'सिटीग्रुप'च्या प्रमुखपदावर मराठी माणूस!

सकाळमधील बातमी

'सिटीग्रुप'च्या 'सीईओ'पदी विक्रम पंडित यांची नियुक्ती
जगातील सर्वांत मोठी वित्तीय संस्था असलेल्या "सिटीग्रुप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून विक्रम पंडित या मराठी माणसाची नियुक्ती झाली आहे. ........
त्यांना कंपनीच्या संचालक मंडळावरही घेण्यात आले आहे. या पदासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अजीझ यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, "सिटीग्रुप'मधील अजय बंगा हे आणखी एक भारतीय आणि इतर दोन जणांबरोबर पंडित यांची खरी लढत झाली.

"वित्तीय सेवा उद्योगात सर्वाधिक आदराचे स्थान प्राप्त केलेल्यांमध्ये विक्रम पंडित यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष कामकाजातील सखोल अनुभव आणि या क्षेत्रातील एक धोरणात्मक विचारवंत ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊनच पंडित यांची संचालक मंडळाने एकमताने या पदासाठी नियुक्ती केली. "सिटीग्रुप'कडे असलेल्या अद्वितीय क्षमतांचा योग्य वापर करून ते कंपनीला पुढे नेतील,' असे "सिटीग्रुप'चे अध्यक्ष रॉबर्ट रुबिन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

नागपूरमध्ये जन्मलेले विक्रम पंडित यांनी कोलंबिया विद्यापीठातून इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्याच विद्यापीठातून "फायनान्स' विषयात "पीएचडी' मिळवली आहे. कोलंबिया विद्यापीठ, कोलंबिया बिझनेस स्कूल, हैदराबादमधील इंडिया स्कूल ऑफ बिझनेस, न्यूयॉर्कमधील ट्रिनिटी स्कूल या शैक्षणिक संस्थांच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत.

संपूर्ण बतमी http://www.esakal.com/esakal/12132007/SpecialnewsAB77D9DF29.htm इथे आहे.

सिटीग्रुपसारख्या जागतिक कंपनीच्या प्रमुखपदी भारतीय त्यातही मराठी माणसाची नियुक्ती होणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पंडित यांची या पदासाठी नियुक्ती होऊ शकेल अशी कुणकुण काही दिवसांपासून होती पण आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. याविषयी आपली मते आणि अधिक विस्तृत माहिती कोणाला असेल तर कृपया इथे द्यावी. याशिवाय यासारख्या इतर अभिमानास्पद घटनांची माहितीही इथे द्यावी ही विनंती.

आपला
(कौतुकमिश्रित) वासुदेव

Comments

विवेक तुळपुळे - रिओ टींटो

विवेक तुळपुळे

हे रिओ टींटो या जगातल्या दुसर्‍या क्रमांकाच्या खनिज कंपनीचे (पहिली बी एच पी बिलिटन?)मुख्य अर्थतज्ञ आहेत.

या दोन राक्षसी खनिज उत्खनन कंपन्या एकत्र होवून जगातली सगळीच खनिजे आपल्या ताब्यात घेणार आहेत असे काही चालले आहे म्हणे.
त्यात एका चीनी सरकारी कंपनीनेही अचानकपणे रस दाखवून रिओ च्या समभागांचे भाव वाढवून टाकले (म्हणे). शिवाय एक भारतीय कंपनीही रस दाखवते आहे असे दिसते आहे.

(यातल्या कोणत्याही कंपन्यांमध्ये भारतीयांची गुंतवणूक किती नि त्या कंपन्यांच्या उत्पन्नातला किती हिस्सा भारतात येत असावा या बद्दल मी साशंक आहे.
म्हणजे जागतिक खनिज उत्खनन उत्पन्नात भारतीयांना एक मराठी अर्थ तज्ञ या कंपनी मध्येच काम करत असूनही काहीही मिळत नाहीये ही किती दुर्दैवी परिस्थिती आहे...)

असो, विवेक तुळपुळे हे अनेक रिसर्च पेपर्स चे लेख तर आहेतच शिवाय एका पुस्तकाचेही लेखक आहेत. याशिवायही ते इतरही संस्थांवर (जनुकीय उत्पादने) कार्यरत आहेत.

पाहा एक लै भारी हाय फ्लायर मराठी अर्थतज्ञ... पण बहुतेक मराठी लोकांना माहित नसलेला...

आपला
गुंडोपंत

कौतुक आहेच

मूळचे मराठी म्हणूनही आणि भारतीय वंशाचे म्हणूनही, पण आपण या सर्वातून काय बोध घेतो ते महत्त्वाचे.

केल्याने देशाटन, "पंडित" मैत्री..!! चे फायदे त्यांना त्यांच्या जडणघडणीत झाले असावेत असे वाटते. कौतुक करण्याच्या नादात नेमकी ही गोष्ट विसरली जाते. स्वतःच्या ध्येयाचा ध्यास ही गोष्ट त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून घेण्यासारखी आहे असे काही त्यांच्याबद्दल मिळालेल्या माहितीमुळे वाटले.

त्यांच्या घरच्यांनाही त्यांच्या या नवीन पदाचा अतिशय आनंद होणे साहजिक आहे - पंडित यांच्या वडिलांची मुलाखत

महत्वपूर्ण

अमेरिकेतील मॉर्गेज मार्केटच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण आहे. तसेच फायनॅन्शियल टाइम्समधील या वृत्तानुसार मागच्या महिन्यात ७.५ अब्ज डॉलर उभे करावे लागल्यामुळे सध्या सिटीग्रूप अवघड परिस्थितीमध्ये आहे. याला सावरण्याची अवघड जबाबदारी पंडीत यांच्यावर आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

केसकर, नुयी व आता पंडित

एकंदरीत भारतीयांची मान उंचावणारी बातमी!

 
^ वर