ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाला येणे

ऑस्ट्रेलिया मध्ये देशांतर करण्यासाठी दोन प्रकारे व्हिसा मिळू शकतो. एक मानवताधारीत (ह्युमनेटेरियन) गुणवत्ता आधारीत (स्किल बेस्ड). या व्हिसावर कायमचा राहण्याचा परवाना (Permanenat Resisidency) मिळतो.
आफ्रिकेतील अनेक देशांतून जसे सुदान, इथिओपिया व श्रीलंका या ठिकाणांहून मानवताधारीत व्हिसावर अनेक लोक देशांतरीत झाले आहेत. हा फक्त कायमचा राहण्याचा परवाना आहे, नागरिकत्व नाही.

ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेण्यासाठी मुळ देशाचे नागरिकत्व सोडावे लागत नाही. जर मुळ देश दुहेरी नागरिकत्व मान्य करत असेल तर व्यक्ती दोन्ही देशांची नागरीक राहू शकते जसे की भारताचे.

ऑस्ट्रेलियाचे देशांतर कार्यालय (Immigration Office) गुणवत्ता आधारीत व्हिसाला प्राधान्य देते.
भारतातून येणारे लोक मात्र मुख्यतः गुणवत्ता आधारीत (इंग्रजी: Skill Based) व्हिसावर येतात. हा व्हिसा मिळवण्यासाठी व्यक्तीचे अनुभव ऑस्ट्रेलियातील व्यवसाय गरजेनुसार निर्धारीत केलेल्या श्रेणीतले असणे गरजेचे आहे. शासन ही यादी गरजेनुसार बदलत असते.
ऑस्ट्रेलियाला देशांतर करण्या आधी आय. इ. एल. टी. एस. (IELTS) ही इंग्रजी ची परिक्षा ५.५ या गुणवत्तेने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परिक्षा फक्त दोन वर्षेच अधिकृत असते. दोन वर्षा आधी दिलेली परिक्षा ग्राह्य धरली जात नाही. अधिक माहिती ब्रिटिश कौंसील लायब्ररी मध्ये मिळेल. तसेच आय. इ. एल. टी. एस. च्या http://www.ielts.org/ या संकेतस्थळावरही मिळेल.

देशांतराचे अर्ज देण्यासाठी कामाचे अनुभव पत्रे मिळवणे गरजेचे आहे. या अनुभव पत्रात कामाचे स्वरूप त्याचे बारकावे लिहिणे आवश्यक आहे. (हे व्यक्तीगत पत्र नाही/नसावे त्यामुळे या पत्रात व्यक्ती म्हणून पात्रता, जसे विश्वसनियता आदी, याचा उल्लेख करण्या ऐवजी कामाच्या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे!)
या अर्जाची फी साधारणपणे २००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी आहे. याशिवाय पोलिस चेक व मेडिकल यासाठी लागणारे पैसे वेगळे.
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर साधारणपणे ५५ आठवड्यात परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळतो. असा व्हिसा असल्यावर येथे नोकरी मिळवणे सोपे जाते.

याशिवाय इतर प्रकारेही ऑस्ट्रेलियाला येता येते.
फिरायला येणे
फिरायला येण्यासाठी अर्जानुसार ३ महिने ते १ वर्ष पर्यंतचा व्हिसा मिळतो. या साठी विमानाचे तिकिट (आयटेनरी) (व योग्य ते पैसे !) असने आवश्यक आहे. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळेलच असे नाही.

व्यवसाय व्हिसा
हा ५ वर्षांसाठी मिळतो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळेलच असे नाही.

शैक्षणिक व्हिसा
या व्हिसावर शिक्षणासाठी येण्याचा व्हिसा मिळतो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर परतणे आवश्यक आहे. शिक्षण जर योग्य त्या श्रेणीत बसणारे असेल, जसे शेफ, मोटार मॅकॅनिक, अकाऊंटंट इत्यादी तर पुढे परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. सध्या ऑस्ट्रेलियाला देशांतर करण्यासाठी तंत्रशिक्षण हा सर्वात चांगला कमी खर्चाचा मार्ग असु शकतो.

--------------------
देशांतरावरील अधिक ताज्या माहीतीसाठी हा दुवा पाहा www.immi.gov.au हा दुवा शासकिय असल्याने येथे दिली जाणारी माहिती विश्वसनिय आहे. तसेच ही माहिती वारंवार ताजी केली जाते.

-निनाद

(या लेखावर फक्त इमिग्रेशन- देशांतर विषयक चर्चा व्हावी ही माफक अपेक्षा आहे.)

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त!

दिल चाहता है बघितल्यापासून ऑस्ट्रेलियाबद्दल आकर्षण आहे :) तुम्ही दिलेली माहिती मस्त आहे. आयटीवाल्यांना कंपनीतर्फे ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी 'वर्क परमिट' कसे मिळते? वर्क परमिट मिळण्याची पद्धत कशी आहे आणि साधारणपणे किती वेळ लागतो?

नाही

'वर्क परमिट' कसे मिळते या विषयी मला तरी काहीच माहीती नाही.
पण तुम्हीही थोडेफार याहू!/गुगललेत तर सहज मिळावी!

शिवाय काही मित्र आहेत त्यांना विचारून कळवतो,
पण मागे बोलणे झाले तेंव्हा तरी व्हिसा त्यांच्या कंपन्यानीच प्रोसेस् केले होते, असे कळते.
बाकी येणार असलात तर कळवा... :))
नोव्हे. ते एप्रिल हा सिझन दक्षिण भागात फिरायला उत्तम असतो. नंतर जरा थंडी पडते.
उत्तर भागात मात्र पावसाळा सोडून सगळाच काळ बरा असतो फिरायला.
(वेगवेगळ्या प्रकारच्या माशा मात्र खुप असतात उन्हाळ्यात!!!)

माशा आणि मासे : अवांतर

(वेगवेगळ्या प्रकारच्या माशा मात्र खुप असतात उन्हाळ्यात!!!)

माशांचे ठीक आहे हो, त्यांना काय घालवता येईल. पण वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात का??????

मासे

इथले लोक मासे खाऊ तर आहेतच पण "मासे पकडू " पण आहेत!
या!! भरपूर आणि विवीध मासे खायला मिळातील.
अगदी ऑक्टोपस, स्क्वीडपासून सामन पर्यंत सगळे! ;))

फक्त बोंबील काही मिळत नाहीत. खेकडे, लॉब्स्टर्स मिळतात!
(बोंबील भारतीय दुकानातून दिसतात अधून मधून!!!)

 
^ वर