संख्या शोधा

पुढील प्रत्येक संख्या तीन अंकी आहे. संख्येच्या प्रारंभी शून्य हा अंक नसतो.प्रत्येक संख्या पूर्णांकी आहे.
***

. शतकांकच सर्वात मोठा.प्रत्येक अंक मूळ संख्या.(प्राईम). संख्या तिच्या प्रत्येक अंकाने विभाज्य.
***
२. अंकयोग (अंकबेरीज) अठरा.मूळ अवयवांची संख्या तीन. त्यांची बेरीज एकशे तीन.(१०३)
***
३.एका मूळ संख्येची दुप्पट आणि दुसर्‍या एका मूळ संख्येची दुप्पट यांचा गुणाकार.मूळ अवयवांची बेरीज बत्तीस.अंकबेरीज एकोणवीस.(१९)
***
४. मूळ संख्या. सर्व अंक भिन्न.शतकांक एककांकाच्या दुप्पट.अंकयोग पूर्ण वर्ग.
***
५. सम संख्या. मूळ अवयवांची संख्या तीन. त्यांची बेरीज १८५.
***
६. ही संख्या तिच्या एककांकाच्या ९९ पट आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

व्यनि. उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वप्रथम श्री. वाचक्नवी यांनी सर्व सहाही संख्या अचूक शोधल्या. अभिनंदन!

व्य. नि. उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. मुक्तसुनीत यांनी सहा पैकी चार संख्या अचूक शोधल्या आहेत.उर्वरित दोन संख्याही त्यांना गवसतील.

आणखी एक उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अमित कुलकर्णी यांनी पाठविलेल्या उत्तरात सहा पैकी पाच संख्या बरोबर आहेत. उरलेली एक संख्या ते शोधतीलच.

संख्या शोधा: व्यनि.उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.महेश हतोळकर, श्री.सुनील तसेच श्री.धनंजय यांनी सर्व संख्यांची अचूक उत्तरे शोधली आहेत.

 
^ वर