मायक्रोसॉफ्ट याहू विकत घेणार?

आत्ताच बातमी वाचली की मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्यासाठी ४४ बिलियन डॉलरची ऑफर दिली आहे. हे प्रत्यक्षात उतरल्यास आंतरजालामध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे. तसेच गूगलला टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टला असे पाऊल उचलण्याची गरज आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

Comments

हं

आता खरी मजा येईल :).. (तस मधे रीबॉक-नायके-अडिडास सारखं झालं #१ च्या विरुद्ध २+३ :) )

बाकी आज इथे बाजारात गूगल (-८.५८%) आणि मायक्रोसॉफ्ट(-६.६०%) खाली गेला आणि याहु चांगलाच वधारला.(+४७.९८%)! यात मायक्रोसॉफ्ट खाली गेला पण पार आपटला कसा नाहि याचं मात्र आश्चर्य वाटलं (त्यांबनी याहुला ४१ म्हणजे सरळ २००% जास्त भाव दिला :) )

-ऋषिकेश

सर्किट

एका दिवसात ४८ टक्के वधारला?
तिकडे अप्पर सर्किट वगैरे नसतं का?

(मुन्नाभाई) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण

३१/४१

३१ रिजेक्ट केला असं ऐकलं. म्हणून ४१ बिड केलं असहि ऐकलं.. असो.. बातमी शोधून वेरिफाय करतो

-ऋषिकेश

किंमत / %

ऋषीकेश % बघत आहे आणि तुम्ही किंमत बघत आहात. मार्केट थांबलं तेव्हा याहू चा शेअर 47.81% दाखवत आहे.

मी चुकलो

कोलबेरराव,

४१$च म्हणत होतो ....सर्कीटरावांचं बरोबर आहेत. मी एका मित्राकडून मिळालेल्या ऐकीव न्यूजवर$३१ चं ४१ झालं असं धरून चाललो होतो.. ३१चं आहे :)
असो. तरीहि माझी चुक झाली नाहि हे गृहित धरल्याबद्दल आभार ;) (स्वगतः काय कॉफिडन्स आहे आपल्यावर लोकांचा ;) )

-ऋषिकेश

इकॉनॉमिक टाइम्स

मध्ये नमूद केलेली किंमत = $४४.६ बिलिअन

हम्म

आता याहूचे उत्तर काय आहे त्यावर बरेच अवलंबून आहे. मायक्रोसॉफ्टचे डेस्परेशन (अगतिकता?) यावरून दिसून येते. शोधयंत्रामध्ये गूगलनंतर याहूचा क्रमांक येतो (विंडोज लाइव्हचा कितवा क्रमांक आहे ठाउक नाही, पण बराच खाली असावा). शोधयंत्र, आंतरजालावरील जाहिराती यासाठी मायक्रोसॉफ्टला या मर्जरची गरज आहे. कदाचित म्हणूनच स्टीव्ह बामर यांनी आपण नकार घेणार नाही असे म्हटले आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये गूगलचा अजून विशेष दबदबा नाही, इथे याहूच्या मदतीने मायक्रोसॉफ्टला मुसंडी मारता येईल. हे डील झाल्यास आत्तापर्यंतचे मायक्रोसॉफ्टचे सर्वात महाग डील असेल.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

 
^ वर