श्रद्धेचे मार्केटिंग

आत्ताच एक सकाळमध्ये बातमी वाचली - नवीन गाडी घेतल्यानंतर देवळात जाण्याचीही गरज नाही, दिल्लीतील लोकांनी खास उपाय शोधून काढला आहे. शिवाय रोजगार निर्मितीचा होणार! आपल्याला काय वाटते?

शोरूममधून जेव्हा ऐकू येतं मंत्रोच्चारण!

नवी दिल्ली, ता. २२ - अखेर गाडी घेतली... एक स्वप्न पूर्ण झालं. आता शोरूममधून थेट मंदिरात जायचं आणि पूजा करूनच गाडी घरी न्यायची... "यजमान, करायची ना सुरवात?' या प्रश्‍नानं मनातले विचार थांबतात. वळून पाहावं, तर साक्षात भटजीबुवाच समोर उभे... पूजेच्या साहित्यासह!
हे सगळं खरं की स्वप्न..? रमण गुप्ता विचार करू लागला. राजधानी दिल्लीतल्या एका आघाडीच्या आय.टी. कंपनीतला हा मॅनेजर. गाडी घ्यायची, हे चारचौघांसारखंच त्याचं स्वप्न. वृत्तीनंही चारचौघांसारखाच धार्मिक. कोणत्याही कामाचा श्रीगणेशा पूजेनेच करणारा. "मारुती'साठी पैशांची जुळणी करून शोरूममध्ये गेला आणि चाव्या ताब्यात घेताच त्याला परमानंद झाला. शोरूमपासून जवळच मारुतीचं मंदिर. तिथं पूजा उरकून घरी जावं, हा विचार सुरू असतानाच भटजीबुवा सामोरे आले. म्हणाले, ""मी पंडित राधामोहन त्यागी. गाडी खरेदी केल्यानंतर करायच्या धार्मिक विधींसाठी शोरूमच्या मॅनेजरनं माझी खास नेमणूक केलीय. तुम्हाला सुविधा देण्यासाठीच आम्ही आहोत. सर, काही चिंता करू नका. तुमच्या भावनांची मला जाणीव आहे...''

अवघ्या पंधरा मिनिटांत भटजीबुवांनी गाडीची साग्रसंगीत पूजा केली. नारळ फोडला; गंधाने गाडीवर स्वस्तिकाचं शुभचिन्ह रेखाटलं; आरतीही केली. रमणच्या बरोबर पत्नी सीमाही होती. या अनोख्या "सर्व्हिस'मुळं ती भारावली. ""कंपनीनं विनामोबदला दिलेली सेवा म्हणजे सुखद धक्काच आहे,'' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आणि पती- पत्नी गाडी घेऊन रवाना झाले.

दिल्लीतल्या अनेक शोरूममध्ये आता हे चित्र दिसू लागलंय. गाडीबरोबर अनेक गोष्टी "फ्री' देण्याची स्पर्धा आता नव्या वळणावर आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं नव्या किमती वस्तूची पूजा केली, की खरेदी करणाऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसतं, ही बाब डीलर मंडळींनी अचूक हेरली आहे. घरोघर जाऊन पूजा करणाऱ्या पुरोहित मंडळींनाही एकाच जागी काम मिळालं आहे. याखेरीज, गणपतीबाप्पा आणि इतर देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा "डॅशबोर्ड'वर स्थापित करून "शुभचिन्हासोबत सुखाचा प्रवास करा,' असे "साइनबोर्ड'ही शोरूममालक झळकवू लागले आहेत. दर वर्षी १५ टक्‍क्‍यांनी वृद्धिंगत होत असलेल्या भारतीय मोटार बाजारातील हालचाल वाढल्याचं आता पुरोहितांनाही दिसू लागलंय. कृष्णमूर्ती झा हे पुरोहित म्हणतात, ""लोकांचं उत्पन्न वाढलंय आणि खर्चही. गाड्या खरेदी करण्याकडे असलेला लोकांचा ओढा पाहता, आगामी काळात आमच्यासारख्या अनेक पुरोहितांना शोरूममध्ये काम मिळेल, अशी चिन्हं आहेत. हल्ली ग्राहकाला एकाच ठिकाणी अनेक सेवा हव्या असतात. त्यामुळं आम्हाला काम मिळतंय, हे शुभलक्षणच!''
मूळ बातमी येथे वाचायला मिळेल. : http://www.esakal.com/esakal/01232008/Specialnews9AFECC3AD4.htm

Comments

हं

श्रद्धेचे मार्केटिंग का व्हॅल्यू ऍडेड सर्व्हीस, गोइंग एक्स्ट्रा माइल म्हणायचे. :-)

ठीक आहे.

खुलासा

गोइंग एक्स्ट्रा माइल हे ठीक आहे, पण ते वेगळ्या तर्‍हेने करता येऊ शकते. - खाली सुनील यांना दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे.

एक प्रसंग

माझ्या या वर्गमित्राने पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा व्यवसाय पुण्यात चालू केल्यावर नवीन कार घेतली. त्याची पुजा झाली. नारळ माझ्या हस्ते फोडून पेढे वाटले. तेव्हा तो म्हणाला," नारळ फोडताना तुला अंनिसतील कोणी बघितलं असतं तर?"
मी खोखो हसलो.
प्रकाश घाटपांडे

धनदा

धनदा धंदा वाचले. (जो त्याचा उगम आहे.)

अवांतर - धनदा धन देणारे तर जर्दा म्हणजे?

जरदा

धनदा धन देणारे तर जर्दा म्हणजे?

जर+दा = म्हातारपण देणारे ऽऽऽ
(व्युत्पत्तिकार)
प्रकाश घाटपांडे

जर्दा

धनदा धन देणारे तर जर्दा म्हणजे तंबाखू

(तर्कशुद्ध) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण

ज़र्दा

ज़र्दा म्हणजे ज़रा ( तंबाखू ) द्या म्हणणारे?--वाचक्‍नवी

नारळ फोडताना तुला अंनिसतील कोणी बघितलं असतं तर?"

अगदी बरोबर प्रतिक्रिया तुम्ही दिली, कारण अनीस आता महाराष्ट्र सरकारच्या मदतीने अंध(श्रद्धा) निर्मुलानाचा कायदा करत आहे त्या वेळी आपण तर घरात देपुजाही करू शकत नाही, या बद्दल माझ्या मित्राने मला एका संकेत स्थलाची लिंक पाठवली ती मी तुम्हाला पाठवतो अवश्य पहा.

http://www.hindujagruti.org/activities/campaigns/religious/anti-faith-bill/

गणेश

चांगली माहिती

प्रथम हिंदू जनजागृति समिती या संस्थेचे या कारणासाठी अभिनंदन की त्यांनी या प्रस्तावित कायद्याचा पूर्ण मसुदा उपलब्ध करून दिला आहे. पण त्यांचा रोष का झाला हे तो मसुदा वाचून मुळीच कळत नाही. मग लक्षात आले की मसुद्यावर त्यांनी एक प्रास्ताविक टीप दिली आहे :

Note: This bill is drafted very smartly, so that common man does not understand the hidden motive of the law. So please do refer analysis by experts.
(माझा स्वैर अनुवाद) टीप : हे विधेयक मोठ्या हुशारीने रचले गेले आहे, जेणेकरून सामान्य माणसाला या कायद्यामागचा छुपा हेतू समजत नाही. म्हणून कृपया तज्ज्ञांच्या विश्लेषणाचा संदर्भ घ्यावा.

आता तज्ञांच्या विश्लेषणाचे एक उदाहरण घेऊ. हे उदाहरण घेतले, कारण हे वरील प्रतिसादात दिलेल्या धोक्याच्या इशार्‍याच्या मुळाशी जाते.
मूळ विधेयकाच्या मसुद्यात दिसते :
13. For the removal of doubt, it is hereby declared that nothing in this Act, shall apply to the acts involving religious rites and rituals which does not adversely affect any person mentally, physically or financially.
(माझा स्वैर अनुवाद) कलम १३: शंकेचे निरसन करण्यासाठी, येथे प्रतिपादन केले जाते, की या कायद्यातील काहीही अशा कृतींना लागू नाही की ज्या धार्मिक विधी किंवा कार्यांशी संबंधित आहेत, आणि ज्यांनी कोणाही व्यक्तीस मानसिक, शारिरिक, किंवा आर्थिक गैर परिणाम होत नाही.

आता मला वाटते, की या प्रतिपादनाने कायद्याच्या सीमा निश्चित व्हाव्या, आणि "घरात देवपूजा करू शकणार नाही" अशी शंका नाहिशी व्हावी. परंतु या बाबतीत तज्ज्ञ काय म्हणतात ते बघूया.
हिं.ज.स. च्या तज्ञांचे मत :
Section 13: Observation: One has to take physical or psychological efforts or monetary harm when one performs any act. Religious acts of pooja, ritualistic worship, Religious discourses or any other religious act cannot be an exception to this universal rule. Thus, to phrase this law in a different way to reassure the public is a cruel prank. It proves that this Law is fact applicable to “religious” activities. The Constitution has given Indian Citizens right to religious freedom. This Black Law denies that right.
(माझा स्वैर अनुवाद) कलम १३: नमूद निरीक्षण : कोणासही कोणतेही कार्य करण्यास शारिरिक किंवा मानसशास्त्रीय यत्न लागतात आणि आर्थिक हानी पोचते. या वैश्विक नियमाला धार्मिक कार्ये पूजा, अर्चेचे विधी, प्रवचने, किंवा अन्य धार्मिक कार्ये अपवाद असू शकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या प्रकारे या कायद्याचे शब्दांकन करून लोकांना शांतवणे म्हणजे एक क्रूर खोडी होय. यामुळे सिद्ध होते हा कायदा खरोखर "धार्मिक" विधींना लागू आहे. घटनेने भारताच्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. हा काळा कायदा हा हक्क नकारतो.

या तज्ज्ञांचे कौतुक वाटते. प्रत्येक कार्याने यत्न वा हानी होते, हा वैश्विक नियम आहे, त्यामुळे हे सिद्ध होते की हा कायदा धार्मिक कार्यांविरोधी आहे! पण "शारिरिक, मानसिक आणि आर्थिक गैर परिणाम" होण्याविरुद्ध कित्येक कायदे आहेत. या वैश्विक नियमाने ते सगळेच कायदे धार्मिक कार्यांच्या विरोधी होतील.

माझे मत असे की सर्व कार्यांनी आर्थिक हानी होते हे तज्ञांचे म्हणणे म्हणजे "हानी" शब्दाचा सर्वसामान्य अर्थ नव्हे. शिवाय शारिरिक आणि मानसिक यत्न म्हणजे कायदा म्हणतो तसे गैर परिणाम नव्हेत, तज्ञांचे तसे म्हणणे, आणि तो वैश्विक नियम मानणे सामान्य शब्दप्रयोगांना धरून नव्हे. शिवाय मूळ मसुद्यात धार्मिक विधी आणि कार्यांशी संबंध नाही हे स्पष्ट म्हटले असता, तसा संबंध लागतोच म्हणणे विसंगत आहे. उलट कुठल्यातरी वैश्विक नियमाप्रमाणे धार्मिक विधी हानी करतात, असे काही विचित्र म्हणून हे तज्ज्ञ स्वतःचे हसे करून घेत आहेत. (आता हेही खरे की कोणी या तज्ज्ञांचे लिखाण वाचले तर हसे होईल. केवळ हिं.ज.स. च्या संकेतस्थळाचे मुखपृष्ठच वाचले तर गणेशरावांना दुवा धाडणार्‍या मित्रासारखेच "आपले देवघर धोक्यात आले", असे लोक मानतील.)

या तज्ज्ञांचे म्हणणे मला मुळीच पटले नाही. पण हिं.ज.स. यांचे हे चांगले की त्यांनी विधेयकाचा मूळ मसुदा दिला आहे. जिज्ञासूंनी तज्ञांचे बाकी सर्व मुद्दे तपासून बघावेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

काय हरकत आहे ?

जर ही पुरोहित सेवा फुकट आणि वैकल्पिक असेल तर त्याला नाके मुरडण्याचे काय कारण? ज्याला हवी तो ती घेईल आणि ज्याला नको जाईल उडत (चालवत !).

मार्केटिंग

ज्याला हवी तो ती घेईल आणि ज्याला नको जाईल उडत (चालवत !).

तो श्रद्धाळू नव्हेच. तो पुजा झाल्याशिवाय चालवत जातच नाही. श्रद्धा, स्वप्ने, असुरक्षीततेचे भय, या गोष्टींचे मार्केटींग हे आपापल्या क्षेत्रात प्रत्येक काळात झालेले आहे. लोकांच्याच गरजेतुन हे निर्माण होते. पण यातुन पुढे त्याचे शोषण होते. पण आपले शोषण होते हे त्याला मान्य नसते.

प्रकाश घाटपांडे

नुसते ते कारण नव्हे

तुमचे म्हणणे तत्त्वत: ठीकच आहे, आणि मला लोकांच्या भावना चुकीच्या आहेत असे म्हणायचे नाही. चांगल्या गोष्टी होताना आपल्यामागे आशीर्वाद/शुभेच्छा असाव्यात असे वाटणे हे नैसर्गिक आहे. पण गिर्‍हाइकांची खरेच एवढी काळजी असली तर या मार्केटिंग करणार्‍यांच्या डोक्यात गाडीची काळजी कशी घ्यावी, किंवा दारू पिऊन गाडी चालवू नये, बेल्ट लावून बसण्याचे फायदे इत्यादी गोष्टींवरून एक १५ मिनिटांचे प्रेझेंटेशन करावे अशी कल्पना का येत नाही?

वरील गोष्टीवरून मार्केटिंग करणारे लोकांना सोप्या आणि भावना गोंजारतील अशा गोष्टी देतात हे सिद्ध होते.

प्रेझेंटेशन


पण गिर्‍हाइकांची खरेच एवढी काळजी असली तर या मार्केटिंग करणार्‍यांच्या डोक्यात गाडीची काळजी कशी घ्यावी, किंवा दारू पिऊन गाडी चालवू नये, बेल्ट लावून बसण्याचे फायदे इत्यादी गोष्टींवरून एक १५ मिनिटांचे प्रेझेंटेशन करावे अशी कल्पना का येत नाही?


कैच्या कैच.. अहो असे सांगायला गेले तर लोकं म्हणातत आम्हाला हे माहित आहे. नसती अक्कल शिकवु नका. पण हेच जर त्या पुरोहितांनी पुजा करताना शेवटी सांगितले तर नक्कि परिणामकारक होइल. लहान मुलांपासुन ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या भावना गोंजारल्या की सुखद वाटते. त्यासाठी लोकं पैसाही मोजायला तयार असतात. २ लाखाची मारुती घेताना पुरोहिताच्या खर्चाचा विचार होत नाहीच हो. भारतात अजुनही गाडी चैनीची गोष्ट आहे.

अवांतरः जिथे एखादा गायक श्रेष्ठ ठरवण्यासाठी करोडो रुपयांचे एस एम एस पाठवले जातात (माझे काय ३ रुपयेच जातात या विचारने), तिथे स्वतःच्या हौसेसाठी आणि वेळ वाचवण्यासाठी या मार्केटिंगला बळी पडले तर जास्त आश्चर्य नाही वाटत.





शास्त्राधार

पण हेच जर त्या पुरोहितांनी पुजा करताना शेवटी सांगितले तर नक्कि परिणामकारक होइल. लहान मुलांपासुन ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या भावना गोंजारल्या की सुखद वाटते. त्यासाठी लोकं पैसाही मोजायला तयार असतात.

खर आहे. प्रदुषण टाळण्यासाठी "गणपती विसर्जन कसे करावे" " विसर्जित गणपती दान करा" असे अंनिसने जनतेला आवाहन केले होते. त्यावेळी दाते पंचांगाने शाडूची मुर्ती करुन विसर्जन करताना बादलीत करावे. निर्माल्य व तो विसर्जित गाळ हा झाडांना घालावा. असे धर्मातील 'शास्त्राधार 'देउन सांगितले होते त्याचा चांगला परिणाम झाला.

प्रकाश घाटपांडे

प्रदुषण, गणपती विसर्जन आणि अंनिस

प्रदुषण, गणपती विसर्जन आणि अंनिस हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. येथे जास्त लिहुन विषयांतर करत नाही. पण फक्त गणपती विसर्जनाने नद्यांचे प्रदुषण होते. ही अंनिसची सर्वात जास्त हास्यास्पद अंधश्रद्धा आहे. शोधले तर शस्त्राधार अनेक गोष्टींना मिळतील.





समांतर विषय

प्रदुषण, गणपती विसर्जन आणि अंनिस हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे

.
प्रदुषण, गणपती विसर्जन आणि अंनिस हा एक समांतर चर्चेचा विषय आहे.

पण फक्त गणपती विसर्जनाने नद्यांचे प्रदुषण होते. ही अंनिसची सर्वात जास्त हास्यास्पद अंधश्रद्धा आहे.

फक्त असे म्हणणेच नव्हते. अगोदरच एवढे प्रदुषण त्यात प्लास्टर ऑफ पॅरिस व विषारी रंगद्रव्यची भर कशाला? त्या ऐवजी सुपारी, शाडूची मुर्ती, धातुची मुर्ती असे पर्याय आहेत. दाते पंचांगाने व अंनिसने एकच सांगितले. पण दाते पंचांगाने शास्त्राधार देउन सांगितले व अंनिसने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आधार घेउन सांगितले एवढेच.आता तर हा विषय नगरपालिकांनीच व पर्यावरणवाद्यांनीच उचलून धरला आहे.

शोधले तर शस्त्राधार अनेक गोष्टींना मिळतील.

फेंग शुई प्रकरणात आम्ही हेच सांगितले आहे.

प्रकाश घाटपांडे

फक्त

अंनिस आजवर हेच सांगत आली आहे की नद्यांचे प्रदुषण टाळण्यासाठी गणपती विसर्जन करु नका.
३६५ दिवसांचा आणि भारतात जेवढे हिंदु आहेत तेवढे आणि त्यांच्यातले किती जण गणेशोत्सव साजरा करतात या सर्वांचा एकत्रीत विचार करा आणि सांगा कि प्रदुषण किती होते. अर्थात म्हणुन प्रदुषण कराच असे म्हणणे योग्य नाही. पण या प्रदुषणाचा विचार करताना औद्योगिक कचरा, नद्यांना लागुन असणार्‍या झोपड्या, तिथले गलिच्छ वातावरण, शहरे वसवताना सांडपाण्याच्या नियोजनाचा अभाव असे अनेक मुद्दे आहेत जे या अंधश्रद्धे पेक्षा भयाण आहेत.
भारतातल्या राजकिय नेत्यांवर त्यांच्या कार्यकर्त्यांची अंधश्रद्धा का दिसत नाही? ती सुद्धा अंधश्रद्धाच आहे ना? ताबुत विसर्जनाला गणेश विसर्जनाचे रुप देउन मिरवणुका काढताना होणारे ध्वनी प्रदुषण कुठे गेले? फक्त गणेश विसर्जनच कसे दिसते? मुर्ती विसर्जन तर दुरचीच गोष्ट आहे. विचारांची क्षमता असलेला सर्व सामान्य भारतीय जेंव्हा नदी प्रदुषित करतो (विसर्जना शिवाय इतर दिवशी) त्याचे काय? अनिंसला अंधश्रद्धा महत्वाची आहे की प्रदुषण की उथळ प्रसिद्धी या बद्दल अंनिसच संभ्रमित आहे असे वाटते.





बाजारात मोफत काही नसते!

पुरोहिताचा खर्च गाडीच्या किमतीतूनच येत असतो. (अगदी दुकानमालकाने घरून पैसे आणले, तरी गाड्या विकूनच दुकानमालकाच्या घरी पैसे गेले आहेत.)
सेवा पुरवण्यात काही वावगे नाही. पण शक्यतोवर त्या वैकल्पिक सेवेची किंमत वेगळी सांगावी. जर नारळ/फुलमाळेच्या बाजारभावापेक्षा अधिक खर्च पुरोहितावर, पुरवलेल्या पूजेवर होत असेल तर आपण बाजारातून पूजेची थाळी आणणे काही गिर्‍हाईक पसंत करतील. (कारच्या किमतीत अर्थात तितकी सूट द्यावी, हे ओघाने आलेच.)

वैकल्पिक... खरंय! +१

आपल्या प्रतिसादाशी आणि धनंजयरावांच्या प्रतिसादाशी सहमत.

....आणि - देव न करो, पण - अहिंदू गिर्‍हाइके जर गाडीची पूजा करवून घ्यायला लागली, तर त्यातून बाकी काही नाही तरी मारुतीचा अपमान होणार नाही काय?

यातील "देव न करो" मधील "देव" नक्की कुणाचा? :-)

--------------

हास्यास्पद

मनोरंजक बातमी. शिक्षणाने आणि पैशाने माणूस शहाणा होत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

५० पैशात कानावर जानवे अडकवून मिळेल अशी जाहिरात 'सुलभ' ने करायला हरकत नाही. ;)

नॉलेज कम्स फ्रॉम आऊटसाईड बट विज्डम कम्स फ्रॉम इनसाईड या वाक्याची आठवण झाली.

(अतिशहाणा) आजानुकर्ण

शोरूमपासून जवळच मारुतीचं मंदिर.

बाय द वे. 'मारुती' घेतल्यावर 'मारुतीचे' दर्शन ठीक आहे पण सँट्रो घेतल्यावर मारुतीकडे गेले तर चालेल का?

(संभ्रमित) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण

आम्ही हे असे आहोत :-)

किस्सा वाचला आणि आठवले :

हम लोगोंको समझ सको तो समझो दिलबर जानी
जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी ...
...फिर भी दिल है हिंदुस्तानी .

नवीन जगातील आयुष्य जगताना आपल्याला नव्या जगाची साधने, सुखसोयी हव्यात , पण दुसरीकडे आपल्या भोवतीची परंपरा, श्रद्धा, विश्वास यांची मिठी सुटत नाही. त्यातूनच मग नव्या गाडीची पूजा होते , अद्ययावत् नव्या गाडीचा आरशाला काळी भावली लावली जाते, कोट्यावधींच्या घराला लिंबाचे तोरण चढते, सधन घरांतून यज्ञयाग , "शांति" , "वास्तुशास्त्र" यांचे प्राबल्य दिसते. याला विसंगती म्हणावे की द्वि-खंडित व्यक्तित्वाचा नमुना म्हणावे असा प्रश्न कधीकधी पडतो. :-)

हैरानी

हम लोगोंको समझ सको तो समझो दिलबर जानी
जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी ...
...फिर भी दिल है हिंदुस्तानी .

अगदी!

बाकी कोणी स्वतःच्या घरात कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे समजते.

नक्कीच.

>>बाकी कोणी स्वतःच्या घरात कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे समजते.

अलबत् ! यात काय शंका ? कुणाच्या वैयक्तिक आणि सामूहिक श्रद्धांची सार्वभौमकता, त्याना आचरण्याचा मुलभूत हक्क याबाबत कसलेच दुमत नाही. माझा प्रतिसाद होता तुमच्या-आमच्या जगण्याबद्द्लच्या निरीक्षणांचा.

असेच राहणार

हम लोगोंको समझ सको तो समझो दिलबर जानी
जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी ...
...फिर भी दिल है हिंदुस्तानी

सुंदर ! मुक्तसुनीत खर आहे.

याला विसंगती म्हणावे की द्वि-खंडित व्यक्तित्वाचा नमुना म्हणावे असा प्रश्न कधीकधी पडतो. :-)

मला पण पडायचा. आता पडत नाही. जेव्हा एखादी गोष्ट दुस-यासमान नसते त्यावेळी ती सम नाही म्हणजेच विषम आहे हे वास्तव आहे. पण विषमतेला अन्याय, शोषण अशा अर्थाच्या छटा चिकटल्या असल्याने पुरोगामी लोकांना तो शब्द खटकतो.त्याच स्पष्टीकरण देणं अवघड जातं. मग अशी विषमता पचवायला अवघड गेली कि त्याला विविधता म्हणून मोकळ व्हायचं." विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" असे आपण प्रतिद्न्येत म्हणतो ते यासाठीच.(हॉ हॉ....) 'काळ-पांढरं' 'पाप-पुण्य' 'राम-रावण' 'चांगलं-वाइट' अशा रस्सी खेच करणा-या दोनच बाजूने न बघता विविधरंगी दृष्टीने पाहिले तर? एकाच व्यक्तीत अशी विविधता दडलेली आहे. http://mr.upakram.org/node/777 या मनोगतात मी तसे म्हटले होते.

प्रकाश घाटपांडे

त्यात नवल ते काय?

शाळेत असल्या पासून कंपासपेटीत 'मिनी देवघर' ठेवणार्‍या आमच्या वर्गमित्रांनी पुढे परिक्षेत आणि नोकर्‍या मिळवण्यात दैदिप्यमान यश मिळवलेले पाहिले आहे.. तेव्हा ह्यांनी गाड्या खरेदी केल्यावर आरशाला काळी भावली, आणि घरं खरेदी केल्यावर लिंबाचे तोरणा लावले तर त्यात नवल ते काय?

:)

मार्केटिंग तंत्र म्हणून ही युक्ती मला तरी प्रचंड आवडली! याशिवाय पुढिल आयडियाच्या कल्पना लढवता येतीलः
१. फेंगशुईवाला एखादा 'लकी' म्हातारा भेट मिळेल, ज्यामुळे अपघात कमी होतील.
२. वर्षभर मिरची-मिंबाचा फ्री सप्लाय.
३. सहा महिन्यात सर्विसिंगबरोबर कुलस्वामिनीला नारळ चढवण्याची सोय करण्यात येईल.
४. गायत्री मंत्राच्या सिडीज फ्री.
५. सिटबेल्टवर महामृत्युंजर मंत्र छापलेला असेल.

तुम्हाला काहि सुचतेय का?

-(मार्केटिंग चिफ)ऋषिकेश

मस्त!

२. वर्षभर मिरची-मिंबाचा फ्री सप्लाय.

५. सिटबेल्टवर महामृत्युंजर मंत्र छापलेला असेल.

हसून दमले:-)

लक्ष्मी यंत्र

सिटबेल्टवर महामृत्युंजर मंत्र छापलेला असेल.

पुण्यात अशी "लक्ष्मी यंत्रे "तांब्याच्या पत्र्यावर [२*३ इंच] अशी यंत्रे , भाकितासोबत फ्री. भविष्य चुकल्यास पैसे परत. ( पैसे परत करायची मागणी झाल्यास यंत्राची किंमत ५००/- ते १००/- वजा होतात. मग राहतात किती? कशाला कोण पैसे परत मागायला जातो? म्हणुन तर सकाळच्या पहिल्या पानावर जाहिरात परवडते.
प्रकाश घाटपांडे

ई-अभिषेक

सत्यसाईबाबावरील ई-अभिषेक बरोबर लोट्टो लॊटरी फ्री. ई अभिषेकाची फी १००१ रुपये.
(अल्पसंतुष्टी)
प्रकाश घाटपांडे

लॊटरी कुणाला?

ई-अभिषेक बरोबर लोट्टो लॊटरी फ्री. ई अभिषेकाची फी १००१ रुपये.

लॉटरी कुणाला - भक्ताला की ट्रस्टला? (कारण साईबाबा काहीच मागत नसतात!)

--------------

किंवा उलट

१००१ रुपयांच्या पावतीवर ई-अभिषेक फ्री. शिवाय त्यात लकी ड्रॉ.

लॉटरी कुणाला - भक्ताला की ट्रस्टला? (कारण साईबाबा काहीच मागत नसतात!)

अर्थात ट्र्स्ट ला.
अवांतर- अनिल अवचटांचे "धार्मिक" वाचल्यावर अनेक कल्पना सुचतील. उदा. मनोरुग्ण माणसाच्या हातवार्‍यातून मटकेबहाद्दर् आपल्याला हवे तसे आकडे काढतात. ते लागल्यावर (कुणालातरी लागणारच) त्याचे बाबात रुपांतर केले जाते. बाबा मात्र विदेही, निष्कांचन. [पहा "गुळाचा गणपती" चित्रपट- पुल]
अतिअवांतर- डाव्या बुटाबरोबर उजवा बुट फ्री. डाव्या बुटाची किंमत- ****/-
प्रकाश घाटपांडे

 
^ वर