नवी लोकल !

मुंबईला नवी लोकल चालू झाल्याचं वाचलं. आनंद झाला.

१. यात तुमच्यापैकी कोणी बसलय का? कशी वाटली लोकल? खरच हवेशीर आहे की दुपारी दोन ला धावल्यामुळे हवा आत येऊ शकली ;) ?
२. दरवाजाला या नवीन डब्यात मध्यभागी दांडा असलेच पण डब्याच्या उजव्या व डाव्या बाजूला दांडा आहे. हे दांडे उगाच मधे मधे नाहीत ना ?
३. सिमेन्स कंपनीच्या तंत्रज्ञानाची कमाल लोकलच्या उपकरणांमध्ये दिसून येईल. कोणी अधिक प्रकाश टाकेल काय? असं कोणतं तंत्र आहे?

-ऋषिकेश

Comments

नवी लोकल

मुंबईच्या लोकल्ज कलकत्यात बनतात. मुंबईचे हवामान विचारात घेऊन त्या तयार करत नाहीत. सध्या चालू असलेल्या लोकल्ज येण्यापूर्वी लाकडी ठोकळ्यासारख्या जड गाड्या होत्या, त्याही बर्‍यापैकी हवेशीर होत्या. रेल्वेत झालेली कोणतीही सुधारणा म्हणजे एक पाऊल मागे असते. पूर्वी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाणार्‍या गाडीत दुसर्‍या वर्गात एका रांगेत पाचजण असत, आता सहा असतात. त्यातल्या दोघांना अर्ध्याच जागा मिळतात. पूर्वी तीन वर्षाखालच्या मुलांना फुकट प्रवास असे, ती कशीबशी का होईना, मांडीवर बसू शकत. आता पाच वर्षाच्या मुलांना मांडीवर घ्यावे लागते. मध्यंतरी डेक्कन क्वीन मधील खुर्च्या बदलून नागमोडी पाठीच्या केल्या. स्त्री-प्रवाशांनी प्रचंड नाराजी दाखवल्यामुळे ते डबे आता दुसर्‍या कुठल्यातरी गाडीला जोडायला लागले. आता शयनयानामध्ये कडेला दोन ऐवजी तीन प्रवासी झोपणार आहेत. म्हणजे तोही प्रवास आता सुखाचा होणार नाही. पूर्वीचे सोफा असलेले पहिल्या वर्गाचे डबे कुर्सीयान केल्यामुळे हल्ली अनेकदा वार्‍याकडे पाठ करून प्रवास करावा लागतो.
आपण आशा करू या की या नव्या लोकल-गाड्या सुखावह असतील. --वाचक्‍नवी

अरेच्या?

हा काय प्रकार? आम्ही काही काळा पूर्वी इथं एक प्रतिसाद लिहिला होता? तो कुठं गेला? की आम्हाला भ्रम झाला होता?

व्यक्तिगत रोखाचे अनावश्यक प्रतिसाद उपक्रमाच्या धोरणांत बसत नाहीत. सदस्यांनी आपली कार्यशक्ती अश्याप्रकारच्या प्रतिसादांत वाया घालवण्यापेक्षा विषयाशी संबंधीत प्रतिसाद देण्यात वापरावी. - संपादन मंडळ.

खुलासा करावा

असंबद्ध प्रतिसाद चालतो तुम्हाला.पण तसे का? विचारले तर नाही चालत? आणि व्यक्तिगत रोख ही काय भानगड? मग आम्ही काय सतत 'क्ष' व्याक्ति आणि 'ज्ञ' व्याक्ती असे म्हणायचे का?
-किमयागार

आता तरी बसतय का धोरणात?

भारतीय रेल्वेवरील आपली नाराजी ह्या विषयावरील आपले मत प्रदर्शन टाळून कोणी इथल्या प्रश्नांना उत्तरे दिली तर आम्हालाही वाचायला आवडतील!
-किमयागार

नवीन ब्रेक्स

मला वाटते नव्या लोकल्स मध्ये सिमेन्स ने
नवीन ब्रेक्सची यंत्रणा (म्हणजे नव्या पद्धतीची) बसवली गेली आहे.

या शिवाय या लोकल्स ची मोटरही वेगळ्या प्रकारची असावी.
तसेच चमकत्या पाट्या हे ही वैशीष्ट्य आहेच.
आशा हे की सिट्स आरामदायक असतील. नि ए. सी. जोरदार असतील!
आपला
गुंडोपंत

एसी नाही आहेत

गुंडोपंत,

असं ऐकलय की एसी नाही आहेत :(

-(एसीप्रेमी) ऋषिकेश

नवीन रचना

मी नवीन लोकल मध्ये बसलो नाही. पण फोटोंवरून कळते त्याप्रमाणे, ह्या नवीन लोकलच्या बाकड्यांचा आकार छोटा आहे. दुसरे, बसण्याच्या जागेकडे जाणारी वाट आहे, तिथे उभा दांडा नाही. तो आधाराला बरा असतो.
आता पश्चिम रेल्वे कडे एक गाडी आहे, त्यात पुढचे स्टेशनचे नाव दाखवणारे दर्शक आहेत. त्या गाडीत एकदा बसण्याचा योग आला होता. पहिल्या स्थानकात बाकड्यावर बसल्यावर दर्शक दिसत, पण पुढे गर्दी झाली की, समोरचा माणूस दिसत नाही , तिथे दर्शक काय दिसणार. आणि ही परीस्थिती रात्री १० वाजताची आहे.
रिकाम्या गाड्यांचे चकाचक फोटो दाखवून रेल्वे व्यवस्थित मार्केटींग करत आहे.

तसेच

पायाखालचा पत्रा गुळगुळीत आहे असे कुठेतरी वाचले. ते जरा जस्तच धोकादायक आहे. असो. आमच्या हर्बर लाईनवर या गाड्या येईस्तो ह्या सगळ्या चुका दुरुस्त झालेल्या असतील असे वाटते.

आपला,
(हर्बर लाईननाल) भास्कर
आम्ही येथे वसतो.

योग्य पण संथ

चला आता चांगल्या नव्या गाड्या मुंबईतल्या रुळांवर दिसणार तर. नव्या व अधुनिक गाड्यांचा निर्णय चांगला आहेच. पण खूप जास्त गाड्यांची गरज असताना एक दोन गाड्यांनी काय होणार असा प्रश्न पडत आहे.

आपला,
(गर्दीतला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सिमेन्सकडून डिझाईन घेताना ....

मागे शताब्दी एक्स्प्रेसचे नवे जर्मन डबे, तांत्रिक दृष्ट्या चुकीचे (म्हणजे भारतीय रेल्वेचे रूळ लक्षात घेता, आणीबाणीच्या परिस्थितीत रुळावरून घरसरतील असे) असल्याने पुन्हा जुनेच डबे जोडण्यात आले होते. ज्या अभियंत्याने ही त्रुट शोधली त्याचे रेल्वे आयुक्तांनी कौतूकही केल्याचे वाचनात आले होते.
पुन्हा सिमेन्सकडून डिझाईन घेताना हे लक्षात घेतले असले म्हणजे मिळवले.

कालच

कालच या लोकलने प्रवास केला. पण दुपारी गेल्यामुळे ट्रेन हवेशीर वाटली. गर्दीच्या वेळचे माहित नाही. पण ही लोकल खरेच प्रशस्त आहे. तीन खांब दिले आहेत खरे, पण त्यांचा फारसा उपयोग नाही.
राधिका

 
^ वर