चुका शोधा

खालील लेखनात काही चुका आहेत.( व्याकरण दोष तसेच टंकलेखन दोष नव्हेत.) त्या शोधून काढा.
***
(१)'वनभोजन' या विषया वरील एका शालेय निबंधातील उतारा:
"दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कोकणात मामाच्या गावी गेलो होतो. ते खेडे निसर्गरम्य होते. गावापासून थोडे दूर एक अरण्य होते.एकदा आम्ही तेथे वनभोजनाला गेलो.तिथे हिरवीगार गर्द वनराई होती.झुळ झुळ वाहाणारे निर्झर होते.वसंताच्या आगमनामुळे वृक्ष वेलींना फुलांचा बहर आला होता.कोकिळांचे कुहू कुहू गान ऐकू येत होते....."
***
(२)त्रिविक्रम
बळीराजाच्या यज्ञमंडपात अनेक कुंडे प्रज्ज्वलित झाली होती.आहुती पडत होत्या.लयबद्ध आवाजात मंत्रपठण चालू होते.काही ऋषी रामनाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राची आवर्तने करीत होते.एवढ्यात बटु वामनाने यज्ञमंडपात प्रवेश केला.त्या तेजःपुंज बटुमूर्तीला पाहून बळीराजा आसनावरून उठून पुढे आला.त्याने हात जोडून वामनाचे स्वागत केले.
***
(३) 'अफझलखानाचा वध' हे चित्तथरारक ऐतिहासिक प्रकरण तुम्ही वाचले असेल.या विजयानंतर प्रतापगडावर विजयोत्सव झाला.त्या प्रसंगी सत्यनारायणाच्या महापूजेचा सोहळाही पार पडला.त्यावेळी प्रसादासाठी सवामण रवा अणि सवा बाराशेर तूप लागले.
***
(४)वसुदेव निघाले नंदघरी
श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्या नवजात बालकाला घेऊन वसुदेव रातोरात तुरुंगाबाहेर पडले. नंदराजाकडे निघाले.वाटेत यमुना नदी लागली.वसुदेवानी डोक्यावरची टोपली होडीत ठेवली तेव्हा प्रथम पुत्रमुख पाहिले.बालकृष्णाचे ते तेजस्वी मुखकमल पौर्णिमेच्या टिपुर चांदण्यात विलोभनीय दिसत होते.
***
(५)कवितास्फुरण
....."ही कविता मला गोव्याच्या दोनापावला समुद्रकिनार्‍यावर स्फुरली. ..मध्यरात्र उलटली होती.मी वाळूत पडून आकाशातील चांदण्या मोजत होतो.सारे कसे शांत शांत होते.केवळ लाटांचा घन गंभीर आवाज कानी पडत होता.त्या नादात मला झोप लागली...सकाळी जाग आली. .लयबद्ध लाटा.सागराचे निळेशार पाणी.त्या पाण्यातून क्षितिजावर येणारे लाल पिवळे बालरवीचे बिंब. ते अलौकिक दृष्य पहून माझे देहभान हरपले.कवितेचे शब्द अवचितपणे मुखावटे बाहेर पडले."
......................................................................................................................
उत्तरे क्रुपया व्यनि. ने
.................................................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर..

व्य नि पाठवला आहे...

व्यनि

पाठवला

चुका शोधा: उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी यांनी सर्व पाचही उतार्‍यांतील चुका अचूक शोधल्या आहेत. सत्यनारायण पूजे विषयी त्यांनी लिहिलेली माहिती माझ्या माहितीशी जुळणारी आहे.
'प्रज्ज्वलित' हे लेखन चुकीचे असून ते 'प्रज्वलित' असे हवे हेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. (या टंकदोषाचे कारण 'उज्ज्वल' हा शब्द. यात दोन ज् आहेत.)

आणखी एक अचूक उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्व (पाचही) वास्तव चुका शोधून काढण्याचे काम श्री. धनंजय यांनी सहजतेने केले आहे.

काही टंकलेखन दोष

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"चुका शोधा" या लेखात मला खालील टंकलेखनदोष आढळले:
...
.......चूक........... ......बरोबर..............
रामनाच्या त्रयोदशाक्षरी.....>रामनामाच्या त्रयोदशाक्षरी
प्रज्ज्वलित.......> प्रज्वलित
उत्तरे क्रुपया.......> उत्तरे कृपया

आणखी उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
**श्री. सुनील यांचा व्यनि. आला. शेवटचा उतारा वगळता अन्य चारही उतार्‍यांतील चुका शोधून काढण्यात ते यशस्वी झाले आहेत.
.....
**श्री अमित कुलकर्णी यांनी क्र.२ वगळता उर्वरित चारही उतार्‍यांतील चुका अगदी बरोबर शोधल्या आहेत.

माझ्या उत्तराचे

माझ्या उत्तराचे काय?.. चुक की बरोबर? कालच व्यनि पाठवला होता.

काही उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
**श्री.टग्या यांनी व्यनि. पाठवून पाचातील चार उतार्‍यांतील चुका अचूक दाखवून दिल्या आहेत. क्र.३(सत्यनारायण पूजा) मधील चूक त्यांच्या नजरेला आली नाही.श्री.टग्या यांनी काही मजेशीर टीका टिप्पणी केली आहे.ते त्यांच्या लेखनशैलीचे अविभाज्य अंगच आहे.
....
** वरील प्रमाणेच क्र.३ वगळता उर्वरित सर्व उतार्‍यांतील नेमक्या चुका श्री.ऋषीकेश यांनी कळवल्या आहेत.
दोघांचेही अभिनंदन!

अभिनंदन!

श्री. महेश हातोळकर यांचे! कारण चार उतार्‍यांतील वास्तव चुका दाखवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. क्र.३ (सत्यनारायण) मधील चूक ते बरोबर दाखवू शकले नाहीत. (पण हे साहजिक आहे.)

आणखी एक यश

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. सुनील यांनी पहिल्या व्यनीत चार उत्तरे बरोबर कळविली होती. क्र.५( गोव्यातील सूर्योदय) चे उत्तर चुकले होते. त्यावर पुनर्विचार करून त्यानी आता अचूक उत्तर पाठविले आहे. अभिनंदन!

पुन्हा उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. सर्किट यांनी पाचांपैकी चार उतार्‍यांतील नेमक्या चुका दाखवल्या आहेत.क्र. ३(सत्यनारायण) मधील चूक सापडली नाही.

ऐशी टक्के गुण

श्री. सहज यांना मिळाले असे म्हणता येईल. कारण क्र. ३ वगळता उर्वरित सर्व उतार्‍यांतील चुका त्यांनी दाखवून दिल्या आहेत."चुका शोधा" हा लेख इथे स्थापित (पोस्ट) झाल्यावर सर्वप्रथम उत्तरे त्यांनीच लिहिली (मात्र पाठवायला विलंब झाला) असा त्यांचा प्रामाणिक दावा आहे.

एकविसावा व्यक्तिगत निरोप

प्रियाली यांचा आला.(या पूर्वी या कोड्यासाठी वीस व्यनि. आले होते.) क्र. ३ वगळता प्रियाली यांनी इतर सर्व उतार्‍यांतील चुका नेमक्या दाखवल्या आहेत.

अंतिम उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मीरा फाटक यांचे उत्तर आले.त्यांनी पाचांपैकी चार उतार्‍यांतील चुका बरोबर दाखवल्या आहेत. क्र.३ (सत्यनारायण) यांत रव्याच्या मानाने तुपाचे प्रमाण कमी असे त्यांचे म्हणणे आहे. पण ही अपेक्षित चूक नव्हे. (मला वाटते १ किलो रव्याला पाव किलो. तूप पुरू शकेल. वाटल्यास थोडे दूध घालता येईल. शिरा अगदी चपचपीत नाही तरी खाण्यायोग्य होऊ शकेल.)

चुका शोधा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या लेखातील उतारे काल्पनिक आहेत.(म्ह्.मुद्रित पुस्तकांतील नाहीत.)पण मुद्रित पुस्तकांत सुद्धा असे कालविपर्यासाचे दोष कधी कधी आढळतात.
उपक्रमाच्या बुद्धिमान सदस्यांनी (इथे सर्व उपक्रमी अभिप्रेत आहेत,केवळ व्यनि. पाठवणारेच नव्हेत) या चुका सहज ओळखल्या.एकतर 'चुका आहेत ' असे पूर्व निवेदन केले होते. तसेच लेखन बालिश होते.("........अरे ही तर माझी लन्सिपे. आता ओळखा पाहू उत्तर." या प्रकारातले.) पण सर्वच वाचकांना या चुका उमगतील असे नाही.
**
(१) दिवाळीत वसंत ऋतू ?
**
(२) वामनावताराच्या काळात रामनामाचा जप?
**
(४)कृष्णजन्म अष्टमीला. त्या रात्री पौर्णिमेचे चांदणे?
**
क्र.३ (सत्यनारायणव्रत ) चे उत्तर स्वतंत्र लिहिले आहे.

सत्यनारायणव्रत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या व्रतासंबंधी 'भारतीय संस्कृतिकोश' या ग्रंथात पुढील माहिती आहे:

"एक काम्य व्रत.बंगाल आणि महाराष्ट्रात लोकप्रिय.शंभर वर्षांपूर्वी हे व्रत महाराष्ट्रात ज्ञात नव्हते.पेशवाईतील कागदपत्रांत या पूजेचा कुठेही उल्लेख नाही.विष्णुसहस्रनामात हे नाव नाही.या व्रताचा उगम मुसलमानी आहे.प्रारंभीचे नाव"साचापीरेर पूजा"

ही माहिती विश्वासार्ह मानायला प्रत्यवाय नसावा. पेशवे एवढे धार्मिक असताना पेशवाईत कोणी सत्यनारायणची पूजा केल्याची नोंद नाही. हे वास्तव आहे.
....सत्यनारायण पोथीत ,"इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे.." असे जे लिहिले आहे ते धादांत खोटे आहे.त्या पोथीत सर्व असत्य भरले आहे. कथा वाचून /ऐकून त्यावर थोडा जरी विचार केला तरी या भाकड गोष्टी आहेत हे लक्षात येईल. गुराख्यांनी दिलेला प्रसाद अव्हेरला म्हणून राजाचे पुत्र मेले. परत रानात जाऊन प्रसादभक्षण केल्यावर ते जिवंत झाले.सत्यनारायणाची पूजा केली नाही म्हणून साधुवाणी आणि त्याचा जावई यांची नौका बुडली.इकडे मुलीने पूजा केली तेव्हा होडी सर्व माणसे आणि माल यांसह सुखरूप वर आली. या काय सत्यकथा आहेत? त्यांपेक्षा "चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक् " ही गोष्ट बरी ! असल्या असत्य गोष्टी ज्यात भरल्या आहेत त्या व्रतावर शहाणी माणसे विश्वास कसा ठेवतात? असे व्रत भक्तिभावाने कसे करतात? इतकी गतानुगतिकता का? स्वतःच्या बुद्धीने विचार करायचाच नाही का? खरोखर सत्याच्या नावावर असत्याची एवढी विक्री अन्यत्र कुठे होत नसावी!
(तशी टी.व्ही. वरून जाहीरातींचा मारा कर करून होते म्हणा!! )

गंमत आहे

नातेवाईक मंडळीत हे सांगून जरा खळबळ उडवून दिली आहे :-)

पण सर अहो ह्या भुक्कड कथा, चमत्कार तर किती भरले आहे आपल्या जुन्या गोष्टीत मग काय हिंदू धर्मावरचा किंवा एकंदरीत जगातल्या सर्वच धर्मावरचा विश्वास उडला का आपला? तसेही मलापण हे धर्म आता कालबाह्य वाटतात. असो, हा वेगळा विषय आहे. एकंदरीत आपल्याला जे पटेल ते आपण उचलावे, बाकीचे सोडून द्यावे.* *संर्दभ - एकदम बेसीक मनुष्य धर्म - स्वार्थ

आता पाहीले तर आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सतराशेसाठ व्रत वैकल्य करायला वेळ कोणाकडे आहे तेव्हा कधीतरी एकदा स्वताच्या स्वता सत्यनारायण घालायचा, सर्व देवांना सांगायचे (सॉरी फॉर लेट रिप्लाय, लाँग टाइम नो सी, सी यू नेक्स्ट इयर, सो प्लीज गिव्ह अस ऑफीशीयल सर्टीफीकेट(टू हूम सो एव्हर - द एप्लीकंट इज ए हिंदू एन्ड धार्मीक/भावीक एन्ड अलाउड टू क्लेम टू बी स्पीरीच्युअल)), सुखी ठेव. शांती, समृद्धी दे. इतकी टु द पॉइंट पुजा जरी नवी असली तरीही एकदम सही आहे.

हा त्या साधू वाण्याची गोष्ट बदलावी किंवा आम्हाला नव्या गोष्टी घालायची परवानगी मिळावी ही मनोमन इच्छा आहे. त्याकरता एक सत्यनारायण घातला पाहीजे. :-)

व्होट फॉर कस्टमाईज्ड सत्यनारायण!

रूढी

या व्रताचा उगम मुसलमानी आहे
-- यावरून मूळ वाक्यात थोडा बदल करून रुढि धर्मात् बलीयसी म्हणावेसे वाटते. :) सहजरावांनी लिहिलेला कस्टमाईज्ड सत्यनारायणही मस्तच :)

साचापीरेर

या व्रताचा उगम मुसलमानी आहे.प्रारंभीचे नाव"साचापीरेर पूजा

नॉक!नॉक! कोणी बंगाली आहेत का इथे? साचापीरेर म्हणजे काय? (साचाचा अर्थ सत्य का? 'तू शाम मेरा| साचा नाम तेरा||) आणि या व्रताचा उगम मुसलमानी असावा हे कसे? मुसलमानी काळात आलेली अशी अधिक व्रते - पोथ्यापुराणे असावीत का?

सत्यनारायण कथेतच का इतर पोथ्यांतही असेच भुक्कड चमत्कार घातलेले असतात. एकंदरीत, घाबरलेल्याला (जो संकटांनी पीडीत आहे) अधिक घाबरवून (व्रत, वैकल्ये, पूजा अर्चा करायला लावून, दक्षिणा उपटून) आपली पोळी भाजून घेण्याचे धंदे आहेत.

अमेरिकेतही हे प्रकार सर्रास चालतात. मध्यंतरी आमच्या देवळातील पुजार्‍यांना अर्धचंद्र देण्यात आला होता. ते म्हणे पूजा सांगून झाल्यावर पूजेसाठी यजमानांनी आणलेले तूप, सुकामेवा, अगरबत्ती आणि इतर सामग्री इ. आपल्या घरी नेत.

स्कंदपुराण

भाकड (आणि चमत्कारिक) कथा खूप आहेत ते निश्चित. त्यामुळे भाकडपणा हा पुरातनपणाच्या आड येत नाही.

पण स्कंदपुराणात रेवाखंडात तो भाग प्रक्षिप्त आहे. जुन्या प्रतींत सापडत नाही, नव्या प्रतींत सापडतो. हा प्रक्षेप असलेल्या मूळ प्रती बंगालातल्या. एका शैव पुराणात या नारायण-व्रताचा प्रक्षेप का झाला कोणास ठाऊक.

साचा-पिर्-एर = सत्य-पीरा-चे

पीर हे हिंदू मुसलमान दोघांनी पूजलेले असले, तरी मुसलमानी परंपरेतले.

शिरा हाच भारतीय नसावा.

साबुदाण्याप्रमाणे शिरा हा पदार्थ भारतीय नसावा असा मला दाट संशय आहे. सत्यनारायणाला तो का चालत असावा याबद्दल आणखी एक शंका. (एखाद्या पीरानेच आपली आवड व्यक्त केली असावी काय?)

गव्हापासून शिरा बनतो, तो गहू मध्यआशियातून भारतात आला. गव्हाचा रवाही मध्यपूर्वेतील आणि भूमध्य सागरी देशांत बनवला जातो. मोरोक्को, ग्रीस, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, आणि अर्थातच पाकिस्तान इ. सर्व देशांत शिरा बनवला जातो. त्याला साधारण 'हलवा' अशा नावाने संबोधले जाते. (आपल्याकडेही सूजीका हलवा म्हणतातच.)

पारश्यांच्या शिर्‍यात (प्रसादाचे? किंवा रीतीचे) म्हणून अंडे घातले जाते. असा इराणी हलवा आणि पारशी शिरा प्रत्यक्ष खाल्ला आहे.

बैंगन का भरता विसरलात??

निरूपा रॉयः आज अगर वो होते तो.. (डोळ्याला पदर).. रुक, मै अभी तुझे गाजरका हलवा खिलाती हूं...

अहो, गाजर का हलवा आणि बैंगन का भरता ही फेमस जोडगोळी आहे.

कृती हवी...

पारश्यांच्या शिर्‍यात (प्रसादाचे? किंवा रीतीचे) म्हणून अंडे घातले जाते. असा इराणी हलवा आणि पारशी शिरा प्रत्यक्ष खाल्ला आहे.

एकदा पाककृतीही द्या बरं!

मूळ भारतीय काय?

शिरा हाच भारतीय नसावा.

अहो शिराच काय पण बटाटा, मिरची, टोमॅटो हे तरी भारतीय कुठे आहेत?

टीपः धार्मिक उपासाला बरे हे सगळे "विदेशी" पदार्थ चालतात!!!!!

उपास आणि 'बाहेरचे' पदार्थ

>>धार्मिक उपासाला बरे हे सगळे "विदेशी" पदार्थ चालतात!!!!!
अहो उपासाचे जवळ जवळ सगळेच पदार्थ बाहेरचे आहेत. पुराणकाळात उपासाला वर्ज्य यादित आपल्याकडचे सगळेच पदार्थ होते. पुढे बाहेरुन हे नवे पदार्थ आल्यवर ते या यादित नसल्याने उपासाला चालतात असे समजले गेले
(हे ज्ञान वाचीव माहिती वरून... संदर्भ लक्षात नाही. चुभुदेघे)

सोयीस्कर तेव्ह्डे...

यादित नसल्याने उपासाला चालतात असे समजले गेले

ह्याला म्हणतात flexibility !! काय??

मण

एक मण म्हणजे बारा शेर का?
आम्हाला केएमएस-सीजीएस मापन पद्धती अभ्यासक्रमात असल्याने मैल, पाऊंड, इंच, फूट, शेर मध्ये काही सांगितले तर फारच अवघड जाते बॉ. सत्यनारायणाच्या प्रसादासाठी आमच्याकडे जेवढा रवा तेवढे तूप लागते! त्यामुळे एक मण = बारा शेर नसल्यास दुसरी चूकही सापडेल.

- आजानुकर्णंभट

- आजानुकर्ण

आमच्याकडे म्हणजे...

आमच्याकडे म्हणजे आमच्या भागात. मंचर-खेड-आंबेगाव-जुन्नर परिसरात. सत्यनारायण आम्हाला आवडत नाही आणि आम्ही तो करत नसलो तरी केळी घालून केलेला प्रसादाचा शिरा फारच सुरेख लागतो. विशेषतः तो दुसर्‍या दिवशी शिळा झालेला असताना जास्तीचे तूप घालून तव्यावर खरपूस भाजावा. फारच मस्त!

- आजानुकर्ण

मण

एक मण म्हणजे ४० शेर.

सत्यनारायणाच्या पोथीत प्रसादासाठी रवा, तूप, साखर, दूध, पाणी हे समप्रमाणात घ्यावे असे सांगितले आहे. माझे उत्तर त्यानुसार दिलेले होते.

यस्स्स

म्हणजे १२ शेर तूप घेतले तर तो असत्यनारायण होईल.
मस्त!

- आजानुकर्ण

सत्यपीर/साचापीर आणि सत्यनारायण.

अफझलखानाच्या वधाच्या काळात सत्यनारायणाची पूजा नव्हती हे नक्की. मग हे सोपे उत्तर श्री. धनंजय आणि अस्मादिक यांच्याव्यतिरिक्‍त इतरांना का सुचू नये त्याचे आश्चर्य वाटते.
सत्यनारायणाची पूजा साचापीरवरून आली हेही माझ्या व्य.नि.त होते. ही माहिती यना आणि मी या दोघांनाही एकाचवेळी आणि स्वतंत्रपणे होती, त्याअर्थी माहितीत तथ्य होते. सत्यनारायणपूजेचा हा इतिहास आमच्या व्यतिरिक्त आणखी एकादोघांना असायला तत्त्वत: काही हरकत नव्हती.
बाकी या निमित्ताने शिवाजी शैव का वैष्णव, रवा भारतीय की नाही, एवढ्याशा तुपात शिरा कसा होईल, शिरा पारशी का मुसलमानी, वधासारख्या दु:खद घटनेनंतर सत्यनारायण करावा का, वगैरे अनेक मुद्द्‍यांवर चर्चेचे नगारे दुमदुमले, हेही नसे थॊडके!--वाचक्‍नवी

उत्तर..

मग हे सोपे उत्तर श्री. धनंजय आणि अस्मादिक यांच्याव्यतिरिक्‍त इतरांना का सुचू नये त्याचे आश्चर्य वाटते.

मोठेपणा म्हणून् नाही पण् तपशीलातील चूक नको म्हणून सांगतो - या प्रश्नाचे बरोबर उत्तर मीदेखील दिले होते. यनांचा प्रतिसाद पहा...

सॉरी!

श्री. सुनील आणि श्री अमित कुलकर्णी यांची सत्यनारायणासंबंधीची उत्तरे बरोबर असल्याचे नजरेतून निसटले, याबद्दल माफी असावी.---वाचक्‍नवी

मनोरंजक

सर्व तथ्य असलेल्या गोष्टी सर्वांना माहित असायलाच पाहिजेत असा नियम नसावा असा आमचा अंदाज आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

चकाचौंध

हा हा हा.... ह ह लो पो....

सर्व प्रश्नातली समाईक चूक.

वरच्या पाचही प्रश्नात एकच समान चूक होती..काळाची. म्हणजे ऋतू, कारकीर्दीचे वर्ष, वेळ , सकाळ-संध्याकाळ इत्यादी. कुठलीही संदर्भ लागेल अशी माहिती संग्रही नसता मुले काय चूक करू शकतात याची किंचित कल्पना जरी केली असती तरी सर्व चुका शोधणे शक्य होते. अमावास्येच्या रात्री , काळे कपडे -काळा गॉगल घालून, दिवे बंद करून, बुरखा ओढून घेऊन, डोळे मिटून जरी प्रश्नांवर विचार केला असता तरी सर्व चुका सापडणे शक्य होते. म्हणजे चकाचौंध व्हावे नसते लागले!--वाचक्‍नवी

अंनिस!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
अंनिसचे डॉ.दाभोलकर ह्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात सत्यनारायण हा मुळात हिंदुंचा नसून तो एका मुसलमान पीराकडून आलेला आहे असे म्हटलेले आहे. पीराला हिंदु आणि मुसलमान हे दोघेही मानत असल्यामुळेच ही पुजा कधीतरी मागच्या दाराने हिंदुंमधे शिरली आणि आता ती राजरोसपणे जवळपास सगळ्या हिंदु घरात केली जाते. मात्र मुसलमान अशी काही पुजा करतात की नाही ते मात्र माहित नाही. बहुदा करत नसावेत.
सत्यनारायणाच्या कथा इतक्या भोंगळ आहेत की त्या लिहिणार्‍याची आणि त्या तशा अतीव भक्तिभावाने खर्‍या मानणार्‍यांची कीव करावीशी वाटते. मनात आणले तर कोणालाही अशा छप्पन(नानाच्या अब तक छप्पन प्रमाणे) कथा बघता बघता पाडता येतील. त्यासाठी विशेष अकलेची जरूर नाही.
हां! एक मात्र आहे, बरं का! प्रसादाचा म्हणून जो काही शीरा बनवला जातो ना तो मात्र खास असतो. तो खायला सत्यनारायणावर विश्वास ठेवणे बंधनकारक नाही हे बाकी मस्तच. त्यामुळे आमच्यासारख्यांची मात्र सोय झाली.

शिरा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सत्यनारायणाच्या पोथीत प्रसादासाठी रवा, तूप, साखर, दूध, पाणी हे समप्रमाणात घ्यावे असे सांगितले आहे.
पोथीत काय लिहिले आहि ते राहूंद्या. पाव किलो रवा + पावकिलो तूप + पावकिलो साखर + पावलिटर दूध + पावलिटर पाणी +
( श्री. आजानुकर्णांसाठी पाव डझन केळी..)घेऊन कोणी खरोखरच शिरा करून पाहिला आहे काय ? कृपया अनुभव काय तो सांगावा. मला अनुभव नाही.

पोथीत पाककृती??

सत्यनारायणाच्या पोथीत प्रसादासाठी रवा, तूप, साखर, दूध, पाणी हे समप्रमाणात घ्यावे असे सांगितले आहे.

मी काही पोथी वाचलेली नाही पण पोथीत अगदी व्यवस्थित पाककृतीदेखील दिलेली पाहून गंमत वाटली. अर्थात ज्याने कोणी ती पोथी लिहिली त्याच्या पसंतीची पाककृती असणार हे उघड!

प्रचलीत प्रमाण बंगालीत खर्‍याला सत्य (उच्चार शोत्य) असे म्हणतात, साचा नव्हे. अर्थात, जुन्या बंगालीत किंवा बंगालीच्या एखाद्या बोलीभाषेत तो शब्द असल्यास ठाऊक नाही.

पीरेर म्हणजे पीराचा हे खरे.

पाककृती

श्री. ऋषीकेश कळवितात की या प्रमाणांत घटकपदार्थ (इनग्रेडियंटस्) घेऊन केलेला शिरा छान होतो, असे त्यांच्या मातोश्रींनी सांगितले आहे.तेव्हा मी माझे शब्द मागे घेतो. आमच्या घरी सत्यनारायणपूजा कधीच न केल्याने शिर्‍यातील घटकांचे हे प्रमाण अनुभवले नाही.तरी क्षम्यताम्.

खळबळ

>> आता तर त्यांनी हे मुसलमानी व्रत असल्याचे सांगून इथल्या श्रद्धाळू लोकांना मोठ्याच संकटात टाकले आहे.
अगदी खरे आहे.. मी हे कळल्यावर अनेक भाविक म्हणून मिरवणार्‍यांच्या कानावर ही माहिती घातली. तर बिचार्‍यांचे चेहेरे बघण्यासारखे झाले. हे सांगितल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या इतक्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या की त्या प्रतिक्रियाच बघुन मला मुळ गोष्टीपेक्षा जास्त मजा आली. मला नंतर लक्षात आले की यामुळे ते हे व्रत/पुजा करणे काहि सोडणार नाहित. पण उगाच मी मात्र त्यांच्या नजरेत "अधर्मी कुठचा" होत चाललो आहे :).. "अमेरिकेत राहुन माणसं बदलतात हे ऐकलं होतं आता पाहतोय"इथपासुन "हे शिवसेनेने वाचलं ना तर उपक्रम बंद करतील तुमचा!! तेव्हा जास्त सांगत फइरु नकोस" इथपर्यंत प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रिया नुसत्या लिहायच्या तर वेगळा लेख लागेल ;)

दगडफेक??

हे शिवसेनेने वाचलं ना तर उपक्रम बंद करतील तुमचा

म्हणजे कुठच्यातरी सायबर कॅफेवर दगडफेक ना?

घाबरनेवालोंको

हे शिवसेनेने वाचलं ना तर उपक्रम बंद करतील तुमचा!! तेव्हा जास्त सांगत फइरु नकोस" इथपर्यंत प्रतिक्रिया आल्या.

घाबरनेवालोंको घाबरनेका बहाना चाहिये| *;-) लोकांना निर्भय बनून जगण्यापेक्षा घाबरून खुराड्यांत जगायला अधिक आवडतं हे सिद्ध करणारी प्रतिक्रिया. :))))

* माझं हिंदी इतकही वाईट नाही असं घाबरत सांगते. ;-)

असं आहे की....

"हे शिवसेनेने वाचलं ना तर उपक्रम बंद करतील तुमचा!! तेव्हा जास्त सांगत फिरू नकोस" यात "मी शिवसेनेला घाबरतो" ही छटा कुठे येते?

बघा! हे वाक्य कोण उच्चारेल? ज्याला सत्यनारायण फोल आहे पटतं तो मुळीच नाही. ' तू काही सांग मी सत्यनारायण/ देव/ चमत्कार मानतो' असं म्हणणारेही हे वाक्य उच्चारणार नाहीत. वरील वाक्य भित्रट माणसे उच्चारतात. ज्यांना आपली संस्कृती, धर्म, परंपरा बुडणार आहे अशी सतत भीती वाटत असते ते.

यापुढेही, 'मी साधासरळ (खरंतर नेभळट) आहे' म्हणून 'माझी (येथे शिवसेना) अमुक तारणकर्ता/र्ती आहे' असा काहींचा समज असतो. हे लोक स्वतः घाबरलेले असतात. सतत दबून असतात उदा. सत्यनारायण कसा अस्तित्वात आला हे पटवून सांगितलं तरी पटवून घेणार नाहीत कारण आपण असे वेडेवाकडे विचार केले तर सत्यनारायणाचा कोप होऊन आपली नैय्याही डुबणार अशी भीती त्यांना वाटत असते. त्यामुळे त्यांना शहाणपणा शिकवणार्‍यांना ते उलटी भीती दाखवतात.

म्हणून म्हटलं घाबरनेवालेको घाबरनेका बहाना चाहिये|

शोले आणि गब्बर

रादर, घाबरनेवाले को घाबरवने का बहाना चाहिए???

हो तसं म्हणता येईल. म्हणजे ते दुसर्‍यांना घाबरवत असतात आणि बरोबर स्वतःही घाबरत असतात.

पुष्टीदाखल एखादा हिंदी चित्रपट आठवा. त्यात अशी उदाहरणे सर्रास दिसतात. गांव का जमीनदार आणि सताये हुए गांववाले, क्याप्टन रसेल आणि दुगना लगान भरायला पण म्याच खेळायला घाबरणारे गावकरी इ. किंवा एकदम फिट्ट उदा. शोले.

जब रात को बच्चा सोता नहीं तो मां कहती है की सो जा वरना गब्बर आ जायेगा|

हे बोलणारी मां त्या बच्च्यापेक्षा जास्त घाबरलेली असते.

है की नहीं प्वाईंटमें दम? ;-)

संपूर्ण प्रतिसाद ह. घेणे.

पीर दर्गा इ.

मूळात पीर (आणि दर्गा) हे खास भारतीय उपखंडातील मुस्लिमांचे वैशिष्ठ्य आहे. आणि त्याचे मूळ हे भारतीय संस्कृतीत आहे. तेव्हा पीर म्हणजे निव्वळ मुस्लीम संस्कृती असे मानणे चुकीचेच.

तुम्ही हाजी अलीला चक्कर मारा. दहातील तीन हिंदू दिसतील. तेथील चादरी विकणार्‍या दुकानात बघा. चादरीबरोबर नारळदेखील दिसतील.

संतोषी माँ

आजकाल या फिल्मी देवीचे प्रस्थ कमी झाले आहे. पण जेव्हा हे प्रस्थ मोठे होते, तेव्हा ही देवी प्राचीन नसून हल्लीच उदयास आली आहे, तिची नेहमीच्या देवांशी नातीगोती नवीकोरी आहेत, असे कोणाला सांगितले की अशीच खळबळ माजत असे.
पण मग असे वाटते, की जुनी म्हणतात ती पुराणे सुद्धा अशीच, गोष्टींना गोष्टी भरीस पडत रचली गेली आहेत. एका पुराणातल्या तपशिलाचा दुसर्‍या पुराणातील तपशिलाशी ताळमेळ लागला पाहिजे असा काही नियम नाही. म्हणून पुराणे यांना जिवंत (बदलणारी) पुस्तके मानून, संतोषी माँ, सत्यनारायण, यांनाही "पौराणिक" मानून घ्यावे.
(पौराणिक कथा अणि बोधकथा संस्कृतीत महत्त्वाच्या असतात - त्या ऐतिहासिक असल्या-नसल्या, प्राचीन असल्या-नसल्या तरी चालतात. अशा प्रकारचा काही मुद्दा मागे राधिका यांनी मागे एकदा मांडला होता वाटते. पण तो दुसर्‍याच एका वादात हरवून गेला होता.)

फिर एक बार - तहलका

संतोषी माता पण खरी नाही? :-) अहो हळू बोला लोक आपल्याला म्हणतील हा काय "उपक्रम" लावलाय तुम्ही लोकांनी

मग असे वाटते, की जुनी म्हणतात ती पुराणे सुद्धा अशीच, गोष्टींना गोष्टी भरीस पडत रचली गेली आहेत

बघा आता असे वाटते की खरेखूरे स्वातंत्र्य कुठल्या धर्मात असेल ते फक्त हिंदू धर्मात, अन्यथा हे ३३ कोटि देव आलेच कोठून? ज्याला त्याला वाटतो तो देव व त्याच्या सुरस व चमत्कारिक कथा!! :-)

प्रियाली ,हे राजे महाराजे वंशावळ ठीक आहे पण आता ३३ कोटींचा हिशेब लावायचे मनावर घ्या. २००८ चा प्रोजेक्ट :-)

३३ कोटी देव्...

अन्यथा हे ३३ कोटि देव आलेच कोठून?

मी दुसरीकडून् "उचललेली" माहिती अशी -

कोटि हा शब्द संख्यावाचक नाही, तो आहे गुण किंवा प्रतवाचक.
विश्वातील गुणातीत पुरुष म्हणजे त्रिगुणात्मक सूर्य. त्यालाच त्रयी विद्या असे म्हणायचे.
या त्रयी विद्या म्हणजे ॠक, यजुः आणि साम हे वेद.
या तीन वेदांची प्रतिके म्हणजे भूह, भुVअः आणि स्वः, म्हणजे अनुक्रमे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग. ( हो गायत्रीमंत्रात येतात तेच. )
या तीनही स्थानाचा एक प्रमुख देव आणि त्या प्रत्येक गटात इतर दहा देवता, असे मिळुन तेहतीस देव. त्याची यादी पण देतो. ( यातली बरिच नावे अनोळखी वाटतील )

पृथ्वीस्थानाची प्रमुख देवता, अग्नी, व या गटात, द्रविणोद, तनूनपाद, नराशंस, इडा, नक्तः, उषा, त्वष्ट्र, वनस्पति, स्वाहाकृति, पृथिवी.

अंतरिक्षस्थानाची प्रमुख देवता इंद्र. व या गटात पर्जन्य, रूद्र, वायू, मित्र, वरूण, यम, आदिती, सवितृ,धातृ, इन्दु.

स्वर्गस्थानाची प्रमुख देवता सूर्य व या गटात, अश्विन, भग, पूषन, वृषाकपि, विष्णु, अजैकपाद, समुद्र, केशिन, वसु, संवत्सर.

अधिक स्प्ष्टीकरणासाठी ३ डिसेंबरची "dineshvs" यांची पोस्ट वाचा.

http://www.maayboli.com/hitguj/messages/46/66670.html?1196978686

संतोषी मां

ही देवी उत्तर भारतात खूप प्रसिद्ध आहे असे मला हल्लीच माझ्या एका उत्तर भारतात वाढलेल्या नातलग स्त्री कडून कळले आहे. तिची ऐकीव माहिती अशी की ही देवी तिथल्या बायकांमध्ये प्रसिद्ध आहे कारण तेथे बायकांवरील अन्यायाचे प्रमाण काहीसे जास्त आहे, त्यामुळे त्यांना एक आधार अशा प्रकारे ती माहिती आहे. हे ऐकल्यावर मला आठवले की असेच "जय संतोषी माता" या काननकौशलला घेऊन काढलेल्या हिंदी चित्रपटात दाखवले आहे.

संतोषी माता खरी आहे की नाही माहिती नाही, चित्रपट मात्र भयंकर करमणूक करणारा आहे! आमच्या ओळखीच्या एका कुटुंबात त्या चित्रपटाची १० हून अधिक पारायणे झाली आहेत.

 
^ वर