कान आणि आवाज

कान आणि आवाज

अर्थातच हा लेख कानगोळ्यां (इयरफ़ोन्स) विषयी आहे. कानगोळे असण्याशिवाय हल्ली जीवन अशक्यच आहे. आयपॉड किंवा एमपी थ्री प्लेयरवर संगित ऐकतांना योग्य ते कानगोळे असणे आवश्यक आहे. earphonesनक्की कोणते इयरफोन्स वापरायचे या विषयी माहीती गोळा करत होतो. सापडलेली माहीती येथे देत आहे.

अतिशय मोठ्या आवाजात सदैव संगित ऐकल्याने कायमचा बहिरेपणा येवू शकतो. कानाचे बड्स वापरणे हे हल्ली सर्रास दिसते आहे. earbudsवर चित्रात दिसणारे इयर बड्स् आहेत. इयरफोन्स मध्ये बाहेरचे आवाज एका प्रमाणाबाहेर कमी करता येत नाहीत. त्यामुळे संगिताचा आवाज मोठा राखावा लागतो. यासाठी अगदी कानात आता जाणारे इयर बड्स् मिळतात. पण कानाच्या पडद्याच्या अति जवळ नेलेला आवाजाही कान निकामी करण्यास तितकाच कारणीभूत असू शकतो. मग याला उपाय काय?

याला उपाय म्हणजे कानावर बसणारे हेडफोन्स वापरणे. आपण आवाजाच्या ठिकाणी संगित ऐकणार असाल तर कानाला झाकून टाकणारे हेडफ़ोन्स वापरणे उत्तम.
यात दोन प्रकार आहेत. एक बाह्य आवाज बंद (क्लोज्ड) हेडफोन्स व बाह्य आवाज चालू (ओपन) हेडफ़ोन्स. मला आवाज चालू हेडफोन्स रोजच्या वापरासाठी योग्य वाटतात. कारण यात हवेला बाहेर जाण्यास जागा असते. त्यांमुळे कानावर कोणताही ताण नसतो. यात कानावर ताण न येता बाहेरचे आवाज 'कमी' असून संगिताचा दर्जा उत्तम मिळतो. पण बाहेरील आवाज पूर्ण बंद होत नाहीत हे ध्यानात घ्या! या साठी बाह्य आवाज बंद म्हणजेच क्लोज्ड हेडफोन्स वापरणे उत्तम. सर्वसाधारणपणे म्युझीक डिजे हे वापरतांना दिसतात. बाह्य आवाज बंद हेडफोन्स फारकाळ वापरता येत नाहीत असा माझा अनुभव आहे. दिवस उष्णता असेल तर ते नकोसे वाटतात. मात्र ओपन हेडफोन्स मध्ये हा त्रास होत नाही. तसेच कानावर बसणारी गादी जर कापडी असेल तर उत्तम. या शिवाय वायरलेस असल्यास अजून बरे!wirelessहे पहा सोनीचे एक वायरलेस मॉडेल.

हे हेडफोन्स खुप मोठे असतात असा त्याचा त्रास मात्र नक्कीच आहे. इयरफोन्स चटकन खिशात टाकून नेता येतात तसे हे नेता येत नाहीत. मात्र काही मॉडेल्स घडीचेही मिळतात. folding हे पहा एक घडी होणारे मॉडेल. याशिवाय अजून छोटी घडी करता येणारे मॉडेल्स मिळतात.

मी सोनी, टिडीके, सॅन्यो , श्रर आणि शेवटी सेनहायझर हे ब्रँडस वापरले. यात शेवटी मला सेनहायझर हा ब्रँड मला सर्वोत्कृष्ठ वाटला. या शिवाय akgए के जी हा पण एक उत्तम पर्याय आहेच.
पण हे वाटणे सर्वस्वी आपआपल्या आवाडीवर व कानावर अवलंबून आहे.
हे हेडफोन्स कसे चालतात व इतर विषयावर इंग्रजी विकिपेडीयावर व्यापक माहीती आहेच.

या शिवाय आपणास नवनवीन मॉडेल्सची अधीक माहीती हवी असल्यास येथेयेथे पहा.

Comments

चांगलाच असावा.

बोसबाबांचे संशोधन व याची किंमत याचा विचार करता चांगलाच असावा.
(याचा वापर करत एम.पी. थ्री किंवा तत्सम कॉम्प्रेस्ड फॉरमॅट मधील गाणी ऐकणे हा याचा अपमान ठरतो काय?)

जर

माझ्या मताने हेडफोन्स घेतांना 'कोणता ब्रँड आहे' या पेक्षा
ही तो हेडफोन 'तुम्हाला तुमच्या कानाला' कसा वाटतो हे महत्वाचे.

मी आपल्याला असे सुचवतो - आपण आपली सगळ्यात आवडती गाण्यांची तबकडी घेऊन त्या दुकानात जा व त्या सेल्समनला ती तबकडी वाजवायला सांगा. या मध्ये जे हेडफोन्स तुमच्या कानाला चांगले वाटतील तेच सर्वोत्तम आहेत हे लक्षात घ्या. मग तो ब्रँड कोणता आहे याचा विचार करू नका. माझ्या माहीती प्रमणे बोस हे छोट्याशा स्पीकर मधून भव्य सराऊंड साऊंड काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हेडफोन्स साठी नाहीत.

तुम्ही घेण्या आधी ए के जी K 141 Studio नक्की ट्राय करा. आपण बहुदा हिंदी गाण्यांसाठी व व्होकल ऐकाल असे समजून सुचवतो आहे. कारण बॉलिवूड च्या स्टुडीयोज मध्ये हा बर्‍यापैकी प्रचलीत आहे. म्हणजे तुम्हाला जे संगितकाराला किंवा गाणार्‍याला अपेक्षित होते ते मिळू शकेल असे वाटते. या शिवाय सेनहायझर चा HD215 पहा कसा वाटतो.

मला वाटते

$३०० हे योग्य पैसे आहेत तसे...

आपण मी वर म्हणालेला चा HD215 पहा... हा साधारण $२०० ते २५० पर्यंत किंवा कमी मध्येही मिळावा...
ए के जी च्या सद्य किमंती ची कल्पना नाही पण या रेंज मध्येच नक्की मिळून जाईल.

बापरे?

अहो येवढ्या पैशात तर एक घरगुती गाण्याच्या मैफीलीचा झकास कार्यक्रम होईल ना....
चांगला बुवांच्या समोर बसून ऐकायचं गाणं!
त्यात जी मजा आहे ते या कसल्याही गोळ्यांमधून कुठून येणार आहे?

हल्ली सगळेच संगित कधीही ऐकायला मिळायला लागल्याने नव्या पीढीला कशाची किंमतच वाटत नाही असे गुंडोपंतांचे मत आहे. त्यात या रिमिक्स मध्ये कुठेही आलाप नि कुठीही चमत्कृतीपूर्ण ताना वापरून पार वाट लावून टाकतात... जावू द्या हा गुंड्या काय बोलणार..

आपला
मैफिलीतले गाणेच सर्व सुंदर मानणारा...
गुंडोपंत

बोस

मागे ऍमेझॉनवर हेडफोन्सचे रिव्यूज वाचताना बोसचे हेडफोनस् हे अनावश्यक महाग आहेत असे बर्‍याच जणांनी लिहिलेले वाचले होते. अर्थात 'व्हॅल्यू फॉर मनी' हे व्यक्तिसापेक्ष असल्याने शेवटी ज्याचे त्याने ठरवावे. पण घेण्यापूर्वी एकदा ऍमेझॉनवरील रिव्यूज वाचून घ्या.
-कोलबेर

अनुभव

माझा सोनीचा अनुभव वाइट आहे. (हाच अनुभव सोनीच्या एमपी३ प्लेअरबद्दलही आला होता*.) इअरप्लग्ज घेतल्यावर ३ महिन्यातच एका बाजूने काम करेनासा झाला. सध्या फिलिप्स चे वापरतो आहे.

*सोनी एम्पीथ्री प्लेअरचे हार्डवेअर चांगले आहे. पण याला सोनिकस्टेज हेच एक सॉफ्टवेअर चालते. आणि हे सॉफ्टवेअर वापरल्यानंतर तुम्हाला वैराग्य येणार ह्याची ग्यारंटी. नको हे सगळे, नको हा एमपीथ्री प्लेअर वगैरे :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आवाजाच्या

आवाजाच्या दुनीयेत सोनी हा बर्‍यापैकी 'ऑर्नॉमेंट्ल' ब्रेंड आहे. म्हणजे बर्‍यापैकी दिखावटी म्हणता येईल असा. आवाजावरील हुकुमतीपेक्षा विक्री तंत्रावरील हुकुमतीनेच ते विक्री साधतात असे मी मानतो. पण फिलिप्सही काही वेगळा नाही. त्यापेक्षा सॅन्यो वापरून पहा नक्कीच पाकिटाला फारसा फरक न जाणवता आवाजात नक्की फरक जाणवेल !

स्वारोवस्की-फिलीप्स

कालच स्वारोवस्की "खडे" असलेले फिलीप्सचे हेडफोन्स् (युएसबी डीवाइस) पाहीले. हे ऐकताना चांगलेच "लक्ष"पुर्वक ऐकावे लागते का?

शांततेचे कानगोळे

लेख माहितीपूर्ण आहे. या अनुषंगाने एक कुतूहल आहे. ब-याच वेळा महत्त्वाच्या बाबींवर चित्त एकाग्र करतांना आजूबाजूचे आवाज (अगदी पंखा किंवा संगणकाचाही) एकाग्रतेत व्यत्यय आणल्यासारखा वाटतो. त्यावर अचूक शांतता निर्माण करणारे कानगोळे उपलब्ध आहेत का? साधे कापसाचे गोळे किंवा तत्सम उपाय फारसे परिणामकारक नाहीत असा अनुभव आहे.

स्नेहांकित,
शैलेश

सहमत

लेख माहितीपूर्ण आहे.

सहमत आहे.

कानाशी संबंधित अनेक प्रकारचे इअरप्लग्ज मिळतात. त्यात एखादा विशिष्ट आवाजच ऐकता येणे, किंवा रात्री झोपेसाठी शांतता राखण्यासाठी, पोहोताना कानात पाणी जाऊ नये म्हणून असे अनेक इअरप्लग्ज (कानगोळे) मिळतात. येथे अधिक माहिती मिळेलच्.

धन्यवाद

धन्यवाद.!
प्रियालींनी म्हंटल्याप्रमाणे असे हवा तो एफेक्ट साधणारे कानगोळे मिळतातच. किंवा सरळ स्पंजचे कानाच्या कॅनलला संपुर्णपणे फिट बसणारे इयरप्लग्ज मिळतात हे तसे स्वस्त मिळावेत. रू १० ते १५ च्या आसपास... (पुर्वी ते रु.३ ला मिळत)

याशिवाय कोणतेही क्लोज्ड हेडफोन्स हे नुसतेच कानावर ठेवले असताही 'काही अल्प प्रमाणात' आपल्याला शांतता देतीलच.

नॉईज कॅन्सलींग हेडफोन्स

त्यासाठी आजकाल नॉईज कॅन्सलींग हेडफोन्स पण मिळतात.
-कोलबेर

हा हा हा

वा आवाज बंद करणारे हेडफोन्स! हे मस्त आहेत.
गरबा, गणपती आणी दिवाळीत चांगले विकले जातील असे वाटते.
बहुतेक पार्लमेंट मेंबर्सना निवडून आल्यावर हे ऑटोमेटीकली फिट केले असतात का हो?

आता कुणीतरी
संपादकांसाठीही "अनावश्यक प्रतिसाद नॉईज कँसलींग डिव्हाईस" बनवा... म्हणजे ते आशिर्वाद देतील.. नि माझ्यासारख्याना आधीचा बाजूला ठेवतील ;))

आपला
गुंडोपंत

ब्रँड

हे वाक्य मूळ लेखात टंकायचे राहिले होते ते आता येथे देत आहे. नोंदवणे महत्वाचे वाटले - ज्यांना काना'वर' कोणता ब्रँड आहे हे दाखवायचे असेल तर मग 'आत काय आणि कसे वाजते' आहे याच विचार करण्यात अर्थ नाही!

 
^ वर