लाखात एक
उपक्रमींनो,
आपल्यातल्या बर्याच जणांनी आजची सर्वात कौतुकाची बातमी पाहिली असेलच. टाटांनी खरोखरच दिली आहे लाखात एक गाडी. हि पहा काहि चित्रे.
एक लाखाची कार. आत रतन टाटा बसले आहेत. |
नॅनो - समोरुन अशी दिसते |
सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे हे स्वप्न सत्यात आणणारा एक मराठी चेहरा आहे. गिरिश वाघ.
आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे ते भारतीयांना भारतात तयार होणारे जागतिक दर्जाचे उत्पादन तयार केले आहे. त्यात मराठी माणसाचा वाटा हा शिरपेचातला मानाचा तुराच आहे.
म. टा. मधले वर्णन...
रतन टाटा यांनी चार वर्षांपूर्वी पाहिलं एक स्वप्न... लाखमोलाची कार बनविण्याचं... आज ते स्वप्न पूर्णत्वास आलं. किंबहुना आपल्या स्वप्नावर स्वार होऊनच रतन टाटा आज दिल्लीच्या प्रगती मैदानात अवतरले... ‘ नॅनो ’ नावाची आपली एक लाख रुपये किंमतीची सिल्वर रंगाची झगमगती ड्रिम कार ड्राइव करीत...
६२४ सीसीचे इंजिन, ३० लिटरचा पेट्रोल टँक, चार माणसांचं छोटं कुटुंब बसू शकेल एवढी जागा आणि प्रति लिटर २० किमीचा अॅवरेज, अशा सामान्य माणसासाठी हव्याहव्याशा वाटणा-या सोयीसवलतींसह टाटा मोटर्सचे चेअरमन रतन टाटा यांनी ही नवी कार आज जगापुढे आणली. विशेष म्हणजे एअर कंडीनशनचा पर्यायही टाटांनी या कारमध्ये देऊन आंतरराष्ट्रीय कार बाजारात खळबळ उडवून दिली आहे.
या गाडीची किंमत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. जगातील ही सगळ्यात स्वस्त कार असेल, असा दावा रतन टाटा यांनी चार वर्षांपूर्वी केला होता. आणि आज खरोखरच त्यांनी आपला शब्द पाळला. प्रॉमिस इज अ प्रॉमिस... असं सांगत या गाडीची स्डँडर्ड किंमत एक लाख रुपयेच असेल. मात्र ट्रान्सपोर्ट आणि इतर चार्जेस वेगळे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. परिणामी प्रत्यक्षात ग्राहकांना जवळपास सव्वा लाखाच्या आसपास ऑन रोड प्राईस
जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
आपले म्हणणे काय?
Comments
वा नॅनो!
नक्कीच आजची सर्वात कौतुकाची बातमी !!! सर्व संबधितांचे अभिनंदन. चाणक्यांनी इथे टाकल्याबद्दल आभार!!
टाटा मोटर्सच्या ह्या जागतिक दर्जाचे उत्पादनाविषयी नक्कीच आदर आणी अभिमान आहे.
पण मनापासुन सांगायचे तर मला टाटांनी ही कार लवकरात लवकर भारतात आणावी असे वाटते.
त्या निमित्ताने काही विचार
१) आता घरातल्यांसाठी एक, श्री. एक आणी सौ. एक अश्या लोकांकडे दुचाकी असतात तश्या ३ नॅनो येणार की काय? मग वाहतुकीचा प्रश्र बिकट होईल का?
२) राजीव बजाज म्हणाले की एक लाख ही किंमत टाटांना परवडेल का? म्हणजे ही किंमत किती काळ टिकवता येईल?
३) आठवतेय मारुती सुझुकी ही गाडी देखील (पीपल्स् कार ) मध्यमवर्गीयांना परवडावी म्हणून आली होती....
विचार
आपले विचार रास्त आहेत. अनेकांनी ते मांडले आहेत. पण सरकार कडुन पायाभुत सुविधा करुन घेउन जीवनमान उंचावायचा विचार कोणी करत नाही अथवा तशी उघड मागणी सुद्धा कोणी करताना दिसत नाही सहसा..
किंमती बद्दल बोलायचे तर या गाडीला भारता इतकीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. त्यामुळे फायदा भरपुर मिळवता येइल. अन भारतात किंमत कमी ठेवणे जास्त सोपे जाइल. राजीव बजाज आपल्या किती उत्पादनांच्या किंमती रामराज्यातल्या ठेवुन आहेत? एक लाखाची चार लाख नक्किच होणार नाही. १ लाख हि सामन्यांच्या आवक्यातली किंमत आहे. ज्याला पल्सर २०० घेणे परवडत नाही तो बजाजच्या स्वस्त गाड्यांचा नक्किच विचार करते असेल. मला वाटत कि लोकांच्या मनातल्या बजाज या ब्रँडची जागा या गाडीमुळे बदलते आहे. तसेच काही प्रमाणात दुचाकी ऐवजी आता काही लोक चारचाकीचा नक्किच विचार करतील. त्यामुळे आपला ग्राहकवर्ग राखुन ठेवण्यासाठी बजाजांचे म्हणणे न्याय ठरते.
तुम्ही जो दुवा दिला आहे त्या तंत्रज्ञाना बद्दल टाटांची बोलणी झाली आहेत. भविष्यात या लाखाच्या गाडीत ते तंत्रज्ञान आल्यास नवल नाही.
अवांतर : सुमोचे नाव सुमो कसे ठरले या बद्दल कोणाला माहिती आहे काय?
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
सुमंत मूळगावकर
सुमो = सुमंत मूळगांवकर.
बरोबर ना?
-- आजानुकर्ण
बरोबर
होय एकदम बरोबर्... एक काळ असा होता कि फक्त सुमो गाडीमुळे टाटा मोटर्स फायद्यात होती.
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
मूळगांवकर
अहो, मूळगांवकर आमच्या पिंपरी चिंचवडचे. मासुळकर कॉलनीमध्ये त्यांच्या नावाचा एक रस्ता आहे. :) शिवाय पिंपरी टेल्कोमध्ये अर्धपुतळा देखील.
-- आजानुकर्ण
गुड न्युझ अँड बॅड न्यूझ
एक लाखात गाडी तयार करूणे ही नक्कीच प्रशंसनीय गोष्ट आहे. याबद्दल संबंधितांचे अभिनंदन. शिवाय हा प्रयोग सफल झाल्यास ही गाडी आफ्रिका, द्. अमेरिका इथेही निर्यात करण्याचा टाटांचा मानस आहे. असे झाल्यास टाटांचे साम्राज्य आणखी वाढेल यात शंका नाही.
काळजीचा मुद्दा हा की हा प्रयोग सफल झाल्यास गाडीचा खप नक्कीच वाढेल. मग आधीच कंबरडे मोडलेल्या आपल्या वाहतुकीची काय अवस्था होईल? शिवाय प्रदूषणाचा मुद्दा आहेच.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
काळजी
तुमचे काळजीचे मुद्दे योग्य आहेत. पण असा विचार का नाही करायचा की, एक लाखाची चारचाकी बनवणे शक्य आहे तर मग वाहतुकीचे प्रश्न सोडवणे का नाही? आपण कर भरतो. त्यातुन पायाभुत सुविधांची अपेक्षा का नाही करायची? कि नुसतीच काळजी करायची?
तसेच रतन टाटांनी खोडलेले मुद्दे असे आहेत.
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
पटणारे
आत्ताच (आमच्या) सकाळी ही बातमी आणि चित्रे पाहून आनंद झाला. राजेंद्र यांच्या मुद्याशी मी सहमत आहे . चाणक्यराव, आपण म्हणता त्याप्रमाणे, "आपण स्वतःची गाडी बनवू शकतो तर स्वतःचे त्यासंदर्भातील प्रश्न का सोडवू शकणार नाही" हे तत्वतः मान्य आहे पण आता नागरीकांनी चांगल्या आयुष्याची - नुसते घरातले आणि व्यक्तिगत आयुष्यच नाही - तर घराबाहेर पण सामाजीक आयुष्य चांगले करण्याची मागणी ("डीमांड") करण्याची आत्यंतीक गरज आहे. ते जो पर्यंत होत नाही तो पर्यत टाटा - बजाज गाड्या काढतील पण पुढचे जमणार नाही असे त्याबद्दल वाटते.
छान आहे!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
गाडी मस्तच दिसतेय. रस्त्यावर अशा तर्हेच्या छोट्या गाड्या धावताना पाहिले की लहान मुलांचे दुडुदुडु धावणे नजरेसमोर येते.
बाकी आधीच असणार्या प्रचंड रहदारीत ह्या गाड्यांची भर पडल्यामुळे हा प्रश्न अजूनही बिकट होणार आहे हे नक्की. त्यातून जुनाट रस्ते आणि वाहतुक व्यवस्था,पार्किंगचा गंभीर प्रश्न आणि पेट्रोलचे वाढते भाव हे पाहिले की त्यापेक्षा पायी जाणे परवडले असेच वाटते. अर्थात दूर जाण्यासाठी मात्र वाहनाला पर्याय नाही हेच खरे.
त्यामुळे ही गाडी मारुती सारखीच सामान्य माणसाची पहिली पसंती ठरेल असे वाटते.
आमचंही स्वप्न पुर्ण होणार.
सर्वात कौतुकाची बातमी !!! सर्व संबधितांचे अभिनंदन. चाणक्यांनी ही बातमी टाकल्याबद्दल आभार!!
आमचंही एक स्वप्न होतं. कमी कीमतीत नवी कोरी गाडी घेऊ ऐटीत फिरायचं !!!
आता कोणती बँक कर्ज देते त्याची चौकशी करुन ठेवतो, आणि मग घेऊन टाकू :)
(एक लाखासाठी कर्ज घेणारेही अनेक असतीलच ना ? )
नवी गाडी
नवीन गाडी स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पाळल्याबद्दल रतनरावांचे आभार.
पण या गाडीमुळे वाहतुकीचा प्रश्न निदान पुण्यात तरी बिकट होईल यात शंका नाही. नवी गाडी तयार करता येते पण नवी जमीन तयार करता येणे शक्य नाही. पार्किंगची समस्या यामुळे वाढेल. पुणेकर आकाशातून पडले असल्यामुळे त्यांना रोज सोसायटीच्या नळातून येणार्या धो धो पाण्याने गाडी धुवायची असते. चारचाकी धुवायला लागणारे पाणी दुचाकीपेक्षा नक्कीच जास्त लागेल. चार दुचाकी ऐवजी एक चारचाकी रस्त्यावर दिसेल असे म्हणणे तितके व्यवहार्य नाही. बहुसंख्य चारचाकी गाड्यांमध्ये दोन पेक्षा अधिक माणसे दिसत नाहीत. गाडीची खरेदी किंमत कमी असली तरी वापरावयाची किंमत (२५ किमी प्रलि) दुचाकीच्या तुलनेने जास्त असल्याने युरो ३ आणि भारत ४ एमिशन प्रमाणपत्र असलेल्या या गाडीला आपले लोक सेपरेट टाकी लावून घेणार आणि ती रॉकेलवर चालवणार. शिवाय पैसे देऊन पीयूसी ही मिळवणार.
-- आजानुकर्ण
टाकी
गाडीची इंधन टाकी ३० लिटर क्षमतेची आहे. वेगळी टाकी लावायचा प्रश्न नाही येणार.
माझे वैयक्तिक मत असे आहे की स्वस्त गाडी, प्रदुषण, रस्ते या पेक्षा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकांची विचार करण्याची पद्धत या गाडीमुळे थोडी बदलेल. गाडी घेणारा प्रत्येकजण ती लावण्याची व्यवस्था असल्या शिवाय घेत नाही. मग ती चारचाकी असो अथवा दुचाकी. प्रत्येकाला आपल्या गुंतवणुकीची काळजी असते. ती समभागात असो अथवा गाडीत.
पुण्याचेच म्हणाल तर पुण्यात सार्वजनीक वाहतुक व्यवस्था नसल्यात जमा असल्याने अमर्याद वाहने आहेत. मी स्वतः नक्कीच कार-पुल करा असा प्रचार करेन. तो जास्त अव्यवहार्य नाही असे वाटते. तसेच ज्यांची क्षमता ४ लाखाची गाडी घेण्याची आहे ते घेउन बसले आहेत. ही सामान्यांची गाडी आहे. त्यात अनेक बचत योजनांचे विचार येतीलच आणि स्वप्ने पुर्ण करण्याचे सुद्धा.
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
उ: टाकी
वेगळी टाकी लावण्याचे कारण टाकीची क्षमता कमी आहे असे नसून आम्हाला गाडी चालू करण्यापुरते पेट्रोल त्या टाकीतून मिळेल पण रनटाईम परफॉर्मन्ससाठी आम्ही स्वस्तातले इंधन रॉकेल वापरणार हे आहे.
सार्वजनिक व्यवस्था सक्षम नाही म्हणून स्वस्तातली गाडी बाजारात आणणे हे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे आहे असे वाटते. :(
पिंपरी चिंचवड आरटीओ मध्ये गेल्या वर्षभरात १.५ लाख म्हणजे प्रतिदिवस सुमारे ४१० गाड्यांची नोंदणी झाली. या गाड्यांसाठी पुरेशी जागा, धुण्यासाठी पाणी, चालवण्यासाठी रस्ते आपल्याकडे नाहीतच.
विकासाच्या* व समृद्धीच्या चुकीच्या कल्पना असल्याने असे होत असावे का?
विकास = डेव्हलपमेंट :)
-- आजानुकर्ण
सहमत
ही कार जर प्रत्यक्षात पुण्यात आली तर रोड व्हेईकल इंडेक्स कोलमडून पडणार. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम होणे अत्यावश्यक. पुण्यात पार्किंगच्या समस्या खुपच त्रासदायक आहेत. या कार सारखी पण बॆटरीवर चालणारी "रेवा" ही कार पुण्यात आली आहे. पण किंमत साडेतीन लाख. एका बॆट्री चार्ज मध्ये ८० किमी जाते. आमच्या एका मित्राने ही कार घेतली. लई हिशेब केले. ४० पैसे प्रति कि.मी असा खर्च येतो. ही बघा
पन पुन्यातल्या ट्राफिकच काय व्हईन ते मिलिंद छत्रे यांनी कुठे तरी जालावर म्हटले ते http://www.manogat.com/node/10643 इथे बघा
प्रकाश घाटपांडे
रोड व्हेईकल इंडेक्स
...म्हणजे काय ?
म्हणजे..
गाण्यांची संख्या व रस्त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असावे.
पद्धत
या कारमुळे आणखी एका विचार पद्धतीत फरक पडेल असे वाटते. एक बीएचके चे घरकुल घेणारे लोक सोसायटीत कार पार्किंगची व्यवस्था आहे वा नाही याची सहसा काळजी करत नाहीत. यापुढे ती करायला लागतील. पण पर्यायाने घरकुलांसाठी लागणारी जमीनीची मागणी वाढेल.
आपला,
(चिंताग्रस्त) भास्कर
आम्ही येथे वसतो.
छान!
गाडी खरंच छान आहे. माझ्याकडे एक लाख रुपये असते तर ही गाडी मी नक्की खरेदी केली असती!
असो,
आपला,
(स्वत:ची एखादी गाडी असावी असं स्वप्न गेली कित्येक वर्ष बघणारा!) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
एनपीआर
थोड्या वेळापूर्वी एनपीआर (नॅशनल पब्लीक रेडीओ, अमेरिका) मधे बातमी ऐकली. ही बातमी चांगल्यापद्धतीने सांगीतली असे वाटते:
येथे ऐका
Morning Edition, January 10, 2008 · The Indian car company Tata unveils a four-seat automobile that will sell for just $2,500. The Nano would be available later this year, and is aimed at people who might otherwise purchase a motorcycle. Reporter Murad Ali Baig describes the car to Renee Montagne.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
सुरक्षितता ?
किंमत आणि वजन कमी करण्याच्या उद्देशाने या गाडीत बरेच ठिकाणी धातू ऐवजी प्लॅस्टीकचा वापर केला आहे असे समजते. तेव्हा अपघात प्रसंगी या गाडीची सुरक्षितता हादेखील एक मुद्दा बनू शकतो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
क्रॅश टेस्ट
या गाडी ने फ्रंट आणि साईड इम्पॅक्ट चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या आहेत.
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
सत्यातला विरोधाभास
ही कार बाजारात आणल्याबद्दल टाटांचे कौतुक करायलाच हवे. तसेच ही बातमी येथे टाकल्यबद्दल चाणक्यांचे!
भारतातले खाजगी क्षेत्र पाश्चिमात्य जगताच्या स्पर्धेत उतरलेले आहे. पण शासकीय यंत्रणा मात्र इंग्रजांनी तयार करुन ठेवलेली जशी होती तशीच थोड्याफार फरकाने अस्तित्वात आहे. पाश्च्चात्य देशात मध्यमवर्ग जेवढा कर भरतो तेवढाच कर भारतातला मध्यमवर्गही भरतो. मात्र सरकारकडून पायाभूत सुविधा त्याला मिळत नाहीत. ही कार आल्यानंतर ती वापरता यावी यासाठी चांगले मोठे रस्ते निर्माण करणे हे सरकारचे काम आहे. पण प्रत्येक योजणांवरचे अर्धेअधिक पैसे भ्रष्टाचारात मुरत असलेल्या या संस्थेकडून ते शक्य नाही. अशा परिस्थितित शासकीय यंत्रणेवर दबाव आणला पाहिजे. रस्ते नीट केले नाहीत तर निवडणुका महागात पडतील हे राजकारण्यांना दाखवून द्यावे लागेल. (निवडणुकीच्या दिवशी कांद्याचा भाव वाढला म्हणून सरकार पाडण्या ऐवजी विकासाच्या मुद्याला महत्व दिले पाहिजे). पण त्या ऐवजी रस्त्यांचे काय होणार ही काळजी करत बसण्याची आपली माणसिकता येथे दिसून येत आहे.
आपला,
(बंडखोर) भास्कर
आम्ही येथे वसतो.
विरोधाभास
भास्कर आपण मानसिकतेचा योग्य मुद्दा मांडलात.
आम्हाला हि गाडी घेउन चालवायची आहे. त्यासाठी चांगले रस्ते द्या, तरच निवडुन देउ हा विचार नाही येणार. आम्ही भारतीय म्हणजे तहान लागली कि विहीर खणणार. पण इथे तर तहानच न लागु देण्याचे विचार जास्त आहेत. अथवा महाग असले तरी चालेल आम्हाला बॉटल्ड मिनरल वॉटरच हवे. ते परवडत नाही म्हणुन अनुदान हवे. अनुदान नाही तर कमी व्याज दराचे कर्ज द्या. मग ते कर्ज घेउन दारु प्या. मग त्याची नशा वाढुन जास्त कर्ज. कर्ज फेडता येत नाही म्हणुन नैराश्य. मग त्या नैराश्यातुन आत्महत्या मग कर्जमाफी. या सगळ्यात कमीत कमी सहा दशके जाणार. तरी ही विहीर मागायची अक्कल नाही. मग परत विहीर खणण्यासाठी जागा मागितली कि आंदोलने. का आमची सुपीक जमीन नाही देणार विहीरीसाठी. मग त्यात हिंसाचार. त्यात सरकारे पडणार. शेवटी त्या हिंसाचाराच्या मुद्यावर निवडणुका. मग कोणी आपण होउन विहीर खणली कि ती कशी धोकादायक. आमच्या गावात आधीच गढुळ पाणि आहे. त्यात हि विहीर. नको रे बाबा. त्यापेक्षा शेजारच्या गावातुन चोरुन, नळ तोडुन आम्ही पाणि आणतो. तर असे आम्ही भारतीय. :)
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
लाखाच्या नॅनो’चा मराठी शिल्पकार
लाखाच्या नॅनो’चा मराठी शिल्पकार
मध्यमवर्गीयांना परवडेल अशी एक लाख रुपयाची गाडी बनवण्याचं रतन टाटांचं स्वप्न साकार केलंय ते एका मराठी माणसानं... लाखमोलाच्या नव्याको-या ‘ नॅनो ’ कारच्या या शिल्पकाराचं नाव आहे गिरीश वाघ. सुमंत मुळगावकरांच्या पाठोपाठ टाटांचा हा दुसरा मराठी एक्का.
ही कार हे माझं स्वप्न होतंचं. पण ते साकार करण्यासाठी गेली चार वर्षे तरुण इंजिनिअर्सची टीम खपत होती. या कारचं श्रेय जातं ते गिरीशला आणि त्याच्या टीमला... असं रतन टाटा यांनी कारच्या लाँचिंगच्यावेळी जाहीर केले. एवढंच नव्हे तर त्यांनी मराठमोळ्या गिरीशला चक्क स्टेजवर बोलावून घेऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
गिरीश वाघ... टाटा मोटर्सचा एक्का म्हणूनच ते ओळखले जातात. टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटमध्येही तसा खास उल्लेख आहे. इतरांसारखाच दिसणारा गिरीश अगदी साधा माणूस. फक्त वेगळ्या पद्धतीने विचार करणारा. म्हणूनच टाटा मोटर्सने आपले सगळ्यात मोठे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्या हाती सोपवली. पुण्याच्या ४०० एकर भूखंडावर पसरलेल्या कंपनीच्या कारखान्यात सुमारे साडेतीन हजार इंजिनिअर काम करतात. त्यातील कार डिझाइन विभागाचे मॅनेजर गिरीश वाघ. ३४ वर्षीय गिरीश आणि त्यांच्या सहका-यांनीच लाखमोलाच्या नॅनोचे डिझाईन तयार केलंय.
एक लाखाची गाडी तयार करायची पण त्यात भारतीयांसाठी जास्तीत जास्त आरामदायी सेवा द्यायच्या हे एक फार मोठे आव्हान होते. त्यामुळे पारंपरिकता सोडून , आर्थिकदृष्ट्या व्यवहारी नसलेला विचार प्रत्यक्षात आणायचा तर एखादा तरुण , नवा विचार करु शकणारा , उत्साही डिझायनर कंपनीला हवा होता. टाटा मोटर्सचे अध्यक्ष रतन टाटा आणि सुमंत मुळगावकर यांनी कंपनीच्या गाड्यांच्या डिझाइनवर वर्षानुवर्षे मेहनत घेतली. मात्र त्यांनाही हे आव्हान पेलण्यसाठी नव्या संकल्पना मांडणा-या तरुणालाच संधी द्यायची होती. अखेर कंपनीने अनेक इंजिनिअरमधून गिरीश वाघ यांचीच निवड केली. आणि गिरीशने ही जबाबदारी समर्थपणे पूर्णही केली.
समस्या संपत नाही.
महाग आहे म्हणून चारचाकी नको आणि स्वस्त झाले तर रस्ते नाही म्हणून सर्वजण अस्वस्थ.
पैसा हो तो मुसिबत और न हो तो भी मुसिबत ( कर्ज मधील गाणे).
या गाडीमूळे समाजजीवनात बदल होईलच असे वाटते. उदा. कायनेटीक होंडामूळे स्त्रीशक्ती सबल झाली आणि मारुती मूळे गुणवत्तेची कल्पना भारतीय मनात रुळली. तसेच आताही होईल.
पण...
१ लाखात फक्त बेसिक मॉडेलच येत् आहे.. बाकिच्या २ डिलक्स ट्रीम्सची किंमत किती?
हे थोडसं टोयोटा मोटर्स सारखं झालं. एन्ट्री मॉडेल स्वस्तपण त्यात गरजेच्या गोष्टी (पॉवर स्टियरींग, एसी) नसणार. त्यासाठी वेगळी किंमत मोजावी लागणार.
वरील गोष्टींची फारशी गरज नसली तरी नवीन् गाडी घेताना या सोयींचं आकर्षण असणार कि नाही?
(सनरूफ हवं या इच्छेपायी १ हजार डॉलर गमावलेला) भटका
पायाभूत् सुविधा
एक् लाखाच्या गाडी मुळे रस्त्यावर जर् ताण् येणार् असेल् तर् आता पर्यंत् आपल्या सारख्या सर्व् सामान्यांनी न चुकता कर भरला आहे त्याचे काय् ?
हया गाडीचा जन्म आपल्या सारख्या सर्व् सामान्यां साठी झाला आहे, ती रस्त्या वर् येणे आणि आपल्या सारख्यांनी ती विकत् घेणे ह्यात् गैर् ते काय्?
आता पर्यंत च्या सर्व् पक्षीय् सरकारंनी स्वतःचे उखळ् पांढरे केले आणि नागरीकांच्या (नियमित् कर् भरणार्या) सुविधे कडे पाठ् फिरवली, ह्या बाबतीत् "चाणक्य" आणी " भास्कर केंडे" यांचे प्रतिसाद बोलके आहेत्.
सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"
नॅनो, शुद्ध पाणी आणि इंडिका
नॅनोने भारतीय जनमानसाचा ताबा घेतला आहे. ही मोहिनी लवकर उतरेल असे वाटत नाही. संपूर्ण भारतीय बनावटीची इंडिका बनवल्यानंतर हा टाटा मोटर्स च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे. रतन टाटांचे आणि टाटा मोटर्स च्या अभियंत्यांचे अभिनंदन! आता स्वस्तात शुद्ध पाण्याचे ध्येय टाटांनी ठेवले आहे. टाटांचा इतिहास पाहता हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी ते जीवाचे रान करतील यात संशय नाही.
दिल्लीच्या प्रदर्शनात नव्या स्वरूपातील इंडिकाही दाखवण्यात आली म्हणे. शिवाय इंडिका व्ही३ लवकरच येणार आहे म्हणे याविषयी कोणास माहिती आहे का?
नवीन इंडिका
हि पहा नवीन इंडिका. या इंडिका सोबत आत्ताची इंडिका सुद्धा विकली जाणार आहेच.
हि पहा शुद्ध पाण्याच्या प्रयोगा बद्दलची बातमी.
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
विनोद
याच्यामागच्या कलाकाराच्या विनोदबुद्धीला दाद द्यायला हवी :)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
हो
हो, आत्ताच विरोपाने आली आहेत आम्हाला सुद्धा... आरक्षणाचे चित्र सर्वात जास्त आवडले. :)
तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?
नॅनोसोबत अजून एक चिनी बनावटीची गाडी
आत्ताच बातमी वाचली म्हणून नवीन चिनी इलेक्ट्रिक गाडीचा फोटो देत आहे. ही गाडी नॅनोला प्रतिस्पर्धी असू शकेल काय?
प्रतिस्पर्धी नसावी
बातमीवरून तरी ही गाडी इलेक्ट्रिक वाटते. साहजिकच तिच्या वापरावर अनेक मर्यादा असणार. पेट्रोल वा डिझेल वर चालणार्या नॅनोशी तिची तुलनाच होऊ शकणार नाही.
महिंद्रा ची नवी गाडी...
पहा.
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय?
http://www.chillpilgrim.com/mahindra-renault-yeni-the-mahindra-13-lakhs-...
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
ही गाडी टाटा नॅनोला पर्याय आहे. पण मग मारूतीचं काय
मी उपक्रम वर नवा आहे. हे आता जाणवले.
गडबड वाटते
महिंद्रची नवी गाडी लेफ्ट हॅन्ड ड्राइव? भारतीय ग्राहकांसाठीच आहे ना? मला काहीतरी गडबड वाटतेय! टाटांनीदेखील अधिकृतरीत्या लॉन्च करेपर्यंत नेनो गाडीचे फोटो जाहीर केले नव्हते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
उपक्रम
मी उपक्रम वर नवा आहे. हे आता जाणवले.
वास्तविक दुव्यातील रोमन अक्षरे ही १० टक्क्यांमध्ये समाविष्ट व्हायला नकोत पण ती तशी होतात. उपक्रमाच्या तंत्रज्ञांनी आपल्या आज्ञावलीत आवश्यक ते बदल करावेत असे सुचवावेसे वाटते.
दुसरे म्हणजे, येथील हलन्त् प्रकरण जरा तापदायकच आहे. प्रत्येक अकारान्त शब्द "अ" देऊनच पूर्ण करणे त्रासदायकच ठरते आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
रेनोची
हि महिंद्रांची नाही, तर रेनोची गाडी आहे. ती स्वस्तात येथे आणायचा विचार आहे. पण... मज्जा अशी आहे की लोगानच्या वितरणा नंतर रेनो बरोबरचे संबंध महिंद्राला ठेवायची इच्छा जरा कमीच आहे. त्यांनी आता डेम्लर क्रायस्लर ला जवळ केले आहे.
गाडी दिसायला सुंदरच आहे. तसेच या कमी किंमतीत आली तर नॅनोला चांगलीच टक्कर देइल. मारुती ८०० चे जीवनमान संपले आहे. त्यावर मारुतीने मिळवलेला नफा लक्षात घेतला तर ती आता ५०००० ला विकली तरी चालेल :)
अशी बनली नॅनो
नॅनो कशी बनली. वाचा छोटीशी कहाणी दै. सकाळ च्या लेखात.
टाटाच्या कारसोबत पेट्रोल फ्री
टाटाच्या कारसोबत पेट्रोल फ्री
25 Jan 2008, 1447 hrs IST
SMS NEWS to 58888 for latest updates
नवी दिल्ली,
मटा ऑनलाइन प्रतिनिधी
पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवायचं नुसतं सूतोवाच जरी झालं, तरी सगळ्या कारवाल्यांच्या पोटात धडकी भरते. स्वाभाविकच आहे, हो. सगळ्या महिन्याचं बजेटच बदलून जातं त्यामुळे. पण तुमच्याकडे टाटाची कार असेल तर तुम्ही निश्चिंत राहा. कारण, टाटांनी जशी मध्यमवर्गीयांसाठी लाखमोलाची कार आणलेय तसंच त्या कारसाठी लागणा-या पेट्रोलचीही व्यवस्था त्यांनी केली आहे.
विश्वास बसणं जरा कठीणच आहे, पण शेवटी टाटांचा शब्द आहे हो हा.
मध्यमवर्गीयांसाठी एक लाखाच्या मोटारीचे स्वप्न टाटांनी पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही आणून दाखवलं. दिल्लीच्या ऑटो एक्स्पोमध्ये त्यांनी आपली नॅनो पेश केली तेव्हा खरोखरच प्रत्येक मध्यमवर्गीय माणसानं आपल्या दारात नॅनो उभी असलेली पाहिली. आता त्या कारसाठी पेट्रोल कुठून आणायचं, हा मध्यमवर्गीयांचा प्रश्नही टाटांनी सोडवला आहे. नवीन कार खरेदी करणा-यांना ते एक वर्षं पेट्रोलही फ्री देणार आहेत.
टाटा मोटर्सच्या सांगण्यानुसार, त्यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड ( एचपीसीएल ) या सरकारी कंपनीबरोबर एक प्रमोशन योजना आखली आहे. या योजनेनुसार, नवीन कार खरेदी करणा-यांना एक वर्षभर इंधन मोफत मिळेल.
ही योजना दिल्ली आणि परिसरात लागू होईल. २५ मार्चपर्यंत लागू असलेली ही योजना टाटा आणि फियाट कारला लागू असेल.
गोम असावी
टाटांचा शब्द आहे तेव्हा खोटा निश्चितच नसणार पण तरीही कुठेतरी गोम असणार असे वाटते!
मनात एक हिशेब केला - जर रोज ठाण्याहून मुंबईला गाडीने गेले तर जाऊन येऊन ६० किमी होतात. नॅनो लिटर मागे २० किमी जाते असे कळते. म्हणजेच रोजचे होतात ३ लिटर. अर्थात (५०रु. च्या भावाने) रोजचे रु. १५०.
वर्षात २०० दिवस गाडी वापरली तर होतात रु ३०,०००
आता गाडीच्या एक तृत्यांश रक्कम जर टाटा परत करणार असतील तर त्यांच्या हातात उरेल काय? असा विचार मनात येतो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
नॅनो?
मला नाहि वाटत् या योजनेचा नॅनोशी संबंध आहे. ही योजना केवळ २५ मार्चपर्यंत लागू आहे. म्हणजे अजून दोन महिने. तेहि केवळ् दिल्लीत. काहि अभ्यासानूसार या कालावधीत या परिसरात टाटांचा खप फार कमी झाला असेल त्यामुळे तो वाढण्यासाठि हि युक्ती असू शकते..
इतकं असलं तरी ऑफर् आश्चर्यकारक आहे हे खरच् :)
गोम
गोम अर्थातच असणार - बहुतांशी ती "डिसक्लेमर" च्या रूपाने असणार. मला पुसटसे आठवते की अमेरिकेतपण गेल्या दशकात अशीच स्कीम (का स्कँम?) फोर्ड का जीएमने केले होते.
अशा प्रकारच्या सवलतीत - किती पेट्रोल असेल यावर बंधन असणार, काही ठेव ठेवायला लावणार इत्यादी इत्यादी. तसे नाही केलेत तर "टाटा!"
हेसुद्धा वाचा.
http://www.downtoearth.org.in/cover_nl.asp?mode=1
---वाचक्नवी
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.---
नॅनो...
काही मुद्दे योग्य आहेत. गम्मत या गोष्टीची आहे की सबसिडी, वाहतुक व्यवस्थेवरचा ताण, पर्यावरण हे सगळे मुद्दे आज नॅनो येण्यापुर्वीच उग्र झाले आहेत. अचानक सगळ्यांना जाग येते आहे? की नॅनोने सगळ्यांना जागे केले?
गाडी घेताना १-१.२५ लाखावरच खर्च थांबत नाही. ज्याला बाकीचे खर्च परवडतात तोच गाडी घेणार. सबसिडी हा मुद्दा मान्य करू. पण गाडीच्या इतर खर्चावर सरकार जो कर गोळा करते त्याचे काय? आज नॅनो आली. पण आजवर लाखो गाड्या खपल्या. आपण गाडी आणि इतर खर्च यावर अंतिम ग्राहक म्हणून कोट्यावधी रुपयांचा कर भरला आहे. त्या बदल्यात योग्य तसे रस्ते आणि इतर सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत का? मित्तल हे समजत असतील की आम्ही भरलेला कर त्या उड्डाणपुलांसाठी वापरला गेला आहे. सत्य काय असते ही प्रत्येक भारतीयाला माहित असते.
नॅनोमध्ये प्रत्येक सामान्य भारतीयाने चारचाकी घेण्याचे स्वप्न पाहीले. ते पाहात असताना अनेक प्रश्न उभे झाले जे बर्याच अंशी योग्य आहेत. नॅनोने हे सर्व प्रश्न सर्वांसमोर आणले हे खरे यश मानावे लागेल.
नॅनोसाठी घेतलेल्या जमिनींबद्दलचा न्यायालयीन वाद निकालात निघाला आहे. आजवरचा इतिहास पाहता टाटांनी कोणतेही समाजविघातक कृत्य केलेले नाही. प्रसंगी कमी फायदा घेउन समाजाला बरेच काही परत दिले आहे. बाकी जमिनमालकांचा फायदा म्हणाल तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सांगितलेले मार्गदर्शक तत्व - जमीन मालकांना भागीदार बनवा, हे सर्वोत्तम आहे.
नॅनो..
नॅनोने सगळ्यांना जागे केले हे खरे!--वाचक्नवी