शून्य - एक शुन्याच्या शोधाचा आढावा घेणारी चित्तथरारक कादंबरी.

'शून्य' ही मी लिहिलेली आणि शिवम प्रकाशन पुणे यांनी प्रकाशीत केलेली (जुन 2007) एक सस्पेंस थ्रीलर कादंबरी आहे.

या कादंबरीचे वैशिष्ट म्हणजे या कादंबरीत आजच्या गणिताच्या दृष्टीने आणि आजच्या एकूण प्रगतीच्या दृष्टीने महत्वाची असलेल्या शुन्याचा शोध या घटनेचा आढावा घेण्यात आला आहे. शुन्याचा शोध हा प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि ऋषीमुनींनीच लावला असला पाहिजे या गोष्टींचे पुरावे आणि प्राचीन भारतिय इतिहासात शुन्याचा शोध कसा लावला गेला असेल या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. त्याचवेळी या कादंबरीला वाचकांच्या दृष्टीने मनोरंजक आणि वाचनीय करण्यासाठी तीला अमेरीकन भूमीवर घडणाऱ्या एका रहस्यमय आणि चित्तथरारक कथेत गुंफले आहे.

ही कादंबरी आता मी ब्लॉग च्या स्वरुपात रोज एक भाग या प्रमाणे खालील संकेत स्थळावर प्रकाशीत करीत आहे...

http://marathionlinenovel.blogspot.com

तरी आपण ही राष्ट्रीय अभिमान प्रज्वलीत करणारी कादंबरी वाचून आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात हि विनंती.

Comments

शुन्याचा शोध

शुन्याचा शोध हा प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि ऋषीमुनींनीच लावला असला पाहिजे या गोष्टींचे पुरावे आणि प्राचीन भारतिय इतिहासात शुन्याचा शोध कसा लावला गेला असेल या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे
या विधानाला तीव्र आ़क्षेप आहे. शून्याचा शोध भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनीच लावला आहे. ही एक जगन्मान्य घटना आहे. याविषयी नव्याने पुरावे देण्याची / शोधण्याची गरज नाही. मी तुमची ही कादंबरी १९व्या भागापर्यंत सलग वाचली (तुमच्याच ब्लॉग वर). मलातरी आतापर्यंत कोठेही शून्याचा शोध कसा लागला याविषयीचे विवेचन दिसुन आले नाही.
रहस्य कथा म्हणून ही कादंबरी खरोखरच वाचनीय आहे.

शुन्याचा शोध

तुम्ही तर तो शोध आर्यभट्टांनी लावला आहे असं म्हणता... पण त्याच्याही आधी शून्याचा उल्लेख भारतिय वेदात आढळतो. पण् आंतरराश्ट्रीय समुदाय या गोश्टीला मानन्यास् तयार् नाही त्यांच्या म्हणण्यानुसार् शुन्याचा सर्वप्रथम उल्लेख् हा बॅबीलियन् संस्क्रुतीत् आढळतो... या सगळ्या गोष्टींव्स् उहापोह् हळू हळू पुढे माझ्या कादंबरीत येणार् आहेच्...

शून्याचा वेदकालिन उल्लेख

शून्य या संकल्पनेची जाण मनुष्याला माझ्यामते तेव्हा झाली जेव्हा त्याने संचयाला सुरुवात केली.
उदा:
माझ्याजवळ १० मेंढ्या आहेत,
माझ्याजवळ १ मेंढी आहे,
माझ्याजवळ काहिच मेंढ्या नाहित

या तीनही परिस्थिती अनादी कालापासून मानवाने अनुभवल्या आहेत.
या दृष्टिकोनातुन शून्याचा शोध कोणीच लावला नाही. कारण शून्य ही एक काल्पनिक संकल्पना आहे (imaginary identity).
आर्यभट्टाने याच तिसर्‍या संकल्पनेला गणिती परिभाषेत मांडले ज्याला आपण शून्य म्हणतो.

शून्य !

आत्ताच १ ते ३२ भाग सलग वाचून काढले. कथा म्हणून उत्कंठावर्धक आहे परंतु गणितीय दृष्टीकोनातून शून्याचा शोध कसा लागला याविषयी आतापर्यंततरी काहीही हाती लागले नाही.

(एक "शून्य") सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

 
^ वर