आढावा...

राम राम मंडळी,

दि ११ सप्टेंबर २००७ रोजी आमच्या या लेखाद्वारे येथील सन्माननीय सदस्यांकरता आम्ही काही कंपन्यांचे समभाग मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता सुचवले होते, ते खालीलप्रमाणे - (कंसातल्या किंमती या आम्ही सुचवलेल्या खरेदीयोग्य किंमती आहेत. त्या दोन-तीन दिवसांच्या कलावधीत सदर समभाग याच किंमतीना (किंबहुना त्यापेक्षा दोन-पाच रुपये खालच्याच भावाला) मिळत होते.)

1) Seshasayee Paper (Rs 177)
2) Siyaram Silk (Rs 116)
3) SRF (Rs 141)
4) Cheviot (Rs 233)

आज दि १० डिसेंबर रोजी सदर समभागांची बाजारी किंमती खालीलप्रमाणे आहेत -
(CMP = Current Market Price)

1) Seshasayee Paper, CMP Rs 196 ( 11 % वाढ)
2) Siyaram Silk, CMP Rs 185 ( 59 % वाढ)
3) SRF CMP Rs 178 per share (26 % वाढ)
4) Cheviot, CMP Rs 270 per share (16% वाढ)

गुंतवणुकीतील ३ महिन्यांतली सरासरी वाढ = 28 % !

तीन महिन्यात २८ % परतावा हा आमच्या मते चांगला परतावा आहे/असावा! :)

येथील सन्मानीय सभासदांनी आमच्या सुचवणीचा लाभ घेतला असावा असे वाटते!

डिस्केमर - वरील सर्व समभागात आमची वैयक्तिक गुंतवणूक असून अद्याप आम्ही या समभागांची विक्री केलेली नाही. तसेच सदर समभागांच्या बाजारी भाववाढीमध्ये आमचा आर्थिक स्वार्थ गुंतलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी. मात्र आजच्या किंमतींना हे समभाग नव्याने विकत घेणे योग्य होणार नाही असेही आम्हाला वाटते!

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लेखनविषय: दुवे:

Comments

शेअर मार्केट व ज्योतिष

तात्या .
आपल्या परिचयात , शेअर मार्केट मधे ज्योतिषाचा आधार घेणारे लोक किती असावेत ? जिथ अनिष्चितता आहे तिथ ज्योतिष आले. मध्यंतरी मी तसा सर्व्हे घेण्याचा प्रयत्न केला. शेअर मार्केट मधिल माझे ग्यान जेमतेम असल्याने फडशा पाडता आला नाही. पण ज्योतिषात सुनंदा राठी यांचे भाग्यसंकेत या दिवाळी अंकाव्यतिरिक्त मला अन्य काहि दिसले नाही. त्या स्वत: ब्रोकर आहेत तशाच अर्थ तद्न्य आहेत. ( डॊक्टरेट तरी अर्थ शास्त्रातील आहे) मध्यंतरी किरण जाधव यांचा प्रिसीजन टेक्निकल्स चा मोठा कार्यक्रम एप्रिल २००७ च्या आसपास पुण्यात भव्यदिव्य अशा गणेश कला क्रीडा मंचावर मोठ्या गर्दीत झाला होता. त्यावेळी त्यांनी गोंधळलेल्या गुंतवणूकदाराची मानसिकता दाखवणारी एक छोटी एकांकिका दाखवली होती. अचुक निरिक्षण होते. पण ज्योतिषी लोक शेअरमार्केटमध्ये सहसा शिरत नाहीत. शिरले तरी त्यात आपले ज्योतिष ग्यान वापरत नाहीत. व्यवहारग्यान व जोखीम याचाच वापर करतात.
प्रकाश घाटपांडे

अगदी खरं!

पण ज्योतिषी लोक शेअरमार्केटमध्ये सहसा शिरत नाहीत. शिरले तरी त्यात आपले ज्योतिष ग्यान वापरत नाहीत. व्यवहारग्यान व जोखीम याचाच वापर करतात.

अगदी खरं! अहो शेवटी पैशांशी खेळ आहेत ते! ज्योतिषावर विसंबून राहून एखादा इसम चुकीचा सौदा करायचा आणि नेमका खड्ड्यात जायचा! :)

असो..

तात्या.

सियाराम सिल्क...

आजही १६ % वर आहे! :)

आत्ताचा भाव रुपये २१६. आमची सुचवणी ११६!

सबब, आम्ही सुचवलेल्या समभागांची ३ महिन्यांतील सरासरी वाढ = ३५% ! :)

अरे किसिने कमाया की नही? :)

असो,

समभाग बाजारात आमचा व्यायसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती जाणून घेण्याकरता आम्हाला व्य नि पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर संपर्क साधा! :)

आपला,
(धंद्यात उतरलेला एक मराठी माणूस!) तात्या.

शंका

समभाग बाजारात आमचा व्यायसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती जाणून घेण्याकरता आम्हाला व्य नि पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर संपर्क साधा! :)

आमच्या मते ही जाहिरात आहे. याचा अर्थ उपक्रमावर जाहिराती दिल्या जाऊ शकतात असा घ्यावा का?
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

खात्रीच होती! :)

राजेन्द्ररावांचा प्रतिसाद बहुधा उपक्रम प्रशासनाला उद्देशून आहे असा माझा अंदाज आहे, तरीही मी माझ्याकडून त्याचं उत्तर देऊ इच्छितो...

आमच्या मते ही जाहिरात आहे.

सहमत आहे! मी माझ्या धंद्या-व्यवसायाविषयी ही जाहिरातच केलेली आहे!

याचा अर्थ उपक्रमावर जाहिराती दिल्या जाऊ शकतात असा घ्यावा का?

मराठी प्रेमी आणि पर्यायाने मराठी माणसांचे प्रेमी उपक्रमराव यांनी सदर प्रश्नाचे उत्तर अवश्य द्यावे असा माझा आग्रह आहे!

बाकी राजेन्द्ररावांचा प्रतिसाद छानच आहे..!

असा एखादा प्रतिसाद येणार याची मला खात्रीच होती! :)

असो..

मराठी माणसांचा विजय असो...
मराठी संस्थळांचा विजय असो...

तात्या अभ्यंकर.

--
मिसळपाव डॉट कॉम वर कोणत्याही सभासदाला एखादं सदर लिहून त्याच्या धंद्याची आणि व्यवसायाची जाहीरात करता येईल! सध्या तरी मिसळपाववर ही सोय फुकट असून त्याचा सर्व मराठी माणसांनी अवश्य लाभ घ्यावा असे वाटते!

आपला,
(मराठी!) तात्या.

गैरसमज

तात्या,
आपला गैरसमज होतो आहे. ही शंका मराठी माणसाच्या खेकडा वृत्तीतून विचारलेली नाही. उलट जसा जाहिराती देण्याचा निर्णय मनोगतावर घेतला गेला तशीच प्रथा इथेही आहे का हे जाणून घ्यावेसे वाटले. जाहिराती देण्याबद्दल आमचा अजिबात विरोध नाही, उलट याचा फायदा इतर व्यावसायिकांनाही घेता येईल. फक्त याबाबतीत धोरण स्पष्ट झालेले बरे असे वाटते.
ही शंका प्रशासनाला उद्देशूनच होती.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

राजेन्द्रराव,

राजेन्द्रराव,

खुलाश्याबद्दल धन्यवाद! :)

तात्या.

जाहिरात

जाहिरात म्हटल्यावर् मला सुरुवातीस आलेला http://mr.upakram.org/node/276#comment-3440
हा प्रतिसाद आठवला व त्यानुषंगिक अन्य प्रतिसाद आठवले. पण राजेंद्ररावांचा खुलासा/ निराकरण झाल्याने बरे वाटले.
प्रकाश घाटपांडे

जाहिरात धोरण

नुसत्या चर्चा झडण्यापेक्षा त्यातून काही साध्य होणे नेहमीच चांगले. माझ्या मते जाहिरात करण्यात गैर नसावे, फक्त फुकटात की विकत हा ठरविण्याचा भाग आहे.
कोणत्याही सभासदाला एखादं सदर लिहून त्याच्या धंद्याची आणि व्यवसायाची जाहीरात करता येईल!
लेखनाच्या बदल्यात जाहिरात ही उत्तम कल्पना आहे. याचा विचार व्हावा.

जयेश

सियारम..आजही ८ टक्के वर! :)

सियाराम सिल्क आजही ८ टक्के वर आहे. चालू भाव रुपये २४०!!
(आमची सुचवणी रुपये ११६!!)

'अरे हा समभाग चांगला आहे, घ्या घ्या' असं कानीकपाळी ओरडून सांगत होतो. कुणी घेतला आहे का हा समभाग? तसे एखाद्या सभासदाने कळवल्यास मला फार आनंद होईल!

अहो, ज्याचे भागभांडवल फक्त ९.४ कोटी आहे, ज्याच्या समभागाची दर्शनी किंमत १० रुपये असून पुस्तकी किंमत १४२ रुपये आहे, ज्याची प्रति समभाग मिळकत २१ रुपये असून (मागील वर्षीपेक्षा ४ रुपये अधिक!), जी कंपनी पाच रुपये प्रति समभाग लाभांश देते व ५.५ इतकेच किंमत/उत्पन्न गुणोत्तर असताना ११६ या बाजार भावाला हा समभाग नाही घ्याचा तर केव्हा घ्यायचा?? अहो ज्या कंपनीच्या समभागाचे बाजारमूल्य (११६) हे त्याच्या पुस्तकी किंमतीपेक्षाही (१४२) कमी असते तेव्हा तो समभाग तिथून कधीही जोरात उसळी मारू शकतो हे लक्षात घेऊनच आम्ही हा समभाग सुचवला होता.

असो, एखाद्या समभागाची निवड करताना वरील सर्व गोष्टी ध्यानात घेतल्यास चांगला परतावा मिळू शकतो हेच आम्हाला यातून सांगायचे आहे.

आपला,
(ए ग्रुपपेक्षा, बी ग्रुप तसेच मिडकॅप व स्मॉल कॅप समभागांवर अधिक श्रद्धा असणारा एक मारवाडी)

तात्या महेश्वरी!

:)

तीन महिन्यातील सरासरी वाढ = ४३ %

SRF आजचा भाव रुपये १९१.
आमची सुचवणी रुपये १४१. एकूण वाढ ३५ %

Cheviot आजचा भाव २८८.
आमची सुचवणी रुपये २३३. एकूण वाढ २४ %

Seshasayee Paper आजचा भाव रुपये १९६.
आमची सुचवणी रुपये १७७. एकूण वाढ ११ %

Siyaram Silk आजचा भाव रुपये २३५.
आमची सुचवणी रुपये ११६. एकूण वाढ १०३ %

गुंतवणुकीवरील तीन महिन्यातील सरासरी वाढ = ४३ %

:)

समभाग बाजारात आमचा व्यायसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती जाणून घेण्याकरता आम्हाला व्य नि पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर संपर्क साधा! :)

आम्हाला आमच्या धंद्या-व्यवसायाविषयी इथे जाहिरातवजा माहिती देता आली त्याबद्दल आम्ही उपक्रम प्रशासनाचे अत्यंत ऋणी आहोत.

डिस्क्लेमर -

१) या बाबतीत कुणी आमच्याशी संपर्क साधून काही करार केल्यास तो करार फक्त संबंधित व्यक्ति आणि तात्या अभ्यंकर यांच्यामधलाच करार असेल. उपक्रम प्रशासनाचा त्या कराराशी काहीएक संबंध नसेल.

२) वरील सर्व समभागात आमची वैयक्तिक गुंतवणूक असून अद्याप आम्ही या समभागांची विक्री केलेली नाही. तसेच सदर समभागांच्या बाजारी भाववाढीमध्ये आमचा आर्थिक स्वार्थ गुंतलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी. मात्र आजच्या किंमतींना हे समभाग नव्याने विकत घेणे योग्य होणार नाही असेही आम्हाला वाटते!

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

 
^ वर