चुका शोधा

खालील लेखनात काही चुका आहेत.( व्याकरण दोष तसेच टंकलेखन दोष नव्हेत.) त्या शोधून काढा.
***
(१)'वनभोजन' या विषया वरील एका शालेय निबंधातील उतारा:
"दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कोकणात मामाच्या गावी गेलो होतो. ते खेडे निसर्गरम्य होते. गावापासून थोडे दूर एक अरण्य होते.एकदा आम्ही तेथे वनभोजनाला गेलो.तिथे हिरवीगार गर्द वनराई होती.झुळ झुळ वाहाणारे निर्झर होते.वसंताच्या आगमनामुळे वृक्ष वेलींना फुलांचा बहर आला होता.कोकिळांचे कुहू कुहू गान ऐकू येत होते....."
***
(२)त्रिविक्रम
बळीराजाच्या यज्ञमंडपात अनेक कुंडे प्रज्ज्वलित झाली होती.आहुती पडत होत्या.लयबद्ध आवाजात मंत्रपठण चालू होते.काही ऋषी रामनाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राची आवर्तने करीत होते.एवढ्यात बटु वामनाने यज्ञमंडपात प्रवेश केला.त्या तेजःपुंज बटुमूर्तीला पाहून बळीराजा आसनावरून उठून पुढे आला.त्याने हात जोडून वामनाचे स्वागत केले.
***
(३) 'अफझलखानाचा वध' हे चित्तथरारक ऐतिहासिक प्रकरण तुम्ही वाचले असेल.या विजयानंतर प्रतापगडावर विजयोत्सव झाला.त्या प्रसंगी सत्यनारायणाच्या महापूजेचा सोहळाही पार पडला.त्यावेळी प्रसादासाठी सवामण रवा अणि सवा बाराशेर तूप लागले.
***
(४)वसुदेव निघाले नंदघरी
श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्या नवजात बालकाला घेऊन वसुदेव रातोरात तुरुंगाबाहेर पडले. नंदराजाकडे निघाले.वाटेत यमुना नदी लागली.वसुदेवानी डोक्यावरची टोपली होडीत ठेवली तेव्हा प्रथम पुत्रमुख पाहिले.बालकृष्णाचे ते तेजस्वी मुखकमल पौर्णिमेच्या टिपुर चांदण्यात विलोभनीय दिसत होते.
***
(५)कवितास्फुरण
....."ही कविता मला गोव्याच्या दोनापावला समुद्रकिनार्‍यावर स्फुरली. ..मध्यरात्र उलटली होती.मी वाळूत पडून आकाशातील चांदण्या मोजत होतो.सारे कसे शांत शांत होते.केवळ लाटांचा घन गंभीर आवाज कानी पडत होता.त्या नादात मला झोप लागली...सकाळी जाग आली. .लयबद्ध लाटा.सागराचे निळेशार पाणी.त्या पाण्यातून क्षितिजावर येणारे लाल पिवळे बालरवीचे बिंब. ते अलौकिक दृष्य पहून माझे देहभान हरपले.कवितेचे शब्द अवचितपणे मुखावटे बाहेर पडले."
......................................................................................................................
उत्तरे क्रुपया व्यनि. ने
.................................................................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

संतोषी मातेचे व्रत

संतोषी मातेचे व्रत बहुधा १६ शुक्रवार करतात. बर्‍याच बायका त्यावेळेस हे व्रत करून 'जय संतोषी मां' हा चित्रपट दर शुक्रवारी बघत. म्हणजे उपवास, पोथीवाचन इ. प्रमाणे चित्रपट बघणे हे ही संतोषी मातेच्या व्रताचा भाग होता. ;-)

बरोबर!

१६ शुक्रवार, चणे वगैरे.

गाणी वेधक होती - उषा मंगेशकरची.. त्यामुळेच चित्रपट जास्त चालला असेल..

काननकौशल नव्हे!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
जय संतोषी माता" या काननकौशलला घेऊन काढलेल्या हिंदी चित्रपटात दाखवले आहे.

काननकौशल नव्हे! अनिता गुहा हिने संतोषी मातेची भूमिका केलेली होती.

(बहुधा) इंदुमती पैंगणकर उर्फ कानन कौशल

हीच जय संतोषी मां या चित्रपटाची नायिका होती, सत्यवती का काहीतरी नाव..... संतोषी माता नव्हे. संतोषी मातेची भूमिका अनिता गुहा यांनी केली होती.

करमणूक

आज बर्‍याच दिवसांनंतर इकडे चक्कर टाकली आणि काय भन्नाट करमणूक झालीये !!

सत्यनारायणाचे सत्य वाचून गंमत वाटली, माझ्या पूजेचा प्रसाद खल्ला नाही म्हणून डायरेक्ट सजा-ए-मौत वगैरे देणारा देव लोकांना खरा कसा काय वाटू शकतो कळत नाही !! लहानपणापासून आईला एकच प्रश्न कायम विचारत आले - देव खरंच असा खुनशी असेल का? बदले की आग वगैरे बाळगणारा ? आपला नवरा मेला नाही, जिवंत आहे हे कळल्यानंतर बायको आधी धावत तिकडेच जाणार ना, ती काय व्रत पूर्ण वगैरे करत बसेल का? ही "पोथी" म्हणजे कुणीतरी एखादी कादंबरी वगैरे म्हणून लिहायला घेतली असेल का ? किंवा हिंदू लोकांमध्ये व्रतं कमी दिसतायत एखाद-दुसरं वाढवू या, असा कट असेल कुणाचा ?

आणि संतोषी मां बद्दल वाचून तर हहपुवा झाली, १६ शुक्रवार चित्रपट पहायचा वगैरे म्हणजे तर अक्षरशः वेड्यांचा बाजारच आहे. (चित्रपट पुन्हा बघावासा वाटायला लागलाय) कितीही अशिक्षित/गांजलेला/घाबरलेला/घाबरवलेला माणूस असेल तरी तो इतकं बिनडोकपणे वागू शकतो? कमाल आहे यार

"बाईसाहेब, आपले स्फोटक विचार आपल्याकडेच ठेवा" असेच नेहेमी ऐकत आल्यामुळे ही चर्चा वेगळी वाटली.

 
^ वर