पवार साहेब कुणाची वाट पहाताय?

पवार साहेब,
हाच तो अशिष्ट आणि कुसंस्कारित पोंटिंग होता ज्यानी तुम्हाला धक्का देऊन मंचावर "बडी" असे उच्चारण केले होते, आणि हाच तो बेईमान पोंटिंग आहे ज्याने हरभजन ला खेळता येत नाही म्हणून त्याला फसवलय... तुम्ही नक्कीच इंजमाम आणि रणतुंगा पेक्षा जास्त समजदार आहात, ज्या दोघांनी देशाचा अपमान होत असताना तात्काळ् मैदान सोडून त्याचा निषेध केला, मग भारतीय संघाचा एवढा मोठा अपमान होत असताना अजून ही काय विचार करत आहात, ताबड़तोब क्रिकेट टीम ला परत कां नाही बोलवत, कि आईसीसी अध्यक्ष बनण्यासाठी अजून ही काही गुप्त तड़जोड़ी चालल्या आहेत? कारण एकदा सोनिया ला विदेशी म्हणून आपण "पलटी" मारलेली आहे, तसंच आता ही तर नाही करणार ना? आम्ही वाट पहातोय...

लेखनविषय: दुवे:

Comments

पवारांना कळवा

हे आपले स्वाभिमानी विचार पवारांना कुणी कळवील का? त्यांनी तूर्त हरभजनसिंगवरची बंदी तात्पुरती स्थगित करायची विनवणी आय्‌सी‌सीला केली आहे.--वाचक्‍नवी

बॅंकेला विनवणी कशापायी?

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
हे आपले स्वाभिमानी विचार पवारांना कुणी कळवील का? त्यांनी तूर्त हरभजनसिंगवरची बंदी तात्पुरती स्थगित करायची विनवणी आय्‌सीआय्‌सीआयला केली आहे
म्हणजे बॅंकेला विनवणी करायची आहे असे म्हणायचे आहे तुम्हाला?

आय्‌सीसी

दोन आय‌ जास्त पडले. जमल्यास कमी करावेत.--वाचक्‍नवी

पाठींबा

या प्रकरणात ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचा पाठिंबाही भारतीय संघाला आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमध्ये पाँटींगवर प्रखर टीका होत आहे. या संदर्भात सुनील गावसकरचे मत.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सुंदर

गावस्करांनी तो कठीण प्रश्न विचारल्यावर अर्थातच तेथे शांतता पसरली! गावस्करांचे मला ह्यासाठी नेहमीच कौतूक वाटत आले आहे. मला आठवते, काही वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर एका मॅचच्या दरम्यान ते कॉमेंटेटर बॉक्समध्ये पोहोचले, तेव्हा ते धापा टाकत होते. कारण तेथे पोहोचायला काही जिने चढून जावे लागते. पोहोचल्यावर लगेचच त्यांना कॅमेर्‍यासमोर बोलण्याची पाळी आली. तेव्हा त्यांनी बॉयकॉटला मस्त सुनावले---'तुम्ही प्रगत देशातले, आणि हे तुमचे एक सर्वोत्तम ग्राउंड वगैरे म्हणता-- त्यात अजून २१ व्या शतकात पण एलेवटर्स् नाहीत. आणी हेच जर आमच्या येथे झाले, तर तुम्ही बोंबाबोंब कराल, नाही?' [ही त्यांची नक्की वाक्ये नाहीत, पण आशय हा असा होता].

ह्या सर्व प्रसंगातून काही चांगल्या गोष्टी झाल्या:

पूर्वी बिचार्‍या भारतीय खेळाडूंना धड इंग्लिशही बोलता येत नसे, आणि देशाबाहेर गेल्यावर, आणि त्यातून गोर्‍या लोकांशी खेळतांना ते दबून वागायचे. कारण भाषा, प्रगत देशांत वावरण्याची सवय नसणे इ. आता ते तसे राहिले नाही. आपले खेळाडू त्यांना जशास तसे देऊ शकतात आणि जरूरीप्रमाणे ते तसे करतातही. गांगुली ऑस्ट्रेलियन्सना कप्तान म्हणून आवडत नव्हता ते त्याचमुळे. कारण तो ठोशास ठोसा देई. तरीही त्यांना जाग म्हणावी तशी आली नव्हती. ह्या प्रसंगानंतर ते ह्याबाबतीत भारतीय खेळाडूंशी अधिक जपून असतील.

आपल्या बोर्डाने अगदी रास्त भूमिका घेतली व आपली आर्थिक ताकद दाखवून दिली. आणि बोर्डाने हे फार संयतपणे केले. खूप तुटेपर्यत ताणले नाही, पण जरूरीपुरते ताणले. ही टूर रद्द करण्याची पैशातली किंमत भारतीय बोर्डाला २ मि. यू. एस. डॉ. पडली असती. आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ती अजूनही महाग पडली असती (मी आज सुमारे २२ मि. डॉ.हा आकडा वाचला, त्यांच्या ब्रॉडकास्टिंग राईट्सच्या संदर्भात). तसेच अगदी टूर वगैरे रद्द करण्याचे दूरगामी परिणाम होत असतात (दोन देशांतले राजनैतिक संबंध इ). त्यामुळे तसे करणे शहाणपणाचे ठरले नसते. पण जेथपर्यंत शक्य होते, तेथपर्यंत बोर्डाने जरूर ताणले, आणि आय.सी.सी. लाही आपली स्वतःची किंमत अधोरेखित करून दाखवली. (मी आज असे वाचले की क्रिकेटच्या एकदरीत आर्थिक उलाढालीतील ७० % उत्पन्न भारतातातून येते). थोडक्यात आक्रस्ताळेपणा न करता आम्ही दाखवले की we have arrived!

सबसे बडा...

बीसीसीआय ने घेतलेली भुमीका पाहून आणि त्याचे फलीत पाहून नक्कीच आनंद झाला. असा धडा शिकवणे आता शक्य आहे कारण आत्ता जरा कुठे जगात "पैशाने" झालेले नाव. "सबसे बडा रुपैय्या" ही कटू पण वस्तुस्थिती आहे.

अर्थात अशा गोष्टि केवळ पैशाने होत नाहीत तर त्याला "स्वतःला (आणि स्वदेश/स्वजन इत्यादींना) कमी " समजण्याची वृत्ती लागते. तशी चांगल्या अर्थी "माजरट" वृत्ती असली की कठीण वेळेसपण मार्ग सुचू शकतो. मला वाचल्याच आठवतयं की १९९१ साली जेंव्हा राव सरकार आले तेंव्हा रुपयाचे मुल्यांकन घटले होते. संपूर्ण खाजगी क्षेत्रालापण त्याच्या झळा लागत होत्या. परदेशी चलन कमी होते आणि (अमेरिकेन कंट्रोल्ड) वर्ल्ड बँक आणि (युरोपिअन कंट्रोल्ड) आयएमएफ, या दोन्ही संस्था सावकाराचा माजोरीपणा भारताला दाखवायला लागल्या होत्या. आपले उच्चविद्याभूषित आणि अर्थशास्त्रनिपूण तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग त्यांचे सर्व ज्ञान पणाला लावत होते (बाबांनो आम्हाला मदत करा, आम्ही असे करू, तसे करू की जेणे करून आमची अर्थव्यवस्था परत तुम्हाला हवी त्या पद्धतीने नीट होईल - असेच अगदी नाही यात उपहास असेल, पण मतितार्थ समजेल अशी आशा करतो). मेडीया, खाजगी उद्योगांचे डार्लिंग स्मार्ट पी चिदंबरम् पण स्वत:चे इंग्लीश फाडत त्यांच्या परीने प्रयत्न करत होते. पण एकंदरीत परिस्थिती चांगली नव्हती आणि सुधरत नव्हती...मग आले आपले संरक्षण मंत्री शरदराव पवार. ते शांतपणे प्रसारमाध्यमात मुलाखती देताना (अशा अर्थाचे) म्हणाले की,"आर्थिक स्थिती वाईट होत चालली आहे, परकीय गंगाजळी वाढवण्यासाठी त्वरीत निर्यात होऊन पैसे मिळण्याची शक्यता वर्ल्डबँक/आयएमएफ पेक्षा जास्त पटकन आहे. म्हणून संरंक्षण मंत्रालय इराणला आपले भारतीय बनावटीचे रणगाडे विकण्यचा विचार करत आहे..." बघता बघता चक्रे फिरली आणि आयएमएफ, वर्ल्ड बँक सगळे मुकाट्याने पैसे देयला पुढे आले...

बीसीसीआयचा हा निर्णय घेताना पण शरद पवारच आहेत हा निव्वळ योगायोगच का? कारण पूर्वि अनेकदा विशेष करून पाकीस्तानात आपल्यावर अन्याय झाला आहे. एकदा तर गावस्करसारखा खेळाडू मैदान सोडून निघून चालला होता. पण कधी कोणी काही नुसता निषेध केल्याचे पण ऐकीवात नाही.

(डिसक्लेमरः हे काही शरदपुराण नाही. आणि मी कुणालाच कृष्णधवल चष्म्यातून पाहात नाही. जगात काहीचे बायनरी नाही के जे फक्त ० असेल अथवा १ इतकेच वाटते)

मस्त

,"आर्थिक स्थिती वाईट होत चालली आहे, परकीय गंगाजळी वाढवण्यासाठी त्वरीत निर्यात होऊन पैसे मिळण्याची शक्यता वर्ल्डबँक/आयएमएफ पेक्षा जास्त पटकन आहे. म्हणून संरंक्षण मंत्रालय इराणला आपले भारतीय बनावटीचे रणगाडे विकण्यचा विचार करत आहे..." बघता बघता चक्रे फिरली आणि आयएमएफ, वर्ल्ड बँक सगळे मुकाट्याने पैसे देयला पुढे आले...

-- 'मुरलेला राजकारणी' म्हणजे काय ह्याची कल्पना पवार साहेबांकडे बघून नेहमीच येते!!

जिंकले!!!

सकाळ बातमी :
नवी दिल्ली, ता. ८ - भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजविणाऱ्या गेल्या तीन दिवसांच्या घटनांनंतर अखेर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) एक पाऊल मागे घ्यावे लागले. रडीचा डाव खेळून सिडनी कसोटी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा खोटारडेपणा त्यामुळे उघड झाल्याचे स्पष्ट झाले. .....
बेईमान म्हणून संबोधले गेलेले पंच स्टीव बकनर यांना कसोटी मालिकेतून हटविल्याने आणि हरभजनसिंग याचा खेळण्याचा मार्ग मोकळा केल्याने भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढे चालू राहणार, हेदेखील स्पष्ट झाले.
---------------------------------------------------
चला मैदानात हरलो असलो तरी मैदानाबाहेर जिंकलो. बकनरला हाकलून दिले हे उत्तमच. भज्जीच्या आरोपांची मात्र व्यवस्थित चौकशी व्हावी. खेळाच्या मैदानावर वर्णद्वेष आणणार्‍या कुणावरही (आपल्या अगर त्यांच्या) आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई व्हावी.
-कोलबेर

कदाचीत प्रथमच..

चला मैदानात हरलो असलो तरी मैदानाबाहेर जिंकलो. बकनरला हाकलून दिले हे उत्तमच. भज्जीच्या आरोपांची मात्र व्यवस्थित चौकशी व्हावी. खेळाच्या मैदानावर वर्णद्वेष आणणार्‍या कुणावरही (आपल्या अगर त्यांच्या) आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई व्हावी.

मैदानात नाही पण कदाचीत प्रथमच आपण युद्धातही जिंकलो आणि तहातही जिंकलो असे म्हणावेसे वाटते.

वा.

मुलखाचा तोंडाळ असलेल्या हरभजनसिंगने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पातळीवर उतरून वांशिक शिवीगाळ केलीच नसेल असे मानणे मूर्खपणाचे आहे. हरभजन सिंगने या आधीही बोर्डाचे नियम धुडकावून लावून ग्रेग चॅपेल विरुद्ध माध्यमांमध्ये गरळ ओकली होती. व त्याह्चे असे अनेक किस्से गूगलवर शोधल्यास मिळतीलही.
मात्र ज्या दिवशी हरभजनसिंगविरुद्ध खटला दाखल केला गेला त्याच दिवशी कसलीही शाहनिशा न करता आपल्या इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांनी तो निर्दोष आहे हे परस्पर जाहीर करून त्याच्या समर्थनार्थ एसमेसचा व्यवसाय सुरु केला. देशभक्तीच्या आपल्या कल्पनाही फार सस्त्या झाल्याने बहुतेकांनी एक एसएमएस पाठवून स्वतःची देशभक्ती सिद्ध केली.
सचिनने पवारांना निरोप पाठवून हरभजन निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे ह्या बातम्या पहिल्या पानावर झळकल्या. दुसर्‍या दिवशी सचिनने असे म्हटलेच नव्हते असे स्पष्टीकरणही आले.

कोणत्याही खेळामध्ये पंचगिरी करताना पंचांच्या चुका गृहित धरलेल्याच असतात. बकनर हे बुजूर्ग व्यक्तिमत्त्व होते. उतारवयातील विशेषतः गेल्या काही वर्षातील काही सामने वगळता अतिशय गांभीर्याने व निरपेक्ष बुद्धीने पंचगिरी करण्याबाबत नावाजलेले होते. किंबहुना डिकी बर्ड यांचे खरे वारसदार असेही त्यांच्या बाबत म्हटले जात होते.

गेली अनेक वर्षे भारतीय बोर्डाच्या मागे उभ्या राहणार्‍या वेस्ट इंडिज संघाने स्टीव बकनर यांच्या विरोधात झालेल्या कारवाई बाबत व्यक्त केलेली नाराजी पुरेशी बोलकी आहे.

बेन्सन यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानाला झेल घेतल्याबाबत विचारणे हे आयसीसीच्या नियमांनुसारच आहे. या कसोटीमध्ये तिसर्‍या पंचांकडूनही चुका झाल्या होत्या.

या आधी वर्णाच्या आधारे होणारा भेदभाव आता पैशाच्या आधारे होईल हे निश्चित.

आफ्रिकेतील देशांमध्ये एक अतिशय बोलकी म्हण आहे. लहान माणसांच्या* मोठ्या सावल्या पडू लागल्या की सायंकाळ आली आहे असे समजावे.

ल. मा. = ह.सि.

आजानुकर्णासाहेब

...कसलीही शाहनिशा न करता आपल्या इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांनी...
ते तर रोजचेच आहे की सध्या हरभजनचा विषय होता....

तुमच्या ग्रेग चॅपेल यांचे थोरले बंधु तर कित्येक वर्षांपासुन म्हणत आहे की हे असे बडबडणे सुरू राहीले तर एक दिवस स्फोट होणारच...बरेच ऑस्ट्रेलियन, अभारतीय तज्ञ मंडळी देखील म्हणत आहेत की ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या चिथावणीशिवाय हरभजन असे करणे शक्य नाही.

मात्र ज्या दिवशी हरभजनसिंगविरुद्ध खटला दाखल केला गेला
तिथेच तर गडबड आहे ना, कोणि केला, का केला, कशावरून? अंपायर मंडळींनी ऐकलेच नव्हते. ऍन्डृ सायमंडसने वेगवेगळि वक्तव्ये अशी केली आहेत, तसेच अनिल कुंबळे देखील म्हणाला की रिकी पॉटींगला म्हणाला होता की मिटवून टाक. तरीही....रिकी पॉटिंगला का इतके झोंबले? केवळ हरभजन आपला पोपट करतो म्हणून मग चला हटवा त्याला???

मागे एकदा सचिन तेंडूलकरने चेंडू कुरतडला असे बहूतेक हा माईक प्रॉक्टरच म्हणाला होता ना? रशिद लतीफला न घेतलेल्या कॅचबद्दल अपील केल्यामुळे हकालपट्टी करणार्‍या प्रॉक्टरने रिकी पॉटींगला का जीवदान दिले?

सदोष सुमार पंचगिरी होती का नव्हती? बकनर यांचे तर "अंपायरींग शेल्फ लाईफ" कधीच संपेलेले होते, झाले ते उत्तमच झाले. डिकी बर्ड देखील बकनरला म्हणाला होता की बास कर आता. गेली काही वर्षे तर बकनर भारतीय खेळाडूंना टारगेट करत होते म्हणायला वाव आहे. आयसीसीलापण ही माहिती आहे म्हणूनच असे झाले असावे असे मला वाटते.

भारतीय बोर्ड श्रीमंत आहे हा काय त्यांचा दोष आहे? इतक्या वर्षाच्या सत्तावर्चस्वाला शह जातोय हे आयसीसी मधील काही जणांना पटत नाही म्हणून का बरे आपण सहन करून घ्यायचे.

असेही आयसीसी व काही पंच आपण करू तेच पुर्व अश्या आविर्भावात असायचे, बरे झाले जर का खरोखर बीसीसीआयच्या प्रभावाखाली येऊन आता काही निर्णय घेतले जात असतील. आणि जरी आपल्याकडे पैसा आहे म्हणुन आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे भेदभाव करू असे आपणच समजू लागलो तर काय बोलायचे.

जर एखादा खेळाडू एखादी, दुसरी मॅच खरच खूप खराब खेळलो तर् त्याला डच्चु मिळतो ना? तर मग पंचाला का बरे त्याच्या सुमार कामगिरी बद्दल जबाबदार धरण्यात येऊ नये? पंचाला देखील पैसे मिळतात, काही उपकार करत दिवसभर उभा नसतो तिथे.

अमेरिकेत एका अफ्रिकन अमेरिकन दुसर्‍या अफ्रिकन अमेरिकनला "*ग्गा" म्हणु शकतो तर तो भेदभाव् नाही तर इथे मंकी म्हणले तर भेदभाव??? :-)

काही करोडपतींच्या भांडणात काही अब्जाधिशांच्या निर्णयात आपली दोन पैशाची मगजमारी इतकीच पुरे :-) ... खर्‍या भेदभाव अन्यायाला तोंड द्यायला लागणार्‍यांची दु:खे ह्या वंशभेदाच्या प्रकरणापुढे .......असो काही लिहणार नव्हतो पण..... खाज..

काही मुद्दे मान्य पण...

१. हरभजनसिंग बद्दलचे निरीक्षण एकदम मान्य.

२. भारतात ह्या सर्व प्रकाराचे माध्यमांनी वगैरे खूपच अवडंबर केले हेही मान्य.

३. आपण आम जनता त्यात वाहून गेलो, हे तर नेहमीचेच.

पण--- गावस्करांनी जे त्याठिकाणी विचारले, त्याला इतरांचे उत्तर काय होते? ते नक्की कोण होते हे मला माहिती नाही, पण एक तो उंच टक्कलवाला (टोनी ग्रेग?) सोडून इतर सर्व ऑस्ट्रेलियन होते, हे त्यांच्या शब्दोचारावरून स्पष्ट आहे. त्यांच्याकडे अजिबात उत्तर नव्हते.

आणि मला हे त्यांचे निरूत्तर होणे आवडले. कारण हे असले उद्योग हेच ऑस्ट्रेलियन खे़ळाडू वर्षांनूवर्षे आपल्या विरूद्ध, श्रीलंकेच्या खेळाडूंच्या विरूद्ध करत आले आहेत. तेव्हा आपले खेळाडू तोंड उघडत नसत. आता ते 'अरे' ला 'कारे' करतात हे चांगले आहे. आतातरी ऑस्ट्रेलियनस व इंग्लिश खेळाडूंना ह्याची जाणीव होईल, हे महत्वाचे आहे.

आणि आपल्याकडे आता त्या खेळाच्या आर्थिक नाड्या आहेत, त्याचा आपण वेळप्रसंगी वापर करू शकतो, हेही आपण क्रिकेटजगताला दाखवून दिले, हे विलक्षणीय आहे असे मला वाटते. मुख्य म्हणजे विकासांनी म्हटल्याप्रमाणे आपण युद्ध जिंकलेच, पण नेहमीसारखे तहात गमावले नाही, हा आपल्या मानसिकतेतील बदल जर एक निसटता, प्रासंगिक स्वरूपाचा (transient) नसेल, तर ते चांगले लक्षण आहे.

आफ्रिकन म्हण मात्र आवडली.

पवार साहेब कुणाची वाट पहाताय?

पवार साहेब,

हाच तो अशिष्ट आणि कुसंस्कारित हरभजन आहे ज्याने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मुस्काटात मारली आहे. आणि हाच तो बेईमान हरभजन आहे ज्याला खेळता येत नसूनही पराभव सहन करता येत नाही. तुम्ही नक्कीच रणतुंगा आणि इंझमाम पेक्षा समझदार आहात. ज्या दोघांनी देशाचा अपमान होत असताना तात्काळ् मैदान सोडून त्याचा निषेध केला, मग भारतीय संघाचा आणि देशाच्या प्रतिमेचा एवढा मोठा अपमान होत असताना अजून ही काय विचार करत आहात, ताबड़तोब हरभजनला ला कायमचे परत कां नाही बोलवत, कि आईसीसी अध्यक्ष बनण्यासाठी अजून ही काही गुप्त तड़जोड़ी चालल्या आहेत? कारण एकदा सोनिया ला विदेशी म्हणून आपण "पलटी" मारलेली आहे, तसंच आता ही तर नाही करणार ना? आम्ही वाट पहातोय...

एखाद्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने मुस्काटात मारली असती तर तो मोठा गुन्हा ठरला असता कां? सांगा पवारसाहेब सांगा.

आजानुकर्णभजनसिंग


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर