उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ऑस्ट्रेलियात लेबर पार्टी सत्तेवर
निनाद
November 25, 2007 - 6:02 am
ऑस्ट्रेलियात लेबर पार्टी सत्तेवर
ऑस्ट्रेलियात लेबर पार्टी सत्तेवर आली आहे. लिबरल पार्टीचा धुव्वा उडवून लेबर पार्टीने जबरदस्त विजय मिळवला आहे.
यात लेबर पार्टीचा जोर इतका जास्त होता की (माजी) पंतप्रधान जॉन हॉवर्डही निवड्णूक हरले आहेत! लेबर पार्टीचे अध्यक्ष केविन रड, हे ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान असतील.
वाढलेले व्याज दर आणी जॉन हॉवर्ड यांनी औद्योगिक संबंधांवर आणलेले विधेयक हेच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले असावे असे मत काही राजकिय निरिक्षक मांडत आहेत.
केविन रड यांची लेबर पार्टी, लेबर युनियन्सना ऑस्ट्रेलिया मध्ये परत चांगले दिवस आणेल असेही मत सर्वसाधारणपणे व्यक्त होत आहे.
सामान्य जनतेला नेतृत्वात बदल हवा होता हे ही यातून दिसून आले आहे.
याचा भारतावर काय परिणाम असेल हे मात्र नवीन सरकारची धोरणे जाहिर झाल्यावरच स्प्ष्ट होईल असे दिसते आहे.
दुवे:
Comments
शक्य आहे
सत्ता व युद्धाला लालचावलेले हे लोक बदलले तर योग्यच होईल.
पण त्या आधी हे बघणे आवश्यक आहे की आजचा अनभिषिक्त माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांची धोरणे काय आहेत. हा मुद्दा येथे काहीसा अयोग्य वाटेल, पण इतिहास असा आहे की, जो निवडणूकीला उभा असलेला नेता रुपर्ट मरडॉक ला भेटतो तोच निवडून येतो.
यात बुश पासून सर्व नेते आहेत. मागच्य अमेरिकन निवडणूकी आधी बुशची. या निवडणूकीत हिलरी, ओबमा की अजून कुणाची कुणाची भेट होते याची एक लहानशी बातमी प्रसृत केली जाते. लक्ष ठेवल्यास जाणवेलच/कळेलच.
ऑस्ट्रेलिया मध्ये या वेळी जॉन हॉवर्ड ची भेट न होता केविन रड यांची भेट मरडॉक यांच्याशी झाली होती...
यावर 'फोर कॉर्नर्स' या डॉक्युमेंटरीही सिरिज मध्ये एक डॉक्युमेंटरीही आहे.... नाव आठवल्यावर देतो.
नक्की पहा!
त्यामुळे मला या सत्तेच्या बाहुल्या वाटतात. खरे सत्ताधारी सुत्रधार वेगळेच आहेत/असावेत.
(या वेळी मी लावलेल्या सर्व पैजा 'या मरडॉक निकषावर' जिंकल्या आहेत. ऑ$५०० जिंकले... :) )
फ्रान्स, कॅनडा, जर्मनी
येथे मात्र युद्धविरोधी पार कोलमडले. जे युद्धविरोधी होते तिथे (पूर्वीच्या मानाने) युद्धप्रिय सरकारे आलीत, युयुत्सू सरकारांच्या ठिकाणी युद्धबंदीस उत्सूक सरकारे आलीत. स्थानिक स्थिती उलथण्याचा पाश्चिमात्य लोकशाही राष्ट्रांचा कल असावा.
जॉर्ज
आमचा एक जॉर्ज फर्नांडीस फ्रांस ला गेला की खेळ खलास!
तरी सामंतांना वर पाठवलं म्हणून बरंय... नाहीतर काय झालं असतं?
मग संप बंद करणारेच बंद ;)
असो, बाकी भारतातले कोणते नेते या मरडाक बाबा ला भेटतात हे आत बघायला पायजे बॉ!
आपला
गुंडोपंत