजन्यशील संस्कृतीवर या बिहारी-उत्तर प्रदेशीयांची सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि वर्चस्ववाद नको, असे आपण का म्हणतोय हे आता सर्वांच्याच लक्षात आले असावे, असेही राज यांनी म्हटले आहे.

बिहारचे राज्यपाल रा. सू. गवई केवळ मराठी आहेत म्हणून त्यांना "परत जा' सांगण्यापर्यंत त्या राज्यातील आमदारांची मजल गेली आहे. देशप्रेम आणि संघराज्याचे संविधान या बाबींची हिंदी-इंग्रजी वाहिन्यांनी बिहारच्या लोकनियुक्त प्रतिनिधींना जाणीव करून द्यावी, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

हेही वाचा

हेही वाचा आणि त्याअगोदर हे.--वाचक्‍नवी

ते पलायन नव्हतेच... यूपीवाले परततील!

ते पलायन नव्हतेच... यूपीवाले परततील!
5 Mar 2008, 0134 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
- म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला घाबरून हजारो उत्तर भारतीय आणि बिहारींनी आपापल्या राज्यात पलायन केले या बातमीत कोणतेही तथ्य नाही. आता मनात कोणतीही भीती न बाळगता होळीनंतर सारे लोक मुंबई आणि महाराष्ट्रात परतततील', अशी माहिती समाजवादी पक्षाचे लोकसभेतील उपनेते खासदार मोहनसिंग यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

' एकतर गेल्या महिन्याभरात उत्तरेत अनेक विवाह सोहळे होते, याखेरीज उत्तरेतले लोक कुठेही वास्तव्याला असले तरी होळीच्या सणासाठी गावाकडे परततात, दरवषीर्च हे घडते. यंदा महाराष्ट्रात परप्रांतियाविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनामुळे सुटीसाठी ते थोडे लवकर आले इतकेच' असे मोहनसिंग म्हणाले.

' गृहमंत्री शिवराज पाटलांनी लोकसभेत केलेले निवेदन संतुलित आणि साऱ्या देशाचे समाधान करणारे होते. आसाममध्ये बिहारी आणि उत्तर भारतीयांचे ज्याप्रमाणे हत्याकांड झाले तसे महाराष्ट्रात काही घडले नव्हते. प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाला जी गैरवाजवी आणि अवास्तव प्रसिद्धी दिली त्यामुळे काही काळ पूर्व उत्तरप्रदेशात बेचैनी वाढली अनेकांना मानसिक धक्काही बसला; पण तथापि गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतर परस्पर सौहार्दावरचे मळभ आता त्वरेने दूर होईल.

ते म्हणाले : महाराष्ट्र भारताचा आत्मा आहे आणि उत्तरप्रदेशशी त्याचे जुने नाते आहे. उत्तरप्रदेश विधानसभेचे पहिले अध्यक्ष आत्माराम गोविंद खेर महाराष्ट्रातले होते. संसदीय लोकशाहीचे संस्कार त्यांनीच प्रथम उत्तरप्रदेशात रूजवले. स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीचे नेते बाबा राघवदास महाराष्ट्रातल्या कराडचे होते पूर्व उत्तरप्रदेशने त्यांच्यावर इतके उदंड प्रेम केले की आचार्य नरेंद देवांचा पराभव करून ते या भागातून निवडून आले होते. मधुकर दिघेंनी एकेकाळी उत्तरप्रदेशचे अर्थमंत्रीपद भूषवले. मधु लिमये, मधु दंडवतेंनी तर अनेक वषेर् आमचे नेतृत्व केले. नव्या पिढीला दुदेर्वाने या इतिहासाची कल्पना नाही.

.....

हा विषय संपला!

गृहमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान व्यक्त करीत शिवसेनेचे अनंत गीते म्हणाले, विनाकारणच या विषयाला महत्व प्राप्त झाले होते. गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतर संसदेपुरता हा विषय संपला.

 
^ वर