ज्योतिषांचे भविष्य

Jyotishache Bhakita" alt="">

आम्ही "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..." भाग १ प्रकरण ५ मध्ये प्रश्न क्रम ५४ मध्ये असेच काही म्हटले आहे

Comments

काय करणार

जगण्याची साधने अशी डळमळीत असली की माणूस आपोआपच या मर्गाकडे जातो.
तसे नसून आयुष्यात अँग्झायटी नि डिप्रेशन आले तरी याचा खूप उपयोग होतो.
त्यामुळे माझा या अतार्किक नि अनाकलनिय गोष्टींना पुर्ण पाठींबा आहे.

आपला
गुंडोपंत

सुधारक अमेरिकन

मला वाटायचे आपल्याकडेच भारतात चांगले ज्योतिषी आहेत. अमेरिकेत आहेत आणि त्यांच्या भविष्यावर तिथले लोक विश्वास
ठेवतात हे वाचून आपण या बाबतीत त्यांच्या मागे नाही हे समजून बरे वाटले. --वाचक्‍नवी

अमेरिकन ज्योतिषी

मला वाटायचे आपल्याकडेच भारतात चांगले ज्योतिषी आहेत. अमेरिकेत आहेत आणि त्यांच्या भविष्यावर तिथले लोक विश्वास ठेवतात हे वाचून आपण या बाबतीत त्यांच्या मागे नाही हे समजून बरे वाटले.

आपण त्यांच्या मागे नाही, ते आपल्या खूप पुढे आहेत. ;-)

कोण्या एका कार्यक्रमात,
ज्योतिषी*: "तुम्हाला एक स्टिलबॉर्न मुलगी झाली होती काय?"
बाई: "हो पण ती खूप खूप पूर्वीची गोष्ट."
ज्योतिषी :"सुमारे ३० एक वर्षांपूर्वीची का?"
बाई: "हो तेवढा काळ गेला असावा."
ज्योतिषी: "ती मुलगी मला तुमच्या आसपास दिसते आहे. आता ती ३० वर्षांची सुदृढ तरुणी आहे." (घ्या! म्हणजे मेलेल्या माणसांची वयेही वाढतात.)

* सदर गृहस्थ अगदी ज्योतिषी असे म्हणता येणार नाहीत. पॅरानॉर्मल तज्ज्ञ इ. आहेत, पण त्याचा उपयोग करून भाकिते करतात. आपल्याकडे हे फ्याड अद्याप रुळायचे आहे.

एनाराय् आणि अंधश्रद्धा/प्रतिगामी मूल्ये

..... हा एक स्वतंत्र पोटविषय ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत मी साधु-बाबा-पत्रिका-जातपात यासंदर्भात काही गोष्टी अनुभवल्या, काही ऐकल्या आणि काही वाचल्या. अमेरिकेला येऊन स्थायिक होण्यामागचा आर्थिक स्मार्ट्-नेस् लोकांकडे असतोच ; पण उपरोल्लेखित बाबींबद्दल येथील काही थोडे भारतीय वंशाचे लोक (आणि काही मराठी बांधवसुद्धा !) मनाने गेल्या शतकात (सॉरी, गेल्याच्या गेल्या शतकात ) राहात आहेत असा , मनाला विषाद देणारा अनुभव काही वेळा येतो.

(अमेरिकेतील माझ्या बंधु-भगिनींनो , "काही थोड्या" लोकांबद्द्लचे हे विधान आहे हे कृपया नमूद करा. )

पाश्चात्य फलज्योतिष चिकित्सा

अहो मुक्त सुनितजी एनारायच कशाला ? पाश्चिमात्य स्थानिक लोकांचेही तेच होते http://mr.upakram.org/node/276#comment-3384 येथील भाग २ मध्ये एरिक रेग यांचे संकलित विचार आहेत. ई बुक होतय बहुतेक. थोडी वाट पहा. अमेरिका वारी करुन आलेले ज्योतिषी वसंत दा. भट सांगतात ना! "वेद "या शब्दाचे तेथिल त्यांना भेटलेल्या लोकांना किती "वेड "आहे ते. आपण http://mr.upakram.org/tracker/582 येथे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी चे ....पुस्तकातील पाच प्रकरणे वाचली असतीलच ना?

प्रकाश घाटपांडे

अहो

अहो ! अमेरिकन असला तरी माणूसच आहे...
त्याला ही आपले भविष्य आशादायक आहे की नाही हे पाहावेसे
वाटले तर काय बिघडले बॉ तुम्हा सो कॉल्ड सुधारणावाद्यांचे?

अँग्झायटी का कुणाला चुकली आहे? तसे झाले तर मग सगळेच ज्ञानेश्वर नाही का होणार?
आम्ही आपली सामान्य माणसे आहोत. नि ज्योतिष हा आमचा आमच्या मनाला आसरा आहे.

उगाच कीस पाडू नका...
तुम्हाला जायचे तर जावू नका...

आमच्या जाण्यावर कशाला इतका त्रास करून घेता?
त्यात आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार दुबळी माणसे!

आपला
ज्योतिषवादी दुबळा
गुंडोपंत

महांबरे नव्हे पाडगावकर!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
शुक्रताराचे कवि गंगाधर महांबरे नसून मंगेश पाडगावकर आहेत. इथे पाहा.

संधीकाली या अशा

प्रकाटाआ
द्विरुक्ती झाल्याने

संधीकाली या अशा

सर्कीटना " संधीकाली या अशा" हे म्हणायच होतं आमच्या ते लक्षात आले. असा गोंधळ "जेथे सागरा धरणी मिळते" या भाव गीताचा गीतकार स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत असा होतो. वस्तुतः त्याचे गीतकार हे पी सावळाराम आहेत . त्यांना " सागरा प्राण तळमळला" या ने मजसी ने गीतातल्या ओळीत साधर्म्य वाटल्या मुळे असा गोंधळ होतो.
प्रकाश घाटपांडे

रंजना पेठे नव्हे!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
(अरुण दाते / रंजना पेठे.. म्हणून घोळ झाला.)

लता मंगेशकर आहे सहगायिका! इथे पाहा.

अजून थोडीशी माहिती...

अरुण दाते आणि रंजना पेठे "शुक्रतारा" नावाचा कार्यक्रम सादर करायचे.

रंजना पेठे या आताच्या रंजना जोगळेकर आहेत. पूर्वी बर्‍या गायच्या!

तात्या.

--
आम्हाला येथे वाचा!

चंदु

अजून माहिती-

"चंदुके चाचाने चंदु के चाचीको चांदी के चमचेसे चटनी चखाई"

यात ८ 'च' पासून सुरु होणारे शब्द आहेत.

हे गाणं ऐकुन दिवस सुरु केल्यास उत्साह वाटू शकतो असे आमचे एक डिप्रेस्सिव मित्रवर्य म्हणतात.

आपला
गुंडोपंत चाचा

साम्य

या दोन वाक्यांचा एकमेकांशी नेमका संबंध काय?

साम्य आहे ते असे कि दोन्ही वाक्ये एकाच व्यक्तीच्या संबंधाने आहे.
अवांतर- बघा वर्तमानाची चिकित्सा करताना अनेक विसंगतींना , प्रश्नांना तोंड द्याव लागत तिथ "भविष्याची चिकित्सा " करताना मला किती तोंड द्याव लागत असेल? पण पुस्तकाची निर्मिती हे त्याचच फल आहे बर का?
प्रकाश घाटपांडे

 
^ वर