तर्कक्रीडा :५५:घनयोग

.....पाण्याच्या दोन टाक्या आहेत. प्रत्येक टाकीचा आकार घनाकृती आहे. (लांबी=रुंदी=उंची).दोन्ही टाक्यांची मापे पूर्ण मिटर मधेच आहेत. या टाक्या पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत.दोन्ही टाक्यांत मिळून एकूण तीन लक्ष एकेचाळीस हजार (३,४१,०००) लिटर पाणी आहे.

तर प्रत्येक टाकीत किती लिटर पाणी आहे?
.....................................................................................
कृ.उ. व्य.
......................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

पाच व्य. नि.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पाच सदस्यांनी या कोड्याचे अचूक उत्तर कळविले. त्यांची नावे:

  • श्री.वाचक्नवी. (बीजगणिती रीत दिली आहे)
  • श्री.विनायक.
  • श्री.धनंजय.(बीजगणिती रीतही लिहिली आहे.)
  • श्री.अमित कुलकर्णी.
  • श्री. महेश हातोळकर.

घनयोग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अदिती आणि मीरा फाटक यांनी या कोड्याची उत्तरे पाठविली आहेत ती बरोबर आहेत.
**श्री.अमित कुलकर्णी यांनीही या कोड्याचे अचूक उत्तर पाठविले आहे.

घनयोग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्रीं. नरेन्द्र गोळे आणि श्री. परीवश यांनीही उत्तरे पाठविली आहेत. त्यांनी कोड्यावर योग्य तो विचार केला आहे. उत्तरांत किंचित चूक आहे.परिमाणांविषयी थोडा गोंधळ असावा.

घनयोगः उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या प्रश्नाचे श्री. धनंजय यांचे उत्तर असे:
अ+ब)^२ - ३अब = ३१
३अब = १२१-३१ = ९०
अ"...याचे उत्तर आकडे लहान असल्यामुळे प्रयासाने काढले. मग बीजगणिताने.

अ^३ + ब^३ = ३४१ मि^३
अ,ब<७
३४१ मध्ये शेवटचा अंक १, बेरजेत हा शेवटी येण्यासाठी दोन टाक्यांचे मान ५ मि आणि ६ मि

बीजगणिताने
अ^३ + ब^३ = ३४१
(अ+ब)(अ^२ - अब + ब^२) = ११*३१
अ+ब = ११ किंवा अ+ब = ३१ (हे चालणार नाही, टाक्या ऋणमानाच्या नाहीत.)
(अ^२ - अब + ब^२) = ३१
(ब = ३०
{अ, ब} = {५,६} किंवा {६,५} कारण अ+ब=११, किंवा क्वाड्रॅटिक समीकरणाने सोडवता येईल.
अ^२ - ११अ -३० = ०
(अ-५)(अ-६)=०
इ.इ.

धनंजय
.....................................................................................

 
^ वर