कुमार बर्वे
मेरीलँड राज्याच्या स्टेट हाऊस मधे बहुमतवाल्या डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते - कुमार बर्वे यांना मद्य पिउन गाडी चालवण्याच्या आरोपात पोलीसांनी अटक केली. चुकीची गाडी चालवलेली पाहून पोलीसाने त्यांना थांबवले. दारूचा वास आल्यामुळे विचारल्यावर बर्वे यांनी दोन पेग घेतल्याचे सांगीतले. त्यांच्या रक्तामधील मद्यांश हा ०.१० इतका म्हणजे ०.०८ या राज्याने ठरवलेल्या मर्यादेच्या वर होता. विशेष म्हणजे ती मर्यादा ०.१ वरून ०.०८ ही श्री, बर्वे यांच्या आग्रहाने कायद्यात रुपांतरीत झाली होती. याचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काही परीणाम होईल असे वाटत नाही.
पण लगेच बेड्या ठोकून त्यांची वरात काढणे हे जरा वांशिक भेद आहे का असे मला वाटले. इतके राजकारणी आणि अतिमहत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी काहीना काही चुका केल्या होत्या. बर्वे यांची पण चूक निश्चितच आहे. त्यासाठी (पकडल्यामुळे) शिक्षा करणेपण योग्य. पण त्यावर बेड्या ठोकून रस्त्यावरून नेणे हा प्रकार जरा अतीच वाटला. आपल्याला काय वाटते?
Comments
बहुतेक वंशद्वेष नसावा
बर्वे हे गेली कित्येक वर्षे विधिमंडळात आहेत, आणि मी त्यांच्या थोड्याफार मुलाखती (नीट लक्ष न देता*) ऐकल्या आहेत. मुलाखतीत किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्यांत त्यांच्या वंशाचा उल्लेख झालेला मी ऐकलेला नाही. (जसे की बॉबी जिंदलच्या बाबतीत वंशाचा उल्लेख जवळजवळ प्रत्येक बातमीत होतो, तसा तर मुळीच नाही.)
पण आता स्थानिक बातम्यांवर जरा लक्ष ठेवून ऐकेन. कधी कधी शब्द नाही तरी शब्दाच्या सुरावरून काही ढोबळ अंदाज करता येतो. काही नवीन ऐकले तर कळवतो.
*फार लक्ष याकरिता देत नाही, कारण मेरीलँड राज्याच्या विधिमंडळात बहुतेक राजकीय संघर्ष वैयक्तिक चढाओढीबद्दल असतात, त्यामुळे मुद्द्याचे प्रश्न, उत्तरे मुलाखतींमध्ये कमीच विचारतात.
वंशद्वेष
>>पण लगेच बेड्या ठोकून त्यांची वरात काढणे हे जरा वांशिक भेद आहे का असे मला वाटले.
जर बर्वे याना सामान्य मेरिलॅंडकरापेक्षा वेगळ्या रीतीने वागवले गेले असेल तर ...
१. जर वागणूक/शिक्षा जास्त वाईट/कठोर असेल तर तो रेसिझम् चा परिणाम आहे असे म्हणायला जागा निर्माण होते.
२. जर वागणूक/शिक्षा इतरांपेक्षा सौम्य असेल तर त्यांच्या राजकीय वजनाचा फायदा त्याना झाला असण्याची शक्यता दिसते.
मी आज सकाळी पोस्ट्" मधे ही बातमी वाचली. मला वरीलपैकी कुठल्याही शक्यतेबद्दलची कसली माहिती त्यातून मिळाली नाही. (त्यांचा फोटो बाकी मी या निमित्ताने पहिल्यांदा पाहिला.)
मद्य पिऊन गाडी चालवणे
बातमीत बर्व्यांची गाडी पिवळ्या दुहेरी विभाजक रेषेवरून चालत असल्याने त्यांना थांबवण्यात आल्याचे म्हटले आहे. याला बेजबाबदारपणा म्हणता येईलच. मद्यतपासाणीच्या परीक्षेत अशारितीने पकडले गेल्यास सर्वांनाच बेड्या ठोकून तुरुंगात नेले जाते काय? तसे असल्यास, बर्व्यांना कोणत्याही प्रकारची सूट देणे योग्य वाटत नाही. त्यांची वरात काढली गेली असेही म्हणता येऊ नये.
माझ्या आठवणीप्रमाणे गेल्यावर्षी सुपरबोव्ल जिंकून इंडीत परतलेल्या आमच्या संघातील एका प्रसिद्ध खेळाडूला पार्टीनंतर पहाटे हायवेवर ८० मैलाच्या* वेगाने गाडी चालवण्याबद्दल पकडले गेले होते आणि बेड्या घालून तुरुंगात रवानगी झाली होती. त्याच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी केवळ ०.०९ (म्हणजे अगदी .०१ ने जास्त) होती. तेव्हा कायदा प्रत्येकाला, कोणत्याही प्रसंगी समान असावा.
* दिवसा माणसे ८५-९०च्या वेगाने सहज गाड्या हाकतात.
म्हणूनच
(माझ्या मनात अन्यथाही आलेच असते, पण मुद्दाम विकासरावांनी "वर्ण ?" असा खालच्या प्रतिसादात खोचक प्रश्न विचारला, त्यामुळे आकडेवारी द्यावीशी वाटली. पण भारतीय नव्हता ह्याची गारंटी १००% बरे का विकास राव ?)
मी वर्ण (कलर) हा शब्द वापरला तो या अर्थानेच आणि म्हणूनच वंश (रेस) हा शब्द वापरला नाही.. जरी कृष्णवर्णीय आणि वंशीय असे दोन्ही शब्द प्रचलात असलेतरी.
वर्ण
हो वर्ण काळाच होता. हल्ली इंडी कोल्ट्सची वर्णवर्गवारी ९५-५ नसावी ८५-१५ असावी तरीही. ;-) अर्थात, दरोगाजींचा वर्ण माहित नाही. ;-)
मुद्दे पटले.
बर्वे हे गेली कित्येक वर्षे विधिमंडळात आहेत, आणि मी त्यांच्या थोड्याफार मुलाखती (नीट लक्ष न देता*) ऐकल्या आहेत. मुलाखतीत किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्यांत त्यांच्या वंशाचा उल्लेख झालेला मी ऐकलेला नाही. (जसे की बॉबी जिंदलच्या बाबतीत वंशाचा उल्लेख जवळजवळ प्रत्येक बातमीत होतो, तसा तर मुळीच नाही.)
वर धनंजयने म्हणल्याप्रमाणे, मी काही त्यांच्या मुलाखती वगैरे ऐकलेल्या नाहीत, पण बॉबी जिंदलसारखा त्यांचा उल्लेख झाला नाही हे सत्य आहे.
मी काही घडलेल्या घटनेत कारस्थान आहे असे म्हणत नाही पण एखादी व्यक्ती अशी असू शकते का असे वाटले. बरं मी काही त्यांना शि़क्षा होणे चुकीचे असेही म्हणले नाही. पण जसे प्रियालीने सुपबोल जिंकलेल्या खेळाडूस (वर्ण?) अटक केले तसे न्यू जर्सीच्या गव्हर्नरला अपघातामुळे अटक नाही पण ९०-१००च्या वेगात गाडी चालवणे याबाबत दोषी अथवा मद्यांशचाचणी वगैरे केल्याचे मी पाहीले नाही. टेड केनडीची तर गोष्ट प्रसिद्ध आहे ज्यात त्याच्यामुळे (तरूणपणी पण राजकारणी असताना) मद्याच्या नादात गाडीचालवताना झालेल्या अपघातात एका बाईस मरण आले (आणि तो "हीट अँड रन" हा किस्सा होता).
मी स्वतः काही कुठे वर्णद्वेष वगैरे बघत नाही. पण काही घटनांच्या वेळेस मात्र असे वाटून जाते. या बाबतीतही मला वाटते ते बरोबर आहे असे म्हणायचे नाही पण वर सांगितलेल्या आणि अजून काही माहीत असलेल्या घटनांमुळे सहज वाटून गेले इतकेच.
पोलीस माणसेच
या चर्चेवर अधिक विचार केला असता असे वाटले की एखादा पोलिस प्रसिद्ध किंवा आपली आवडती व्यक्ती दिसल्याने त्याला सोडून देण्याची शक्यता आहे तर दुसरा एखादा पोलीस 'बरा सापडला!' असे म्हणून त्याला कायद्याचा बडगा दाखवण्याची शक्यता आहे. कदाचित, या घटनांत असे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मान्य! :) पण केनेडी म्हणजे जरा 'हटके' कुटुंब नाही का? म्हणजे नेहरू-गांधींसारखं! ;-)
बुश
आपले भाग्य धन्य आहे, कारण बुश कुमार, आणि चेनी आजोबा, दोघांनाही तारुण्यात मद्य पिऊन गाडी चालवल्याबद्दल "अटक" झालेली आहे. अशी जोडी आपले सत्ताधारी आहेत, ह्याचा अभिमान वाटायला हवा ;-)
अगदी खरे आहे. त्यात चेनी तर अर्जुनासारखे नेमबाज - एकीकडे बघून दुसरीकडे नेम मारणारे म्हणून आता प्रसिद्धीस पावलेत! (अर्जुनाचा विनोद अशोक सराफांच्या तोंडून ऐकलेला!). बुश बद्दलचे माहीत होते, ते आत्ता आठवले पण चेनीच तुमच्याकडूनच समजले. एक "इंटरेस्टींग" भाग म्हणजे फ्लोरीडा कायद्याप्रमाणे निवडणकीतील उमेदवारांना त्यांच्यावरील मागील गुन्हे सांगावे लागतात. या बुश (आणि आता चेनी पण) बाबांनी काय केले कोणजाणे, पण त्याची माहीती बर्याच वेळाने बाहेर आली होती असे काहीसे आठवते...
पुन्हा?
पुन्हा एकदा दिशाभूल
म्हणजे आधी कधी केली?
आता त्याला इस्पितळात न्यायचे, की मद्यचाचणी घ्यायची ?
न्यू जर्सीच्या गव्हर्नरला अपघातामुळे अटक नाही असे म्हणायचे कारण तेच तर होते. अटक नाही, पण निदान चाचणी केलेली बाहेर का आली नाही. चाचणी पोस्टमार्टेम मधेपण केली असती नाही का? मी ऐकल्याप्रमाणे गव्हर्नर चालवत होता. पण ड्रायव्हर असेल तर त्याच्याबाबतीत पण तेच म्हणणे...
तशी माहीती नाही म्हणायला आमच्या जे एफ के ज्युनीयर आणि त्याच्या एका काका बद्दल शोधली होती. (आठवते त्याप्रमाणे हा काका कोलोरॅडो मधे अल्कोहोल पिऊन स्कीईंग करत त्यातच फूटबॉल का आईसहॉकी खेळत दुसर्याहाताने व्हिडीओ शूटींग करत होता आणि झाडावर आदळला. झाडाला आणि भौतिकशास्त्रीय नियमांना कळले नाही तो कोण आहे ते आणि त्यातच त्याला बिचार्याला मरण आले..)
दारू पिऊन गाडी चालवली तर दुर्ल़क्ष करा / शिक्षा करू नका असे मी कुठे म्हणल्याचे दिसले नाही (बर्वे यांची पण चूक निश्चितच आहे. त्यासाठी (पकडल्यामुळे) शिक्षा करणेपण योग्य. पण त्यावर बेड्या ठोकून रस्त्यावरून नेणे हा प्रकार जरा अतीच वाटला.) पण आपण दिशाभूल हा शब्द वापरल्याने इतरांची तशी दिशाभूल होऊ शकते इतके नक्कीच! मी असे ही म्हणले नाही की रेसीझम अथवा वेगवेगळी ट्रीटमेंट कायम मिळते. किंबहूना त्याच्या उलटच म्हणले. (मी स्वतः काही कुठे वर्णद्वेष वगैरे बघत नाही. पण काही घटनांच्या वेळेस मात्र असे वाटून जाते.).
असो.
धन्यवाद
ड्रायव्हर अपघातातच मेला. त्याच्या पोस्ट मॉर्टेम मध्ये त्याची अल्कोहोल लेव्हल ०.०८ पेक्षा जास्त नसल्याचे आढळून आले.
धन्यवाद. ही माहीती मी केवळ आठवणिवरून देत होतो. मी पॅसेंजरची ब्लड-अल्कोहोल बघा असे म्हणत नव्हतो...
बर्व्यांनी अटक करण्याला "मी कोण आहे, ठावूक आहे का..." वगैरे सांगून विरोध केल्यानेच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात, असे वृत्त आहे.
हे मी वाचले नव्हते. पण त्या केस मधे एक सोपे विधान: In that case, he deserve what he got !
ह्या दिशाभुलीबद्दल क्षमस्व
याची अजिबातच गरज नाही! इतके गंभिर होऊन मी आलल्याला लिहीले नव्हते आणि आपल्याबद्दल खात्री आहेच :) मी फक्त काही गैरसमज होवू नयेत म्हणून माझी वाक्ये पुन्हा लिहीली इतकेच.
पण, आम्ही म्हणतो प्यावेच कशाला ?
बर्वेंनी प्यावेच कशाला आणि पीलेच तर गाडी चालवावी कशाला. खरे तर पिणा-याच्या बाबतीत वांशिक भेद बीद असा विचार करु नये बॉ असे आमचे मत आहे. कारण पिणारे हे कोणत्याच वंशाचे नसतात,असे आमचे मत आहे. :)
अवांतर :) घाटपांडे साहेब, पोलिस खात्यात आपण सेवेत होता, म्हणून आम्ही आपणास विचारतो. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी किती (कोणत्या मापापर्यंत )मर्यादेपर्यंत पिण्याची परवानगी आहे, हो !!
आपला.
०.०८ पर्यंतची सिमा पार केलेला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.
सार्वजानीक ठिकाणी...
बर्वेंनी प्यावेच कशाला आणि पीलेच तर गाडी चालवावी कशाला. खरे तर पिणा-याच्या बाबतीत वांशिक भेद बीद असा विचार करु नये बॉ असे आमचे मत आहे. कारण पिणारे हे कोणत्याच वंशाचे नसतात,असे आमचे मत आहे. :)
आपण म्हणता ते अगदी मान्य!
याबाबतीत एक मजेशीर पद्धतः
अमेरिकेन लग्नातपण (मद्य हे जनमान्य असल्यामुळे) "बार" जरी असला तरी तो "कॅश बार" असतो. थोडक्यात तुम्ही तुमच्या पैशाने प्यायली की नंतर काही गोंधळ झाला तरी त्याची कायदेशीर जबाबदारी यजमानावर येत नाही!
माझाच अनुभव
मुंबईला नोकरीत नवा होतो तेव्हा आमच्या वायरलेस मेंटेनन्स व्हॅन चा इन्चार्ज म्हनून काम करताना डायवर च्या तोंडाला भकाभका वास मारत व्हता. आपण सदेह कामाच्या ठीकाणी पोचु का असा संभ्रम वजा भीती माझ्या मनात निर्माण झाली. ती माझ्या सहकार्याने चेह-यावरुन वाचली. "अहो काळजी करु नका ! टाकलीय ना? मंग व्यवस्थीत चालवन! टाकली नाही तरच बेनं ऍक्शीडंट करन!"
प्रकाश घाटपांडे
फोटो बघून
नाव नसते सांगितले तर फोटो बघून हा माणूस मला अमेरिकनच वाटला असता...
असो.
आपला
जरासा वर्णवादी भासणारा
गुंडोपंत
मपल्याला बी
अहो पुन्यात लहानपनि कधि यायचो तव्हा हॅट घातलेली. प्यांटीला बॉटमला क्लिप लावलेली, गौरवर्णीय, नितळ चेहर्याची. गॉगल घातलेली, (गॉगल नसेल तेव्हा निळसर घारे डोळे असलेली) पुन्यातल्या नारायन् सदाशिव पेठेतील रस्त्यावरुन सायकलवर जायची तेव्हा मी गावात जाउन फुशारक्या मारायचो मी विंग्रज पघितला. पन यकदा तसल्या मान्सांना अनुनाशिक म्हराटी बोलताना ऐकल अन सगळा ईच्का झाला.
प्रकाश घाटपांडे
गम्मत
आज वर्तमानपत्रात एक किस्सा वाचला. कोणाएका प्रतिष्ठित व्यक्तिवर खटला चालला होता. काय निर्णय लागेल याच्या साठी बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळीं न्यायालयात जमा झाली होती. ते पाहताच आरोपीच्या वकिलाचे धाबे दणाणले. त्याने सगळ्यानाच एका कोपर्याआड दडवले. कारण इतकी गर्दी पाहिली तर न्यायाधिश हमखास ज्यास्त शिक्षा देतात असा अनुभव आहे. शेवटी एका दिवसाची शिक्षा झाली.
शेवटी पळ्साला पाने तिनच.