वंशावली कशी मिळवायची . . .. ?

कोणत्याही घराण्याची वंशावळी कशी मिळवायची? ही माहिती मिळण्याचे काय स्रोत आहेत? गेल्या काही पिढ्यांचे ठिकाण आणि आडनाव यावरून काही माहिती मिळते का? अश्या वंशावळी ठेवण्याचे काम काश्मीरचे पंडे किंवा नाशिकचे काही ब्राह्मण करत असत असे ऐकले आहे याबद्दल कोणास काही माहिती आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

वंशावळी

आपल्या पूर्वजांनी कधीना कधी काशी, नाशिक किंवा इतर तीर्थक्षेत्रांवर जाऊन काही धर्मकृत्ये केली असतात. त्यामुळे तिथल्या ब्राम्हणांकडे याची नोंद असते. आपली माहिती ते एकमेकांना देत असल्याने साधारणपणे तिथल्या घाटावरचा कुठलाही ब्राम्हण ही माहिती पुरवू शकतो, निदान कुणाकडे ही माहिती असू शकेल त्याचा अंदाज सांगू शकतो. प्रयत्‍न करून पहायला काही हरकत नाही.-----वाचक्‍नवी

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.
कल्याण खराडे

ती वंशावळ नव्हे..

तीर्थक्षेत्रीचे पंडे त्या-त्या घराण्यातील कोण तेथे कधी येऊन गेले याची नोंद ठेवतात. मी माझ्या आजोबा-पणजोबांची त्यांच्या हस्ताक्षरातील नोंद माझ्या लहानपणी नाशीक येथे एका पंड्याच्या घरी पाहिली आहे. त्याखाली आम्हीही नोंदी केल्या. आता कदाचित आणखी काही वर्षांनी आमचे वंशज (निपजले आणि गेलेच) तर, ते आमच्या हस्ताक्षरातील नोंदी पाहतील आणि आश्चर्यचकित होतील!

पण ती काही वंशावळ नव्हे. त्या साठी त्या घराण्यातील कोणालातरी अथक प्रयत्न करून घराण्यातील सर्व फांद्या-उपफांद्यांची नोंद घ्यावी लागते. गं बा सरदार यांनी त्यांच्या घराण्यासाठी हे केले होते.

टीप : "लोकमुद्रा" मध्ये ही चौकशी टाकून पहा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.

कल्याण खराडे

कुलदैवत

तुमचे कुलदैवत जेथे असेल तेथील देवळातील पुजारी कधी कधी अशी यादी सांभाळून असतात, त्यांना विचारूनही पाहता येईल. आमच्या घराची गेल्या ४००-४५० वर्षांची नोंद सविस्तर आहे पण त्याचे कारण असे की ती घरातील व्यक्ती अद्यवत करत गेल्या. आताची पिढीही ती सांभाळून आहे.

कुलवृत्तांत

होय. आता पुण्यात अशी कुलसंमेलन भरतात.कुणीतरी पुढाकार घेउन अशा पद्धतीने कुलवृत्तांत तयार करतो. उदा. घाटपांडे कुलवृत्तांत कुणी तयार करु शकतो. (अद्याप कुणी केला नाही ) तार्किक निकष लावताना मूळ आडनावात काही गोष्टी दडलेल्या असतात. घाटपांडे म्हणजे घाटावरचे मग त्याचे मूळ शोधायला कुणी कोकणात जाणार नाही. फार तर कुठल्या घाटावरचे ? जुन्या लोकांकडून काही माहीती काडून त्याचा माग काढला जातो, त्यानंतर त्यांचे पत्ते काढुन त्यांना निमंत्रण देउन कार्यालयात एक कौटुंबिक सोहळा केला जातो. त्यानिमित्त विखुरलेले सर्व एकत्र येउन परस्परांशी सम्पर्क राहतो. त्याचा व्यावसायिक फायदा पण होतो. पुर्वीच्या पिढ्यातील भाउबंदकीतील तेढ नव्या पिढीतील लोकात नसते. कारण ते नात फक्त आडनाव बंधु इतपर्यंतच असत.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.

कल्याण खराडे

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.

धन्यवाद चांगली माहीती मीळाली.

कल्याण खराडे

भाट...

भाट नावाच्या जातीत अशी वंशावळ ठेवण्याचे काम केल्या जाते अशी माहिती आहे. वर्षातून एकदा हे भाट त्यांच्याकडे असलेल्या आडनाव - वंशाच्या घरी जाऊन काही अद्यतने असतील तर ती करतात. कुणाकडे लग्न झाले असेल, कुणाकडे मुल झाले असेल अशी सगळी माहीती ते नोंदवतात. त्यांची खास लिपी असते. कदाचित ती मोडी असावी.

एवढ्यात या वंशावळींचा व्यवसाय करून एकाची माहिती दुसर्‍याकडे देण्याचा प्रकार चाललेला दिसतोय. हे आधी होत नव्हतं. असा कुणी भाट शोधता आला तर बघा.

नीलकांत

अगदी बरोबर

भाट असतीलच. त्यांना शोधलेत तर साधारण पणे हजार वर्षांचा मागोवा सहज मिळावा...
पुर्वी हे भाट क्षत्रियांसाठी असायचे... नक्की माहीत नाही.

आपला
गुंडोपंत

मस्त विषय

विषय चांगला आहे. पण नाशिकचे पुजारी, कुलदैवताचे पुजारी वा भाट या सगळ्यांकडे केवळ एका स्थानिक राहिलेल्या वंशांच्याच वंशावळी असतील. बरेचदा चांगल्या सुस्थापित घराणेही स्थलांतरीत होत. त्यांच्या वंशावळीच्या नोंदी नवीन पुजारी/भाट यांच्याकडे हस्तांतरीत होत का?

आपला,
(जोजारे-जोशी-केंडे वंशावळीतला (आमच्या घराण्याची आडणावे मागच्या पंधरा पिढ्यात अशी बदलली अशी ऐकीव माहिती आहे) ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

 
^ वर