त्याने गोळी का झाडली?

Tyane Goli Ka Zadali" alt="">

पुण्यातील ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ उल्हास लुकतुके यांचा लोकसत्ता १५ नोव्हे २००७ मधील लेख हा पोलीस.लष्करी दले यातील हत्या वा आत्महत्या यावर् प्रकाश टाकतो. डॉ. लुकतुके हे केवळ मनोविकार तज्ञ नसून उर्दू भाषेचे जाणकार् आहेत. शेर शायरी हा त्यांचा प्रांत आहे.

Comments

चिंताजनक

ताणतणाव हा आजकाल् सगळ्यांच्याच आयुष्यात आला आहे. ह्यातून उद्भवणार्‍या भीषण समस्यांना वेळीच कसे आवरायचे ह्याचे शिक्षण सगळ्यांना मिळायला हवे.

ह्या अश्या घटनांची चौकशी, अहवाल वगैरे होत असेल ना? बघायला आवडेल. घाटपांडेसाहेब मधे महाराष्ट्र पोलीसात कामावर अतिशय ताण येऊन र्‍हृद्यविकाराचा झटका येऊन काही पोलीस दगावले होते तसेच वर उल्लेख असलेल्या घटना घडल्याचे आठवते. तेव्हा काही अहवाल तुमच्या वाचनात आला असेल किंवा काही विशेष अधिसुचना, सुधारणा जाहीर झाल्या होत्या का तुमच्या खात्यात? काही माहीती असेल तर कृपया सांगा.

इथे काही भाग

http://mr.upakram.org/node/882#comment-14611 या प्रतिक्रियेत काही भाग् आलेला आहेच. शेतकर्‍यांच्या आत्महत्या व पोलिसांच्या आत्महत्या या मला सारख्याच वाटतात. समीर कर्वे या मटाच्या पत्रकाराने "वर्दीचा माज आणी मिंधेपणाची सक्ति" लेखात मांडले आहे. या लेखाचे हे शिर्षकच किती सूचक आहे. मी मागे कुठेतरी याचा उल्लेख केला आहे. पण लेख सापडत नाही. कुणाला सर्च मारुन मिळतो का ते बघा. सरकारी नियम पोलिस खात्याला काही बाबतीत जसेच्या तसे लागू पडत् नाहीत. पोलिस मॅन्युअल नावाचे एक कालबाह्य बायबल च्या आधारे यंत्रणा चालते. मला लुकतुक्यांच्या लेखातील बारकावे समजावून घ्यायला तीनदा वाचावा लागला. सदर लेख मी भास्करराव मिसर माजी अति पोलिस महासंचालक यांनाही दिला. ते पण संवेदनाशील लेखक आहेत त्यांचे "दानवाधिकार" नावाची एक प्रहसनात्मक एकांकिका २००६ च्या एका दिवाळी अंकात वाचली होती. प्रायोगिक रंगभुमी साठी खुपच चांगली आहे.
काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी खूप चांगले लेखन केले आहे. यादी करुन पुढच्या वेळी देतो.

प्रकाश घाटपांडे

विचार प्रवर्तक

विचारप्रवर्तक लेख आहे. ज्यांनी बंदूक कधी पाहिलीही नाही त्यांना सीमेवरच्या जवांनांच्या मानसिकता कळणे अवघड आहे, हा मुद्दा विशेष वाटला. नेहेमी स्वत:ला सतर्क म्हणवणारा कायदा युद्धाच्या वेळी गायब झालेला दिसतो. हा शेवटच्या तीन परिच्छेदातील विरोधाभास थांबून विचार करायला लावतो.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अवांतर

ज्यांनी बंदूक कधी पाहिलीही नाही त्यांना सीमेवरच्या जवांनांच्या मानसिकता कळणे अवघड आहे
अगदी खरं... एकदम 'सेविंग प्रायवेट रायन' आठवला. दुसर्र्‍या महायुद्धात अमेरिकन कॉलेजवयीन मुले/शिक्षक इ. मंडळी पुर्ण सैनिक शिक्षण नसताना ज्या प्रसंगांना सामोरे गेले आहेत त्याच्या मानसिकतेचं जबरदस्त चित्रण या चित्रपटात आहे.

+१

एकदम 'सेविंग प्रायवेट रायन' आठवला. दुसर्र्‍या महायुद्धात अमेरिकन कॉलेजवयीन मुले/शिक्षक इ. मंडळी पुर्ण सैनिक शिक्षण नसताना ज्या प्रसंगांना सामोरे गेले आहेत त्याच्या मानसिकतेचं जबरदस्त चित्रण या चित्रपटात आहे.

सहमत आहे. कुठलाही फिल्मीपणा, उदात्तीकरण येउ न देता लढाईचे वास्तववादी चित्रीकरण या चित्रपटात आहे. पहिल्यांदा पाहिला तेव्हा सुरुवातीची २० मिनिटांची ओहामा बीचवरची चढाई बघून गळाठून गेलो होतो, कुठलीही प्रतिक्रिया देणे शक्य झाले नव्हते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर